नंदिनी ...श्वास माझा 11

शरू नंदू


भाग-11 : दुर्घटना से देर भली


दोन दिवस नंदूला ताप होता. आजी आणि शरू दिवस रात्र एक करून नंदूची काळजी घेत होते. आबासाहेब तालुक्या वरून यायचे होते. आजी घरी एकटी आहे म्हणून शरू रात्री उशिरापर्यंत आजीला मदतीसाठी म्हणून नंदूच्या घरी थांबायचा. नंदूला बरं नव्हतं म्हणून शरूला त्याच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याची काहीच इच्छा नव्हती . पण नंदूने त्याला समजावून सांगितले होते की तिला आता बरं वाटत आहे, तुझे मित्र तुला भेटायला आणि फिरायला आले आहे नंतर तुम्हाला असा चान्स भेटायचा नाही , तर त्यांच्यासोबत तुला वेळ घालवायला हवा . त्या दोघांना असं त्रासात बघून टिनाला तिची चुक समजली होती, तिने नंदूला सॉरी म्हटले होते. आता नंदू आणि टीना मध्ये छान मैत्री झाली होती. नंदूच्या आग्रहाखातर शरू
दिवस मित्रांसोबत घालवायचा. ते आजूबाजूला बाहेर फिरायला सुद्धा केले होते मात्र परत आला की रात्री तो नंदू जवळ येऊन बसायचा...... एवढे सगळे ठीक सुरू असतानाही नंदू मात्र पहिले पेक्षा आता शांत झाले होती, एकटी एकटी राहत होती आणि हे शरूच्या लक्षात आलं होतं . त्याला माहीत होतं , की ती अजूनही झालेली गोष्ट विसरली नाही आहे . झालेली गोष्ट तिच्या मनाला फार लागली आहे आणि म्हणून ती अशी शांत शांत वाटते आहे. तिच्या वागण्या बोलण्यात बराच बदल झाला होता.

नंदूला आता बरं वाटत होतं. आबासाहेब सुद्धा तालुक्याच्या गावावरून परत आले होते.

" अहो नंदूची आजी , आजकाल नंदू शांत शांत राहते आहे , काय झालं सगळं ठीक आहे ना?" आबा आजींना विचारले .

" हो सगळ ठीक आहे , दोन दिवस आधी बीचवर फिरायला गेले होते ,तिथे ती पाण्यात ओली झाली होती , त्यामुळे तिला दोन दिवस थोडा ताप होता , तसे आज ठीक आहे , म्हणून कदाचित शांत असेल ", आजींनी वेळ मारून नेली.

तेवढ्यात तिथे शरू आला.
"आबा, तालुक्या वरून परत कधी आलात ? आश्रमाची कामे झाली का?" , शरूने विचारले.

" हो... हो... बाळा , सगळे काम नीट झाले. काय म्हणतात तुझे मित्र ? आवडलं की नाही त्यांना आपलं गाव ?", आबा म्हणाले

" हो , खूप आवडलं उद्या सकाळी निघायचं ठरतंय आबा!" शरू म्हणाला.

" अरे इतक्या लवकर? आता तर सुट्ट्या सुरू आहेत ना तुमच्या कॉलेजला ?", आबा म्हणाले.


" हो आबा , पण पंधरा दिवसांनी अमेरिकेला जायचं आहे. पुढच्या शिक्षणासाठी मला स्कॉलरशिप मिळाली आहे, त्याची काही काम राहिली आहे ती काम पूर्ण करायची आहे , म्हणून लवकर निघावे लागेल. उद्या मित्रांसोबत निघेल आहे " ... शरू म्हणाला.

" अरे वाह , छान छान ,स्कॉलरशिप मिळाली ,तसा तू खूप हुशार आहेस . मला तुझा नेहमीच अभिमान राहिला आहे , स्वबळावर तू सगळं करत आला आहेस ,छान असाच मोठा हो !" , आबा खूप कौतुकाने म्हणाले.

" थँक्यू आबा!" शरू म्हणाला.

" आजी, नंदू कुठे दिसत नाही आहे !" , इकडे तिकडे नजर फिरवत शरू आजीला बोलला..

" हो , ती तिच्या रूम मध्ये आराम करते आहे. जा बघ आजकाल ती शांत शांत असते . आधीसारखी उधमपट्टी काही करत नाही. तुझे आबा सुद्धा तक्रार करत होते !" , आजी म्हणाल्या .

" अरे हो, मी पण तेच म्हणतोय ,तू इथे आणि ती शांत? तुम्ही दोघं असले की पूर्ण घर किती डोक्यावर घेत असता. तुमच्या दोघांमध्ये काही बिनसले आहे काय?" , आबा म्हणाले.

" नाही नाही , काही बिनसलं नाहीये. बरं मी बघून येतो!" म्हणत करू नंदूच्या खोलीत गेला.


नंदू खिडकीत उभी होती . ती बाहेर फुललेली मोगऱ्याची फुलं झाडं सगळं बघत होती , आणि आपल्याच विचारात तल्लीन होती. शरू आलेला सुद्धा तिला कळलं नव्हतं . शरूने एकदा नंदुकडे बघितले आणि खोलीचे दार बंद करून आतमध्ये आला.

शरू तिच्या जवळ गेला. ती पाठमोरी उभी होती, तिच्या कंबरेत हात घालून त्याने तिला मागूनच मिठी मारली.

" हे प्रिन्सेस , बाहेर बगीच्यामध्ये कसली सुंदर मोगऱ्याची फुलं फुलली ना! पण माझं फुल का येथे कोमजल्यासारखं दिसतेय? अशी हसरी फुलं किती सुंदर दिसतात बघ , मला सुद्धा टवटवीत फुलं खूप आवडतात !" , तो तिला स्वतःकडे वळवत बोलला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. ती मात्र काही बोलली नाही.

" अशीच न बोलता राहणार आहेस का आता ? तू दोन दिवसापासून सुद्धा जास्त काही बोलली नाही आहे माझ्यासोबत ! तुझी मस्ती मी किती मिस करतोय. उद्या मला जायचंय ग, सकाळी लवकर निघायचंय , आजचा दिवस सुद्धा संपत आला . बघ माझ्यासोबत अशीच वागणार आहेस काय? मग एकदा गेलो की किती दिवसांनी परत येईल ,काही माहिती नाही. तुझ्यासोबत अशी मनमोकळी मस्ती कधी करता येईल माहिती नाही. ये राणी , प्लीज बोल ना आता काही?" . तो तिच्या डोक्यावर कीस करत बोलत होता.

\"उद्या जायचं\" , हे शब्द ऐकून तिने त्याला घट्ट पकडले आणि स्वतःचा चेहरा त्याच्या छातीवर नकारार्थी घासत ,त्याचा शर्टात खुपसले. त्याने सुद्धा तिच्या भोवतीची त्याची मिठी आणखी घट्ट केली.

थोड्यावेळाने ती त्याच्या मिठीतून बाहेर आली.. आणि डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती..

"मला तुझी खूप आठवण येते . आजी ,आबा आणि तुझ्याशिवाय कोण आहे माझं? तू आजूबाजूला असलास ना, की सगळं जग जवळ आहे असं वाटतं . आता हे शेवटचे तुला मी जाऊ देते आहे , त्यानंतर मी तुला कुठेच जाऊ देणार नाही !" , बोलतांना थोडा पॉज घेऊन ," लवकर परत येशील ना ? आता मला तुझ्याशिवाय नाही राहवल्या जात !" , नंदू त्याच्या डोळ्यात आरपार बघत बोलत होती आणि त्याच्या डोळ्यात हरवली.

तिचं बोलणं त्याच्या काळजाच्या आरपार गेले होते . ते ऐकून त्याचे डोळे सुद्धा भरून आले. त्याने होकारार्थी मान हलवली आणि परत तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं.

" बरं , पण मला ही अशी रडकी नंदू आवडत नाही. तू अशीच रडणार असेल तर मी येणार नाही. मला माझी खट्याळ , मस्तीखोर नंदिनी आवडते. माझी नंदू मला परत आणून दे ,मी लवकर परत येणार !", शरू तिचा मूड ठीक करण्यासाठी बोलला. ती मात्र फक्त त्याला बघत होती .

" बरं चल, आज मामीने तुला जेवायला बोलवले आहे. आज तिने तुझ्या आवडीचा मस्त बेत आखला आहे" , शरू म्हणाला.

" नको ना प्लीज , माझा मूड नाही आहे जेवायचा, मी इथे घरीच जेवते" .नंदू म्हणाली.

" अग चल ना , अशी काय करतेस, सगळे तुझी आठवण काढत आहे. आजी आबांना पण छान वाटेल!" शरू म्हणाला.

" प्लीज, ऐक ना ,नको वाटतंय . तसे पण मला जेवण काही जात नाहीये , तापामुळे माझी चव गेलेली आहे . सगळ्यांसमोर काही खाल्लं नाही तर ते पण छान नाही दिसणार , प्लीज ऐक ना! , नंदू म्हणाली .

" बरं ठीक आहे , जशी तुझी इच्छा , मी तुला फोर्स नाही करत . बरं ऐक, उद्या सकाळी आम्ही लवकर निघणार आहोत , जवळपास आठ च्या सुमारास निघू. सगळ्यांना भेटायला सकाळी मी येऊन जाईल . आता थोडा वेळ घरच्यांसोबत पण घालवावा लागेल , दोन-तीन दिवस नुसतं बाहेर बाहेर फिरण्यात गेले आणि रात्री तुझ्या जवळ येऊन बसत होतो . त्यामुळे आता थोडसं मामा-मामी सोबत , आजी सोबत वेळ घालवतो. आई दोन दिवस अजून थांबणार आहे, कुठलातरी प्रोग्राम आहे , तो अटेंड करून ती परस्पर तिकडे मुंबईला येईल. काळजी घे स्वतःची ,मी परत आल्यावर माझी चिमणी मला जशीच्या तशी हवी आहे . कळतय का वेडाबाई मी काय बोलतोय?" , शरू तिच्या डोक्यावर टपली मारत बोलला.

" अरे हो ! हे काय फेअरवेल स्पीच सारखा बोलतोय . अजून उद्याची सकाळ आहे की ,उद्या परत तू सेम इन्स्ट्रक्शन्स देत बसशील. आता उद्या ऐकवं हे सगळे, आता लेक्चर नको देऊस , तसेही आबा पण मला खूप लेक्चर देत असतात. माझा मेंदू केवढा , तुमचे लेक्चर्स केवढे ? सगळे पचायला जड जात मला !" नंदू हसत हसत बोलली..

" हाहाहा ! आता बघ हसताना कशी क्यूट दिसतेस!" , तिचं नाक ओढत शरू बोलला... " बरं चल, मी जातो जेवायला ,सगळे वाट बघत असतील . मेडिसिन वेळेवर घे आणि झोप लवकर, जास्त विचार करत बसू नको" , तिला मिठी मारून तो दाराजवळ गेला , तसं त्याला काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि तो परत फिरला.

आता त्याच्या डोळ्यात नंदू ला खट्याळ भाव दिसत होते. त्याच्या मनात काय सुरू आहे ते ती समजली . तो तिच्याजवळ हळूहळू येत होता. ती एकेक पाऊल टाकत मागे मागे जात होती. ती मागे भिंतीला जाऊन धडकली ,आता तिला मागे जायला जागा नव्हती . ती भिंतीला चिटकुन उभी होती . तो अगदी तिच्या पुढ्यात जवळ येऊन उभा राहिला. एकटक तिच्या डोळ्यात बघत होता. त्याला असे आपल्या खूप जवळ बघून आणि त्याची ती प्रेमळ नजर बघून तिच्या हृदयाची धडधड आता खूप वाढली होती. त्याने तिच्या दोन्ही बाजूंनी त्याचे हात भिंतीवर टेकवले, त्यामुळे आता तिला जागेवरून हलता ही येत नव्हते ,आता तो तिच्या आणखी जवळ जाऊ लागला. जसजसा तो जवळ येत होता तसतशी तिची धडधड अजूनच वाढत होती . त्याने आता त्याच लक्ष तिच्या गुलाबी ओठांवर केंद्रित केले. त्याचे ओठ आता अगदी तिच्या ओठाजवळ आले होते. तिचे ओठ थरथरत होते. स्वतःचा श्वास रोखून ती त्याच्या कडे बघत होती. त्याचे श्वास तिला तिच्या कानाजवळ , गालांवर जाणवत होते , इतक्या तो तिच्या जवळ आला होता . तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवणार तेवढयात तिने तिची मान पलीकडे वळवली , त्यामुळे त्याचा किस तिच्या गालावर झाला. आणि तिने रोखून ठेवलेला श्वास सोडला..

" हे काय यार ,नंदू असं कोण करतं का?" , शरू नाटकी रागात बोलला...
त्याला असा रागात बघून नंदू हसत होती...

" प्लीज! फक्त एक !" शरू

" नाही!" ....मान हलवत...नंदू

" छोटीशी !" ,, शरू डोळे बारीक करत तिला बघत बोलला.

" छोटी नाही, मोठी नाही , जा आता..... वाट बघतात आहेत ना सगळे तुझी!" ...नंदू त्याला पाठीला ढकलत बोलली

" माझी पहिली किस तुला देणार होतो . जाऊ दे आता तिकडेच ट्राय करावं लागेल. तसेही खूप मुली लाईन मध्ये मागे आहेतच ", तो तिची मस्करी करत बोलला...

ते ऐकून , ती त्वेषाने त्याच्या जवळ गेली, दोन्ही हाताने त्याची शर्टची कॉलर पकडत त्याला स्वतःजवळ ओढलं , डोळे मोठे करत , त्याच्या डोळ्यात बघत ," मी नी फक्त मीच असेल, आताही नी नंतरही ! दुसरी तिसरीचा विचार सुद्धा आणला ना मनात तर तुला कच्च खाईल हा ?" , नंदू रागात बोलली.

त्याला त्याचावर तिचा असे अधिकार गाजवणे खूप आवडलं होतं . तो तिच्याकडे बघत गालातच हसला .

" कधी......?" , शरू तिची मस्करी करत हसत बोलला..

"तुला मस्करी सुचते आहे?".म्हणत ती त्याला मारायला त्याचा पाठीमागे धावली. तो पुढे ती त्याच्या मागे धावत होती ..तो पळतच खाली आला. ती त्याच्या पाठी आली. दोघांना असे हसतांना , बागडताना बघून आजी आबांना पण बरे वाटले. पळतच तो त्याच्या घरी गेला...

नंदू त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनातच, " अभी तो पुरी रात बाकी है, माझ्या राजा..." , आणि स्वतःशीच हसली...

*****

क्रमशः

*********

🎭 Series Post

View all