भाग 24
राजने घरात पाय ठेवला तर घरात एकदम नीरव शांतता पसरली होती....आजी साहेब एका चेहऱ्यावर बसल्या होत्या आणि त्या खूप रागात दिसत होत्या....... पूर्ण रूम वर सर्वत्र खाली वस्तू पडलेल्या होता भयंकर पसारा झाला होता..... सगळे त्याच्याकडे बघत होते..... जागा शोधत राज पाय ठेवत आत मध्ये गेला..... सगळे शांत एका जागेवर उभे होते आणि आजी कडे आणि राजकडे बघत होते..... राजनी हॉलवर नजर फिरवली.... नंदिनी अवतारामध्ये एका चेअरवर पाय वर करून दोन्ही हातात पाय पकडून बिचारा चेहरा करून इकडे तिकडे भिरभिर बघत बसली होती.... तिच्या बाजूला थोडं दुर आबा बसले होते..... त्यांच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव होते..... आजीला घाबरल्यामुळे ते हसू दाबून बसल्यासारखे वाटत होते.. तिकडे थोड्या अंतरावर राहूल सुद्धा तोंड दाबून उभा होता..... बाकी सगळे खूप सिरीयस वाटत होते......
सगळ्यांचे स्वभाव बघता आणि हॉल चा अवतार बघता राजच्या लक्षात आले होते की नक्कीच नंदिनी काहीतरी गोंधळ केला आहे.... राज ला बघून नंदिनीला आनंद झाला... ती चेअर वरून पाय खाली ठेवतच उठणार होती की तेवढ्यात साहेब ओरडल्या...
बिल्कुल पाय खाली ठेवायचा नाही सांगितलं ना एकदा... हालयच नाही जागेवरून....आजी
आजीचा आवाज ऐकून नंदिनी ने घाबरून परत पाय वरती घेतला...... आणि केविलवाना रडका चेहरा करून राजकडे दोन्ही हात पसरून बघत होती.... ..
राजने एकदा आजी साहेबांकडे बघितले आणि नंदिनीला एक हाथ पसरवत हातानेच इशारा करत जवळ यायला सांगितले....
नंदिनी ने लगेच उडी मारली आणि धावतच राजच्या गळ्यात जाऊन पडली... त्याने एकाच हाताने तिला आपल्या कुशीत घट्ट पकडून धरले......
डोळ्यांनी तो इशारा करत आबासाहेबांकडे ,राहुल कडे बघत काय झाले म्हणून विचारात होता..,. पण कोणी काहीच बोलायला तयार नव्हतं...
बाकीच्यांना काय विचारतोय...या तुझ्या बायकोला विचार काय केलं तर......आजिसहेब
माझं नाव नंदिनी आहे..... आपला चेहरा त्याच्या शर्ट मध्ये खुपसत एका डोळ्याने आजीकडे बघत बोलली
तिच्या बोलण्याने आबा साहेबांना हसण्यावर कंट्रोल नाही झालं आणि ते खुदकन थोडेसे हसले..
तुम्ही तर बिलकुल चूप बसा.... तुम्ही आणि या श्रीराज... दोघांनी मिळून तिला खूप लाडावून ठेवल आहे काही वळण नाही काही नाही..... आजीसाहेब
आजिसहेबांच्या आवाजाने परत आबासाहेब चूप झाले....
राजने नंदिनी कडे बघितलं आणि काय झालं म्हणून विचारलं...
मी काही नाही केलं ....... खरंच..... लिची ने केले.
...नंदिनी
तू नाही तर कोणी केलं .....सगळा बाजार करून ठेवलाय घराचा... आजीसाहेब
तुमच्या गॉसिप मार्केट पेक्षा हा बाजार चांगला दिसतो आहे आबा साहेब मस्करीत बोलले...... त्यांच्या बोलण्यावर आजिसहेबांनी त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघितलं तसे ते परत चूप झाले...
