Jan 22, 2022
प्रेम

नंदिनी....श्वास माझा 15

Read Later
नंदिनी....श्वास माझा 15

भाग-15


 

नंदिनीला नववधूच्या रुपात बघून श्रीराज ला खूप आनंद झाला होता त्याबरोबरच चार दिवसापूर्वी चा आठवून तो भाऊ सुद्धा झाला होता त्यामुळे त्याच्या डोळ्यातून थोडेसे अश्रू बाहेर पडले....

नंदिनीला लग्नाचे किती हाऊस होती.... कितीतरी स्वप्न तिने तिच्या लग्नाचे रंगवले होते....... श्रीराज अमेरिकेला असताना फोन वरती कोणाच्या लग्नावरून आले की ती त्याच्याशी लग्नाच्या गप्पा सांगायची......

शरू आपण दोघांना मॅचींग मॅचींग कलर घालूया लग्नात................ मला रेड कलर फार आवडतो आपण रेड कलरचा घालूया.... नंदू

ये नाही हा त्याचा बँड पार्टी सारखा काय घालायचं नाही मला आपण वेगवेगळे मस्त कलर्स करूया तो नेहमी तिची मस्करी करायचा ..

ये बाबा असं काही नाही .......मी म्हणेल तसेच होणार माझं लग्न आहे ना मग माझ्याच मतांनी होणार सगळं...... मी तर तुला मेहंदी सुद्धा लावून देणार आहे खूप सारी.......नंदू

हे बाई मी असं बिस काही नाही करणार नाहीये .......मुला कधी मेहंदी लावतात का बघितले का तू........ उगाच त्रास नाही द्यायचा हा नंदू लग्न माझं पण असणारे मी माझ्या मताने करणार सगळं....... शरू

ये शी बाबा .....तू ना तिकडे जाऊन फारच खडूस झाला..... अजिबातच ऐकायला नाही ऐकत नाही माझं....नंदू

खडूस का....... थांब आलो की तुला माझा खडूस पणाच दाखवतो ......शरू

नंदूला त्याचा बोलण्याचा अर्थ कळला आणि तिने लाजतच विषय बदलला.....

आणि ते ना टीव्ही सिरीयल मध्ये मुव्हीज मध्ये दाखवतात मला तसंच अगदी नटायचे मला...... माझ्या डोक्यापासून नखापर्यंत दागिने घालायचे आहेत..... मी खूप गजरे लावणार आहे.... तिची अखंड बडबड चालू असायची..

. लवकर येणारे शरू ...आता खुप आठवण येते मला तुझी........ किती दिवस झाले बघितले सुद्धा नाही तुला...............बघ आता मी कुठलाच हट्ट करणार नाही तू म्हणशील सगळं तसंच करू आपण पण प्लीज आता लवकर ये ना आता तुझ्याशिवाय राहावयास जात नाही....... आणि बोलता बोलता मग तिला अश्रू अनावर व्हायचे....... आणि शरू तीची समजूत घालायचा........

श्रीराज ने तिला आवडत होतं तसंच सगळं अरेंजमेंट केली होती...... 

नंदू बघ ना एकदा माझ्याकडे...... बघ तू बोलली होती त्याप्रमाणे मी रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे तुझ्यासोबत रंग मॅच केलेला आहे   ....बघ तुझ्या आणि माझ्या मुंडावळ्या देखील सेम सेम आहेत........माझ्या हातावर मी मेहंदी सुद्धा काढली आहे..... आपल्या दोघांचं नाव सुद्धा त्यात लिहिलं आहे.... शरू- नंदू...... तो आपल्या  हातातल्या मेहंदी कडे बघत मनातच बोलत होता....... बाळा असं लग्न मला कधीच करायचं नव्हतं...... तुझ्या आवडीने सगळं करणार होतो.... तुझे सगळे हट्ट मला पुरवायचे होते....... करणा ग हट्ट........ धाव ना ग माझ्या मागे मारायला...... सगळं हवय नंदू मला........ त्याच्या डोळ्यात पाणी आलं....... आणि त्याला चार दिवसांपूर्वी घडलेल्या डोळ्यासमोर दिसू लागलं.....

 

त्या दिवशी सकाळी तो लवकरच उठला....... त्याने आपली बॅग भरली दोन-चार कपडे काय ते त्यात ठेवले......

