नंदिनी...श्वास माझा 28

राजनंदिनी

भाग 28

नंदिनी हे काय चाललंय तुझं...... काम करू दे ना मला...राज

तूच बोल ना अभ्यास कर....,.अभ्यास करते आहे........नंदिनी

राज काऊच वर बसून लॅपटॉप वर काम करत होता.... आणि नंदिनी त्याला टेकून पाय लांब करून हातात बुक घेऊन बसली होती...

थ्री वंझ आर थ्री
थ्री टूज आर सिक्स
थ्री थ्रीजी आर नायन

नंदिनी जोर्याने तीन चा पाढा म्हणत होती... आणि खूप चुळबूळ करत होती..... पाय आपटत होती.,, ज्यामुळे राज ला धक्का लागत होता .... टायपिंग करताना सुद्धा हाताला बराच धक्का लागत होता..... नंदिनी अजून त्याच्या कडे सरकत त्याला दाबत धक्का मारत होती....

नंदिनी नीट बस.....राज

नाही मला असंच बसायचं.... असं बसला की माझं लवकर अभ्यास होतं........नंदिनी

आणि जरा हळूने म्हण ना....राज

तूच तर बोलला होता थोडा मोठ्याने बोल म्हणजे लवकर पाठ होते......नंदिनी

तुझे पाठ झाल आहे ते.... आता मोठ्याने ओरडण्याची गरज नाही आहे.....राज

ठीक आहे......नंदिनी

सी ओ पि कॉप
एम ओ पी मोप
टी ओ पी टॉप
एच ओ  पी हॉप............. नंदिनी परत जोराने वाचायला लागली....

आता मात्र त्याने डोक्यावर हात मारून घेतला.,......

नंदिनी बस झाला अभ्यास आता..... जा आबांसोबत खेळ.....राज

नाही...... मी एकटी नाही जाणार खाली.......नंदिनी

काय पाहिजे आहे...... राज

तू............. त्याच्या मांडीवर जाऊन बसतात त्याची दोन्ही गाल ओढत नंदिनी बोलली...

आज संडे आहे तरी तू कामच करत आहे..... चल ना आपण खेळू...... सगळेच घरी आहे पण आपापल्या रूम मधेच आहेत.......नंदिनी

ह्म्म...... राज काहीतरी विचार करत होता... बरं चल खाली गंमत करू आपण....... नंदिनी राजचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या सोबत उड्या मारत खाली जात होती....

नंदिनी नीट चल....... पडशील आहे पायर्‍यांवरून......राज

तुझा हात पकडला आहे ना....... नाही पडणार मी...... नंदिनी परत जोराने उड्या मारत होती...

चार वाजले होते सगळे जण आपापल्या खोल्यांमध्ये होते....

दिना काका  बाहेर सगळ्यांसाठी चेअर लावा.... आणि टेबल क्लीन करा......
जी दादा.....

छायाताई....... मी सांगतोय ते सगळं सामान काढून द्या..... राज किचन मध्ये जात बोलला...... राजने एप्रोन घातला आणि तो कामाला लागला...... नंदिनीला पण तो छोटी छोटी कामे सांगत होता........ नंदिनी ला खूप मजा वाटत होती....... छाया पण त्यांना मदत करत होती.....

चलो डण....... नंदिनी जा सगळ्यांना आवाज त्याने बाहेर गार्डन मध्ये यायला सांग...... मी फ्रेश होऊन येतो.....राज

टिंग टाँग....... नंदिनी आबाच्या रूम मध्ये जात आवाज करत होती.....

बोला नंदिनीबाई काय काम होतं......आबा
 

आबा ....आजीसाहेब बाहेर गार्डन एरिया मध्ये या...... सरप्राईज आहे तुमच्यासाठी.......नंदिनी

काय नवीन खेळ सुरू केला या पोरीने..... आजीसहेब

लवकर या बाहेर..... मी बाकीच्यांना बोलावून आणते... ओरडत च ती बाहेर पळाली.... तिने काका काकी.... आई-बाबा.... राहुल सगळ्यांना आवाज दिला......

बाहेर गार्डन मध्ये एक शेर होता तिथे बैठक एरिया होता..... राज ने तिथे  सगळं अरेंज करायला सांगितलं होतं.... काही खाली लो साईड काऊच होते...... तिथे साईडला एक टेबलवर सगळं खायचं अरेंज केलं होतं..

An evening with family .... साईडला एक बोर्ड लावला

अरे वा..... गेट-टुगेदर चा प्लान केला.....मस्त.... आबा तिथे येत चेअरवर बसत बोलले...

हळूहळू सगळे जमायला लागले.....

हे सगळं कोणी केलं.....आई

राजने........ नंदिनी खूप एक्साईटेड होत बोलली

राजला किती सारे बनवता येते...... आबा तो तर त्या चाकूने   असं फास्ट कट करत होता.... ते टीव्ही मध्ये दाखवतात तसेच...... कट कट कट कट..... नंदिनी ॲक्शन करून दाखवत होती..

ह्म्म...... द्या अजून त्रास द्या आमच्या नातवाला......बाकीचं सगळं करायला लावतात ते कमी होतं की आता हे पण करायला लावा...... आजीसहेब

आजीसहेबमच्या आवाजाने  नंदिनी बसली...

Wow bro ...you are so cool...... लुकिंग सो टेम्पटिंग........ राहूल टेबलवर ठेवलेले बघून बोलला.....

टेबलवर दोन मोठे पिझ्झा.... चॉकलेट केक..... भेळ..... आणि काही फ्रुट्स ठेवले होते..... राज ने ते खूप सुंदर डेकोरेट केले होते..... बघितल्याबरोबर  तोंडाला पाणी सुटेल......

तर आजचा अजेंडा असा आहे की आपण खूप दिवस झाले एकत्र बसलो नाही गप्पा केल्या नाहीत..... तर आज आपण सगळे एकत्र वेळ घालवणार आहोत....राज

छायाताई सगळ्यांसाठी कॉफी बनऊन आणा.......राज

सगळ्यांनी आपल्या आवडीच प्लेटमध्ये घेतल आणि गप्पागोष्टी करत तिथेच बसले..... खूप फ्रेश वातावरण होत.... सगळ्यांना खूप आवडलं होतं.... इकडल्या तिकडल्या.... ऑफिसच्या.... बायकांच्या किटी पार्टीच्या.... अशा अनेक गोष्टी रमल्या होत्या...

राज मी  त्या सिक्युरिटी काका..... गार्डन काका छायाताई काकी सगळ्यांना पण देऊन येऊ काय......नंदिनी

हो......राज

छाया का त्यांच्या मदतीने प्लेट बनवले आणि सगळ्यांना देऊन आली...

खूप मोठ्या मनाची आहे नंदिनी.....आबा

राज हसला..

राज तूच मला का बरं शिकवत नाहीत...... तूच किती छान शिकवतो........ ती श्वेता टीचर तर काहीच जास्ती शिकवत नाही.......नंदिनी

का ....काय झालं..... छान तर शिकवते.....राज

आबा तुम्हाला माहिती आहे ती मला कमी शिकवते आणि तिचं सगळं लक्ष राज कडेच असते...... ती सतत राजकडे बघत असते......ती तिच्या पर्स मधून   एक छोटा आरसा काढते लिपस्टिक काढते आणि इथे लावत असते..... आणि पावडर लावत असते..... मला थोडंसं सांगते लिहायला लावते आणि बस राजकडे बघत बसते...... नंदिनी त्या टीचर ची नक्कल करत.... लिपस्टीक पावडर लावताना तोंडाचा पाऊट कशी करत होती.... तिची एक्टिंग करत.... सांगत होती..

तिच्या बोलण्याने सगळे हसायला लागले...... राज ला तर हसावं की रडावं समजत नव्हतं

काय बायको आहे....... दुसऱ्या मुली आपल्या नवर्‍याकडे बघताय....त्याचे काहीच वाटत नाहीये आणि तेच ती मजा करत सांगते आहे.... आजीसाहेब

राज बघ एंजॉय करून घे असे दिवस परत नाही येणार.... बायकोची पण परमिशन आहे...... रविकांत राजची मस्करी करत बोलत होता

स्मार्ट झाली नंदिनी...... तिची एक्टिंग बघून आबा बोलले..

स्मार्ट नाही... भारी बदमाश झालीये...... खूप डोकं चालायला लागला आज-काल.....राज

आबा तुम्हाला माहिती आहे आम्ही बाहेर जातो ना सगळ्या मुली... आंटी.... राज कडेच बघत असतात...... काय बघत असतात काय माहिती........ पण एकटक बघत असतात.....नंदिनी

नंदिनी तू मोठी झाली ना  की कळेल तुला.... त्या मुली ब्रो कडे का बघतात ते.... आणि मग एकेकीला मारायला धावशील....... राहुल राजला डोळा मारत बोलला.......

मी धक्का मारला होता एक आंटीला.....
आम्ही शॉपिंग ला गेलो होतो ना त्या दिवशी..... तर एक आण्टी ना राजचा जवळ आली होती.. त्याला पकडत होती....... राज इंग्लिश मध्ये काहीतरी बोलला तिला पण ती ऐकतच नव्हती....... मी ना जाऊन तिला धक्काच मारला....... तेवढ्यात ती खाली पडत होते तर  तिचा काका तिला पकडायला गेला तर त्याच्या हातात तिचे केस आले आणि ती खालीच पडली....... आणि केस त्या काकांच्या हातामध्ये होते....... तिथे सगळे लोकं तिच्या आजूबाजूला जमले..... आणि हसायला लागले.....ती ऑंटी टकली होती तिने नकली केस लावले होते...... ती त्या काकांना खूपच रागवत होती.........राज ने माझा हाथ पकडला आणि आम्ही पळतच बाहेर आलो..... नंदिनी खूप हसत हसत सांगत होती......... राजला पण तो किस्सा आठवला आणि तो पण पोट धरून हसत होता.......

ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ते त्यांचा ब्रेकअप झाला तिथेच...... राज हसू न हसून लोटपोट होत सांगत होता.......

त्यांच्या गप्पा ने सगळे खूप हसायला लागले होते.... त्याला हसा खळखळून हसताना पाहून आबांना ....आईला खूप छान वाटत होते...... बऱ्याच दिवसांनी तो इतका मनसोक्त हसत होता....... आई तर एकटक त्याच्याकडे बघत होती.....

आणि आम्ही पार्क मध्ये गेलो होतो एक दिवस......आम्ही तिथे बॉल खेळत होतो तर माझा बॉल एका साईडने गेला..... मी तिथे बॉल आणायला गेले तर तिथे  एक अंकल ऑंटी होते.....ते ना .....

नंदिनी काय सांगते ते राजला आठवले...... त्या पार्क मध्ये बघितले ला एक किसिंग सीन ती सांगत होती......ज्याच्या तिला तेव्हा पण खूप प्रश्न पडले होते.......

नंदिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात राज ने तिच्या कंबरेत हात घालून तिला एका हातांनी उचलले आणि एक हात तिच्या तोंडावर पकडला...... आणि तिचे तोंड दाबले... ती पुढे काही बोलावे नाही म्हणून......

मी आलोच....... म्हणत राज तिला उचलून आत मधे घेऊन जात होता..... मला खाली उतरून म्हणून आली नाही पाय झाडत होती पण त्याने तिला घट्ट पकडले होते आणि तो तिला आत मध्ये घेऊन गेला....

त्यांच्या त्या कृत्याला बघून सगळ्यांनाच खूप हसू आले होते........

काही समजत नाही कुठे काय बोलते... या नंदिनी ला......  किती त्रास देत असते..... आजीसाहेब

अहो राज चा आजिसहेब..... आयुष्यात पर्फेक्ट असण्यापेक्षा आनंदी आणि खूश असणं जास्त महत्वाचं आहे....... आणि त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद सगळं सांगून जातो की तो नंदिनी सोबत किती खुश आहे....... जे आपल्याजवळ नाही त्याबद्दल दुःख करण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद कसा मानून घेता येईल हे त्या पोरापासून शिकण्यासारखे आहे.......... जो परफेक्ट आहे तो आनंदी आहे असं नाही होत....... आयुष्य आपल्या मर्जीने आपल्या मताप्रमाणे जगता यावे .....यापेक्षा सगळ्यात जास्त सुख कुठेच दुसऱ्या गोष्टींमध्ये नाही..... राजला समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्या सुखात दुपटीने वाढ होईल........

आजी साहेब वाकड तोंड करून ऐकत होत्या....

मला नाही वाटत घरात काही होईल........ तिकडे बाहेरच काहीतरी बघावं लागेल......... शशिकांत फोनवर बोलत होता...

*********
संध्याकाळचे आठ वाजले होते .... तेवढ्यात राजचा फोन वाजला....

थँक्स अ लॉट इन्स्पेक्टर गौरव........ तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही....... हो मी काळजी घेतो....... राज फोनवर बोलत होता......

फोन ठेवल्यावर राज भयंकर रागांमध्ये दिसत होता...... तिच्या चेहर्यावरचा राग कोण घरात सगळ्यांना कळलं होतं की काहीतरी भयंकर घडले आहे........

राज काय झाले आहे......शशिकांत

कळेलच थोड्या वेळा मध्ये......राज

तेवढ्यात एक गाडी घरासमोर येऊन थांबली....... राहुल ला घेऊन एक पोलिस आतमध्ये मध्ये येत होता.......

मिस्टर श्रीराज........ तुम्ही एस पी गौरव यांचे मित्र आहात म्हणून हे पॉसिबल झालं आहे...... समोरून काळजी घ्या परत असं व्हायला नको........पोलिस

थँक्स अ लॉट सर....... श्रीराज त्या पोलिसाला शेकंड करत बोलला आणि तसा तो पोलीस निघून गेला.......... सगळे राजकडे राहुल कडे आणि पोलिसांकडे बघत होते...... कुणाला काहीच कळत नव्हतं काय झाला आहे ते......

राज खूप रागाने राहुल कडे बघत होता.....

भाई.....माझी...... राहुल काही बोलणार तेवढ्यात त्याच्या गालावर जोरदार हात पडला आणि तो बाजूला जाऊन पडला.......

राहुलची आई तर घाबरून राजकडे बघत होती....... तिला काय बोलावं काहीच कळत नव्हते........

अहो तुम्ही बोला ना काही.....राहुल आई

तु चुप बस........ नक्कीच राहुल नाही काहीतरी केला आहे....... त्याशिवाय राज इतका चिडणार नाही.....रविकांत

राज....... हे काय करतोय.....शशिकांत

राहुल घाबरतच उठून उभा राहिला........

तू सांगतोय.............राज

ते चुकून.........परत राहुल काही बोलणार तेवढ्यात त्याच्या दुसर्‍या गालावर हात पडला......

राज गे काय चाललंय.......आजिसहेब

नंदिनी आपल्या रूम मध्ये बसून अभ्यास करत होती...... तिला खाली गोंधळ होत असल्याचा आवाज ऐकू आला आणि ती उठून बाहेर आहे खाली बघते तर राज राहुलला मारत होता......

भाई....... सॉरी......चुकून..... राजने राहुलच्या गालाला... हाताला जिथे जागा भेटेल तिथे मारत होता......

राज चे हे रूप आज बऱ्याच दिवसांनी घरात दिसत होते..... त्याचा राग आला बघून कोणी त्याच्या मध्ये येण्याची हिम्मत करत नव्हता......सगळ्यांना माहीत होतं की एकदा त्याचा राग अनावर झाला की कोणीच त्याला कंट्रोल करू शकत नाही......... आणि नक्कीच राहुलने काहीतरी केले आहे तेव्हाच राहत इतका चिडला होता हे आतापर्यंत सगळ्यांना कळलं होतं.......

राहुल बरंच लागलं होतं....... तो कळवळून राजला हात जोडत सॉरी म्हणत होता...... पण राज मात्र काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हता......

राहुल लावासा रडताना बघून नंदिनीचा मात्र मन खूप भरून आलं........ ती धावतच पायऱ्या उतरून खाली आली......

राज त्याला खूप लागलंय..... त्याला मारू नको..... नंदिनी त्या दोघांच्या मध्ये येऊन उभी राहिली.....

नंदिनी वरती जा......राज

नाही....... माझ्या दादाला तू मारू नको........ तो खूप रडत आहे....... त्याला बघ किती लागलं.......नंदिनी राहुलचा हात पकडत बोलत होती..

राज राहुल वर परत हात उचलणार की नंदिनी त्याच्यामध्ये येऊन उभी राहिली......... नंदिनी ला समोर बघून राज ने हात खाली घेतला...

भाई सॉरी खरच मला माहिती नव्हतं तिथे असं काही होणार आहे ते........ मी तर माझ्या मित्रांसोबत जस्ट एन्जॉय म्हणून गेलो होतो.......राहुल

मित्र कसे असावे तुला माहिती नाही का........या बिघडलेल्या मुलांना सोबत मित्र मैत्री करायला तुला लाज नाही वाटली...........आणि का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेव पण तसंच काही केलं असशील.......आज जर तुला पोलिसांनी पकडून नेल असता तर तुझं सगळं लाईफ खराब झालं असते.........राज

भाई खरच मला काहीच माहिती नव्हतं.....राहुल

अरे काय चाललंय आम्हाला कळेल का.....आजिसहेब

आज हा मित्रांसोबत जिथे पार्टी करायला गेला होता तिथे रेव पार्टी सुरु होती....... आज पोलिसांनी तिथे खूप मोठ ड्रग्स रॅकेट पकडल...... हा पण त्यांच्यासोबत पकडला गेला होता...... ते तर एस पी गौरव माझे मित्र आहेत....... त्यांना जेव्हा कळले कि हा माझा भाऊ आहे त्यांनी एकदा मला फोन करून सगळं कळलं....... त्यांना मी रिक्वेस्ट केली.... तर लास्ट वॉर्निंग देऊन त्याला सोडलं आहे....

राज चे  बोलणं ऐकून सगळे शॉक झाले होते..... रविकांत येऊन परत राहुलच्या गालात एक मारली.......

आता मात्र राहुल आपण राग आला.......राहुल काही बोलणार तेवढ्यात नंदिनी त्याला ओढतच वरती घेऊन जात होती....

उद्यापासून तु मला माझ्या ऑफिस मध्ये हवा आहे....... आणि तुझ्या सगळ्या पार्ट्या बंद........आणि मला तू या मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये दिसायला नको आहे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही........ राज राहुल ला खडसावत होता....

नंदिनी  राहुलला वरती घेऊन गेली........ नंदिनी मधात आल्यामुळे राज मारायचा थांबला होता आणि होणारा वाद आटोक्यात आला होता.....

आजी साहेब तुम्हाला शिक्षा करायला आवडते ना.... बघ आता राहुल कडे...... लक्ष घाला.... तो काय करतोय ते बघा.....तुम्ही सगळे माझ्याकडे आणि नंदिनी कडे बघण्यात इतके गुंतले की राहुल काय करतोय हे कुणाला दिसतच नाही आहे..... पण मी माझं कर्तव्य विसरलेलो नाही आहे..... मला माहिती आहे की मी एक मोठा भाऊ सुद्धा आहे.........,राज रागातच आपल्या रूम मध्ये निघून गेला...

डिनर साठी सगळे टेबलावर बसले होते.....

राहुल नाही आला......शशिकांत
जेवायचं नाही बोलतोय..,

तेवढ्यात नांदीने टेबल वरून उठून राहुलला बोलवायला जात होती..

नंदिनी..... कुठेच नाही जायचे.... इथेच बस.... त्याला त्याची चूक कळली कि येईल तो......राज

राज चा आवाज ऐकुन नंदिनी चुपचाप आपल्या जागेवर जाऊन बसली... सगळ्यांची जेवणं आटोपली आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले....

राहुल जेवला नाही म्हणून राहुल च्या आईचा जीव मात्र खालवर होता..... तिने दोन तीन दा जाऊन बघितले पण राहुल जेवायच्या  मूडमध्ये नव्हता...

नंदिनी किती चुळबूळ करते आहे झोप बरं..... सकाळी लवकर उठायचे आहे ना.....राज

ह्म्म..... नंदिनी त्याच्या टीशर्ट ला पकडून कुशीमध्ये तोंड घालून चुपचाप झोपली

जवळपास अकरा वाजत आले होते...... राज झोपलेला बघून तिने हळूच त्याचा हात आपल्या अंगावरून काढून घेतला..... आणि हळूहळू चोरपावलांनी रूमच्या बाहेर गेली...... राहुल च्या रूम जवळ येऊन उभी राहिली...... राहुल जागाच होता तो काऊच वर चुपचाप बसला होता....

दादा दुखतयं काय खूप....नंदिनी राहुल जवळ जात बोलली

तू.....तू इथे काय करतेय....... तू जा तो भाई तुझ्यावर पण रागावेल......राहुल रागात बोलला..

झोपला तो.....दाखव कुठे लागलं....नंदिनी त्याच हाथ कपाळ बघत होती...तर हाताला आणि कपाळाला थोड खरचटले होते..
 

मी आलीच ..... नंदिनी तिच्या रूम मध्ये आली ...तिने फर्स्ट ट्रीट बॉक्स घेतला आणि ती राहुल चा रूम मध्ये गेली......

नंदिनी प्लीज तू इथून जा..... मला एकट्याला सोड.... मला कोणाची गरज नाही.... कुणीच माझ ऐकून घेतलं नाही......राहुल

तित्ने डेटॉल ची बॉटल काढली ... पण तीच कॅप तिच्याकडून उघडल्या जात नव्हते...ती ते काढण्यात मग्न होते

अगं कुठे चालली.....राहुल

हे निघत नाही आहेना ..... राज ला काढून मागते....नंदिनी

राहुल ने डोक्यावर हात मारून घेतला......   तू त्याला न सांगता आली ना ...... रागवेल तो तुला पण....दे इकडे मी काढून देतो.....राहुल ला आता तीच हसू येत होत.....

खूप मारालेना राजने....... त्याला राग आला ना की तू खूपच चिडतो .....नंदिनी

हो मोठा आहे ना..... आपल्याच मताच करतो.... कोणाच ऐकून घेत नाही...... माझा पण ऐकलं नाही...... मी तर तसं काही कोणीच नाही त्याचा..... फक्त मारत सुटला.....राहुल

अरे राहुल दादा..... राज तुझ्यावर खूप प्रेम करतो..... त्याला तुझी काळजी वाटली म्हणून रागवला तो..... तुला माहिती आता तो मोबाईल मध्ये तुझेच फोटो पाहत होता...... आणि स्वतःच्या हातात कडे बघत होता...... त्याला खुप वाईट वाटत होतं तुला मारलं म्हणून.........नंदिनी

काय.....राहुल

अरे खरच आता मी बघितले.......आपण लहान आहोत ना म्हणून आपली त्याला काळजी वाटते..... मला पण खुप रागवतो तो..... आजकाल तर खूपच रागावतो...... तुला माहिती आहे मग तो मला चॉकलेट्स आणि आइस्क्रीम सुद्धा देत नाही.,...... मी त्याला किती सॉरी बोलते तरीसुद्धा तू देत नाही मला........ पण थोड्या वेळाने विचार केला की समजते की त्याच बरोबर होतं...,... तू पण का बर ऐकत नाही त्याचं.,.... तो जे बरोबर असते तेच सांगतो......नंदिनी