आज माझ्या मैत्रिणी आल्या होत्या....आम्हीच गेट-टुगेदर चा प्लॅन केलं होतं..... आमच्या महत्त्वाच्या गोष्टी सुरू होते.... तरी या नंदिनी मुळे त्या सगळ्या घरी चालल्या गेल्या.... आजीसाहेब
महत्वाच्या गप्पा.....? नवऱ्याच्या आणि सूनांच्या बुराया..चुगल्या करत होता तुम्ही लोकं .....बरं झालं गेल्या त्या....आबासाहेब
आबांच्या बोलण्यामुळे आता सगळ्यांनाच गालात हसू आले होते राजला सुद्धा गालात हसू आले होते पण आजीच्या रागामुळे त्यांनी सुद्धा ते कंट्रोल केले.... आई आणि काकी सुद्धा मान खाली घालून हसू दाबत उभ्या होत्या
अरे काही समजेल असं बोलाल का तुम्ही.... मला काहीच कळत नाही आहे.... राज
नंदिनी ने लीची ची काय खोड काढली माहिती नाही..... नंदिनी ओरडतच आत मध्ये आली आणि लीची सुद्धा भुंकत भुंकत तिच्या मागे आली आणि या दोघी पूर्ण घरभर फिरायला लागल्या.... यांच्यामुळे माझ्या मैत्रिणी सुद्धा घाबरल्या आणि त्या सुद्धा उठून इकडे तिकडे पळत होत्या....... त्यात पळता पळता हा सगळा हॉलचा हाल झाला आहे...... ते तर बरं झालं की माळीदादा लगेच आत मध्ये आले आणि लिची ला पकडून घेऊन गेले.... नाहीतर अजून काय काय बघावे लागले असते देव जाणे..... आणि तिच्या या अशा गोंधळामुळे माझ्या मैत्रिणी सुद्धा वैतागून निघून गेल्या......तिला सगळं समजून सांग हा...नाहीतर इला कसे सरळ करायचे मी चांगलं जाणते....... आजी साहेब रागाने बोलत होत्या
नंदिनी .....हे आजीसाहेब काय सांगतात आहे..... काय केले तू असा त्रास देत असतात का......
मी फक्त तिला बिस्कीट देत होते........नंदिनी
एवढ्या बिस्कीट ने काही होणार आहे का........ नीट सांग सगळं .....का चिडली केलीची एवढी......राज
अरे राज ती लीची बिस्किट खात होती.......तर मी तिला फक्त माझ्या जवळची चांगली क्रीम ची चॉकलेट बिस्कीट दिली आणि तिचे बिस्कीट ची प्लेट आत मध्ये घेऊन येत होती...... तर तिची भुंकायला लागली आणि माझ्या मागे धावत येत होती.... मला भीती वाटते म्हणून मी आत मध्ये धावत आले....तर माझा धक्का लागून काय काय वस्तू पडल्या ....तर ती माझ्या मागे धावत होती म्हणून मी तिकडे धावत आजी साहेब बसले होते तिकडे धावत धावत आले तर ते आजी साहेबांच्या बाकीच्या सगळ्या आज्या घाबरल्या आणि त्या सुद्धा तिकडे पळायला लागल्या आणि मग सगळ्यांच्या धक्क्याने हे रुम मधल्या सर्व असं खाली पडपुड झालं........ मी खरच मुद्दामून काही केलं.... मी कधीची सांगते यांना पण कोणी माझा ऐकतच नाही आहे.......नंदिनी
तिच्या बोलण्यावर आधी साहेबांनी हात मारून घेतला....... आणि बाकी सगळे जोराने हसायला लागले.... आता राज ला पण हसू येत होते...... तो पण हसायला लागला
....नंदिनी मात्र त्यांच्या सगळ्यांकडे कसनुसं चेहरा करत बघत होती .....आतापर्यंत तिला सगळे रागवत होते आणि आता सगळे हसायला लागले तिला काही कळतच नव्हतं...
अरे राज तुला सांगतो खूप दिवसांनी मी इतका हसलो आहे...... त्या बुढढयांना इकडे तिकडे पळतांना बघून मला खूपच मजा येत होती..... मला तर इतके हसायला येत होते कंट्रोल च होत नव्हतं........आबासाहेब
बुढढया...? आजिसहेब डोळे मोठे करत ओरडल्या.... आणि चिडत च आत मध्ये निघून गेल्या....
आणि तिथे एकच हशा पिकला.......
