Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 20

Read Later
नंदिनी...श्वास माझा 20
 

भाग 20
 

नंदिनी चल आवर पटकन..... खूप थकलोय... आणि उद्या पूजा पण आहे ना.... लवकर उठायचा आपल्याला.... चल कपडे बदल पटकन..... श्रीराज बेडवर बसत बोलला

हो पण माझे कपडे दे ना...... मी काय घालू.... नंदिनी आरशासमोर साडी सोबत खेळत बोलत होती.....

हो देतो थांब.....म्हणत राज नंदिनी ची बॅग मध्ये कपडे चेक करायला गेला.....

अरे यात सगळ्या साड्या आहेत...... बाकी नेहमीचे तुझे कपडे कुठे गेले...... बॅगमध्ये कपडे शोधत राज बोलला

पाठवणीच्या नंदिनी ने केलेल्या गडबडीत आजी तिचे साधे नॉर्मल कपडे ची बॅग द्यायची विसरली होती.....

मी काय घालू आता.....मला या टाईट कपड्यांमध्ये नाही आवडत आहे ....खूपच कचकच होत आहे..... मला माझे कपडे पाहिजे..... नंदिनी बॅग जवळ येत बॅगमध्ये कपडे शोधत कुरकुर करत बोलली

अग कुरकुर नको करू थांब शोधूया आपण..... त्याने असलेल्या सगळ्या बॅग शोधल्या पण त्यात नंदिनी चे कपडे सापडले नाही.....

आपण घरीच विसरलो बहुतेक बॅग..... तू आता हेच कपडे घालून झोप... श्रीराज

नाही.. मला माझे कपडे पाहिजे.... नंदिनी हट्ट करत बसली

अग पण सोन्या नाही आहेत ना कुठून आणू आता रात्र पण खूप झाली आहे..... राज

मला माझे कपडे पाहिजे...... म्हणत नंदीने भोंगा पसरला

श...शू sss.... रडू नको..... आवाजाने सगळे उठतील ना....... मला रागवतील ना सगळे........,.ये बाई प्लीज रडू नको आता..... आपण काहीतरी करू या..... राज

मला हे कपडे घालून नाही झोपायचं मला दुसरे कपडे पाहिजे.... नंदिनी शांत होत रडक्या आवाजात बोलली

थांब मला विचार करु दे..... राज आणि काहीतरी विचार करत त्याला काहीतरी आठवलं..,... आणि त्याने त्याच्या कपाटातून त्याचा एक कॉटनचा शर्ट काढला..... हे बघ हे घाल हा खूप मोकळा मोकळा वाटेल तुला..... तिच्याजवळ शर्ट आणत तो बोलला.....

ई.....हा....ब्राऊन कलर नाही आवडत मला..... मला नाही आवडला तो...... नंदिनी कुरकुर करत बोलली

बरं मग कुठला कलर आवडतो तुला...... राज

मला गुलाबी कलर पाहिजे...... नंदिनी

राजने डोक्यावर हात मारून घेतला आता गुलाबी कलर कुठून आणू....

ये नंदिनी माझ्याकडे गुलाबी रंगाचा काही नाही आहे .....प्लीज दुसरा रंग सांग ना.... राज

तूच बोलला ना माझा आवडता रंग कुठला आहे.... मग आता मला गुलाबी रंगाचा ड्रेस पाहिजे..... नंदिनी हट्ट करत बोलली

आपण एक काम करूया का उद्या आपण मस्तपैकी दुकानात जाऊया आणि तुला आवडतील त्या रंगाचे तसे संख्या ड्रेस घेऊया...... पण आता यातलं कुठलातरी कलर घालून घे बरं...... आता बघ किती रात्र झाली आहे.... मग सकाळी पण लवकर उठाव लागेल आपल्याला ...आता हट्ट नको करु..... राज

खरंच उद्या तु मला दुकानांमध्ये घेऊन जाशील.... मला पाहिजे ते घेऊन देशील....... नंदिनी आनंदाने बोलली

हो तुला हवं ते सगळं घेऊ आपण.... पण  आता यातून जे आवडते ते प्लिज घालून घे... राज

मला खेळणी सुद्धा घेऊन देशील..... मला ना बाहुली पाहिजे..... आणि खेळ भांडे..... आणि नाते सापसीडी लुडो चा गेम..... आणि........ ती विचार करत बसली

हो हो तुला हवेत तितकी खेळणी घेऊ आपण..... आता लवकर लवकर कर ....तिथे विचार करत नको बसू.... राज

ठीक आहे.... म्हणत ती त्याच्या कपाटातून शर्ट शोधत बसली...... इ...... एक पण नाही आवडला मला... नंदिनी

थांब मी देतो तुला माझ्या आवडीचा कळेल म्हणून त्याने एक व्हाईट कलरचा कॉटन शर्ट कपाटातून बाहेर काढला आणि तिला दिला......

खूपच बोर आवड आहे तुझी..... नंदिनी तिचे तोंड वेडंवाकडं करत बोलली

मन्या प्लीज घालून घे ना बाळा आता हा..... बघ ना किती रात्र झाली आहे .....आपण दिवसभर किती थकलो मला खूप झोप येते आहे.... सकाळी पण लवकर उठायचं आहे.... सकाळी लवकर नाही उठलं तर आई आपल्याला र रागवेल हा......आणि उद्या तुला खेळणी घ्यायला पण जायचंय ना दुकानांमध्ये मग चल आता पटापट करून घे.... राज

खेळण्यांचे नाव ऐकून नंदिनी ने तो शर्ट घेतला...... हे बटन काढून दे निघतच नाही आहे..... राजने तिला शर्टाच्या बटन काढून दिल्या..... घे आता हा आणि जा बाथरूममधून घालून ये...... राज

नाही मी बाथरूम मध्ये नाही जाणार मला भीती वाटते...... मी पडली तर ......माझा पाय घसरला तर.... आणि मला नाही घालता आला तर..... मला मदत लागली तर....... नंदिनी

पुरे पुरे बरं बाबा इथेच घाल...... राजने रूमचा दरवाजा बंद केला...... आणि बेडवर जाऊन डोळे बंद करून बसला.......

नंदिनी आरशासमोर जाऊन शर्ट घालत होती......

ई......... किती ढिला आहे हा....... याच्या बाह्य कशा आहे माझ्या हात पण लपले यामध्ये...... मी बुजगावण यासारखे दिसत आहे...... ते तिकडे शेतामध्ये असते ना तसेच दिसत आहे....... शी बाप्पा मला नाही आवडलं हे.... किती छोटा आहे हा....... माझे सगळे पाय दिसत आहेत.......याच्या बटन नाही लागत आहे..... बटन लावायचा प्रयत्न करत...... कुरकुर करत ती राज जवळ आली

ये राज....तू झोपला काय.... बघ ना हे बटन्स लागत नाही आहे...... त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली

त्याने डोळे उघडले बघतो तर काय नंदिनी बटन लावत उभे होते.... तिच्या एकही बटण नीट लागले नव्हत्या कसंतरी खालच्या दोन बटना तिने लावल्या होत्या आणि बाकीचे बटन लावायचा प्रयत्न सुरू होता आणि तोंडांनी कुरकुर बडबड सुरू होती.....

राज आवासुन तिच्याकडे बघत होता...... कमालीची सुंदर ती दिसत होती त्या शर्ट मध्ये..... तिचे मोकळे लांब केस अर्धे मागे अर्धे दोन्ही खांद्यावर वरून पुढे आलेले..... आणि निरागसपणे बटण लावायचा तिचा चाललेला प्रयत्न त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे सतत बदलणारे एक्सप्रेशन्स....... राज तिच्या त्या रूपाने घायाळ झाला होता..... एकटक तिच्याकडे बघत होता.......

राज....ये राज... नंदिनी त्याला हाताने खांद्याला हलवत बोलत होती....... तिच्या स्पर्शाने तो भानावर आला..

ह......काय झालं.....राज

हे बघ नाही लागत नाही आहे ....आणि या बाह्य बघ ना...... आणि तू डोळे बंद करून का बर बसला होता तुला झोप आली आहे का....... म्हणत त्याच्या अगदी जवळ गेली..

तिच्या जवळ आल्याने राजाच्या रूदयाची धडधड खूप वाढली....

काही नाही ते असंच..... तू कपडे बदलत होती ना म्हणून मी डोळे बंद केले होते..... ये मी लावून देतो बटन..... राज

राज तिच्या शर्टची बटनं लावायला गेला...... तिच्या शरीराच्या होणाऱ्या स्पर्शाने त्याचे हात थरथर कापत होते....... त्याने कशाबशा सगळ्या बटन्स लावल्या आणि एक मोठा श्वास सोडला .....

या बाह्य माझा सगळा हात लपला त्यामध्ये..... ते दोन्ही हात बाजूला करत त्याला दाखवत बोलली

त्याने तिला त्याच्या बाजूला बसवले आणि तिच्या बाह्य वरती कोपरापर्यंत फोल्ड करून दिल्या..... आता ठीक आहे.... राज तिच्याकडे बघत बोलला

हो पण हे छान नाही दिसत आहे मला नाही आवडलं.... नंदिनी

हो आजच्या रात्रीपुरते.... आणि इकडे असेच कपडे घालतात मुली ....छान दिसतेस तू खूप सुंदर दिसते आहेस......... उद्या आपण नवीन घेऊया चल झोप आता इथे..... तिच्या हाताला धरून तिला बेडवर झोपत... राज

ती बेडवर जाऊन झोपली..... त्याने तिला पांघरून ओढून दिले..... तिच्या कपाळावरून केसांवरून हात फिरवत होता....

राज झोप नाही येत आहे.... गोष्ट सांग ना........ नंदिनी

मन्या मला गोष्ट नाही येत....मी ना उद्या खूप सार्‍या गोष्टींची पुस्तके वाचून ठेवतो मग मी उद्या तुला गोष्ट सांगतो..... तिच्या डोक्यावर हात फिरवत तो बोलला

ठीक आहे मी सांगू तुला गोष्ट.... मला खूप सार्‍या गोष्टी येतात आबांनी मला खूप गोष्टी सांगितले आहे..... नंदिनी एक्साईटेड होत बोलली

चिमणी झोप ना आता..... तू डोळे बंद कर येईल तुला झोप...... राज

नाही मी फक्त एक गोष्ट सांगते.... मग मी झोपते... नंदिनी

ह्म्म...... राज

आणि नंदिनी कुठलेतरी वाघाचे बंदराची गोष्ट सांगायला सुरुवात केली.....

राज ह्म्म हमम करत ऐकत होता आणि त्याचा डोळा लागला...... आणि त्यांनी त्याची कुस बदलली... आजच्या दिवसभराच्या गडबडीने तो खूप थकला होता शरीराने.. डोक्याने आणि मनानेसुद्धा त्याला लगेच झोप लागली

राजच्या शरीरावर शहारे येत होते...... त्याच्या पाठीवर नाजूक बोटे फिरत होती..... तो खाडकन जागा होत उठून बसला... आणि नंदिनी कडे बघितलं

अग काय करत आहेस तू....... राज

नंदिनी त्याच्या पाठीवर आपल्या बोटांनी काहीतरी नक्षी काढत होती....

मला भीती वाटत आहे .....तू झोपून गेला ....तुला आवाज दिला पण तू उठत नव्हता.... नंदिनी

पण हे असं काय करत होती.... मला गुदगुल्या होत होत्या ना...... राज

मग तू उठत नव्हता ना..... आजी पण उठत नसले की मग मी तिच्या पाठीवर अशी करते .....मग ती लवकर उठते...... तू तिकडे का बरं तोंड करून झोपला...... मला खूप भीती वाटते...... तू बोलला होता ना मला कुशीत घेऊन झोपशील....... आजी पण बोलली होती आणि तू एकटाच झोपून गेला....... नंदिनी रडक्या सुरात बोलत होती....

अच्छा अस आहे का...... मला लक्षात नाही राहिले.... सॉरी..... थांब मी आलोच.... उठून तो बालकणी मध्ये गेला......

नंदिनी तू अशी जवळ असली की मी कसं कंट्रोल करू स्वतःला..... नंदिनी लवकर बरी हो ..... नाही राहु शकत तुझ्याशिवाय....... अपूर्ण  आहो मी तुझ्याशिवाय....... त्याने मोकळ्या हवेत मोठा श्वास घेतला आणि आपल्या भावनांवर कंट्रोल करत आत मध्ये नंदिनी जवळ येऊन बसला.....

ये माझ्याजवळ..... त्याने हात पसरून तिला स्वतः जवळ घेतले...... त्याच्या छातीजवळ डोकं ठेवत ती पण त्याला घट्ट बिलगली.........राज तिच्या डोक्यावरून केसांमधून हात फिरवत तिला डोक्यावर थोपटत होता..... तिने पण त्याच्या शर्टात डोकं खुपसून त्याला छातीवरून घट्ट पकडून झोपी गेली......राज  पन तिला जवळ मिठीत घेतले..... राज चा पण तिला थोपटत थोपटत डोळा लागला.......बऱ्याच दिवसांनी त्याला शांत झोप लागली होती

******

Chaha Hai Tujhko
Chahunga Hardam
Mar Ke Bhi Dil Se
Ye Pyaar Na Hoga Kam

Teri Yaad Jo Aati Hai
Mere Aansoon Behte Hain
Apna To Milan Hoga
Pal Pal Yeh Kehte Hain
Kya Yeh Zindgani Hai
Bas Teri Kahani Hai
Bas Teri Kahani Hai
Ye Jo Zindgani Hai
Chaha Hai Tujhko
Chahunga Hardam
Mar Ke Bhi Dil Se
Ye Pyaar Na Hoga Kam...

Toot Jayee Na Lamha, Aitbaar Ka
De Koi Silaa, Mere Intezaar Ka
Teri Hoon Teri
Jo Chahe Kasam Le Le
Mujhko Humrahi
Tu Apne Gham De De
Rastey Mein Koi Hai
Manzilein Meri
Mere Saath Jayengi
Mukshkilein Meri

Chaha Hai Tujhko
Chahunga Hardam
Mar Ke Bhi Dil Se
Ye Pyaar Na Hoga Kam
Tu Saamne Hai Mairey
Phir Kyoon Ye Doori Hai
Tujhe Kaise Bataoon Main
Hai, Kya Majboori Hai
Yeh Bhi Koi Jeena Hai
Sirf Aansoon Peena Hai
Sirf Aansoon Peena Hai
Yeh Bhi Koi Jeena Hai

Chaha Hai Tujhko
Chahunga Hardam
Mar Ke Bhi Dil Se
Ye Pyaar Na Hoga Kam.

******

सकाळी डोअर नॉक चा आवाजाने राज चे  डोळे उघडले..... उठून तो दरवाजा उघडला..... आई तू इतक्या लवकर...... राज म्हणत त्याने मागे बघितलं...

आई एक मिनिट म्हणत त्याने डोअर पुन्हा बंद करून घेतले....

नंदिनी अंगावरचे सगळे पांघरूण काढून फेकले होते..... ती तशीच पालखी एक पाय जवळ घेऊन एक पाय लांब करून झोपली होती...... केस पाठीवर उडत होते......  तिचे लांब गोरे सडपातळ पाय त्याचं लक्ष वेधून घेत होते.....झोपेत तिचा निरागस रूप खूपच मोहक दिसत होतं..... तो तिला बघण्यात गुंग झाला...... आता ते आपल्या जवळ आहे याच विचाराने तो  आनंदित झाला.... देवा अशीच गोड सकाळ असू दे रोज..... त्याच्याच विचाराने त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले.... इकडे आई दरवाजा नॉक करत होती...... दरवाजा ठोकण्याची आवाजाने तो भानावर आला.... त्याने लगेच तिच्या अंगावर पांघरून नीट केले..... आणि हसतच दार उघडलं...

काय रे काय झालं होतं असा अचानक परत दरवाजा बंद केला तू....... त्याच्याकडे बघत नाही बोलली तर आईला त्याचा चेहरा खूप आनंद वाटला.....

असाच रोज खुश रहा त्याच्या डोक्यावर हात फिरवत आहे आत मध्ये झोपलेल्या नंदिनी कडे बघत बोलली.....

आई काही काम होतं...... राज

अरे तुम्हाला उठायला च आले  होते..... आज पूजा आहे लक्षात आहे ना तुझ्या...... हे घे नंदिनी साठी कपडे आणि दागिने...... आई त्याच्या हातात बॉक्स देत बोलली....

आई साडी कशाला गं...... बघ ना किती भारी आहे ही.... तिला नाही सांभाळल्या जात... श्रीराज त्या बॉक्स कडे  बघत बोलला..

अरे आजोसहेबांनी  दिलं.... मी तरी काय करू.... आंघोळ झाली की सांग मला मी येते तिला घालून द्यायला..... चल उठव तिलापण..... आई निघून गेली

राज ने दरवाजा बंद करून घेतला.... फ्रेश व्हायला निघून गेला..... त्याची आंघोळ वगैरे सगळं आटोपल्यावर त्याने नंदिनीला उठवले......

गुड मॉर्निंग सोन्या..... चला उठा आता...... राज तुझ्या कपाळावर किस करत बोलला

नंदिनी आळस देत उठून बसली...... राजने तिला आंघोळीला पाठवले आणि आईला आवाज दिला....

नंदिनी बाथरूम मधून बाहेर आली...... ब्लाउज तिला घालता आला होतं पण पेटिकोट चा नाडा तिला काही बांधता येत नव्हता..... राज हे बांधता येत नाही आहे म्हणते राज जवळ गेली.... राज डोळे बंद करून बसला होता

ह्म्म.... ये इकडे बांधून देतो...... त्याने पेटीकोट चा नाडा...नीट बांधून दिला... तेवढ्यात आई आली नंदिनीला तयार करून द्यायला....

अरे वा झाले का आमच्या नंदिनी राणीची आंघोळ....आई

ये आई बघ तिला... मी बाहेर जातो.... तो बाहेर उठून गेला

आईने तिला नीट साडी चोपून  नेसवली.. फक्त पदर लावायचा राहिला होता...... तेवढ्यात आजीने आईला आवाज दिला.....निती बघ पाहुणे आलेत खाली चल....

हो आलेच...... नंदिनी ची साडी नीट करून येते... आई

ते तीच ती बघेल तू खाली ये .....पाहुणे जमायला लागले आहेत बरं दिसत नाही ते..... आजीने हुकूम सोडला

आई हे पाहुणे वगैरे का बर बोलवलेत.... आपलं घरगुती ठरलं होतं ना सगळं करायचं...... राज डोक्यावर आठ्या पाडतच बोलत आत मध्ये आला..

अरे हो मी पण म्हणले होते पण आजी कुणाचा ऐकते का.....  आईसाहेब म्हणाल्या की चार-पाच जवळची लोक बोलवू...... न्यूज मध्ये सगळे आले आहे त्यामुळे आता सगळ्यांना माहितीच पडलं तर त्यांना वाईट वाटायचं म्हणून आजीने त्यांना प्रसादासाठी बोलावले.....आई

अग पण नंदिनी ची तयारी करून दे ना...राज

तेवढ्यात परत आजीचा आवाज आला...... त्याने लग्न केलाय..... तो बघेल सगळं..... जमत नव्हतं तर का घेऊन आला तिला घरात........ तु खाली ये...

थोडासाच राहिला आहे सांभाळून घे.... म्हणत आई खाली निघून आले

आता कसं करायचं म्हणत तो आत मध्ये जाऊन बसला....

*******

क्रमशः

********

प्रिय वाचक मित्रांनो...

Katha aawadate aahe tya baddal khup khup dhanyawad ????

Kajali ghya ..surakshit raha

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️