Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 81

Read Later
नंदिनी...श्वास माझा 81

 

( आधीच्या भागात : सगळे महाबळेश्वर ला पोहचतात.... आराम केल्यावर रात्री सगळ्या तरुण मंडळीच्या गप्पागोष्टी रंगतात..... त्यात राज नंदिनीसाठी गाणे म्हणतो ..... सगळे एकत्र छान वेळ घालवतात.... आता पुढे.....)

भाग 81

आजपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार असतात.... पूर्ण रिसॉर्ट बुक असल्यामुळे बाहेरील कोणी नव्हते.....सगळे घरातीलच लोकं तिथे होते.... कार्यक्रमाच्या हिशोबाने रिसॉर्टचे डेकॉरेशन सुरू होते...अधून मधून राज ते चेक करत होता.... राजचा मित्र रोहन सुद्धा आला होता...बहुतेक सगळेच कामं तो बघत होता....

इकडे रश्मी राहुलवर रुसल्यामुळे राहुल तिची मनधरणी कशी करायची याच विचारात होता...तिच्यासोबत बोलायचं ,पण ती एकट्यात सापडत  नव्हती....फोन करायचा म्हटलं तर फोन उचलत नव्हती .. मेसेज केला तर ती त्याला उत्तर देईना....असा तो मस्ती करत होता पण ती पुढे दिसली की चिंताग्रस्त व्हायचा.... ती पण त्याच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकत नाक मुरडत निघून जायची .... 

" काय रे ,काय झाले ?? ..सकाळपासून बघतेय.... काहीतरी गडबड दिसतेय......"....नंदिनी

" सगळं त्या राज मुळे....."....राहुल

" राज .. ??? तो कुठे आला तुमच्या दोघांमध्ये?? तो तर साधं बोलला सुद्धा नाहीये "...नंदिनी

" बोलत नाही तो, डायरेक्ट गाणे गातो .... कौतुक काय , तारीफ काय करतो, ते पण सगळ्यांसमोर......मग आम्हा गरिबांचा प्रॉब्लेम होणारच ना "..... राहूल

" ही ही ही...... असा प्रॉब्लेम झाला आहे तर.....मॅडम  रुसल्या तर....."....नंदिनी

" मग काय , तुम्ही हे असे वागता....मग बाकीच्यांच्या अपेक्षा तर वाढणारच.....आणि मग त्याची शिक्षा  आमच्या सारख्या पामारांना त्या भोगाव्या लागतात .....आता बोलत नाहीये ती सकाळपासून, भाव पण नाही देत आहे ...."... राहूल

" बरोबर आहे तिचं..... I am with her..... ".... नंदिनी

" हे बरं असतं तुम्हा मुलींचं ..... रूसून बसायचं, आणि इकडे आमचा जीव टांगणीला लावायचा....".... राहूल

" त्यात काय येवढं , तू पण कर तिचं कौतुक....म्हण एखादं गाणं ...."....नंदिनी त्याची मस्करी करत होती

" तुम्हाला ना तेच आवडते ज्यात आम्ही कंफर्टेबल नसतो....मला कुठं येतं हे गाणे वैगरे म्हणता..."....राहुल

" बघ बाबा, तुला काय जमतं ते....मदत लागली तर सांग ..."....नंदिनी

राहुल बऱ्याच वेळ विचार करत बसला होता....

*******

संध्याकाळी मेहंदी कार्यक्रमाची तयारी झाली होती...एका मोठ्या हॉल मध्ये कार्यक्रमाची सोय केली होती ....बायकांचा कार्यक्रम म्हणून पुरुष मंडळींची वेगळी सोय करण्यात आली होती...तरी सुद्धा काही मोठी पुरुष मंडळी सोडली तर बाकी सगळे इकडेच गडबड करत होते....

आजकाल लग्न, इतर कार्यक्रम म्हटले की वेगवेगळ्या रंगांची उधळण केली जाते.... एका कार्यक्रमाला एक रंग....असे काहीसे ठरवले जाते.... तसेच आज हिरव्या रंगाची थीम ठरवण्यात आली होती.... सगळ्यांनी फिक्कट , गडद असे विविध हिरव्या रंगाचे शेड्स परिधान केले होते....

सगळे हॉल मध्ये जमले... पुणे वरून मेहंदी आर्टिस्टची टीम बोलावली होती....  लहान पासून मोठ्यांपर्यंत घरातील सगळं महिला मंडळ हॉल मध्ये जमले होते....मेहेंदी ही अशी गोष्ट  होती जी प्रत्येक वयाची  आवडीची , त्याचे डिझाईन, त्याचे रंग , त्याचा सुगंध अगदी प्रत्येक वयाला हवाहवासा.....

नंदिनी तयार होऊन हॉल मध्ये आली...नंदिनीने पिस्ता रंगाचा भरपूर घेर असणारा , ऑरेंज बॉर्डर ,त्यावर रेशमी आणि मिरर वर्क असलेला फ्लोअर लेंघ्थचा abaya style चा  ड्रेस , त्यावर नेटची सेम कलरची ओढणी घेतली होती...केसांची सागर वेणी , कानात बांगडी येवढ्या आकाराची बारीक बारीक मोत्यांची  चांद बाली आणि सारख्याच डिझाईनची बिंदी ( मांग टीका )  , कपाळावर छोटीशी हिरवी टिकली....साजेसा सिंपल मेकप.... अशी ती गोड दिसत होती....

 

 

 

 

नंदिनी हॉल मध्ये आली तसे सगळ्यांच्या नजरा नंदीनिवर खिळल्या होत्या....पण नंदिनीची नजर मात्र दुसऱ्याच  कोणाला शोधत होती....राहुल सुद्धा तयार होऊन खाली आला होता.... आणि तो रश्मीला शोधत होता...

" राज नाही दिसत ??" ..... नंदिनी राहुल जवळ येऊन उभी राहत बोलली

" रश्मी नाही दिसत ??" ..... राहूल हॉलच्या entrance gate जवळ येत उभा राहिला....नंदिनी पण त्याच्या सोबत येत उभी राहत इकडे तिकडे राजला शोधत होती.

" मिस्टर इंडियाच झाला आहे हा आजकाल..... सदा न कदा गायब असतो ".....नंदिनी

" कार्यक्रमाची ही अरेंजमेंट मला अजिबात आवडली नाही ..."...राहुल , त्याची नजर रश्मीच्या वाटेकडे लागली होती

" मला पण बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही आवडली ...."....नंदिनी

" कोणाची आयडिया आहे ही ......?? काय गरज होती लेडीज वेगळे आणि जेंट्स वेगळे .....?".... राहूल

" तुझ्या भावाचीच ...... म्हणे बायका मुलींना मोकळेपणाने एन्जॉय करता यावे म्हणून ....." .....नंदिनी

" खूपच भारीपणा करतो हा आजकाल ......आता माझ्या सारख्या माणसाने कुठं जावं?.....दिलं इधर,दुनिया उधर......".... राहुल

" हो ना..... आपण दोघही सेम कष्टी पे सवार....समजू शकते तुझ्या फीलिंग्ज.... "....नंदिनी

" यार , ही रश्मी किती वेळ घेते आहे....?"....राहुल

" मुलींना वेळ लागतो रे तयार व्हायला....त्यात तिचा आज स्पेशल दिवस आहे....."....नंदिनी

" म्हणजे , तू मुलगी नाही आहे?? "...... राहुल ची मस्करी करत होता...

" ये फालतू जोक नको मारू.....एकतर जा राज दिसत नाहीये.....त्यात तुझे हे पकाऊ जोक....."....नंदिनी

" मी काय करू..... टेन्शन मध्ये असलो की असेच होते मला....."....राहुल

" जरा धीर धर....तुझ्यासाठीच तयार होतीय ती ".....नंदिनी

ते ऐकून तो चूप झाला......." खरंच मुली किती वेड्या असतात ना.....आपली एक कौतुकाची नजर जावी म्हणून काय काय करतात आपल्या व्यक्ती साठी....... can't wait now....."..... राहुल मनातच विचार करत होता..

" काटे नहीं कटते लम्हे इंतज़ार के,
नजरें बिछाए बैठे हैं रस्ते पे यार के......."....नंदिनी राजला शोधत शायरी म्हणत होती....

तेवढयात रश्मी, रुची आणि काही मुलींसोबत  समोरून येताना दिसली.....

 

 

रश्मीने हिरवी प्लेन सिल्की साडी, हेवी वर्कचे हिरवे ब्लाउज ,  गळ्यात ब्रॉड नेकलेस, आणि कानात झुमके...हातात एक एक कडे....साजेसा सिंपल मेकप ,  साधीच पण खूप सुंदर ती दिसत होती.....जरी सगळी तयारी देशमुखांनी केली होती ... तरी कपडे आणि दागिने मात्र रश्मीने तिच्या आईबाबा कडून घेतले होते.....आईने पोरीसाठी तिच्या लहानपणापासूनच एक एक करून दागिना बनवला होता....आईच स्वप्न पोरीच्या अंगावर एक तरी सोन्याचा दागिना हवा.....म्हणून रश्मीने देशमुख परिवाराकडून काही घेतले नव्हते आणि देशमुखांनी पण तिचा आवडीचा मान ठेवला होता....कोणीच तिला हे आमच्या स्टेटसला शोभणार नाही वैगरे काहीच बोलले नव्हते....

तिला बघून तर राहुलचे डोळे दिपले........रश्मी राहूल जवळ पोहचली...

" काटे नहीं कटते लम्हे इंतज़ार के,
नजरें बिछाए बैठे हैं रस्ते पे यार के
दिल ने कहा देखे जो जलवे हुस्न-ए-यार के,
लाया है उन्हें कौन फलक से उतार के।".......नंदिनीने बोलल्या त्याच्या पुढल्या लाईन रश्मीला बघून राहुलच्या तोंडून निघ्याला.....

त्याल बघून रश्मीला हसू येत होते पण तिने कंट्रोल केले....

" Something original..."..... रश्मी , तिने एक तिरपा कटाक्ष राहुलवर टाकला आणि नंदिनीला स्मायल देत आईने आवाज दिला म्हणून पुढे गेली.....राहुल आ फाडून तिच्याकडे बघत होता....

" उहहू उहहू ....... जिजाजी तोंड बंद करा..."....रुची हसत निघून गेली.....नंदिनी सुद्धा आपली बत्तिशी दाखवत खुदुखुदू हसत होती....

" सलमान खान काम नही किया......better luck next time.....".... नंदिनी  परत हसायला लागली .... आणि रश्मीच्या मागे गेली....राहुल मात्र लहान तोंड करत बाहेर निघून आला....

मंद मंद आवाजात  मुजिक सुरू होते..... रश्मीचे औक्षण करून मेहेंदी लावायला सुरुवात झाली....मेहेंदी आर्टिस्ट सोबत आणखी काही मुली आल्या होत्या....त्या बाकी बायकांना मेहेंदी लावत होत्या....

" नंदिनी , जा तू पण लाऊन घे मेहेंदी....."...आई

" पण .... हे सगळं ... काही लागले तर. ??"....नंदिनी

" मी आहे .... आणि सगळी सोय केली आहे , जा तू , तुला आवडते ना .... सुंदर डिझाईन काढून घे ...."....आई

" तू पण लाव ना ".....नंदिनी

" मला काय छोटीशी लावायची...लवकर होईल....तू आधी काढून घे.....आणि हो छान हातभार काढ ..... "...आई

" Okay boss ...... पण राज नाही दिसत आहे , कधीची बघतेय त्याला .....".....नंदिनी

" अगं , तो तिकडे पुरुष मंडळीमध्ये आहे .... बऱ्याच वेळाने तो त्यांना रिकामा सापडला आहे ...त्याला घेरून बसले आहे सगळे .... बिजनेस आणखी काय काय विचारणे सुरू आहे सगळ्यांचे ..... तो नीट आहे....तू काढून घे मेहंदी......".....आई

" ठीक आहे ...".....नंदिनी मेहेंदी काढायला निघून आली...

" मॅडम , डिझाईन सांगा कुठली आवडते तुम्हाला "...मेहेंदी आर्टिस्ट , तिने एक मोठे मेहेंदी डिझाईनचे बुक नंदिनिपुढे धरले ... ..

" बापरे , किती सुंदर आहेत सगळेच....."....नंदिनी खूप कौतुकाने ते बुक बघत होती ..

" एक मिनिट .... मी सांगते...."....काकी तिथे आल्या आणि त्यांनी एकदम दुल्हन पॅटर्नची मेहेंदी डिझाईन काढून दिली.....

" काकी, अग येवढे मोठी...?? मी कुठं नवरी आहे...?"....नंदिनी

" अगं काढ ग...... खूप छान दिसेल......"..काकी .. "आणि हो मॅडम मेहेंदी मध्ये S लिहा हा ..."....काकी मेहेंदी आर्टिस्टच्या कानात बोलली...

" ठीक आहे madam....".... आर्टिस्ट

" काय...?? काय खुसुर पुसुर चाललीये ?"....नंदिनी

" काही नाही , त्यांना सांगत होती तू एका जागेवर नीट बसत नाही ... हलत डुलत असते..... पकडून ठेवा....".... काकी.

" काकी....?".....नंदिनी

" बरं बरं , गमत केली.... छान काढून घे.....".....म्हणत काकी तिथून गेल्या...

मेहेंदी आर्टिस्ट सुद्धा खूप सुंदरपणे नंदिनीचा हातावर मेहेंदी काढत होती........ लहान मंडळीनी सुद्धा आवडीने मेहेंदी काढणाऱ्या ताईंकडून आपल्या इटुकल्या पिटूकल्या
हातावर मेहेंदी काढून घेतल्या ...

थोड्या वेळ साठी लाइट्स बंद झाले....गोंधळ होणारच होता की तेवढयात आवाज ऐकू आला....आणि सगळे शांत झाले ...

" Twinkle Twinkle Little Star ✨????.....

लाईट्स लागले तसे सगळे पुढे बघायला लागले तर राहुल आणि त्याच्या बाजूला सगळी चिल्लू पिल्लू......उभे होते.

"  Twinkle, twinkle, little star
   How I wonder what you are
   Up above the world so high
   Like a diamond in the sky ".....
 
सगळी छोटी मुलं मुली , आणि सोबत राहुल ....आपला क्युटसा चेहरा करत गाणं म्हणत होते.... खूप गोड असे त्यांचे हावभाव हातवारे होते ..

या चार ओळी म्हणून ते सगळे रश्मी जवळ गेले.. ........ बाकी हॉल मधले सगळे कौतुकाने बघत होते .....

" Twinkle, twinkle little star
We love you Kaki , We love you mami ....."...

मुलं म्हणतच होते की राहुलने त्याचा एक हात तिच्या पुढे केला....त्यावर मेहेंदीने रश्मी लिहिले होते......रश्मी तर त्यालाच बघत होती....त्याचे ते वागणं तिला  खूप गोड वाटत होते.....त्याने आपला दुसरा हात पुढे केला... त्यावर मेहेंदी ने  ' I ❤️(heart shape)  U '  असे काढले होते.....
ते बघून रश्मीच्या ओठांवर  गोड हसू पसरले....ती गालात लाजली सुद्धा.......आणि झालं तिथेच राहूल खल्लास.......

" ये मामा , आता आइसक्रीम दे......तू बोलला होता ना मामी हसली की आइस क्रीम देशील आम्हाला...... चल आता........".....एक छोटी चिऊ .... तसा हॉल मध्ये एक हशा पसरला.......

" हा हा हा .... रिश्र्वत.......काय..??....".....नंदिनी
तसे बाकीचे अजून हसायला लागले......

" काय रे लबाड..... काय गोंधळ घालतो आहेस इथे???...."....काकी

" काही नाही ..... तुझी आठवण आली होती......म्हणून......".... राहूल

" अच्छा मला I love you म्हणायला आला होता काय??"......काकी

" हो .....हो .... मग काय.??.......पण मग तू दिसली नाही तर .....मग.....रश्मीला......".....राहुल अडखळत बोलत होता....

" हो ना ..... सगळी नाटकं समजतात......."...काकी

" बरं...... चाललो आहे......"....म्हणतच परत रश्मी जवळ गेला......" You are looking marvelous....."... म्हणत राहुल एक डोळा मारत तिथून पळाला....बाकी छोटी मंडळी पण त्याच्या मागे मागे पळाली.....

हे सगळं हसरं खेळतं , मोकळं वातावरण बघून रश्मीच्या घरचे पाहुणे तर अवाक् झाले होते.... इतके श्रीमंत लोकं , पण जरा पण कशाचाच अभिमान नाही की घमंड नाही.... वर पक्षाकडील कोण, वधू पक्षाकडील कोण ....काही ओळखायला नव्हते येत....दोन्ही घरं मिळून लग्नाचे काम बघत होते ....पोरीने खरंच नशीब काढलं ... रश्मीचे नातेवाईक कुजबुजत होते.....
 

रश्मीच्या हातावर आणि पायावर मेहेंदी काढणे सुरू होते.....नंदिनीची हातावरील मेहेंदी आटोपली होती.... तिला सुद्धा पायावर काढायला बराच फोर्स केला...पण पायाला मेहंदी लावली तर एका जागेवर बसून राहावं लागेल....जे तिला अजिबात जमणारे नव्हते....त्यामुळे रात्री झोपताना आपल्या हाताने लावेल सांगून ती तिथून उठली.....

ती स्वतःच आपले दोन्ही हात चार चारदा मागून पुढून बघत होती....आणि ते बघून तिला खूप आनंद होत होता......अगदी दुल्हन मेहेंदी सारखी हाताच्या कोपरा पर्यंत सुंदर बारीक, नक्षीदार मेहेंदी काढली होती.......तिला तर राजला कधी कधी दाखवते असे झाले होते......तिथे बाकी बायकांची नजर चुकवत तिने तिथून बाहेर पडली ....राजला शोधत शोधत ती बाहेर आली तर राज बाहेर लॉन मध्ये त्याच्या दोन भावांसोबत काहीतरी बोलत उभा होता..... जसा तिला राज दिसला पळत पळत ती राज जवळ येत उभी राहिली.....तिने आपले हात मागे लपवले होते..... पळल्यामुळे तिला थोडी धाप लागली होती...धापा टाकत हसत ती त्याच्याकडे बघत होती.... त्याचे पण तिच्याकडे लक्ष गेले....आणि तिला काहीतरी सांगायचे आहे तिच्याकडे बघून त्याच्या लक्षात आले.....तेवढयात राहुलचे लक्ष गेले आणि त्याने राजसोबत असणाऱ्या त्याच्या भावंडांना आवाज दिला.....तसे ते तिथून निघून आले...

" राज.....राज......"....नंदिनी धापा टाकत बोलत होती...

" हो हो .... Relax ...... "........ राज

" राज , काहीतरी दाखवायचं आहे तुला....."....नंदिनी , म्हणत तिने आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर पुढे धरले.....तिच्या हातांमागे तिचा चेहरा लपला होता....आणि हळूच तिने आपले हात थोडे बाजूला केले तिचे डोळे दिसेल येवढे......राज तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता..... ..... तिच्या ओठांवर गोड हसू होते....हाताला मेहेंदी लावल्यावर कोणी इतकं आनंदी होऊ शकतं, त्याला तर विश्वास बसत नव्हता....

" कशी आहे....?"....नंदिनी

" छान ......"....राज

" फक्त छान?".....नंदिनी , आता तिचे रुंदावल्या ओठांची रुंदी जरा कमी झाल्यासारखी वाटली...

" सुंदर ......." ...राज

" फक्त सुंदर ....?? शी बाबा तुला कौतुक सुद्धा नाही करता येत आहे .....".......नंदिनी , तिने आपला चेहरा अगदी लहान मुलांसारखा केला....तिला तसे बघून राजला हसू आले.....

" तुझ्या या सुंदर नाजूक हातांवर ही मेहेंदी सुंदर दिसते आहे ..... ".....राज , तशी तिची खळी खुलली

" आणि मी ??"......नंदिनी

" तू??? .......तू तर नेहमीच गोड दिसते......".....राज

"फक्त गोड ??"......नंदिनी , राजला परत हसू आले.... आज ती एकदम त्याला त्याची आधीची नंदिनी वाटत होती....तीच निरागसता....तेच भाव....तेच नाटकी नाटकी रुसने......तेव्हा तिचे नेहमीचेच होते.....जोपर्यंत तिचं मन भरत नाही तोपर्यंत त्याच्याकडून स्वतःची तारीफ करून घ्यायची..... लडीवाळपणे त्याच्याजवळ सगळं आपल्या मनासारखं करून घ्यायची , सगळ्यांनी लाख चांगलं म्हणू देत पण जोपर्यंत राजकडून कौतुकाचे शब्द नाही ऐकले तोपर्यंत तिचे पोट नव्हते भरत ............त्याला अचानक त्याची ती नंदिनी आठवली......त्याला तर तिचे ते गोड रूप बघून तिचे गाल ओढवेसे वाटत होते....

" परी राणी दिसतेय ........".... राज तिच्या एका गालावर थोपटत बोलला...,.तशी तिच्या ओठांवरचे हसू परत उमलले......

" राज , मी तुला हॉट वैगरे नाही वाटत काय ...??, नेहमीच गोड , स्वीट येवढेच बोलतो..."......नंदिनी

राजने कधीच तिला त्या नजरेने बघितले नव्हते....तो तरी काय बोलणार होता....तो आपल्याच विचारात हरवला होता....

" राज.??....".....नंदिनीने त्याचा डोळ्यांसमोर चुटकी वाजवली....

" माझी गोड परीराणी आहेस तू ..... हॉट किंवा इतर काही शरीराकडे बघून बोलल्या जाते.... तू दिसायला सुंदर तर आहेसच पण त्याहून ही जास्ती तू मनाने सुंदर आहेस..... म्हणून मला तू नेहमी गोड , सुंदर दिसतेस....."....राज

" तू असाच आहे .... गोड गोड बोलून गोल गोल फिरवतो......."....नंदिनी

तिच्या बोलण्यावर त्याला हसायला आले....

"  राज , फोटो काढून दे ना माझे , हाताचे ....मला स्टेटसला ठेवायचे "....नंदिनी

" ह्मम......"....त्याने त्याचा मोबाईल काढला आणि तिच्या हातांचे , तिचे चार पाच फोटो काढले...

" राज , सेल्फी .......".....नंदिनी

" ह्मम.......".....राजने मोबाईल पुढे धरला....तशी नंदिनी वेडेवाकडे तोंड करत होती , पाउट करत होती....राज तर कॅमेरा मधून तिलाच बघत होता...... एखादा फोटो नीट नाही आला तर हा डिलिट कर...यात डोळे बंद झाले....यात तू नाही हसला नीट , यात केस उडत आहेत....इथे लाईट नाही आला बरोबर .......असे करत करत तिने बराच वेळ  घालवला.... राज पण आज्ञाधारका प्रमाणे तिच्या सगळ्या त्या गोड हुकूमांचे पालन करत होता....

" ये राहुल......".....नंदिनिने आवाज दिला...

" हा बोल ग......"....राहुल तिथे आला

" आमचे फोटो काढून दे ना ......"....नंदिनी

राहुल ने त्या दोघांचे फोटो काढले.....राज तर एकसारखाच उभा होता...नंदिनी मात्र वेगवेगळ्या काय काय पोज देत होती....त्यांनतर त्या तिघांनी परत सेल्फी काढले......पण त्यातले बहुतेक सगळेच राहुल आणि नंदिनीने काही ना काही वाकडे हावभाव करून बिघडवले होते.....आता मात्र राज वैतागला होता...

" नंदिनी....रश्मीला पण आण थोड्या वेळ बाहेर...."... राहूल

" अह......तिला नाही येता येत......"....नंदिनी

" का...?? करना तू काही प्लॅन ".....राहुल

" तिला नाही चालता येत.....पायाला लावलीये मेहेंदी....एकच ठिकाणी बसावे लागते.... अटलिस्ट ती सुकेपर्यंत.....".....नंदिनी

" अरे राम........"...त्याने डोक्यावर हात मारला....

"पण तू तर फिरेते आहे?? ........".... राहूल

" मी नाही लावलीय "..…नंदिनी

" बरोबर आहे, तुझे पाय एका जागेवर कसे टिकतील....."....राहुल

" Very funny......".... नंदिनी

" पण मग तू लावणार नाहीस पायाला...?".... राहुल

" लावेल ना , झोपायच्या आधी ......स्पेशल आर्टिस्ट कडून....."....नंदिनी राजकडे इशारा करत बोलली...

"  Great.....".... राहुल

जेवण्यासाठी बोलावणे आले....तसे सगळे आतमध्ये आले.....

मोठी मंडळी जेवण आटोपून आधीच गेली होती.....रश्मीचे हात , पाय अशी मोठी मेहेंदी होती...त्यामुळे तिला बराच वेळ लागला होता....म्हणून सगळी तरुण मंडळी जेवायला थांबले होते.......जेवण्यासाठी राऊंड राऊंड टेबल लावण्यात आले होते.......... सगळे आपापल्या सोयीने बसले होते..... नंदिनी एका टेबल वर बसली होती.... हाताला मेहेंदी असल्यामुळे तिला नीट खाता येईना..... ती कसेबसे चमचाने खात होती...... खाता खाता तिचे लक्ष रशमिकडे गेलं.....तर रशमीची आई , रुची ....गप्पागोष्टी मौजमस्ती करत तिला जेवण भरवत होते...आता नंदिनीची एकटक नजर त्यांच्यावर खिळून होती...... राजचे लक्ष मात्र नंदिनिकडे होते.....तिच्या मनात काय चालले असेल ते त्याला कळत होते. ....तो पुढे जाणार तेवढयात कोणीतरी तिच्या जवळ दिसलं तर तो तिथेच थांबला..... .....नंदिनीचे सगळे लक्ष रशमिकडे लागून होते ....तेवढयात तिला जाणवले तिच्या हातातला चमचा कोणीतरी पकडला आहे ..... तिने वळून बघितले तर राहुल तिच्या शेजारी बसला होता.....आणि त्याने तिच्या हातातला चमचा पकडला होता.....आणि त्याने तिला खाऊ घालायला म्हणून हाथ पुढे केला.....ते बघून नंदिनीच्या डोळ्यात थोडंसं पाणी तरळले......

" ये बाई.... आता मी तुला तिच्यासारखी बहीण तर नाही देऊ शकत...... हा भाऊ चालेल काय खाऊ घालायला ....?"..... राहूल , त्याचे बोलणे ऐकून तिच्या ओठांवर हसू ....चेहऱ्यावर आनंद पसरला....आणि तिने त्याच्या हातून एक घास खालला....

" ये राहुल , ती कोण आहे रे .....??".....नंदिनी एका मुलीकडे बघत म्हणाली

" कोण ग...?"....राहुल

" अरे ती.....ती बघ राजलाच बघतेय......ती आल्यापासून बघते आहे तीच सगळं लक्ष राजकडेच आहे ...."....नंदिनी इशारा करत बोलली..

" ती...??..ती ना रितू.....ती बाबांचे मामा आहे त्यांची कोणाची तरी मुलगी...."...राहुल

" आल्यापासून फक्त राज ला च घुरते आहे...." ..नंदिनी

" ती ना त्याच्या मागे होती बऱ्याच वर्षांपासून.....कधीही इकडे आली ना की वेळात वेळ काढून घरी यायची......घरातली असल्यासारखीच वागायची.... आजीसाहेब , काकींना तर खूप इंप्रेस करायचा प्रयत्न करायची....."....राहुल

" ते का ?".....नंदिनी

" हा गडी तर काही भाव नाही द्यायचा तिला...मग काकी आणि आजीसाहेबांना पकडले तिने ......बीचारीने बरेच प्रयत्न केले पण आपलं ध्यान ते ध्यानच......."..... राहूल तिला तिच्या सगळ्या करामती सांगत होता......

" हो ना , पण आता राज married आहे...... मला अजिबात नाही आवडली हा ती ...."....नंदिनी

" अगं चांगली आहे..... तिच्या लग्नासाठी मुलगा बघत आहे........आता तिच्या बीचारीचा तो क्रश होता.... डोळ्यासमोर असेल तर बघणारच ना कोणीही...."....राहुलला आता नंदिनीला चिडवायचे मन झाले ....

" बिचारी ....???".....नंदिनी

नंदिनीच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव बदलत होते  ..... राहुल  तिची गंमत बघत होता...

राहुलने दोनतीन घास खाऊ घातले की त्याला कोणीतरी आवाज दिला...

" या लोकांना पण ना .... माझ्याविना करमेना....काय काम काढतात उटसुट...काय माहिती.....रश्मीला बघायला थोडा चांस मिळाला होता...तो पण या लोकांना सहन होईना....."....राहुल बडबड करत होता ...

" तू तर मला खाऊ घालायला आला होता ना ....?"....नंदिनी

" करायला तर तेच आलो होतो.... एका वेळेला दोन कामं करणं काय गुन्हा आहे काय ??"...... राहूल

" बदमाश......".....नंदिनी

" Actually तसे तर तो .... तो बघ तिकडे कॉर्नर मध्ये उभा आहे , तोच येणार होता....पण मी पाहिला नंबर लावला....तर तो थांबला.....".... राहूल हळूच राजकडे इशारा करत बोलला....तशी नंदिनी हसली

" तुला माहिती नंदिनी ..... You are the most luckiest person....... या एका व्यक्ती मध्ये तुला सगळी नाती मिळाली आहेत.....नशीब लागते यासाठी.......नाहीतर नाती असून सुद्धा जवळ नसतात...नाहीतर फक्त नावाला असतात नाती...... " ... राहूल

नंदिनीने होकारार्थी मान हलवली........ तिचं सगळं लक्ष मात्र त्या रितू कडेच होते...

" बरं येतो मी लगेच.... काय म्हणताय बघतो....".... राहुल , राहुल आवाज दिला त्याच्याकडे आला....नंदिनी परत आपल्या हाताने खायचा प्रयत्न करत होती.....तिला एकटे जेवतांना बघून आई(राज ची आई )  तिला खाऊ घालायला म्हणून तिच्या जवळ जात होती... तेवढयात राज त्यांना नंदिनी जवळ जातांना दिसला...तश्या त्या हसल्या आणि परत मागे फिरल्या....

" मी भरवू....??"..... राज नंदिनी जवळ येत बाजूला बसत बोलला....

" हो .....".....नंदिनी आनंदली .... राज तिला भाजी पोळी भरवत होता....

" काय , मज्जा आहे बाबा.... एकाजनीची मस्त सेवा सुरू आहे....नशीब लागते बाबा...."....राजची एक वहिनी तिथून जात होती तर टोमणा मारला..

" अहो वहिनी .... असं काही नाहीये....या बसा...."...नंदिनी

" नाही , नको , चालू देत तुमचं.... उगाच भाऊजी रागावतील....."....म्हणत नंदिनी ला एक डोळा मारत त्या तिथून निघून आल्या....

असेच येतं जाता दोन तीन लोकांनी टोमणे दिलेच होते.... तेवढयात परत राहुल टपकला......

" माझा बाबा या मुलीची.... सगळ्यांकडून सेवा करून घेते....".... राहूल

" आ sss ....."...... राज थोडा कळवळला..आपला हात झटकत होता....

" सॉरी सॉरी.... ते चुकून झाले...
सॉरी .... लागलं काय तुला....?"..... नंदिनी काळजीने विचारात होती.....जेवता जेवता नंदिनी त्याच्या बोटांना चावली होती...

" कही पे निगाहे, कही पे निशाणा...... मग असेच होणार ना ..... ,"..... राहुल

" काय ??"......राज

" काही नाही..... तिखट लागलं काय ग ? ".... राहूल

" ह.... हो ........."..…नंदिनी

" म्हणून गोड खायला गेलीस...?त्याचा हात खाल्लास......इतकाच तो हवा आहे तर लवकर व्यक्त हो त्याच्यापुढे.....वेळ का घेते आहेस?...नाही म्हणजे मग हे असले बहाणे करायची गरज नाहीये......."....राहुल तिच्या कानाजवळ जात हळूच बोलला..

" राहुल , तू मार खाशील हा  आता ...... "...नंदिनी डोळे मोठे करत बोलली...

" हो आलो रे......"....आणि राहुल तिथून पळाला...

" राज , झालं माझं जेवण.....तुला खरंच लागलं नाही ना ....?? खरंच ते चुकून.... माझं लक्ष नव्हते....."....नंदिनी

" It's okay Nandini .... I am fine ...., पण तू काहीच जेवली नाहीये..... गप्पा करण्यात पूर्ण वेळ घालवला....."....राज

" झालंय माझं.... तसे पण मला खूप अकवर्ड वाटते आहे इथे , सगळे आपल्या कडेच बघत आहेत.... "....नंदिनी

" तिकडे लक्ष नको देऊ .... "..... राज

" नको .... मी दूध घेते झोपताना.... ".....नंदिनी

"रूम मध्ये मागवतो आहे जेवण....."....राज

" अरे नको ... असू दे ...."....नंदिनी

" नंदिनी , काहीच जेवली नाहीये तू नीट...दिवसभर इकडून तिकडे फिरत असते......इतकी रमालिये या कार्यक्रमांमध्ये की लक्ष नसते तुझं स्वतःकडे..... माझं पण व्हायचं जेवण..... मी रूममध्ये ऑर्डर करतोय.... व्यवस्थित जेवता येईल..... चल आता ..."....राज

राज बोलल्यावर त्याच्यापुढे आता तिला जास्ती काही बोलता आले नाही.....

नंदिनी तिथे सगळ्यांसोबत बोलत त्यांचा निरोप घेऊन राजच्या रूम मध्ये गेली....नीट जेवण वैगरे आटोपून , तिच्या पायाची मेहेंदी कंप्लीट करून .... आपल्या रूम मध्ये जाऊन झोपली..... थकली खूप होती त्यामुळे लगेच तिला झोप लागली.,...

बाकी सगळे सुद्धा लगेच आराम करायला निघून आले.... रश्मी राहुलचे वागणे आठऊन हसत होती.... उद्याच्या हळदीचे स्वप्न रंगवत कधीतरी तिला सुद्धा झोप लागली...

*******

जून चा शेवटचा आठवडा सुरू होता...... प्रसन्न सकाळ,  आज थोडं आभाळी वातावरण होते ..... तसे तिथे थंड आणि शांतच वातावरण होते....अधूनमधून सकाळ ची  कोवळी  सूर्याची किरणं ढगामागून डोकावत होती.....उन्हाळा असून सुद्धा तिथली सृष्टी हिरवीगार होती.... उंच पहाडावरचे ठिकाण असल्यामुळे अधून मधून ढग जवळ येत होते.... खूप सुंदर असे नयनरम्य दृश्य होते......

आज हळद...आणि संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम होता...... सगळेच हळदीच्या तयारीमध्ये लागले होते.... रिसॉर्ट मध्ये एक ओपन पण मोठा शेडेड एरिया होता...तिथेच हळदीचा कार्यक्रमाची कलरफूल झिरझिरीत पडदे , मिरर स्ट्रिंग्ज , फुलांची सजावट केली होती.... मधून मधून  छता पासून खाली फुलांची छोट्या छोट्या झुंबर सारखी लटकन खाली आली होती.....  मधोमध दोन थोडे उंच चौरंग सुशोभित करून ठेवले होते.... सगळी पाहुणे मंडळी हळू हळू तिथे जमत होती.... आता वाट फक्त होणाऱ्या कपलची होती....

********

क्रमशः

*******


 

लवकरच ........

नंदिनी सगळ्यांसमोर आली ....तिने हात जोडत हसून सगळ्यांना अभिवादन केले.....

" ओह... नंदिनी गाणं म्हणतेय तर ...... "....

राज मात्र तिला बघत होता....काहीशी वेगळी ती त्याला भासत होती....काहीतरी वेगळं होणार आहे ... त्याचं मन त्याला सांगत होतं.....आणि तो टक लाऊन तिला बघत होता...

तशी ती गोड हसली.....

" आज मी तुम्हाला एका स्पेशल व्यक्ती सोबत भेटवणार आहे ..... माझं आयुष्य.... माझं जग....."....

नंदिनी अशी बोलली आणि सगळे शॉक झाले.... ते ऐकून राजच्या तर हृदयात धडकी भरली.... जो त्याला नको वाटत होता शेवटी तो क्षण आला होता.....त्याला आता तिथे बसणे जड व्हायला लागले.... मन घाबरायला लागले....... त्याचे अंतकरण जड झाले.....डोळ्यात अश्रू जमायला लागले......त्याला हे सगळं ऐकावल्या सुद्धा जाणार नव्हते की बघावल्या सुद्धा.......आणि कोणाचं लक्ष नाहीये बघून तो तिथून जायला वळला....

*********

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️