Oct 16, 2021
प्रेम

नंदिनी..श्वास माझा 13

Read Later
नंदिनी..श्वास माझा 13
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

भाग-13
 

पाच वर्षानंतर..........

S&N ग्रुप ऑफ कंपनीज च्या भव्य बिल्डिंग समोर एक ब्लॅक ऑडी येऊन थांबली......

वेलकम बॅक टू इंडिया मिस्टर देशमुख.......

थँक्यू मिस्टर शहा.......

वाव ही इस सो हांडसम...... व्हेरी डॅशिंग..... मला तर वाटलं डायरेक्टर आहे  तर कोणी aged पर्सन असेल..... बट ही इज सो यंग......... शैला रियाला बोलली... सगळा ऑफिस स्टाफ त्याला बघत उभा होता आणि मुलींची तर आपापसात खुसरपुसर सुरू होती..

तो गाडी मधून उतरला तेव्हापासून ऑफिस स्टाफ मध्ये कुजबुज सुरू झाली होती..... तो आत्मविश्वासाने भरपूर असा.... 6fit उंची, वेल मेन्टेन फिजिक्स..... बहुतेक रोज जिम करत असेल.... ब्लॅक ब्लेझर त्याने हातावर काढून घेतले होते, व्हाईट शर्ट , ब्लॅक ट्राऊजर, छोटे केस प्रॉपर जेल लावून सेट केलेले, गोरा रंग धारदार नाक, धनुष्य बाना च्या आकारासारखे ओठ हसली की डाव्या गालावर एक खळी पडणार... ट्रिमड शेव... डोळ्यांवर फ्रेमलेस स्क्वेअर  स्पेक्ट्स
...... शर्टच्या स्लिम फोल्ड करत त्याने खूप पोलाईटली मिस्टर शहाला ग्रिट केले.....
 

सो गाईज मिट आऊर् MD मिस्टर श्रीराज देशमुख..... यंग बिझनेसमॅन आयकॉन..... काही दिवसांपूर्वीच यांना अमेरिकेमध्ये यंग बिझनेस मॅन चा अवॉर्ड मिळालेला आहे.
... दोन वर्षापासून अमेरिकेमध्ये यांनी यांचा बिजनेस सुरू केला होता आणि आता तो मल्टिनॅशनल लेव्हलवर स्प्रेड सुद्धा केला आहे.... त्यांच्या आता देशो देशात बऱ्याच  ब्रांचेस आहे.... लास्ट मंथ यांनी आपली कंपनी टेकओव्हर केली ...... सो नाऊ ही इज अवर न्यू बॉस....

सगळ्या स्टाफ नेत्याचं टाळ्या वाजवून स्वागत केले

श्रीराजने सगळ्यांना हाताने हॅलो आणि थँक्यू म्हणाला....

मिस्टर देशमुख.... ही मिस शैला तुमची पी ए.... शहा
शैला ने फ्लावर बुके ऑफर केला......

थँक्यू मिस शैला....... श्रीराज

सो गाईज.... मला शिस्तीत आणि वेळेत काम पूर्ण पाहिजे बाकी एन्जॉयमेंट च्या वेळी तुम्ही फूल एन्जॉयमेंट करू शकता....... ओके देन आता रोज भेटीगाठी  होईलच..…. हसतो सगळ्यांना उद्देशून बोलला... मी केबिन कडे वळला.... मिस्टर शहा आणि शैला त्याला त्याचे केबिन दाखवायला घेऊन गेले...

श्रीराज त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला.

हॅव अ सीट मिस्टर शहा अंड मिस शैला..... त्यांना उभा असलेला बघून श्रीराज बोलला...

मिस शैला , पूर्ण झालेले आणि सुरू असलेल्या प्रोजेक्टच्या सर्व फाइल्स आता मला हव्या आहेत.... श्रीराज

ओके सर.... शैला

उद्या मी ऑफिसला येणार आहे त्यानंतर आठ दिवस मी पर्सनल लिव्ह वर आहो तर मला  सगळं  स्टडी करायचा आहे.... त्याप्रमाणे आपण आपल्या गाईडलाईन्स तयार करू शकतो आणि लगेचच त्या इन्क्रिमेंट करता येतील.... श्रीराज

ओके सर ......शहा
शहा आणि शैला केबिन मधून बाहेर आपल्या कामाला निघून गेले...

शैला ने सगळ्या फाईल श्रीराज ला आणून दिल्या आणि सगळे प्रोजेक्ट समजून सांगितले....

ओके गुड काम तसा व्यवस्थित आहे थोडेसे चेंजेस हवे आहे ते मी उद्या सांगेल... उद्या सगळ्या स्टाफ सोबत एक मीटिंग अरेंज करा..... श्रीराज

ओके  सर... शैला

तो डायरेक्ट विमान तळावरून ऑफिसमध्ये आला होता त्याला लवकरात लवकर काम हातात घ्यायचं होतं आणि सगळे सेट करायचं होतं..... बेसिक गोष्टी डिस्कस करून तो घरी जायला निघाला....

गाडी एक मोठ्या बंगलो समोर येऊन थांबली श्रीराज उतरून आत मध्ये गेला...... त्याची आई गेट मध्येच आरतीचे ताट घेऊन उभी होती..... त्याला बघून त्याच्या आईचे डोळे आनंदाने आणले होते आणि कौतुकाने ती त्याच्याकडे बघत होती.......आज पाच वर्षानंतर तो घरी आला होता.. पाच वर्ष तो अमेरिकेतच होता पहिले दोन वर्ष त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर एक वर्ष एका कंपनीमध्ये काम करून एक्सपिरीयन्स घेतला त्यानंतर त्याने पार्टनरशिप मध्ये तिथेच बिझनेस सुरू केला..... त्यानंतर त्याने त्याचा पर्सनल लेव्हलवर S&N ग्रुप ऑफ कंपनीज नावाने बिझनेस सुरू केला. त्याच्या हार्डवर्क ने त्याने त्याचा बिजनेस टॉप लेवल वर नेऊन पोहोचला होता आणि आता भारतातली मुंबईमधली एक कंपनी त्याने टेक ओवर करून केली होती ..... म्हणून तो आता भारतामध्ये परत आला होता आता त्याला भारतामधून त्याचं काम बघता येणार होतो त्याची तो खूप वर्षापासून वाट बघत होता..
तो देशमुख अँड सन्स कंपनीचा एकुलता एक वारसदार होता त्याचे वडील सुद्धा भारतातले टॉप मधले बिझनेस मॅन होते पण त्याला स्वबळावर मोठं व्हायचं होतं म्हणून त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस जॉईन न करता स्वतःचा बिजनेस उभा केला होता..... तसा तो घरच्या बिजनेस मध्ये सुद्धा त्याच्या वडील आणि काकांना मदत करायचा....

श्रीराम ची फॅमिली मुंबईमध्ये एक प्रतिष्ठित बिजनेस फॅमिली मध्ये येत होती..... त्याची जॉइंट फॅमिली होती.... आजी आजोबा... आई नीती, वडील शशिकांत देशमुख, लहान काका रविकांत देशमुख, काकू रेवती देशमुख आणि त्यांचा मुलगा राहुल देशमुख.. सगळे फॅमिली त्यांच्या स्टेटसला जपणारी होती.....

शशिकांत देशमुख आणि रविकांत देशमुख दोघे मिळून बिजनेस सांभाळायचे.... आई गृहिणी होती.... काकू काही सोशल काम बघायची आणि तिच्या किती पार्टीस मध्ये बिझी असायची.... राहुल त्याच्या एज्युकेशन पूर्ण झालं होतं अधून-मधून तो बिजनेस मध्ये मदत करायचा....

घरी एकदम खडक शिस्तीचं वातावरण.... श्रीराज ची आजी थोडी जुन्या वळणाची होती... घरात तिचाच शब्द पाळल्या जायचा...... श्रीराज ची आई इ साध्या घरातून आली होती त्यामुळे देशमुख फॅमिली चे जास्त संबंध तिच्या माहेरी नव्हते त्यांना ते   त्यांच्या स्टेटस चे वाटायचे नाही..... त्यामुळे तिकडे कोणीच जास्त जायचे नाही फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये श्रीराज आणि त्याची आई  जायची....... श्रीराज ची आई स्वभावाने गरीब आणि साधी होती तिचा श्रीराज वर खुप जीव होता....... तिची इच्छा नव्हती श्रीराज ने अमेरिकेला जावे पण पण मुलाच्या करियर पुढे आणि हट्टापुढे  तिने परमिशन दिली होती....

आईने श्रीराज ची आरती करून त्याला घरात घेतले....
घरात आला आल्या त्याने सगळ्यांना नमस्कार  केला.....

अरे वाह आपले संस्कार विसरला नाहीतर....... आजी पाठीवर दबुकखडा देत बोलली..,....

आजी मी शुद्ध भारतीय आहो काळजी नको करूस हसत तो बोलला..

सगळ्यांसोबत भेटीगाठी घेऊन नॉर्मल गप्पा केल्या

बरे आई मी फ्रेश होऊन येतो असं म्हणतो त्याच्या रूममध्ये गेला....... त्याची रूम जशीच्या तशी त्याच्या आईने मेंटेन करुन ठेवली होती..... तो तर आपली रूम बघून खूप आनंदी झाला...,... फ्रेश होऊन तो खाली आला सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले होते तो पण तिथे जाऊन बसला.....

काय रे आधी ऑफिसमध्ये गेला .....आधी घरी यायचं ना...... आई जेवण वाढता वाढता बोलली

अगं हो थोडा महत्त्वाचे काम होते उद्यापर्यंत आटो पाहिजे आहे...... श्रीराज

आता आला आहेस ना ,आरामात कर काम ,कसली एवढी घाई आहे.... आई

अग मला मामाच्या गावी जायचं आहे... म्हणून इथला चार्ज लवकरात लवकर हातात घ्यायचा होता....... एकदा काम समजावून सांगितले की मग आराम....... श्रीराज

मामाच्या गावाला जायचं नाव काढताच सगळे एकमेकांकडे बघायला लागले.... श्रीराज आणि नंदिनीच्या मैत्रीची घरात बहुतेक सगळ्यांनाच कल्पना होती....

काही गरज नाही आहे जायची ....आत्ताच आला आहे आता इथेच राहायचं ........आजी

पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना मला लवकरात लवकर नंदिनी ला भेटायला जायचं आहे........ दोन वर्षापासून काही नीट कॉन्टॅक्ट झालेला नाही.... त्यामुळे मी परवाच जाणार आहे आणि आठ दिवस सुट्टीवर आहो.... श्रीराज

हे बघा आम्ही तुम्हाला फोनवर सांगितलं नाही पण नंदिनी चं लग्न झालेलं आहे ...... त्यामुळे आता तिला भेटायची तुम्हाला गरज नाही...... आजी

आई मान खाली घालून बघत होती.....

श्रीराज चा हातातला घास हातातच राहिला......

काय.......?.... इम्पॉसिबल........ मला अशी मस्करी आवडत नाही.......... श्रीराज थोडा रागात बोलला

नंदिनीच्या आबांचा दोन वर्षापूर्वीच कॉल येऊन गेला होता तेव्हा त्यांनी आम्हाला कळवलं...... त्यानंतर त्यांच्यासोबत  आपला काहीही कॉन्टॅक्ट नाही राहिला...... आजी

असं असं होऊच शकत नाही .......श्रीराज ठामपणे म्हणाला

सुनबाई नंदनी च्या लग्नाची पत्रिका दाखवा त्याला..... आजी

काकू ने त्याला पत्रिका आणून दाखविली......
त्याने हातात घेतली .....ती खरंच नंदिनीच्या लग्नाची पत्रिका वाटत होती .....पण पत्रिका बघून सुद्धा त्याला विश्वास बसत नव्हता..

पत्रिका खोटी असू शकते..... असं काहीही झालेलं नाही उगाच मला तिच्याबद्दल काहीही सांगू नका..... श्रीराज चिडत बोलला..... पण त्याचे डोळे थोडे पाणावले होते

हे बघ राज..... चांगल्या स्थळ चालून आलं असेल..... बिन आई-वडिलांची पोरगी होती ती......तिच्या आजी-आजोबांना स्थळ चांगलं वाटलं असेल म्हणून त्यांनी तिचं लग्न करून दिलं असेल.... आणि तसं पण ते लोक आपल्या स्टेटस चे कधीच नव्हते, पण तुला नेहमी मामाकडे जायला आवडायचं पण तुझ्या आवडी खातर मी काही बोलायचो नाही..... मी इकडे तुझ्यासाठी एक चांगली तुला शोभेल अशी शिकलेली वेल करियर मुलगी शोधलेली आहे ,माझ्या बिझनेस पार्टनर चिस्ती मुलगी आहे आम्ही तिचा हात तुझ्यासाठी मागितला आहे तो एकदा तिला भेट म्हणजेही नंदिनी वगैरे काय तू सगळं विसरून जाशील........ शशिकांत

अहो आपण या विषयावर नंतर बोलू आत्ताच आला आहे त्याला आराम करूद्या ........ आई

ताटाला नमस्कार करून तो तिथून उठून त्याच्या रूममध्ये चालला गेला.......

बेडवर पडल्या पडल्या त्याने नंदिनी चा फोटो हातात घेतला....
अमेरिकेला गेल्यापासून तीन वर्ष त्याचा तिच्यासोबत फोनवर कॉन्टॅक्ट होता..... नंतर तो फोनला रेंज नाही वगैरे असे काही कारण सांगून त्याचा फोन लागत नसायचा आणि तो सुद्धा बिझनेसच्या कामात बिझी झाला होता.... दिवस रात्रीचा घोळ असल्यामुळे बोलायला सुद्धा भेटलं नव्हतं....
तिचा फोन लागत नाही म्हणून त्याने मामांना फोन करून तिचा हालचाल विचारला होता.... मामाने सगळं ठीक आहे असं कळवलं होतं...

जर तू नाही तर कोणीच नाही........नंदू मी येतोय उद्याच.........मला यांच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाहीये मला माहितीये तू माझी वाट नक्कीच बघत असणार......

श्रीराज चे मन खूप दाटून आलं होतं....... त्याने अशा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा केली नव्हती..... त्याला त्याची आणि नंदू ची शेवटची भेट आठवली होती., ..,...... त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं....... श्रीराज नंदिनीच्या विचारात झोपी गेला........

******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "