Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 87

Read Later
नंदिनी...श्वास माझा 87

 

©️®️ मेघा अमोल

[email protected]

 

( आधीच्या भागात : नंदिनी राहुलच्या लग्नासाठी तयार होते.... मंगळसूत्र , भांगेत कुंकू ... ती नववधू प्रमाणे दिसत होती .. त्यात त्यांचा झालेला किस...तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली असते....सेम तसेच राजच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप आनंद पसरला असतो ... त्या दोघांना बघून घरातील सगळे खूप खुश होतात...राज लग्नात इतका बिनधास्त मस्ती करत असतो की सगळ्यांना त्यांचा आधीचा राज आठवत असतो.. त्यांचा आधीचा राज परत मिळलल्याने सगळेच खुश असतात... राहुलचं लग्न , सप्तपदी , जेवणं सगळं व्यवस्थित पार पडते. आता पुढे.....)

 

भाग 86

 

लग्नाच्या विधी सगळ्याच आटोपल्या होत्या ... सकाळचं लवकर मुहूर्त असल्यामुळे सगळं लवकर आटोपले .... आतापर्यंत सुरू असलेली गडबड आता थोडी मंदावली होती. सगळ्यांची जेवणं आटोपली होती...आता मात्र पाहुणे थोडे सुस्तावत होते...मोठी मंडळी थोडा आराम करायला म्हणून आपापल्या रूममध्ये गेली.....काही लोकं ग्रुप ग्रुपने बसून गप्पा मारत होते .. .. लहान आणि तरुण मंडळी  तिथेच गोंधळ घालत होते ....

 

नंदिनी पण फ्रेश होऊन आली होती....सकाळपासून साडी , दागिने मिरवून ती भारीच थकली होती....आता तिने लाईट व्हाइटीश जांभळा स्ट्रेट कटचा स्लीवलेस कॉटन सिल्कचा कुर्ता चुडीदार , त्यावर रेड नाजूक बॉर्डर असलेली ओढणी ... केसं मागे घेऊन अर्धे पिनप करून मोकळे सोडले होते ... मेकप सगळाच पुसला होता.... कपाळावर तिची आवडती चंद्रकोर , कानात छोटे टॉप्स , हातात मात्र हातभर हिरव्या काचेच्या  बांगड्या ....आणि गळ्यात मंगळसूत्र .... सडपात कमनीय  बांधा... नितळ चेहरा  ... कॉलेज जाणारी मुलगी वाटत होती ती .... नंदिनीला बघून असे वाटत होते लहान वयात लग्न झाले आहे.... खूप अशी गोड ती दिसत होती... राजने सुद्धा आता जीन्स पँट आणि सिंपल कॉटन शर्ट घातला होता... तो पण त्यात कूल अँड हँडसम दिसत होता...कुठेच तो मोठा फेमस बिजनेसमन वाटत नव्हता.... एकदम साधा सिंपल मुलगा दिसत होता.... रेगुलर व्यायाममुळे त्याची बॉडी मेन्टेन होती ... राजनंदिनी एकदम जोडात जोड दिसत होते ....

 

" नंदिनी , तू तुझ्या अमेरिकाच्या मित्रांसोबत भेट नाही करून दिली..... .. त्यांना मला thank you म्हणायचं आहे ....चल मीच ओळख करून घेतो ...."....राज

 

" Thank you ?.." .. नंदिनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती .

 

" हा.... त्यांच्यामुळेच मला इकडे तुझी काळजी नव्हती....म्हणजे तू स्वतःची काळजी घेऊ शकते, पण संगत पण खूप महत्वाची असते  ..... स्पेशली ती तुझी मैत्रीण शैला .... " ...राज

 

तशी नंदिनी हसली....वेळोवेळी नंदिनीने त्याला शैला आणि बाकी सगळे तिला कशी मदत करतात वैगरे राजला सांगितले होते...त्यामुळे हळूहळू नंदिनी बद्दलची त्याची काळजी कमी झाली होती. ... बोलत बोलत ते दोघंही तिचे मित्र बसले होते तिथे आले ...

 

कालच्या संगितच्या गडबडीपासून , नंतर नंदिनीला ताप, मग लग्नाची धावपळ ... नंदिनीच्या मित्रांकडे त्याचं थोडं दुर्लक्ष झाले होते....

 

" Hello Guys .... Sorry तुम्हाला भेटायला थोडा उशीर झाला ....".... राज त्यांच्याजवळ येत बोलला.

 

" It's okay sir .... We can understand ". ..... जय

 

नंदिनीने सगळ्यांसोबत राजची ओळख करून दिली.... सगळ्यांना राजला भेटून खूप छान वाटत होते...शैला  तर त्याला फॉलो करतच होते .... त्यामुळे त्यांचा आयडॉल समोर बघून त्यांना खूप आनंद झाला होता ...

 

" तुम्ही ..... श्रद्धाची सिस्टर .... राईट?" ... राज शैलाकडे बघत काही आठवत बोलला .

 

" Oh God , तुम्हाला आठवते ..... Great ".... शैला

 

" परदेशात  तुमची फॅमिलीने अगदी घरच्यासारखे आपलेपण  दिले होते ..... विसरणे अशक्यच , श्रद्धा कशी आहे ? "..... राज

 

" ताई मजेत .... लग्न झालंय , दोन क्यूट मुलं आहेत .... She is happy in her life "..... शैला

 

" Good , she deserves ....."..... राज

 

बाकी अमेरिकन मुलांसोबत काही  अवांतर थोड्या गप्पा झाल्या ...... त्यांना लग्न खूप आवडले होते ....

