नंदिनी...श्वास माझा 86

राज नंदिनी

भाग 86

( आधीच्या भागात : नंदिनीला आता बरे वाटत होते. राज तिच्यासाठी एक लेटर लिहून खाली लग्नाची सोय बघायला निघून येतो. नंदिनी जागी होते , फर्स्ट लवत लेटर म्हणून ती खूप खुश होते ....दोघंही लग्नासाठी म्हणून तर होतात. नंदिनी राजच्या रूममध्ये येते आणि त्याच्या पुढे तिच्या लग्नाचं मंगळसूत्र धरते... आता पुढे ....)

भाग 85

" समर्पण " शब्द ऐकला आणि आता पर्यंत रोखून ठेवलेला राजचा   श्वास सुटला ....आपोआप त्याचे डोळे मिटल्या गेले.....

"Sorr........."........त्याचे शब्द पूर्ण व्हायच्या आतच  त्याच्या माने भोवतीची पकड घट्ट झालेली होती ..... त्याचा ओठांवर मऊ रेशमी स्पर्श जाणवला.....आणि क्षणात  त्याचे ओठ लॉक झालेत......

नंदिनीला त्याच्या डोळ्यांमधूनच कळले होते की नक्कीच राजला  वाईट वाटत आहे ....त्याची काहीच चूक नसतांना त्याच्या तोंडून तो सॉरी शब्द पण तिला नकोसा झाला होता...... त्याच्या डोळ्यांतील अश्रू बाहेर यायच्या आधीच तिने त्याचा ओठांवर आपले ओठ टेकवत त्याच्या ओठांचा ताबा मिळावला होता.....

राजचे श्वास जड झाले होते...अचानक नंदिनी अशी जवळ आली होती....त्याला तर काहीच सुचत नव्हते....एक मुलगा असून सुद्धा तिच्या असे जवळ आल्याने त्याच्या हृदयाचे हार्ट बिट्स भयंकर वाढले होते , त्याला त्याच्या भावना कंट्रोल करणं आता खूप जड जात होतं .....आणि आतापर्यंत शांत तो जो तिचा स्पर्श फक्त अनुभवत होता....तो पण तिला आता  प्रतिसाद देऊ लागला....

नंदिनीला श्वास घेणे जड झाले .... तसं तिने त्याला सोडले....आणि   त्याच्या मिठीत शिरली ...... त्याने सुद्धा तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून घेतले....

"  Missed you a lot Nandini...... "

......

लग्नाची वेळ जवळ आली होती....सगळी पाहुणे मंडळी खाली मांडवात जमली होती...... सगळाच महिला मंडळ अप्रतिम दिसत होत्या... पैठणी , शालू , सिल्कच्या विविध रंगांची उधळण झाली होती....त्यात दागिने...सुवासिक गजरे....बांगड्यांचा छनछन आवाज, रुणझुणती पैजण त्या मंगलमय वातावरणाला आणखीच प्रसन्न आणि उत्साही बनवत होते..... कोणी  एकमेकांच्या साडीचे कौतुक तर कोणी हीची साडी माझ्या साडीपेक्षा सुंदर का...म्हणून नाक मुरडत होते.... जेवढ्या त्या नटल्या होत्या तेवढेच विविध रंग त्यांच्या बोलण्यात होते.... 
पुरुष मंडळी मात्र as usual नेहमी सारखेच...कुठेही जा.. त्यांचा बिजनेस, नोकरी आणि शेवटी आवडता  विषय म्हणजे गवर्मेंट , सरकार कशी बरोबर काम करत नाही या गप्पांमध्ये रमलेले.....

