भाग 26
राज तू ऑफिसमध्ये चालला...... नंदिनी राज आरशासमोर उभा राहून ऑफिसला जायची तयारी करत होता तेव्हा त्याच्या मागे एक स्टूल आणत त्या स्टूल वर उभी राहात बोलली...
ह्म्म...... राज वेस्टकोट घालत बोलला..
तिथे काय करते स्टूल वर ... खाली उतर पडशील..... राज ... बोलतच होता की नंदिनी ने पाठीमागून त्याच्या गळ्यात हात टाकले... आणि आपले दोन्ही पाय पुढे अनंत फोड करून राज चा पाठीवर लटकली...
अगं हळू पडशील..... राज तिला पाठीमागून पकडत बोलला....
राज तू ऑफिसला गेला की मला खूप बोर होतं...... ऑफिसमध्ये नाही गेले तर काय होतं....... नंदिनी तिची मान त्याच्या खांद्यावरून पुढे आणत हनुवटी खांद्यावर ठेवत बोलली...
हो जावं तर लागेलच ना....... मग आपल्याला पैसे कुठून मिळणार....... आणि मग या चिमणी ला खेळणे.. चॉकलेट ...आईस्क्रीम ...काय काय हव असते ते कुठून आणणार आपण.....राज
माझ्याकडे आता खूप खेळणी आहेत...... मला आता जास्त चॉकलेट नको फक्त एकच दे...... तू घरी राहा ना..... मला तुझ्या सोबत खेळायच आहे....... मला फक्त तुच पाहिजे आहे......नंदिनी
काम नाही केलं तर आपली स्वप्न कशी पूर्ण होणार...... आणि मला माझ्या गोड गोड परीची सुद्धा तर स्वप्न पूर्ण करायची आहेत.......राज
म्हणजे.....?..... मला तर तू सगळे देतो.....नंदिनी
अगं म्हणजे तुला काहीतरी बनवायचं ना...... सांग बरं तुला मोठे होऊन काय बनायचं.....?
मला ना टीचर बनयचं.... पण ती श्वेता टीचर येते ना तिच्यासारख नाही...... ती फारच रागवत असते... मला ना छान वाली टीचर बनायचं.... जी मुलांना रागवत नाही.... चॉकलेट ..खाऊ देते..... मुलांसोबत खेळते..... अशी.. आणि तुझ्यासारखाच बनायचं......खूप हुशार........नंदिनी
अरे वा छान....टीचर बनायला आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल बरं..... मग शाळेत जावं लागेल.... बुक्स घ्यावे लागेल.... मग पैसे नको का..... म्हणून मी ऑफिसमध्ये जातो म्हणजे आपल्याला पैसे मिळतील...आपली स्वप्नं पूर्ण होतील.......राज
राज तू मला शाळेत कधी घेऊन जाणार आहेस..... तू मला बोलला होता नाकी इथे खूप शाळा आहे..... शाळेत जाऊ आपण...... मी कधी जाणार शाळेत.....नंदिनी
अरे हो.... विसरलो होतो मी..... आज बघतो.....राज
राज तिला पाठीवरच घेऊन रूम मध्ये फिरत होता आणि त्याच्या ऑफिसच्या लागणाऱ्या वस्तू कलेक्ट करत होता.....
