Login

नंदिनी...श्वास माझा 77

नंदिनी राज

भाग 77

लग्न डेस्टिनेशन वेडिंग कॉन्सेप्टचे ठरले होते....अगदी जवळचे लोकं लग्नासाठी आमंत्रित केले  होते.....आणि नंतर इथेच  सगळ्यांसाठी रिसेप्शन करायचा प्लॅन केला होता...., ..उन्हाळा असल्यामुळे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण लग्नासाठी  ठरवण्यात आले होते... कुळाचार घरी, आणि बाकी मग सगळे कार्यक्रम महाबळेश्वरच्या  एका रिसॉर्ट मध्ये होणार होते...पूर्ण रिसॉर्ट  बुक करण्यात आला होता...

उद्या कुळाचार , काही जवळचे नातेवाईक आले होते.... बाकी उरलेले काही पाहुणे  महाबळेश्वरला  जायच्या एक दिवस आधी येणार होते...उद्या पासून वेळ नाही मिळणार म्हणून आजच सगळं पॅकिंग , लग्नासाठी लागणारे सगळ्या वस्तू , पॅक केलेले बॉक्सेस एकदा सगळं चेक करणे सुरू होते.... आजीसाहेब स्वतः लक्ष घालून सगळी कामं नीट झाली आहेत की नाही लक्ष देत होत्या.... राज पण काहीतरी कामाने तिथे आला होता...आणि हे सगळं बघत होता....

" नंदिनी , मी लिस्ट मधून नावं वाचते...तू बघ ते सगळं सामान आलंय काय आणि सगळे बॉक्सेस चेक कर.....काही राहायला नको......"... काकी

" ठीक आहे...."....नंदिनी

काकी एक एक नाव घेत होत्या लिस्ट मधून आणि नंदिनी ते बघत होती.... काही आठवले तर आजीसाहेब अधून मधून आठवण करून देत होत्या...

" ते अहेराचे बॉक्स चेक करा नंदिनी एकदा....बरेच पाहुणे तिथूनच परस्पर घरी जाणार आहेत.....घेण्या देण्याची जबाबदारी तुमची नंदिनी....काही सुटायला नको "..... आजीसाहेब

" अहेराचे आहेच तर तुमचे....? तुम्हाला किती सांगूनही तुम्ही ऐकत नाहीत....ही पद्धत खूप चुकीची आहे...." ...राज थोडा चिडलाच

" हे बघा , काही रीतिभाती असतात, त्या पाळाव्याच लागतात....तुम्ही आम्हा बायकांच्या कामामध्ये बोलू नका....तसे पण लग्न पत्रिका छापताना आम्ही तुमचे ऐकले होते आणि खूप साध्या अश्या पत्रिका आपण छापल्या आहेत....आपल्या स्टेटसला अजिबात शोभले नाही ते...तरी सुद्धा तुमची इच्छा म्हणून आम्ही ते स्वीकारले.....आता आमचं आम्हाला बघू द्या....".... आजीसाहेब

" आजीसाहेब , स्टेटस जपणे म्हणजे आपण किती दिखावा करतो त्यावर नसते ... चांगली कामं , गरजूंना मदत करून , चांगल्या कामात आपले नाव कमावून स्टेटस जपता येते....दिखाऊपणा म्हणजे स्टेटस नव्हे.....आणि पत्रिकांबद्दल काय चुकीचे बोललो मी....निमंत्रण देणे येवढाच उद्देश असतो त्यांचा...तुम्ही किती पण महागाची पत्रिका घ्या....शेवटी ती कचरापेटीतच जाते......कोणी ती जपून नाही ठेवत की त्याचा काही वापर करतो...पैसे तर वाया जातात, कागद सुद्धा....तुमच्या त्या एका पत्रिकेत किती लोकांचे जेवण येते......".....राज

" हो रे..... पण आपण करतोय की दानधर्म ....."....आई

" आई, अग.... मी दानधर्म बद्दल नाही बोलत आहो.... प्रत्येकच व्यक्ती आपल्या सोयीप्रमाणे ते करतच असतो....मी वाया घालवण्या बद्दल बोलतोय....".....राज

" मग तुम्ही म्हणाल हे फुलं ,सजावट ..... हे सगळं वाया घालवत आहोत....पुढे तर जाऊन तुम्ही म्हणाल हे सगळं करण्यात वेळ पण वाया घालवत आहोत.....".... आजीसाहेब

" आजीसाहेब तुम्ही शब्दांचे चुकीचे अर्थ काढू नका.... फुलांची सजावट डोळ्यांना सुंदर आणि वातावरणात सुगंध पसरवतात, वातावरण प्रसन्न, हवा पण शुद्ध करतात...खाण्यापिण्याचे म्हणाल तर पोटात जाते, वाया नाही जाऊ देत आपण काही , हे कार्यक्रम म्हणाल तर एकत्र वेळ घालवल्यानाने नातेसंबंध दृढ होतात...हसण्याचे क्षण जास्ती मिळतात.....आयुष्यभर पुरतील अशा गोड आठवणी आपल्या गाठीशी येतात.... जे आपल्याला आनंद देऊन जातो त्याने वेळ वाया जात नाही.....या सगळ्या बाबतीत माझे काहीच बोलणे नाही.....जिथे वाया जाते ते मी बोलतोय....हे अहेर...खरंच आपण वापरतो काय?? ...या पत्रिका कचरापेटीचे धन असते.....खूप लोक आहेत अशी ... जो उपाशी झोपतात....दहा रुपये कमवायला सुद्धा त्यांना किती कष्ट पडते मी बघतो जवळून..........आपले असो वा दुसऱ्यांचे....का हे पैसे वाया घालवायचे??".........राज

आता आजीसाहेब आणि राजमध्ये शाब्दिक चकमक होत होती....

" तुमचं नेहमीचेच असते असे .... फक्त आपल्या मताचे करायचे असते तुम्हाला....समजदार म्हणतात सगळे...पण हट्टी पण तेवढेच आहात..,.. ऐकूण घ्यायचेच नसते तुम्हाला कधी.....तुमच्या लग्नाच्या वेळी किती हौसमौज होती आम्हाला, तेव्हा काहीच करू देण्याचा अवसर सुद्धा तुम्ही आम्हाला नाही दिला....आता हे घरातील शेवटचे लग्न आहे....आम्हाला आमच्या मनाप्रमाणे करायचं सगळं .....आम्ही घरात मोठे अहो आणि सगळं आमच्या मताप्रमाणे होणार ......" ... आजीसाहेब जरा चिडल्या..

" काम राहिलेत बाजूला... आता यांचे आधी निवळा"...काकी डोक्यावर हात मारत हळूच बोलल्या .

" Generation Gap "...... नंदिनी त्या दोघांकडे बघत होती..

" काय?".....आई

" पिढ्यांमधील अंतर....म्हणजे विचारांचे अंतर.....दोघांनाही ते बरोबर आहेत असे वाटते आहे...एक अतीच प्रॅक्टिकल आहे तर एक अतीच जुन्या गोष्टींमध्ये गुरफटलेला आहे....."....नंदिनी

" मागे आजीसाहेबांच्या बहीण सुशीला आजीने  वाद घातला होता साखरपुड्याला....आता ते सगळे शांत आहेत तर हे दोघं सुरू झाले..... कोण समजवेल यांना??"....राहुलला टेन्शन आले....

" कार्यक्रम म्हटले की होतेच रे, सगळ्यांचे वेगळे विचार...प्रत्येकाला आपल्या मताचे झाले पाहिजे असे वाटते........"..आई

" हो, पण हे असे ....पाहुणे आहेत ना घरात....."...राहुल

"नको काळजी करू, सगळ्यांना माहिती स्वभाव....."...आई

" हो ,पण हा राज....याला काय झाले?? हा असा कधी वागत नाही..."...काकी

"हो ना, त्याचं आजकाल वेगळंच सुरू असते काहीतरी "...आई

" तुम्ही काळजी नका करू, मी बघते...... मध्य  काढावा लागेल......"...नंदिनी...

" करा जे करायचे ते... बनवा पेटीचे धन....इथे आमच्याच लग्ना.....चे ....."....राज बोलतच होता की त्याचे नंदिनीकडे लक्ष गेले....ती पण त्याच्याकडे बघत होती ...   'आमचे लग्न'  शब्द बोलला आणि तो एकदम  शांत झाला,  नंदिनिकडे बघत  त्यांच्या  लग्नाचे सगळे क्षण त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागले....त्याचे मन कासाविस झाले आणि तो वैतागत बाजूला सोफ्यावर जाऊन बसला.....तो सुद्धा बराच चिडला होता.

आजीसाहेब काही बोलणार तेवढयात नंदिनीने त्यांना अडवले आणि त्यांचा हात पकडत त्यांना बाजूला नेऊन बसवले...राज आणि आजीसाहेब आमोरसमोर बसले होते....घरातील वातावरण एकदम शांत झाले होते....

" छाया काकी ssss......."..... नंदिनीने आवाज दिला...

छाया काकी आइसक्रीमचा ट्रे घेऊन आल्या....

" गरम गरम दुपार....त्यात थंड थंड ice cream ..... वाह वाह ..."....नंदिनी

छायाने  सगळ्यांना ice cream दिले....पण आजीसाहेब आणि राजने घेतले नाही...

" जश्या  आजी तसा नातू....एक नंबरचे हट्टी ....."..... आई

नंदिनीने एक बाऊल घेतला नि आजीसाहेबांपुढे धरला.

" आम्हाला नकोय".... आजीसाहेब

" अहो  तुमच्या आवडीचा फ्लेवर आहे ,घ्या हो, ..... जरा थंड होईल वातावरण.....नाहीतर आमच्यावर निघायचा तुमचा राग ".....आबा मस्करी करत बोलले... आजीसाहेबांनी एक कटाक्ष आबांवर टाकला आणि बाऊल हातात घेतला....

नंतर नंदिनीची स्वारी राजकडे वळली....... ' आमचं लग्न ' या शब्दांनंतर अचानक शांत झालेला राज तिला कळला होता...तो का शांत झाला हे पण तिला समजत होते...तिने राज पुढे बाउल धरला

" नकोय...."...राज

" प्लीज ssss".....नंदिनी खूप गोड स्मायल करत त्याचापुढे उभी होती....

त्याला आता परत तिला नाही म्हणाल्या गेले नाही आणि त्याने तिच्या हातून बाऊल घेतला नि पकडून बसला..

सगळे ice cream चा आनंद घेत होते....पण राज मात्र खात नव्हता..... वातावरण हलके करायचे म्हणून नंदिनीने टीव्ही सुरू केला.....आणि तेवढयात च तिचे आवडते गाणे लागले आणि तिला एक आयडिया सुचली....तिने फुलदाणी मधले गुलाबाचे फुल काढले नी आपल्या ओठांमध्ये आडवे  पकडले.....

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी,
संपते अंतर झोक्यात
नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात

नंदिनी राहुल समोर जात एक हात पुढे करत उभी राहिली..... राहुलने पण हसुन तिच्या हातात हात दिला....आता दोघेही  सालसा सारखा डान्स करत होती....नंतर आबांसोबत , नंतर अक्षरशः आजीसाहेबांना पण तिने उठवले...... आजीसाहेबांचा सुद्धा राग आता थोडा निवळला होता....त्या पण आनंदाने नंदिनी जसे करत होती तश्या करत होत्या.....
सगळे कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते.....वातावरण सुद्धा छान हसरे खेळते झाले.... सगळेच आता गाण्याच्या बोलांसोबत आपले सुर मिसळवत टाळ्या वाजवत होते...

टिक टिक …
सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक …

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

सगळ्यांसोबत नाचता नाचता , गोल फिरत ती राजपुढे एका टोंगळ्यावर  येऊन बसली.....

" शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात " ..........म्हणत तिने तिच्या ओठांमध्ये धरून ठेवलेले गुलाब काढत राजच्या पुढे धरले आणि त्याच्याकडे बघत होती........आता मात्र तिच्या हृदयाची धडधड चांगलीच वाढली होती....

राज तर स्वप्नवत तिला बघत होता......थोड्यावेळ जग तिथेच थांबल्या सारखे झाले होते.....टाळ्यांचा आवाज आला तशी ती भानावर आली...

" प्लीज , थोडासा हस .... थोडासा....."....नंदिनी लहान मुलासारखे तोंड करत बोलली......तसा तो खळखळून हसायला लागला.....त्याने तिच्या हातातले फुल घेतले...

" Thanks...." ... नंदिनी

आई तर कौतुकाने आपल्या लेकरांना बघत होती....नंदिनी सुद्धा आता तिच्यासाठी मुलगीच झाली होती...नंदिनी आपली सून आहे हे तर आता ती विसरली सुद्धा होती...इतकी एकजीव झाली होती घरातील  सगळी नाती....

" हुश........आता त्या आइस क्रीमची बासुंदी व्हायच्या आधी खाऊन घे, नाही तर परत वाया गेले म्हणून मला लेक्चर देशील बाबा तू..........."....नंदिनी

तसे सगळे हसायला लागले.....

" बरं , आजीसाहेब राज ऐका....आपण काहीच वाया नाही जाऊ देणार आहोत.... आपल्याला जे पण अहेरमध्ये कपडे, साड्या वैगरे जे काही येणार आहेत, आणि जे काही आपल्याकडे आधीपासून आहेत ,  ते आपण गरजू लोकांना देणार आहोत....जसे की कन्स्ट्रक्शन साईटला , इतर कामाच्या ठिकाणी ज्या गरजू बायका माणसं आहेत त्यांना आपण हे देणार आहोत.... परत मी आणि रश्मीने काही संस्थांची माहिती काढली आहे ...ते लोकं गरजू लोकांपर्यंत सामान पोहाचावतात तिथे आपण ते देणार आहोत.... So राज तुझा जो वाया जाण्याचा मुद्धा आहे तो पण मिटला आहे आणि आजीसाहेब तुमचा जो रीतिभाती जपण्याचा मुद्दा आहे तो पण सांभाळल्या गेला आहे.......आता खुश आहात ना दोघं ?".....नंदिनी

" वाह बाळा....खूप छान मार्ग काढला......."... आबा

" आबा राज जे बोलतो, ते खरंच बरोबर असते... हां म्हणजे त्याचा कधी कधी बोलतांना तोल जातो.....अतीच लेक्चर देतो ........पण don't worry.... आपण आहोतच की सांभाळायला.....आणि आजिसहेब तुमचं बरोबर आहे, तुम्हाला वाटते की आपले संस्कार , आपल्या चांगल्या समोरच्या पिढीने जपल्या पाहिजे , म्हणून तुम्हा लोकांचा आग्रह असतो... पण कधी कधी आमची पिढी पण बरोबर असते.... तुम्ही अगदी नीच्शिंत रहा...तुम्ही  दिलेले संस्कार मात्र आम्ही नेहेमीच टिकाऊन ठेऊ...जपू "....नंदिनी

" शाब्बास बेटा....."...

" Impressed हा.. ...".... राहूल

" तू एन्जॉय कर रे, लग्न एकदाच होते, मनभरून एक एक क्षण जग... .... कशाचीच काळजी करू नको....आणि तुझी वहिनी आहे ना .... मग काय चिंता....."...नंदिनी ठसक्यात बोलली.

" ओहो....वहिनीसाहेब .... indirectly प्रपोज केले ते सुद्धा सर्वांसमोर  , भारी होते हा..... ते काय होते...' जीव अडकला मोत्यात .... ऑसम "..... राहूल

" हो पण तुझ्या दादासाहेबांच्या डोक्यात घुसेल तेव्हा ना.......काय काय करावं लागते बाबा त्या देवदासला मनवायला.... चलो कोई बात नहीं.....अपना है तो मनाना तो बनताही  है....."....नंदिनी

राहुल सोबत बोलत नंदिनी काही कामं करायला निघून गेली...

" नीती,  मोठी सूनबाई एकदम हीरा आहे हा..... घरात आनंद खेळता कसा ठेवायचा चांगलच माहिती तिला.....आणि हुशार पण आहे शालू तुझी सून ".....सुशीला आजी

" हेच तर हवे असते घरात.... सुख शांती , आनंद.... मुला सूनांकडून बाकी दुसऱ्या कुठल्याच अपेक्षा नाहीत......आणि नंदिनीचे म्हणाल तर  आहेच गुणाची पोर.... राजची पसंती आहे.... साधी सुधी कशी असणार त्यांची जीवनसंगिनी ".... आजीसाहेब

ते ऐकून राजचे ओठ रुंदावले, मन मात्र ती सोडून जाईल या कोलाहलने माजले होते.......घरी सगळ्यांना कळल्यावर कसे तोंड द्यायचे हे एक टेन्शन सुद्धा त्याला आले होते.

नंदिनीच्या आजीला पण खूप समाधान वाटले तिचं कौतुक ऐकून.....

बाकी राहिलेले कामं आता शांतीने पार पडत होते....

........

" नंदिनी ....."...संध्याकाळी बाहेर झाडांना आबा पाणी घालत होते....नंदिनी दिसली तसा त्यांनी तिला आवाज दिला...

" हा आले आबा......"....नंदिनी , गडी माणसाला काही काम समजवून आबांजवळ गेली....आबा पण झाडांना पाणी देणे बंद करून बाजूला असलेल्या झुल्यावर जाऊन बसले...

" हा आबा...बोला....".... नंदिनी

" अग, ये बस थोडा वेळ... सतत कामात लागली आहे... थोडा आराम कर....."....आबा तिला आपल्या बाजूला बसवत म्हणाले...

" अहो आबा आपल्या राहुलचे लग्न आहे  ...असे बसून कसे चालणार?......लग्न झाल्यावर मस्त आराम करणार आहे.... अगदी आठवडा भर तर  फक्त झोप काढणार आहे.... "....नंदिनी

" घरात पूर्ण एकरूप झाली बाळा..... छान ".....आबा

" आबा, तुम्ही हे सांगायला मला इथे बोलावले काय ? अहो किती कामं पडली आहेत".....नंदिनी

" अगं बस जरा.... आहेत बरीच  लोकं काम करायला.....किती दिवस झाले माझ्यासोबत निवांत बोलली नाही आहेस".....आबा

" बरं बोला...तुमच्यासाठी all time free "..... नंदिनी , तेवढयात राज बाहेर आला आणि कोणासोबत तरी काही बोलत instructions देत होता...नंदिनीचे सगळे  लक्ष आता  त्याच्याकडे होते..

" आवडतो ना तो ?"....आबा

" हां??? कोण?".....नंदिनी

" तुझं लक्ष जिथे आहे तो".....आबा

" राज?? तो तर मला नेहमीच आवडतो....."....नंदिनी

" ह्मम ते पण आहे....पण फक्त आवडतो की आणखी काही ?"..... आबा

" काय हो आबा तुम्ही पण.....आतापर्यंत त्यांनी छळले....आता तुम्ही छळणार काय .....?"....नंदिनीचा चेहरा एकदम गुलाबी झाला होता

" बरं बाई... नको सांगू काही..... माझ्या मुलांचे चेहरे मला सगळं सांगून जातात......"..... आबा

" हो आणि आमच्या आबाचा चेहरा आम्हाला सगळं सांगून जातो...."....नंदिनी आबांची मस्करी करत बोलत होती

" वाह ग पठ्ठी...माझ्यावरच उलटली तू तर....."....आबा

" मग , नात कोणाची..??.....तुमच्या चेहऱ्यावर फारच ग्लो आला .....तुमचा हँडसम दिसण्यामागचे काय कारण ?"......नंदिनी भुवया उडवत बोलत होती...

" मी पण राजचाच आबा आहो म्हटलं.....ते काय म्हणतात तुम्ही लोकं आजकाल.??....हा  हॉट......तो हॉट  असेल तर मला हँडसम राहावच लागणार ना...."....आबा परत चिडवायला लागले..

" आबा.!!!......"....नंदिनी

" बरं ..........पण शाब्बास ..... घरात सगळं छान सांभाळले ..,..तुमच्या आजीसाहेबांना , राजला ,परिस्थितीला अगदी व्यवस्थित हॅण्डल केले....चला  आता काहीच आणि कोणाचीच काळजी नाही मला.... आपलं घर योग्य हातांमध्ये आहे..... ".....आबा

" माझंच घर आहे ना आबा .....मग मला बघायला नको काय.... आणि जे काही आहे ते सगळं तुमच्यामुळे..... तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहात , चुकलं तर प्रेमाने समजावून सांगितले आहेत तुम्ही....तुम्ही माझे आबा कमी आणि मित्र जास्ती आहात....."....नंदिनी त्यांच्या गळ्यात जाऊन पडली..

" आहेसच तू इतकी गोड..... आणि आपण मित्रच आहोत.....तुला आठवते की नाही माहिती नाही....आपण लुडो पासून सगळे खेळ खेळले आहोत ....."....आबा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलले

" ते तर आहेच, पण तुम्ही नेहमीच योग्य गोष्टींना पाठिंबा दिला आहे..... घरातील मोठ्या ,वडीलधारी व्यक्तीने ज्या जबाबदारी आणि समजुतीने वागावे, तुम्ही नेहमीच तसे वागले आहात...योग्य गोष्टींना साथ दिली आहेत....आम्हा छोट्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहेत....चुका केल्या तरी सांभाळून घेतले आहात...चुकत का होईना पण शिक्षा न करता त्यातून  शिकायची संधी दिली आहे........हा ती गोष्ट वेगळी आहे की तुम्ही आजीसाहेबांना  खूप घाबरता.....बाकी तुम्ही एकदम ऑसम आहात....."....नंदिनी

"लबाड........"... बरं थांब चहा घेऊन येतो आपल्यासाठी... मस्त चहा पीत गप्पा करूया...."...आबा

" मी घेऊन येते...तुम्ही बसा...."....नंदिनी

" नको, तू बस इथे..... तुझं जे काम सुरू आहे ते चालू दे......मी घेऊन येतो....तेवढेच पाय मोकळे"...आबा

" काम?".....नंदिनी

आबांनी दूर उभा असलेल्या राजकडे इशारा केला.....नी हसतच आतमध्ये निघून आले....ते बघून नंदिनी स्वतःतच लाजली.... पाय पोटाजवळ पकडून झुल्याला टेकून  राजकडे बघत बसली....पाहुणे आलेले काही लहान मुलं  तिथे खेळत होती....राज त्या लहान मुलांसोबत अधूनमधून खेळत गडी माणसांना   काही कामं सांगत मदत करत होता.....लहान मुलांसोबत त्याला खेळताना बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्मायल आले.

आबा चहा चे कप घेऊन आले तर नंदिनी तिथे झुल्यावर बसल्या बसल्या झोपली होती...

" राज sss......".... आबांनी आवाज दिला , तसा राज त्यांच्याजवळ आला...बघतो तर नंदिनी तिथे झोपली होती...

" बोला आबा, काही काम होत?"....राज

" चहा घे......बस ".....आबा

" ही इथे....??"....राज चहाचा कप हातात घेत बाजूला चेअर वर बसला....

" सहज गप्पा करत होतो... हिच्यासाठी चहा आणायला गेलो तर झोपली ती.....".....आबा

" ह्मम..."....राज तिच्याकडे बघत होता..

" तुमचं काही बिनसले आहे काय??".....आबा

" ह्मम.... नाराज आहे ती माझ्यावर .... ती परत आली तेव्हा मी इथे नव्हतो.....तिच्या अवॉर्ड फंक्शनला नाही गेलो म्हणून ".....राज

" तू आजकाल जास्ती चिडचिड करायला लागला आहे, असे नाही वाटत तुला?? असे राग राग, चिडचिड करून प्रश्न सुटणार आहेत काय?? मन हलकं होणार आहे काय??, तुझं स्वभावच आहे तू कोणालाच स्वतःला होणारा  त्रास सांगत नाही ........ " .....आबा

" असे काही नाहीये आबा.... Everything is fine...."... राज

" Okay.... काय असेल ते लवकर सोडवा.... ताणून धरू नका....... तसे मला माहिती तू  सगळं सांभाळून घेशील.....आणि नंदिनी पण इतकी गोड आहे की कोणी तिच्यावर राग धरून बसूच शकत नाही.".....आबा

तो आबांच्या बोलण्यावर कसंनुसा हसला... तेवढयात आबांना कोणी आवाज दिला...

" मी उठवतो तिला...तुम्ही जा ".....म्हणत तो नंदिनीला उठवायला गेला...

" नाही , उठऊ नको...झोपू दे तिला....तू आतमध्ये झोपवून ये तिला...."....आबा

" पण.......आता संध्याकाळ झालिये....तिला असे झोपलेले बघून आजीसाहेब रागावतील ..."....राज

" मुद्दाम नाही झोपली ती....दमालिये खूप.....चालते तेवढे ....काळजी नको करू लक्ष्मीदेवी  नाराज नाही होणार.....ही  आपल्या घरची लक्ष्मी आहे .....तिची काळजी घेणे आपले काम आहे.....मागच्या दाराने घेऊन जा.....काही कळणार नाही तुझ्या आजीसाहेबांना "....आबा

" पण , तिची झोपमोड होईल....?".... राज

" राज, तुला कधीपासून इतके प्रश्न पडायला लागले ??....जा घेऊन जा तिला आतमध्ये.,... झोपव नीट .... थोड्या वेळाने परत कामात धावपळ करेल ती....."....आबा बोलून निघून आले...

राजने तिला तिला उचलायला गेला तेव्हा ती थोडी हलली....त्याने तिच्या डोक्यावर थोपटले...तशी ती परत झोपली....तिला गाढ झोपलेले बघून त्याने तिला आपल्या हातांवर आपल्या कुशीत उचलून  घेतले आणि मागच्या दाराने जात तिला काकींच्या रूममध्ये नेऊन बेडवर  झोपवले....तिच्या मानेखालून हात काढणार तेवढयात तिने कड बदलाला ,  त्याचा हात तिच्या गालाखाली अडकला.... आपलं कपाळ त्याच्या हातावर घासत तिने त्याचा हात पकडून ठेवला.....  तिला झोपेत तसे करतांना बघून त्याला हसू आले....तो तसाच थोड्यावेळ तिथे तिच्याजवळ  खाली टोंगळ्यांवर बसत तिला बघत होता...

" शिंपल्यांचे शोपिस नको
जीव अडकला मोत्यात........"...मनातच म्हणत त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने चेहऱ्यावर आलेले तिचे केस मागे केले....मायेने तिच्या डोक्यावरून दोन तीनदा हात फिरवला.....हळूच तिच्या हातातून त्याने हात सोडवून घेतला.... AC अडजस्ट केला....तिच्या अंगावर नीट पांघरून घालत....लाईट बंद करून ....रूमचे दार लोटून बाहेर निघून आला....

******

क्रमशः

******

आधी , नंदिनीला कधी कळणार????????
आता , राजला कधी कळणार????????

कठीण आहे बाबा सगळंच????????






 

🎭 Series Post

View all