******
राज मला भूक लागली पण मला आजीसाहेब किचनमध्ये जाऊ देत नाही .....काहीच घेऊन नाही देत नाही .....काय करू...... नंदिनी कुरकुर करत राज जवळ आली .... राज्याच्या ऑफिसचं काम करत लॅपटॉप कडे बघत बसला होता......
राज ....राज ......नंदिनी ने त्याला खांद्याला हलवत बोलली
ह्म्म....राज
मला भूक लागली......नंदिनी
थोड्या वेळापूर्वी च तर खाल्लं होते तू....राज
हो पण मला आता परत भूक लागली. . .नंदिनी
तिने आतापर्यंत ३-४ दा राज ला भूक लागली ...भूक लागली .....म्हणून त्रासवले होते...
बरं थांब .... इथेच बस .....मी आलो २ मिनिटात....... राज उठून खाली गेला.... आणि सोबत चार-पाच छोटे छोटे डबे घेऊन आला ... आणि तिथेच एका सेल्फ मध्ये जिथे नंदिनीचे खेळणी वगैरे ठेवली होती तिथे डब्बे अरेंज करून ठेवले......
नंदिनी....... हे बघ त्याच्यात तुझ्या आवडीचे सगळे खाऊ आहेत ....बिस्किट सुद्धा आहेत .......तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा जे आवडते ते खा आणि डब्याचं झाकण नीट लावून परत तिथेच ठेवून दे ......राज
ये ssss..... आता मला कोणीच रागवणार नाही.... मी आपल्या हाताने खाईल...... नंदिनी उड्या मारत होती....आणि तिने एका डब्यातून तिला आवडते बिस्किट काढले आणि खाल्ले..... राज परत आपलं काम करत बसला होता.....
थोड्यावेळाने.......
राज.........नंदिनी
काय झालं नंदिनी आता....... राज लॅपटॉप मध्ये काम करतच बोलला
मला बोर होत आहे ......कोणीच खेळायला नाही आहे..... आबा पण बाहेर कुठेतरी गेले आहे....... तू पण फक्त कामच करतो आहे.... कधी संपलं तुझं काम....... नंदिनी कुरकुर करत बोलली
मन्या माझी उद्या खुप इम्पॉर्टंट मीटिंग आहे रे...... प्लीज थोडं काम करू के सोन्या मला....... तुझा आणि तुझ्या डॉल सोबत खेळ..... तुझे खेळभांडे खेळ.....राज
किती वेळ तेच खेळत आहे .....आता मला ते बोर झालं......नंदिनी
आज राजचं खूप महत्त्वाचा ऑफिसचं काम सुरू होते... उद्या त्याची खूप महत्वाची मिटींग होती ...त्यामुळे तो पाहिजे तेवढा वेळ नंदिनीला देऊ शकत नव्हता आणि म्हणूनच बऱ्याच वेळापासून नंदिनी या ना त्या कारणाने त्याला त्रास देत होती..... तिला त्याच्याजवळ त्याच्यासोबत खेळायचं होतं
एक मिनिट थांब मी तुला गंमत दाखवतो..... म्हणत त्याने टीव्हीवर कार्टून ची मूव्ही लावली..... आणि तिला बेडवर बसवले तिच्या आजूबाजूला तिच्या डॉल्स ठेवल्या... त्याच्याजवळ दोन-तीन खाऊचे डबे ठेवले आणि साइड टेबल वर एका ग्लासमध्ये पाणी काढून ठेवले..... आता दोन-तीन तास तरी ती शांत बसणार होती...... तीसुद्धा मूव्ही बघण्यात रमून गेली आणि राज बाहेर बाल्कनीमध्ये झुल्यावर बसून आपलं काम करत होता...
आता रात्र होत आली होती..... मुव्ही बघून झाला होता...... तिला झोप यायला लागली पण राज शिवाय तिला झोप येत नव्हती .....ती उठून राज जवळ गेली.....
