Aug 16, 2022
कथामालिका

नंदिनी....श्वास माझा 21

Read Later
नंदिनी....श्वास माझा 21

 

भाग-21
 

नंदिनी ची काहीच तयारी झाली नव्हती.... आईने थोडेफार साडी घातली होती ती  पण अर्धवट ....पण बाकी सगळंच राहिलं होतं.... इकडे पाहुणे मंडळी सुद्धा जमायला लागली.... राजला खूप राग येत होता की इतक्या लोकं बोलवायची काय गरज होती..... अजून नंदिनी घरच्या लोकांसोबत मिक्स झाली नव्हती.... कुणाला नीट ओळखत सुद्धा नव्हती.... त्यात आता परत बाहेरच्या लोकांची भर पडली होती..... राज दारातच उभा राहून विचार करत होता

राज साडी नीट करून देना.... हलता पण येत नाही आहे मला इथून......नंदिनी

हो आलोच......... राज आत मध्ये आला आणि नंदिनी जवळ गेला हातात साडी पकडून नीट करण्याचा प्रयत्न करत होता ....पण त्याला ते काही जमत नव्हतं.... त्यात तो आधीच चिडला होता .. त्यात परत हे साडीच... त्यांने कधी हातात घेतली सुद्धा नव्हती......

राज कारणा पटकन...... किती जड आहे ही..... नंदिनी ची  कुरकुर सुरू होती... ती इतकी हालत होती कि घातलेली साडी सुद्धा खराब होत होती....

नंदिनी हलू  नको... सरळ उभी राहा..... तू घातलेली सुद्धा साडी खराब करते आहेस....... मला बघू दे ना कसं करायचं ते... तू हलली तर मला काही जमत नाही आहे....राज

राज तुझ्या इथे खेळणे सुद्धा नाही आहे काही .....मी काय करू मला बोर होत आहे..... आजी पण ना.... माझी खेळण्याची बॅग सुद्धा दिली नाही... सगळं विसरली........नंदिनी

लकीली त्याच्या रूम मध्ये काही खूप जुने टेडी सॉफ्ट टॉईज होते ठेवलेले....... कधीतरी फ्रेंड्स सोबत शिकलेल्या मुलींनी बर्थडे ला गिफ्ट दिलेले.... त्याने त्यातले एक टेडी घेतला आणि नंदिनीच्या हातात दिला आणि तिला एका चेअरवर शांत बसायला सांगितलं.... नंदिनी एका जागेवर बसून त्या टेडी सोबत खेळत होती.. गाणे.. कविता.. गोष्टी काय काय त्याला सांगत बसली होती......

राज विचार करत होता साडी कशी घालायची.... नीट तयारी  तयारी झाली तर खाली आजी साहेब आहेच बसल्या कशी मी चूक केली आहे सांगायला...... आणि विचार करता करता त्याला आयडिया सुचली त्याने आपला मोबाईल काढला आणि त्यामध्ये यूट्यूब लावल.... त्याने साडी कशी घालतात  बघून घेतले...... आणि नंदिनीला त्यामध्ये बघत व्यवस्थित साडी घालून दिली.... थोडा कमी जास्त झालं होतं पण बऱ्यापैकी ओके दिसत होती....

राज.....?...नंदिनी

ह्म्म....राज....तिला तयार करत बोलत होता.....नी नंदिनी चे  सततचे प्रश्न सुरू होते

आपण खेळणे घ्यायला कधी जाऊ.....आता जाऊया....नंदिनी

आता सत्यनारायणाची पूजा आहे ...खूप पाहुणे आले आहेत....ते झाले की नंतर जाऊया....आणि तसे पण इतक्या सकाळी कुठलेच दुकान उघडत नाही.....राज

पूजा झाली की लगेच.....नंदिनी

हो.... पाहुणे गेले की जाऊया....राज

हुश..... झालं बाबा मोठं  काम.... राज ने  सुस्कारा सोडला.... आता त्याने तिथे ठेवलेले दागिने तिला घालायला घेतले....... दागिने सुद्धा त्यांचे पारंपारिक खूप खूप जड असे होते.....