राज तू खूप छान दिसतो.....तो टीव्ही दाखवतात ना रितिक रोशन त्याच्यापेक्षा पण खूप छान दिसतो......तू माझा फेवरेट आहे........नंदिनी
हो ssss.....राज
हो खरच.......... राज तुला पण ऑफिस मध्ये बाहेर टीव्ही मध्ये दाखवतात तशी फ्रेंड असते का...... ती टीव्ही मध्ये असते तशी सुंदर सुंदर आंटी सारखी.....नंदिनी
तिच्या बोलण्यावर राजला खूप हसू आले......... टीव्ही मधून बरच नॉलेज हिच्या पर्यंत पोहोचला दिसते....... खरंच आहे लहान वयातच मुलांना टीव्हीमुळे सोशल मीडियामुळे काय काय समजायला लागलं...... राज मनातच विचार करत होता
हो ऑफिस मध्ये खूप टीव्हीसारख्या आंटी आहेत...... पण माझी मैत्रीण नाही कोणी.....,...राज
का .....तुला मैत्रीण आवडत नाहीत का........ तू तर इतका छान दिसतो..... तू अशी सुंदर आणि ती मैत्रीण का बनवत नाहीस..... मग ती माझ्यासोबत पण खेळेल ना.....नंदिनी
हा हा हा हा हा........ राजला तिच्या बोलण्यावर खूप हसायला आले....... टीव्ही दाखवतात ते गंमत गंमत असतं..... ते खरे नसते....... आणि तशी पण मला मैत्रिणीची गरज नाही आहे..... माझ्याजवळ आहे ना ही माझी परी राणी हीच माझी बेस्ट फ्रेंड आहे....... आहे ना तू माझी बेस्ट फ्रेंड.... राज तिचं नाक ओढत तिला बोलला..
आता कंबरडे पण मोडा त्यांचं....... आधी जेवढा भार टाकून ठेवला आहे त्यांच्यावर...... त्यांचा जीव नकोनकोसा करून ठेवा तुम्ही...... आणि आता वरून हे असं पाठीवर लहान आहात का नंदिनी तुम्ही आता.......आजी साहेब त्यांच्या रूम पुढून जात होत्या... त्यांना राज तिला पाठीवर घेतलेले दिसला आणि ते बघून त्या ओरडल्या...
आजीचा आवाज एकूण नंदिनी घाबरली आणि ति पाय झटकू लागली.... तसे तिला राजने खाली उतरवले....आजी साहेबांना बघून ती राज च्या पाठीमागे लपली आणि एका डोळ्याने आजिसहेबांकडे बघत होती......
राज खूप स्ट्रॉंग आहे......तो रोज खूप एक्झरसाइज करतो..... तिथे ठेवले आहे ना गोल गोल ते भारी भारी वजन सुद्धा उचलतो..... होना राज .... मी तुझी पाठ नाही मोडली....... नंदिनी राजच्या पाठीमागून च घाबरत बोलली
राजने हो म्हणून मान हलवली......
डोक्यावर बसवा आता ....तेच राहिला बाकी....... तिचं बोलणं सगळेच मान्य करता तर....ती जे बोलली ते मान्य करा..... ते ती खरं बोलली होती...... स्वतःला शोभेल अशी कोणी दुसरी मुलगी बघा...... आजीसाहेब
आजी साहेब तुम्ही काय हा फालतू विषय घेऊन बसला आहात..... तिला तर समजत नाही..... जे दिसतं तेच खरं वाटते...... तुम्हाला माहिती आहे ना माझं लग्न झालं आहे ते...... मला बाकी मुलींमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे......राज
ह्म्म..... बर आहे ....स्वतःच्या मुलांना पाठीवर खेलावण्याचा वयात तुम्ही बायकोला पाठीवर घेऊन खेळवा...... आजी टोचेल असं बोलून निघून गेली...
राज तुझी पाठ दुखतंय का....नंदिनी केविलवाण्या स्वरात म्हणाली..
नाही रे माझ्या सोन्या...... तू म्हणालीस ना मी स्ट्रॉंग आहो...... मग मी खूप स्ट्राँग आहे.....हो की नाही.....राज
हो.......नंदिनी आजीला बघून आलेल्या टेन्शन दूर झालं...
बरं चल थोडं काम आहे ते करून लगेच परत येईल.......मला गोड गोड स्मायल दे तुझी आता....आज खूप महत्वाचं काम आहे ...तू हसली की सगळं छान होते........ राज
हो....हसतच तिने राज चा गालावर किस केले.........तोपा. गालात हसला...
छाया ताईंना सांगितला आहे रूम आवरायला तर तिला मदत कर... आणि फारच बोर झालं तर गेम खेळ..,... आणि आबा आहेत त्यांच्या जवळ जा.... अशी थोडीफार इन्स्ट्रक्शन्स त्याने तिला दिले.,....
