Jan 22, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 29

Read Later
नंदिनी...श्वास माझा 29

भाग  29

Wow......she is so pretty......

कोण आहे ती..... फर्स्ट टाइम ऑफिस मध्ये बघत आहे....

I think she is Mrs Shriraj Deshmukh...... मी तिथे रिसेप्शनिस्ट च्या काउंटरला ला बोलताना ऐकलं......

ओ माय गॉड ...शी इज रियली व्हेरी ब्युटीफूल.... म्हणूनच सर ऑफिसमध्ये कुणाकडे बघत ही नाही...... एवढी हॉट PA असूनही कधीच सरांनी तिला भाव दिला नाही..... किती त्यांच्या मागे मागे करत असते...

They look made for each other ......

नाही सर जास्ती हँडसम आहेत.......

जेलस हा........ She is also very sweet....

ऑफिस मधून रिसेप्शनिस्ट सोबत आत मध्ये येत असलेल्या नंदिनीला बघून तिथला स्टाफ गप्पा करत होता.... नंदिनी दिसत ही तशीच होती...... बेबी पिंक कलरचा knee-lenghth वन पीस घातला होता....तो ड्रेस तिच्या रंगाला मॅच होता त्यामुळे तिचा तो नितळ गोरा रंग खूप उठून दिसत होता....... मॅचिंग क्लॉथ  शुज.... कानामध्ये वन डायमंड..... गळ्यामध्ये छोटेसे डायमंड मंगळसूत्र...... केसांमध्ये दोन भाग करून साईड छोटे छोटे दोन वेण्या घालून... वरती पिन मध्ये बसवलेल्या होत्या.... बाकी सगळे केस मोकळे सोडले होते.... केस कुरळे असल्यामुळे ते खूपच सुंदर दिसत होते.. जवळपास तिच्या ड्रेसची लांबीचे केस होते...... चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही...... ओठांवर लिपबाम..... आणि कपाळावर तिची नेहमीची फेवरेट छोटीशी चंद्राची टिकली..... त्यात तिचे ते हिरवे घारे डोळे...... एखाद्या गोड परी सारखीच ती भासत होती..... आणि तिच्या ओठांवर छान छोटस स्माईल..... सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं....

नंदिनी ऑफिसमध्ये इकडेतिकडे बघत येत होती..... राजच ऑफिस ती पहिल्यांदाच बघत होती.... तिला खूप मजा वाटत होती...... रिसेप्शनिस्ट ने तिला एका वेटींग हॉलमध्ये बसवलं.... आणि काहीतरी बोलून ती तिथून निघून गेली.... तिथे टीव्ही लागला होता..... नंदिनी टीव्ही बघत बसली होती

आज ऑफिसमध्ये बर्‍याच मोठ्या कंपन्यांचे प्रोजेक्ट हेड..... कंपनी हेड्स आले होते.... सोबत मिडिया सुद्धा तिथे होता...... आज खूप मोठ्या डिल साइन होणार होत्या.... आणि त्याचे प्रेझेंटेशन चालले होते........ राज सुद्धा त्याच्यातच बिझी होता.......

आजचा दिवस साधूनच नंदिनीला मुद्दामून प्लॅनिंग करून ऑफिसमध्ये बोलावण्यात आले होते.... राजला ह्याची  माहिती नव्हती...... सगळ्यांसमोर नंदिनी पागल आहे असा रिविल करायचा प्लान झाला होता....... राज ची पेशन्स लेव्हल पाहता.... त्याला मेंटली कसं ब्रोक करता येईल याकडेच लक्ष दिलं होतं..... जर बाहेरच्या जगात नंदिनी पागल आहे असे सिद्ध झाले तर राज चे प्रॉब्लेम अजून वाढतील.... म्हणून हा सगळा खटाटोप चालला होता...

सगळे सेमिनार हॉलमध्ये जमले होते....बरेच सेमिनार प्रेसेंटेशन्स झाले होते..... मीडिया मीडिया वाले सुद्धा प्रोजेक्टची माहिती आणि फोटो क्लिक करत होते.....

नंदिनी ला राज कामात आहे सांगून वेट करायला सांगितले होते..... ती टीव्ही बघण्यात मग्न होती..... टीव्ही बघता बघता अचानक ती घाबरायला लागली...... ओरडायला लागली........ भूत भूत.... करती ती सैरावैरा धावायला लागली........स्टाफ ने येऊन तिला विचारले पण ती काहीच सांगायला तयार नव्हती....... ती फक्त राज कुठे आहे विचारत होती. ... एका स्टाफने तिला  सेमिनार रूम कडे बोट दाखवलं.....ती तिकडे धावायला लागली....... तिला असं बघून सगळ्यांना थोडं विचित्र वाटत होतं........ आवाजाने लावण्या बाहेर आले......ती सुद्धा बघत होती तिने नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न केला पण नंदिनी कुनाच्यानेच आवराल्या जात नव्हती...... भीतीमुळे ती खूप घामाघूम  झाली होती......भूत.....भूत....  ओरडत ती सेमिनार रूम जवळ आली..... बघते तर आत्मध्ये राज चा सेमिनार सुरू होता ......तो प्रोजेक्टर समोर उभा होता.....

राज........ नंदिनी

नंदिनी.,.. राजनी दरवाजाकडे बघितले तर नंदिनी तिथे उभी होती......... नंदिनी इथे कशी काय..... आणि अशी का ओरडत आहे...... राज विचार करतच होता की नंदिनी पळत पळत येऊन राजला बिलगली...... तिने राज ला अगदी घट्ट पकडून घेतले होते ......ती थरथर कापत होती........ राज ने  सुद्धा तिला आपल्या जवळ घट्ट पकडले.,... त्याला जाणवत होतं नंदिनी कशासाठी तरी घाबरली आहे..,... पण तिथे आलीच कशी हाच मोठा प्रश्न त्याला पडला होता.....

नंदिनी काय झालं ....तू इथे कशी काय आलीस.... हे बघ बाळा शांत हो मी आहो ना इथे..... राज तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला......

एवढ्यात सेमिनार रूम चे  सगळे लाइट्स ऑन झालेत.....अचानक लाईट ऑन झाल्यामुळे नंदिनी अजून घाबरली आणि भूत भूत... जोराने ओरडत होती........ मिडीयावाले सगळे समोर आले होते आणि फोटो काढायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या प्रश्नांची भडीमार सुरू झाली होती.... बाकी तिथे बसलेल्यांना हे काय चाललंय काहीच कळत नव्हते......कॅमेऱ्याची लाईट्स नंदिनी वर पडत असल्यामुळे नंदिनी परत राज्या शर्ट मध्ये आपला चेहरा लपवत दुसरीकडे बघत होती....... राजने सुद्धा तिला भीती वाटू नये म्हणून आपल्या हातांमध्ये लपवून घेतलं होतं.......

Mr Shriraj Deshmukh who is she.....?

ऑफिस कलिग....?

युवर गर्लफ्रेंड..... but you are married right...? Or your wife...?

असे अनेक प्रश्नांचे भरीमाढ पत्रकारांकडून होत होते...... नंदिनी मात्र ते सगळे बघून खूप घाबरली होती.....

मिश्रा देशमुख व्हाट्स गोइंग ऑन हेअर....... एका दुसऱ्या कंपनीचा मॅनेजर बोलला...... तसे बाकीच्या कंपन्यांचे सुद्धा बोलायला लागले प्रश्न विचारायला लागले......अचानकपणे घडलेल्या या गोष्टी मुले राज सुद्धा थोड्यावेळासाठी भांबावला होता.....

She is your wife.... ती पागल आहे....... कोणीतरी मागून ओरडल

पागल शब्द ऐकून पत्रकारांनी आणखीनच जास्त प्रश्न विचारणे सुरु केले........

पागल शब्द ऐकून राज ला भयंकर राग आला..... त्याने आवाज आला त्या दिशेने बघितले पण ती इतकी गर्दी होते की त्याला कोण पागल बोललो हे कळलंच नाही........ पण सर्वांसमोर त्याने आपला राग कंट्रोल केला..... राजने एक मोठा श्वास घेतला.......

Yea she is my beautiful wife Nandini ....... आणि पागल म्हणाल तर तुम्हाला ती कुठल्या अंगल ने पागल दिसते आहे.... ती सभ्य लोकांना शोभणार नाही असं काही वागताना दिसत आहे तुम्हाला ??....I am her husband.....if she is not feeling comfortable....she can come to me anytime ..anywhere...right..?.....जेव्हा आपल्याला पुढल्या बद्दल काही माहिती नसते तेव्हा त्यांना कुठली लेबल द्यायचा हक्क कोणी दिला तुम्हाला......

जेंटलमॅन  आय एम रियली सॉरी फॉर धीस डिस्टर्बन्स....... आय अपोलाइज ..........Mr Rohan will continue the seminar...आय नीड टू गो नाव.....will be back in some time......thank you.... राज एकदम स्पष्ट आणि कॉन्फिडन्स नी बोलत होता..... नंदिनी अजून सुद्धा त्याच्या जवळ त्याच्या मिठीमध्ये होती... तेवढ्यात राहुल सुद्धा तिथे आला होता...... राज नंदिनी ला घेऊन त्याच्या कॅबिन कडे जात होता पण मिडिया मात्र त्याला सोडत नव्हते...... राहुल ने  मिडीयाला अडवून धरले आणि राज नंदिनी ला घेऊन त्याच्या केबिनमध्ये गेला......ऑफिस स्टाफ मात्र त्याच्याकडे अवाक होऊन बघत होते..... आतापर्यंत ऑफिसमध्ये  पसरलं होतं की नंदिनी पागल आहे  .... रादर ते मुद्दाम पसरवल गेल होत...

राज ने नंदिनीला काऊच वर  बसवले आणि तो पाण्याचा ग्लास आणायला जात होता...

राज मला सोडून नको जाऊ...मला खूप भीती वाटते आहे .... नंदीनी घाबरतच रडत बोलली..

राज तिच्याजवळ काऊच वर जाऊन बसला....चांदणी त्याच्या मांडीवर येऊन बसली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून तिने त्याला घट्ट हग केले......

श sss..... काही नाही झालं आहे.... घाबरू नको..... मी आहो ना...... राज तिला शांत करत होता....

Bro..... मिडीयावाले ऐकत नाही आहे ....त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे...... राहुल राजचा केबिन मध्ये येत बोलला...

Okay....... राज.

तू जा बाहेर.... मी बघतो नंदिनी ला....सेमिनार रोहन सांभाळतो सो डोन्ट वरी.....राहुल

राजनी ड्रॉवर मधून दोन चॉकलेट काढून नंदिनीला दिले आणि पाण्याचा ग्लास दिला आणि तो बाहेर आला....

मिस्टर देशमुख तुमची बायको पागल नाही आहे तर त्यांना तुम्ही समोर का आणत नाहीत .....आम्हाला  त्यांच्याशी बोलायचं आहे.....पत्रकार

You all are welcome here to cover buisness deals details..... Not my personal life..... राज

जर असे आहे तर मग तुमची वाईफ इथे काय करत आहे..... आणि का तुम्ही तुमचं काम मध्येच सोडून इकडे आलात.......do she is working here .... पत्रकार

This is all  her office .....she can come here anytime .... right..? ..and she is my first priority so I am here..... राज

तुम्ही प्लीज त्यांना बाहेर बोलवल का..... आम्हाला त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत.......पत्रकार

सॉरी.......राज

तुम्ही त्यांना लपवत का आहात.... का त्यांना समोर येऊ देत नाहीत......... म्हणजे त्यांच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे.....पत्रकार

I will definately bring her infront of the world... पण ती ही वेळ नाही आहे.... जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी तिला समोर घेऊन येईल...... मला वाटते आता मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत...... तर तुम्ही इथे ज्या कामासाठी आलेले आहात तुम्ही तुमची ती कामे करावीत....please co-operate with us....... Thanks a lot.....and yess lunch is arrange for everyone so have a lunch...good day...... राज बोलून त्याच्या कॅबिन मध्ये निघून आला..

नंदिनी तुला आता बरं वाटतंय..... राज

हो..... नंदिनी ने मान हलवली....

बरं तू इतकी का घाबरली होती..... कोणी काही बोललं का तुला......राज

मी तुझी वाट बघत त्या रूम मध्ये  टीव्ही बघत बसली होती...... पहिले तर कार्टून सुरू होतो मग काहीतरी खूप घाणेरडे भयानक असे टीव्हीवर सुरू झालं...... आणि मग तिथे एक भुत आला.... खरोखर वाला...... नंदिनी परत घाबरायला लागली.....

मन्या शांत हो  ...बघ इथे कोणीच नाही आहे...राज

बरं तू इथे कशी आलीस .....मला आधी का कळवलं नाहीस......राज

मला आई म्हणाली की राज ने तुला ऑफिसमध्ये बोलावले आहे तर मग मला डॅड ने  इथे सोडलं....नंदिनी

अच्छा.....राज विचार करत होता की असं कोणी केल.... कारण त्याने तर तिला ऑफिसमध्ये बोलावले नव्हते आणि आई तरी अशी का करणार......

आणि दुसऱ्या दिवशी व्हायचे तेच झाले..... पेपर मध्ये आणि न्यूज चैनल वर नंदिनी चे आणि राज चे  फोटो फ्लॅश होत  होते........  राजला बरेच फोन येत होते..... सगळ्यांना उत्तर देत तो त्रासाला  होता..... त्याची थोडी चिडचिड होत होती.......  पण बिजनेस त्याने त्याच्या स्मार्टनेस ने सगळं व्यवस्थित हँडल केल होत ..... ऑफिस मधल चित्र मात्र थोडं बदललं होतं...... पण राज ने मात्र फालतू गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नव्हते......

******

राज आपण कधी जायचं दुकानांमध्ये खरेदी करायला........ नंदिनी

काय घ्यायचं आहे.....राज लॅपटॉप मध्ये काम करत बोलत होता

तुना बुद्धू च आहेस....... दिवाळी आहे ना आता..... किती सारी खरेदी करावी लागते.....तिकडे आबा तर मला मार्केटमध्ये घेऊन जायचे आणि जे जे पाहिजे ते सर्व घेऊन देत होते...... दिवाळीची तयारी नाही करायची का......नंदिनी

ओह तर मॅडमला शॉपिंग ला जायचं...... बरं जाऊ या संडेला.....राज

संडे...... अजून दोन दिवस आहेत......नंदिनी

आता फक्त दोन दिवस आहेत.......राज

राज..... आज जाऊ ना...... मग संडे ला किती काम करावे लागेल ....साफसफाई ....डेकोरेशन..... रांगोळी .... खूप काम आहेत ना.... नंदिनी नाटकी सुरात बोलत होती ...

हे सगळं तू करणार आहेस...... राज हसतच बोलला

हो मग तिकडे आजीला पण मीच मदत करत होती .... आता तर मी मोठे सुद्धा झाले आहे आता मला बरंच काही येतं......तुला माहिती त्या दिवशी मी रांगोळी सुद्धा काढून बघितले..... मी खूप प्रॅक्टिस केली त्याची .....आबा सुद्धा म्हणत होते की खूप छान काढली ....आता दिवाळीला मीच काढणारे रांगोळी........ आपला रांगोळी सुद्धा घ्यायची आहे..... आणि आकाश कंदील..... आणि लाइटिंग.... आणि होते मातीचे दिवे ते तर खूप महत्त्वाची असतात म्हणे हे दिवे लावावेत लागतात........ राज चल ना आज...... तुझं काम तर रोजच असते..... कधीच संपत नाही...... तू नंतर कर ना......... राज .....प्लीज राज.... प्लीज राज प्लीज राज ......प्लीज राज....... नंदिनी चा हट्ट सुरु झाला.....

तिला तर असं झालं होतं की कधीकधी बाहेर जातो आणि कधी कधी पाहिजे ते मनासारखं घेतो....

बरं बाबा संध्याकाळी जाऊया......राज

तूच तर म्हणतो संध्याकाळी खूप गर्दी असते बाहेर...... आताच जाऊया ना..........नंदिनी

नंदिनी.............

राज..........

नंदिनी........ काय हट्ट लावलाय........ बरं चल...... हो तयार....राज

Yipieeee.... तू माझा फेवरेट आहेस...... राजाचे गाल ओढत..... नंदिनी बेडवरच उड्या मारायला लागली......

दोघेजण तयार होऊन मार्केट मध्ये गेले........ नंदिनी एकच नाव आठवत आठवत सगळ्यांसाठीच राजला काही ना काही घ्यायला लावत होती......

राज आजीसाहेबांसाठी......

ह्म्म...... चल सारी घेऊया..... आई आणि काकी साठी सुद्धा साडी घेऊ.....राज

राज ने  सगळ्यांसाठीच काही ना काही घेतले होते........ नोंदणीसाठी मात्र त्यांनी त्याच्या आवडीचे चार पाच ड्रेस घेतले होते...... साडी तर त्यांना अजिबात घेतली नव्हती.....नंदिनीला साडी सांभाळता येत नाही त्याला माहिती होतं..... त्याने घागरा पॅटर्न..... फ्लोर लेन्थ अनारकली ड्रेस.... 1....2 चुडीदार..... आणि काही नेहमीची तिचे वन पीस.......  ज्वेलरी तिला फार काही आवडायची नाही...... ड्रेसला मॅचिंग होईल असे इयरिंग फक्त त्याने घेतले होते...... गळ्यात तिला घालायला बहुतेक आवडायचं नाही......,.. हेअर ॲक्सेसरीज.....

राज तू सगळ्यांसाठी घेतलं...... तुझ्यासाठी काहीच नाही घेतलं ......आपण तुझ्यासाठी पण घ्यायला जाऊयात.....नंदिनी

मला जीवावर येता नंदिनी शॉपिंग करायला.... चल झाली आता.....राज

नाही तुझ्या साठी पण घ्यायचं........नंदिनी

बरं बाबा चल....... राजने त्याच्यासाठी ड्रेस घेतले.....

राज दिवाळीला कोणी असं थोडी घालतं....... ते बघते तिकडे पुतळ्याला लावले आहेत ना तसे पाहिजेत....,

नंदिनी........

घे ना एक तरी......नंदिनी

राज ने  तिच्या आवडीचा एक ट्रॅडिशनल कुर्ता पायजमा बेस्ट जॅकेत असा ड्रेस घेतला..... नंदिनी त्याला कोण भयंकर भयंकर ड्रेस सिलेक्ट करून देत होती त्यातून थोडाफार डिसेंट दिसणारा ड्रेस त्याने सिलेक्ट केला होता...

नंतर ते रांगोळी मार्केटमध्ये आले....... तिथून तिने खूप खूप वेगवेगळे रंग घेतले..... मातीचे दिवे...... ते घ्यायला पण तिने खूप वेळ लावला..... त्यामध्ये खूप प्रकारचे व्हेरायटी होते डिझाईन्स होते..., ते सर्व बघताना तिला खूप गंमत वाटत होती.....,... आकाश दिवा,.....तिने घरासाठी प्रत्येक बालकांनी ला आकाश दिवा लावायचा हट्ट केला होता......हे सगळ घ्यायसाठी ते छोट्या मार्केटला आले होते त्यामुळे राजनी एका ठिकाणी गाडी पार्क केली होती....

नंदिनी..... तू इथे थांब मी गाडी घेऊन येतो ....,.त्याने नंदिनीला रस्त्याच्या एका साईडला उभे केले आणि बाजूला गाडी घ्यायला गेला...,. डिकी मध्ये सामान ठेवून तो कार मध्ये बसणारच की त्याचं लक्ष नंदिनी कडे गेलं.....एक टवाळखोर मुलगा नंदिनी ला मागे हात लावत होता.... त्याच्यासोबत अजून दोन मुले होते..... ती हसत होती..... नंदिनी ला मात्र ते काहीच कळत नव्हतं..... ती त्यांच्याकडे फक्त बघत होती....

तेवढ्यात नंदिनीला हात लावणाऱ्या मुलाच्या नाकावर एक जोरदार पंच पडला आणि तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला.... त्याच्या नाकातून रक्त येत होते....... त्याला पडलेला बघून त्याचे दोन मित्र राज वर धावून आले..... राजने त्या दोघांना सुद्धा एकेका पंच मध्येच खाली लोळवलं होतं....... राजने त्या तिघांना चांगलंच चुकून काढलं होतं..... इतकी कि ती मुले पुढे जाऊन कधीच कुठल्या मुलीला हात सुद्धा लावणार नाही..... नंदिनी ला मात्र काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं..... पण तिला राजची धिश्युं धिष्युं बघण्यात खूप मजा येत होती....... ती टाळ्या वाजवत उड्या मारत होती....... आजूबाजूचे बरेच लोक जमली होती.... आणि सुद्धा त्या मुलांना पकडून चांगलीच सुनावले होते.......

राज आणि नंदिनी घरी येण्यासाठी निघाले..,..

राज तू तर सुपरमॅन आहे...... किती मस्त फायटिंग केली...धिष्युं धिष्युं..... नंदिनीची अखंड बडबड सुरू होती....

नंदिनी ला काहीच कळत नाही...... मी नसलो सोबत कधी तर हे काय करेल..... तिला तर एकटे सुद्धा सोडता येत नाही..... पाच मिनिटांसाठी माझी नजर चुकली आणि हे सगळं घडलं........ माझं लक्ष नसतं गेले तर..... आधीसुद्धा नंदिनी सोबत हे घडले आहे ...ती कॉलेजमध्ये असताना....... त्याच्यामुळे तर नंदिनी ची आज ही अवस्था झाली आहे........ नंदिनीला स्वतःची काळजी घ्यायला हवी आहे........ मला काहीतरी करावाच लागेल........ राज चा डोक्यात असे असंख्य विचार सुरू होते....... साडेसात आठ वाजता ते घरी पोहोचले......

राजने डिकीतून शॉपिंग केलेले सगळे सामान काढले तर नंदिनी झालेला सगळा प्रकार विसरली आणि परत ती शॉपिंग मधल्या सामानामध्ये रमली...... तिच्या हातात मावत होते तितक्या पिशव्या तिने पकडल्या आणि ती धावतच आत मध्ये गेली.......

आबा......आबा........ मी बघा किती सारी शॉपिंग केली..... नंदिनी ओरडतच घरात आली...... आणि आबा जवळ जाऊन बसली...... तिने सगळे बॉक्स काढले.... तेवढ्यात राज सुद्धा तिथे येऊन उभा झाला.....

अरे वा खूप छान .....सगळ्यांसाठी आणले वाटते गिफ्ट..... आता वाटत आहे दिवाळी आली म्हणून..... बाबा तिची गंमत करत बोलले...

हो ना...... हा राज ऐकतच नव्हता... संडेला जाऊ म्हणत होता..... किती काम असतात आबा दिवाळीचे..... याला काही कळतच नाही.......नंदिनी

राज मात्र आपल्याच विचारांमध्ये गुंग झाला होता......

राज मी सगळ्यांना त्यांचे गिफ्ट देऊन येऊ......नंदिनी

रात्री तिच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हते.....

राज.... अरे कुठे हरवला नंदिनी काहीतरी विचारत आहे.....आबा

हा.......काही नाही...... काय झालं नंदिनी.....राज

राज मी सगळ्यांना गिफ्ट देऊन येऊ......नंदिनी

हो.......राज

नंदिनी आणलेले बॉक्सेस 1  1 उघडून बघितले आणि सगळ्यांना देऊन आली.... आजी साहेब सोडून सगळ्यांना तिचे गिफ्ट आवडले होते...... तिने सिक्युरिटी गार्ड... माळी काका ...छाया काकी आणि बाकीचे  काम करणारे सगळ्यांसाठी गिफ्ट आणल होती... ..ती त्यांना सुद्धा देऊन आली..... नंदिनीच्या हसण्या.... बागडण्याने घरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं..... आणि खऱ्या अर्थाने दिवाळी ची सुरुवात झाल्यासारखी वाटत होतं......

बरं आबा डेकोरेशन ची सुरुवात आपण उद्यापासून करू आता मी खूप थकली आहे....... नंदिनी जांभळी देत बोलत होती.........

ह्म्म... आबा हीची एनर्जी लेव्हल ला भयंकर आहे.... मलासुद्धा थकायला होते...... पण या मॅडम थकत नाहीत...... बरं झालं तुमचं तुम्हाला कळलं की तुम्ही थकला आहात ते .....चल आता झोपायला......राज नंदिनीला बोलला.....

अरे  राज तुझ्या हाताला काय लागलाय.....आवाज लक्ष त्याच्या हाताकडे गेला तर त्याच्या हाताला थोडं खरचटलं होतं.....

हा आबा ते तर मी विसरलेच....ते ना...... नंदिनी काही बोलणार तेवढ्यात राज बोलला

अ.... काही नाही... असच थोडं काम करताना लागलं..... नंदिनी चल आता झोपायला बाबांना पण झोपु दे खूप रात्र होत आली आहे..... आजी साहेब येतील आता रागवायला...... राज तिला जबरदस्ती वरती घेऊन गेला...

राज तू खोटं का बर बोलला आबांना......तूच म्हणतो ना खोटं बोलायचं नाही आणि आता तूच खोटं बोलतो..... मी त्यांना सांगून येते..... की तू कसे धिष्युं धिष्युं  केला ते..... आणि ती परत जायला वळणार की राजाने तिचा हात पकडला...

नंदिनी..... आबा ना झोपू दे आता..... इकडे ये मला तुला गोष्ट सांगायची आहे...... जा फ्रेश हो..कपडे बदलून ये.....राज

राज फ्रेश होऊन बेडवर विचार करत बसला होता...

राज तू किती स्ट्रॉंग आहे...... किती मस्त मारले त्या अंकल लोकांना....नंदिनी त्याच्या जवळ जात बोलली..

नंदिनी तुला माहितीये मी त्यांना का मारलं.,.. राज तिला आपल्या जवळ बसवत बोलला......

अरे हा ते तर मी विसरलेच......मी तुला तेव्हाच विचारणार होते त्यांना का मारलं.....नंदिनी

तुला माहितीये ते कोण होते.....राज

नाही...... मी त्यांना आधी कुठे बघितलं पण नाही आहे.....नंदिनी

नंदिनी ज्यांना आपण ओळखत नाही त्यांना स्ट्रेंजर्स म्हणतात...... स्ट्रेंजर्स म्हणजे जे आपल्यासाठी नवीन आहे.... स्त्रिंजर्स म्हणजे... कोणी पण असू शकतो... अंकल ..आंटी... आजी... आबा... ताई... दादा कोणीपण..,. असे लोकं जे आपल्या ओळखीचे नाहीत..... हे लोकं चांगले पण असू शकतात वाईट पण असू शकतात..... पण आपल्याला माहीत नसते की ते चांगले आहे म्हणून..... म्हणून अशा लोकांपासून आपण दूर राहायचं असते.... त्यांना आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही...... त्यांना आपल्याला टच करू द्यायचे नाही.....त्यांना आपल्याला हात लावू द्यायचे नाही.... समजा कोणी असं करत असेल तर तिथे बाजुला कोणी असेल त्यांना सांगायचं..... किंवा ओरडायचं...... आजूबाजूला असणारी लोक का आपल्या मदतीला धावून येतात....

का बरं त्यांना आपल्या जवळ येऊ नाही द्यायचं....नंदिनी

हे बघ नंदिनी हे लोक वाईट असतात..... ते आपल्याला इजा पोहोचवू शकतात.... हाऊ शकते आपल्याला पकडून पण घेऊन जातील..... आपल्या सोबत काही वाईट करू शकतात......राज

बापरे..... मी नाही जाणार कोणाकडे......नंदिनी

कोणाला आपल्याला हात सुद्धा लावू द्यायचं नाही...... त्याला बॅड टच म्हणतात.....राज

बॅड  टच म्हणजे.....नंदिनी

आता कसं सांगायचं राज विचार करत होता.....

हे बघ आपल्या शरीराचे काही भाग खूप महत्त्वाचे असते.... तिथे असं कोणालाही हात लावू द्यायचा नाही...... म्हणजे हे बघ त्याने तिचे हाताचे मनगट आपल्या हातात पकडले.... आणि तिचे छातीत तिच्या छातीवर ठेवले..... इथे हात लावू द्यायचा नाही........ त्यानंतर तिच्या हाताचा स्पर्श तिच्या पोटाखाली केला..... इथे हात लावू द्यायचे नाही कोणाला....... त्यानंतर तिच्या हातांचा स्पर्श त्याने तिच्या कमाबरे खाली केला..... इथे सुद्धा कोणाला हात लावू द्यायचा नाही..... त्यानंतर त्याने त्याचे हात तिच्या ओठांवर ठेवले..... इथे कोणालाच पप्पी किंवा किस करू द्यायचं नाही...... कोणालाच म्हणजे कोणालाच नाही.... आपल्या ओळखीच्या सुद्धा लोकांना नाही टच करू द्यायचे...... हे आपल्या शरीराचे खूप महत्त्वाचे पार्टस आहेत.... आपल्याला यांची काळजी घ्यावी लागते..... आता तू मोठी होत आहेस ना तर आता तुला तुझी काळजी घेतात यायला हवी...... आता कळलं का तुला..... सांग मी त्या मुलांना का मारलं...... राज तिच्या डोळ्यांकडे बघत बोलला

नंदिनी काहीतरी आठवल्यासारखं करत......
हो...... त्या एका अंकले माझ्या इथे मागे हात लावला होता.... मला बॅड टच केल होत..... म्हणून तू त्यांना मारलं...नंदिनी

राजने एक मोठा श्वास घेतला....... त्याला समाधान वाटलं की त्याचं बोलणं तिला कळलं होतं...

पण राज.... ओळखीच्या पण लोकांना नाही..... आबा ला आजीला राहुलला कोणालाच नाही......नंदिनी

हो कोणालाच नाही.... आणि कोणी केलं तर मला सांगायचं.......राज

तुला पण नाही..,......नंदिनी

तिचा प्रश्‍न ऐकून राहिला गालात हसू आले....

फक्त तुझी आजी तुला टच करू शकते......... आणि तुझ्या आजीने मला परमिशन दिली म्हणून मी तुला टच करू शकतो....... आणि जर मी दुसरा कुणाला परमिशन देईल तर ती व्यक्ती तुला टच करु शकेल..... जसे मी आईला कधी कधी सांगतो तुला साडी घालून दे .....तयार करून दे तर ती तुला टच करू शकते..... पण जर मी म्हटलं की नाही करायचं तर कोणीच करणार नाही..... आणि हो डॉक्टर टच करू शकतात.... पण मी तुझ्यासोबत असताना....... समजलं आता.......राज

हो........नंदिनी

गुड गर्ल..... चला झोपा आता.......राज

राज तिला त्याच्या कुशीमध्ये घेऊन झोपला.......

राज........ नंदिनी त्याच्या शर्टाच्या बटन मध्ये बोट घालत बोलत होती

ह्म्म...........राज डोळे मिटून च बोलत होता

राज मी तर तुला पप्पी करत असते....... ते पण बॅड टच असते  काय....... पण मी फक्त तुलाच करते बाकी कोणालाच नाही करत...,......मी तुला करू शकते ना........नंदिनी

राज ला तिचं बोलणं ऐकून आता खूप हसायला येत होतं....
अरे माझ्या सोन्या पिल्ल्या टिल्ल्या....तू मला हाथ लावलयाला परमिशन ची काही गरज नाही........मी  पूर्णच तुझा आहो  ग राणी....... जे वाटते ते तू माझ्यासोबत करू शकते....... मी तर वाटच बघतोय कधी तू काय करतेस ते....... राज मनातच बोलत होता.... त्याच्या मनात फारच खट्याळ विचार आले होते आणि त्याचं त्याला हसू येत होतं....

राज........ तू सांगितलं नाही........नंदिनी

हो तू मला काही पण करू शकते....... फक्त मलाच हा..... चल झोप आता......त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि तिला आपल्या कुशीत घट्ट पकडले...... ती पण त्याच्या कुशीत गाढ झोपी गेली....

******

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️