Aug 09, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 25

Read Later
नंदिनी...श्वास माझा 25
 

भाग 25
 

रोहन हे जी नवीन पीए अपॉइंट केली आहेस ती अजिब  नाही वाटत...... श्रीराज

हो.... हॉट आहे ना  जास्ती.....रोहन हसत बोलला

हा हा हा हा ......I don't care ........ म्हणून तू अपॉइंट केलीस का....... श्रीराज

अरे तसं नाही ....प्रोफाईलला परफेक्ट मॅच होती... आणि शशिकांत सरांनी पण शब्द टाकला होता म्हणून घेतले..... रोहन

तसं नाही रे ...मी तिचे सगळे डिटेल्स चेक केले ......तिच्या वडिलांची तिच्या घरची इंडस्ट्रीज आहेत..... तिथे काम करायचं सोडून ती इथे आली आहे म्हणून जरा अजब वाटत आहे..... श्रीराज

हो माझा डोक्यात आले .....ते मी त्यांना इंटरव्ह्यूच्या वेळी विचारलं होतं...... तर त्या म्हणाल्या की स्वबळावर काहीतरी  करायचा आहे....... स्वाभिमानी वाटले जरा...  रोहन

ह्म्म...... पण जरा चिपकू पॅटर्न आहे..... काम तसा ठीक करते म्हणा लेट् सी.... श्रीराज

हा हा हा हा ..... तसेही अर्ध्याच्या जास्ती मुली तुझ्यामुळे इथे इंटरव्ह्यू द्यायला येतात..... रोहन हसत बोलला

Whatever.......Leave it ....... श्रीराज

अर्जुन ची पीए मीs शैला काही पर्सनल कारणांमुळे मुळे तिने जॉब सोडला होता तर तिच्या जागेवर नवीन PA आली होती मिस लावण्या पाटील...... पाटील इंटरप्राईजेस च्या मालकाची मुलगी..... एम बी ए... दिसायला सुंदर... एकदम मॉडर्न आणि स्मार्ट....... घरचा बिजनेस असून तिने श्रीराजची कंपनी जॉईन केली होती त्यामुळे जरा त्याला डाउट येत होता..... पण त्याच्या वडिलांनी शब्द दिला म्हटल्यावर अव्हॉइड सुद्धा करता आले नव्हते...

******

नंदिनी हे काय चाललंय तुझं........ राज लॅपटॉप मध्ये ऑफिसचे काम करत तिचा चाललेला गोंधळ बघून तिला बोलत होता

नंदीनीने कपाट उघडलं होतं आणि सगळ्या कपड्यांचा पसारा ती करत होती....... एकेक कपडा कपाटातून काढून खाली फेकत होती....

   राज माझी लाल ओढणी कुठे आहे दिसतच नाही आहे शोधून  दे ना....... नंदिनी त्याच्या जवळ जात बोलली

नंदिनी आधी तो पसारा उचल......राज

नाही .....मला पहिले शोधून दे.......नंदिनी

श्रीराज दादा तुम्हाला भेटायला कुणी लावण्या खाली आल्या आहे...... छाया वरती सांगत आली

हा येतो.....राज

ही का बर आली घरी...... राज मनामध्ये विचार करत होता

नंदिनी हे सगळे उचलून ठेव मी येतोच खाली जाऊन......राज

नाही तू खाली नाही जायचं पहिले मला शोधून दे.....नंदिनी

नंदिनी आपल्याकडे कोणीतरी आल आहे त्यांना असं वाट बघत बसवायचं असते का........ आणि हे तू सगळे उचलून ठेव मग मी तुझी ओढणी शोधून देईल.....राज

मी नाही.....नंदिनी

मी आलो..... म्हणत राज खाली आला.... नंदिनी रूम  मध्ये तन तन  करत कपडे फेकत होती

लावण्या.... What a pleasant surprise...... शशिकांत लावण्याला घरी आलेलं बघून तिच्या जवळ जाऊन बोलले

हॅलो अंकल ......हाऊ आर यू...... ते मी राज सॉरी श्रीराज सरांना फाईल द्यायचे होते........लावण्या राजला खाली येताना बघून बोलली..

ओके.... ये बस..... शशिकांत

तेवढ्यात तिथे आजी साहेब सुद्धा येऊन बसल्या आणि त्या सुद्धा तिच्यासोबत ओपचारिक गोष्टी करत होत्या

मिस लावण्या तुम्ही इथे......राज

सर मी तुम्हाला ही फाईल द्यायला आले होते.....लावण्या

तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण मला ऑफिसमधले लोक ऑफिसच्या कामाने घरी आलेली आवडत नाही..... आणि जर खूप अर्जंट असत तर मी पिऊन च्या हाताने मागवली असती....राज

राज अरे ती दुसरी तिसरी थोडी कोणी आहे.... ती माझ्या मित्राची मिस्टर पाटील ची मुलगी आहे...... शशिकांत

डॅड तुमची फ्रेंड कधी पण घरी येऊ शकतात... मी माझ्या ऑफिस स्टाफ बद्दल बोलतोय.....राज

इट्स ओके सर मी घरी जात होते तर मला असं वाटलं की जाता जाता मी ही फाईल तुम्हाला देऊन देते..... नेक्स्ट टाइम पासून मी लक्षात ठेवेल....लावण्या

ओके...... राजने फाईल घेतली आणि तो त्याच्या रूममध्ये परत निघून गेला

He is so tough..... लावण्या

हो मी तुला आधीच बोललो होतो...... जे करायचं ते लक्षपूर्वक काळजीने करावे लागेल..... शशिकांत

येस अंकल.... विल टेक केअर ऑफ डेट.....लावण्या

चला मी निघते.......लावण्या

अगं थांब मी घरात तुझी ओळख तर करून देतो...... तू आईसाहेबांना तर भेटलीच आहेस..,.. या राज चा आई नीती..... शशिकांत

तिने सगळ्यांना हलो केले आणि थोडाफार बोलून ते निघून गेली

आवडली मला ही मुलगी....... आजीसाहेब

हो मी म्हटलं होतं ना माझ्या एका मित्राची मुलगी आहे ही तीच आहे....... शशिकांत

ठीक आहे....आजिसहिब्र

****

राज फाईल घेऊन वरती आला तर नंदिनी ने रूमवर कपडे पसरून ठेवले होते....... पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती.......कसाबसा जागा करत पाय ठेवत राज्यात मध्ये गेला त्याने बाजूला टेबलवर फाईल ठेवले.....

नंदिनी हे काय करून ठेवले आहे तू...... मी तुला बोललो होतो ना ते उचलून ठेवायचं म्हणून.....राज

तू मला माझी ओढणी काय शोधून नाही दिली आधी.....मला खेळायचं होतं ना माझ्या भावलीला साडी घालून द्यायची होती...... तु मला नुसता रागवत असतो.... माझं ऐकतच नाही........नंदिनी

तू असं करशील तर मी तुला शोधून देणार नाही.....राज

मी तुझ्याशी कधीच कधीच कधीच बोलणार नाही..... कट्टी कट्टी कट्टी....... नंदिनी तन तन करत बाहेर गेली... आणि आबा जवळ जाऊन बसली

काय झालं.... आबा

बघा ना आबा तो राज मला नुसता रागवत असतो.....नंदिनी

आता काय केलं त्याने..... आबा

मला ओढणी नाही शोधून देत आहे तो......नंदिनी

अग त्याला काम असेल..... ये मी तुला एक गंमत शिकवतो...आबा

आणि आबांनी तिला एका न्युज पेपर चा जहाज बनवणे शिकवलं.... आणि ती दोघं ते घेऊन स्विमिंग पूल मध्ये सोडत होते.... नंदिनी ला खूप मजा वाटत होती..

आबांचे कुणी फ्रेंड आले तर आबा त्यांना भेटायला म्हणून आत मध्ये  गेले.... नंदिनी एकटीच खेळत होती....

राज रूम मध्ये त्याची फाईल शोधत होता.......
या नंदिनी ने पण इतका पसारा करून ठेवला आहे .....इथेच तर ठेवली होती मी ...कुठे गेली.... काहीच दिसत नाही आहे... त्याने ऑलमोस्ट सभी रूम शोधली होती पण त्याला फाईल कुठेच भेटली नाही...

थोड्या वेळानी त्याला नंदनी चा खेळण्याचा हसण्याचा टाळ्या वाजवण्याचा आवाज येत होता..... तो बाहेर बालकांनी मध्ये आला..... तर तिथे नंदिनी स्विमिंग पूल मध्ये कागदाच्या बोटी टाकत खेळत होती...... तिला असं खेळताना बघून त्याला बरे वाटले ...बघता बघता त्याची नजर तिच्या बाजूला असलेल्या फाइलवर गेली...... आणि तो संतापला.....आधीच नंदिनी इतका पसारा करून ठेवला होता त्यामुळे त्याचं डोकं आऊट झालं होतं...

नंदिनी थांब ......तो तिथूनच ओरडला आणि लगेच धावत खाली गेला..

नंदिनी चे सगळे जहाज संपले होते....... ती जहाज बनवायचे साठी कागद शोधत होती...... तिला पेपर सापडत नव्हते.... ते शोधत-शोधत वरती रूम मध्ये आली होती...... तिने दरवाजातूनच वाकून बघितले तर राज तिथे नव्हता.... तो बाथरूम मध्ये होता...... नंदिनी इकडेतिकडे पेपर शोधत होती पण तिला पेपर भेटत नव्हते.... तिचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या फाईल कडे गेले.... त्यात तिला खूप सारे पेपर दिसले.... आणि नंदिनी ती फाईल घेऊन खाली गेली होती....

नंदिनी हे काय करते आहे....?.... त्याने लगेच फाईल उचलून घेतली..... आणि आत मधले पेपर चेक करू लागला..... त्यातले चार पाच पेपर मिसिंग होते......त्याने स्विमिंग पूल कडे बघितलं तर त्याच्या बोटी केलेल्या पाण्यात होत्या.... त्याने त्या लगेच बाहेर काढल्या.... पण ओल्या झाल्या होत्या......

मला दे ते पेपर ....मला खेळायचा आहे....नंदिनी त्याच्या हातातली फाईल ओढत बोलली

नंदिनी ते माझ्या ऑफिसचे फाईल आहे.... तुला कोणी घ्यायला सांगितली...... तुला कळते का काहीतरी...... किती महत्त्वाचे पेपर आहेत ते...... सकाळपासून तू माझा डोकं खराब करुन ठेवल आहे.... राज तिला रागवत बोलला

तू सारखा सारखाच मला रागवत असतो...... मग तु मला शोधून का नाही दिलं......... आता मी खेळते तर ते पण तू रागवतो...... तिने भोंगा पसरला

तिच्या आवाजाने आबा तिथे आले...... काय झालं राज..... काय झालं नंदिनी तू रडत का आहेस....आबा

आबा हा मला रागवतो .....मला खेळू देत नाही.... नंदिनी रडत बोलत होती

राज काय झालं....... सकाळपासूनच काहीतरी गडबड दिसते आहे..... आबा

आबा हिने माझ्या महत्त्वाच्या फाइलचे काही पेपर ची बोट बनवून येथे पाण्यामध्ये टाकून ही खेळत आहे....... खूप महत्वाचे पेपर होते ते.......राज

नंदिनी आज अजिबात माझ्याशी तू बोलू नको...... राज

कट्टी कट्टी कट्टी कट्टी...... मी पण नाही बोलणार तुझ्यासोबत.......... नंदिनी कट्टी करत दाखवत त्याला बोलत होती

राज रागातच त्याच्या रूम मध्ये निघून गेला...

चला सुरुवात झाली म्हणायची आता...... दुरूनच आजी साहेब आणि शशिकांत कुत्सित हसत बोलत होते

हॅलो रोहन आता तू एक टेक्सटाइल प्रोजेक्ट ची फाईल पाठवली होती..... तिचे काही पेपर चुकीने  मिस प्लेस झाले प्लीज परत ती फाईल तयार करून घे..... राज रोहन सोबत फोनवर बोलत होता.....

नंदिनी दोन-तीनदा रूम मध्ये गेली .....राज  तिला रागात दिसत होता...... ती आपले खेळणे घेऊन खाली आबासोबत खेळत बसली.....

राजने पण तिच्याकडे बघितले आणि लक्ष नसल्यासारखे दाखवले...

श्रीराज दादा कपडे आवरून ठेऊ काय .....छाया त्याच्या रूममध्ये येऊन पसारा बघून बोलत होती...

नको ताई ...बघू.... करतो आम्ही  ...उद्यापर्यंत नाही झालं तर आवरून देशील आहे.......राज

मान हलवत छाया तिथून निघून गेली

रात्र होत आली होती तरीसुद्धा नंदिनी आणि राज बोलत नव्हते.....नंदिनी चे त्याच्याशिवाय जेवण सुद्धा नीट धकले नव्हते..... पण उगाचच राग दाखवत तिने आबा सोबत जेवण केले....

नंदिनी चल झोपायला...... राज खाली येत नंदिनीला बोलत होता...

नाही .....मी तुझ्याशी कट्टी आहे .....मी इथे आबा सोबतच झोपणार आहे.......नंदिनी

नंदिनी चल आता ....उगाच हट्टपणा करायचा नाही ... आबांना त्रास देऊ नको....राज थोड्या कडक आवाजात बोलला

आबा सांगा याला... मी नाही जाणार......नंदिनी

आबांनी त्याला तू जा ... मी बघतो.... म्हणून हात दाखवला..... राज त्याच्या रूममध्ये चालला गेला

आबाचा रूम मध्ये आबाची आणि नंदिनीची खुसरपुसर सुरू होती

हे काय चाललंय येथे...... नंदिनी तुम्ही आपल्या रूम मध्ये जा...... झोपायची वेळ झाली..... आजी साहेब गरजल्या

मी आबा सोबतच झोपणार आहे....नंदिनी

हे काय चाललं आहे...... इथे झोपायचं नाही....... आजीसहेब

बरं बरं आम्ही दुसऱ्या रूममध्ये जातो.....आबा आणि नंदिनी गेस्ट रूममध्ये झोपायला गेले

राजला सुद्धा झोप येत नव्हती...... त्याला आता नंदिनीची खुप सवय झाली होती..... ती त्याला सतत डोळ्यापुढे पाहिजे असायची....... तो बेड वर पडल्यापडल्या इकडून तिकडे कड बदलत होता...... त्याने परत एकदा खाली येऊन बघितले तर आबा नंदिनीला गोष्ट सांगत होते तो परत वर जाऊन झोपला....

  जब कहीं भी आहट हुई
  यूँ लगा के तू आ गया
खुश्बू के झोंके की तरह 
मेरी साँसें महका गया
एक वो दौर था
हम सदा पास थे
एक वो दौर था
हम सदा पास थे
अब तो हैं फ़ासले दरमियाँ
मैं यहाँ तू वहाँ
ज़िंदगी है कहाँ
ऊँ.. हूँ… बीती बातें याद आती हैं 
जब अकेला होता हूँ मैं
बोलती हैं खामोशियाँ 
सबसे छुपके रोता हूँ मैं
एक अरसा हुआ मुस्कुराए हुए
एक अरसा हुआ मुस्कुराए हुए
आँसुओं में ढली दास्तान
मैं यहाँ तू वहाँ
ज़िंदगी है कहाँ
तू ही तू है सनम
देखता हूँ जहाँ
नींद आती नहीं
याद जाती नहीं
नींद आती नहीं
याद जाती नहीं
बिन तेरे अब जिया जाए ना

राज सगळे जुने दिवस आठवत होता....

नंदिनी बरीच रात्र झाली आता गोष्टसुद्धा संपली झोप आता.... आबा

हो...... नंदिनी ने पांघरून घेतले आणि झोपायला गेली

थोड्या वेळाने...

आबा राज मला का रागवला......नंदिनी

तू त्याच्या महत्त्वाच्या वस्तूला काबरा हात लावलं..... आबा

मला कुठे माहीत होतं ते त्याच्या महत्वाच आहे.....नंदिनी

ह्म्म...... बरं झोप आता पण उद्या सांगू त्याला.....आबा

ह्म्म.....नंदिनी

थोड्यावेळाने....

आबा तुम्ही घोरू नका ना मला भीती वाटते...... राज कधीच घोरत नाही........नंदिनी आबांना  हलवत बोलली

ठीक आहे.....आबा

थोड्यावेळाने......

नंदिनी तिथे बाजूला ठेवलेल्या गलासमधले पाणी पिली..... तिला अजिबात झोप येत नव्हती....... आबा तिची मजा बघत होते आणि झोपायचं नाटक करत होते

आबा.......नंदिनी

ह्म्म.....आबा

राज काय करत असेल...... झोपला असेल काय......नंदिनी

ह्म्म......आबा

मला झोप येत नाही आहे........ मला राज पाहिजे........नंदिनी

आबांना हसायला आलं..... जा मग रूम मध्ये......आबा

पण तो बोलत नाही आहे ना माझ्यासोबत........ मी कट्टी आहे त्याच्या सोबत........ आता कसं करू.....नंदिनी

दो घेऊन घे.....आबा

हो मस्त आयडिया....... तो रागवणार तर नाही ना परत......नंदिनी

नाही............आबा

आबा मला राजकडे पोहोचवून द्या......नंदिनी

चल.....आबा

आबांनी तिला पायऱ्यांजवळ आणून सोडलं...

तु जा वर.... मी बघतोय इथून......आबा

ठीक आहे...... नंदिनी

नंदिनी हळूहळू पायर्‍या चढत वर रूम जवळ गेली..... तिने हळूच दरवाजाचे दार हलवले आणि वाकून आतमध्ये बघितलं.... तर राज पांघरून घेऊन झोपलेला दिसला....

राजने दार उघडेच ठेवले होते..... त्याला माहिती होतं नंदिनी नक्कीच येईल..... तिला त्याच्या शिवाय झोप यायची नाही....

राजा उठला तर रागवेल आपल्याला....नंदिनी हळुच आत मध्ये गेली.... तिने  दार लोटले..... आणि दबकत दबकत हळूहळू त्याच्या पायाजवळ गेली.... तिने त्याच्या पाया जवळून पांघरून वर केले आणि आत मध्ये घुसली.... आणि पांघरुणात च आत्मधून रांगत रांगत त्याच्या चेहर्या पर्यंत गेली.... आणि थोड्या वेळ त्याच्याकडे बघत होते...... तिचे सगळे मोकळे केस त्याच्या चेहऱ्यावर आले होते....... तिच्या मुलायम केसांचा स्पर्श त्याला वेड लावत होते...... पण तो तिच्यावर रागवला आहे असं दाखवत होता आणि म्हणून त्याने डोळे उघडले नाही झोपायचे नाटक केले ..

राज.......नंदिनी ने आवाज दिला

पण तो उठला नाही

नंदिनी ने  थोड्यावेळ त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली....... थोड्यावेळाने परत तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं...... त्याचे डोळे बंद होते म्हणून परत ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली..... तिला झोप येत नाही आहे हे बघून त्याने तिच्यावरून आपले दोन्ही हात घेतले आणि कड बदलून तिला कुशीत घेतलं....... नंदिनी गाढ झोपी गेली .....

मला पण झोप येत नाही रे चिमण्या तुझ्याशिवाय.......मी तरी कसा जगू तुझ्याविना......मला पण ही रात्र खायला बघते....कसा राहू तुझ्याशिवाय.....तिला झोपलेलं पाहून तिच्या डोक्यावरून केस दूर केले आणि तिच्या कपाळावर किस केलं.....

सकाळी राज तिच्या सोबत बोलत नव्हता...... ती बरीच त्याच्या मागे मागे करत होती आणि तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता..... कट्टी तर कट्टी जा......नंदिनी आंघोळ करून आली होती आणि ती आरशासमोर उभी राहून तिचे केस कांगव्याने विंचरत होती..... राज दुरूनच तिची गंमत बघत होता..... ती केस नीट करायच्या ऐवजी सगळे केस गुंतवून ठेवले होते..... कसाबसा  तिने खाली एक रबर  लावला..... आणि खाली आबा जवळ आली

आबा राज माझ्यासोबत बोलत नाही.....नंदिनी तोंड पाडून बोलत होती

अरे अजून तुमची दो झालीच नाही का.......आबा

हो...... काय करू....नंदिनी

त्याला आवडेल असं कर.....नंदिनी

मला नाही माहिती त्याला काय आवडते.....नंदिनी

काल तू रूम मध्ये कपड्यांचा पसारा केला ना ..... जा तो आवर......स्वच्छ रूम आवडते त्याला.....आबा

पण ते तर खूप आहे.......नंदिनी

जा प्रयत्न तर कर.....आबा

नंदिनी रूम मध्ये आली आणि तिने परत राजने एका साईडला करून ठेवलेले कपडे बाहेर केले..... आणि त्यातला एक ड्रेस घेऊन घडी करायचा प्रयत्न करत होती...... पण ती काही तिला जमत नव्हते.... तिने ते तसेच चोळामोळा करत आत मध्ये ठेवले..... परत दुसरा ड्रेस घ्यायला गेली तर ठेवलेले कपडे खाली पडले....... बराच वेळ तिचा हा कार्यक्रम सुरू होता...... शेवटी ती थकली आणि बेडवर जाऊन बसली...... राज तिथेच साईडला काऊच वर बसून त्याचं काम करत नंदिनी कडे बघत होता..

ती विचार करत बसली होती..... उठून तिचा फेव्हरेट टेडी बियर घेतला  आणि ती राज जवळ गेली

राज.........नंदिनी

ह्म्म......राज तिच्याकडे न बघताच लॅपटॉप कडे बघत बोलत होता

राज मला ते आवरा आवर करता येत नाही आहे......नंदिनी

ह्म्म.....राज

मग पसारा कोणी केला........राज

मी........नंदिनी

राज माझ्याशी दो घेना....... मी आता तुझ्याशी कधीच कट्टी घेणार नाही...... मी तुझ्या वस्तूला सुद्धा हात लावणार नाही...... मी तुझं सगळं ऐकेल....... तू माझा हा फेवरेट टेडीबियर पण घे.......... राज माझ्याशी बोलना........ राज मला आता खूप रडू येत आहे....... ते रडतच बोलत होती......राज बोलत नाही म्हणून आता तिचे मन खूप भरून आले होते........ तिने आपले दोन्ही हात पसरून त्याच्यापुढे उभी होती

तिला तसं गहिवरून आलेलं बघून राजला सुद्धा खूप वाईट वाटलं...... तिचा तो केविलवाणा चेहरा बघून त्याचं मन खूप दुखलं..........तो लगेच उठून तिच्याजवळ गेला आणि तिला आपल्या मिठीमध्ये घट्ट पकडले......आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता........त्याने जवळ घेतल्यामुळे आता तिला जास्तीच रडायला आले .....तिचा गळा दाटून आला...

मला पण तुझ्यासोबत इतके कठोर वागायचे नव्हते रे सोन्या.....पण तुला तुझी जबाबदारी...चुका कळल्या पाहिजे.....म्हणून अस वागावं लागते.....मला पण खूप त्रास होतो .....माझं पण हृदय तुटते.....पण काय करू माझ्याकडे दुसरे ऑप्शन नाही.......राज मनातच बोलतं तिच्या डोक्यावरून पाठीवरून हाथ फिरवत होता...

Shssss.......रडू नाही आता.....तू तर किती शहाणी मुलगी आहेस.....तू तर आता कपाट पण आवरत होती.....राज

हो पण मला नाही करता येत आहे ....नंदिनी

चल मी शिकवतो तुला......राज

राज तिला कपडे घडी करायला शिकवत होता.....तिने त्याचं बघून २ - ३ कपडे वाकडेतिकडे घडी केले.....एक ओढणी घडी करता करता ती वरती हवेत उडत होती..... तिला खूप मजा वाटत होती...... ती आता मुद्दामूनच उडवायला लागली........ एवढ्या मारायला लागली आणि तिचा खेळ सुरु झाला....... आता ती मागचं सगळं विसरली होती....... तीचे रडणे कुठल्या कुठे गायब झालं होतं....... आणि ती परत बाजूला ठेवलेले कपडे उडवत होती...... आणि जोराने हसत होती..... तिने परत पसारा करून ठेवला......... तिला बघुन राजने डोक्यावर हात मारून घेतला........

राज खूप मेहनत घ्यावी लागेल........पण तू माझ्या जवळ आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे...... तो तिच्याकडे बघत मनातच विचार करत होता........ तिला हसताना बघून त्याला पण खूप चांगला वाटत होते......त्याने पण आता बाकी पडले कपडे हातात घेतले त्याचा गोळा बनवून तिला मारून फेकला........ आता ती पण त्याला कपडे मारून फेकत होती........ आता दोघांचाही कपडे फेकाफेकी चा खेळ सुरु झाला....... रूम भर त्यांची धावा धावी पकडापकडी सुरू होती..........त्या दोघांनी मिळून आता आधी पेक्षा पण जास्त पसारा........ दोघेही आनंदाने खेळत होते,....

दिल के हाथो मजबूर............ राज च काही होऊ शकत नाही........त्या दोघांना बघून बाहेरुनच आबांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि ते खाली चालले गेले

डॉक्टरांनी नंदिनी चेकअप केले होते........ तिच्या मध्ये जास्ती सुधारणा नव्हती....... पण वन पर्सेंट चेंजेस झाले होते....... त्यामुळेच त्यांना होप वाटत होती...... डॉक्टरांनी राजला काही माईंड गेम्स सजेस्ट केले होते...... तिला छोट्या-मोठ्या कामांची जबाबदारी द्यायला सांगितले होते..... आणि असेच बरेच इन्स्ट्रक्शन्स दिले होते..... जे तो फोलो करत होता..

*****
आशिक़ी में हर आशिक़
हो जाता है मजबूर
इसमें दिल का, मेरे दिल का
इसमें दिल का
क्या कुसूर
आशिक़ी में हर आशिक़...

****

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️