Jan 22, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 22

Read Later
नंदिनी...श्वास माझा 22

 

भाग  22

सगळ्यांनी रागवल्यामुळे नंदिनी खूप रडत होती.....
श्रीराज नंदिनी ला आपल्या रूम मध्ये घेऊन आला.... तिला बेडवर बसवले..... आणि शांत करायचा प्रयत्न करत होता.... पण तिने जो भोंगा पसरला होता  .. तो काही थांबायचं नाव घेत नव्हता...

मला आजी पाहिजे..... मला आबा कडे जायचं....... मला इथे नाही राहायचं...... मला नाही आवडलं..... मला आईची पाहिजे....... नंदिनी रडत बडबड करत होती

नंदिनी हे बघ रडू नको मी सगळ्यांना रागवला ना आता तुला कोणी काही बोलणार नाही..... राज तिला समजावत बोलत होता

मला आजी पाहिजे,... मला आजी सोबत फोनवर बोलायचं आहे........नंदिनी ने एकच हट्ट पकडून ठेवला होता....

हो तू आधी शांत हो मग आपण आजीला फोन लावू या....राज

नाही आत्ताच बोलायचं आहे.....नंदिनी

राजने फोन लावायचा नाटक केलं आणि फोन लागत नाहीये असं तिला सांगितलं....नंदिनी अशी रडत रडत तिकडे आजी आबासाहेबांसोबत बोलली असती तर  त्यांना नंदिनीची काळजी वाटली असती म्हणून त्याने फोन न लागायचा नाटक केले

ती ऐकायला काहीच तयार नव्हती... राजने त्याच्या जवळचे 4- 5 जे काही सॉफ्ट टॉईज होते ते काढले आणि तिच्या जवळ आणून ठेवले......

नंदिनी हे बघ माझ्याजवळ अजून खेळणी आहेत..... तुला नको आहेत का हे..... आणि जर तू अशी रडत राहिली तर मग आपण दुकानात कस जाणार....... जाऊ दे मग जाऊयाच नाही ...कॅन्सल करून घेऊ..... राज नाटकी बोलत होता

पाहिजे मला खेळणे...... नंदिनी रडक्या सुरात बोलत होती

मग आधी शांत हो बघू..... तू शहाण बाळ आहेस ना.... मग शहाणी मुलगी असं रडत असते काय..... राज

हो मी शहाणी मुलगी आहे .....नंदिनी ने  रडत-रडत मान हलवत बोलली

गुड गर्ल..... राज तिचे डोळे पुसत बोलला

राज मला भूक लागली......नंदिनी

तू बस इथेच ....कुठे  जाऊ नको..... मी आलोच जेवायचं ताट घेऊन.......राज

नंदिनी ने मान डोलावली...

राजने बाहेर येऊन बघितले..... तर पाहुण्यांची जेवण सुरू होते......काही बायका झालेल्या प्रकारावर बोलत होते तर काही जणी आईला आणि आजीला सून अशी का आणले वगैरे विषयावर चर्चा करत होते... राजने  या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि तो किचनमध्ये गेला..... बऱ्याच जणांचा त्याच्याकडे लक्ष गेलं... त्याने त्यांना एक छोटस स्मायल दिले ..... किचन मधल्या काकींना त्याने जेवण्यासाठी प्लेट बनवून मागितली.... आणि तो रूम मध्ये परत गेला....

हे काय पुरणपोळी .....मला नाही आवडत....नंदिनी ताटा मध्ये बघत बोलली....

बघ अजून बाकीचे पण आहे..... गुलाबजाम.. पनीरची भाजी ..पकोडे ...पोली.... व्हेजिटेबल्स राईस.... पराठा चिप्स पापड... हे नाही का आवडणार  तुला...... राज

ठीक आहे मी नेऊन ठेवतो ही प्लेट.......राज नाटक करत बोलला

नाही नाही मी  खाते ना मला खूप भूक लागली आहे..... दोघेही बाजूला असलेल्या एका स्टडी टेबल वर जाऊन बसले... राजने तिला जेवण भरवले

तुला भूक नाही लागली का....नंदिनी खाताखाता बोलत होती

लागली आहे ना.... तुझं झालं की खाईल आहे...... राज तिला भरवत बोलला....
तू पण खा..... म्हणत तिने तिला भाजी पोळी देत असताना त्याचाच हात त्याच्या तोंडाकडे वळवला..... त्याने तिला छान गोड स्माईल दिली आणि त्याने तो घास खाल्ला......

समजत नाही पण प्रेम आणि काळजी अजूनही आहे...... यालाच तर म्हणतात मनाचं मनाशी जोडलेलं नातं...... प्रेमाला भाषेची, वयाची, श्रीमंत-गरीब, लहान-मोठे कशाचीच बंधने नसतात.... राज मनात विचार करत होता तिच तसं काळजी घेण्याने तो खूप सुखावला होता.....

मला आयुष्य जगायला एवढेच पुरेसा आहे..... थँक्यू देवा.... राज मना मध्येच  देवाचे आभार मानत होता...

राज सगळे मलाच का रागवतात....नंदिनी

हो ..हो पण .....तुझी पण चुकी होती की नाही..... मी तुला आधीच सांगितलं ना की आपल्या घरी खूप पाहुणे येणार आहेत तर मस्ती कमी करायची.... मग तू का ऐकलं नाहीस माझं...राज

मी थोडी मस्ती करत होती मी तिथे ते मला नवीन फ्रेंड्स मिळाले त्यांच्या सोबत खेळत होती..... तो चिंटू ..तो मला पागल पागल म्हणून चिडवत होता... इतकी मोठी झाली तरी तू पागल आहेस... तुला समजत नाही असं बोलत होता..... म्हणून मग मी त्याच्या मागे पळत होती......मग त्या काकी मध्ये आले आणि  त्यांना माझा धक्का लागला तर ते वरण सगळं ते दुसऱ्या काकूंच्या कपड्यांवर सांडले.......आणि मग त्या काकी त्या दुसऱ्या काकींना खूप रागवत होत्या म्हणून मी त्यांना फक्त एवढंच बोलले की  त्यांनी काही नाही केलं माझाच धक्का त्यांना लागला आणि सगळे लोक , आजी साहेब मलाच खूप रागवत होते...... नंदिनी लहानसं तोंड करत बोलली

हो पण चुकी तुझी पण होती ना बाळा...... तू जर घरात सगळे लोक असताना खेळ खेळली नसती पण आली नसती तर हे सगळं झालं असतं का.... जेव्हा आपल्या घरामध्ये खूप लोक येतात... काही पूजा असते... फंक्शन असते तेव्हा खूप सांभाळून वागायचं असते....आणि मोठे लोक आपल्याला चांगल्यासाठीच रागवत असतात..त्यांचं ऐकायचं असते....... राज

हो माझं पण चुकलं मी आता पुढल्या पासून असं नाही करणार.... पण ही साडी पण होती ना मध्येच यासाठी मुळेच मला नाही आलं..... मला दुसरे कपडे देना आणून.......नंदिनी

बरं..... शहाणी माझी पिल्लू..... तिचे गाल ओढत बोलला...

रडल्या मुळे आणि जेवण पण झालं होतं त्यामुळे नंदिनीला झोप लागली...

राजनी लगेच फोन काढला आणि रोहनला कॉल केला....

रोहन प्लीज एक इम्पॉर्टंट काम होतं ....घरी खूप पाहुणे आहेत म्हणून मी बाहेर जाऊ शकत नाही.....राज

कमॉन यार राज.... तुला केव्हापासून प्लीज बोलायची गरज पडायला लागली... आणि थँक्स मी तुला म्हणायला पाहिजे मग ...तुझ्या कंपनीमध्ये तू मला इतक्या चांगल्या पोझिशन वर  ठेवले आहे....... सांग काय काम आहे ते.....रोहन

इट्स ऑल बेकॉज ऑफ यूर टॅलेंट... नथिंग एल्स.....राज

बघ हसू नकोस तू .....हवं तर तू रितिका ला घेऊन जा सोबत....... राज l

अरे हो बोल ना काय.... रोहन

नंदिनी साठी काही कपडे मागवायचे होते.... इकडे येताना फक्त साड्याच आणण्यात आल्या.... ते तिला फार अन्कंफटेबल  होत आहे..... सो प्लीज  तेवढं एक काम कर आणि लवकरात लवकर जमत असेल तर आणून दे..... मी तुला लिस्ट मेसेज करतो.....राज

ओके शुअर.....रोहन

राजनी रोहनला काही कपड्यांची लिस्ट दिली त्यामध्ये वन पिस फ्रॉक टाइप काही ड्रेस आणि एलेस्टिक वाली लेगिन्स सलवार कुर्ता... असे काही ऑप्शन्स सांगितले....

पूजा वगैरे सगळं आटोपले होते सगळे पाहुणे निघून गेले होते ...राज ने नंदिनी ला  निट झोपवले आणि तो खाली आला...

राज हे सगळे सगळ्यांसमोर तुझं काय चाललं होतं..... पाहुण्यांसमोर काही तमाशा नको म्हणून आम्ही काही बोललो नाही... पण आम्ही घरात अशा गोष्टी खपवून घेणार नाही.........आजिसहेब

मी पण तेच बोलायला आलो आहे..... तुम्हाला सगळ्यांना नंदिनी च्या मानसिकतेबद्दल माहिती आहे..... तुमच्या पासून काही सुद्धा लपलेला नाही आहे...... तुम्हाला तुमचे रितीरिवाज करायला मी मनाई केली नाही आहे..... पण माझं म्हणणं एवढंच होतं की ते आपल्या घरातल्या घरात असावा...,जोपर्यंत नंदिनी ठीक होत नाही किंवा तिला इथल्या लोकांची ओळख होत नाही... इथे राहण्याची सवय होत नाही ....तोपर्यंत जास्ती लोकांमध्ये तिला न नेलेले च बरे....ति जरी वयानी , शरीराने मोठी असली तरी सुद्धा तिचा मन हे बालमण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वागण्यामुळे... बोलण्यामुळे तिच्या मनावर वाईट परिणाम व्हावे हे मला आवडणार नाही.....राज

तुमची बायको पागल आहे ....आम्हाला नाही वाटत की ती कधीही बरी होणार आहे.... आज दोन वर्षे उलटून गेली तरी त्यांच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे आणि पुढे पण हे असंच सुरू राहणार आहेत.... तुम्ही आम्हाला समाजामध्ये काही बोलायला बाकी ठेवले नाही.......ज्यांची आमच्या समोर बसायचे हिम्मत होत नव्हती आज ते लोकं सुद्धा आम्हाला दोन गोष्टी ऐकवून गेले......आजी

मी परत सांगतो आहे ....ती पागल नाही आहे... आधी तिला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून तिच्या मध्ये काही बदल झाला नाही.....इथे तिला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल आणि मला आशा ..आहे विश्वास आहे की ती बरी होईल...... आणि तुम्हाला जर इतका त्रास होत असेल तर मी तिला घेऊन जातो इथून......राज

राज आई साहेबांचा बोलायचा तसा अर्थ नव्हता.... मला पण तुझे वागला ते अजिबात आवडलं नाही..... मला तुझं लग्न सुद्धा पटलेलं नाही.... पण आता जे झालं ते झालं... बरं आता हे इथेच थांबवा..... शशिकांत

काय करायचं वाटते ते करा पण मला आज झाला तसं तमाशा परत घरात नको आहे.., तुम्ही तुमच्या जिम्मेदारी वर तिला आणलेला आहे तर तिच्या वागण्यात बोलण्याची सगळी जबाबदारी तुमची ....तुम्हाला या सगळ्या गोष्टी  सोपी वाटत आहे तर.....इथे घरात तुम्हाला कोणीही काही मदत करणार नाही ......तुम्हाला इतकाच स्वतःवर विश्वास आहे तर स्वतः एकटे ते करून दाखवा.... आणि खबरदार श्रीराज ला कोणी मदत केली तर..... सूनबाई तुम्हीसुद्धा.....आजिसहेब

राज इथेच राहणार.... कुठे जाणार नाही इतक्या वर्षाची माझी मेहनत वाया घालवू नका.... मला तुमच्या समाजाचं.. प्रतिष्ठेचं काही घेणे देणे नाही.... मला माझा परिवार हा एकत्रित हवा आहे ... राज बाळा मी तुझ्यासोबत आहे.. मला तुझ्या विश्वासावर विश्वास आहे..... मी तुझ्या पाठीशी आहे ......आबासाहेब

तेवढ्यात रोहन तिथे काही बॅग घेऊन आला.... आणि त्याने त्या राज ला दिल्या........

थँक्स अ लॉट रोहन.... राज बॅग हातात घेत बोलला

रोहन ....ये बस....आई

काकू नंतर येईन कधी.... बस हे  काही सामान जायचं होतं राजला.. तेवढेच द्यायला आलो......रोहन

बरं बरं आज पूजा झाली त्याचा प्रसाद तरी घेऊन जा ...आई आईने रोहनला प्रसाद दिला आणि रोहन  प्रसाद देऊन निघून गेला..

सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले...

राज आपल्या रूममध्ये येऊन ऑफिसचं काम करत बसला बरंच काम आठ दिवसापासून पेंडिंग होते.. आता ते त्याला बघायला हवं होतं .....त्याने काही दिवस घरूनच काम करायचा निर्णय घेतला होता...... इम्पॉर्टंट मीटिंग किंवा काही असेल तर तो काही वेळासाठी ऑफिसमध्ये जाणार होता

लगेच फोन काढून नंदिनी साठी डॉक्टरांची दुसऱ्याच दिवशी ची अपॉइंटमेंट घेतली.... त्याला तिचे लवकरात लवकर ट्रिटमेंट सुरू करायची होती...

काम करता करता त्याचा तिथेच बसल्या बसल्या डोळा लागला..... नंदिनी ला थोड्या वेळाने जाग आली आता तिला बरंच फ्रेश वाटत होते..... सकाळी घडलेल्या गोष्टी ती बर्‍यापैकी विसरली होती........ बाजूला बघते तर राज झोपला होता...... तिने रूमच्या बाहेर डोकावून बघितलं.... तिथे कोणीच नव्हतं... मग वरतून खाली हॉलमध्ये बघितलं .. तर सगळं शांत होतं...... ती साडी पकडत हळू हळू खाली आली.... आणि हॉलभर फिरू लागली...... इतके मोठे.. घर तिला खूप मजा वाटत होती... तिने नंतर दारातून बाहेर डोकावून पाहिलं..... खूप सुंदर बगिच्यात फुलं बघून तिचे डोळे चमकले.... आबासाहेब तिथे झोपाळ्यावर बसले होते... त्यांचं लक्ष नंदिनी कडे गेलं आणि त्यांनी तिला छानशी स्माईल दिली आणि हाताने ने इशारा करत स्वतःजवळ बोलवले.......

त्यांना बघून नंदिनी खूप खुश झाली... ती लगेच धावत धावत त्यांच्या जवळ गेली... आणि त्यांच्या गळ्यातच आनंदाने पडली..... ते पण हसले आणि त्यांनी तिला त्यांच्या बाजूला बसवलं...

आबासाहेब तुम्ही माझ्या आबा सारखेच आहात......नंदिनी

हो ना... मग मला फक्त आबा म्हणायचं... आबासाहेब नाही....आबा

ठीक आहे.....नंदिनी

थोड्या वेळाने राज ला जाग आली... बघतो तर नंदिनी त्याला त्याच्या आजूबाजूला कुठेच दिसली नाही.... बाथरूम जवळ जाऊन बघितले पण ती तिथे सुद्धा नव्हती..... आता मात्र त्याला काळजी वाटली.. तसे त्याने सिक्युरिटी गार्डला सर्व नीट सांगून ठेवलं होतं तरी मात्र त्याला नंदिनी कुठे दिसली नाही म्हणून तो काळजीत पडला आणि तो खाली येऊन सगळीकडे शोधायला लागला....

हसण्याचा आवाज आला म्हणून सहज त्याचे लक्ष बाहेर गार्डन कडे गेले..... आणि बघतो तर काय आबासाहेब आणि नंदिनी  हसत गप्पा मारत आहेत आणि नंदिनी त्यावर खूप खळखळून हसत आहे.... तिला व्यवस्थित बघून त्याच्या जीवात जीव आला आणि तो तिथेच दारात उभा राहून त्यांना बघत होता...

राज इकडे ये ना..... राजला दारात बघून नंदिनी आवाज दिला.... राज त्यांच्या जवळ झोपाळ्यावर आबासाहेब जवळ बसला

बाबा या राज्यांना एकही गोष्ट येत नाहही..... तुम्हाला येते काय...... मला तिकडे गावात माझे बाबा खूप गोष्टी सांगत होते मला खूप आवडते गोष्टी ऐकायला....नंदिनी

हो मला येतात खूप गोष्टी... मी तुला सांगेल.... पण तुला माझे एक काम करावं लागेल.... हा राज जे  तुला सांगतो ते सगळं ऐकावं लागेल.....आबा

हो मी तर सगळ ऐकते त्याचं......नंदिनी

राज... उद्या मला सकाळी लवकर उठवशील ....मी आबांसोबत  बगीच्या मधून फुल तोडायला जाणार आहे आणि आबाना  देव बाप्पा ची पूजा करायला सुद्धा मदत करणार आहे....आणि आबा मला असं हार पण बनवता येतात मी तुम्हाला हार पण बनवून देईल.... मला आजीने शिकवले आहे.... नंदिनीची अखंड बडबड सुरू होती

खूप गोड मुलगी आहे ....सगळे आपापल्या कामात बिझी झालेत... मी आपला एकटा पडलो होतो... बघ आता मला सुद्धा छान कंपनी मिळाली...खूप लघवी पोर आहे ... निरागस आहे ..... आताच इतका जीव लावते आहे तर आधी किती लावत असेल......जीवन परीक्षा घेतच असते... येतात असे क्षण आयुष्यात....सोपी रस्ता तर कुणीही निवडतात ....आपली जबाबदारी घेणे...हे सगळ्यांना नाही जमत....तू पळपुटा नाहीस....तू प्रेम केले ते निभावतच नाही तर जपतो आहेस...खूप क्षण असे येतील जे तुला तोडायचा प्रयत्न करतील... तू थकाशिल.. वैतागशिल ..... पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.. दगमळू  नकोस..... तू तुझ्या आयुष्यात जे निवडल आहे ते खूप कठीण आहे , तू इतका मोठा झाला आहेस तुझं नाव कामाला आहेस तुला सोपी आयुष्य निवडत आलं असतं पण तू तुझं प्रेम निवडलं..... you are so strong my boy..... I am really proud of you my son...nothing will beat you .... I am with you always..... आबा

आबा काय बोलताय.. नंदिनीला मात्र काहीच कळत नव्हते...

आबा थँक्यू.......राज चा डोळ्यात आनंदाश्रु होते...तो भाऊक झाला होता....

काळजी नको करू...सगळं ठीक होईल...नंदिनी अगदी पहिल्यासारखी होईल.....आबांनी त्याला स्वतःच्या मिठीत घेतले....

मी पण....नंदिनी

राजने तीलासुद्धा मिठीत घेतले.... आणि त्यांनी ग्रुप हग केला.... अंबानी दोघांच्या पाठीवर प्रेमाने थोपटले..

राज ने नंदिनी ला सगळं घर दाखवले..... घरात काम करणाऱ्या लोकांसोबत तिची ओळख करून दिली.... तिने पण आनंदाने त्या सगळ्या लोकांना आबा, काका ,काकी मामा असं काही काही बनवून घेतलं होतं.... राज ला  तिचं खूप कौतुक वाटत होतं....माणसाची मेमरी गेली तरी स्वभाव मात्र बदलत नाही हे कुठेतरी त्याने वाचलं होतं आणि खरच तो ते अनुभवत सुद्धा होता.... कारण ती लहानपणापासून अशीच लघवी होती... जरी ती खूप खट्याळ खट्याळ स्वभावाची होती तरी मात्र माणसं जोडणं तिला येत होतं....

औपचारिक अच्कान हो पण ...त्याने घरातल्या सगळ्यांसोबत सुद्धा तिची ओळख करून दिली.....

राहुल राजच्या रूम मध्ये आला...

नंदिनी..... हा राहुल माझा लहान भाऊ.... राज

हॅलो वहिनी साहेब.....राहुल

वहिनी..... माझं नाव तर नंदिनी आहे....नंदिनी

राजनी त्याला मानेनेच काही इशारा केला... तसा तो समजला

हो ....हो ....नंदिनी....राहुल

अरे तुमच्याकडे कोणी  मुलगी नाही आहे....... तुम्हाला बहीण नाही का..... मी बनू का तुमची बहीण.......नंदिनी

राजनी डोक्यावर हात मारून घेतला आणि राहुल ला सुद्धा खूप हसायला येत होतं....

बरं राज चे असू द्या ......मला तुमचा भाऊ बनवा.... राहुल हसतच राजकडे बघत बोलला

राजला का बरं नाही...... हो हो तो खूप मोठा आहे.... तो काका सारखा आहे..... सारखा रागवत असतो...... मी तुला राहुल दादा बोलू का.....नंदिनी

अरे मला राहुलच म्हणाला तरी चालेल मी लहान आहे तुमच्यापेक्षा...राहुल

लहान..... हे काय तुम्ही तर माझ्यापेक्षा पण उंच आहात..... माझ्यापेक्षा मोठे आहात..... आजीने सांगितले आहे मोठ्या लोकांना मान दिला पाहिजे...... मी तुम्हाला दादा म्हणेल..... नाहीतर आजी मला रागवेल येईल.....नंदिनी

बर ठीक आहे.... तुम्हाला जे आवडते ते तुम्ही मला बोलू शकता...... राहुल

नंदिनी ला आनंद झाला....
नंदिनी आपल्यास सॉफ्ट टॉईज सोबत खेळत बसले

काय भाई तू काय केलं हे...... मला तर काहीच कळत नाही आहे.... सगळे डोक्यावरून जात आहे..... तुला माहितीये तू माझ्या सगळ्या मैत्रिणींचा क्रष आहेस...... किती साऱ्या मुली तुझ्या मागे लागले आहेत...... तू  मोस्ट हँडसम, मोस्ट पावरफुल, मोस्ट टॅलेंटेड द श्रीराज देशमुख  आहेस..... वहिणी चांगली मुलगी आहे.... सुंदर आहे ....पण तुला कुठेच मॅच नाही आहे तिचा आणि आता तिची ही मानसिक अवस्था.... कसं करशील तू सगळं......राहुल

तू प्रेमात पडशील तेव्हा तुला सगळं कळेल....राज

नो वे भाई ....सगळं जर येवढे कठीण असेल तर मी कधीच असं  करणार नाही..... तू स्ट्रॉंग आहेस... मी नाही ऐवधा स्ट्रोंग.... ओके चल येतो.... काही काम असलं की सांग......राहुल

जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे ....बरं झालं भाई  नंदिनिवाहिनी  चा मागे बिझी झाला..... आता त्याला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ भेटणार नाही ...मी आपला मोकळा झालो.... जे पाहिजे ते करू शकतो मनातच विचार करत राहुल तिथून बाहेर पडला

राहुल तसा मनाने चांगला होता पण अती लाडा मुळे श्रीमंती मुळे बिघडलेला होता...... सतत पार्ट्या करणे बाहेर फिरून आज काय त्याचा उद्योग चालायचा.... आणि राज चे नेहमी त्याच्यावर लक्ष असायचं त्यामुळे तो राजला थोडा घाबरायचा....

राज आता संध्याकाळ पण झाले ....आता थोड्यावेळानी रात्र होईल..... मग दुकान बंद होतील ....तू मला कधी घेऊन जाणार आहे खेळणी घ्यायला...नंदिनी

राज ने नंदिनी ला रोहनने आणलेल्या कपड्यांच्या बॅग दिल्या आणि तिला त्यातला कुठला ड्रेस आवडतो घालायला सांगितला.... रोहनने अगदी राजने सांगितले होते तसेच शॉपिंग केली होती.....

इ...... माझ्यासाठी कपडे.... म्हणती बेडवरच उड्या मारू लागली.... तिने त्यातले सगळे कपडे बाहेर काढून बेडवर पसरवले..... तिला काही त्यातल्या आवडले होते काही आवडले नव्हते कोणाचे कलर्स नव्हते आवडले तर ती आपली कुरकूर करत कपडे अंगाला लावत बघत होती.....

राज मला हा ब्लू कलर नाही आवडला.....नंदिनी

ठीक आहे  काय जे आवडले ते ठेव मग आपण नंतर परत जाऊन तुझ्या आवडीचे कलरचे घेऊन येऊ.... आणि आता यातला जो आवडतो तो घाल आपण बाहेर दुकानात जाऊ या तुझ्यासाठी खेळणी घ्यायला....

तिने त्यातला पीच कलरचा वन पीस फ्रॉक पॅटर्न चा ड्रेस घातला तो तिला खूप घालायला सोपा गेला..... राजने तिला तिच्या ड्रेसची मागून चेन लावून दिली आणि सकाळसारखेच जमेल तशी वेनी घालून दिली....

राज माझे केस आपण छोटे करून टाकू..... तुला नीट घालता येत नाही आणि तुला त्रास सुद्धा होतो ना....नंदिनी

नाही ...नको ....मला आवडतात तुझे हे लांब केस....तू काळजी करू नको.... मला काहीच त्रास होत नाही आणि मी आता शिकून घेईल वेणी कशी घालायची ते...... फक्त काही दिवस ऍडजेस्ट करून घे.....राज

ठीक आहे....नंदिनी

त्या सिम्पल फ्रॉक मध्ये नंदिनी खूपच सुंदर दिसत होती.... एकही दागिना तिने घातला नव्हता फक्त गळ्यात छोटे मंगळसूत्र घातलं होतं...... मंगळसूत्र पण तिला घालायचं नव्हतं पण तिच्या आजीनं तिला सांगितलं होतं की हे कधीच काढायचं नाही म्हणून तिने ते तेवढं ठेवलं होतं..... राजपण तिलाच मॅच असा टीशर्ट आणि जीन्स घालून आला......

हे काय...हे कसे कपडे घातले आहेत....सून आहे ना .... सूनेसारख राहायचं.....आजिसहेब

नंदिनी आजिसहेबांच्या आवाजाने घाबरली....तिने राज चा दंडाला पकडले आणि त्याच्या मागे लपली...त्याच्या मागूनच एका डोळ्याने आजिसहेबांना बघत होती

आजिसहेब हे काय घेऊंन बसलय तुम्ही....आजकाल सगळ्याच मुली असे कपडे घालतात.....तुम्हाला सुद्धा तर आवडतात ना मॉडर्न मुली.....आणि मला असे वाटते की ज्यात आपल्याला सहज वाटेल असे कपडे घातले तर काय बिघडते...आणि वाईट अस काही घटक नाहीये....राज

राज आजकाल तुम्ही खूप वाद घालायला लागलात आमचासोबत......या मुली सोबत राहून तुम्ही सगळे मानपान विसरत आहात......किती लोकांसोबत भांडाल या मुलीसाठी......आजिसहेब

सॉरी.....विषय वाढायला नको म्हणून त्याने तिथेच विषय थांबवला

राज तिला बाहेर दुकानात घेऊन गेला..... ती त्याच्या शेजारी कार मध्ये बसली होती.... राज ड्राईव्ह करत होता... राजला ड्राइव्ह करताना बघून तिला खूप मजा वाटत होती.... तिकडे गावांमध्ये हे असं काहीच तिने बघितलं नव्हतं...... ती खिडकीतून बाहेर बघण्यात मग्न झाली होती......... बाहेर रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्या त्यांचे वाजणारे horns.. लाईट.... संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळंच कसं डोळ्यांना दिपवून टाकणारे होतं..... मोठमोठी दुकान  ...मॉल..... बघण्यात ती बिझी झाली होती...आणि मध्ये मध्ये ति जे जे बघत होती त्याची सतत कॉमेंट्री सुरू होती..... ड्राईव्ह करता-करता राज अधुन-मधुन तिच्याकडे बघत होता...... तिला खुश बघून त्याला खूप आनंद होत होता..... तो तिला एका खेळण्यांच्या दुकानांमध्ये घेऊन गेला...... आणि तिला हवे ते खेळणे घ्यायला सांगितले...... दुकानदार अजीब नजरेने त्यांच्याकडे बघत होता..... पण राजला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं..... त्याचे सगळे लक्ष नंदिनी कडे होता.....नंदिनी ने  नवीन नि दोन भावल्यांचे सेट घेतले होते त्यानंतर साप सीडी.. लुडो... किचन सेट असे चार-पाच खेळने घेतले......

बस झालं ......अजून काही हवं असेल तर घे.....राज

नाही ....नको.....  आजी रागवते खूप सारे खेळणे घेतले की..हे खराब झाले की परत घेऊ आपण.....नंदिनी

बर ठीक आहे..... राजनी बिल पे केलं आणि खेळांच्या बॅग घेऊन ते परत कारमध्ये बसले......

राज तू खूप चांगला आहे .....मला तू खूप आवडतो.....नंदिनी

राज ने तिला एक स्माईल दिली आणि गाडी स्टार्ट केली....

राज.... थांब थांब थांब थांब......जोपर्यंत त्याने गाडी थांबवली नाही तोपर्यंत ती थांब थांब बोलत होती

काय झालं.....राज

हे बघ इकडे आईस्क्रीम दुकान दिसला मला.... आईस्क्रीम खायची......नंदिनी

अग आता...... सर्दी होईल ना तुला....राज

थोडीशी  ...फक्त थोडीशी..... नंदिनी बोटांनी थोडसं दाखवत त्याला लाडीगोडी लावत होती..

राज तिच्या आईस्क्रीम घेऊन आला..... त्याने तिला पुढे गाडीवर तिच्या कंबरेला पकडुन उचलत बसवले आणि तिच्या हातात आईस्क्रीम दिले...... ती अगदी लहान मुलांसारखी त्या आईस्क्रीम मध्ये हरवत आईस्क्रीम खात होती...... राज तिचे हावभाव डोळ्याने टिपत होता

एकच का आणलं.... तुझ्यासाठी का बरं नाही आणलं..नंदिनी

मला नको आहे......राज

का.....नंदिनी

मी आता मोठा झालो ना....... मोठे लोक आइस्क्रीम जास्त खात नाही ....तू खा.....राज

हो का .......नंदिनी डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती

मग मी... मी मोठेच नाही होणार.... नाहीतर मग मला आईस्क्रीम खाता येणार नाही......नंदिनी

नाही ग बाई..... असं नको बोलू .....पटापट मोठी हो.... मी तुला हवा तेवढा आईस्क्रीम खाऊ घालेल... पण तु लवकर मोठी हो....राज

प्रॉमिस......नंदिनी

हो....राज

ठीक आहे मग मी होईल मोठी लवकर....नंदिनी

आजूबाजूला असलेली सगळी लोक अधून मधून नंदिनी कडे बघत होते...... त्यांच्या नजरेमध्ये नंदिनी बद्दल वेगळेच भाव राजला दिसत होते.....त्यांच्या तशा नजरा बघून राजला खूप वाईट वाटत होते...राग पण येत होता...माणसाला फक्त मा ऊस म्हणून का बघू शकत नाही हा समाज त्याचा डोक्यात विचार सुरू होते..... ......येण्या जाणाऱ्या मुली मात्र राज कडेच बघत होत्या........ दिसतच इतका हांडसम होता राज....

आईस्क्रीम खाता खाता तिने तिचा सगळ तोंड आणि हात  भरवले  होते...... राज हातात टिशू पेपरचा बॉक्स घेऊन उभा होता....... आईस्क्रीम खाऊन झाल्यावर त्याने तिचं तोंड हात सगळं नीट क्लीन करून दिले..... आणि ते परत घरी जायला निघाले

घरी आल्यावर नंदिनी ने सगळे खेळण्यांच्या बॅग हातात पकडल्या आणि धावतच आबा आबा करत घरात पळाली.... घरात सगळे सोप्या वर बसले होते...... नंदिनी पळतच जात आबाच्या गळ्यात  पडली.....

ही काय बोलायची पद्धत झाली... असं घर डोक्यावर घ्यायला काय झालं......
... आबासाहेब बोलायचं..... तुझे  सासरे आहेत ते..... काही मानपान असतो की नाही...... आणि हे असं सगळ्यांसमोर गळ्यात कोण पडते...... आजिसहेब रागावल्या

ते आबा आहेत माझे...... त्यांनीच मला म्हणाले की आबा म्हणायचं म्हणून...... नंदिनी मान खाली घालत छोट्या आवाजात बोलली

हो बाळा मी आबा च आहे तुझा आणि मी तिला सांगितलं होतं मला आबा च बोलायचं म्हणून...... ती माझी आता नात आहे आणि  तिचे सगळे हक्क तिला  मिळणार........आबासाहेब

तो एक राज कमी होता की आता तुम्ही सुद्धा त्याच्या नाटकं मध्ये सामील झालात...... मला हे आवडले नाही म्हणत आजी साहेब आपल्या रुममध्ये निघुन गेल्या

ह....बाळा बोल काय म्हणत होती आणि हे काय इतक्या साऱ्या बॅग्स....आबा

आबा आबा.... मला राजने खूप सारे खेळणे घेऊन दिले..... मी ना लुडो नी सापशिडी पण आणली आहे .....आपण खेळूया......नंदिनी बॅग्स उघडत बोलली

नंदिनी आता रात्र झाली आहे....जेवायची वेळ आहे...उद्या खेळा तुम्ही..... चल आधी ते सगळं रूम मध्ये ठेव आणि हातपाय धू आपण बाहेरून आलोय ना ....राज

सगळे आटोपल्यावर रात्री राज ने गावाला आजी ला फोन करून सगळं ठीक आहे कळवले...नंतर नंदिनी सुद्धा बऱ्याच वेळ आजी आबा सोबत फोन वर बोलत बसली....तिने दिवसभर घडलेले सगळे सांगितले ...

आजी राज खूप छान आहे ...मला खेळणी घेऊन दिली...मी आईस क्रीम पण खाल्ले....नंदिनी चा गप्पा सुरू होत्या...

राज तिथेच बेडवर पाय लांब करून लॅपटॉप घेऊन office चे काम करत बसला.....नंदिनी त्याला पोटाजवळ बिलगून घट्ट पकडून झोपली होती.....एका हाताने त्याने तिला घट्ट स्वतःजवळ पकडली होते आणि एका हाताने लॅपटॉप चालवत होता.....

******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️