राज नी त्याच्या रुमचं पूर्ण रिनोवेशन केले होते...... त्या तिथे एका कॉर्नरला एक छोटी रूम बनवून नंदिनी साठी काही mind's गेम इन्स्टॉल केले होते....... ज्याने तिची लॉजिकल आणि थिंकिंग प्रोसेस वाढेल आहे.... आणि एका कॉर्नरला तिचे डॉल्स के भांडे अशी सगळी गेम्स अरेंज केले होते..... तिथेच एका भिंतीवर तिचे हात आरामात पोहोचेल अशी एक मोठे शेल्फ तयार केले होते ज्यामध्ये केला आवडेल असे हेल्दी फूड्स चे डब्बे तिचा आवडता खाऊ असं सगळं अरेंज केलं होतं..... तिथेच एका साईडला गोष्टींचे पुस्तक..... pictorial स्टोरीज बुक.... सोशल अवेअरनेस बुक्स या सगळ्यांचे अरेंजमेंट केली होती..... राजने तिच्यासाठी टीचर सुद्धा ठेवली होती..... जी तिला स्कूल टाईपचे एज्युकेशन देत होती....... त्याने मुंबईमध्ये बऱ्याच शाळा रिलेटेड गोष्टी सर्च केल्या होत्या..... पण नंदिनी सारख्या मुलीसाठी एज्युकेशनल रिलेटेड त्याला सापडले नव्हते....... घरातच बसून तिची प्रोग्रेस होणार नाही त्याला माहिती होते..... त्याची काकी... ती एका ngo ची पार्ट होती.....असा तर तिला किटी.... पार्टी.... वगैरे पासून फुरसत नसायची पण ही एक गोष्ट तिने चांगली केली होती..... तिच्या ओळखीचा एक मुलींचे अनाथाश्रम होतं.... तिथे सगळ्या वयाच्या मुली होत्या..... सुट्टीच्या दिवशी रविवारी राज नंदिनीला तिथे घेऊन जायचा...... त्यामुळे तिला मुलांमध्ये राहता यायचं....... आणि वेगवेगळ्या वायांच्या मुलीसोबत राहिल्यामुळे ती बऱ्याच गोष्टी शिकत होती....... राजने त्या आश्रमामध्ये काही चांगल्या टीचर्स... त्यांना डबल salary देऊन ठेवल्या होत्या.....त्यामुळे नंदिनीला पण त्यांच्यासोबत शिकायला मिळायचं आणि तिला शाळेत गेल्याचे समाधान व्हायचे....... तरीसुद्धा तिच्या डोक्यामध्ये शाळेचे भूत होतच...... जे ती राज ला अधुन-मधुन बोलून दाखवायची.
******
Wow......he is so dashing and handsome...
हो ना आणि किती टॅलेंटेड सुद्धा....
काय बोलतोय...... असे वाटतय त्यालाच बघत रहाव...
असा बॉस असेल तर मी तर चोवीस तास काम करायला तयार आहे..... मजा आहे यार त्यांच्या ऑफिसच्या लेडीज स्टाफ ची
He is so smart yar...... काय उत्तरे दिली......
प्रोजेक्ट यांच्या कंपनीला भेटेल.....,. बाकीच्यांना काय फाडून खाल्ले आहे ...
एका दुसऱ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एका प्रोजेक्ट शी रिलेटेड प्रेझेंटेशन्स सुरू होते...... खूप मोठ्या लेव्हल चा प्रोजेक्ट होता..... त्यामुळे शरीर आज स्वतः प्रेसेंटेशन द्यायला आला होता..... आणि त्याचे प्रेझेंटेशन सुरू होते...... तिथल्या सगळ्या मुली मात्र त्याला बघण्यातच गुंग झालेल्या होत्या...... दिसता येतो तसाच होता.,.. त्याने व्हाईट शर्ट थ्री पीस सूट घातला होता..... त्याने कोट काढून ठेवला होता..... तो परफेक्ट ऑफिस लूक मध्ये होता.... अंड चेहऱ्यावर आणि बोलण्यामध्ये भारी कॉन्फिडन्स.... मुली तर मुली पण बाकीचे बिजनेस मन सुद्धा खूप इम्प्रेस झाले होते....... आणि फायनली झाले तेच प्रोजेक्ट श्रीराजाच्या कंपनीला भेटला होता....... सगळे त्याचा अभिनंदन करत होते......