ये त्याची वकिली नको करू माझ्याजवळ....राहुल

त्यादिवशी आजी साहेबांनीने मला किती शिक्षा केली होती...... मला पणजी साहेबांचा खुप राग आला होता..... पण राज ने च मला समजवले......मोठे लोक आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला रागवत असतात आपल्याला शिक्षा देत असतात....... तुला मोठ होऊन चांगल बनायचं आहे ना...... मग आईक ना त्याचे........ नाहीतर ते पोलीस तुला पकडून घेऊन गेले असते ना....... आणि मग त्यांनी किती मारल असते तुला....... तुला माहिती आहे मी टीव्ही मध्ये बघितलं पोलीस ना खूप मारतात...... अस सगळीकडून खूप रक्त रक्त निघत...... आणि ना कोणाजवळ.... आई बाबा.... कोणाजवळ जाऊ पण देत नाहीत....... खरंच मी तिथे बघितलं होतं......नंदिनी

नंदिनी चा बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येत होते..... आणि त्याला त्याची चूक कळत होती....... खरंच आहे जर आपल्याला पोलिसांनी पकडून नेले असते तर आपली काय हालत केली असती...... राजमुले आपण आपल्या घरात सुखरूप बसलो आहोत...... तो विचारात हरवला होता आणि नंदिनी त्याला म्हणून लावून देत होती..

बाहेर दारात राज.... दोन्ही हात फोल्ड करून उभा त्या दोघांना बघत होता...

तुझे दिलेले संस्कार दिसत आहेत......... मागून आई त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलली

ह्म्म.......राज

तुझीच भाषा बोलते........ नात्यांची चांगली समज आली आहे तिला...... तुझ्यासारखीच आहे......आई

खूप चांगला बाबा बनशील......आई

राज च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.... त्याने आईकडे बघितले आणि हसला

बाबा तर बनलो आहोच ना ......राज

ह्म्म.......आई

आई-बाबा तर तू बनला आहेसच....... नवऱ्याचं सुख कधी भेटेल बाळा तुला.... नवरा कधी बनशील...... तुझी स्वतःची मुलं कधी  होतील...आई

आई ....काय घाई आहे....... पूर्ण आयुष्य आहे समोर.......राज

राज..........आई

आई ....हे बघ करायला तर मी आता सुद्धा काही पण करु शकतो......... ती डोक्याने विसरली आहे सगळं पण शरीराने ते सुदृढ आहे.... मोठी आहे..... पण तिला ज्या गोष्टी कळतच नाही.... त्या गोष्टी मला तिच्यावर लादयच्या नाही....... नवरा बायको मधल सुंदर नातं तिलासुद्धा कळायला हवं...... तिचा हक्क आहे तो ते नातं अनुभवायचा...... ते नातं जगायचं....... मी तिचा तो हक्क तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही....... मला तिला फुलताना बघायचा आहे..... कोमेजतन्ना नाही..... तिला ती माझी बायको आहे हे कळेल तेव्हाच या सगळ्या गोष्टी  होतील.......राज

आणि नाही कळलं तर कधीच........आई

मी वाट बघेल त्या दिवसाची......राज

राज........आई

आई........मनाने जोडलेल्या नात्यांमध्ये अशा लहानसहान गोष्टींमुळे दुरावा येत नाही..., आणि त्याची गरजही पडत नाही.........फिजिकल नात्याचं इम्पॉर्टन्स असेलही...... पण मला सध्या तरी त्याची अशी काहीच गरज वाटत नाही आहे...... मला तुझी काळजी कळते आहे...... माझा माझ्या मनावर खूप कंट्रोल आहे...... काळजी नको करू मी चुकीचं असं काहीच करणार नाही आहो........ तुझे संस्कार आहेत माझ्यावर....... आपल्या संस्कारांवर विश्वास ठेव........ नको काळजी करूस माझी..... मी नंदिनी सोबत खूप खुश आहे......राज

राज त्याचा रूम कडे जाण्यासाठी मागे वळला....... तर काकी उभी होती..... नंदिनीला राहुलची काळजी घेताना बघून तिला खूप भरून आले होते..... तिने डोळे पुसले आणि राज जवळ आली...