श्रीराज इतक्या घाईने जायची खरंच गरज आहे का...... कालचा प्रवास आ वरून आला आहे..... नीट तुझा आराम सुद्धा झाला नाही आहे...... इतक्या दूर ड्राईव्ह कसा करशील........आई

आई नंदू माझी वाट बघत असेल मला आता जायलाच हवं...... डोन्ट वरी मी ड्राईव्ह करणार नाही मी मी ड्रायव्हर काकांना सोबत घेऊन जाईल..... पण प्लिज आता मला थांबू नको....... श्रीराज बॅग भरत बोलला

बाळा तिथे तुझी कोणीच वाट बघत नाही आहे ......विश्वास ठेव माझा.........आई

आई तु तरी अशी नको बोलू तुला तर सगळं माहिती आहे ना लहानपणापासूनच ती मला फार आवडते..... तुम्ही सगळे समजतात ती तशी मुलगी नाही आहे...... ती फक्त माझ्यासाठी थांबली आहे........ मला माहितीये ती माझी वाट बघत असेल....

आई मी ऑफिसला चाललो आणि तिथूनच परस्पर मी तिकडे जाईल नाश्ता आणि जेवण सुद्धा मी तिकडेच करेल काळजी करू नको चल येतो......,.... म्हणतो बॅग घेऊन निघाला..

ऑफिसमध्ये येऊन त्याने थोडंसं फाईल चेक केलं आणि मिस्टर शहा आणि शैला काय हवं नको ते समजावून सांगितलं......... रोहन त्याचा मित्र त्याने सुद्धा त्याची कंपनी जॉईन केली होती..... रोहन च्या भरोशावर सगळे काम सोडून तो नंदूला भेटायला निघाला..

नंदूला बघून त्याने करकचून वाड्यासमोर गाडीचा ब्रेक मारला........... तिला बघून आता कुठे त्याच्या जीवात जीव आला होता..... रस्त्याने पूर्णवेळ नंदू त्याच्या डोक्यात होती...,... खरंच ती माझी वाट बघत नसेल का असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते आणि त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती...... त्या प्रत्यक्षात समोर नंदूला बघून त्याने सुखाचा श्वास घेतला होता..... असाच असतो गाडीबाहेर उतरला.....

लाईट येलो कलरचा तिने पटियाला कुर्ता घातला होता.... केस मोकळे विस्कटलेले होते....... सलवार हातात पकडून तिथे तीन-चार लहान मुलींसोबत लंगडीचा खेळ खेळत होती...... तिला लहान मुलांसोबत नेहमीच खेळायला आवडायचे...... श्रीराज तिथेच गाडीला टेकून थोड्यावेळ भान हरपून तिला बघत होता...,.. तिचे ते हसणे ओरडणं एन्जॉय करत होता...

ओ काका........ ही अशी काय कोणी गाडी.....मध्ये लावतात काय .......आम्ही खेळत आहोत तुम्हाला दिसत नाही काय........ नंदू दोन्ही हात कमरेवर ठेवून श्रीराज कडे बघत बोलत होती..... तसा तो भानावर आला..........आणि तिला बघून त्याने छान स्माईल केले...

अग ये ...... मी काका ......तर तू काकूबाई झालीस की.... तो हसतच तिचे नाक ओढत...... बोलला...

हात नाही लावायचा नाही हा ......नाहीतर आजीजवळ तुमचं नाव सांगेल ती ना चोळत बोलली......

लावेल.... जा काय करशील आणि हे नेहमी नेहमी आजीच्या नावाची धमकी नाही द्यायची हा ,. श्रीराज तिची मस्करी करत बोलला...

तुम्ही पहिला ती गाडी तिथून हटवा आम्ही तिथे खेळत आहोत....... आणि तुम्ही इथे का आले आहात........ हो अच्छा आबाना भेटायला आले आहात का.....नंदू चिडत बोलली

हो आबांना तर भेटायला आलोच आहो....... तुला सुद्धा भेटायला आलो आहो...... शरू

मला ......?मला .....काबरं......? नंदू

ये बाई........बस कर ना आता मस्करी......... मला माहितीये तुला राग आलाय मला थोडा उशीर झाला यायला पण आता पुरे कर मस्करी......... श्रीराज तिचे गाल ओढत म्हणाला

तुम्हाला सांगितलं ना हो हात नाही लावायचा....... इतके मोठे आहात तुम्ही तुम्हाला कळत नाही का..... मी खरंच आता अगदी जवळ जाऊन तुमचं नाव सांगेल......... आणि पहिले ती गाडी बाजूला करा......... आत मध्ये आबा बसले आहेत तुम्ही आत मध्ये जावा.......नंदू चिडतच बोलली

बरं आता रागावू नको जास्ती....... मी जातो आत मध्ये ये तू..... पण हा लवकर ये ..... डोळेभरून बघायचे आहे..., म्हणत त्याने गाडी साईडला पार केली आणि आत मध्ये गेला ....

आबासाहेब ........आजी ........आवाज देत तो आत मध्ये गेला...

त्याचा आवाज ऐकून आजीच्या हातातलं भांडण खाली पडलं...... ती धावतच बाहेर आली....... त्याच्याकडे पाणी भरल्या डोळ्याने एकटक बघत होती....., तिच्या चेहऱ्यावर तो आल्याचा आनंद स्पष्ट दिसून येत होता......

आला बाळा तू....... किती वाट बघत होते तुझी....... आजी त्याच्या केसांवरून, चेहऱ्यावरून तिचे दोन्ही हात फिरवत...... त्याचा हाताने मुका घेत बोलत होती..... आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत होते....

त्याने आजीला जवळ मिठीत घेतले...... आजी आबासाहेब कुठे आहेत...... श्रीराज

ते काय तिथे बैठकीत बसले आहे ....चल तुला बघून त्यांना खूप आनंद होईल..... म्हणतात आजी त्याला आत मध्ये घेऊन गेली

अहो..... नंदिनीचे आबा बघा कोण आलय....... आजी त्यांना आवाज देत बोलली........ ते कुठेतरी शून्यात नजर हरवून बसले होते....... त्यांचं तिच्या आवाजाकडे लक्ष नव्हतं......

श्रीराम त्यांच्या पायाजवळ खाली जाऊन बसला........

आबासाहेब ...... आबासाहेब..... त्याने त्याचा हात त्यांच्या हातावर ठेवला.... तसे आबा भानावर आले आणि त्यांचं लक्ष श्रीराज कडे गेलं........

आला बाळा तू .......मला माहित होतं ........तू नक्कीच येशील .......तू नक्कीच येशील ......मला माहित होतं..... बाबासाहेब त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले आणि त्यांच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आलं होतं...

त्याला पहिल्यांदाच आबासाहेब एवढे हतबल वाटले होते...... त्यांनी त्यांना असं याआधी कधीच बघितलं नव्हतं.....

आबासाहेब तुम्ही ठीक आहात ना......... काय झालं तब्येत वगैरे ठीक आहे ना...... आणि हे काय तुमची तब्येत अशी का दिसते..... या नंदनी फार त्रास दिला की काय तुम्हाला.......... तो काळजीने विचारपूस करत बोलला

हो हो सगळ ठीक आहे....... आबासाहेब आपल्या भावनांना आवर घालत बोलले.....

कधी आलास बाळा अमेरिकेहून......आबा

कालच आलो......... श्रीराज

आबासाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप यश  भेटले आहे..... बिजनेस या दुनिया मध्ये खूप नाव झालं आहे,........ आत्ताच काही दिवसांपूर्वी मला यनगेस्त बिझनेस माणसा अवॉर्ड सुद्धा भेटला आहे.... तो त्यांना झालेले सगळं सांगत होता

हो हो बाळा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता .......तू खूप मेहनती आहेस .......हुशार आहेस हे तर होणारच होतं....... आबासाहेब कौतुकाने बोलले

आबासाहेब माझं एक स्वप्न पूर्ण झालं आहे........ आता फक्त एकच स्वप्न उरला आहे ......तुमचा आशीर्वाद द्या ते सुद्धा मला लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे ..... श्रीराज

आबासाहेब काही बोलले नाही ते फक्त त्याच्याकडे बघत होते........

अहो असं काय करताय जाताना तुम्हाला बोलून गेलो होतो ना की आता नेक्स्ट टाईम आलो की नंदनी ला नेहमीसाठी स्वतःसोबत घेऊन जाईल........ आता हटायचं नाही हा.....तुम्हाला तेव्हाच बोललो होतो जितके लाड करायचे करून घ्या आल्यावर मी काहीही ऐकणार नाही आहो...... श्रीराज

त्याच्या आशा बोलण्याने आजी आबा दोघांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आले.....

अहो नंदूच्या आजी पोरगं लांबून आला आहे खाण्यापिण्याचं बघा थोडं काही...... आबासाहेब विषय बदलत बोलले..

बाबासाहेब विषय बदलू नका .......मला आत्ताच तुमची परमिशन हवी आहे...... आबासाहेब विषय बदलत आहे बघून त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती...

अरे हो इतकी काय घाई आहे...,. नंतर बोलूया आपण.....आबासाहेब

तेवढ्यात नंदिनी आत मध्ये आली..........

आजी बघ ना ग ती पिंकी ...मला मारत होती ....नुसती भांडत असते खेळतांना..... ती रडक्या आवाजात आत मध्ये आजीजवळ आली..... बघते तर श्रीराज तिथे आंबा जवळ बसला होता त्याला बघून ती चूक झाली आणि आजी जवळ जाऊन उभी राहिली.......

आजी हे काका कोण आहेत ग .......मघाशी बाहेर सुद्धा भेटले होते ......माझं नाक सुद्धा ओढत होते....... त्यांना हात नका लावू सांगितलं तरी ऐकत नव्हते.... नंदिनी एका डोळ्याने श्रीराज कडे बघत आजीच्या कानामध्ये खुसुर पुसुर करत होती....

हे चिमणी....... तिथे काय आजीजवळ जाऊन माझी कम्प्लेंट करते ग ....... म्हणतो तिच्याजवळ गेला

आजी हे कोण आहे .......सांग ना यांना मघापासून हे मला फक्त चिडवत आहेत.... मी खेळत होते तिथे मध्येच त्यांनी आपली गाडी आणून उभी केली.......नंदिनी

नंदू ........आता बस झाल हा नाटकपणा.......... आलो तेव्हाचा बघतोय काय मला काका बोलतेस ........आजी बघ ना किती रुसून बसली आहे .......मघापासून काहीच ओळख दाखवत नाही आहे मला...... आलो की नेहमी पहिले गळ्यात पडते...... आता साध हात लावला तरी ओरडते आहे....... म्हणत तो तिच्या अगदी जवळ गेला...

तिने रागाने त्याला धक्का मारला आणि तिथून पळत आत मध्ये गेली...... तिचा तस वागण त्याच्या खूप जिव्हारी लागलं होतं....... तो पण पळतच तिच्यामागे आत मध्ये गेला.....

पळत असताना त्याने तिचा हात पकडला आणि तीला स्वताकडे ओढली आणि स्वतःच्या मिठीत घेतलं.......

सॉरी ना ग पिल्लू...... मला माहिती आहे तुला खूप राग आला आहे...... पण आता तू अशीच दूर दूर पळणार आहेस का........ किती वर्षांनी भेटतो आहे आपण...... प्लीज ना बाळा एकदाच अशी मिठीत ये तुला मन भरून मिठीत अनुभवायचा आहे मला........ नको ना आता दूर जाऊ...... नाही राहल्या जाता......... तु बोलशील ते सगळं करेल फक्त आता..... थोडा वेळ शांत बस...... म्हणत त्याने तिच्या कपाळावर केसांवर कीस केले......

तिने रागाने  पुर्ण जोर लावून त्याला दूर ढकलले..... तिच्या असं अनपेक्षित वागण्याने त्याला खूप राग आला आणि त्याला वाईट सुद्धा वाटले........

आणि धावतच ओरडत आजीजवळ आली.....

आजी हे बघ मला त्यांच्या कुशीत घेत होते त्यांना सांग माझ्या दूर राहा म्हणून मला ते काका आवडले नाही......नंदिनी

श्रीराज तिचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होऊन थोडा नर्वस पणे आजीकडे बघत होता.... त्याने अपेक्षाच केली नव्हती किती हे असं काही आजीजवळ येऊन बोलले.....

आजीसुद्धा एकटक त्याच्याकडे बघत होती..... त्याच्या डोळ्यात आता पाणी होते....

हो सांगते जा तू  आत मध्ये........आजी

आजी ती मला का ओळख दाखवत नाही आहे...... इतकं काय कोणी रुसून बसते काय...... श्रीराज हतबल होत बोलला

आता याला सगळं खरं सांगावं लागेल आजी-आजोबांच्या लक्षात आलं.....

श्री राज ती तुला आता ओळखत नाही.......श्रीराज ती तुला विसरली आहे....... तिच्यासाठी तू आता परका आहेस.......आजी

आजी चे  ते बोलना एकूण  श्रीराज मटकन खाली बसला........ आणि आईचं बोलणं त्याला आठवलं आता तिथे तुझी कोणीही वाट बघत नाही आहे............. त्याच्या डोळ्यात ना पाणी व्हायला सुरू झाले........ आईची आबांना पण त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटत होते........

*********

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️