राहुल आणि घरातील सगळे तयार झाले होते ... सगळे तिथे वरतीच एका छोटा हॉलमध्ये जमले होते ... इकडे बँड , सनई , चौघडा वाजयाला सुरुवात झाली होती...रश्मी तयार झाली होती...सनई चौघडेच्या आवाजाने तिच्या मनात गोड धडकी भरली होती....तशीच काहीशी स्थिती नंदिनीची झाली होती.....राजचा तो पहिला स्पर्श मंगळसूत्र घालून देताना , पहिला किस (म्हणजे दुसरा होता , पण नंदिनी साठी तो पहिलाच होता ) , तिच्या अंगावर मनावर रोमांच उठत होते....तिला इतकं लाजल्यासारख होत होते की  नजर वर करून राजला बघायची सुद्धा हिम्मत तिला होत नव्हती....

राजच्या रूमच्या दाराला कोणी नॉक करून सगळे वाट बघत आहे सांगितले तेव्हा नंदिनी राजच्या मिठीतुन दूर झाली आणि त्याला न बघताच बाहेर पडली....राज पण तिच्या पाठोपाठ बाहेर आला.... नंदिनी पुढे आणि राज तिच्या साईडने पण थोडा मागे, असे दोघेही सगळे होते तिथे आले.....

नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र, केसांची साधीशी मधून भांग काढलेली लांब वेणी ,  त्यात खूप सारे मोगऱ्याचा फुलांचे गजरे माळले होते ( अर्थातच राजनेच ते माळून दिले होते)त्यात केसांच्या  दोनचार बटा कानाजवळ विसावल्या होत्या.... ...आणि भांगेमध्ये लाल चुटुक कुंकू....कपाळावर  नेहमी पेक्षा थोडी मोठी लाल टिकली ...त्या हिरव्या डोळ्यात काजळ , ओठ तर बिना लिपस्टिकचेच गुलाबी दिसत होते आणि राजच्या प्रेमाच्या स्पर्शाने  गोरीमोरी झालेली ती....तिचा लाल गुलाबी झालेला चेहरा.....आणि लाजरं गोजरं हसू ..........नंदिनीचे ते रूप सगळं काही सांगून गेले....राजचा पण आत्मविश्वासाने भरलेला चेहरा त्यात पण लाजेची थोडी किनार पसरली होती, ओठांवर गोड हसू ....दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळा असा प्रेमाचा रंग पसरला होता.... त्या दोघांना तसे  बघूनच आई ,काकी आजी सगळ्यांना खूप आनंद झाला......

" खूप सुंदर दिसते आहे ,  अगदी नवी नवरी  ....दोघं पण सोबत खूप गोड दिसता.....".....आई नंदिनीच्या चेरहर्यावरून मायेने हाथ फिरवत एकदा राजाकडे बघत बोलल्या ..... राज गालात हसला...

" सूनबाई कानाच्या मागे काजळ लावा नंदिनीच्या....आणि घरी गेल्यावर दोघांचीही दृष्ट काढा.... "..... आजीसाहेब

" हो आईसाहेब "..... नीती (आई)

नंदिनीला ते सगळं ऐकून लाजल्यासारखं झाले ... तिचे गाल ब्लश करत होते...

" अरे बापरे , कोणीतरी लाजयाला पण शिकलं तर ".... काकीने मस्करीची री ओढली...... ते ऐकून नंदिनीला कुठे लपू कुठे नको असे झाले होते आणि ती लगेच आईच्या गळ्यात जाऊन पडली आणि आपला चेहरा लपवला....

" खुश आहे ना ?".....आई

" हो......."......नंदिनी

सगळे ती कशी सुंदर दिसत आहे ... तिला चिडवत राज आणि ती दोघं एकत्र येण्याचा आनंद व्यक्त करत होते.

ते सगळं बघून नंदिनीच्या आजी भाऊक झाल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते .... ते बघून राज त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना जवळ घेतले...

" आजी .... हे काय? "......राज

" आनंदाश्रू आहे रे बाळा .... तुला खुश बघून, हसतांना बघून  खूप आनंद झाला.... मनावरचं ओझं उतरले बघ..... नंदिनी तर खुश होतीच ज्याही परिस्थितीत होती.... पण तुझ्यासाठी मन खूप तुटायचं रे राजा .... तुम्हा दोघांना परत एकत्र बघून आता कुठे शांत वाटत आहे ......असेच आता नेहमी खुश रहा....."......आजी

" हो ..... आणि आता तू पण अजिबात रडायचं नाही .... "...... राज

" हो ....."....आजींनी आपले डोळे पुसले ... " नंदिनीला जुनं काही आठवत नाहीये तर वाईट वाटतं काय?"....आजी

" ह्मम थोडं.... पण तिने माझा स्वीकार केला आहे .... आणि महत्वाचं म्हणजे आता सुद्धा तिचं माझ्यावर तेवढच प्रेम आहे..... मी यातच खुश आहो......"..... राज

" खूप समाधानी वृत्ती आहे तुझी ...... "....आजी त्याच्या गालावर थोपटत बोलल्या...

" आता लग्नाची सगळी कामं आटोपली की एकदा दोघंही या आपल्या गावाला.....किती वर्ष झाले माझा या छोट्या बाळांना घरात हसतांना , खेळताना बघितले नाही .... घर सुद्धा आसुसले आहे तुमच्या आवाजाला , मस्तीला ".....आजी

" हो .... नक्कीच ..... मला पण माझे ते जुने दिवस जगायला आवडेल .....लवकरच येऊ ".....राज

" बरं , चला आता आवरा पटापट ..... मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे ...  देवळात पण जायचं आहे " ..... राजचा आबा

तसे सगळ्यांनी आवरते घेतले.... राहुलचे औक्षावन झाले...

" नंदिनी ... तू पण कर त्याचं औक्षण "...... काकी
पण नंदिनी मात्र आपल्याच तालात...

" ओ राहुलच्या वहिनीसाहेब .... औक्षण करा आपल्या लाडक्या दिराचं "..... काकी

तसे सगळे हसायला लागले आणि नंदिनीला कळले काय झाले ते ... आणि ती पटकन त्याचं औक्षण करायला गेली ....

" वाह वाह रामजी , जोडी क्या बनायी , भैय्या और भाभी को बधाई हो बधाई ......"....नंदिनी राहुलला ओवळत होती तेव्हा तो राजनंदिनी दोघांकडे बघून चिडवत होता

" राहुलSSSS...... शी बाबा सगळे मलाच चिडवत आहात ......".... नंदिनी

" का तुला वहिनी म्हटलेलं आवडलं नाही ?"..... राहूल

नंदिनी लाजातच आपला चेहरा आपल्या हातात लपवत होती.....

" But today I am very Happy..... तू मला माझ्या लग्नाचं बेस्ट गिफ्ट दिलंय...... राजला आनंदी बघून मी खूप खुश आहो.... माझा पहिलावाला भाऊ मला परत मिळाला आहे....आता माझं लग्न मी दुपटीने एन्जॉय करू शकतो...... Thanks a lot my dear Vahini Jaan " ..... राहुल

" Thank you तुझे ..... तुझ्यामुळे मला माझा राज मिळाला आहे ...... you are the best best brother in law......."....नंदिनी राहूलला मिठी मारली....

" हां...... Brother वरून brother in law....??... वाह मस्तच प्रगती आहे... ".....राहुल

" राहूल नको ना ....."......नंदिनी

" बरं हे आमच्या घरातलं डॉन , असं एकदम लाजरंलुजरं छुईमुई कसं काय झालं?  "...... राहूल

" राहूल ssss.......".....नंदिनी

" Happy ना?" .... राहूल

" खूप खूप खूप.......".....नंदिनी

" Stay blessed always  "..... राहूल

.......

सगळे खाली आले ..... राहूल घोडीवर चढला..... राज तर एकदम full on मस्ती मूडमध्ये होता .... तो मुलांच्या घोळक्यात मस्ती करत होता.....नंदिनी मात्र चोरून चोरून त्याला बघत होती....बोलत इकडे होती पण सगळं लक्ष मात्र तिचं राजकडेच होते .... तिला पण आज राज खूप बदलेला दिसत होता.... आज एक वेगळाच राज ती बघत होती..... राजचे पण काही वेगळे सुरू नव्हते...तो होता सगळ्यांमध्ये पण नजर मात्र नंदिनिवर होती ... आणि दोघांची नजरानजर झाली की नंदिनी लाजून नजर वळवायची ....

आँखों की गुस्ताखियाँ माफ हो
इक टुक तुम्हें देखती है
जो बात कहना चाहे ज़ुबां
तुमसे ये वो कहती है

आँखों की शर्मा-ओ-हया माफ हो
तुम्हें देख के छुपती है
उठी आँखे जो बात ना कह सकीं
झुकी आँखें वो कहती है

असाच काय तो दोघांचा नजरानजरचा खेळ सुरू होता....राजला बघितले की तिच्या मनात तर फुलपाखरू अगदी डान्स करायला लागायचे..... त्याची पण काही वेगळी हालत नव्हती.... असं काही सुरू होते जसेकाही दोघंही पहिल्यांदा प्रेमात पडले होते....दोघंही एकमेकांकडे आकर्षित होत होते...

देवदर्शन घेऊन वरात मांडवदारी आली.....तसा बँड , ढोलचा आवाज वाढला... सगळेच भारी जोशमध्ये आले..... लहान मोठी सगळीच मंडळी खूप उत्साहात होती... बायका फेर धरून नाचत होते.... आता तर आबा पण नाचण्याचा आनंद घेत होते ... राज तर आपल्या मित्र आणि भावंडांसोबत सोबत मनसोक्त एकदम बिनधास्त नाचत होता.... राहुलच्या लग्नद्वारे सगळ्यांच्या लग्नाबद्दलच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या....

" अरे यार , माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये.... माझं लग्न आहे ,मी एन्जॉय करायचं सोडून , सगळे मला सोडून आपलेच एन्जॉय करत आहेत..... no way..... मी पण करणार ... मी काय शोपिस नाही....मला बसवून दिले इथे ... ".....घोडीवर बसलेला  राहुल त्याच्या पुढे नाचनाऱ्यांना  बघून स्वतःच बोलत होता.... "अरे ओ,त्याने मला पण घ्या  आवाज पण दिले पण कोणालाच ऐकू जाईना..... शेवटी त्याने घोडीवाल्याला इशारा केला आणि खाली उतरला..... जसा तो उतरला , रुचीचे ( रशमीची बहीण) लक्ष त्याच्याकडे गेले आणि तिने त्याचा हात धरून मधोमध आणले..... नवरदेव बघून तर सगळ्यांना भारीच जोश चढला.....सगळे त्याच्या सोबत नाचत होते..... आता राज सुद्धा पुढे आला ,  राज तर इतका नाचला होता की घामाने अक्षरशः लतपत झाला होता....आता तर त्याने घातलेले जॅकेट सुद्धा काढून टाकले होते....बाह्य सुद्धा फोल्ड केल्या होत्या.....   आणि दोन्ही भावांचा  डान्स आता  खूप रंगला....अगदी भांगडा म्हणून नका की सगळ्या हाई आणि फेमस स्टेप्स सुरू होत्या...राजचा तर आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता ... दोघा भावांची बाँडींग उठून दिसत होती.....राजला खुश बघून त्याचा मित्र रोहन जो नंदिनीला आधीपासून ओळखत होता आणि तो राजच्या या खडतर प्रवासाचा सोबती होता ( त्याने ऑफिस खूप चांगल्या प्रकारे हॅण्डल केले होते त्यामुळे राज नंदिनीला भरपूर वेळ देऊ शकत होता ) त्याने राजची प्रत्येक तळमळ बघितली होती... आजा त्याला त्याचा जुना श्रीराज, खोडकर , मस्तीखोर , जिंदा दिल राज  परत मिळाला होता .... त्याच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू होते, आणि मनोमन देवाचे आभार सुद्धा मानत होता ........नंदिनी बाजूला उभी राज राहुलचा डान्स  बघत होती....आणि आता कुणीतरी तिचा हात ओढला आणि तिला त्या दोघांजवळ नेऊन उभं केलं.... तिला बघून राज पण थोडा बावराला, त्याची नाच करण्याची स्पीड आता कमी झाली ...नंदिनीची नजरानजर झाली तसा तो एकदमच शांत झाला....आणि तिच्या बाजूला उभा होता.....सगळे ठेक्यात टाळ्या वाजवू लागले तसा राहुलला जोश चढला , त्याने राजला एक डोळा मारला आणि आता ते दोघं नंदिनीला घेरून तिच्या गोल डान्स करत होते......नंदिनीच्या ओठांवर काँटिन्यूं हसू होते...ती   टाळ्या वाजवत अधून मधून दोघांना बघत होती...एकीकडे खूप प्रेम करणारा नवरा तर एकीकडे तिच्या भोवती पिंगा घालणारा तिचा दीर....... त्या क्षणी कोणालाही नंदिनीचा हेवा वाटावा असे ते दृश्य होते ......

मुहूर्ताची वेळ झाली , नवरदेवाचं आणि परिवाराचे आतमध्ये सावागत करण्यात आले ..... राहूल मधोमध पाटावर  जाऊन उभा राहिला..... आता त्याच्या डोळ्यांना वाट होती ती रशमीची....समोरून पिवळ्या पैठणी नऊवारमध्ये वधू वेशातील रश्मी दिसले आणि त्याचे नेत्र सुखावले.... आंतरपाट धरल्या गेले...एका साइडला राहुल, तर दुसऱ्या साइडला रश्मी हातात हार घेऊन उभे होते..... बाकी सगळी मंडळी त्यांच्या भोवताल गोल उभी होती.... नंदिनी राज राहुलच्या मागे उभ होते.... अक्षदा वाटण्यात आल्या.... मंगलाष्टकांचे सुर गुंजले....' कुर्यात सदा मंगलं , शुभमंगल सावधान ' ...आणि अक्षदा आणि फुलांचा राहुल रश्मीवर वर्षाव सुरू होता.....इकडे राजचे मात्र वेगळंच सुरू होते.... तो सगळी फुलं नंदिनीच्या डोक्यावर टाकत होता.... नंदिनीचं लक्ष गेले की राज ' तो मी नव्हेच ' अश्या भूमिकेत असायचा.....आणि शेवटी तिने त्याला पकडलेच .... त्याला एक स्ट्रेंज लूक दिले...आणि थोड्या वेळात दोघंही खळखळून हसायला लागले....

आता कन्यादान , सप्तपदी सुरू होते ....पंडित एक एक शलोकचा अर्थ समजावून सांगत होते ...... नंदिनी तिथेच जवळ बसून सगळं ऐकत होती..

" नंदिनी , चल थोडं खाऊन घे .....".... राज तिच्या कपाळाला हात लावत तिचा ताप चेक करत बोलला...

" मी ठीक आहे , नको काळजी करू ".....नंदिनी

" ओके .... पण चल थोडं खाऊन घे, नाहीतर गरागरल्या सारखे वाटेल " ....राज

" नको , मला हे सगळं ऐकायचं आहे .... मला हे काहीच माहिती नाही ... मला पण हा सगळा अर्थ समजून घ्यायचा आहे ... "......नंदिनी

" मी सांगेल नंतर  "......राज

" नको ... तू फक्त नवऱ्याने काय करायचं तेवढच सांगशील..... बायकोने काय करायचं नाही सांगशील "...…नंदिनी

" बायकोने फक्त नवऱ्यावर प्रेम करायचं असते ...... " .... तो हसत बोलला ..

" राज ..... मस्करी नको हा .....".....नंदिनी थोडी लाजली होती पण ते न दाखवता त्याला थोडी डटावत बोलली .

" मस्करी नाही ... खरं काय तेच सांगतोय ..... बायकोचं एक गोड हसू आणि भरपूर प्रेम ...... कितीही संकटं आली ना ..... सगळं पार करू शकतो ..... ".... राज

" तू ना भारी ड्यांबिस झाला हां..... काल पर्यंत एक संत आत्मा होतास... आणि आज अचानक ..... येवढा फरक ...?" .....नंदिनी

" ते काय आहे ना ..... माझी नंदिनी अचानक खूप प्रेमळ झाली , लाजयाला लागली .....त्यात  तुझं हे गोड रूप .... कोणाला वेड नाही लावणार  ....."...... राज तिचे नाक आपल्या चिमटीत पकडत बोलला.

" राज , सगळे आपल्याकडेच बघत आहेत ....."....नंदिनी थोडी अवघडल्यासारखी झाली

"हा मग बघू देत ..... I don't care "..... राज

" राज , बदमाशी पुरे हा आता ..... आधीच मला लाजल्याहून लाजल्यासरखं होतंय....सकाळ पासून सगळेच मला लाजवून सोडत आहेत.... आणि आता तू पण सतावतो आहेस "........नंदिनी

" आणि तू मला सतावलेस , त्याचं काय? ... तुला माहिती होते ना सगळं .... तरी मला त्रास दिलास ना तू ? .."....राज

" हो तर मग... it's my rights .... मी तुझ्यासोबत काहीपण करू शकते....आणि मी अमेरिकावरून परत आल्यापासून तू मला तुझ्याजवळ तुझ्या मिठीत तरी घेतले होते काय...?? कट्टी....मला नाही बोलायचं तुझ्यासोबत   "..... नंदिनी

" अरे बापरे..... भारीच रुसली दिसतेय ही चिमणी , माझी लहानपणीची नंदू सुद्धा  रुसली की अशीच खूप  गोड दिसायची  "......राज तिचे गाल ओढत बोलला

" राज sss ......".... नंदिनी

" बरं , जातोय .... पण हे झालं की लगेच खायला ये , वाट बघतोय "..... म्हणत तो जायला वळला.... आणि परत वळून तिच्या कानाजवळ झुकला...

" And yes , I am all yours ..... आणि आता मिठीत घेईल ना , तर अजिबात सोडणार नाहीये....मला पण माझी नंदिनी आता फक्त माझ्याजवळ हविये..... ".....तिला एक डोळा मारत एक फ्लायिंग किस देत तो तिथून गायब झाला.... नंदिनी मात्र डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती..... तिला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटत होतं की एका रात्रीत त्याच्यामध्ये जमीनआसमानचा फरक झाला होता....

लग्नाच्या सगळ्या विधी व्यवस्थित आटोपल्या होत्या..... विहिनीची पंगत , उखण्यांचा कार्यक्रम..... उखण्यांची तर जशी काही अंताक्षरी सुरू होती ... सगळेच खूप उत्साहात येईल त्या शब्दांवरून वेळेवर उखाणा बनवत म्हणत होते .....

जोडे लपवण्याचा पण कार्यक्रम झाला .... गंमतजंमतची तू तू मैं मैं झाली ..... मग शेवटी आपल्या एकुलत्या एक साळीपुढे राहुलने सगळ्या अटी मान्य केल्या ...  पण एकट्यात  अजून एक  डील झाली....त्याने  प्रॉमिस रूचिकडून सुद्धा घेतले....तिच्या डॉक्टर होण्याचा .... आणि शिक्षणाचा सगळं खर्च फक्त रश्मी करणार ..... हो नाही करत तिने ती मान्य केली .... आणि रूचीने आपल्या हातांनी राहुलला शूज घालून दिले....

सगळेच कार्यक्रम झाले होते .... थोडा आराम झाला होता.... आता तयारी सुरू होती ती पाठवणीची......
 

******

क्रमशः

******

🎭 Series Post

View all