तुला समजून घ्यायला खूप उशीर केला.....माफ कर तुझ्या काकीला..... खुश राहा राजा.... देवाला प्रार्थना आहे की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे ...... काकी त्याच्या केसांवरून चेहऱ्यावरून हात फिरवत बोलली आणि निघून गेली.....

जा....झोप.... बरीच रात्र झाली आहे.....राज

तुझ्यासारखा मुलगा सगळ्या आयांना भेटू दे...... आणि तुझ्या सारखा नवरा प्रत्येक बाईला..... मग त्यांचा जीवन खर्‍या अर्थाने फुलेल......... आईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि झोपायला चालली गेली...... राज सुद्धा त्याच्या रूम मध्ये येऊन पडला.....

नंदिनी मी ठीक आहे आता..... तु जा.....राहुल

भूक लागली का..... तू मगाशी सुद्धा जेवायला आला नव्हता.....नंदिनी

हो तेव्हा रागात होतो...... पण आता काय करू सगळं संपलं असेल.....राहुल

झोपू नको.....   थांब मी आलीच......नंदिनी

ये राज उठ ना....... नंदिनी त्याला हाताने हलवत होती

काय झालं नंदिनी......राज

मला पास्ता बनवून दे ना.......नंदिनी

आता....?.... आता कोणतं आणि तू मगाशी स्तर किती सारे जेवली होती.......राज

राज देना प्लीज......प्लीज.......प्लीज...... तोपर्यंत मी तुला झोपू नाही देणार.......नंदिनी

त्याला माहिती होतं नंदिनी हट्ट करायला बसली की ऐकत नाही..... ते दोघं किचनमध्ये निघून आली....

राज ने वेज पास्ता बनवला........ आणि एका ट्रेमध्ये दोन बाऊल भरून दिले...... आणि ट्रे वरती घेऊन आला......

तू झोप आता...., मी माझे खाते...,. पण दोन-दोन का दिलेस.....नंदिनी

हे तुला आणि तुझ्या दादाला लागले ना.....राज

हा ssss......... तुला कस माहिती......नंदिनी

मला माहिती असते सगळं......जाता त्याला पण खाऊ काय आणि लवकर ये झोपायला.....राज

नंदिनी ट्रे घेऊन राहुल च्या रूम मध्ये गेली.......

Wow यार नंदिनी.....पास्ता my favourite........ राहुल आनंदाने डोळे मोठे करत बोलला....... आणि ट्रे मधून एक बाऊल उचलून घेत एक बाईट खालला...

It's so yummy....... नंदिनी खूपच टेस्टी आहे....... एक मिनिट पण तुला तर बनवता येत नाही...... घरातले बाकीचे पण झोपले आहेत..... हे कुठून आणलं.....राहुल

राजने बनवून दिला.......नंदिनी

क..... काय........ डोळे मोठे करत चम्मच तोंडातच ठेवत राहुल बोलला...

हो राजनी बनउन दिला..... इतका टेस्टी तर तोच बनवतो....खा पटापट मला झोपायला जायचं नाही तर पण मला राज रागवेल.....

नंदिनी ने पटापट खाल्ला आणि ती राहुल ची वाट बघत होती....

जा तू.... मी ट्रे नेऊन ठेवेल....राहुल

ठीक आहे.....नंदिनी पळतच आपल्या रूम मध्ये गेली आणि तिने दार बंद केले..... आणि राज चा कुशीमध्ये जाऊन त्याला घट्ट पकडून झोपी गेली....

Love you brother....you are the best big bro in these whole world...... राहुल ने डोळे पुसले आणि पास्ता चवीने खात बसला.....

******

क्रमशः

🎭 Series Post

View all