 

" I want to confess something ......"..... जय राजला बोलला ...

 

सगळे त्याच्याकडे बघत होते...राज नंदिनी प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत होता... ..

 

" मला माहिती नाही नंदिनिने तुम्हाला सांगितले की नाही , पण मी सांगतो.... मी खूप jealous feel करत होतो तुमच्या बाबत ....मी नंदिनीला प्रपोज केले होते ... .. जेव्ह मला कळले  तुम्ही नंदिनीचे हजबंड आहात , तेव्हापासून मला तुम्ही अजिबात आवडत नव्हता ....आणि नंदिनी blindly तुमच्यावर विश्वास ठेवते..... आणि मला वाटत होते की तुम्ही नंदिनीला फसवत आहात,  धोका देत आहात...कारण तेव्हा ती मला हॅप्पी नव्हती वाटली , काहीतरी टेन्शनमध्ये वाटायची ती मला नेहमी .... आणि आता पण मी लग्नाचा बहाणा करून हेच बघायला आलो होतो ....  "..... जय

 

त्याचं बोलणं ऐकून सगळे शॉक झाले ...

 

" जय , अरे हे काय .....".....नंदिनी

 

" Let me finish Nandini ..... "..... जय

 

राजने पण तिला इशारा केला तशी ती चूप झाली

 

जय बोलत होता तर नंदिनी राजाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होती.... राज हे ऐकून कसा रिॲक्ट करेल असेच तिला वाटत होते... कारण तिने ही गोष्ट त्याला सांगितली नव्हती....

 

" मला वाटत होते माझ्यासारखं प्रेम नंदिनिवर कोणी दुसरं करू शकत नाही ....But I was totally wrong ..... you teach us the exact difference between "Like" and "Love" ....Thank you Sir ......"..... जय

 

राज त्याचं बोलणं ऐकून गोड हसला... " नंदिनी आहेच अशी की ती सगळ्यांना आवडते......  "..... राज

 

जयचे  असे सांगून सुद्धा राज चिडला  नव्हता,  त्याचा असा पॉझिटिव रिप्लाय बघून सगळेच भारावून गेले.

 

" You are the bestest couple I ever seen... Just made for each other ...."... शैला

 

" thank you ...."....

 

" भारतात आलो आहोत  तर आम्हाला राजस्थान आणि द्वारका बघायला  जायचं आहे .. आम्ही आता निघतो"....शैला

 

" आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद .... "... राज

 

" Can I hug her  ?".... जय राजकडे बघून बोलला ..

 

नंदिनीने एकदा राजकडे बघितले ..... तो तिच्याकडे बघून गोड हसला...." It's her life... always  respect her  decisions ..... "

 

नंदिनी जयला हग केले ...

 

" Stay  Happy always "..... जय ....

 

नंदिनीचे  फ्रेंड सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघाले...

 

इकडे  आता रश्मीच्या पाठवण्याची तयारी सुरू होती .... सगळे नातेवाईक आपापलं सामान व्होल्व्हो बसमध्ये भरून घेत होते ...

 

कितीही ठरवलं आनंदाच्या क्षणी रडायचं नाही ... लग्न म्हणजे आयुष्याची नव्याने सुरूवात ... नवी सुरूवात रडून नाही करायची तरी सुद्धा मुलीला, तिच्या घरच्यांना मुलगी सासरी जायला निघाली की भावना अनावर होतात  .... रश्मी आणि तिच्या घरच्यांचे सुद्धा तेच सुरू होते .... नंदिनी एकटी एका कॉर्नरला उभी हे सगळं बघत होती.... आणि रश्मीला बघून  नकळत तिच्या डोळ्यांतून सुद्धा अश्रू येत होते .... तिला सुद्धा ते बघून गहिवरून आले होते ... राजचे तिच्याकडे लक्ष गेलं तसा तो तिच्या जवळ येत एका साईडने  तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतले...

 

" ही खूप वाईट प्रथा आहे .... मला अजिबात नाही आवडली.....".....नंदिनी डोळे पुसत त्याच्याकडे बघत बोलली

 

" मला पण नाही आवडली ".....राज

 

" मुलींनीच का जायचं नेहमी सासरी ?.... तिनंच का सोडावे आपल्या आई बाबांना...? जसे मुलाला आपले आईबाबा हवे असतात तसेच मुलीला पण हवे असतात ना ..... जसे मुलाच्या आईवडिलांना वाटते आपला मुलगा आपल्या जवळ असावा तसेच मुलीच्या पण आईवडिलांना वाटत असेल ना  .....मुलगी आहे म्हणून आपल्या परीवाराबद्दल  तिच्या भावना मुलापेक्षा वेगळ्या असतील काय?  ... " ..... नंदिनी केविलवाण्या सुरात बोलत होती ...

 

" आपण जायचं आजी आबाकडे? तिथेच राहूया  "..... राज

 

" पण मग इकडे ?? आजीसाहेब , आबा , आई बाबा काकी राहुल....सगळेच आहेत .... कसं जाणार ? "..... नंदिनी

 

" बघ यातच उत्तर आहे तुझं ..... तुम्ही मुली असतातच अशा की जिथे पण जाता  , ईझिली मिक्स होता.... लवकरच नवीन घर तुम्ही आपलंसं करता .... तुमची सहनशक्ती , अडजस्टमेंट करणे...तुमच्यातली स्त्रीशक्ती  खूप भारी आहे.... आम्हा मुलांना हे सगळं खूप कठीण आहे .... हे सगळं जाणून आपल्या पूर्वजांनी कदाचित ही प्रथा सुरू केली असावी...." ..... राज

 

"हे ठीक आहे ,  पण मी आपल्या मुलीला नाही जाऊ देणार  .... "..... परत तिचा केविलवाणा सुर निघाला ..... राज मात्र शांतपणे पण खूप स्वप्नवत नजरेने तिच्याकडे बघत होता ... त्याच्या डोळ्यात चमकत आहे असे तिला त्याला बघून वाटले ...

 

" काय झालं ?  असा काय बघतोय ? " .....नंदिनी

 

" काही नाही ....".... राजने आपली नजर वळवली....

 

" तुझ्या डोळ्यात काहीतरी होते... काहीतरी खास ...... बोलना ..... "..... राज

 

" तू आपलं भविष्य किती सुंदर आहे....ते सांगितले  .... "..... राज

 

" भविष्य .... ?" ..... नंदिनी

 

" आता बोलली ना .... आपली मुलगी ...... ".....राज

 

ते ऐकून तिचे सुद्धा डोळे चमकले .... बोलता बोलता आपण किती पुढले बोलून गेलो तिला आता कळले..... आणि नकळत तिची मान खाली झुकली .... ओठात हसू आणि डोळ्यात गोड लाजणं.... तिला परत त्याला नजर मिळवणं कठीण जात होतं....

 

" किती गोड आहे ही.... आताच रडत होती, काही गोष्टींचा तिला त्रास होत होता ... आणि आताच गोड भविष्याची स्वप्न बघत हसायला सुद्धा लागली.......खूप मोठं मन असतं या मुलींचं..."..... राज तिच्याकडे बघत विचार करत होता......

 

समोर एक फुलांनी सजलेली कार येऊन उभी राहिली....

 

काकींनी रश्मीच्या आईला समजावून रश्मी सुखात राहील हे आश्वासन दिले....सगळ्यांचा प्रेमाचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन रश्मी राहुल  कारमध्ये बसले...... देशमुख परिवाराने सुद्धा देसाई परिवाराचा निरोप घेतला...आणि बसमध्ये बसले...... राहुलच्या कारच्या पाठोपाठ बस निघाली .....

 

" रश्मी ठीक आहेस ना ...?  " ...राहुल

 

" ह्मम .... डोकं दुखतेय थोडं .....".....रश्मी

 

" इतकं रडशील तर असेच होणार आहे ......... ".... राहुल

 

" ते आपोआप झाले.... मी मुद्दाम थोडे रडले....."...रश्मी

 

" हो .... आता तुझं संपलं रडणं  ... माझं सुरू होणार डोकं दुखणं .....".... राहूल

 

" राहुल........."...... रश्मीला खूप हसू आले....ती त्याला मारू लागली .... त्याने पण हसतच तिला आपल्या कुशीत घेतले...तिच्या केसांमधून मायेने हात फिरवत होता ... थोड्या वेळातच तिला झोप लागली..

 

बसमध्ये राज नंदिनी सगळ्यात शेवटी बसले होते .... सुरुवातीला थोड्या गप्पा , मजा मस्ती झाली ... पण हळूहळू सगळे पेंगायला लागले होते..... येतांना नंदिनी जेवढी उत्साहात होते.... तेवढीच आता शांत होती... सीटला मागे टेकून ती सगळ्यांच्या गप्पा ऐकत होती .. आणि कधीतरी तिचा डोळा लागला... राजचे लक्ष गेले..... त्यानें तिच्या माने मागून हात हात घालत तिला आपल्या कुशीत घेतले.... ती पण त्याच्या कुशीत स्वस्थ झोपली.

 

रात्री नऊच्या  दरम्यान  गाड्या देशमुख विला समोर येऊन थांबल्या... पूर्ण घर लायटिंग आणि फुलांच्या हारांनी सजले होते.... मेन गेट पासून आतमध्ये घराच्या मुख्य दारापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या...सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली होती........ देशमुखांचे घर नवीन सुनेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते .... आज ती निर्जीव वास्तू पण खूप बोलकी दिसत होती....

 

राहूल रश्मी मेन गेटमध्ये येऊन उभे राहिले...ते सगळं बघून रश्मीला खूप आनंद झाला..... सुनेचं असे सुद्धा स्वागत होऊ शकते... तिने तिच्याकडे झालेल्या एकही लग्नात बघितले नव्हते... त्यामुळे ते सगळंच बघून तिचं मन भारावून आले आणि आपण या सगळ्यांसाठी किती महत्वाचं आहे हे सुद्धा तिला कळले होते... फुलांच्या पायघड्यांवरून राहुल रश्मी दोघंही आतमध्ये येत घरच्या मुख्य द्वाराजवळ येऊन थांबले... त्यांच्या मागून बाकी सगळे आले....

 

दारात उंबरठ्याच्या पलीकडे  खूप सुंदर सजवलेले माप ठेवले होते... समोर काकी , आई , एका साईडला आजीसाहेब आणि घरातील इतर स्त्रिया प्रसन्न चेहऱ्याने हातात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या .... काकीने राहुल रश्मीचे औक्षण केले.... परत उखण्यांचा एक छोटासा कार्यक्रम पार पडला.... राहुलच्या बहिणींनी दोघांना दारात अडवले... मग राहुलने त्यांची सगळी मागणी पूर्ण केली... रश्मीने माप ओलांडून गृह प्रवेश केला.... सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले....

 

राहुल रश्मी आतमध्ये गेले...तसे त्यांच्या मागोमाग राज आणि त्याच्या पाठी  नंदिनी सुद्धा आतमध्ये येत होती ... आजीसाहेबांनी त्या दोघांना तिथेच दारात अडवले ....

 

आजीसाहेब घरात येऊ नाही देत आहे बघून ..आपण काही गडबड केली की काय असा विचार नंदिनीच्या डोक्यात सुरू होता ... ती थोडी घाबरली.... राजच्या हाताच्या दंडाला पकडत ती  मागे लपत होती ..आणि त्याच्या खांद्यांच्या मागून डोकावत पुढे बघत होती....राजला पण काही कळत नव्हते ... तो पण त्यांचं काय सुरू आहे ते बघत होता...
 

 

" नंदिनीने  या घरात आपलं मुलीचं स्थान कधीचेच  निर्माण केले आहे ... त्या  या घरची मुलगी तर आहेच .... पण आज त्या माझा नातवाची राजची  बायको , या घरची सून बनून आल्या  आहे.... या घरच्या लक्ष्मी आहेत.... सूनबाई ...."... आजीसाहेबांनी आईंना इशारा केला....... तसे त्या परत औक्षणचे ताट घेऊन आल्या...

 

' राजची बायको '... हे शब्द ऐकून नंदिनीला आता खूप लाजल्यासारखे होत होते... ती लाजेने राजच्या मागे आपला चेहरा लपवत होती

 

" भारीच लाजयाला लागल्या या ........ सकाळपासून लाजण्यात कळस गाठला यांनी ...आम्ही कधीच नंदिनीला असे लाजातांना बघितले नव्हते.....".... आजीसाहेब नंदिनीची गंमत करत होत्या....

 

" आजपर्यंत असे काही घडले सुद्धा नव्हते ना राजच्या बायको सोबत ......".... काकीने आजीसाहेबांच्या बोलण्याला दुजोरा दिला..

 

ते सगळं ऐकून तर आता तिला आता कुठे चेहरा लपवू असे होत होते.... राजच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू पसरले....त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला हळूच पुढे आपल्या बाजूला   आणत आपल्या सोबतीने उभे केले...

 

आईने हळदकुंकू लावत त्यांचे औक्षण केले... भाकरीचा तुकडा ओवळला... सगळ्यांनी त्या दोघांना उखाणा घेण्यासाठी आग्रह केला... राजने  छान एक उखाणा घेत नंदिनीचे नाव घेतले....आता नंदिनीची वेळ आली.. ती बराच वेळ विचार करून पुढे बोलली

 

" श्रीराज ".....नंदिनी

 

" अगं उखाणा....".... काकी

 

" श्रीराज या नावातच सगळं आले...  श्रीराज नाव घेण्यासाठी कुठल्याच उपम्याची , कवितेची गरज नाही... श्रीराज स्वतःच एक सुंदर कविता आहे ...शिकवण आहे....."....नंदिनी

 

तिचं बोलणं ऐकून जोऱ्याच्या टाळ्या झाल्या.... ..राजच्या साथीने तिने तिच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश केला.... दोन्ही जोडप्यांनी घरातील सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला....

 

राजनंदिनीने सुद्धा सगळ्यांना नमस्कार केला...पण जेव्हा राजच्या वडिलांना नमस्कार करण्याची वेळ आली तेव्हा मात्र राज मागे हटला... त्याचा अजूनही त्याच्या वडिलांबद्दलचा असलेला राग गेला नव्हता.... राजच्या वडिलांना प्याऱ्यालीसीस झाले होते... ते चालू शकत नव्हते... पण रश्मीच्या प्रयत्नांनी ते बरेच बरे झाले होते....आता ते आधार घेऊन उभे राहू शकत होते....  त्या दिवशी संगीतच्या  कार्यक्रमाच्या वेळी नंदिनीने सांगितलेल्या कथेमुळे ते किती मोठा गुन्हा करायला जात होते हे त्यांना कळले होते...त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती....राजला असे मागे हटलेले बघून त्यांना वाईट वाटत होते... त्याची नाराजी आता त्यांना सहन होत नव्हती....आणि त्यांचे डोळे पाणावले...

 

" राज , बेटा ..... आपल्या वडीलाला  माफ नाही करशील....  देवानं पण मला त्याची शिक्षा दिली आहे... मी खूप चुकीचं वागलो आहे .... मी केलेल्या चुका माफी लायक नाही आहे .... पण तरी सुद्धा एकदाच माफ कर ..... कधी आपल्या मुलाला  जवळ घेतो असे झाले आहे ..... Sorry Raj "....... राजचे वडील सगळ्यांसमोर आपली चूक कबूल करत बोलत होते..... त्यांचा एक एक शब्द राजच्या जिव्हारी लागत होता......त्यांच्या प्रत्येक शब्दाला राजला नंदिनिसोबत घडलेले वाईट त्या गोष्टी आठवत होत्या....त्याच्या वडिलांमुळे तो नंदिनीला गमावून बसला असता...... तो खाली मान घालून चुपचाप उभा होता......आज त्याचे वडील त्याची खरंच मनापासून माफी मागत होते हे त्याला कळत होते... पण ऐवढे वाईट काही घडले होते की त्याचे पाय पुढे धजत नव्हते....  घरातील बाकीचे पण खूप अपेक्षेने त्याच्याकडे बघत होते .. आता घरात सगळंच छान झालं होते फक्त राज आणि शशिकांत मधील संबंध मात्र अजूनही तसेच ताणलेले  होते... ते ठीक झाले तर घर अगदी परिपूर्ण होणार होते...नंदिनीला ते सगळं बघून खूप वाईट वाटत होते...

 

" राज...........".....नंदिनीने त्याचा हात आपल्या हातात घेतला....आणि आर्जवी नजरेने त्याच्याकडे बघत होती.... राजने नकारार्थी मान हलवली...

 

"  तुझे.......आपले बाबा आहेत ते..... सगळ्यांसमोर एक वडील आपल्या मुलाची माफी मागत आहेत.... त्यांची चूक कबूल करत आहेत.....आपली फॅमिली कंप्लीट होईल... Everyone deserves one chance , Raj प्लीज ..... ..... "..... नंदिनी खूप प्रेमाने त्याला समजावत होती.... तिचे शब्द ऐकले आणि तो आपल्या वडिलांच्या गळ्यात जाऊन पडला.....ते  मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवत होते ..

 

" मला खूप गरज होती तुमची..... खूप थकलोय  मी.....पाठीवर तुमच्या हाताची थापेची  गरज होती..... मला गरज होती एका भरभक्कम आधाराची .... माझ्या वडिलांची ......".....राजचा बांध फुटला ... इतकी वर्ष तो जे खूप स्ट्राँग आहे सगळ्यांना भासवत होता ........ ते आज गळून पडलं होते.... तो लहान मुलाप्रमणे आपल्या वडिलांच्या मिठीत रडत होता.......प्रत्येक मुलाचा/ मुलीचा भरभक्कम आधार म्हणजे त्यांचे वडील असतात....वडिलांचं छत्र डोक्यावर आहे म्हटलं की कठीण कठीण प्रसंगांना सामोरे जायला कितीतरी हत्तींच बळ मिळतं...... मुलं कितीही मोठे होऊ देत, आईवडिलांची गरज त्यांना आयुष्यभर असते........जसे त्याच्या वडिलांनी राजच्या पाठीवर हात ठेवला तसे त्याच्यावर असलेले  ओझे त्याला हलके भासू लागले........ त्याला बघून सगळ्यांची मन भरून आले होते...

 

फ्रेश व्हायला सगळे आपापल्या रूममध्ये निघून आले....

 

नंदिनी फ्रेश होऊन आरसा समोर येऊन बसली...आणि आपले केस नीट करत होती... तेवढयात तिला विसल (शीट्टी ) मारण्याचा आवाज आला.... मागे वळून बघते तर राज तिला बघत उभा होता...

 

" You are looking so hot ......."..... राज

 

" हां ......?" .......नंदिनी तर अवाक् होत आ फाडत त्याच्याकडे बघत होती..... तिला तसे बघून राजला खूप हसू येत होते... तो तिच्या जवळ गेला आणि त्याने हळूच तिचं उघडं असलेले तोंड बंद केले...तशी ती भानावर आली

 

" तुला मी या कपड्यात हॉट दिसतेय?"....नंदिनी ... नंदिनीने साधं कॉटनचा पायजामा आणि बेबी पिंक कलरची टीशर्ट घातली होती...

 

" कपडोंसे कूछ नही होता मोहरतर्मा , येह सब देखणेवालोंकी नजरोमे होता है.... , By the way you not hot ....."..... राज

 

" काय ...?" ... नंदिनी चिडल्यासारखी त्याला बघत होती .... आणि तिने बाजूला असलेल्या एक पिलो उचलला आणि त्याला मारू लागली ...तो पण आता रूमभर पळत सुटला.....थोड्या वेळात दोघंही  एकमेकांना उषांनी मारत बेडवर उड्या मारत होते..... दोघांचं चांगलाच गोंधळ सुरू होता ... 

 

" हे काय सुरू आहे?"...... आजीसाहेब , ज्या तिथून जात होत्या त्या यांना मस्ती करतांना बघून थांबल्या... आजीसाहेबंच्या आवाजाने दोघंही शांत होत बेड खाली उतरले... ..

 

" हे काय अजूनही बालिशपणा गेला नाही तुम्हा दोघांचा ....??.. आता आपल्या मुलांसोबत खेळायचे दिवस आणायचे सोडून अजूनही तुम्हीच मस्ती करताय..... लहान आहात काय आता ..?".....आजीसाहेब

 

" आजीसाहेब , दिल तो बच्चा है जी .... आयुष्यात सुंदर आणि आनंद  हवा असेल तर आपल्यातल्या निरागस बालकाला जिवंत ठेवावं लागतं....आणि काळजी करू नका आम्ही दोनचे तीन झाल्यावर तिघही मिळून बेडवर अशीच मस्ती करू........" ... राज

 

ते सगळं ऐकून नंदिनिने पिलो मागे आपला चेहरा लपवला...." राज पण ना काय काय बोलतो.... ते पण आजीसाहेंबासमोर ....शी बाबा .... "

 

त्याची नौटंकी बघून आजीसाहेंबानना खूप हसू आले....

 

" बरं चालू द्या तुमचं........आणि हो तीनाचे चार- पाच झालात तरी आम्हाला चालेल बरं का ...... नाही म्हणजे चौघांना उड्या मारता येईल , असा मोठा बेड मागाऊ देऊ , काळजी नको  .....". ...आजीसाहेंब हसत हसत तिथून निघून गेल्या..... आजीसाहेवांनी फेकलेली गुगली त्याच्यावर भारी पडली होती .. केसंमधून हात फिरवत तो स्वतःशीच हसत होता ..

 

आजी साहेबांचे बोलणे ऐकून तर नंदिनीच्या पोटात गोळा आला ...." पाच....?...की तीन..... बापरे......"

 

राजने तिने पकडलेला पिलो खाली करत होता.... ती मात्र तो सोडत नव्हती....

 

" नंदिनी ...... तू हॉट नाही सुपर हॉट आहेस......"..... राज

 

" राज, खोटं बोलू नको  .......नाहीतर  मार खाशील आता....."...ती पिलो मागूनच बोलत होती

 

" I am serious...."..... राज

 

नंदिनीला त्याचे बोलणे ऐकून पोटात फुलपाखरू उडत आहे असे वाटत होते ..... तो तिच्या हातातली उशी काढणार तेवढयात काकींचा आवाज आला... तशी नंदिनीने उशी फेकली आणि लाजतच तिथून पळाली....

 

" घरचे पण ना ...... एक्झॅक्ट मोमेंटला गडबड करतात..... लाजतच तो बेडवर आडवा झाला...

 

रश्मीची  पहिली रात्र, उद्या पूजा होई पर्यंत ती राहुल सोबत नव्हती राहू शकत, त्यात येवढे पाहुणे , रश्मीला अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून काकींनी नंदिनीला  रशमिकडे लक्ष द्यायला सांगितले होते.....सगळी सोय करून रूममध्ये येईपर्यंत नंदिनीला बराच वेळ झाला होता.... आतमध्ये येऊन बघते तर राज घोरत झोपला होता.... त्याची सगळी मस्ती आठवत आठवत तिचा पण डोळा लागला....

 

******

 

सकाळी पूजेची गडबड सुरू होती.... पूजेसाठी महाराज लवकरच येणार होते .... त्या नंतर संध्याकाळी  रिसेप्शन  होणार होते.... नंदिनी पटापट तयार होऊन खाली मदतीला गेली होती...

 

राहुल रश्मी दोघंही छान पारंपरिक पद्धतीने तयार झाले....रश्मीचे आई बाबा, ऋची आणि बाकी नातेवाईक मंडळी पूजेसाठी म्हणून आले होते...

 

सकाळपासून राजला नंदिनी भेटली नव्हती....त्याचा जीव तिच्यासाठी झुरत होता.... आणि ती आहे की कामात लागली होती..... नंदिनी आज सुद्धा खूप सुंदर दिसत होती....तिने काठपदरी आंबा रंगाची पैठणी नेसली होती...त्यावर साजेसे दागिने .... ती कामात बडबडत येत होती की अचानक कोणीतरी तिचा हात ओढला.... आणि झटकन रूमचा दरवाजा बंद केला

 

अचानकपणे झाल्यामुळे ती ओरडणाराच होती की त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला...

 

"Shssss,  मी आहो "....

 

" राज ...... हे आपल्याच घरात असे कोणी kidnap करतं काय ?".....नंदिनी खुस्पुसत हळू आवाजात बोलली

 

" तशीच वेळ आणून ठेवलीय तू माझ्यावर..... सकाळपासून शोधतोय..... पण या देवीचे दर्शन दुर्लभ झाले आहे.......".... राज

 

" काही काय बदबडतोय..... "....नंदिनी

 

" नाहीतर काय, सकाळी उठल्या बरोबर आज मला तुझा चेहरा बघायचा होता..... पण नाही....तुम्ही गायब "..... राज

 

" राज, घरी पूजा आहे .....लवकर उठावे तर...... ".....नंदिनी बोलतच होती की तिला तिच्या कंबरेवर गरम हातांचा स्पर्श जाणवला.......आणि बोलता बोलता ती एकदम शांत झाली.... राजने तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला.....आणि तिला बघत होता.... त्याची नजर तिला अस्वस्थ करत होती....पोटात  कळ आल्यासारखे तिला वाटत होते ... अंगावर रोमांच उठत होते ... .

 

" रा...... ज....... का ..... य.... कर...." .....ती कशीबशी बोलायचा प्रयत्न करत होती ....पण तिचे शब्द सुद्धा तिचे आता वैरी झाले होते ..

 

" माझ्या नंदिनीला , माझ्या बायकोला बघतोय ...".... राज

 

" राज, वाट बघत असतील....."....नंदिनी

 

" बघू दे .....".... राज

 

आता ती सुद्धा त्याच्या नजरेत कैद झाली होती....

 

" नंदिनी sss ....." ....कोणीतरी आवाज देत दार ठोकले तशी तिची तंद्री सुटली...

 

" तू खूप बदमाश झालास ....".... तिने त्याला ढकलले आणि बाहेर पळाली......

 

" नंदिनी , this is not fare...... सोडणार नाही मी तुला...." ....

 

पूजा यथासांग छान पार पडली.... थोडा आराम करून सगळे संध्याकाळच्या रिसेप्शन पार्टीसाठी तयार झाले..... पार्टीसाठी सगळे मोठमोठे बिजनसमन , शहरातील सगळी प्रतिष्ठित मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते.... आणि स्वयंआमंत्रित मीडिया सुद्धा हजर होती...

 

एका मोठ्या हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती....एक एक करून सगळे आतमध्ये पोहचले होते....मीडिया येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रश्न विचारत होती...

 

आणि शेवटी मीडिया ज्यांची वाट बघत होती ती वेळ आली... आता राज नंदिनी सुद्धा तिथे पोहचले होते. .... राजने ब्लॅक सूट ...तर नंदिनीने लाँग हेवी पण सोबर work असलेला  गाउन घातला होता... सिंपल मेकप... दागिने अजिबात नाही..... फक्त गळ्यात नाजूक मंगळसूत्र घातले होते... दोघंही एकदम परफेक्ट एकमेकांना कम्पलीमेंट करत होते.... मीडियाने त्या दोघांना घेरलेच... फोटो आणि प्रश्न सुरू होते ..नंदिनी पण खूप कॉन्फिडन्सने सगळे उत्तर देत होती..... ... Mr and Mrs Shriraj Deshmukh म्हणून आज खऱ्या अर्थाने दोघंही जगा समोर आले होते....

 

आतमध्ये राजच्या कंपनीचा स्टाफ पण नंदिनीला राजची बायको म्हणून बघून आश्चर्य चकित झाला होता...

 

"मी म्हणाले होते, ती खूप स्मार्ट आहे ..... शेवटी तिने गटावलेच बॉसला....."...एक office ची मुलगी

 

" हो , आणि sir म्हणे कुणा मुलीला भाव नाही देत.... बघत नाही......married आहेत...... नाहीतर आपण काय कमी होतो काय...."...दुसरी

 

" या मोठ्या लोकांचं असेच असते ... दाखवतात एक आणि वागतात वेगळे.....".....

 

" नंदिनी पण भारी चंट निघाली, आणि तिचे एज्युकेशन नसतांना सुद्धा तिला जॉब मिळाला होता.....हेच कारण असेल...आणि म्हणे आपल्या कंपनीमध्ये वशिला चालत नाही .. ".....

 

" त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत.... "....mr ठाकूर..

 

तश्या त्या मुली शॉक झाल्या.....

 

" नंदिनी मॅडम जॉब जॉईन करायच्या आधीपासून  नंदिनी मॅडमच देशमुख सरांच्या वाइफ आहेत..... आणि त्यांनी कोणतेच रुल तोडले नव्हते...." .... मि ठाकूर

 

आता मात्र त्या मुलींना स्वतची लायकी कळली होती....

 

रिसेप्शनचा कार्यक्रम जोशात पार पडला....

 

.........

 

रश्मीने रूममध्ये एंट्री केली तर तिच्या हृदयात गोड धस्स झाले..... पूर्ण रूम फुलांनी सजवलेली होती.... राहुल रशमीची मधुचंद्राची रात्र.... 

 

नंदिनी रूममध्ये आली तर तिला बेडवर एक बॉक्स आणि लेटर दिसले...

 

स्वीटहार्ट....

 

तयार होऊन वरती टेरेस वर ये.....

 

वाट बघतोय...

 

........... श्रीराज

 

नंदिनीने बॉक्स उघडला तर त्यात  व्हाइटिष पिंक रंगाची खूप सुंदर अशी  नेटची साडी होती.....

 

साडी, सिंगल स्ट्रिप चे ब्लॉउज्...केस मोकळे , छोटी स्टोनची टिकली ...डोळ्यात थोडं काजळ , ओठांवर साजेसे लिपस्टिक , कानात डायमंड  कानातले...... आरसामध्ये स्वतलाच बघून लाजली.......नंदिनी तयार झाली........आणि राजने सांगितल्या प्रमाणे ती वरती टेरेसवर गेली... एक एक पायरी चढताना तिला धडधड तर होत होती....पण राजला भेटायची ओढ पण लागली होती.....आणि शेवटी ती वरती पोहचली..... वरचे दृश्य बघून ती शॉक झाली..... डोळे दिपून टाकणारे सौंदर्य होते.... मधून मधून फुलांनी सजवलेले खांब ,....मंद लाईटचा प्रकाश .....रात्रीची  मोकळी फ्रेश हवा वाहत होती ...त्यात झाडांची अधूनमधून येणारी सळसळ....समुद्राचा येणारा खळझळणारा आवाज ...... सगळंच वातावरण खूप रोमँटिक वाटत होते.... ती सगळं बघतच होती की तिला टेरेसचं दार बंद करण्याचा आवाज आला .... तिने वळून बघितले तर राज उभा होता....तो पण खूप छान दिसत होता.... त्याने तिला मॅच होणारा साधा शर्ट....शर्टच्या वरच्या दोन बटन ओपन.... स्लीव फोल्ड केलेल्या .... व्हाइट कॉटन पँट....हातात वॉच.......आणि डोळ्यात चमक....जी नंदिनीला त्याच्याकडे खेचत होती. ते त्याच्या  लक्षात येऊ नये म्हणून नंदिनिने आपली नजर वळवली.

 

" बापरे तू तर रात्रभर जगायचीच सोय केलेली आहे ..."....नंदिनी बाजूला ठेवलेल्या खाऊकडे बघत बोलली.बाजूला एका टेबलवर नंदिनीला आवडणारा सगळा खाऊ, लाडू , चिवडा , चकली , चॉकलेट.....इत्यादी सगळं ठेवले होते.......

 

" हो , आज जगायचेच  आहे ...... "....राज

 

नंदिनी अवघडल्या प्रमाणे प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत होती...... त्याला पण आपण घाईत काय बोलून गेलो ....आता तो ब्लश करत होता ..

 

" तुझी आवडती night out आहे ही.... तुला नेहमीच असे टेरेसवर गप्पा करायला आवडत होते ...तिकडे गावाकडे  खाऊच्या अश्या बरण्या , छता वरील  मोकळी रात्र , रात्रीचं चांदणं , आपण दोघं...आणि खूप साऱ्या गप्पा..... "....राज

 

राजचे बोलणं ऐकून तिचे अवघडलेपण दूर झाले....

 

" अजून काय आवडायचे मला....?"....नंदिनी

 

" सगळंच सांगणार आहे......"....म्हणत त्याने तिला हात दिला....तिने सुद्धा आपलं हात त्याच्या हातात दिलं.. .. बाजूला असलेल्या एका सोफ्यावर जाऊन बसला... अगदी लहानपणापासून तिच्या आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी तो तिला सांगत होता.... लहानपणीच्या तिला आठवत नसलेल्या सगळ्या आठवणी , मस्ती , तारुण्याच्या गोष्टी असे सगळं तो तिला सांगत होता.... सांगता सांगता तो तिच्या अठरव्या वाढदिवस बद्दल सांगायला लागला  .. आणि गप्पांच्या ओघात तो विसरला होता ती गोष्ट त्याला आठवली... आणि त्याने तेच आपल्या खिशातून एक छोटा बॉक्स काढला , त्यातले  हार्ट शेप डायमंडचे लॉकेट त्याने तिचा पुढे धरले....

 

" मी माझं प्रेम तुझ्यापुढे व्यक्त केले होते... तेव्हा हे तुला घातले होते......आता घालू शकतो?"...राज

 

नंदिनी ते बघून हसली आणि मानेनेच होकार दिला....

 

राज तिच्या मागे जाऊन उभा राहिला....त्याने अलगद तिच्या मानेवरील केस बाजूला केले...आणि ते लॉकेट तिच्या गळ्यात घातले.....त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातून वीज सळसळली.....आणि ती लगेच वळून त्याच्या मिठीत शिरली.....

 

" I love you Nandini ..."... तो तिच्या डोक्यावर किस करत  कानाजवळ जात बोलला....

 

" डान्स ?".... राज

 

" मुजिक?".....नंदिनी

 

" मला काही वर्षांपूर्वी कोणीतरी म्हटले होते...आपले हार्ट बिट्सच मुजिक इतकं सुंदर आहे की दुसऱ्या कुठल्या मुजिकची गरज नाही...."... राज ,

 

ते ऐकून ती हसली....आणि डान्ससाठी तिने त्याच्या हातात हात दिला... त्याने आपला एक हात तिच्या कंबरेवर आणि दुसऱ्या हातात तिचा हात घेतला.....  हळूवारपणे दोघंही डान्स करत होते .... दोघांची पण नजर एकमेकांमध्ये कैद झाली होती.......दोघांसाठीही जग तिथेच थांबले होते.....कोणीच नव्हतं, फक्त ते दोघं एकमेकांसाठी होते.... वातावरण खूप रोमँटिक झाले होते.   एकमेकांना भुरळ पाडणारी शांतता होती दोघांमध्ये ..

 

नेहमीप्रमाणे नाचता नाचता ती त्याच्या पायांवर चढली.... डान्स मधली तिची आवडती स्टेप.....त्याला त्याची तो अमेरिकेला जाण्यापूर्वी नंदिनी आणि ती एकत्र घालवलेली रात्र आठवली... तेव्हा पण ती अशीच त्याच्या सोबत डान्स करत होती ...आता फक्त तो स्टेप्स घेत होता.... नंदिनी तर त्याला पकडून उभी होती ......

 

नंदिनी इतक्या जवळ होती...त्यात ती खूप सुंदर दिसत होती.....हवेवर उडणारे तिचे रेशमी  केस अधूनमधून त्याच्या चेहऱ्यावर येत त्याला खुणावत  होते ... तिचा शरीराचा गंध त्याला वेडावून सोडत होता.....तिची पण काही वेगळी हालत नव्हती .... त्याचा स्पर्शच तिला मोहित करत होता ....

 

" Nandini , I want you .... माझी होशील ?".... राज

 

त्याचे ते शब्द ऐकले आणि त्याच्या भोवतीची तिची पकड घट्ट झाली.....आणि तिने आपलं तोंड त्याच्या शर्टमध्ये खुपसले ..तिची धडधड ऐवढे वाढली होती  की त्याला स्पष्ट जाणवत होती...... जणूकाही तिच्या हार्ट बिट्स त्याला संमती देत होत्या..... त्याने तिला आपल्या हातांवर उचलत आपल्या कुशीमध्ये घेतले.....तिने पण त्याच्या शर्टच्या कॉलरला पकडून घेतले होते.....चांदण्या प्रकाशात तिचा चेहरा त्याला आणखीच गोड दिसत होता....तिने पण लाजून आपले डोळे बंद करून घेतले....बऱ्याच वेळ तो तिला फक्त न्याहाळत होता... आणि तिथेच एका साइडला खाली बेड अंथरला होता...त्याभोवती पांढरे झिरझिरीत पडदे.....तिथे आणून झोपवले..... एक डोरी ओढली आणि आजूबाजूला  सगळे पडदे खाली पडले.....

 

समर्पण की बेला

आयी रे आयी सजनी

ये दर्पण हैं या तेरा मन हैं

यहाँ भी सजन हैं

वहा भी सजन हैं

मन जिस पे वारा हैं

जान जिसपे वार दे

आज की रात के

सारे अधिकार दे

ना अब वो पराया

ना तु पराई सजनी

समर्पण की बेला

आयी रे आयी सजनी...

मिल ही गयी वो खुशी

थी जो हमारे भाग्य की

अग्निपरीक्षा देके पायी

रात ये सुहाग की

चाँद सितारे अपने मिलन

की देंगे मिसाले

आज इन चरागो से

चलो ये दुआ ले

सेज फूलो की सजाऊ

तम्हे हक हैं

संग तेरे सदिया बिताऊ

तुम्हे हक हैं

 

आणि राजनंदिनीच्या  सुखी संसाराची सुरुवात झाली ...

 

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

 

समाप्त

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️