राज झोप येत आहे...... झोपऊन दे ना..... नंदिनी थकल्या आवाजात बोलली
अरे चल मग आधी जेवण करून घेऊ......राज त्याच्या हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत बोलला
नाही..... मला भूक नाही आता ......मी खूपसारा खाऊ खाल्ला ....आता मला झोपायचं....नंदिनी
नंदिनी थोडं जेवून घे.....राज
नाही .......मला खूप झोप आली...... म्हणत ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली.. ....पाय पाय सुद्धा वरती तिनी पोटाजवळ केले होते आणि त्याच्या गळ्यात हात टाकत त्याच्या छातीवर डोकं ठेवले........ राजने सुद्धा तिला नीट जवळ पकडुन घेतले आणि तिच्या डोक्यावर एक हाताने थोपटत होता...... बघता बघता ती दहा मिनिटात झोपली सुद्धा........ राज सुद्धा दिवसभर काम करून थकला होता तिला झोपवता झोपवता त्याचा सुद्धा डोळा लागला होता.....
पोरं जेवायला का आले नाही म्हणून आई राजच्या रूम मध्ये वरती बघायला आली...... तिने बघितले तर राज तिला मांडीवर पकडून झुल्याला मागे टेकून झोपला होता....... त्यांना बघून आईच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या .... तिने स्मितहास्य केले..... आत मधून एक शाल आणून त्या दोघांच्या अंगावर नीट टाकली..... आणि लाईट बंद करून........ दरवाजा हळूच लोटून बाहेर चालली गेली ....
मध्यरात्री कधीतरी राजला जाग आली......
बापरे बरीच रात्र झाली..... कधी झोप लागली कळलच नाही.........
त्याने नंदिनीला उचलून बेडवर झोपवले....
साइड टेबलवर त्याला दुधाचा ग्लास दिसला.....आई येऊन गेली वाटते....... भूक तर लागली होती ...त्याने गटागटा दूध पिऊन घेतले......आणि तो सुद्धा तिच्या बाजूला तिला कुशीत घेऊन झोपून गेला.....
आईच मन ते आईच असते...... आईच आपल्या मुलांना समजून घेत असते..... तिला तिची मुलं फक्त खुश हवी असतात बाकी तिला काहीच नको असते....
नंदिनी चल उठ ...आपल्याला जॉगिंग ला जायचं आहे बरीच सकाळ झाली आहे..... राज तिला उठवत होता..
राज माझे पाय दुखत आहे...... मला नाही जायचं .....नंदिनी झोपेतच कुरकुर करत बोलली......
नंदिनीला exercise करायला जायचं नसले किंवा योगा करायचं जीवावर आले किती असेच काही काही दुखते असे कारण सांगायची...... नाटक करायची...... राजने जबरदस्ती उठून तिला तयार केले आणि दोघेही बाहेर वॉक ला गेले
राज मला आज योगा नाही करायचा..... आबा सांगा ना हो याला......एक दिवस नाही केले तर काय होतं..... माझं पोट दुखत आहे...........नंदिनी
आज राहू दे राज... नाही म्हणत आहे तर ती.....आबा
आबा तिला करायचं नाहीये ना म्हणून ही सकाळपासून तिची सगळी नाटक चालले आहे....... मग एक दिवसाची गॅप गेली की तिला दुसऱ्या दिवशी करायला खूपच जीवावर येते...... नंदिनी चल बरं नाटक नाही करायचं.....राज
मला नाही करायचं आज..... तिने भोंगा पसरला..... शेवटी राजने तिच्या पुढे हार मानली.....त्याला पण आज महत्त्वाचं काम होतं त्यामुळे तो पण काही जास्त तिच्या पाठी लागला नाही...... त्याला आज थोड्यावेळासाठी ऑफिस मध्ये जायचं होतं म्हणून त्याने तिची तयारी करून दिली नी स्वतः सुद्धा तयारी केली........ नाश्ता सुद्धा तिने आज कुर्बुरिताच केला होता....... राज ने तिला सगळे इन्स्ट्रक्शन्स सांगितले आणि लवकरच येतो सांगून तो ऑफिसमध्ये गेला....
नंदिनी बरं वाटत नव्हते..... तिचा काही खेळायचा मूड नव्हता..... थोडा वेळ आबा सोबत खेळून ती... ती तिच्या रूम मध्ये गेली नी झोपली होती....... थोड्यावेळाने उठून ती खाली आली...... घरात कोणीच नव्हतं ..... आबा त्यांच्या रूम मध्ये आराम करत होते..... तिने खाली थोडा फेरफटका मारला.... तिला समोर आजी साहेब दिसल्या.....रागावतील म्हणून ती परत रूम मध्ये जाण्यासाठी मागे फिरली.......
नंदिनी......... आजीसाहेब जोऱ्यानी ओरडल्या......
नंदिनी घाबरूनच त्यांच्याकडे बघितलं ....
तुम्हाला कळते की नाही काही..... कपडे बघितले का आपले........ किती खराब केले आहे ते...... आणि अशा कपड्यांनी तुम्ही घरात फिरून राहिल्या...... घरात गडीमाणसं बायका सगळे आहेत...... समजते की नाही तुम्हाला काही....... तुमच्या आजी साहेब नी काही शिकवलं नाही का तुम्हाला .......काही सांगितलं नाही का...... ते तर बरं झालं इथे कोणी नाही आहे...... आजीसाहेब नंदिनी वर जोरजोराने ओरडत होत्या पण तिला काय झालं ते कळतच नव्हते.........
आबांना आजी साहेबांचा ओरडण्याचा आवाज आला...बाहेर काय चालले म्हणून ते बघायला आले....
काय झालं नंदिनी......आबा
मी काहीच केलं नाही आबा... नंदिनी रडक्या आवाजात बोलली.
नुसतीच अंगा पायाने मोठी झाली आहे ........अक्कल तर एवढी सुद्धा नाही...... तुमच्या नातवाला सुद्धा काय दिसलं तिच्यात काय माहिती.......... आजीसाहेब
अहो श्रीराजच्या आजी... काय झालं नीट सांगाल का.....आबा
काही नाही....... तुम्ही जा आत मध्ये ..... बघते मी काय करायचं ते....... म्हणत त्यांनी त्यांच्या कामवाली छायाला आवाज दिला....
आबांनी एक नजर नंदिनी वर टाकली आणि काहीतरी समजून आत मध्ये चालले गेले
आजी साहेबांनी छाया ला काही इन्स्ट्रक्शन दिल्या आणि छाया नंदिनीला वरती तिच्या रूम मध्ये घेऊन गेली.....
राज त्याची ऑफिस चे काम आटोपून जवळपास चार तासात घरी परत आला होता......... घरात त्याला सामसूम दिसली.... बहुतेक जेवण करून सगळे आराम करत असावे म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेला...... तर त्याला नंदीनी खाली एका कोपऱ्यात चटई वर झोपलेली दिसली....तिला तसं झोपलेलं बघून त्याला थोडा विचित्र वाटलं...... बहुतेक खेळता-खेळता तिथे झोप लागली असावी असा विचार त्याच्या डोक्यात आला....... तो तिच्याजवळ गेला तिच्या कपाळावरून हात फिरवत त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतले आणि बेडवर आणून झोपवले...... आणि स्वतःचं ब्लेझर वगैरे काढत होता....
त्याने तिला उचलून घेतल्यामुळे नंदिनीची झोप मोड झाली होती आणि तिने बघितले तर ती बेडवर आहे तिच्या लक्षात आले आणि ती ताडकन बेडवरून उठून परत चटईवर जाऊन बसली
राज त्याच्या शर्ट चा बटन काढतच होता की त्याचे नंदिनी कडे लक्ष गेले...
पिल्ल्या तिथे का झोपली होती तू..... आणि उठली का बरं झोप ना नीट .... तुला बेडवर झोपवले होतेना... परत उठून तिकडे का बसली....राज तिच्याजवळ जात बोलला
नाही ....आजी साहेब रागावतील.....नंदिनी
अगं काय बोलते तू ....त्या कशाला रागवतील....राज
राज माझं खूप पोट दुखत आहे..... पाय पण दुखत आहे..... ते माझे सगळे कपडे खराब झाले होते तर आजिसहेब रागावल्या होत्या...... बेड वरची चादर पण खराब झाली होती...... ती छाया काकूंनी मला नीट करून दिलं..... आणि बेड पण नीट केला....... आजी रागवला की आता बेडवर बसायचं नाही म्हणून..... त्या रागावतील मला मी इकडेच बसते...... राज माझं पोट दुखत आहे म्हणत ती रडायला लागली.......
तिचं बोलणं ऐकून राजाच्या अंगावर सर्रकन काटाच आला...... त्याच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आले होते..... त्याने तिच्या डोक्याला पकडून तिला आपल्याजवळ मिठीत छातीशी घट्ट पकडून घेतले......... आणि स्वतःच्या अश्रूंना सुद्धा मोकळी वाट करून दिली
काय रे हे देवा.... का हा सगळा त्रास हिला दिला.... थोडा माझ्या वाट्याला दिला असता...........मी कसा काय हे विसरून गेलो..... कसं काय माझ्या डोक्यातून निघून गेलं हे सगळं.....तरी सकाळपासूनच बोलत होती पाय दुखते पोट दुखते मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं असं वाटलं एक्सरसाइज करायचं नाही म्हणून नाटक करते आहे...... राज मनातच स्वतःला कोसत होता..... त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि नंदिनीच्या पाठ थोपटत तिला शांत करत होता...
मन्या शांत हो रडू नको आता..... मी आलो आहे ना मी बघतो आता...... काय करायचं ते..... त्याने तिला परत त्याच्या मिठीत उचलून घेतलं आणि बेडवर आणून बसवलं...... तू इथेच थांब मी आईला बघून आलो......राज
आई नाही आहे घरात..... त्यांच्या कुठल्यातरी मैत्रिणीला बरं नाही म्हणून त्या त्यांना भेटायला गेले आहेत.....नंदिनी
अरे हो सकाळी ती बोलली होती मला.... विसरलोच मी...राज
त्याने लॅपटॉप उघडला आणि काही माहिती टाकून सर्च केली आणि पोट दुखायला साठी पाय दुखण्यासाठी उपाय शोधून काढले..... लग्नानंतर पहिल्यांदा हे असं घडलं होतं त्यामुळे त्याला सुद्धा काही माहिती नव्हतं.....
घरात कुणी नवत आजिसहेब सोडून.......कधी गरज पण पडली नव्हती...
त्याने तिला गरम पाण्याने आंघोळ घालून दिली......
छाया काकूंनी बऱ्यापैकी तिला समजावून सांगितलं होतं आणि आजीसुद्धा नेहमी समजवायची मात्र वेळेवर ती विसरून जायची.......
राज तु जा बाहेर ....मी कपडे घालून येते.....नंदिनी
अगं मी देतो ना घालून.....राज
नाही मला छाया काकूंनी सांगितलं कसं करायचं ते ...मी येते..... तो गालातच हसला आणि बाहेर गेला.... ती सगळं आटोपून ....कपडे घालून बाहेर आली....... राज ड्रेसची चेन लावून दे ना....म्हणत त्याच्यापुढे जाऊन उभी राहिली..... त्याने तिच्या टॉप ची चेन लावून दिली आणि टॉवेलने डोकं पुसून दिलं.....
मन्या तू काही जेवली आहेस काय.....राज
नाही ....माझं पोट दुखतंय तर मला भूक नाही....नंदिनी
बरं तू इथे बेडवर बस मी आलोच.....राज तिला बेडवर बसवत.... पाय लांब करून पाठीमागे उशी दिली....
नाही .....आजी साहेब रागावतील... मी तिथे खाली बसते......नंदिनी
कोणी रागवणार नाही.... मी आहो ना..... मी रागवले सगळ्यांना आणि तू आता इथेच बसायचे ....इथून बिलकुल उठायचं नाही ......मी आलो थोड्या वेळात.... त्याने तिला टीव्हीवर कार्टून लावून दिले आणि तो खाली गेला
त्याने तिच्यासाठी तिच्या आवडतं चॉकलेट शेक बनवला... आणि गरम पाण्याची पिशवी सोबत घेऊन आला.....
हे घे पिऊन घे पटकन...... काही खाल्लं नाही ना अजून पोट दुखेल आणि मग शक्ती कशी राहणार......म्हणत त्याने तिला शेक पाजला.....
राज अजून पण पोट दुखतय.... पाय पण दुखत आहे....नंदिनी
हो तू झोप...... त्याने तिला झोपवले...... तीच पोट आणि पाठ गरम पाण्याच्या पिशवीने शेकऊन दिले..... पायाला तेलाने मालिश केली........ आणि पाय दाबून दिले..... तिला आता शांत झोप लागली होती.......... त्याने तिच्या अंगावर नीट पांघरून घातले आणि तिच्या केसांवरून कपाळावरून हात फिरवत कपाळावर किस केले.... आणि जेवाय साठी खाली निघून आला...... आबा सुद्धा वरती एकदा येऊन बघून गेले ....नंदिनी नीट झोपलेली बघून त्यांना समाधान वाटले आणि ते सुद्धा खाली निघून आले..
बऱ्यापैकी संध्याकाळ होत आली होती..... राज आपलं ऑफिसचं काम करत बसला होता....... नंदिनी झोपून उठली...... आता तिला सकाळ पेक्षा बरं वाटत होतं ती बऱ्यापैकी फ्रेश झाली होती........
लाडोबा उठला काय माझा...... बरं वाटतंय का आता....... राज तिच्याकडे बघत हात पसरत बोलला..... ती हो म्हणतच बेडवरून उठून त्याच्या मांडीवर जाऊन बसली.....
हो आता नाही दुखत आहे पोट....... राज हे असं कधीकधी हे असं शिशी मला काय होत असते .....माझी तब्येत का खराब होत असते...... मला नाही आवडत हे असं....... डॉक्टर कडून औषध आणून देणा......नंदिनी
हे शिशी नसते हे ....चांगलंच असते...... आपण शी-सू करायला का बरं जात असतो...... राज नंदिनी कडे बघत बोलला
आपण जेवतो ना ....आपण खूप पाणी पण पितो..... मग त्यातून आपल्या शरीराला शक्ती भेटत असते...... आणि मग जे खराब असते ते शी आणि सू मधून निघून जाते असं मला आजीने सांगितलं होतं...नंदिनी
हा बरोबर..... मग हे पण असच असते...... तुला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये रोज नवीन नवीन रक्त बनत असते... त्यामुळे आपल्याला खूप शक्ती येते........ ते रक्त आपल्या शरीरा भर फिरत असते ज्यामुळे आपलं डोकं, हात ,पाय ,मेंदू सगळं छान काम करत असते......आणि मग असं फिरता फिरता रक्तामधला सगळा कचरा एका ठिकाणी जमा होतो.... आणि मग ते असं निघून जाते... म्हणजे मग आपलं शरीर आत मधून पूर्ण स्वच्छ क्लीन होते..... मग त्यामुळे कसे तुझे हे केस किती छान मोठे झाले आहेत.... तू किती सुंदर सुंदर दिसतेस कारण तुझ्या शरीरात सगळं क्लिन झालेले असते म्हणून......... आणि हे रोज नसते .... महिन्यातून फक्त चार पाच दिवसच असते.......आपल्याला फक्त थोडीशी काळजी घ्यायची असते बस....... राज तिला समजावून सांगत होता
अच्छा असा आहे का....... हो म्हणूनच मी अशी छान सुंदर दिसते........... राज सगळ्यांनाच असं होते का.....नंदिनी
हो सगळ्या मुलींना असं होत असते........राज
मुलांना नसते होत.....नंदिनी
नाही.......राज
का बरं.....नंदिनी
आता काय उत्तर देऊ..... हिचे तर प्रश्नच संपत नाही आहे राज विचार करत बसला..
ह्म्म.....कारण मुली खूप सुंदर असतात, खूप स्ट्रॉंग असतात म्हणून.......मुलांचं पोट दुखलं तर मुलं किती रडतच बसतील .....तुम्ही मुली किती स्ट्रॉंग आहात .....तू कसं छान सगळं ऐकून घेते ....होणं....राज
हो मी खूप स्ट्रॉंग आहे...... नंदिनी हसतच बोलली...
That's my good girl...... राज तिचे गाल ओढत तिचा लाड करत बोलला....... नंदिनी ने पण त्याला गोड स्माईल दिली.....
*******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा