भाग 27
डॉक्टर नंदिनी ठीक आहे ना...... राज नंदिनी चेकअप करत असणाऱ्या डॉक्टरांना विचारत होता......
हो श्रीराज..... ती अगदी व्यवस्थित आहे.... घाबरल्यामुळे ती बेशुद्ध झाली..... आणि बहुतेक जेवण नाही केलं ... म्हणून थोडी कमजोरी वाटते आहे..... मी इंजेक्शन दिले आहे ..... थोड्या वेळाने ती शुद्धीत येईल...... उठली की तिला खाऊ घाला म्हणजे ती ठीक होईल..... आराम करू द्या तिला...... आणि तिला भीती वाटेल घाबरेल अशी कोणतीही गोष्ट करू नका....... घाबरायचं काही कारण नाही....... यंग मॅन...... डॉक्टर
थँक्यू डॉक्टर.......राज
तशी तर ती ठीक आहे पण काही गरज वाटली तर मला कॉल करा..... काही इन्स्ट्रक्शन सांगून डॉक्टर निघून गेले
नंदिनीला त्या अवस्थेत बघून सगळेच घाबरले होते... राज तिला स्टोअर रूम मधून वरती बेडरूम मध्ये घेऊन आला होता..... त्याच्या मागे मागे बाकी सगळे आले होते....
राज घाबरू नको तिथे ठीक आहे.....आई
आई प्लीज ......मला तुम्ही सगळे एकटे सोडा......आताच्या परिस्थितीत मी काय बोलेल काय करेल मला पण माहिती नाही तर तुम्ही सगळे इथून जा......राज थोडा रागातच बोलत होता....
त्याचं बोलणं ऐकून सगळे चुपचाप तिथून निघून गेले......तो नंदिनीचा डोक्याच्या वर बेडवर येऊन बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता....... ती अजुनही झोपली होती..... शुद्धीत आली नव्हती.....
छाया राज साठी ज्यूस घेऊन आली होती......
दादा तुमच्यासाठी वहिनी साहेबांनी ज्यूस पाठवलं..... छाया
ह्म्म... ठेवा त्या टेबलवर......राज
दादा पिऊन घ्या आत्ताच.... ऑफिसमधून आल्यापासून तुम्ही काहीच नाही घेतलं या..... छाया
ह्म्म....राज
छाया तिथेच थोड्यावेळ उभी होती....
काय झालं छायाताई काही बोलायचं आहे का.....राज
हो ....ते म्हणजे...... हे सगळं माझ्यामुळे झालं..... मला माफ करा..... छाया
राज तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता.....
ते मी इथे रूम साफसफाई करायला आले होते.... नंदिनी वहिनीसाहेब पण मला मदत करत होत्या....... माझ्या घरचा फोन आला आणि त्यानंतर मी थोडा उदास झाली.... नंदिनी वहिनीसाहेब मला विचारत होत्या काय झालं म्हणून....तर मी त्यांना सांगितलं माझ्या मुलीचं लग्न जमला आहे आणि मला दागिने वगैरे घ्यायची आहे.... तर कुठून सगळं काय समजत नाही... तर त्यांनी मला त्यांच्या कपाटातली दागिने काढून दिले...... मी त्यांना नको म्हणले..... तर त्या हट्टच करत होत्या... मी घालत नाही तुम्ही घेऊन जा...... मी त्यांना सांगितले सगळे रागावतील हे बरोबर नाही......तरी त्या हट्टच करत होत्या.... नाही कोणीच काही नाही म्हणणार ... घेऊन जा तुम्ही... त्यांनी हट्ट केला म्हणून मी ते घेतलेला नाही वहिनी साहेबांना नेऊन दिले.... आणि सगळं सांगितलं.... तर मोठ्या मोठ्या आईसाहेबांचा आमच्या बोलण्याकडे लक्ष गेलं आणि मग त्या नंदिनी वहिनी वर खूप चिडल्या आणि हे सगळं झालं.... मला माफ करा दादा माझ्यामुळे झालं हे...... नंदिनी वहिनी जवळ मी बोलायला नको पाहिजे होतं...... छाया
राजने चुपचाप तिचं बोलणं ऐकून घेतलं....
ह्म्म..... इतकं मनाला लावून घेऊ नका.....राज
नंदिनी वहिनी खूप चांगल्या आहे दादा..... खूप चांगलं मन आहे त्यांचं...... छाया
ह्म्म..... जा तुम्ही.... मी पितो ज्यूस.....राज
छाया तिथून निघून गेले..
*******
धनी ......किती काम करसाल .......सूर्य डोक्यावर आला.... माध्यान्हा झाली .....चला हात पाय धुऊन या....... भाकरी खाऊन घ्या.......नंदू शरू च्या रूममध्ये येत बोलली.......
शरू स्टडी टेबल वर बुक्स पेन घेऊन काहीतरी लिहीत बसला होता....
धनी.........?...... अजब कसातरी तोंड करून तो ......तो मागे वळला आणि तसं तोंड उघडाच्या उघडच राहिल...... आणि डोळे मोठे करत तिच्याकडे बघत होता...
नंदू पूर्ण गाव की गोरी बनून आली होती...... तिने खनाची हिरवी साडीतला जांभळ काठ........ कोपऱ्यापर्यंत लांब बाह्यांचे ब्लाऊज..... केसांचा एक गाठ मारून आबाद्यासारखे करून थोडे बाहेर काढलेले केस ...... केसांची एक बट काना जवळून समोर आलेली...... डोळ्यात खूप काजळ.... कपाळावर लाल मोठ्या कुंकू त्याखाली काळी रे त्याखाली एक छोटसं काळा ठिपका... खाली हनुवटीवर तीन त्रिकोणात असलेली काळे ठिपके...... मरून लिपस्टिक..गळ्यात काळा धागा त्यात एक लॉकेट....कानात सोन्याचे रिंग..हातात हिरव्या जांभळ्या काचेच्या बांगड्या........साडीच्या समोरच्या काही मिऱ्या आणि पदर समोर कंबरेमध्ये खोचलेला...त्यामुळे त्यातून तिची नाजुकशी गोरी कंबर दिसत होती.... आणि कमरेवर एक टोपले पकडलं होतं..... ती त्या रूपात भयंकर सुंदर दिसत होती....... शरू ची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती.....
धनी तोंड बंद करा माशी जाईल...... नंदू त्याच्यापुढे येऊन आपल्या एका हाताने त्याची खालून हनुवटी वर करत त्याचं तोंड बंद करत बोलली..
आज काय स्पेशल आहे का.... नाही म्हणजे हे वेगळे सजन धजने........ शरू
हो आज सगळे बाहेर लग्नाला गेले आहेत संध्याकाळ पर्यंत येतील..... तर आज घर घर खेळुयात..... ती एका डोळ्याची भुवई भरती करत बोलली
काय...... अग आता आपण लहान आहोत का घर-घर खेळायला..... लहान होतो तेव्हा खेळत होतो........ आणि हे धनी काय आहे....... शरू
काय धनी तुम्ही पण मस्करी करता..... नवऱ्याचं नाव कोणी घेतो होy..... नवऱ्याला आवाज द्यायचं की धनी म्हणून आवाज देतात......नंदू हातातला टोपलं बाजूला ठेवत बोलली...
पण अजून लग्न कुठे झालं..... शरू
हा...तर होणारच आहे ना ......आता घर घर खेळायचे तर एक दिवसाचा .....धनी बन ना ......नंदू
चला खूप दमलात काम करून..... उन बघा किती झालं..... ती आपल्या खोचलेला पदर काढत शरू च्या कपाळावर घाम टिपत बोलली.....
हा........... हे काय करतेय...... शरू
किती दमला ना व्हा धनी तुम्ही.......नंदू
ये शी बाबा .. तुला घाम पण नाही आला... थोडा वेळ उन्हात चल बरं...... थोडावेळ तिथे बस मग घाम आला तुला की मी माझ्या पदराने तुझा काम पुसून देईल......नंदू
उन्हात....मी नाही येत मला काम करु दे......शरू
काय धनी ....काम नंतर करा.... चला हात पाय धुऊन या.... कांदा भाकर खाऊन घ्या...... मी आपल्या हाताने बनवून आणली या.....नंदू
पूर्ण बायको बनायचं भूत अंगात घुसल दिसताय हिच्या.....शरू मनातच विचार करत त्याने त्याचे बुक्स बाजूला केले......
बरं मालकिन बाई..... तुमच्या जशी आज्ञा .....त्याने तिचा हात धरला आणि तिला ओढतच आपल्या मांडीवर बसवले.........
धनी हे काय करताय कोणी येईल नव्ह.......नंदू
कोणीच नाही येणार..... कोणीच नाही घरात...... आणि माझी मालकीण एवढी नटून थटून आली आहे एकदा बघू तर दे....... तिच्या हातातल्या बांगड्या सोबत खेळत तो तिच्याकडे बघत होता......
नंदू..... लग्न झाल्यावर तू अशीच तयार होत जा..... मला भारीच आवडली बाबा माझी मालकीण....... तो तिच्या गालांवरून हात फिरवत बोलला.....
चला चावट कुठले.......नंदू
चावट........हा हा हा हा हा..... हे काय ......मी तर काही चावटपणा केला नाही......शरू
ते असं म्हणावं लागते.....ते मीनाच्या शेजारी राहतो ना तो राजू ...त्याचा आताच लग्न झाला आहे..... त्याची बायको त्याला अशी म्हणत असते........नंदू
आणि तुम्ही काय तिथे ऐकायला जात काय....... काय काय बोलतात ते......शरू हसत तिच्याकडे बघत बोलला
हा ....ते म्हणजे.... जनरल नॉलेज वाढवायला......नंदू
हा हा हा हा हा हा हा....... शरू ला आता हसायला कंट्रोल होत नव्हते तो जोराने हसायला लागला..... शरू ला आता तिची मस्करी करायची इच्छा झाली...
इकडून तिकडून काय जनरल नॉलेज गोळा करते.... मी आहो ना मी सांगतो तुला............ त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतले आणि बेडवर झोपवले.... आणि तो तिच्या जवळ जाऊ लागला....
नंदू आता घाबरली....
शरू तू काय करतो आहे......नंदू
तुझं जनरल नॉलेज वाढवतो आहे..... शरू
नको मला काही नॉलेज वगैरे.....नंदू
तुला धनी काय करतो ते सांगतो आहे...मालकीण...... शरू
आपले लग्न नाही झालं आहे अजून .... नंदू
हा पण आज एका दिवसासाठी खेळतोय ना आपण घर घर.... तूच तर म्हणालीस माझा धनी हो म्हणून........ शरू तो तिच्या च्या खूप जवळ गेला.... आणि तिच्या खांद्या जवळ मानेजवळ खाली वाकला......
आता मात्र नंदिनीचे हृदय जोरजोराने धडधडायला लागले........... तिचं डोकं काम करणे बंद झाले....... तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले......... तिचा श्वास वाढला होता........ शरू ला तिचा श्वास जाणवत होता...... आणि तो तिथेच थांबला..... तो उठून बाजूला झाला... आणि हात फोन करून तिच्याकडे हसत बघत होता.........
नंदूने डोळे उघडले तर तो तिच्यापासून दूर उभा होता...... आणि हसत होता.....
शरू तू खूप खराब आहेस....... तिने उशी घेतली आणि त्याला मारायला धावली........ थोड्यावेळ पळापळी खेळून दमल्यावर दोघेही बेडवर बसले......
मग भेटला. का जनरल नॉलेज...... शरू मस्करी करीतच हसत तिच्याशी बोलत होता....
मला नको जनरल नॉलेज ....हे असे.......नंदू
ह्म्म....... आणि असं कुठूनही काही ऐकून बघून यायचं नाही..... कोणी सांगितल्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही....,बऱ्याच चुकीच्या पद्धतीने ही माहिती पोहचवली जाते...त्याचे वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात........ तुला काहीपण माहिती हवी असली तर मला विचार मी सांगेल तुला....... काय समजलं का मालकीणबाई .... शरू तिचं नाक ओढत बोलला......
ह्म्म.... तिने होकारार्थी मान हलवली.......
मालकीणबाई भूक लागली आता खूप....... अशाच बसून राहणार आहात का....... वाढ लवकर आता...... ती शांत झालेली बघून तिचा मूड परत पहिले सारखा करायसाठी तो बोलला......
हो चला बसा........ तिने खाली टाकली आणि त्यावर टोपली घेऊन बसली..... तिने फ्रीज च्या बॉटल मधलं पाणी तांब्या मध्ये ओतले......
हे काय ......आजीने फक्त कांदा आणि भाकरी दिली...... तिची टोपली उघडत ती बोलली.......
तूच म्हणाली होती ना कांदा भाकरी खायची.......शरू
हो कांदा भाकरी म्हटलं तर काय फक्त कांदा भाकरी बांधून द्यायची काय आजीने....... मी कसं खाऊ आता.....नंदू
हा हा..... बरं थांब मी आलोच...... शरू खाली किचन मध्ये गेला आणि एक प्लेट वाढून आणली.....
अरे वा इतका सारा.....नंदू
हो लक्ष्मी काकी बनवून गेली...... शरू
दोघांनी मिळून जेवण फस्त केले..... जेवता जेवता अधून मधून नंदू शरू चा खोड्या काढत होती.....
धनी आता दोन घटका आराम करा .....मग परत शेतावर काम करायचं ना.....नंदू
अरे अजून आहेच का डोक्यात........ शरू
ये झोपणारे थोड्यावेळ....... ते शेतावर असंच करत असतात जेवण झाले की थोड्यावेळ झोपायचं असते...... परत काम करायचं असतं....... नंदु
बरं झोपतो.... तो बेडवर जाऊन झोपला....
हे असं थोडी असते......असा झोपल्यावर पाय दाबून द्यावे लागतात... बायकोचा काम असते ते नवरा थकला असला की त्याचे पाय दाबून द्यायचे असतात..... शरू
हो.....हो माहिती मला...... ती त्याच्या पाया जवळ जाउन बसली आणि त्याचे पाय दाबत होती.....
बस झाल आता खेळ....... खूप सेवा केली तु माझी....... मी तुला लग्नानंतर एक पण काम करू देणार नाही आहे........ राणी आहेस तू माझी..... तुला राणी बनवून ठेवणार .........शरू
हो पण मला तुझी सगळी काम करायची आहे....... ....... तो ऑफिसमधून दमून भागून आला की मी तुला गरम चहा देणार......तुझ्यासाठी माझ्या हाताने जेवण बनवायच आहे...... थकला असल्यास की तुझ्या डोक्याला तेल मालिश करून देणार...... तुझे पाय दाबून देणार..,.... मला तुझ्यासाठी सगळं सगळं सगळं करायचा आहे.........
शरू आता तुझ्याशिवाय रहावले नाही जात...... तू इथे नसलास की मला तुझी खुप आठवण येते..... मी उन्हाळ्याची खूप वाट बघत असते...... तू कधी कधी येतो मला असं झालं असते........ आणि आता तर इतके दिवस चालला...... कशी राहू रे तुझ्याशिवाय.......नंदू
ये वेडाबाई....... मी पण नाही राहु शकत तुझ्याशिवाय...,.. तू म्हणशील तर नाही जात...... शरू
नाही तू जायचं...... तुझं स्वप्न आहे ना... खूप शिकायचं खूप मोठा व्हायचं..... मला तुझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली बघायची आहेत...... मला तुझी कमजोरी नाही बनायचं.... मला तुझी शक्ती बनायचं........ तू खूप मोठ्या झाला पाहिजे.... सगळ्यांनी तुझं कौतुक केलं पाहिजे..... मला नेहमीच तुला आनंदी आणि असं हसतच बघायचं आहे...... सगळं जग तुला ओळखेल.... मला तुझं खूप मोठ नाव झालेले बघायच आहे....... आणि मग मी कधी बाहेर गेली की मला म्हटलं पाहिजे ती बघा द श्रीराज देशमुख ची बायको नंदिनी श्रीराज देशमुख........ तुझ्या नावातच माझी ओळख असणार आहे ना......नंदू
बापरे इतका प्रेम करतेस माझ्यावर.....शरू
You are my life
you are my pleasure
You are my life,
you are my happiness
You are the love,
you are the lover
You are my first wish,
you are the last
Your are my dreams
You are my lifeline
You are my heart beats
You are my breaths......
You are my life ..... beyond the life ...
तू माझा श्वास आहे .....
शरू आवसून तिच्याकडे बघत होता नि तीच बोलणं ऐकत होता....तिच्या बोलण्याने त्याचे डोळे थोडे पणावळे..ते त्याने पुसले नंदिनीच्या नकळत......किती प्रेम करते ही माझ्यावर... माझी लहानी चिमणी माझ्या बद्दल ऐवधा विचार करते.....माझ्यावर किती विश्वास आहे हीच ........मी पण कधी ऐवधा केला नाही .....मी खरंच तीच प्रेम निभावू शकेल ना ......मनातच त्याचे विचार सुरू होते....
नंदिनी इतका प्रेम नको करू ग माझ्यावर..... उद्या जर मी नाही आलो ....मला काही झालं......
Shsss.... असं नाही बोलायचं...... आणि मला माहिती आहे तू येशील...आणि. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट बघेल........ श्रीराज शिवाय या नंदिनीच काहीच अस्तित्व नाही
माझ्या आयुष्याचं एकच इक्वेशन आहे
"तू नाही तर मी नाही........" नंदू. त्याच्या डोळ्यात हरवत बोलत होती........
I love you Shriraj........❤️❤️ म्हणत नंदिनी ने त्याला मिठी मारली
I love you too my sweetheart..... शरू तिच्या डोक्यावर किस करत बोलला.... आणि त्याला आता तिला किस करायचा मोह आवरला नाही....... नंदिनी त्याच्या डोळ्यात गुंतली होती...... तो त्याचे ओठ तिच्या ओठां जवळ नेत होता.... त्याने त्याचे डोळे बंद केले होते..... आणि त्याने किस केले......
तुझे ओठ इतके रफ कसे झाले......त्याने डोळे उघडून बघितलं तर त्या दोघांच्या ओठांमध्ये एक पेपर होता.....तो जेव्हा जवळ येत होता तेव्हा नंदिनी ने बाजूलाच त्याचे काही पेपर्स पडले होते हाताला लागेल तो पेपर पकडून तिने तो मध्ये पकडला होता.....
काय यार नंदिनी ....तू पण ना.... रोमँटिक मुड ची पूर्ण वाट लावते यार........
हे सगळं लग्नानंतर..... तिने त्याला ढकलले आणि ती दूर पळाली........
नंदू थांब.........
राज.... राज....... नंदिनी च्या आवाजाने राज भानावर आला....... त्याच्या हातामध्ये तू नंदिनी ने किस केलेला पेपर होता......त्यावर तिचे lips चे निशाण बनले होते...... त्याने त्यांची ती गोड आठवण खूप जपून ठेवली होती.....
हो नंदिनी मी इथेच आहो तुझ्या जवळ.... नंदिनीचा डोकं आपल्या मांडीवर घेत तो बोलला...
राज तू माझ्या जवळच राहा...... मला फक्त तुच पाहीजे.....नंदिनी
हो मी इथेच आहो....... बरं तुला आता बरं वाटतंय ना......राज
हो..... पण मला खूप भीती वाटत आहे........नंदिनी
मी आहो ना. . .. त्याने तिला उठवून उशीला टेकून बसवले...... हे बघ मण्या मी इथेच आहे...... त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला आश्वस्त केले.....
राज मला खूप भूक लागली......नंदिनी
हो.... एक मिनिट बस .....मी घेऊन आलो......राज
छाया ताई जेवायची प्लेट आणा वरती .....राजने वरतून च खाली आवाज दिला..... छायाने जेवणाचा ताट आणून दिला.....राजने तिला जेवण बनवलं आणि स्वतः सुद्धा तिच्यासोबत जेवण केले....... आणि तिला औषध दिले....
मन्या आता थोड्या वेळ आराम करायचा........ मग तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आणून ठेवले आहे...... चल डोळे बंद करा आणि पटकन झोपायचं.......राज
नंदिनी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली....... राज तिच्या डोक्यातून केसातून हात फिरवत तिच्या डोक्यावर थोपटत होता........... औषधामुळे तिला लगेच गुंगी आली........ तिला नीट झोपवून तो खाली गेला....
राज..... हे काय ....आम्हाला तू सगळ्यांना रूमच्या बाहेर हाकललं...... हे तुला शोभत नाही......शशिकांत
तेव्हा मी खूप रागात होतो...... मी काय बोलून गेलो असतो मलाच काही माहिती नव्हते......आणि तुम्ही सगळे तिथे माझ्या डोळ्यासमोर राहिले असता तर माझा राग अजून वाढला असता...... राज
कशी आहे नंदिनी......आई
ठीक आहे .....झोपली आहे.....राज
आजीसाहेब कोणाला मदत करायची इतकी मोठी शिक्षा असू शकते काय......राज
मदत कशी केली जाते काय..... ते पण कोणाला मोठ्याला न विचारता..... ते सगळे सोन्याचे दागिने होते....... ते तर छाया आपली इतक्या दिवसांची आहे म्हणून तिने ते परत दिले........ आजिसहेब
छायाताई आपल्याकडे पंधरा वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून काम करत आहेत..... समजा थोडी मदत केली तरी काय बिघडते........ नंदिनी खूप निरागस आहे..... तिला हे सोना चांदी श्रीमंत गरीबी हे काही समजत नाही....... तिचं मन निर्मळ आणि स्वच्छ आहे..... कोणाला तरी मदतीची गरज आहे एवढेच तिला ते कळलं होतं.....तिला समजावून सांगितले असते तर ती समजली. असती.....मला सांगायचं असते.......माझं ती नक्कीचं ऐकते....... पण तिच्या या निरागस पणे ला तुम्ही इतकी मोठी शिक्षा दिली........राज
इतकी मोठी काय शिक्षा दिली...... ती काय लहान आहे काय........ तुम्ही आणि राहुल छोटे होता तेव्हा पण तुम्हाला अशी शिक्षा देत होते...... आजीसहेब
ती फक्त शरीराने मोठी आहे पण मनाने आणि डोक्याला अजून सुद्धा लहानच आहे हे तुम्ही वारंवार का विसरत आहात...... तिचे आई-बाबा गेले तेव्हापासून ती अंधाराला आणि एकटाच राहायला खूप भीती घाबरत असते....... आज जर काही बरं-वाईट झालं असतं ना .....तर मी तुम्हाला कोणालाच माफ केले नसते....राज
तुम्हाला फक्त नंदिनी दिसतात....... तुमचे या घरा प्रती.. लोकांप्रती काही कर्तव्य आहेत की नाही.......आजिसहेन
मी माझी कर्तव्य जमेल तेवढी पूर्ण करतो आहे मी माझ्या कर्तव्य यांना कधीच पाठ दाखवली नाही आहे...... फक्त एवढेच की आता नंदिनीला माझी जास्ती गरज आहे म्हणून मी तिला माझ्या जास्ती वेळ देतो आहे पण याचा अर्थ हा नाही होत की मी माझे कर्तव्य करत नाही आहो....... मला जर या घरचा लोकांचा विचार नसता तर मी कधीच हे घर सोडून गेलो असतो......दर दोन-तीन दिवस आड नंदिनीला काही ना काही त्रास देत असता पण तरीसुद्धा मी चूप आहे कारण की मला असे वाटते की हे माझं घर आहे आणि ही माझी माणस आहे.......राज
आम्ही पण काही चूक केली नाही....नंदिनी या घरात राहते..... तिला वळण लागायला हवे म्हणून आम्ही तिला शिक्षा दिली होती.......आजिसहेब
तुम्ही कुठल्या हक्काने तिला शिक्षा दिली.......जर तुम्हाला तिला प्रेम देता येत नाही..... तिची काळजी करता येत नाही..... तिला आपुलकीच्या नात्याने स्वीकारता येत नाही..... तर तुम्हाला तिला शिक्षा देण्याच्या काहीही एक हक्क नाही आहे................. हे बरं असते आपल्य समाजामध्ये........ सून लग्न करून घरी आली की तिच्यावर हक्क गाजवायला तुम्ही तयारच असतात........ कुठे चूक करते ते बघतच असता....... आणि मग बोलायला आणि शिक्षा द्यायला तुम्ही लोकं तयार असता....... नंदिनी तरी तिला समजत नाही..... अवांतर पण समाजामध्ये हेच घडत असते...... काय तर म्हणे आपल्या घरचं वळण लागायला हवं........... पण प्रेम मात्र द्यायला विसरून जाता......आणि समोरच्या कडून मात्र प्रेमाची.... आपुलकीची अपेक्षा ठेवता....... नाही तेव्हा स्वतःला मोठे म्हणून घेतात..... आम्हाला जास्ती समजते.. आम्ही जास्त उन्हाळे-पावसाळे बघितले याचा आव आणता....... पण ज्या वेळेला ला खरच समजून घेऊन जवळ घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही आपले हात झडता...आणि तिच्यावर आरोप करून मोकळे होता....आपल्या घरात आणली आपण मुलगी तिची काळजी घेणे आपले पाहिले काम आहे मात्र विसरता.....तिच्या कर्तव्याची लिस्ट मात्र तिच्या हातात देता...
.....शिक्षा देण्याचा बोलण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे जो खूप प्रेम देऊ शकतो बाकी दुसरा कोणालाच नाही........ तुम्ही सगळे एकदा नंदिनीला प्रेम तर देऊन पहा ती तुमच्यावर स्वतःचा जीव ओवाळून टाकेल.......राज
आता आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवाल....... आम्ही जे काही करत होतो ते तुमच्या सुखासाठीच करत होतो.......आजिसहेब
माझं सुख हे फक्त नंदिनी मध्ये आहे........
आणि सर्वांनी लक्षात ठेवा......
"नंदिनी नाही तर मी पण नाही...."
*******
या प्रसंगानंतर मात्र नंदिनी खूप शांत झाली होती...... तिने स्वतःला आपल्या खेळांमध्ये आणि कामांमध्ये गुंतवून घेतले.......ती जास्तीत जास्त वेळ फक्त आपल्या रूम मध्येच राजच्या अवतीभवती राहायची....... तिने आता सिरीयसली अभ्यास करण्यास सुरू केला होता..... तिला पेंटिंग मध्ये सुद्धा इंटरेस्ट आला होता ती चांगले चांगले पेंटिंग काढायला शिकली होती........ तिचा अल्लडपणा बराच कमी झाला होता...... तिचं विश्व फक्त राज आणि राजस झालं होतं......
******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा