Aug 09, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 17

Read Later
नंदिनी...श्वास माझा 17

भाग 17
 

आणि आज तो दिवस होता श्रीराज आणि नंदनी च्या लग्नाचा...... श्रीराज मांडवात उभा होता आणि नंदिनी तिच्या आजीसोबत लाल साडी मध्ये नववधूचा रूपामध्ये मध्ये दारात उभे होती..... श्रीराज तिच्या सोज्वळ लोभस रूपात हरवला होता..... रोहनने त्याच्या खांद्यावर थाप मारली तसा तो भानावर आला......

समोरून नंदिनी आजी सोबत श्री राज उभा होता तेथे आजूबाजूला बघत कधी गालातच खुदकन हसत.... येत होती...... तिला स्वतःला येवढं नटलेलं खूप भारी वाटत होतं.... तिला आनंद सुद्धा होता इतका सगळं नवीन नवीन तिला घालायला भेटले होते...... पण इतक्या सगळ्या दागिन्यांची कपड्यांची तिला सवय नसल्यामुळे थोडं कचकच सुद्धा वाटत होतं..... भटजींनी  अंतरपाट पकडले होते.... नंदिनीला श्रीराज च्या पुढल्या पाटावर उभा केलं.... आणि तिच्या हातात दिला...... पलीकडे श्रीराज सुद्धा हातात हार घेऊन उभा होता...... मंगलाष्टके सुरु झाली......आंतरपाट मुळे नंदिनीला पलीकडे उभा असलेला श्रीराज दिसत नव्हता........नंदिनी अंतरपाट थोडा खाली करून त्याला बघायचा प्रयत्न केला....... तिला श्रीराज दिसला तर तिच्याकडे बघत होता....  तसा तिने हाताने त्याला सुंदर सुंदर दिसतो असं खुणावलं... श्रीराज ला  तिचं वागणं बघून हसू आलं.,... त्याने तिला बघून छानशी स्माईल दिली....  आणि हाताने तिलासुद्धा सुंदर दिसते खुणावलं....... तिचं तसं वागणं बघून आजूबाजूचे सुद्धा थोडे हसू लागले............ तर तिला आजीने डोळे दाखवून दटावले तशी ती थोड्यावेळ शांत उभी राहिली....... मंगलाष्टक संपले आंतरपाट काढला गेला...... सगळे ती त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकत होते ती अक्षदा येणार्‍या दिशेने बघत होती...... नंतर भटजींनी तिला श्रीराज च्या गळ्यात हार घालायला सांगितला........ तो खूप उंच असल्यामुळे तिला हार नीट घालता येईना...... ती उड्या मारत हार घालायचा प्रयत्न करत होती....तिचा तो प्रयत्न बघून श्रीराजला सुद्धा हसू आले.... त्याने हळूच तिच्या समोर मान खाली झुकवली....... त्याने मान खाली झुकवायाच ई आणि तिने परत उडी मारणे एकत्र झालं आणि तिचं डोकं त्याच्या डोक्यावर आपटलं.......

आ..... लागलं न.... राज तुला दिसत नाही का  मी हार घालत होते ना........ती कपाळ चोळत बोलली....

सॉरी नंदिनी.... चुकून झालं..... श्रीराज

खाली मान कर..... ती त्याला तिच्या हाताने हात खाली कर   इशाऱ्याने बोलत होती..

तो हसला त्याने मान खाली केली.... तसं तिने तिचं डोकं परत त्याच्या डोक्यावर आपटलं.....

ये बाई... किती जोरात ...लागलं ना.... तो डोकं चोळत बोलला.... मी सांगितलं होतं ना ते चुकून झालं मग असं का केलं परत..... श्रीराज

ते पिंकी म्हणली होती.. असं जर डोक्याला डोकं आपटलं तर शिंग येत असतात म्हणूनच परत मारायचं असते म्हणजे ते येत नाही.... मला शिंग आले तर मी किती वाईट दिसेल.... मग सगळे मला चिडवतील...... नंदिनी निरागसपणे म्हणाली...... सगळीकडे एकच हशा पिकला.....आजीने डोक्यावर हात मारून घेतला आणि तिला सरळ उभं केलं..... आणि तिला गळ्यात हार घालायला सांगितले.... श्रीराज तसा पुढे येऊन वाकला.. नंदिनी ने त्याच्या गळ्यामध्ये हार घातला..... नंतर श्रीराज ने सुद्धा तिच्या गळ्यामध्ये हार घातला....... नंतर भटजींनी काही मंत्र वाचले आणि मोठ्यांच्या पाया पडायला आशीर्वाद घ्यायला सांगितले........ दोघे  खाली उतरून आजी आबांना नमस्कार करायला गेले त्यानंतर आई-बाबा आजी साहेब मामा-मामी असे सगळ्यांना नमस्कार करत होते..... नंदनी ला आधीच साडी दागिने खूप भारी झाले होतं त्यात आता गळ्यात हार तिला ते सगळं पकडून चालायला वाकायला जमत नव्हतं ..सुचत पण नव्हतं.... एक दोनदा ती अडखळत पडत सुद्धा होती.. तिची चुळबूळ सुरू होती आजीला हार काढते म्हणत होते पण आजी तिला थोड्यावेळ थोड्यावेळ करून निभावून नेत होती......... श्री राजला तिला होणारा त्रास कळला....... त्याने तिला थांबवून तिच्या गळ्यातून हळुवारपणे यतो भारी हार काढून घेतला आणि हातात पकडला..... तिला तेवढेच हायसं वाटलं.... नंतर त्यांनी फक्त घरातल्या लोकांना नमस्कार केला.....

आजी .....मला भूक लागली.... नंदिनी
थोडी पूजा राहिली आहे ती झाली की जेवण करू..... आजी

तु मला सकाळी सुद्धा काहीच खाऊ दिलं नव्हतं किती वेळ लागणार आता या पूजेला मला खूप भूक लागली आहे...... नंदिनी हट्ट करत बोलली

हट्ट नाही करायचा असा.... बस थोड्यावेळ.... आजी

हे बघ आता मला चालायला पण जमत नाहीये..... मला शक्तीच नाही ....मला भूक लागली मला आत्ताच खायचं... नंदिनी हट्ट करत होती.... आईची तिला दटावत होते

पुढच्या विधीला थोडा वेळ होता..... श्रीराज फोनवर बोलून........ आजूबाजूला कोणी नाही आहे बघून श्रीराज नंदिनीला बाजूला असलेल्या रूम मध्ये घेऊन गेला......

राज ....मला खूप भूक लागली आहे ....ही बघ ना आजी काही देतच नाही आहे..... नंदिनी केविलवाण्या स्वरात बोलली... तेवढ्यात रोहन जेवणाची एक प्लेट घेऊन आला..... तिला ते प्लेट बघून खूप आनंद झाला...... रोहनने श्रीराज च्या हातात प्लेट दिली.... श्रीराज ती प्लेट घेऊन नंदिनी जवळ आला...... आणि तिच्या पुढ्यात प्लेट पकडली...

ई........ गुलाब जामून....... जिलेबी.......राज मी हे खाऊ शकते काय....... नंदिनी

हो ......घे...... श्रीराज

तिने लगेच वाटी मधला गुलाबजाम हातात घेतला आणि खाऊ लागली..... पण गुलाबजाम खाताना त्याच्यातला पाक तिच्या अंगावर सांडत होता......

नंदिनी थांब...... म्हणत त्याने तिच्या हातातला गुलाबजाम काढून घेतला.

तू पण काय रे आजी सारखा करतो..... खाऊ दे ना मला खूप भूक लागली आहे..... नंदिनी

अगं हो तुलाच खायचं आहे आणि बघ तुझं कपडे खराब होतात आहे ना.... आजी ला हे दिसलं तर ती परत रागवेल...... म्हणत त्याने बाजूच्या बॉक्स मधला टिशू पेपर काढले आणि आणि तिच्या साडीला क्लीन केले.....

त्याने तिला आपल्या हाताने गुलाबजामचा घास भरवला...

आता पोळी आणि वरण चा घास दे.... नंदिनी

आता जिलेबी.....बोटाने एकएक पदार्थ दाखवत ती त्याला सांगत होती......ती जसजसं सांगत होती  तसतसं तो तिला खाऊ घालत होता...

नंदिनी दिसत नाही म्हणून आजी तिला शोधत येत होती... रूम मध्ये श्रीराज तीला खाऊ घालतांना बघून तिला खूप बरं वाटलं... ती त्यांना तसंच बघून परत चालली गेली....

बस आता भरलं माझं पोट.... नंदिनी पोटाकडे हात दाखवत बोलली.. तो हसला आणि त्याने ताट बाजूला ठेवले आणि हात धुतले नंदिनीचे पण हात धुऊन घेतले...

तू आजो पेक्षा पण छान आहेस..... तू माझं सगळं ऐकतो म्हणत नंदिनी ने त्याच्या गालावर छोटासा किस केला.... तो गालात हसला... तिच्या स्पर्शाने तो मोहरुन गेला होता.... खूप वर्षांनी तिचा असा स्पर्श त्याला झाला होता .....त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते..

बरं चल आता बाहेर जाऊया..... श्रीराज

आल्यापासून दोन-तीन दिवसात आजी च्या मदतीने त्याने नंदिनी सोबत चांगली गट्टी केली होती...... तिला काय आवडते ..... काय हवं नको ते सगळं आजीकडून त्याने समजून घेतलं होतं.... नंदिनीला आबा आजीने रागवले की नंदिनीची साईड घेऊन बोलायचा.... तिचा राग दूर करायचा.... तिच्यासोबत खेळायचं .....असं सगळं तिच्या मनाप्रमाणे वागून त्यांनी तिच्या सोबत छान मैत्री केली होती.... जेणेकरून तिला त्याच्यासोबत कंफटेबल वाटावं.....

हे तु मला नंदू नाही बोलायचं ......माझं नाव नंदिनी आहे मला नंदिनी म्हणायचं नंदू मला आवडत नाही..... नंदिनी नाटकी रागात बोलत होती

का नाही आवडत..... श्रीराज

ते आम्ही खेळत असताना तिथे एका मुलाचं नाव नंदू आहे तो फारच शेंबडा आहे मला तो अजिबात आवडत नाही म्हणून मला नंदू बोलायचं नाही...... नंदिनी

श्री राजाला खुप हसायला आलं... बर ठीक आहे तुला नंदिनीचा बोलेल पण एका अटीवर....

काय..... नंदिनी

तू मला काका नाही म्हणायचं...... आता आपण मित्र झालोत ना ...आता हे असं काका वगैरे मला पण आवडत नाही.... तू मला माझ्या नावाने हाक मारायची..... श्रीराज

पण तू मोठा आहेस ना माझ्यापेक्षा..... मोठ्या लोकांना काकाच बोलत असतात.... नंदिनी

हो पण आता आपण मित्र झालो ना मित्रांमध्ये असं छोटे-मोठे नसतं..... तू तुझ्या मित्रांना नावानेच हाक मारते ना.... मग मला सुद्धा नावानेच हाक मारायची.... श्रीराज

श.....शर...... ए मला नाही म्हणतायेत ...खूपच कठीण नाव आहे तुझं ......नंदिनी

श्रीराज ला हसायला आलं...... त्याला जुन्या गोष्टी आठवल्या जेव्हा तो पहिल्यांदा नंदिनीला भेटला होता तेव्हा सुद्धा तिला श्रीराज नाव बोलता यायचं नाही तेव्हा तिने त्याला शरू नाव दिले होते

तू मला शरू (जुन्या आठवणींची जबरदस्ती आठवण करून देऊ नको असा डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि शरीर तिच्या खूप क्लोज होतं शरू नावामुळे तिला काहीतरी वेगळे फिलींग व्हायचं असा आबांनी त्याला सांगितलं होतं).............. अं..... तू मला राज म्हणून बघ राज सोपि आहे म्हणता येतं.... श्रीराज

हा ठीक आहे...... मी तुला राज बोलेल..... नांदणी हसत बोलली..

श्रीराज नंदिनी ला घेऊन बाहेर आला.....
भटजींनी  पुढल्या विधी ची सगळी तयारी करून ठेवली होती... श्री राज्य आजी बाबा काका काकी कोणालाच लग्नामध्ये इंटरेस्ट नव्हता ते लोक दुर एका ठिकाणी बसून सगळं बघत होते फक्त त्याची आई त्याच्या जवळ होती...

सप्तपदी साठी ती दोघं पाटावर जाऊन बसली..... समोर होम-हवन सुरू होते....कंटिन्यू एका जागेवर इतका वर बसायची नंदिनीला सवय नव्हती तिची सारखी चुळबूळ सुरू होती...... कधी दागिन्यान सोबत खेळ खेळ कधी साडीच्या पदरात सोबत..... कधी मान हलवून हलणाऱ्या मुंडावळ्या गालावर येताना बघून तिला हसू यायचं.... आता ती एकटक एका डोळ्याने स्वतःच्या नाकात दिसणारी नथ बघत होती.... सतत तिच्या ओठांवर येत होती....... असे काय ते तिचे खेळ सुरू होते..... थोड्यावेळाने ती नथ तिला टोचल्यासारखे वाटत होती ....हाताने  सतत ती नथ ला  हलवत होती....... आजीने तिच्या हातावर एक टपली मारली आणि हात खाली करायला लावला...

टोचते आहे काय... श्रीराज
हो तिने मान हलवली.....

त्याने हळुवार पने तिच्या नाकातून नथ काढून घेतली आणि आपल्या खिशात ठेवून दिली....

आता ठीक आहे..... श्रीराज

हो.... ती हसत बोलली

विधी साठी भटजींनी नंदिनी ला तिचा हाथ त्याचा हाठला लावायला सांगितले....ती थोडा वेळ लावायची मग सोडायची.....

नंदिनी नीट हाथ लाव...आजी

श्री राजने नंदिनीचा हात हातात धरून ठेवला आणि आजीला शांत बसवाले

होमहवन चा धुरामुळे नंदिनीच्या डोळ्यात पाणी येत होते ती तिच्या दुसऱ्या हाताने डोळे चोळत बसली होती..... तिचा पूर्ण चेहरा लाल लाल झाला होता...... तिला होणारा त्रास त्याला कळत होता......त्याने खिशातून रुमाल काढून तिचे डोळे नीट पुसून दिले आणि मधून मधून हवा घालत धुळ्याला पळवण्याचा प्रयत्न करत होता..... त्याला आजही तिला थोडासा सुद्धा त्रास झालेला सहन होत नसे....

आबासाहेबांनी कन्यादान केले.... त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते... श्रीराज नेत्यांना डोळ्यानेच आश्वस्त केले..

भटजींनी श्रीराजला तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितले.....

श्रीराजनी मंगळसूत्र तिच्या पुढ्यात धरले..... तिने छान सी स्माईल केली.....त्यानेसुद्धा तिच्याकडे बघून छान स्माईल करून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले.......ते मंगळसूत्र बघून तिला फार गम्मत वाटत होती मंगळसूत्र मधल्या वाट्या सोबत यांसोबत त्यात बोट घालून ती खेळत होते....

आता आपण बेस्ट फ्रेंड झालो... श्रीराज तिला बोलला

नंतर जोडवे वगैरे घालण्याच्या सगळ्या विधी पार पडल्या...... आता मात्र ती फार त्रासली होती...

भटजींनी सप्तपदी आणि फेर्यांसाठी साठी त्या दोघांना उभारायला सांगितले ..

आता मी थकले .....खूपच बोर गेम आहे हा..... नंदिनी

बस आता थोडंच राहिलं...... आजी

मी नाही...... आता उद्या खेळू आपण जे काही राहिलं ते..... आता मला झोप येते आहे ....पाय दुखत आहे.... नंदिनी कुरकुर करत बोलली...

अग बाळा आता थोडीशी पूजा राहिली नाहीतर ते भटजी आबा रागवतील.... आजी तिला समजावण्याच्या सुरात बोलली..

ती मात्र ऐकायला तयार नव्हती..... ती हट्ट करत होती..... माझे पाय दुखत आहेत ......आता मला चालता येत नाही..

हे असच होणार आहे जिलl  लग्न या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही तिच्यासोबत लग्न करणार तर हे असं होईल ....... हे काय लग्न आहे नुसता खेळ सुरू आहे.....या सगळ्या विधींना आपल्याकडे किती महत्त्व आहे तुम्हाला कळत नाही का..... त्याच्याशिवाय लग्न अपुर आहे...,..श्रीराज ची आजी चिडत बोलली

आजीने तिच्या पदराची आणि श्री राजनी घेतलेल्या उपरण्याची गाठ बांधली........ पण ती मात्र फेरे घ्यायला तयार नव्हती आपण आता उद्या करूयात असाच हट्ट करत होती...

चला लवकर लवकर आटोपा.. भटजी

आजी मी बघतो..... श्रीराज आजीला डोळ्याने खुणावत बोलला

तुझे पाय दुखत आहेत ना...... तुला कडेवर उचलून घेतलं तर चालेल का...नाहीतर देव बाप्पा रागावतील ना..
.  आपण पटकन हे पूजा पूर्ण करून घेऊ..... श्रीराज नंदिनी ला बोलला

सगळ्यांचं रागवणार ऐकून तिने मानेनेच रडका चेहरा करून हो म्हटले...

श्रीराजने तीला आपल्या दोन्ही हातावर आपल्या कुशीमध्ये उचलून धरले आणि तिला तसेच पकडून  सात फेरे पूर्ण केले.......

थॅंक यू सोन्या माझा ऐकल्याबद्दल.... श्रीराज तिला खाली उतरवत बोलला..

त्या दोघांना तसं बघून आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आले.....

श्रीराजचे नंदिनी बद्दलचे प्रेम बघून..... तिथे जमलेल्या पाहुण्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले.... त्यांना श्रीराज खूप कौतुक वाटलं..... त्याच्याबद्दल अभिमान वाटला.....

श्रीराजच्या आजीला मात्र ते आवडलं नव्हतं..... पण ती गप्प पणे सगळं बघत होती...

लग्नाचे सगळे विधी पार पडले होते...... आता श्रीराज आणि नंदिनी लग्नाच्या बंधनात अडकले होते.....

नंदिनीचा तिच्या लहानग्या मैत्रिणींमध्ये मिरवणे सुरू होतं ती त्यांना तिच्या गळ्यातले दागिने बांगड्या असं सगळं दाखवत खेळत बसली होती....

आता पाठवणीची वेळ झाली होती....श्रीराज आणि नंदिनी.... आजी आबासाहेबांना नमस्कार करायला आला.. आजी तिला पाठवणी बद्दल समजावून सांगत होती......

मला नाही जायचं कुणाच्या घरी...... असा कुठे खेळ असतो का......आम्ही आमच्या भावाला भावल्यांचे लग्न केले की आपल्या भावला भावली ना आपल्या घरी घेऊन जात असतो...... हो ना ग पिंकी......... असाच असता लग्न....... मला नाही जायचं आजीला सोडून कुठेच...... आता मला घरी जायचंय...... नंदिनी

आजी आणि तिथल्या जवळच्या बायका तिला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या...... ते मात्र कोणाचेच ऐकत नव्हती

आता आजीने तिला थोडे दटावत सांगितले......

सगळे मलाच रागवतात नेहमी...... तुम्हीच बोलले ना भावला भावली च्या लग्नासारखा आपण लग्न करूयात...... मला नाही जायचं.... त्या राज ला सांग आपल्या घरी यायला.... नाहीतर त्याला त्याच्या घरी जाऊ दे...... मी कुठेच जाणार नाही म्हणत ती रडतच आपल्या घरात पळत गेली...... श्रीराजला तिची भावना कळत होती..... त्याला तिला तसे बघून खूप वाईट वाटत होते....

******

मन से जो जुडे जाते है
वो रिश्ते रब के नवाजे होते है

*******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️