Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 74

Read Later
नंदिनी...श्वास माझा 74

भाग 74

 

" राज नंदिनी पोहचली काय नीट???"....आई

 

"आला होता ना तिचा फोन सुखरूप पोहोचल्याचा....."...राज

 

" हो......पण तुझं  रात्री बोलणं होत असेल ना??...आजी आबा कसे आहेत??"....आई

 

" ठीक"......राज

 

" राज तुझे काही बिनसले आहे काय? ती आल्यापासून नीट वागाला नाही आहेस.....आणि मला तर प्रश्न हा पडतोय की तू तिला जाऊच कसे दिले??".....आई

 

" नीट वागायला हा घरात तर हवा ना...???..... मोठा बिजनेसमन आहे बाबा हा.....त्याला कुठे आता आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी वेळ असणार आहे...??? ॲपॉइंमेंट घ्यावी लागणार आता तर बोलायचं म्हटले तरी ".....राहुल

 

" राहूल....."....... राज

 

" Okay....sorry "...... राहुल

 

" राज तू म्हणतोय  तर खरा की ती एक आठवड्यांसाठी जाते आहे......पण मला वाटत नाही तू तिला येवढे दिवस राहू देशील......."....आई

 

" अहो वहिनी , हे काय विचारायचं झाले काय???...दोन दिवसात जातो की नाही तिला घ्यायला तो बघतच राहा.....तुम्हाला वाटते तरी काय इथे भारतात असून तो येवढे दिवस तिच्यापासून दूर राहणार आहे?? .... आताच त्याचा प्रवास झाला वरून हे हाताला लागले आहे म्हणून तो शांत बसला आहे....काय राज बरोबर ना...??? ...".....काकी मस्करी करत होत्या.

 

राजने त्यांच्याकडे बघून कसेबसे स्मायल केले.

 

सकाळी डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसले असताना गप्पा सुरू होत्या....त्यात गप्पा काय सगळे राजला बोलत होते.....अन त्याच्या जवळ काहीच उत्तर नसल्याने तो हो नाही येवढेच उत्तर देत होता...

 

" ढणटण्याssssssननन..........

 

सरप्राइजssssss ............".....

 

त्या आवाजाने राजाला खाता खाता एक जोरदार ठसका लागला होता ...

 

आवाज आलंतासे सगळ्यांनी मागे वळुन बघितले तर नंदिनी आपले दोन्ही हात पसरवून आपली बत्तिशी दाखवत हसत उभी होती.......

 

सगळे तिला बघून शॉक झाले होते.....आणि का नाही होणार कालच ती आजी आबांची आठवण येते म्हणून गावाला गेली होती....नी आज सकाळी परत सुद्धा आली होती..

 

" तू sssss ???".... राहूल जवळ जवळ ओरडलाच ... काल रडत रडत गेलेली नंदिनी आज आपली पूर्ण बत्तिशी दाखवत उभी आहे.....तिला तसे बघून तर तो पूर्णच चक्रावला होता....

 

Yess I am....... कसे वाटले माझे सरप्राइज?"".....नंदिनी

 

"छानच  पण येवढ्या सकाळी??"....आई

 

" मला तुमच्या सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करायचा होता म्हणून......"...नंदिनी

 

"का तिथे ब्रेकफास्ट नाही बनत..??...नक्कीच तिथल्या लोकांनी हाकलून लावले असेल?"..... राहूल

 

"येह..... हमको हाकलनेवाला पैदा नहीं हुवा अभी.......पहाटे चार वाजता निघाले आहे यार.... ब्रेकफास्ट नंतर सगळे आपापल्या कामाला निघून जातील....मला सगळ्यांसोबत एकत्र वेळ घालवायचा होता म्हणून आले ना लवकर ...."....नंदिनी

 

"सगळ्यांसोबत की.....??".....राहुल तिला एका हाताने ढोबर मारत खुणावत होता...

 

"गप रे तू........"....नंदिनी

 

"तुम्हाला आजी आबांना भेटायचे होते ना??लगेच परतून आल्या?? राहायचं असते"..... आजीसाहेब

 

" आजीसाहेब भेटायचे होते...झाली भेट...बघून आले त्यांना...तसे पण ते आजी आबा काय आणि हे आजीसाहेब आबा काय ,सेमच ना...आजीआबा  आजी आबा असतात नाहीं काय....? तिथे सगळं साधं साधच असते...इथे कसे सगळं मस्त मसालेदार असते.....गोड तिखट... सगळंच...."...गोड बोलतांना खास करून राजकडे बघत ती आजीसाहेबांच्या गळ्यात पडली."आजीसहेब I missed you so much....."....

 

"आणि याचं लग्न आहे ना....किती कामं पडली आहेत.... असं घरातील कर्त्या धरत्या व्यक्तीने बाहेर असणे शोभते काय.... लोकं तोंडात बोटं घालतील माझ्या.......मला जबाबदारीने वागायला नको?".....नंदिनी

 

तिचे येवाढले मोठमोठे डायलॉग्ज ऐकून सगळे अजब नजरेने तिच्याकडे बघत होते....राहुलला तर चक्कर यायचीच बाकी राहिले होते...

 

"बरं बरं समजले.....जा फ्रेश व्हा....".... आजीसाहेब

 

"तसे पण मी आजी आबांना राहुलच्या लग्नासाठी लवकरच या म्हणून सांगितले आहे....."....नंदिनी बोलतच आतमध्ये पळाली सुद्धा..

 

"काय मुलगी आहे??? परवा जाण्याची घाई केली...आज आली सुद्धा.....अजब आहे बाबा हि ".....आई

 

"राज तू बोलावून घेतले???".....काकी ...राज काही बोलणार तेवढयात नंदिनी डायनिंग टेबलवर राहुलच्या शेजारी राजच्या समोरासमोर जाऊन बसली.

 

" आई नाश्त्याला काय बनवलं लवकर दे खूप भूक लागलीय.....".....नंदिनी ओरडली.

 

राज चोरून चोरून अधूनमधून नंदिनीला बघत होता.तिच्या वागण्यावरून ती त्याच्यावर रागावली आहे हे स्पष्ट जाणवत होते त्याला....

 

" नंदिनी .....तू अशी अचानक???मला अजूनही थोडा डाऊट येतो आहे  ".....राहुल

 

"माझं घर आहे, मी कधी पण येऊ जाऊ शकते....मला कोणाच्या परमिशनची गरज नाहीये".....एक तिखट कटाक्ष राजवर टाकत बोलली.

 

"तुमच्या दोघांचे काही बिनसले आहे काय??"... काकी

 

"नाही......."....राज

 

"हो........मी कट्टी आहे त्याच्यासोबत........"....नंदिनी

 

"अरे हे काय किती महिन्यांनी भेटला आहात.....आणि आता हा अबोला...??" ...आई

 

"नंदिनी.... I am with you..... सोडू नको हा त्याला....".....राहुल

 

"Okay boss..... तुम्हारा हुकूम सर आँखो पर..... नही छोडेंगे......कभी नहीं छोडेंगे......"....नंदिनी

 

"राहुल हे काय चाललं आहे तुझं??..... समजवायच सोडून अजून भडकवतो आहे तू तिला....आगाऊपणा नाही करायचा..."....काकी

 

" राहुल बरोबर आहे काकी.....आगाऊपणा राहुल नाही हा करतोय.....मी परत आल्यापासून एकदा तरी भेटला आहे का तो नीट मला???बोलला आहे काय प्रेमानं?......मी पण नाही बोलणार आहे आता त्याच्यासोबत....."....नंदिनी

 

"अगं कामात होता ना तो ..."....आई

 

"मग मी काय रिकामी आहे???....आता मला पण खूप कामं आहेत.....बोलायला वेळ नाही त्याच्यासोबत...".......नंदिनी

 

"अरे बस बस..... नाश्ता करा....ते दोघं लहान नाहीत आता...त्यांचं त्यांना बघू देत.....बोलायचं तर बोला.... भांडायच तर भांडा.......".....आबा

 

राज शांतपणे सगळं ऐकत होता....बोलत मात्र काहीच नव्हता.....त्याला नंदिनीची नाराजी कळत होती...तो चुकला आहे हे पण त्याला कळले होते....पण तिच्यापासून दूर राहायला ही नाराजगीच कामी येणार म्हणून तो चूप होता....

 

"आई, काकी मी  काय म्हणते.....??".....नंदिनी , नाश्ता करत करत बोलत होती.....

 

तिच्या या प्रश्नाने परत सगळे तिच्याकडे बघत होते....आता परत काय पसारा मांडते ....

 

"काय???"....

 

"मला कॉफी........".....नंदिनी

 

" हे ....??"....काकी

 

" मी आणतो बनवून......"....राज डायनिंग टेबलवरून उठत बोलला.

 

" नको....मला काकिंच्या हातची हवीये......"....नंदिनी

 

तिच्या बोलण्याने राज परत आपल्या जागी बसला....

 

"कॉफी रिजेक्ट झाली म्हणजे............ खूपच भडकलेले दिसतंय बाबा वातावरण....".....राहुल

 

काकीने कॉफी आणली सगळ्यांसाठी...

 

" तर आई काकी मी काय म्हणत होते......लग्नसाठीचे जे जे काम आटोपले आहे त्याची लिस्ट द्या....आणि जे जे राहिले आहे त्यांची पण लिस्ट द्या......वेळ नाहीये आता जास्ती पटापट आवरायला लागेल......आणि मी....माझी पण तर शॉपिंग राहिली आहे सगळीच.......ते पण करायला लागले.....ये राहुल रश्मीला विचार ना तिला थोडा वेळ असेल तर माझ्यासोबत येईल शॉपिंगला".....नंदिनी

 

" अग तू काळजी का करते आहेस....तुझी सगळी शॉपिंग झाली आहे......राजने ऑलरेडी सगळं घेऊन ठेवले आहे....टिकली पासून सगळं झालंय तुझं.....फक्त एकदा ट्राय कर ...काही असेल कमी जास्ती तर ते ठीक करून घेता येईल लगेच.."..... काकी....ते ऐकून नंदिनीला राज च कौतुक वाटले...मन सुद्धा भरून आले....

 

" सॉरी काकी.......मला माझ्या आवडीने करायचे सगळे आता....मला कोणावर आता डीपेंड नाही राहायचे ......".....नंदिनी

 

तिचं बोलणं ऐकून राजला थोड वाईट वाटले....पण ठीक आहे तिच्या आवडी निवडीचा पण रिस्पेक्ट ठेवायलाच हवा.......असे त्याला मनातून वाटले...

 

नंदिनीचे बोलणे ऐकून राजवर ती किती नाराज आहे हे सगळ्यांना कळले होते...त्यामुळे दोघांनाच त्यांचे प्रश्न सोडवू द्यावे सगळ्यांना वाटले....नाही तर राहुलच्या लग्नानंतर बोलू असे विचार करत सगळे गप्प बसले...

 

" हो देते लिस्ट.....पण झालेल्या कामांची का हवी??".....आई

 

"बघायला लागेल  ना बरोबर केलंय की नाही कामं".....नंदिनी

 

"धन्य आहात.....आधी नाश्ता करा...."....काकी

 

सगळे नाश्ता करत होते...

 

"काय ग ....काय खुंकार प्लॅन आहे???".... राहूल हळूच नंदिनीला खाता खाता विचारत होता...

 

"तुला कसे कळले??"....नंदिनी

 

"तू आल्यापासून जी असुरी बत्तिशी दाखवत आहे ना....कळले त्यावरून.....आणि रडत रडत गेली होती आणि अशी अवलीया सारखी एन्ट्री केली आहे.....काय चालले आहे डोक्यात??".... राहूल

 

"तुझी वहिनी बनण्याचा ....."....नंदिनी

 

ते ऐकून राहूलला जोरदार ठसका लागला.....

 

"हळू.....कितीदा सांगितले आहे खातांना बोलू नका....पण हे दोघं ऐकतील तेव्हा..."... आजीसाहेब

 

तसे राहुल नंदिनी शांत होत चूपचाप खात होते.....राजचे मात्र पूर्ण लक्ष या दोघांकडे होते....पण त्या दोघांमध्ये काय चाललंय त्याला काही कळत नव्हते....सगळे नाश्ता आयोपून आपल्या कामाला निघून गेले....राहुलने नंदिनीचा हात पकडला आणि एका रूम मध्ये ओढत घेऊन गेला....
 

 

" काय बोलत होती तू??? ....राहुल

 

"काय....??"....नंदिनी

 

"तेच....माझी वहिनी बनायचं ....ते???".....राहुल

 

"तुला माहिती होते ना.......तू का नाही सांगितले ???"....नंदिनी राहुलची कॉलर पकडत आपल्याकडे खेचत बोलली.

 

"हे काय चालले आहे...??"...काका तिथून जात होते तर त्या दोघांना बघून बोलले

 

"काही....थोडासा हिशोब राहिला आहे तो ठीक करतोय".....नंदिनी राहुलची कॉलर सोडत बोलली

 

"ह्मम.......आरमानी ".....काका निघून गेले..

 

"तू का लपवले?? .... ".....नंदिनीचे डोळे आता भरले होते.

 

"माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे राजला...... ....."......नंदिनी रडतच राहुलच्या कुशीत शिरली.

 

" नंदिनी सॉरी यार........ पण जोपर्यंत मला खात्री नाही होत तू त्याच्यावर प्रेम करतेय ....तोपर्यंत तुला नव्हते सांगू शकत....... अवॉर्ड फंक्शनच्या दिवशी खात्री झाली......म्हणून मग...."......राजला येतांना बघून राहुल बोलता बोलता थांबला....

 

"नंदिनी रडू नको...नाही तर तो बोकांबो कच्चा खाईल मला.......इकडेच येतोय.... खुंखार नजरेने बघतोय ".....राहुल

 

त्याचं बोलणं ऐकून नंदिनी हसायला लागली...नी डोळे पुसत बाजूला झाली....राज तिथून जात होता तसे ते चूप होत त्याच्याकडे एकटक बघत होते....राजने त्यांच्याकडे बघितले नी तो वरती आपल्या रूम मध्ये निघून गेला.....

 

"ये हा तुझा भाऊ ती तुहिरे कथा तर नाही वाचत आहे ना......"...नंदिनी

 

"का??....काय झालं??"....राहुल

 

"त्या माहीच्या अर्जुन सारखा हार्ड लूक देतोय.....तो खडूस वरून क्यूट बनतोय....हे आपलं ध्यान क्यूट वरून खडूस बनायला चाललं...."....नंदिनी

 

"हा हा हा......असेल त्याचा काही प्लॅन....खडूस बॉस मुलींना आवडतो लवकर......"..... राहूल

 

"Very funny...... त्या देवदासला काय कळणार तो त्यातही क्युटच दिसतोय.......".... नंदिनी

 

"देवदास???"..... राहुल

 

"बघ ना त्याच्याकडे ....पक्का देवदास दिसतोय".....नंदिनी

 

" पारो अन् चंद्रमुखी कोण मग???"..... राहूल

 

"पारो अन् चंद्रमुखी.....सगळं मीच....."....नंदिनी परत राहुलला बत्तिशी दाखवत होती...

 

" काही आयटेम आहेस यार तू........."....राहुल

 

"अरे खरंच बोलतेय.....देवदास झाला आहे तो.....बघ ना त्याच्याकडे....कधीतरी असा दाढी वैगरे वाढवून असतो काय तो...??..हा त्यातही तो डेंजरस हँडसम दिसतोय ते वेगळं....पण खरंच सांग असा कधी वागला आहे काय तो?".....नंदिनी

 

"तू म्हणते आहेस ते बरोबर आहे....मी पण लास्ट मंथ पासून नोटीस करतोय ....बदलला आहे तो खूप.....आधीसारखा बोलत नाही....एकत्यात राहतो....पळतोय सगळ्यांपासून.......आणि त्या दिवशी तर चक्क पियुन आला .....असा नव्हता यार तो .....he never give up for anything in any situation....... काय झालंय सांगत पण नाही आणि कळत सुद्धा नाही आहे.....काही दिवस आधी तर तापाने फणफणला होता.....आणि मला आठवतेय तेव्हापासूनच तो असा वागतोस..."...... राहूल काळजीच्या सुरात म्हणाला...

 

"काय???? कधी???? आणि मला कोणी काहीच सांगितले नाही....."....नंदिनी

 

" राजने नाही म्हणून सांगितले होते....तू कॅम्पला गेली होती तेव्हा......."..... राहूल आणि त्याने तिला तो सकाळी कसा चेअर वरच बसला झोपला होता ते सगळं सांगितले....

 

"it's all because of me ....".... नंदिनीला आता खूप वाईट वाटत होते...

 

"म्हणजे???".... राहूल

 

" सॉरी राहूल , हे सगळं माझ्यामुळे झाले आहे ..... त्या दिवशी मी त्याला रात्री फोन केला होता....".....नंदिनी आणि तिने त्याला राजसोबत झालेले बोलणे सांगितले...

 

"नंदिनी, मी माझ्या भावाला नाही समजू शकलो ....आणि मीच त्याच्यावर रागावलो होतो....जेव्हा सगळ्यात जास्ती त्याला गरज होती तेव्हाच मी त्याच्या सोबत नव्हतो.....तो कसा आहे माहिती असून सुद्धा मी नाही ओळखू शकलो त्याला.....माझ्या लग्नात ,माझ्या आनंदात काही खंड पडू नये म्हणून तो मला आणि घरच्यांना काही सांगत नव्हता.....आणि मीच त्याला चुकीचे समजत होतो....."....राहुल

 

" मी प्रेम करते ना त्याच्यावर....नाही ओळखू शकले मी त्याला.....मी दुसऱ्या कोणावर प्रेम करते असे त्याला वाटते आहे....त्याला सहन नाही झाले आणि म्हणून तो माझ्या अवॉर्ड फंक्शनला आला नाही ...आणि मी  समजून न घेता त्यालाच दोष देत होती....पण मी राहुल हे मुद्दाम नाही केले रे....पण मी आता माझ्या सगळ्या चुका सुधारणार......"......नंदिनी

 

"Okay...better.....".... राहूल

 

"पण सद्ध्या कोणाला काही सांगू नकोस.... it's a top secret .....promise??".... नंदिनी

 

"Okay..... पण तू तर आल्यापासून त्याला टशन देते आहेस..??.."..... राहूल

 

" हे बघ मी तर चुकलेच आहे...पण नकळतपणे झाले आहे माझ्या हातून हे.......पण तो...त्याला तर सगळं कळत होते ना...माहिती होते....मग मला सांगायला नको त्याने....मला ओळखतो ना तो, माझे डोळे वाचता येतात ना त्याला....मग नाही कळलं का त्याला की मी त्याच्यावर प्रेम करते आहे....आता तर बघच कसा त्रास देते मी त्याला....बदला तो लेना ही पडेगा.... हमको तडपाया है...मला मिठीत नाही घेतले आह त्याने अजूनही......आता तो जोपर्यंत स्वतःहून मला आपल्या मिठीत घेत नाही ...मी नाही जाणार त्याच्याजवळ......."....नंदिनी

 

" नंदिनी...हा तुमच्या दोघांचा प्रश्न आहे....तुम्हाला कसा सोडवायचा तसा सोडव....पण एक लक्षात ठेव त्या दिवशी तो कसा वागला आहे ....परत असे काही व्हायला नको बस येवढेच वाटते.....".... राहूल

 

" नाही राहुल...असे काहीच होणार नाही आहे....राज असा व्यक्तीचं नाहीये की तो असे बरेवाईट काही पाऊल उचलेल..... तो खूप विचारशील व्यक्ती आहे....समजदार आहे.......तो जेवढे प्रेम माझ्यावर करतो तेवढेच तो आपल्या परिवारावर सुद्धा करतो....त्याला माहिती आहे त्याला जर काही झाले तर त्याच्या परिवाराला खूप त्रास होईल...आणि त्याचा परिवाराला त्रास झालेला कदापि त्याला आवडणार नाही....तो स्वार्थी नाहीये....तो फक्त देणं जाणतो....प्रेम करणं जाणतो.....त्याचा त्याचा शरीरावर..मनावर किती कंट्रोल आहे हे तुला सांगायला नको....त्या दिवशी तो थकला होता...हरला नव्हता.... त्याचं मन जड झाले होते... .....कुठेतरी डोक्यातले विचार थांबवावे लागेल ना .....म्हणून त्याने ड्रिंकचा सहारा घेतला......असं एखद्या वेळेला ड्रिंक केले तरयाचा अर्थ हा नाही होत की तो त्याचं वाईट करून घेईल....तू काळजी करू नको...आणि मी आहे ना आता मी काळजी घेईल त्याची....he is the strongest, well balanced  person with all the control on his body and mind....so you don't worry..... भाई श्रीराज देशमुख है वो......very much sorted personality.....".... नंदिनी

 

" बरं ठीक आहे....पण जास्ती वेळ नको लाऊ".....राहुल

 

"Sure.....".... नंदिनी

 

" बरं मला सांग तुला कधी कळलं तू राजच्या प्रेमात आहेस ??".....राहुल

 

" राहुल नंतर सांगते माझी स्टोरी......दोन दिवस झोप नाही लागली मला...खूप वाईट परिस्थितीतून गेले आहे मी.....राजला मी हरवले आहे ही खूप वेदनादायी भावना होती....आता राजला बघितले ना , आता खूप शांत वाटते आहे....झोपायच मला आता......".....नंदिनी

 

" ओके no problem..... आराम कर....."... राहुल

 

त्याला बाय करत ती आपल्या रूममध्ये वरती जायला निघाली तर जाता जाता तिचे लक्ष राजच्या रूमकडे गेले...नी ती तिथेच दारात थांबली. राज आरसा समोर उभा आपल्या डाव्या हाताने शर्टाची बटण लावायचा प्रयत्न करत होता....नंदिनीचे लक्ष त्याच्या दुसऱ्या हाताकडे गेले ,त्याला ब्यांडेज होते...ते बघून तिला अवॉर्ड फंक्शनची रात्र आठवली....त्याचा तो हतबल झालेला चेहरा ...त्याचा हातात फुटलेला ग्लास....हातातून येणारे रक्त....हे सगळं  आठवून तिच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळले......नी तिला राहुलचे बोलणे आठवले...त्याने जर चुकीचे काही केले असते तर??...ते आठवून ती घाबरली पण तिला त्याचा राग सुद्धा आलेला.....तिने ते अलगद पुसले आणि राजपुढे जात उभी होत तो बटण लावत होता त्या हातावर तिने आपला हात ठेवला......आज सहा सात महिन्यानंतर तो तिला इतक्या जवळून बघत होता...आज कितीतरी दिवसांनी तिचा स्पर्श तो अनुभवत होता.......तिच्या जवळ येण्याने.....त्याचा हृदयाची धडधड वाढली होती....तिला पकडावं आणि आपल्या छातीशी कवटाळव असे त्याला वाटत होते....पण तिला मिठीत घेण्यात त्याचा हात पुढे धजला नाही.......तिच्या त्या स्पर्शात त्याच्यासाठी जग तिथेच थांबले असे त्याला वाटत होते..

 

ती खाली बघत चुपचाप त्याच्या शर्टच्या बटण लावत होती....तो एकटक तिला बघत तिचा चेहरा न्याहाळत  होता.....दोघांमध्ये पण एक निरव शांतता पसरली होती...

 

"नंदिनी....."....राज

 

नंदिनी मात्र खालीच बघत होती....

 

"आजी आबा कसे आहेत??"..

 

.......

 

" राहायचं असते तिथे काही दिवस त्यांना बरे वाटले असते...."....

 

.........

 

"खूप थकली दिसतेस...झोपली नाही काय नीट.....?"...राज

 

............

 

" राग आला आहे माझा??माझ्यासोबत बोलणार नाही आहेस??"......राज

 

" हे .... हे ब्यांडेज चेंज करावं लागेल.... थोड ओलं झाले आहे......"....नंदिनी

 

" नंदिनी...."...

 

" तू इथे बस....मी बदलवून देते......"...

 

ती ब्यांडेज आणि क्रीम घेऊन आली.....त्याचा हात आपल्या हातात घेत जुने ब्यांडेज काढत होती...

 

" असू दे..... मी करेल आहे....."....राज आपला हात तिच्या हातातून सोडवत बोलला... ..ती बोलत नाहीये ,त्याच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये बघून त्याला वाईट वाटत होते...

 

तिने परत त्याचा हात आपल्या हातात घेतला....त्याने परत त्याचा हात तिच्या हातातून सोडवला...असे दोन तीनदा झाले...

 

" आगाऊपणा करू नकोस........तुझ्यापेक्षा जास्त हट्टपणा मला करता येतो......सरळ बस आता"....नंदिनी थोडी मोठ्यानेच बोलली आणि त्याचा हाताला क्लीन करत होती...

 

" आह......"....

 

" दुखलं???"......

 

"राज काहीच न बोलता तिच्याकडे बघत होता....

 

नंदिनी आता हातावर फुंकर घालत हळूहळू क्रीम लावत होती....आणि हळूवारपणे तिने त्याचा हातचं ब्यांडेज केले....

 

ती बोलत नाहीये बघून राज जागेवरून उठला आणि आपली ऑफिस बॅग भरू लागला....

 

" ऑफिस मध्ये जात नाहियेस तू.....".....नंदिनी

 

"काम आहेत......"...... राज

 

" नको करू......."....नंदिनी

 

"महत्वाचं आहे....."....राज

 

" मग घरुंन कर .....".....नंदिनी

 

"नको.......मी ऑफिस मध्ये जातोय.....".....राज

 

"तुला आपली मनमानीच करायची आहे ना.....??....करत बस......आणि मग विचारायचं नाही माझ्यासोबत का बोलत नाही ते??...नंदिनी

 

" माझ्या झोपेची खूप काळजी आहे ना....मग एकदा स्वतःकडे बघ....तुला या अश्या अवस्थेत बघून कोणाची झोप खराब होणार नाही...... आणि हो......तुझ्यापेक्षा जास्त ड्रिंक मी करून दाखवू शकते....तू एक हात जखमी केला मी दोन्ही हात करू शकते.......आणि एक नेहमीसाठी लक्षात ठेव........जे जे तू करशील ना ते ते तुझ्या दुपटीने मी करून दाखवेल आहे......रादर करणारच आहे......सो विचारपूर्वक पुढल पाऊल टाकायचे.......remember it....".... नंदिनी ... बडबडत बाहेर आली....परत काहीतरी आठवून ती त्याच्याजवळ आली....

 

" आज तू जर ऑफिस मध्ये गेला ना.....तर मी कायमची इथून निघून जाईल.....आणि दुसरी गोष्ट तुला माझा चेहरा बघायचं नव्हता ना....आता तो मी तुला 24*7 दाखवेल......नाही तुझ्या एक एक गुन्हाचा बदला घेतला ना तर नाव नाही लावणार नंदिनी.......".....नंदिनी... आणि ती आपल्या रूम मध्ये निघून आली....राज तर डोळे विस्फारून तिच्याकडे बघत होता...

 

" क्या सॉलिड धमकी दिली यार तिने........".......राहुल त्याच्या रूममध्ये येत बोलला..

 

" हा????.......पण का बोलली ती अशी......वेगळीच वागत होती".......राज

 

" बायको सारखी".......राहुल हसत होता....

 

" काही काय तुझा फालतूपणा......".....राज

 

" बरं....... पण रागावली जबरदस्त आहे हा..... मान गये नंदिनी मॅडम..... अन् ते काय होते.....तू जे जे करशील त्याच्या डब्बल मी ते ते करेल....... ऑसम होत.....".... राहुल

 

" हो ना ....काय काय बडबडत होती...काहीच समजले नाही.......आणि मी कोणता गुन्हा केला?? कशाचा बदला घ्यायचा तिला??"....राज विचार करत होता..

 

" तिला घ्यायला एअरपोर्ट ला नाही आला.......ती आली तर तिकडे सिंगापूरला जाऊन बसला.... तू अवॉर्ड फंक्शनला नाही आला,वरतून इतकी दारू ढोसून आला.... ........तो गुन्हा म्हणत असेल ....... "....राहुल

 

" तो गुन्हा होता??"....राज

 

" हो....तिच्या देखत तर तो गुन्हाच आहे...........आता ती आधीची नाही आहे...फॉरेन रिटर्न आहे.....काय काय शिकून आली असेल तिथून देवच जाणे......चून चून के बदला लेगी वो......तू सांभाळून राहा हा आता...."....राहुल

 

" तू घाबरावतो आहेस???"......राज

 

" तू घाबरला??? नसशील तर घाबर.....खाली बघितले ना काय attitude होता पोरीचा....चक्क तुझी कॉफी नाकरलिये....कळते काय तुला तुझ्या हातची कॉफी जे कधीकाळी तिच्यासाठी अमृतापेक्षा गोड होते .mmm...यावरूनच तू लक्षात घे वातावरण किती तापालय....".....राहुल त्याचा गोंधळलेला चेहरा बघून मनातच खूप हसत होता....

 

"हम्म.........".....राज

 

" ऑफिसला जाऊ नको.........नाही तर ती सगळं घर डोक्यावर घेईल....."....राहुल बाहेर निघून आला...

 

राजला नंदिनी काय बोलली काही नीट कळले नव्हते .... पण ती काहीतरी बोलली यातच तो समाधानी होता......

*******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️