राज आपल्या कंपनीमध्ये आला..... राज आणि रोहन बोलत बोलत पुढे येत होते.... मागे लावण्या येत होती...
श्रीराज सर आज खूपच खूश दिसत आहेत....... नक्कीच प्रोजेक्ट आपल्याला भेटला दिसतोय....
पण हे इतक्या थोड्यावेळासाठी का येतात ऑफिसमध्ये.... त्यांना बघाय साठी किती वाट बघावी लागते
बॉस सिंपल लूकमध्ये पण किती हँडसम दिसतात.....
ते अल्वेज च ऑसम दिसतात यार.....
यार पण ते कधीच कुठल्या मुलीकडे बघत सुद्धा नाही.... कोणाला भाव पण देत नाही......his wife is so lucky yaar...
राज ब्लेझर काढून ठेवला होता तो व्हाईट शर्ट आणि ट्राउझर मध्येच आला होता.... शर्ट चा स्लीव सुद्धा वरती फोल्ड केल्या होत्या.... हातात ब्लॅक बेल्ट वॉच....
राज मधोमध येऊन उभा राहिला.....
हॅलो गाईज...... तुमच्या सोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे..... आपल्याला डेल्टासॉफ्ट कंपनी चा प्रोजेक्ट भेटलेला आहे...... दिस इस लाईक मोस्ट अवईटेड प्रोजेक्ट फॉर मी..... तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत चांगलंच काम केले आहे...... आता या प्रोजेक्टसाठी सुद्धा जोमाने कामाला लागा....... and yess promotions and salary hikes are waiting for you after this so give your best ....all the best..... राज
सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.... आणि त्याला काँग्रॅच्युलेशन्स केले....
Thank you all...... हसत राज त्याच्या केबिन मध्ये निघून गेला....
मिस लावण्या...... मला आपल्या सुरू असलेल्या सगळ्या प्रोजेक्टच्या पहिला हवे आहेत....राज
सर ....माय फ्रेंड्स कॉल मी lavs.... मिस लावण्या फार बोरिंग आणि मोठा आहे..... लावण्या
मिस लावण्या इज ओके फोर मी... नो प्रॉब्लेम....नाव प्लीज मला फाईल्स आणून दे.....राज
ओके सर... लावण्या फाईल आणायला केबिनच्या बाहेर गेली..
श्रीराज ने मोबाईल बाहेर काढला आणि युट्युब वर लहान मुलांचे काही एज्युकेशनल व्हिडीओस बघत होता...... आणि ते बघता बघता त्याला सकाळी नंदिनी पण आलेली गोष्ट आठवली आणि तो एकटाच हसायला लागला..... तिथे रोहन आलेला सुद्धा त्याला कळले नव्हते..... इतका तो त्या सकाळच्या गोष्टींमध्ये गुंग झाला होता...
आज भारीच खूष दिसत आहेत बॉस आमचे..... काय झालंय एवढं खळखळून हसायला.... आमच्यासोबत पण शेअर करा आम्ही पण हसायला कंपनी देऊ..... नंदिनी मॅडम ने परत काही कांड केलेला दिसतो.,........ रोहन पुढल्या चेयर मध्ये बसत बोलला..
हा हा हा हा.......... हो लहान मुलांचे डोकं किती निरागस असते नाही..... जे बघतात त्यालाच खरं मानायला लागतात........राज
हो...... झालं काय ते पण सांगशील.....रोहन
नंदिनी मला म्हणत होती की ऑफिस मधली कुठली आंटी मैत्रीण नाही का तुझी......... राजने सकाळचा किस्सा त्याला सांगितला.......
