Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 76

Read Later
नंदिनी...श्वास माझा 76


 

( आधीच्या भागात आपण बघितले नंदिनी राहुल ला तिला अमेरिका मध्ये काय काय आवडले. नंदिनीची मैत्रीण शैलाच्या समजवण्यावरून नंदिनी आणि शैला चर्च मध्ये जातात , तिथे मनातले प्रश्न विचारतात... फादर त्यांना योग्य मार्गदर्शन करतात...आणि नंतर नंदिनी राजला ती प्रेमात आहे कळवते. राजच्या हाताला लागल्यामुळे नंदिनी त्याला जेवण खाऊ घालते. बोलता बोलता तीने त्या मुलाला राहुलच्या लग्नात बोलावले आहे सांगते. आता पुढे )........
 

भाग 76

" आई sssss थंड गार पाणी .....तुमच्या लाडोबा साठी .....".... संध्याकाळी बाहेरून घरात येत नंदिनी ओरडली .....आणि ती सोफ्यावर जाऊन बसली....

राज तिच्या मागे येत   नंदिनीच्या बाजूला  जाऊन बसला.....तो चेहऱ्यावरून वैतागलेला वाटत होता...
नंदिनीला मात्र  खूप हसू येत होते.....

" काय ग ,काय झाले?? झाली काय शॉपिंग?".....काकी  पाण्याचा ग्लास घेऊन येत नंदिनी पुढे ट्रे धरला....

" इकडे आधी.....जाम गरज आहे"......नंदिनी राजकडे इशारा करत बोलली, नी गालातच हसत होती.

काकीने राजला पाणी दिले......

" बरं मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते...."....काकी

" काकी , वातावरण आधीच तापलय .....त्यात कॉफी? बर्फाच्या लाद्या आणा...."...नंदिनी राजकडे इशारा करत बोलत होती...

राज अजब नजरेने तिच्याकडे बघत होता....

" म्हणजे......बाहेर किती उन आहे...त्यात उन्हाळा...थंड काही द्या....असे म्हणायचे होते....."....राज ला तसे बघतांना बघून तिने शब्द जरा फिरवले..

" बरं....सरबत आणते करून....मग तर झालं ना...."...काकी सरबत करायला आत निघून आल्या..

"याला काय झाले?? हा का वैतागला वाटतो आहे??"......राहुल ,

" त्याचा देवदास रुपाची वाट लावली आज.."....नंदिनीने हळूच राहुलच्या कानाजवळ जात बोलली.

" काय ग, झाले काय शॉपिंग?? काही बॅग्स नाही दिसत आहेत तुमच्या हातात?"....आई

" याने नीट दुकानात नेलेच नाही मला....?? काहीच आवडले नाही....".....नंदिनी

" For your kind information ... आपण सगळ्या बेस्ट शॉप्स मध्ये गेलो आहेत.....भयंकर नाटकं केली हिने दुकानामध्ये.....डिझाईन आवडायचं तर त्यात वेगळा रंग आहे काय?? रंग आवडला तर कापड दुसरा मिळेल काय??...कापड आवडले तर त्यावरचे डिझाईन यावर करता येईल काय? आणि कुठे काय तर तिला कपडे दाखवणारा माणूस नव्हता आवडत.....आणि कुठे सगळंच आवडले तर तिच्या ड्रेसला मॅचींग male dress मिळेल काय....चपलांचा शॉपमध्ये पण सेम...हील असेल तर फ्लॅट दाखवा.... सिंपल हील आहे तर पेन्सिल हील..कधी ब्रॉड बेल्ट हवा होता तर कधी नाजूक बेल्ट......सगळ्या दुकानात तिने हेच केलंय....त्यात एका दुकानात चक्क एका मुलीसोबत वाद घातला हिने.........ही आधीची नंदिनी नाहीये...बदलली खूप...आधी शांतपणे बघत असायची....आता भयंकर वादावादी.....पाच तास फिरवले तिने....त्यात मला ऑफिसचा कुठलाच फोन पण अटेंड करू नाही दिला............त्यात कुठल्या कुठल्या गल्ल्यांमध्ये घेऊन गेली.......गाडी तर अशी चालवत होती जसे काय एअरोप्लेन..ना गढढे दिसत होते ना रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स.......त्यात मध्येच पाणीपुरी...ice cream... हा फ्लेवर नको ,तो नको.....वरून तिथे बऱ्याच लोकांना स्वच्छतेचे धडे देत होती......"...... राज

त्याचं बोलणे ऐकून सगळ्यांना हसायला येत होते....आणि त्याचं पण बरोबर होते...आजपर्यंत शॉपिंगमध्ये नंदिनिने काहीच त्रास दिला नव्हता.. इनफेक्ट तिला ही अशी शॉपिंग आवडायची सुद्धा नाही...जे घ्यायचे असायचे ते  राज घ्यायचा...ती फार फार तर साइज वैगरे चेक करून द्यायची....हे आजचे तिचे रुप एकदमच वेगळे होते....तो तिचे हे रूप पहिल्यांदाच बघत होता .....त्याला अशी सवय नव्हती....त्याचे फारच सोफिस्टिकेटेड काम , त्याच्या नेहमीच्या डिझायनरकडे राजचे बहुतेक काम होऊन जायचे, नंदिनीला तिथे पण काहीच आवडले नव्हते...आज ती टिपिकल बाई बायको सारखी वागली होती... पाच तास घालवून सुद्धा तिने काहीच घेतले नव्हते.......आज हे सगळं अनुभवून तो भारीच वैतागला होता.....

" अरे पण तू का इतका वैतागला.....?? तू नेहमीच खुश असतो तिच्या सोबत जातो तेव्हा...."...काकी

" काकी , अग माझी महत्वाची मीटिंग सुरू होती....हिने मला धमकावून काढलंय तिथून बाहेर......आणि त्यात तिने काहीच शॉपिंग केली नाहीये....फक्त फिरवलय आणि ऐकवलय......"...राज

" Excuse me मिस्टर राज!!! ...."... नंदिनी जागेवरून उठून दोन्ही हात कंबरेवर ठेवत राजच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली.....

"  आता नाही आवडले तर नाही आवडले.... आवडले नाही तरी जबरदस्तीने घेणार काय?? आता मी सगळं आपल्या आवडीचे, आपल्या मर्जीने करायचे ठरवले आहे....मला कोणी फोर्स करू शकत नाही....तिथले ते दुकानदार किती पटवत होते, याचं हे चांगलं त्याचे ते....हे असे फेमस आहे.. इम्पोर्टेड आहे आणि काय काय...किती गोड बोलत होते ते....मी का फसू त्यांच्या बोलण्यात...नाही आवडले मला ते....आणि तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते सांग??.....आणि ती मुलगी...... काकी, आई तुम्हाला सांगते ती मुलगी चक्क याला धक्का देऊन गेली...त्याचा हातातला फोन पण खाली पडला...तिला बोलायला नको?? मुद्दाम धक्का दिला होता तिने याला....असा आगाऊपणा कोण खपाऊन घेणार?...आपण स्वतःहून हिंसा करत नाही... पण कोणी करत असेल आणि आपण चुपचाप सहन करत असू तर ते चूक आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे....."....नंदिनी

" हींसा?? ती हिंसा होती??"..... राजच्या माथ्यावर  आट्या पडल्या...

" विनाकारण कोणाच्या शरीराला टच करणे, त्याला हिंसाच म्हणतात....."....नंदिनी

" तिने विनाकारण नसेल केले टच याला , नंदिनी.....".... राहूल

" हो ना.....मला माहिती तिने जाणूनबुजून केले होते....तरी मी शांत बसायचे होते?".....नंदिनी

" नाही नाही, तू जे केले ते अगदी परफेक्ट केले.....keep it up "..... राहूल

दोघांची चांगलीच जुगलबंदी सुरू होती.....बाकीच्यांना मात्र फ्री मनोरंजन सुरू होते.....आज खूप दिवसांनी राज त्याच्या अबोल कोषातून बाहेर येत बोलत होता...

" तुला बरं माहिती श्रीकृष्णाने काय काय सांगितले ते ...??"...काकी..

" हे संत आत्मा....आपले  श्रीराम ...यांचीच शिकवण....यांनीच दिले ना मला  श्रीभगवद्गीतेचे धडे...."...नंदिनी राज पुढे हात जोडत म्हणाली... राहुलला खूप हसू येत होते...त्याला तर राज  एकदम बिचारा वाटत होता...

"हा तर  दुसरं काय म्हणत होता??....हा ..गाडी चालवण्याचे....राहुल तुला सांगते हा तुझ्यापेक्षा पण बेक्कार गाडी चालवत होता , सायकलवाला पण आम्हाला ओव्हरटेक करून गेला....... त्याने अशीच चालवली  असती  ना तर  आम्ही डायरेक्ट रात्रीच घरी पोहोचलो असतो...... आणि ते पाणीपुरी वैगरे.....आता येवढं फिरत आहे म्हटल्यावर भूक नाही का लागणार....मला ते हॉटेलचे खाऊन बोर झाले होते....तिकडे पण तेच खाल्ले....राहुल तुला सांगते काय ऑसम चाट होते तिथे... खुप्पच टेस्टी....रश्मीला पण आवडेल....तू जा तिकडे.....एक नंबर आहे.......आता तिथे थोड अन्हायजेनिक होते.....म्हणून त्यांना स्वच्छतेचे थोडे महत्त्व पटवून देत होती....हे काय चूक केले काय?? जे चांगले आहे ते सांगायला नको?यात मी काय अजब वागले?"....नंदिनी

" नाही नाही, तू एकदम बरोबर केले नंदिनी".....काकी

" आणि हा फोनचे.... हा जर फोनवर बोलत बसला तर चॉईसला कोण मदत करेल?...म्हणून काढून घेतला मी त्याचा फोन......".....नंदिनी

" अग पण तू विचारलेच कुठे चॉईस ?".....राज

" हा तर सांगितले ना ... आवडलेच नाही , आवडेलच नाही तर चॉईस का विचारू?"....नंदिनी

" मग फोन का घेतला??".....राज

" हे भगवान, सांगितले ना ..... चॉईस विचारायला.....आता तुझ्याशिवाय कोणी होते काय तिथे मदत करायला??, तुम्हारे सिवा हम अधुरे शहांशा....... ....".....नंदिनी

राजने डोक्यावर हात मारून घेतला..

" बोलो अब, और कोई प्रॉब्लेम आहे??".....नंदिनी आपले हात गुंडाळून आपल्या भुवया उडवत, आपली बत्तिशी दाखवत उभी होती...राज तर कन्फ्युज नजरेने तिला बघत होता........बोलत तर ती आधी पण होती...पण एवढी ते पण इतके भारी उत्तर देत.....काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हते...तो फक्त केविलवाण्या नजरेने तिला बघत होता....

" हो एक राहिले ना....".... राहुल

" काय?".....नंदिनी

" ते मॅचींग male dress ?"..... राहुल

" ते ssss.... माझ्या male partner साठी...."... नंदिनी राहुलला डोळा मारत बोलली

" मग मिळाला?"..... राहुल

" कोण पार्टनर?? Yess"..... नंदिनीने मोठी दात दाखवता स्मायल केले

" नाही ग ड्रेस?"..... राहूल

" च्यायला ते .... T नाही मिळाला....सांगितले ना याने नीट दुकानात नेलेच नाही....".....नंदिनी

" बरं बरं नंतर बोला .....आता हे सर्बत आणि नाश्ता घ्या आधी ".....आई

" हो हो....राजला दे आधी त्याला गरज आहे.....मी तर हाणलय मस्त तिकडे .....".....नंदिनी राज जवळ बसत बोलली.

" Hushh .....".....नंदिनीला चूप झालेले बघून राजने सुटकेचा सुस्कारा सोडला...आणि सरबतचा ग्लास हातात घेतला.

"माझा अवॉर्ड फंक्शनला आला नाहीस ना...माझा येवढा प्लॅन वाया गेला...त्याचाच हा बदला.... आज फक्त पाच तास घालवले....परत जर मला इग्नोर केले ना तर कधीच तुझा पिच्छा सोडणार नाही....."..... नंदिनी राजच्या कानाजवळ जात बोलली.

" हा बदला होता?? म्हणजे तुला काहीच घ्यायचे नव्हते??"..... राज

" नाही "......नंदिनी परत बत्तिशी दाखवत होती....
तिच्या या उत्तराने तो आता भारीच वैतागला....आणि वैतागतच आपल्या रूममध्ये गेला....

त्याला असे बघून नंदिनी आणि राहुल आई काकी सगळेच जोराने हसायला लागले...

" जाम पिडलेस तू त्याला".... राहूल

" त्याचा सोबत वेळ घालवायचा होता रे.......मी परत आल्यापासून नीट तास भर पण बसला नाहीये माझ्या सोबत...........घरात तो बघत सुद्धा नाही माझ्याकडे....बाकी वेळ ऑफिस आणि  काम ......म्हणून आपला हा असाच लाँग ड्राईव्ह.... वैतागून का होईना, चिडून का होईना....पण मजा आली आज त्याचा सोबत "....नंदिनी

" पण मग तुझी शॉपिंग?? आता लग्नाला आठ दिवस राहिले फक्त, दोन दिवसांनी पाहुणे येतील....मग नाही होणार"..... काकी

" काकी , राजने आधीच सगळं घेऊन ठेवले आहे ना...."....नंदिनी

" पण तुला तुझ्या आवडीचे घ्यायचे होते ?"....काकी

" काकी गंमत होती हो ती , मुद्दाम बोलले होते त्याचापुढे....त्याची आवड तर नेहमीच ग्रेट असते.....आणि त्याने घेतलंय आणि मी ते घालणार नाही ... असे कधीच शक्य नाही...."...नंदिनी

" बरं ठीक आहे....मी कामाचं बघते"..... काकी निघून गेल्या....

" किती गोंधळून ठेवले आहे त्याला...??..त्याला काहीच कळत नाहीये.......त्याचा चेहरा बघितला??"..... राहूल

" काल एक वाचक म्हणले....राजच्या डोक्याचा काही केमिकल लोचा झाला म्हणून....."....नंदिनी

" हा हा हा ..... होना तसेच काही दिसत आहे.....त्याचे डोक काम नाही करत आहे वाटते...".... राहूल

" अरे त्याचा डोक्यात आता एकच फिक्स बसले आहे की नंदिनीला कोणी आवडते आहे....आणि त्या गोष्टीमुळे  त्याला किती पण हिंट द्या त्याचा डोक्यात काहीच जात नाहीये.....पण लवकरच कळेल त्याला.......राहुल तुझा भाऊ ठीक आहे....होईल नॉर्मल काही दिवसात.....तू काळजी नको करू...तुझं लग्न एन्जॉय कर... परवा कुळाचार मग फंक्शन सुरू होतील....पॅकिंग पण करायची ... चल बाय..... कामं करते मी पण."........नंदिनी त्याला बाय करून आपल्या कामाला लागली.

अशीच नंदिनी राजच्या खूप खोड्या काढत त्याला त्रास देत  होती....नेहमी असे काही बोलायची की राजला ती तिसरी व्यक्ती आठवायची.....आणि मग नंदिनीचे प्रेमाने बोलले असो वा तिच्या वागण्यातून असलेले तिचे प्रेम त्याला दिसत नव्हते....

.......

नंदिनीने लग्नाच्या  बऱ्याच  कामांची  स्वतःवर जबाबदारी घेतली होती. बाकी सगळ्या छोट्या मोठ्या कामात पण ती मदत करत होती. घरी लग्नाची लगबग सुरू झाली..... पै पाव्हणे यायला सुरुवात झाली होती.....नंदिनीचे आजी आबा आले होते.......घर सजावटीचे काम सुरू झाले...मांडव उभारण्यात आला....घरामध्ये एकदम मंगलमय वातावरण होते....सगळेच खूप उत्साही होते...

तिकडे रश्मीच्या घरीसुद्धा सारखेच सुरू होते....रश्मी चे आईबाबा खूप आनंदी होते.....रश्मीला खूप छान घर मिळाले त्यामुळे ते खूप समाधानी होते....पाहुण्यांना ,नातेवाईकांना जावयाचं, रश्मी च्या सासरच्यांचे किती कौतुक करू किती नको असे व्हायचे.... रश्मीची लहान बहीण रुचीच्या पण परीक्षा आटोपल्या होत्या त्यामुळे तिला पण आता मनमोकळेपणाने ताईचे लग्न एन्जॉय करता येणार होते...तिला तर तिरचे जिजू भारीच आवडले होते....त्यामुळे ती पण त्यांच कौतुक करून थकत नव्हती.  तिथे पण लग्नाची घाई सुरू झाली होती.... छोटासाच का नाही पण तिथे चाळीत सुद्धा मांडव घालण्यात आला.....उन्हाळा असल्यामुळे उठ बस करायला मांडवाची मदत होत होती.....घराचे दार फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले......अंगण रांगोळीने सजले.....चुलत , मावस सगळी भावंडं जमली....सगळे रशमीची मस्करी करत....रश्मी पण हे सगळं खूप एन्जॉय करत होत.

.........

" हा बघ, सगळे घरात लग्नाच्या उत्साहात आणि कामात आहे आणि याचं आपलं भलतेच चालले आहे....... साखरपुडाच्या  वेळी किती कामं करत होता...."....राहुल , राज त्याच्या रूममध्ये बसून ऑफिसचे काही काम करत फोनवर बोलत होता....

" हो ना हा देवदास.....त्या देवदासच्या हातात ग्लास तर याच्या हातात लॅपटॉप....कामाचं व्यसन ..... ..थांब आलीच......"....नंदिनी

" व्यसन तर तुझंच आहे ग बाई  त्याला......"...राहुल मनातच बोलत आतमध्ये काय होते आहे ते बघत होता...

नंदिनी राजच्या पुढे जात  कंबरेवर दोन्ही हात ठेवत उभी राहिली.

" काय??"...... राजने फोन बाजूला केला आणि इशाऱ्यानेच विचारले..

" फोन दे......"...नंदिनी

" मिस्टर ठाकूर सोबत बोलतोय..... ऑफिस संदर्भात ".... राज

" हा ,मला पण तेच बोलायचं आहे.... ऑफिस work संदर्भात".....नंदिनी

राज प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता...नंदिनीने फोन मागायला हात पुढे केला...

" Mr Thakur just a minute...."..... बोलत राजने नंदिनीच्या हातात फोन दिला .

" नमस्कार मिस्टर ठाकूर सर , नंदिनी बोलतेय....."...नंदिनी

" Yess Mam ......".... ठाकूर

" Mam नको हो, मी येणारच आहे तुमच्या हाताखाली काम करायला....बरं ते नंतर बघू ,.....हे महत्वाचे ऐका....आजपासून पुढले पंधरा दिवस ऑफिसची सगळी छोटी मोठी काम तुम्हीच बघायची...हवे तर मिस्टर रोहन यांना सांगा , ते योग्यच निर्णय घेतात....अगदीच कंपनी(हसत) वैगरे विकत घ्यायची तेव्हाच देशमुख सरांना फोन करा नाहीतर मोठे देशमुख सर , त्यांना काँटक्ट करा......पंधरा दिवस देशमुख सर सुट्टीवर असतील ...... "....नंदिनी ...

राज आणि राहुल तर अवाक होत तिच्याकडे बघत होते....

ठाकूर काहीच बोलत नव्हते ...

" Am I clear Sir ??"..... नंदिनी

" Yess , yess sure ".... ठाकूर

" Thanks a lot" ..... नंदिनीने बोलून फोन कट केला..

" हे काय?? आणि ठाकूर....ते का तुला mam म्हणत होते??".....राज गोंधळला होता....

" पंधरा दिवस तुला ऑफिस पासून सुट्टी आहे..... आणि ठाकूर सरांच विचारशील तर त्यांना माहिती मी Mrs Deshmukh  आहे ते ......" .....नंदिनी

" What??? How's it possible?? मी ऑफिसमध्ये, कुठेही नाही सांगितले आहे आपल्या बद्दल....".....राज

" मीच सांगितले होते त्यांना , ऑफिस सोडायच्या आधी...."... नंदिनी

" Why??"..... राज.

" का..... तुला आवडले नाही वाटते ?"...नंदिनी

" तुझीच इच्छा होती ना ... मी बाहेर कुठे सांगू नये म्हणून?? "  ...... राज

" हो ... पण रिझाइन लेटर दिले तेव्हा त्यांनी रिक्वेस्ट केली होती... त्यांना मी कोण आहे जाणून घ्यायचे होते....चांगले आहेत रे ते....त्यांनी माझ्यासाठी all time जॉब ऑफर ओपन ठेवलीय".....नंदिनी

" वाह.... त्यांनी पण मला माहिती नाही पडू दिले ,त्यांना माहिती तू माझी wife आहे ते......माझ्या सोबतच गेम केला तुम्ही......."... राज इरिटेट झाला होता..

" मी पण देशमुख आहे म्हटलं".....नंदिनी बत्तिशी दाखवत होती....

" बरं चल आता... घरात किती कामं पडली आहेत.... लग्नाचं घर आहे .... माहिती आहे काय तुला?"....नंदिनी

" माझं काय काम आहे तिकडे? आणि सगळीच कामं झाली आहेत....तू इथे यायच्या आधीच आटोपली होती....."...... राज

" वाह....म्हणून म्हणतात घर बघावे बांधून, लग्न बघावे करून........तोपर्यंत कळायचं नाही........लग्न घरातील कामे कधी संपतात काय? शेवटपर्यंत सुरू असतात....चल दाखवते तुला काय काम आहेत??. "..... नंदिनी पुढे निघाली..राहुल पण हसतच पुढे गेला..

"नंदिनी...."....राज ने मागून आवाज दिला

"काय?? ....नंदिनी मागे वळली

" त्याला माहिती तुझं लग्न झालेय ते ?"....राज

" हो..त्याला सगळं माहिती आहे "......नंदिनी

" त्याला काही प्रॉब्लेम नाही ना??" ....राज

" नाही.... त्याने मी जशी आहे तशीच ॲक्सेप्ट केले आहे....खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर.....more than his life......".... नंदिनी

राज कसाबसा हसला..

" तुला एक गंमत सांगू तो ना तुझ्यासारखाच आहे .... म्हणाजे बघ ना मला जेव्हापासून कळायला लागलं आहे की माणूस कसा असावा.. तर तूच समोर यायचा....त्यामुळे मला नेहमीच तुझ्यासारखीच व्यक्ती हवी होती..... इथे कॉलेजला वैगरे किती मुलं होती मागे.....पण तुझ्यासारखा कोणीच नव्हतं....दिसायला तर नव्हताच तुझ्यासारख पण अटलिस्ट तुझ्यासारखे गुण असावे असे वाटत होते....... जसे एखाद्या मुलीला तिच्या वडिलांसारखा मुलगा आवडत असतो , माझ्यासाठी तर तूच माझा बाबा झाला आहेस......."...नंदिनीचा आवाज थोडा जड झाला...

राज तर फक्त तिचं बोलणं ऐकत होता... तिला माझ्यासारखा मुलगा हवा ऐकून त्याला आनंद झाला...आणि आपण तिला आपल्या भावना सांगायला उशीर का केला याचे त्याला वाईट वाटत होते....ती त्याच्या बद्दल इतकी भरभरून बोलत होती की त्याला कळले होते आता खूप उशीर झाला आहे .

"तर देवाने माझे ऐकले आणि मला हवा होता तो मिळाला आहे...अर्थात फक्त मिळाला आहे , अजून माझा पूर्णपणे झाला नाहीये....घरातले तर देतील होकार.....तू एकदा त्याला भेटला आणि तुला तो आवडला की मग घरी सांगुयात...... Okay? ..."..... नंदिनी

" तुला आवडला आहे ना तो, अगदी मनापासून??"....राज

" हो.....खूप ".....नंदिनी

" तू समजदार आहेस....तुला कळते आता व्यक्ती....राहुलसाठी रश्मी अगदी छान शोधली आहेस तू.... तू स्वतःसाठी पण योग्यच जोडीदार शोधशील...मला विश्वास आहे तुझ्यावर......मग माझ्या होकाराची वाट का बघत बसलीस....?".....राज

" राज माझा  स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्ती विश्वास आहे.... तुला कितीही त्रास झाला तरी तू माझ्या आयुष्याचे निर्णय नेहमीच योग्य घेतले आहे ... त्यामुळे तुझा  होकार असल्याशिवाय मी पुढे जाणार नाही....."...नंदिनी

"ह्मम ..."..राज

" पण मी तुझ्यासोबत येवढे बोलले याचा अर्थ असा नाही की तुझ्यावरचा माझा राग निवळला आहे.....तू जे वागला होता ते योग्य नव्हते....मी तुला सोडणार नाही..... चल आता कामं खोळंबीली आहेत...."....नंदिनी

दोघंही खाली निघून आले....नंदिनी राजला एक मिनिट बसू देत नव्हती.... एक झाले की दुसरे.....असे तिची  कामांची लिस्ट तयारच होती......

" खूप कामं सांगत आहेस त्याला...?"... राहूल

" असू दे.... दोन तास घालवतो ना जिममध्ये.... हे फार मामुली आहे त्याचसाठी........आमच्या दोघांच्या तू तू मैं मैं मध्ये त्याचे हे आनंदाचे सुंदर क्षण निसटायला नको ....लग्नातली प्रत्येक गोष्ट त्याने एन्जॉय करायला हवी......सगळ्यांमध्ये बघ हसतोय तो....किती गोड दिसतोय ".....राजला हसतांना बघून नंदिनीच्या पण ओठांवर हसू पसरले.

.......

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️