आ ssss.......लागलं ना......... राज..... ते टोचत आहे नेकलेस माझ्या गळ्याला...... मला नाही घालायचे हे मला नाही आवडले..... परत नंदिनीची कुरकुर सुरू झाली... राजला पण ते दागिने नव्हते आवडले...त्यावेळी एवढी भारी साडी आणि दागिने सांभाळू शकणार नाही असं त्याला वाटत होतं म्हणून त्याने दागिने काढून ठेवले....

श्रीराज ....झाले काय तुम्ही तयार... काकी दरवाजे ठोकत होती..... राजने दरवाजा उघडला तशि काकी आत मध्ये आली..

अरे हे काय हीची तयारी झालीच नाही अजून...काकी

बस झालीच आहे...  तुम्ही व्हा पुढे आम्ही येतोच....राज

  हे काय दागिने  नाही घातले.... सगळे लोक जमत आहेत... आईसाहेब खूप रागावतील दागिने नाही घातले तर.... काकी निरोप देऊन निघून गेली...

राज मला हे दागिने   नाही घालायचे .....नंदिनी

नंदिनी तू इथे खेळत बस मी आलोच म्हणत राज बाहेर आईकडे गेला... त्याने आई काढून सगळे मोत्यांचे दागिने आणले... त्याला माहिती होतं की लहानपणापासून नंदीनीला मोत्यांचे दागिने आवडतात... ते गुळगुळीत असतात आणि टोचत नाहीत.... म्हणून आजी तिला नेहमी मोत्यांची दागिने घालून द्यायची

त्याने एक एक करून सगळे दागिने तिला घालून दिले........ नंदिनीला पण ते सगळे दागिने आवडले होते तिने  आनंदाने ते घालून घेतले....

झालं बाबा एकदाच... चल आता मी तयार होतो.... इथेच बस टेडी सोबत खेळ......राज

राज..... केस...... वेणी राहिली ना घालायची........ नंदिनी ने त्याला आठवण करून दिली...

अरे यार राहीलच का अजून.......त्याला माहिती होतं तिला तर मोठी झाली होती तरीसुद्धा नीट वेणी घालता यायची नाही.......

राज मला अंबाडा घालून दे... आजी सारखा....नंदिनी

काय.....? .....आंबडा........ राज कसं तरी तोंड करत बोलला

थांब बघतो म्हणत त्याने युट्युब परत सुरू केले.......  सोप्यात सोपे आंबाड्याची हेअर स्टाईल बघितली आणि नंदिनीच्या केसांमध्ये प्रयत्न करत होता..... नंदिनीचे केस खूप मोठे होते.... त्याला त्यामध्ये अंबाडा घालता येत नव्हता.....  केस पण बरेच ओढले जात होते गुंतत होते..... त्यामुळे नंदिनी सुद्धा आरडाओरडा करत होती....

नंदिनी हे अंबाडा फार कठीण आहे .... आपण दुसरं काहीतरी करू........ तो विचार करत बसला... सोप्यात सोपा काहीतरी त्याला करायचं होतं..... त्याने तिचे केस समोरून मागे घेत क्लिप  मध्ये घातले...... आणि बाकी मोकळे सोडले......

राज गर्मी होते अश्या केसांन.....नंदिनी

बरं..... त्याने 3 रबर घेतले.... आणि  केस सरळ पकडत.....वरती थोडे केस लूज करत ......थोड्या थोड्या अंतरावर... रबर लावून दिले..... वेणी छान झाली होते..... जरी ती गुंफलेल्या वेणी सारखी दिसत नव्हती तरीसुद्धा व्यवस्थित सगळे केस रबर मध्ये  टाकले होते....आणि ते संभाळण्या सारखे होते

राज..........नंदिनी

आता काय राहिलं.......राज

मला ते असं मोठ्यांना लावतात ते लिपस्टिक लावायच.... ते तिथे ठेवल आहे  ते.... ती बोट दाखवत बोलली...

अग तू अशीच खूप सुंदर दिसते हे सगळे लावायची काही गरज नाही आहे......राज

नाही खूप छान दिसते ते... काल नाही का मला एका काकी नी  लावून दिलं होतं.... लग्न होतं तेव्हा..... लावून दे ना मला खूप आवडते.......नंदिनी हट्ट करत होती

राजने  डोक्यावर हात मारून घेतला..... सगळे विसरली.... पन मुलींसारखी नाटकं करणं मात्र नाही विसरली....राज मनामध्येच हसतच बोलत होता... त्याने त्यामध्ये असलेले लाईट पिंक कलर च शेड असलेलं लिपस्टिक घेतलं.....आणि.. हळुवारपणे तिच्या ओठांवर लावून दिले....... जास्तीचा लागलेले लिपस्टिक तो  बोटाने पुसत होता..... तिच्या त्या मऊमऊ ओठांचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता.... लिपस्टिक पुसता पुसता त्याने तिच्याकडे बघितलं..... आणि तो तिला बघण्यात दंग झाला..... ती दिसताच इतकी सुंदर होती....

हिरवी बनारसी पुरे सिल्क साडी.... त्याला बारीक क्रीमिष सोनेरी काठ..... त्यावर मॅचिंग ब्लाऊज.... कानात मोत्यांचे झुमके.. त्यात मोत्यांचे वेल तिच्या केसांवर लावलेले..... गळ्यात छोटे मंगळसूत्र.... त्यावर लांब तीन सरींचे मोत्यांचा हार त्याला डायमंड पेंडंत..... हातामध्ये हिरव्या मॅचींग बांगड्या त्याच्या आजूबाजूला मोत्यांचे तोडे.... कंबरभोवती नाजूक मोत्यांची सर..... डोक्यावर छोट्याच्या  मोती ची बिंदी.... आणि कपाळावर तिची नेहमीचे चंद्रकोर..... आणि त्या  चंद्रकोरीच्या खाली हिरवी गोल छोटी टिकली...... डोळ्यात काजळची बारीक रेघ.... ओठांवर हलकं पिंक कलरचा लिपस्टिक......... तिला बघून राज चे  मन भरतच नव्हते...

राज झालं का..... माझे पाय दुखत आहे...... मी बसू काय आता.....नंदिनी

अं......हो...... हो बस तू इथे ..... एका ठिकाणी..... मी लगेच तयार होतो मग आपण खाली जाऊयात......राज

राज पण छान तयार झाला होता.... त्यांने क्रीमिष  कुर्ता पायजमा त्यावर सिल्की ग्रीन नंदिनी ला मॅच होईल असे वेस्ट कोट घातला होता....बाह्य वर फोल्ड केलेल्या...ट्रिम शेव....नी जेल ने सेट केलेले केस ......एका हातात घड्याळ....तो पण एखाद्या राजकुमार पेक्षा कमी दिसत नव्हता......

चला महाराज आले.... झाली का तयारी ....म्हणत आई राज चा रूममध्ये आली....

किती सुंदर दिसतात माझी मुलं..... अगदी राजा राणीची जोडी....... आईच्या त्या बोलण्यावर राज ने स्मायल केले.... आईने एक काजळाचे बोट  दोघांच्याही कानामागे लावलं.....
दृष्ट नको लागायला कुणाची........ आई हसतच बोलली..

बरं या आता खाली.....म्हणत आई पुढे निघून गेली

नंदिनी..... बघ आपल्याकडे आता पाहुणे आले आहेत..... सगळे आपल्या सोबत बोलायला येतील.... तर घाबरायच नाही...... सगळ्यांना हात जोडून आणि छोटंसं हसून उभ्यानेच नमस्कार करायचा.....वाकायचं नाही ....नाहीतर साडी सांभाळणार नाही.... आणि हो जास्ती काही बोलायचं नाही आई सगळं बघेल.... आणि मुख्य म्हणजे  मस्ती आणि गोंधळ करायचा नाही ....शांत रहायचं........ राज

आता उघडले असतील दुकान .....आता खूप वेळ झाला ना....नंदिनी.

नाही उघडले .......राज

उम्म.....नंदिनी

नंदिनी.....मी काय सांगितले ते समजले काय.....राज

हो......नांदी

काय.....राज

दुकान अजून उघडले नाही....नंदिनी

राज ने डोक्यावर हात मारला....

ते नाही....खाली पाहुणे आहेत....जास्ती मस्ती करायची नाही ......ते समजले काय.....राज

हो.... चल ना आता खाली....पटपट पूजा झाली की जाऊ आपण....नंदिनी....आणि नंदिनी पुढे जायला निघाली....

नंदिनी...तो टेडी ठेव इथेच.....राज

नाही...मला सोबत न्यायचा....नंदिनी

मन्या इथेच ठेव तो..,नाहीतर आजिसहेब रागावतील आपल्याला .......नंतर आली की परत खेळ....राज

नांनदिनी ने टेडी तिथेच ठेवला.....राज ने नंदिनी चा हाथ आपल्या हातात पकडला आणि तो बाहेर आला ....पायऱ्यांवरून नंदिनी सोबत उतरत होता.....सगळ्यांचे लक्ष त्या दोघांकडे गेले....सगळे त्यांना बघतच होते....

वाह.....खूप सुंदर आहे ग निती तुझी सूनबाई..,एक बाई बोलली.

अगदी जोडात जोड आहे ......

लक्ष्मीनारायण चा जोडा शोभतो अगदी.....तिथे आलेल्या पहुण्यांपैकी काही बायका आई आजी ला बोलत होत्या..

राज नंदिनी सगळ्यांजवळ आले....

काकी ..आई नंदिनी ची बसलेल्या बायकांसोबत ओळख करून देत होती....नंदिनी सुद्धा राज ने सांगितल्याप्रमाणे हाथ जोडून स्मायल करत नमस्कार करत होती....राज सुद्धा सगळ्यांना नमस्कार करत होता ..

खूप गोड दिसतेय ग.......खूप छान तयारी केली....एक बाई तिच्या गालाला हाथ लावत बोलली

हो.......राज ने करून दिली सगळी तयारी......हे बघा लीपिस्तिक पण लवालय.......नंदिनी आपल्या ओठांकडे बोट करत बोलली......राज ने डोक्यावर हात मारून घेतला....नी लाजून च मान वळवली.....त्याला बघून बाकीच्या बायकांना गालात हसू आले ....पण काहींना तीच बोलणं विचित्र वाटले

आजिसहेबांना तिच्या बोलण्याचा राग आला.... सगळ्यांसमोर इज्जतीचा वाटोळं नाही झाल म्हणजे मिळवले....विचार करतच डोळ्यांनी नीतीला खुणावले....

त...ते मी कामात होते ना...तर राज ने तिला साडीच्या मिऱ्या वैगरे थोड ठीक करून दिले.....म्हणून ती गंमत करतेय म्हणत निती ने  वेळ सांभाळून नेली..

महाराजांनी पूजा सुरू केली ... राज नंदिनी पुणेकर बसले ....पूजा चान सुरू होती... नंदिनी ची मात्र चुळबुळ सुरु होती....

राज.......नंदिनी

ह्म्म.....राज

पूजा कधी संपेल.....नंदिनी

बस अजून थोडा वेळ.....राज
.
.
.

राज......नंदिनी

काय......राज

दुकान उघडले काय आता......नंदिनी

नाही.......वेळ आहे भरपूर .....राज

नंदिनी शांत बस पूजा करतोय ना आपण.....राज

ह्म्म....नंदिनी थोड्या वेळ शांत बसते नी आजुबाजूच निरीक्षण करत होती. ..

राज.......नंदिनी

ह्म्म......राज

हे सगळे लोकं कधी जातील.......नंदिनी

जेवण झाले की...राज

सगळे माझ्याकडेच का बघत आहेत......नंदिनी

तू छान दिसतेय म्हणून....राज

खरंच......नंदिनी

हो....राज

राज.....नंदिनी

बोल......राज

मला भूक लागली......नंदिनी

झालीच आहे पूजा.....नंतर जेऊच आपण.....राज

ठीक आहे ......नंदिनी लहानसे तोंड करत बोलली

समोर एक पेढ्यांचा बॉक्स ठेवला होता...... आता तिचं लक्ष पेढ्यांवर केंद्रित झालं होतं...

सूनबाई आरतीचे ताट घ्या हातात......महाराज

नंदिनीच्या काही लक्षात आले नाही

नंदिनी ताट पकड ते .....आई

नंदिनी ने आरतीचे ताट हातात घेतले ...... उठतांना तिचा साडी मुळे थोडा बॅलन्स गेला आणि ते ताट पडणारच होते....

सुनबाई......... आजिसहेब थोड्या कडाक आवाजात बोलल्या......

आई तिच्याजवळ जाणारच होती की..... मागून येऊन राजने तिच्या दोन्ही साईड ने हाथ घालून आरतीचे ताट पकडून सांभाळून घेतले  घेतलं...

आजी साहेबांच्या आवाजाने नंदिनी चांगलीच दचकली.....नी घाबरली सुद्धा ... तिचा हात थरथर कापत होता.... पण राजने  मागून येऊन तिला आणि आरतीच्या ताटाला.... दोघांनाही सांभाळलं होतं..... राज आता एकदम तिच्याजवळ होता.......... राज जवळ आल्यामुळे तिला आता थोडं बरं वाटत होतं....... तिने मान वळवुन राजकडे बघितलं..... त्याने तिला छोटीशी स्माईल दिली...... मग तिला पण थोडं हायसं वाटलं आणि तिने पण त्याला स्मायल केलं....... आरतीला सुरुवात झाली....... महाराजांनी आणि  बायकांनी मिळून तालासुरात पाच आरत्या म्हटल्या...... वातावरण एकदम प्रसन्न वाटत होते..........

प्रसादाचा नैवेद्य दाखवला..

सुनबाई सगळ्यांना प्रसाद वाटा.......महाराज

मी हा पेढ्यांचा वाटते....... म्हणत तिने पेढ्याचा बॉक्स हातात उचलला..... तिने त्यातून एक पेढा हातात घेऊन तोंडाजवळ नेतच होती की राजने  तिचा हात पकडला..... आणि डोळ्यांनी तिला नाही म्हणून सांगितले....

आधी सगळ्यांना द्यायचा मग आपण खायचा......राज

मग संपून जाईल ना....... मी काय खाऊ मग....नंदिनी

नाही संपत... खूप आहेत...... प्रसाद सगळ्यांना दिल्यावरच आपण घ्यायचा असतो.....राज

नंदिनीचा हिरमोड झाला तिने म्हणून मान हलवली....

नंतर उरलेला सगळा प्रसाद मी घेऊ शकते काय.......नंदिनी

हो हो.... चल आता सगळ्यांना प्रसाद देऊन येऊ या...... त्याने  सत्यनारायणाचा प्रसाद आणि तीर्थ वाटायला हातात घेतले आणि दोघेही सगळ्यांना प्रसाद वाटत होते...

नंदिनी तिथे आलेल्या काही लहान मुलांसोबत एका कॉर्नर मध्ये जाऊन बसली आणि खेळत होती ....

राज ला काही फोन आला म्हणून तर बाहेर एका साईडला बोलायला गेला...

सगळ्यांची निरीक्षण सुरू होतं......

काय ग निती... नवीन सूनबाई ला लहान मुलं फारच आवडतात वाटते....... बालिश आहे नाही थोडी......

अं.... हो तिला लहान मुलं फार आवडतात....निती

हो पण  येथे एवढे सगळे मोठे लोक आले असताना इथे भेटायचं सोडून ती तिकडे जाऊन बसली.... बरं नाही दिसत अस.......

असू द्या हो चालायचं .....इथे इतके सगळे नवीन लोक बघून ती गोंधळली असेल.... म्हणून मुलांमध्ये जाऊन बसली.....निती

इकडे जेवायची.... वाढायची घाई सुरू होती...

मुलांच्या खेळण्यांमध्ये काहीतरी गोंधळ झाला आणि त्याचे रूपांतर आता भांडणात झाले होते......एका लहान मुलाने नंदिनीला काहीतरी म्हटलं आणि त्याला मारायला म्हणून त्याच्या मागे धावत होती असे ते दोघे मिळून हॉलभर धावत सुटले.......

नंदिनीला तसं बघून आजीचा पारा आता चांगलाच चढला होता..... सुनबाई कप्पा काय करत बसल्या.... थोडा तिकडे सुद्धा बघा लक्ष असू द्या.....आजिसहेब

तेवढ्यात धावता-धावता नंदिनी चा धक्का वरण नेत असलेल्या बाईला लागला..... तिच्या हातातलं वरणाचा पातेलं खाली पडलं....... आणि त्यातलं थोडं वरण बाजूला बसलेल्या एका पाहुण्या बाईच्या अंगावर उडाल.....

कोणी कामावर ठेवलं तुम्हाला येथे बघून करता येत नाही काय......ती बाई मेड वर ओरडली.... मेड मान खाली घालुन उभी होती..... आणि त्या बाईच्या तोंडाचा पट्टा सुरू होता

काय हो आई साहेब या अशा कोणत्या बायका तुम्ही कामावर ठेवल्या..,.

सुनबाई आपल्या सुनबाईला आवरा थोडं...... आणि काय ग तुला नीट काम करता येत नाही का आजूबाजूला बघून चालता येत नाही का....... आजी कडाडल्या.

आता सगळ्या बायकांचा लक्ष नंदिनी वर गेले....... आणि त्या कुजबुज करत हसायला लागल्या...... धावल्यामुळे नंदिनीच्या  साडीची मिऱ्या निघाल्या होत्या आणि तिची साडी बऱ्यापैकी सुटली होती.... नंदिनी ला  मात्र काहीच माहिती नव्हतं ती तशीच उभी राहून बोलत होती...

काही म्हणा आईसाहेब पण तुम्ही सूनबाई मात्र एकदम भारीच आणल्या.... आता लहान मुलांची घरात तुम्हाला कमतरता भासणार नाही.......

हो ना  माझ्या मुलीचे स्थळ मी यांच्या श्रीराज साठी सुचवलं होतं तेव्हा नाही बोलल्या..... म्हणाल्या होत्या की श्रीराज इतका टॉप चा बिजनेस मन आहे..... स्मार्ट आहे..... आम्हाला अशी तशी मुलगी नको....संस्कारी.... मोठ्या घरची शिकलेली मुलगी हवी.... आणि काय काय...... पहिली तुमची चॉईस आता आम्हाला........ खूप हुंडा दिला असेल नाही त्यांनी म्हणून तुम्ही  तिच्या सारख्या मुलीला आपली सून बनवून घेतली......

अक्कल तर दिसतच नाही आहे...... ना कपड्यांची सुधबुढ... मोठ्या लोकांमध्ये कसं वावरायचं... ते सुद्धा कळत नाही आहे..... वरून तोंड वर करून बोलते पण आहे........ खूप संस्कारी  दिसत आहे.....एक बाई

त्या मेड ला अस रगवतांना बघून नंदिनीला फार वाईट वाटत होतं...

त्या काकींना नका रागावू...... मी धावत होते इथे..... माझा धक्का लागला त्यांना म्हणून ते वरण खाली सांडलं......नंदिनी केविलवाणे तोंड करत बोलली....

नंदिनी साडी आवर आधी.........तुला कळत नाही का इथे मोठ्या लोकांमध्ये असं बोलायचं नसते.........तुला शोभते का असे लहान मुलांमध्ये खेळायला...... हेच शिकवले का तुझ्या आजी आबांनी....... आजी साहेब जरा जोरातच चिडत  बोलत होत्या.....

माझ्या आजी आबा ना  काही नका म्हणू..... ते खूप चांगले आहे......नंदिनी रडक्या सुरत बोलत होती

आई नंदिनी जवळ जात होती तर आजी गरजल्या.... थांबा सुनबाई...... या अशा पोरीला तुम्हीच सून बनवून आणले....तुमच्याच पाठिंबा होता म्हणून हे असं सगळं घडून राहिलं आहे आज ...आमच्या इज्जतीचा  वाटोळं  करत आहेत.... तिला या साध्याशा गोष्टी कळत नाही घर काय सांभाळणार..

नंदिनी ला आता रडायला येत होते .....आजी तिला खूप रागवत होत्या आणि बाकीच्या बाया सुद्धा काही काही बोलत होत्या ..... नंदिनी आता बरीच जोराने रडायला लागली होती....

काहीतरी गोंधळ सुरू दिसतोय... म्हणून राज घरात आला...... तर त्याला नंदिनी रडतांना दीसली.. आणि सगळ्यांचे बोलणे ऐकू येत होते..... नंदिनीला सगळ्यांचं बोलणं फार टोचत होतं.....

नंदिनीला रडताना बघून राजचे मन कळवलं आणि तो लगेच तिच्या जवळ येऊन उभा राहिला....

राज मी मुद्दाम नाही सांडलं..... चुकून झालं..... माझे आजी आजोबा चांगले आहेत..... नंदिनी रडत रडत बोलत होती........ ती आता हुंदके देत होती..... राजने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःजवळ आपल्या कुशीत घेतलं...... आणि तिच्या डोक्यावर थोपटत तिला शांत करत होता.....

इतका हुशार स्मार्ट तू......काय राज तुला पागल आवडली... आम्ही इतक्या चांगल्या मुली सांगितल्या तर तू स्पष्ट नकार देत होता याच मुलीसाठी काय जिला कवडी ची अक्कल नाही आहे......

या सगळ्या बायकांच्या बोलण्याने राजला  खूप राग येत होता....

बस.......... तुम्ही जिच्याबद्दल बोलत आहात ती माझी बायको आहे .....    मिसेस नंदिनी श्रीराज देशमुख.... आणि मी तिच्या बद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही....तुम्हाला कळत आहे काय तुमच्या बोलण्यामुळे तिला किती वाईट वाटत आहे..... तिच्या मनावर किती आघात होत आहेत..........राज

तू एका पागल मुलीसाठी आम्हा सगळ्यांचा अपमान करत आहेस... म्हणूनच तुम्ही अस लपून-छपून लग्न केले... लाज वाटते ना तिच्यासोबत असो सगळ्यांसमोर जायला..... नाहीतर बोलावलं असतं लग्नाला

बघा श्रीराज तुमच्यामुळे आम्हाला किती लोकांची बोलणी ऐकावी लागत आहे.....आजिसहेब

हे बघा मला तुमचा कुणाचाच अपमान करायचा नव्हता रादर मी तुमचा कुणाचा अपमान करत सुद्धा नाही आहो.... मला एवढेच बोलायचं आहे की तुमच्या कडू बोलण्याने तिच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो...... आणि मला काहीही लाज वाटत नाही आहे तिला माझी बायको म्हणून सांगायला...... काल मी मीडियासमोर सुद्धा तिला घेऊन आलो होतो...... माझं तिच्यावर खूप प्रेम आहे... ती माझी लाईफ लाईन आहे..... आणि हो मला ती जशी आहे तशी आवडते......

सगळे अवाक होतो त्याच्या बोलण्याकडे बघत होते.....

आणि हो ती पागल नाही आहे...... तिचा एक्सीडेंट झाला होता त्यामुळे तिचा थोडा मेमरी लॉस झाला आहे......लहानपणापासून मी तिच्यावर प्रेम करतो आणि आता सुद्धा मी तेवढेच प्रेम करतो...... आणि सगळ्यांसमोर माझं प्रेम स्वीकारायला मला काहीच लाज वाटत नाही.....
आयI थिंक तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटली आहेत......तुम्ही इथे सगळे आला आहात ......तुम्ही सगळे आमच्यापेक्षा मोठे आहात .....आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या आणि कृपा करून प्रसाद ग्रहण करा....आणि मी जर जास्ती काही बोललो असेल तर कृपा करून मला माफ करा........ तो सगळ्यांसमोर जोडत  खूप नम्रपणे बोलला.... नंदिनी मात्र त्याला बिलगून रडत होती...

साडी सुटल्यामुळे तिला नीट चालता येत नव्हतं.... ती साडी पकडून कशीबशी उभी हुंदके देत रडत होती..... राजने तिला तिच्या दोन्ही हातांवर त्याच्या मिठीत उचलून घेतले आणि तिला वरती आपल्या रूम मध्ये घेऊन गेला.....

काही लोकांना तो मूर्ख वाटत होता की त्याने त्याच्या आयुष्य खराब करून घेतल आहे....... पण काही बायकांना मात्र त्याचा अभिमान वाटला...... त्याने परिस्थितीशी आपले हात मिळवले होते..... आणि निडर पणे त्याला सामोरा जात होता...... तो पळपुटा नव्हता.... त्याच प्रेम त्याच्या डोळ्यात त्यांना दिसत होतं....

हे सगळ बघून आईच्या डोळ्यात पाणी आले होते....... पण तिला स्वतःच्या मुलाचा खूप स्वाभिमान वाटत होता..... आपण त्याला चांगल्या गोष्टींची शिकवण दिली त्याचा अभिमान वाटत होता....

*****
मेरे यारा तेरे गम अगर पाएँगे
हमें तेरी है कसम, हम संवर जाएँगे

तेरे काँधे से ही लग के यारा बीती उम्र सारी
सोचो कैसी होगी किस्मत हुआ यूँ तो फिर हमारी
सारे आँसू तो हो तेरे और आँखें हो हमारी
तेरे दर्द हमें जो मिले प्यार में
तेरे दर्द हमें जो मिले प्यार में
हम खुशी से यूँ भर जाएँगे
हम मर जाएँगे हो ओ..
हम मर जाएँगे
मेरे यारा तेरे गम अगर पाएँगे हमें तेरी है कसम,
हम संवर जाएँगे

चाहे दुःख हो,
चाहे सुख हो
दिल ने तुझको ही पुकारा
तुने हमको है बनाया
तुने हमको है संवारा
जहां को तो रब का है हमें तेरा है सहारा
बस तेरा साथ हो
चाहे जो बात हो
बस तेरा साथ हो
चाहे जो बात हो
तेरे कहने से कर जाएँगे
हम मर जाएँगे हो ओ..
हम मर जाएँगे हाँ..
मेरे यारा तेरे गम अगर पाएँगे
हमें तेरी है कसम, हम संवर जाएँगे मेरे यारा तेरे गम अगर पाएँगे हमें तेरी है कसम, हम संवर जाएँगे

*******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️