नंदिनी...श्वास माझा 80

राज नंदिनी

भाग 80

(आधीच्या भागात : लग्नासाठी महाबळेश्वर ला जायची सगळ्यांची तयारी झाली असते. राहुल  रशमीची सोबत मिळणार म्हणून आनंदी तर राज नंदिनी दुरावणार म्हणून दुःखी होता...नंदिनी राज ला आपल्या प्रेमाची कबुली कशी द्यायची विचार करत होती तर रश्मी ला आपलं घर सोडून जातांना त्रास होत होता...महाबळेश्वर ला जातांना बस मध्ये सगळ्यांची खूप धमाल सुरू असते .... आणि फायनली सगळे महाबळेश्वर ला पोहचले....आता पुढे....)

महाबळेश्वर ला सगळे व्यवस्थित पोहचले होते. दुपारी जेवण करून सगळ्यांनी चांगलाच आराम केला होता. सगळे फ्रेश झाले....आपापल्या आवडीने कोणी रीसोर्टला फेरफटका मारला तर कोणी थोडं आजूबाजूला फिरून आले होते. रिसॉर्ट मध्ये लहान मुलांसाठी पण खेळणी, झुले, घसरगुंडी असा एक एरिया होता....लहान मुलांची तिथे फुल्ल टू धम्माल सुरू होती...तिथे बघायला गार्ड्स असल्यामुळे लहान मुलांच्या आईवडिलांना सुद्धा बऱ्यापैकी मोकळीक मिळाली होती...सगळे जण आपापल्या वयानुसार, आवडीनुसार त्या स्थळाचा आनंद घेत होते.

रात्री नऊ  वाजता सगळ्यांचे डिनर आटोपले..... वृध्द आणि मोठी मंडळी आराम करायला म्हणून  लवकरच आपापल्या रूम मध्ये निघून आली...पण दिवसा खूप आराम केल्यामुळे तरुण मंडळींना काही झोप येत नव्हती....दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा काही कार्यक्रम नव्हते ...त्यामुळे आरामात उठले तरी चालणार होते....सगळ्या तरुण मंडळीन्नी लेट नाईट गप्पागोष्टी चा प्लॅन केला....

रिसॉर्ट मध्येच मागच्या बाजूला मोकळ्या हवेत एक मोठं ओपन ट्री हाऊस होते.....लाकडाचे बनलेले....जवळपास पंधरा  पायऱ्या चढून वरती गेले की वरती मोकळी एक मोठी  रूम , चारही बाजूंनी आणि काही मध्ये लाकडाचे कोरीव काम केलेले मोठे पिलर्स ,  कौलारू छतासारख डिझाईन असलेले छत , चारही बाजूंनी पिलर्सला धरून चार फुटांची लाकडी बाऊंडरी .... तिथे बसायला हलक्या टेबल खुर्च्या...आणि बाऊंडरीला टेकून काही बेंच ठेवले होते.... छताला जुन्या काळात होते तसे कंदील लुकलुकत होते.....महाबळेश्वर उन्हाळ्यात सुद्धा थंड ठिकाण त्यात रात्र ...मोकळी थंड हवा खेळती होती ... जे थोडेफार झोप येण्याची कुरकुर करत होते त्यांना सुद्धा फ्रेश वाटत होते...झोप कुठल्या कुठे पळाली होती...

जवळपास रात्री साडे दहाच्या सुमारास राज, राहुल , रश्मी ,रुची आणि या सगळ्यांची भावंडं सगळेच तिथे जमले होते.....

" अरे ही नंदिनी वहिनी नाही आलो अजून ?"....एक भावंडं

" राज , बायको कुठे ?" ... एक ताई

" असेल कुठेतरी कामात...."...राज सुद्धा तिला शोधत इकडे तिकडे बघत बोलला..

" तिच्या शिवाय मजा नाही ..... full on energetic असते वहिनी....."....

" अरे तर फोन कर ना तिला..."....ताई

" ह्मम...."....राज त्याचा फोन हातात घेत बोलला

"काही फायदा नाही , मी केला दोन तीन दा ... उचलत नाहीये...फोन कुठेतरी ठेवला दिसतोय तिने ..."....राहुल

" दादा, सांभाळून या ....नाहीतर एक ट्रे  मी पकडते......"....नंदिनी , राहुलचं ऐकून राज नंदिनीला शोधायला जाणार ... तेवढयात नंदिनीचा आवाज आला....त्याने खाली बघितले तर नंदिनी दोन वेटर सोबत बोलत उभी होती... नंदिन आणि त्यांच्या मागोमाग वेटर   वरती आले ...

" वहिनी , अग कुठे......"....एक भाऊ  बोलतच होता की मागे वेटर दिसले आणि त्यांच्या हातात ट्रे दिसले.... त्यात मस्त  गरमागरम कॉफी आणि काही स्नॅक्स आयटेम होते...

" ये वहिनी....तू एकदम ऑसम आहेस..... आता मज्जा येणार "..... रवी ( राजचा कझिन )

" हो , अरे ही अशी रात्र, त्यात थंड हवा... राज आणि मला खूप आवडते  कॉफी पित गप्पा मारायला........"..... नंदिनी

" ओ sssss ........."....सगळ्यांचाच एक सूर लागला...ये ऐकून नंदिनीला गालातच हसू येत होते....हे सगळं असे चिडवणे वैगरे ती पहिल्यांदाच अनुभवत होती....ते चिडवणे सुद्धा तिला खूप गोड वाटत होते.... राज ची बायको असल्याचा , सगळे वहिनी वहिनी करत मान देत होते तर गोड गोड मस्करी सुद्धा....हे सगळंच तिला हवेहवेसे वाटत होते.....

राहुलच्या साखरपुड्याचे वेळी बहुतेक हे  सगळे भावंडं  आले होते .... तेव्हा नंदिनी आणि ते एकमेकांना नवीन होते...त्यात त्यांनी नंदिनी बद्दल वेगळेच काही ऐकलेले होते त्यामुळे त्या सगळ्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता....पण आता मात्र त्या सगळ्यांची नंदिनिसोबत छान गट्टी जमली होती...नंदिनीच्या हसऱ्या लघवी स्वभावाने सगळ्यांना आपले केले होते त्यामुळे राजचे भावंडं सुद्धा वहिनी वहिनी करत तिच्यासोबत बरेच मोकळे झाले होते....

" क्या बात है , म्हणून म्हणते तुला लग्न कर , आपली  बायको असली की अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळते.....हो ना रे राज दादा "..... रिनी

" अरे बाबा शादी एक ऐसा लड्डू है जो खाये पछताये , जो ना खाये पछताये.....काय राज बरोबर ना ....??"...राज चा एक मोठा लग्न झालेला भाऊ

राज त्यावर कसनुस हसला.....

" काही काय बोलतो....ते काय तुझ्यासारखे नाहीत.... बघ त्यांच्याकडे, कुठूनतरी पछतावा दिसतोय काय त्यांच्या चेहऱ्यावर.......?".......त्याच लग्न झालेल्या भावाची बायको..

" खरंच पण भाई, यार तु खुप लकी आहेस......you two are just made for each other...... mind-blowing couple ....."......

नंदिनीला हे सगळं बोलणं खूप भारी वाटत होते , राज ची बायको असल्याचे फील येत होते....ते सगळं ऐकून तिच्या ओठांवर क्यूट हसू पसरले होते....ती थोडीफार गालात लाजल्यासारखी पण वाटत होती... राज मात्र या सगळ्यांचा निशाणा झाला होता....सगळेच जण त्याची खूप खीचाई करायला लागले होते...तो फक्त ' ह्मम ह्मम ' करत होता.....

" अरे हम भी है ........ तुम्ही तर तर मला साईड रोल मध्येच टाकलं... असं वाटते आहे माझं नाही त्याचंच लग्न आहे .....""..... राजचा त्रासिक चेहरा बघून राहुलने सगळ्यांचं लक्ष राज वरून बाजूला व्हावे म्हणून मध्ये आपला पाय घातला....

" ये जळकुकडू .... कॉफी घे ".... नंदिनीने राहुलच्या हातात कॉफी मग दिला....

तसे सगळे हसायला लागले..... राज एका कॉर्नरमध्ये उभा होता....नंदिनीने एक कॉफीचा मग ट्रे मधून उचलला  आणि राजच्या पुढे जाऊन उभी राहत त्याच्या पुढे मग धरला...

" Thanks ......"..... राज .... नंदिनने त्याला बघून गोड स्मायल केले..

" मॅडम , परत काही हवे काय ?"..... वेटर सगळ्यांना मग देत स्नॅक्स मध्ये टेबलवर ठेवत बोलला

" बस .... Thanks दादा " .... नंदिनी

" Welcome Madam ".... बोलत वेटर तिथून चालले गेले..

आता सगळे राहुल आणि रश्मीच्या मागे लागले होते....त्यांना त्यांची लव्हस्टोरी विचारत होते...राहुल सुद्धा दोन चार हातचे जोडून आपल्या फनी स्टाईल मध्ये त्यांना सांगत होता........बोलता बोलता अधून मधून रश्मीला सुद्धा चिडवायचा....त्यात मग दोघांची तू तू मैं मैं व्हायची.....सगळे राहुलची कथा एन्जॉय करत होते.... रश्मी चे भावंडांना तर राहुल भारीच आवडला होता....इतके इझी गोइंग क्यारॅक्टर होते त्याचे....   

इकडे काकी नंदिनीला शोधत होत्या , नंदिनी दिसत नाही म्हणून त्या  राजच्या आईच्या रूममध्ये आल्या...

" वहिनी , नंदिनी ला बघितले काय ??? बऱ्याच वेळ पासून शोधते आहे ... दिसत नाही आहे ... आणि राज राहुल , बाकी कोणीच दिसत नाही आहे "....काकी

" अरे हो तू रेवती ताईंसोबत बोलत होती... तुला सांगायचे विसरले ... अगं सगळे मुलं ते बघ तिकडे गप्पागोष्टी करत बसले आहे...."....आई बाल्कनी मधून काकींना ट्री हाऊस दाखवत बोलल्या...

" अच्छा , मला नव्हते माहिती..."....काकी

" काही महत्वाचे काम होते काय नंदिनिकडे ?? थांब फोन करून बोलावते तिला ".... आई

" अहो वहिनी , नको , असू द्या .. इतकं पण महत्वाचे नाहीये काम....उद्या सकाळी पण करता येतात.... करू देत मुलांना एन्जॉय..... कधीतरी भेटतात सगळे भावंडं एकसाथ .... नाहीतर आजकाल कुठे या मुलांना वेळ मिळतो...... अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र वेळ घालवायला मिळतो त्यांना.... "....काकी

" हो बरोबर आहे तुझं.... मला या पिढीचे खूप कौतुक वाटते .... यांना मान पान, आदर सत्कार असे काही लागत नाही....कसल्या गोष्टींची काही कंप्लेंट नसते की आम्हाला विचारले नाही वैगरे अश्या कसल्याच अपेक्षा नसतात.......कोणाला टाँट नाही की कोणाला टोचून बोलणार नाही ........काही  रुसण फुगणे नाही......मस्तपैकी एकत्र वेळ घालवतात.... सुख दुःख शेअर करतात ......हसतात, हसवतात ...एक एक क्षण आनंदाने जगतात..... छान छान आठवणी जमवतात..... जगण्यातल बळ घेऊन परत आपल्या ठिकाणी हसत हसत परत जातात......

बरं यांना एक फोन कॉल पुरेसा असतो निमंत्रण साठी... पत्रिका का नाही वैगरे एक शब्दाने विचारत नाही......तुला आठवते रागिनी....यांची चुलत बहीण रेखाताई.... तुमच्या लग्नाच्या वेळी किती रुसल्या होत्या.... लग्न साठी पत्र मिळाले नाही....सगळ्यांना मिळाले .... आम्हाला का पाठवले नाही..... किती चिडल्या होत्या.....तरी बरं पत्रिका पाठविली होती.....आणि फोन पण केला होता...पण बाकीच्यांना पत्र पाठवले आणि मला का नाही... बरं ते भाऊसाहेब पण खूप रागावले म्हणे.... आपल्या बाबांनी किती समजावून सांगितले की पत्र पाठवले.... पोस्टाकडून काही गडबड झाली असेल....पण एक ऐकायला तयार नाही .... शेवटी आपल्या घरची मुलगी.... लग्नाला यायला हवी म्हणून त्यांच्या गावी जाऊन भाऊसाहेबांची माफी मागत परत निमंत्रण देऊन आले....तेव्हा आले ते....तसेच एक यांचे मावस भाऊ...ते पण असेच खूप bhariy होते.... घरात काही करायचं म्हटले की त्यांना आधी बिचारा ,बोलवा....नाहीतर ते पण भारी रुसायचे........आपली पिढी, आधीची पिढी या बाबतीत खूप कठीण होत्या बाबा....."...आई आताच्या पिढीचे बघून जुन्या आठवणी आठवायला लागल्या...कोण कसं कार्यक्रमांमध्ये त्रास द्यायचे, नीट मानपान नाही झाला, आम्ही आलो  तर बघितलेच नाही , पाणीच नाही विचारले...आधी त्यालाच का ,मला का नाही... , हे असेच दिले नी ते तसेच... किती छोट्या छोट्या कारणांवरून   रुसून फुगून बसायचे ....आणि आपला आनंद, आपला कार्यक्रम सोडा, आलेल्या पाहुण्यांना मनवतच , त्यांची मनधरणी करण्यातच सगळा वेळ जायचा....त्यातही कमी जास्ती काही झाले तर परत मोठ्यांकडून बोलणी खा......असे कार्यक्रम म्हटले की खूप टेन्शन यायचे घरतल्यांना खास करून महिला मंडळींना.....

" खरं आहे वहिनी तुमचं..... या पिढीकडून नक्कीच आपण सगळ्यांनी या गोष्टी शिकायला हव्यात.....किती धकाधकीचे धावपळीचे जीवन झाले आहे आता... .....तेच चार क्षण आनंदाचे मिळत असतील तर ती वेळ रुसण्या फुगण्यात न घालवता , मस्त आनंदाने पुरेपूर जागून घ्यावे......वेळ परतून येत नाही.......आणि हे आपल्याशिवाय आणखी कोणाला माहिती??? कधी आपल्या बाळाची नंदिनी त्याला परत मिळेल??.........."......रागिणी

"ह्मम....पण नाही ना कोणी लवकर हे स्वीकारत......ही तरुण मंडळी बघ.... असेल त्या परिस्थितीत लवकर adjust होतात.... ही जुनी लोकं " बदल " लवकर स्वीकार नाही करत......"....आई थोडी खंत व्यक्त करत बोलत होत्या...

" जाऊ द्या वहिनी.....आपण आपल्या पासून सुरू करूयात..... मुलांना करू देत एन्जॉय...यासाजी उद्या सकाळी काही फार कामं नाहीत....उशिरा उठले तरी चालतात.....करा तुम्ही आराम.....येते मी "...... म्हणत काकी आपल्या रूम मध्ये निघून आली...

इकडे ya सगळ्यांची मस्ती चांगलीच रंगात आली होती....कांदेपोह्याचा कार्यक्रम ऐकून तर सगळे खूप हसत होते......त्यात राहुल रशमीची पहिली भेट......त्या सगळ्यांची खूप धमाल सुरू होती.....

नंदिनी फिरत फिरत तिथे एका कॉर्नर जवळ येत लाकडी खांबाला टेकुन  दोन्ही हातांनी कॉफी चा मग पकडत एक एक घुट पित ती बाहेर बघत होती........स्वच्छ आभाळ.....चंद्राचे निखळ चांदणं,त्यात  लुकलुकणाऱ्या चांदण्या....स्वच्छ गार वारा....त्यात मिसळणारा फुलांचा सुगंध , वाऱ्याबरोबर हलणारी झाडांची पानं , फांद्या.....हे सगळं अनुभवत ती त्या निसर्गात हरवली होती.....

सगळ्यांची एकमेकांसोबत चेष्टा मस्करी करत करता राजकडे गाडी वळली...

" राज , किती छान वातावरण झाले आहे.... एखादं गाणं म्हण ना ....".....

" हो हो ... म्हण ना... किती दिवस झाले तुझा आवाज नाही ऐकला"....

" नको ग..... आता काही प्रॅक्टिस नाही माझी ....."... राज

" त्यात काय प्रॅक्टिसचं??...... तू छानच म्हणतो....आणि तसेही इथे कुठली काँपिटीशन आहे...?"....

" हो हो म्हण.....नंदिनी वहिनी साठी ....."....

सगळे मागे लागल्या मुळे राज चे कोणाचे मन मोडायची इच्छा झाली नाही....त्याने त्याचा मोबाईल हातात घेत त्यात एका मुजिक ॲप मधून  एका गाण्याचे मुजिक सुरू केले...आणि नंदिनी कडे बघू लागला...

नंदिनीने पांढरा लखनवी पॅटर्नचा सलवार कुर्ता घातला होता......त्यावर लाल बांधणी प्रिंटची गोल्डन बॉर्डर असलेली सिल्की ओढणी दोन्ही खांद्यांवर घेतली होती....मोकळे केस.....येणाऱ्या हवेच्या झुळूक बरोबर तिचे उडणारे केसं सोबत त्यांना मिळणारी ओढणीची साथ......चंद्राच्या चांदण्यात खुलून दिसणारा तिचा चेहरा......राजाला ला भुरळ पाडत होते.........राज तिचे हे सौंदर्य न्याहाळन्यात  होता......या इतक्या प्रसन्न शांत वातावरणात तिला बघण्यात तो इतका गुंग झाला होता की आता त्याच्या डोक्यातून थोड्या वेळ साठी का होईना....नंदिनीच्या त्या दुसऱ्या व्यक्ती बद्दल तो विसरला होता...

" कधी तू रिमझिम झरणारी बरसात........

आवाज आला तसे नंदिनिने मागे वळून बघितले तर राज गाणं गात होता....तिच्याकडे बघत.....त्याचा तो गोड आवाज ऐकून ती शॉक झाली कारण तिने त्याला कधीच गाणं गाताना बघितले नव्हते.......

" कधी तू रिमझिम झरणारी बरसात........

कधी तू चम चम करणारी चांदरात

कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा

बिजलीची नक्षी अंबरात ...

सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा

चिंब पावसाची ओली रात ....

त्याचा तो गोड मधाळ आवाज ऐकून नंदिनीच्य अंगावर शहारे आले.....तिनें हातातला मग बाजूला ठेवला...आणि ओढणीने आपले हात झाकून घेत हातांची घडी घालत थंडी वाजल्या सारखे आपल्याच दनडांवरून फिरवत होती...त्यात हवा चांगलीच सुटली....तिचे केस सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हवेवर उडत होते....ती मात्र एकटक राजला बघण्यात हरवली होती......

कधी तू अंग अंग मोहरणारी

आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात

कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा

बिजलीची नक्षी अंबरात ...

सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा

चिंब पावसाची ओली रात ....

जरी तू कळले तरी ना कळणारे

दिसले तरी ना दिसणारे

विरणारे मृगजळ एक क्षणात

तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू चम चम करणारी चांदरात

सगळे गाणे ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते..... गाणं संपले तरी कोणाच्याच लक्षात आले नाही.....थोड्यावेळ एक अबोल अशी शांतता पसरली होती... रशमीचा फोन वाजला....रश्मीने दोन शब्द बोलुन फोन ठेवला.... तसे सगळे भानावर आले..... आणि सगळे टाळ्या वाजवायला लागले......नंदिनीच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू पसरले होते......टाळ्यांच्या आवाजाने राज भानावर आला....आणि त्याने नंदिनिवरून आपली नजर  वळवली.....

" नंदिनी वहिनी.....दादा बद्दल काही तर बोला....तुमच्यासाठी म्हटलं आहे त्याने जे साँग ....".....नंदिनी चूप शांत राजकडे बघत उभी आहे बघून एक भाऊ बोलला

" बोलायला शब्दच नाहीत.......मंत्रमुग्ध केलंय त्याचा आवाजाने ......"....नंदिनी , नंदिनीला खरंच काय बोलावं सुचत नव्हते....

" तरीसुद्धा ...... आम्ही कितीही कौतुक केले तरी त्याला मात्र तुमचेच शब्द ऐकायचे असतील "......

ते ऐकून  नंदिनी हसली......" He is the magician.... जादूगार आहे तो .....कुणालाही त्याचा मोह व्हावा असाच .......सगळ्यांना हवाहवासा........".... नंदिनी राज कडे बघत त्याच्या जवळ जात बोलली..

" ओ sssss......".....परत सुर निघाला....

" सॉरी .... ते या सगळ्यांनी खूप फोर्स केला... म्हणून गायलो गाणं "...... राज

" सॉरी का???.... किती छान म्हणतो तू....किती गोड आवाज आहे तुझा.... हरवायला झाले होते......मला माहितीच नव्हता तुझा हा गुण ...."....नंदिनी

" आई छान म्हणायची गाणं .... तिचाच गुण घेतजा आहे....तिची आवड होती म्हणून लहानपणी गाण्याचा क्लास लावला होता.... पण आता गेली काही वर्ष वेळे अभावी काहीच सराव नव्हता...."....राज

" अरे वाह....आई ला पण येतं......खूप छान "....नंदिनी

तेवढयात परत रश्मीच्या फोन वाजला...आणि तिच्या लक्षात आले...

" नंदिनी , अगं आईने बोलवले आहे ..... मी येते.....तुम्ही सगळे करा काँटिन्यू......"....रश्मी , राहुलचा मात्र चेहरा उतरला...

" अगं वहिनी आता तू ला चालली लवकर...आता तर सुरुवात झालीय.......तुम्हा दोघींशिवाय मजा नाही. ग..".... रिनी

" हो, थांब ना रश्मी....."....नंदिनी

" अगं , ती एक आत्या आजी आहे , जरा जुन्या विचारांची आहे....ती दोन तीन दा विचारून गेली माझ्या बद्दल...तिची कुरकुर सुरू आहे, होणाऱ्या नवरीने असे रात्री बाहेर नको राहायला  वैगरे......".... रश्मी

" बरं , ठीक आहे....."....नंदिनी.

" अभी ना जाओ छोडकर , के दिल अभी भरा नही ....".... राहुलने चेहऱ्यावर दुःखी हावभाव करत  एक नाकातून  सेंटी सुर काढला.... ..

" राहुल तू मला खरंच थांबवतोय की भगवतोय ....."....रश्मी प्रश्नार्थक नजरेने बघत होती..... तसे सगळे हसायला लागले.....

" अरे उगाच थोड्या साठी कशाला आजीला दुखवायचे.... त्यांच्या काही जुन्या मान्यता आहेत.... जुनं माणूस ते....नाही ऐकणार.....सकाळी भेटूच.....रुची आहेच इथे आणि बाकी सगळे पण आहेच की ......."...सगळ्यांना गूड नाईट करत ती पायऱ्या उतरायला लागली...

" Wait..... मी येतोय पोहचवायला...."....म्हणत राहुलने तिथून गायब झाला......बाकी सगळ्यांनी आपली धमाल मस्ती काँटिन्यू केली...

" ये रश्मी हळू....इतकी फास्ट का चालते आहे..??....मी येतोय...."...राहुल रश्मीच्या मागे जात ओरडत होता...पण रश्मी मात्र त्याचं काही न ऐकल्यासारखे करत पुढे जात होती.....शेवटी त्याने पळत जाऊन तिचा हात पकडला...

" कधीचा आवाज देतोय....थांबत ला नाहीये....?"... राहुल

" मला नाही बोलायचं ".....रश्मी

" का ..,...?"....राहुल

" तुला मीच सापडते ना चेष्टा करायला......एक कौतुक करत नाहीस ..... फक्त मस्करी आणि चिडवत असतो...

".......रश्मी

" अरे बापरे.....मॅडम रुसल्या आहेत तर......".... राहूल

रश्मीने नाक मुरडले आणि परत पुढे चालायला लागली....

" कसली गोडंबी दिसतेस रागात असताना ...".....राहुल

" बस पुरे..... एकट्यातच सुचतं तुला.....सगळ्यांसमोर मात्र फक्त मस्करी करत असतो माझी...."..रश्मी

" गंमत असते ग ती ..... सगळे हसतात.... किसी को हसाना बहोत पुण्य का काम होता है मोहतरमा .... आणि तुला माहिती ना मी असाच आहो ग....."....राहुल

" पण , तरीही .... एखाद्या वेळ तर कौतुक असावे......तसेही तुझ्यासमोर मला कोणी बघत नाही....मी डावीच दिसते तुझ्यापुढे ......".....रश्मी ( रश्मीने तिच्या  रंगावरून काही बायकांचं बोलणं ऐकलं होते........तिला थोडं वाईट वाटले होते......सगळ्यांसमोर ती चूप होती.....राहुलच्या मस्तीत शामिल होत होती.... राहुल तिच्या हक्काचा माणूस होता...त्याच्या पुढे ती रुसू शकत होती...अपेक्षा करू शकत होती.....)

" अरे बापरे , या छोट्याशा मेंदू मध्ये मोठमोठे प्रश्नांनी, शंकांनी घर केले दिसतंय......रश्मी असं काही नाही आहे....कोण उजवं कोण डावं नाहीये...आपण सारखे आहोत...बरोबरीचे आहोत...एकमेकांना परफेक्ट आहोत...."... राहुल समजावयाचा सुरात बोलत होता.....पण ती मात्र काहीच ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती...

" नाकावरच्या रागाला औषध काय

गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय……".... राहूल परत तिच्या मागे मागे जात ओरडत होता...

" असू दे.....तुला माझ्या मनातले पण कळू नये......"...." गुड नाईट " ....म्हणत ती आपल्या आईच्या रूम मध्ये गेली.....

" बापरे.....प्रकरण बरंच गंभीर दिसत आहे.....बघुया उद्या सकाळी....."....विचार करत तो आपल्या रूम मध्ये निघून आला.

जवळपास रात्रीचा एक वाजत आला होता.... सगळ्यांची मौजमस्ती आटोपली होती...आता सगळे पेंगायला खले होते....प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये परत येत होते......राज नंदिनी सगळ्यांच्या मागे चालत येत होते...

दोघंही शांत होते....बरोबरीने चालत होते.....

" राज खूप छान जागा आहे ही.... मला खूप खूप आवडली ....".....नंदिनी

" Thanks...... कॉलेज मध्ये असताना मित्रांसोबत  खूपदा येत होतो इकडे  ....मला पण नेहमी आवडत होती...".....राज , नंदिनीचा स्मृतिभ्रंश व्हायच्या आधी कॉलेज च्या कितीतरी गमती जमती त्याने नंदिनीला सांगितल्या होत्या...त्यात महाबळेश्वर बद्दल तर खूपदा सांगितले होते, तेव्हा तिने त्याच्याकडून प्रॉमिस सुद्धा घेतलेले.....की लग्न नंतर तिथे दोघांनी जायचं ते.....पण तिला आता ते काहीच आठवत नव्हते....

" ह्मम......"....नंदिनी

बराच वेळ परत शांततेत गेला..

" नंदिनी.....".....राज

" हा रे ......"....नंदिनी

" थोडं पर्सनल आहे, विचारू काय ?".....राज

" राज , तुझ्या पासून  लपवून माझं असं पर्सनल काहीच नाही आहे...... तुला परमिशन घ्यायची गरज नाही .... विचार बिनधास्त.....".... नंदिनी

" नंदिनी, तुझ्या त्या  मित्राचा फोन वैगरे येत नाही काय?? I mean मला तू कधी दिसली नाही बोलतांना त्याच्यासोबत , म्हणून सहज विचारले....".... राज

" बोलातेना रात्री झोपण्यापूर्वी ( नंदिनी राजच्या फोटो सोबत जे बोलायची...), आणि ना तो थोडा रुसला आहे ..... घरी सांगण्यासाठी  खूप घाई चाललेली, पण राहुलचे लग्न आहे ना .... म्हणून थांबले मी......उगाच काही गडबड नको ...म्हणून थोडा नाराज आहे माझ्यावर तो.....पण don't worry ,  मनधरणी येते मला त्याची करता.....आणि तो पण माझ्यावर जास्ती काळ नाराज नाही राहू शकत....."......नंदिनी राजच्या चेहऱ्यावरचे एक एक बदलणारे भाव टिपत बोलत होती...

"ह्मम ..... गूड "..….राज

" परत काही विचारायचे आहे ??".......नंदिनी

" नाही..... "....राज

" बरं , आल्या आपल्या रूम .... गूड नाईट...."....नंदिनी , बोलत नंदिनी वळली

" नंदिनी ...."....राज

राजच्या आवाजाने परत ती वळली...

" हा बोल ....."....नंदिनी

" ही माझ्या रूमची एक्स्ट्रा की , नवीन जागा आहे .... रात्रीतून भीती वाटली , एकटं वाटले तर कधी पण ये इथे, किंवा फोन कर ...."....राज  स्वापिंग कार्ड तिच्या पुढे करत बोलला..

" राज , मी सोडून पण कधी दुसरा विचार करत जा रे .... किती काळजी असते तुला माझी , लहान लहान गोष्टींची काळजी घेतो.... नवीन जागी एकट्याने मला कधी भीती वाटते, हे पण लक्षात आहे तुझ्या....."....नंदिनी त्याच्याकडे बघत विचार करत होती , तिला खूप गहिवरून आले होते...

" काय झालं?? ".....राज तिला शांत बघून बोलला

" काही नाही .....".... हसत मान हलवत तिने त्याचा हातातले कार्ड घेतले...

" ठीक आहे , कर आराम..... आणि हो सकाळी लवकर उठायची काही गरज नाही आहे....सकाळी काही फंक्शन नाही आहे .......... नाहीतर पहाटेच उठून बसशील......कोण काय म्हणेल ...असे फालतू विचार करायची गरज नाही आहे..... दोन तीन दिवसापासून खूप दगदग झालिये तुझी....."......राज

तिने होकारार्थी मान हलवली......तो इतक्या काळजीने बोलत होता की तिचा आता त्याला सतवायचा अजिबात मूड नव्हता झाला..

" बाय......."....राज

" शुभ रात्री ......"....नंदिनी.... तसा तो हसला...

नंदिनी रूमध्ये जाई पर्यंत तो तिथेच उभा होता....ती आतमध्ये गेली, तसा मग तो आपल्या रूममध्ये आला होता......

राजची फॅमिली एका फ्लोअर वर होती.....आणि बाकी शाळे पाहुणे मंडळी वेगवेगळ्या फ्लोअर वर होते...... राजने नंदिनी साठी वेगळी रूम बुक केली होती...पण अगदी त्याच्या रूम समोरची .... गरज पडली तर तिला कधीही त्याच्या रूम मध्ये येता यावे......दिवसभर तर ते सगळ्यांसमोर नवरा बायको असल्याचे नाटक करत होते..(म्हणजे नंदिनी नव्हती करत, पण आता या परिस्थितीत तरी  त्याला असेच वाटत होते...).... रात्र तरी तिला जे नाटक करू लागावे नाही...तिची पर्सनल स्पेस ( व्यक्तिगत मोकळीक ) तिला मिळावी , म्हणून त्याने त्यांच्या वेगळ्या रूम बुक केल्या होत्या...

सगळे गाढ झोपेत निद्रिस्त झाले.........

**********

क्रमशः

**********

" यार आई ... हे इतके कार्यक्रम करणे गरजचे आहेत काय...?? किती वाट बघतोय मी लग्नाची "......राहुल त्रासिक सुर काढत बोलत होता....

" मी पण ......."....नंदिनी स्वप्नवत बोलत होती..

" हो , गरज आहे ...... आणि गपरे तू ढोल्या ..... तुला काय लग्न नाही केले तरी चालले असते......"... काकी

" नाही नाही , असं कसं ..... आपली संस्कृती , आपल्या परंपरा , येवढे तर मी पाळलच असते..... after all तुझा मानपान मी कसा घालवेल....."....राहुल

" खरंय....."....नंदिनी.,

" ह्मम ... बदमाश.....आला मोठा मानपान सांभाळणारा......" ..काकिने राहुलच्या पाठीत एक धपाटा घातला..... ते बघून नंदिनी खी खी करत हसायला लागली...

" आ ssss ...... अगं माझं लग्न आहे ना.... मीच तर या सगळ्या कार्यक्रमांची उत्सव मूर्ती आहो..... मलाच मारते आहे तू......तिकडे ती रश्मी शाब्दिक वार करते..... तू हाताने वार करते........ माझी काही किंमतच नाही तुम्हाला....."....राहुल नाटकी सुर काढत होता...

" उत्सवमूर्ती ...... बिचारा ......"....नंदिनी परत हसत होती......

" पण आई , हे मेहेंदी, हळद , संगीत.......मग इतक्या उशिराने लग्न......, किती उशीर होतोय ...आधीच या नंदिनी मुळे सहा महिने उशीर झाला , त्यात आता हे एके एक दिवस.......काय गरज आहे?......"..... राहूल

" ये नाही हा......गरज आहे सगळी...... माझ्या लग्नाचं तर मला हे सगळं आठवत नाहीये......मला एक एक क्षण मेमोरेबल करायचा.....भरभरून जगायचा.... एन्जॉय करायचा.......लग्न एकदाच होत असते .... आयुष्यात हे क्षण एकदाच येत असतात.... हे आताच जगायचे असतात....नंतर कितीही anniversary अन काय काय सेलिब्रेट केले तरी हे क्षण परत नाही येणार...... प्रत्येक कार्यक्रमाची एक वेगळी गोड आठवण असते.... माझं तर नाही झालं असं काहीच..... मला जगायचं यार हे सगळं...."....नंदिनी

" Okay ...... आपके लिये कुचभी ....फिर येह दो दिन क्या चीज है.......".... राहुल तिच्या पुढे झुकत बोलला

" आला मोठा कुर्बान करणारा..... याच्या मनात लड्डू फुटत आहे.... ते नाही सांगणार....."....नंदिनी...

" बरं बाई.... चल आपल्या वाचक मित्रांना तर आमंत्रण देऊ दे माझ्या लग्नाचं ..... माझ्या लग्नाचं तर कोणाला काय कौतुक नाही..,. सगळे तुमच्याच दोघांच्या मिलनाची वाट बघत आहेत......मला तर कोणी भाव ही देईना.....लेखिका बाई पण काय जास्ती लिहीत ना माझ्या बद्दल.....तरी सुद्धा देतो मी बिचारा माझ्या लग्नाचं आमंत्रण....."..... राहुल

" हा हा हा ...... सांगूयात हा तुझ्या बद्दल ...."....नंदिनी

" नमस्कार मित्र मैत्रिणींनो.....
आमच्या म्हणजे राहुल आणि रश्मीच्या मेहंदी, हळद , संगीत , आणि लग्न सोहळ्यात आपण सगळे निमंत्रित आहात..... आपण सगळ्यांनी यावे आणि आमच्या या मधुर क्षणाचे सोबती व्हावे हीच आम्हा सगळ्यांची , देशमुख परिवाराची आग्रहाची विनंती .... "..... राहुल

" हो सोबतीने आनंदाची देवाणघेवाण करूया ......"... नंदिनी हात जोडत निमंत्रण देत आहे....

भेटूया पुढल्या भागात......

**********


 

🎭 Series Post

View all