हा हा हा हा..... ऑंटी व्हेरी नाईस ....... इथल्या मुलींना कळलं ना त्यांना आंटी म्हणताय....... जॉब सोडून जायच्या त्या....... रोहन जोरजोराने हसायला लागला...... पण काय रे ऑप्शन चांगला दिला आहे नंदिनी ने .... यू आर फ्री टू डू अनीथिंग...... यू हॅव व्हेरी हॉट सेक्रेटरी अल्सो........ बिचारी तुला इम्प्रेस करण्यासाठी किती काय काय करते..., रोज फ्लॉवर्स असतात......
She knows I am married...... And I am very much happy ???? with my life partner..... राज
बरं ऐक मी तुला बोलावणार होतो...... मला एक नवीन प्रोजेक्ट सुरु करायचा आहे..... लहान मुलांसाठी एज्युकेशन प्रोजेक्ट..,... राजने सगळे डिटेल्स रोहनला सांगितले....... सुरु होण्यासाठी मला पूर्ण वेगळा स्टाफ हवा आहे..... आपल्या ऑफिसमध्ये एक वेगळं शिक्षण करूया....... तर त्यासाठी तू स्टाफ इंटरव्यू सुरु कर..... आणि लवकरात लवकर सेट अप कर....... आणि फायनल सेलेक्टेड कँडिदेट्स माझ्याकडे पाठव मी सिलेक्ट करेल त्यातून.......राज
ओके....आणि हो आजच्यासाठी सुद्धा काँग्रॅच्युलेशन्स...... कुठून आणतो एवढे एनेर्जी.... फार पेशन्स आहे तुझ्या मध्ये......,.. रोहन
नंदिनी.... राज हसतच बोलतो
रोहन हसतो आणि निघून जातो..
लावण्या सगळ्या फाईल्स आणून देते........ राज सगळ्या फाइल्स चेक करून त्यात थोडेफार करेक्शन्स सांगतो..
मीस लावण्या आजच्या प्रोजेक्ट बेसिक डिटेल्स उद्या पर्यंत येऊन जातील...... त्याप्रमाणे टीमस तयार करा..... आणि मला रिपोर्ट करा...राज
ओके सर.....लावण्या
ओके.... आय एम लिविंग नाऊ.... आणि येस मिस लावण्या.... मी केबिनमध्ये पाय थोड्यावेळासाठी असतो.....ही फुला येथे ठेवण्यापेक्षा बाहेरच्या वास मध्ये ठेवा.... फ्रेशनेस टिकून राहील....राज आणि तो चालला जातो
खूप पापड लाटावे लागेल याच्यासाठी..... मला इग्नोर करतो.... आजपर्यंत मला कोणी इग्नोर केले नाही..... लावण्या मनातच विचार करत असते
******
राज घरी येतो.... घरी सगळीकडे शांतता असते....
छायाताई हे आईस्क्रीम घ्या आणि सगळ्यांसाठी काढून आना.. सगळ्यांना गुड न्यूज सांगायची आहे........ म्हणत त्याने आईस्क्रीम चा बॉक्स छाया ला दिला आणि त्यातले दोन चॉकलेट फ्लेवरचे स्मॉल बॉक्सेस घेऊन तो वरती जात होता..
पण दादा.... छाया
काय झालं छाया ताई.....राज
तेवढयात तिला आजीचे बोलणे आठवले....नी ती काही नाही म्हणाली
ओके....राज वरती गेला ...
दादा किती खुश आहेत आज....... पण आता कळेल तर..... छाया आईस्क्रीम चा बॉक्स घेऊन किचन मध्ये गेली
राज रूम मध्ये आला... त्याने ऑफिस बॅग बाजूला ठेवली आणि तो..... तो नंदिनी ला शोधत होता.....
अहो आज राज खूप आनंदात दिसत आहे..... आई साहेबांसोबत बोला ना तुम्ही........निती
तू मध्ये पडू नकोस...... आई साहेब जे करताय ते ठीकच करतायेत.....शशिकांत
अहो पण....निती
पण नाही नी बिन नाही.... मुलाला सांभाळता आलं नाही.... म्हणून हे सगळं बघावं लागते.....शशिकांत
नंदिनी ....नंदिनी .....रूममध्ये आवाज देत बघत होता..... बघ मी एक तुझी फेवरेट गंमत आणली आहे तुझ्यासाठी..... राजनी सगळी रूम शोधून काढली...... पण त्याला नंदिनी कुठे दिसली नाही.... त्याला वाटलं आबाच्या रूम मध्ये असेल म्हणून तो तिथे बघायला गेला पण तिथे पण नव्हती..... आबा सुद्धा बाहेर गेले होते..... तो बाहेर बगीच्यामध्ये बघायला गेला पण तिथे पण नव्हते... आता मात्र तो टेन्शन मध्ये आला होता.......
छायाताई नंदिनी कुठे आहे......नंदिनी नंदिनी....... राज आतमध्ये येत जोराने आवाज देत होता.....
काय झालंय एवढं ओरडायला...... आजी साहेब हॉलमध्ये येत बोलल्या.....
राज चा आवाजाने बाकी सगळे पण बाहेर आलेत....
आजीचा बोलणं दुर्लक्ष करून परत तो नंदिनी नंदिनी करत घर शोधत होता...
आई नंदिनी कुठे आहे.....राज
आईचे चूप उभी होती ....ती आजीसाहेब कडे बघत होती...... तसेच राज चा लक्षात आले आणि तो आजी साहेबां जवळ गेला.....
आजीसाहेब नंदिनी कुठे आहे.......राज
एवढा ओरडायचे काही कारण नाही आहे... ती आहे तिथे ठीकच आहे.... आजीसाहेबा
नंदिनी कुठे आहे.......राज थोड्या मोठ्या आवाजात बोलला
तुमच्या ने ती सांभाळली जात नाही..... शिस्त तर तुम्हाला लावता येत नाही आहे....... आम्ही तिला शिस्त लावतो आहे..... तुम्ही मध्ये बोलू नका.... आजीसाहेब
काय.......?.... नंदिनी कुठे आहे........राज
ती आमचा ऐकत नव्हती....... आम्ही तिला तिथे स्टोअर रूम मध्ये बंद केले आहे...... आजीसाहेब
काय......... तो ओरडला.... आणि पळतच स्टोअर रूम कडे गेला....... बाहेरून दार बंद करून ठेवले होते....... त्याने दार उघडले आणि तो आत मध्ये गेला बघतो तर आत मध्ये खूप अंधार होता....... नंदिनीला तर अंधाराची खुप भीती वाटते.........
नंदिनी... नंदिनी.... करत तो ओरडत होता आणि स्टोअर रूममध्ये सगळीकडे बघत होता.... पण नंदिनी त्याला दिसत नव्हती..... त्याने मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि तो सगळीकडे बघायला लागला....... त्याला एका कोपर्यात नंदिनी पोटाजवळ पाय घेऊन खाली झोपलेली दिसली...... रडून रडून तिच्या डोळ्यांचा पाणी सुकले होतं.... केस विस्कटलेले होते...... तिला या अवतारात बघून त्याच्या ह्रदयात धस्स झालं.......त्याने तिला आपल्या हातांवर उचलून छातीजवळ घेतलं....
नंदिनी...... नंदिनी....... बाळा...... उठ..... बघ मी आलोय.....तिला गालावर मारून उठवत होता........ पण ती उठत नव्हती....... आता मात्र त्याला भीती वाटायला लागली...... त्याचं काळीज जोरजोराने धडधडायला लागले......... त्याने आपले बोट तिच्या नाकाजवळ नेऊन बघितले...... आणि त्याने मोठा श्वास घेतला...... त्यांनी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले..... आणि नंदिनीला आपल्या हातांवर उचलून बाहेर घेऊन आला....... आणि तो सगळ्यांकडे रागाने बघत होता...... जणूकाही त्याचे डोळे आग ओकत होते.........
*******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा