नंदिनी...श्वास माझा 71

Raj Nandini

भाग 71

आज नंदिनीचे  अवॉर्ड फंक्शन होता.....सोबतच नंदिनिने  काही सरप्राइज प्लॅन केले होते...तिच्यासाठी आज खूप स्पेशल दिवस होता....त्यासाठी ती खूप आतुरतेने राजची वाट बघत होती....काय करू अन् काय नको असे तिला झाले होते...आज तिच्या आयुष्यातला खुप मोठा दिवस होता....आज ती तिचे प्रेम कबूल करणार होती....आज ती त्या व्यक्तीला सगळ्यांसोबत भेट्वानार होती ज्याच्यावर ती जिवापाड प्रेम करत होती......आजचा दिवसच तिच्यासाठी खूप खास होता....त्यामुळे ती तिची खास अशी तयारी करायला लागली.... आज तिला सुंदर दिसावेसे वाटत होते....ती आपल्या तयारीला लागली.

इकडे राजच्या मनाची खूप चलबिचल सुरू होती.....त्याचे मन खूप अस्थिर झाले होते......अवॉर्ड फंक्शनला जाऊ की नको या द्वंद्व मध्ये तो फसला होता....नंदिनीच्या आनंदात शामिल होता तो...पण आज ती त्याच्यापासून दुरावणार हे दुःख त्याचे मान वर करत होते....डोळ्यांआड हे सगळं सहन करणे कदाचित जमेल पण डोळ्यांसमोर सगळं घडतांना त्याला बघावल्या जाणार नव्हते.....त्याचे मन खूप घाबरघुबरे झाले होते....तो सिंगापूर वरून निघाला तर होता....पण पुढे नंदिनील फेस कसे करायचे हेच त्याचा डोक्यात सुरू होते.... ओठांवर हसू तर आणू....पण डोळ्यांचे काय....??? त्याला कसे सांभाळू......ते तर खरंच बोलणार होते.....

नंदिनी तयार झाली होती...तिने व्हाइट टीशर्ट... हाफ व्हाइट पेन्सिल पॅटर्न ट्रौउजर ...त्यावर मरून पिंकिश कलरचे लाँग स्लीवस असलेले राजस्थानी पॅटर्नचे मिरर आणि एम्ब्रॉइडरी असलेले ब्लेझर घातले होते....एका हातात साजेशी ब्रॉड बेल्ट वॉच, पायात डार्क मारून पेन्सिल हीलचे शूज....केस कर्ली सेट करून मोकळे सोडले होते...डोळ्यात काजळ...ब्लॅक ब्रॉड आयलायनर ....कपाळावर छोटीशी मरून स्टोन टिकली...ओठांवर लाईटशेडचे लिपस्टिक...कानात सेम रंगाचा छोटासा स्टोन.....बघताक्षणी नजर स्थिरावेल अशी ती सिंपल पण खूप अत्त्रॅक्टिव दिसत होती.....

स्वतःलाच थोड्यावेळ आरसा मध्ये बघत होती...आणि स्वतःलाच फ्लायिंग किस देत होती....

*****

राज येव्हणा भारतात पोहचला होता... पिकप करायला कार आली होती...त्यात जाऊन बसला...... त्याने खिशातून मोबाईल काढला आणि ऑन केला....तर भराभर मेसेजेस यायला लागले.  .... त्यात त्याला नंदिनिकडून सुद्धा एक अपडेट दिसले....त्याने लगेच ते ओपन केले...

नंदिनीचा एक सुंदर फोटो होता.....

" परफेक्ट अँड बोल्ड ........"....फोटो बघून आपसुकच त्याच्या तोंडून बाहेर पडले.....तिचा फोटो बघून त्याच्या ओठांवर गोड हसू उमटले.....आता जावे नी आपल्या मिठीत तिला घ्यावे असे त्याला वाटत होते...इतकी ती गोड त्याला भासत होती .. ....

बऱ्याच वेळ तो फोटो झूम इन झूम आऊट करत बघत होता....आणि शेवटी त्याची नजर तिच्या डोळ्यांवर जाऊन थांबली.....तिचे ते हिरवे डोळे....भरपूर काजळ लावल्यामुळे खुप्पच सुंदर दिसत होते....पाणीदार आणि खूप बोलके......

" दहा अकरा वर्षांचा असेल.....तेव्हापासून गुंतलो आहे या  डोळ्यांमध्ये........कैद करून ठेवले आहेस मला....." ...राज तिच्या फोटोकडे बघत स्वतःशीच बोलला.फोटो बघता बघता त्याचे लक्ष फोटो खाली लिहिलेल्या लाईन कडे गेले......आणि ते वाचून कुणीतरी हृदयात बाण मारल्यासारखे त्याला टोचले.....आणि दोन अश्रू डोळ्यात तरळले......

" कशी दिसतेय??? त्याला आवडेल ना???"

त्याने फोन स्विच ऑफ केला आणि बाजूला ठेवला.....सीटला मागे टेकून बसत डोळे बंद केले.....

माना के हम यार नहीं
लो तय है के प्यार नहीं

फिर भी नज़रें ना तुम मिलाना
दिल का ऐतबार नहीं
माना के हम यार नहीं..

रास्ते में जो मिलो तो
हाथ मिलाने रुक जाना हो..
साथ में कोई हो तुम्हारे
दूर से ही तुम मुस्काना
लेकिन मुस्कान हो ऐसी की
जिसमे इकरार नहीं
नज़रों से ना करना तुम बयां
वो जिससे इनकार नहीं
माना के हम यार नहीं..

फूल जो बंद है पन्नो में तुम
उसको धुल बना देना
बात छिड़े जो मेरी कहीं
तुम उसको भूल बता देना
लेकिन वो भूल हो ऐसी
जिससे बेज़ार नहीं
तू जो सोये तो मेरी तरह
इक पल को भी करार नहीं
माना की हम यार नहीं..

रेडिओ वर गाणे सुरू होते....ते शब्द ऐकून राजच्या डोळ्यांच्या कड्यांतून अश्रू बाहेर आले.....

****

" Hey ...wow yar....looking so hot and confident...."... राहुल

"Yess......thank you ...... राजने गिफ्ट केलेला आहे ड्रेस......"....नंदिनी

" सही.....पण कधी?"......राहुल

" मला कुरिअर केले होते त्याने कॅलिफोर्निया ला ....माझा वाढदिवस होता तेव्हा..... ऑसम आहे ना???....."...नंदिनी

" Yess..... त्याच्या चॉईसला काय बघावे लागते..... सगळं परफेक्ट असते बाबा त्याचे......ये पण रश्मीला नको सांगू हा....खूप ऐकवेल मला ती........मला साधा रुमाल पण तिच्या आवडीचा घेता नाहीं येत.....".... राहूल.

"काय रे तू........."...नंदिनी

"बरं चल..... बरच दूर आहे लोकेशन.....वेळ लागेल पोहचायला , रश्मीला पण पिकप करायचे आहे...".... राहूल

" पण राज.....तो नाही आला ना अजून??".....नंदिनी

" तो तिकडेच येणार आहे ... चल आता....."...राहुल

सगळे ठरलेल्या स्थळी पोहचले......भव्य असा तो हॉल होता.....त्याच्या मागच्या बाजूला पेंटिंग चे एक्जीबिषण भरले होते.... बऱ्याच  पेंटिंग्ज तिथे लागल्या होत्या.....त्यात नंदिनीच्या काही चार पाच पेंटिंग त्यात होत्या....तिच्या प्रत्येक पेंटिंग मधून काही ना काही भाव , सामाजिक विकृती उठून येत होती....
 

कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ बाकी होता....नंदिनी आणि परिवार सगळे पेंटिंग्ज बघत त्यावर डिस्कशन करत होते...त्या आर्ट कलेक्शन मध्ये तर कोणाला काही समजत नव्हते....नंदिनी त्यांना प्रत्येक फोटो...त्यातून पेंटर ला काय सांगायचे, काय दर्शावयाचे आहे ते समजावून सांगत होती...

" नंदिनी ... या पेंटिंग आहेत तुझ्या कंपिटिशन मध्ये....??"...काकी

" नाही काकी... या फक्त डिस्प्लेसाठी आहेत.... कंपिटिशनसाठी पाठवलेली वेगळी आहे....."...नंदिनी

"मग ती इथे नाही आहे???".....काकी

" या बघा इथे ज्यांच्यावर पडदे आहेत ना.... त्या आहेत कंपिटिशनच्या पेंटिंग्ज .......आणि ज्या टॉप 3 असतील त्या तिथे स्टेजवर रिविल करतील आहेत...."....नंदिनी

"Wow....superb...."... रश्मी

"नंदिनी...तुझी पेंटिंग कशाबद्दल आहे....??"....काकी

" That's the surprise .....".....नंदिनी

"अरे यार...इथे पण सरप्राइज??.....".... राहूल

"Yess......".... नंदिनी

प्रोग्रमची अंनौन्समेंट झाली...तसे सगळे मेन फंक्शन हॉलकडे जायला वळले....तिथे गेट वर एक छान पेंटिंग लावले होते....त्यावर खूप सुंदर असा मेसेज लिहिला होता..

" Your life is your canvas....create a divine masterpiece......"...

" किती छान मेसेज आहे....."...रश्मी

"हो....आणि आता मी सुद्धा माझे लाईफ असेच सुंदर रंगांनी भरणार आहे......बर चला कार्यक्रम सुरू होतो आहे.."....नंदिनी , आणि सगळे आपापल्या जागी येऊन बसले...

कार्यक्रमाचे उद्घाटन झाले ... सगळे मान्यवर त्यांच्या जागेवर स्थानापन्न झालेत...काही मान्यवरांचे art of life वर दोन दोन शब्द झालीत....अधून मधून काही पारंपरिक नाच गाणे सुरू होते..आणि कार्यक्रम सुरू झाला....

" राहुल ....राज नाही आला ना अजून....."...नंदिनी

" येईल ग.....".... राहूल

"फोन कर ना....."...नंदिनी

" केला होता मघाशी....एअरपोर्टवर होता....on the way च आहे तो.... पोहचेलच इतक्यात...तू तिकडे लक्ष दे......"... राहूल

"Okay....."... नंदिनी

काही प्रोत्साहन पर बक्षीस देणे सुरू होते.....जसे जसे नाव अंनाउन्स होत होते.....नंदिनीच्या हृदयाची धडधड वाढली होती....तिसऱ्या नंबरचे बक्षिश्चे नाव अंनाउन्स झाले.....तसे तिला नर्व्हस व्हायला लागले...तिला स्वताहवार विश्वास तर होताच.....पण तिथे खूप मोठं मोठ्या आर्टिस्टचे पेंटिंग होते...त्यामुळे तिला थोडी भीती सुद्धा वाटत होती....तो दोन्ही हात जोडून स्टेजकडे लक्ष देऊन बसली होती...

" And the best painting award of the year goes to Ms Nandini Shriraj Deshmukh......."..

हॉल मध्ये नाव घुमत होते......नंदिनीचे डोळे आनंदाने चमकू लागली...सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट होत होता...

" नंदिनी..... येस.......".....राहुल

नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आले.....

" नंदिनी जा......तुझं नावं घेत आहेत....."..काकी

" पण राज......???"....तिचा आनंदी चेहरा थोडा उतरला होता

" अग तो पार्किंग मध्ये आहे.... जस्ट त्याचा मेसेज आला....जा तू....वेळ नको करू"..... राहूल

" खरंच??"....नंदिनी

" हो.... जा सगळे वाट बघत आहे तुझी......."...राहुल तिच्या डोक्यावर थोपटत बोलला.

नंदिनी , आई काकिंना नमस्कार करून स्टेजकडे जायला निघाली... स्टेजवर सगळ्यांनी तिचे कौतुक केले...तिला ट्रॉफी आणि एक चेक देण्यात आला....तिने सगळ्यांचे धन्यवाद केले..... आणि आता वेळ होती तिचे पेंटिंग रिविल होण्याची......तिने एकदा मेन गेट कडे बघितले....आणि नंतर राहुलकडे....राहुलने तिला थंपज अप करत गेटकडे इशारा केला...ती बघनारच की तेवढयात सगळे लाइट्स ऑफ झाले......आणि एक फ्लॅश लाईट तिथे मधोमध ठेवलेल्या पेंटिंगवर  आला ...आता हळूहळू त्या पेंटिंग वरून पडदा बाजूला झाला...

" श्रीराज ..........".आईच्या.... तोंडून पेंटिंग बघून शब्द बाहेर पडला...

आई, काका, काकी, राहुल, रश्मी सगळेच आवसून त्या पेंटिंग कडे बघत होते.....इतकी अप्रतिम ती पेंटिंग होती....

" Amazing surprise....... नंदिनी......"... राहूल एकसारखा पेंटिंग बघत होता...

एक पाच फूट मोठी अशी ती पेंटिंग ची  फ्रेम होती...त्यात राजच्या फक्त चेहऱ्याची मानेपर्यंत अशी  पेंटिंग केली होती....थोडेसे विस्कटलेले केस .... कॅजूअल चेक शर्ट...शर्टाची एक बटन ओपन....डोळ्यात चमक, खूप स्वप्न...तो स्वप्न पूर्ण करण्याचा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स..सगळ्यांना आपलेसे करून घेईल असे ओठांवर गोड हसू......

" So ladies and gentlemen....this is the best painting of this evening......तुम्हाला वाटत असेल ही  एक साधी एका मुलाची पेंटिंग आहे..पण असे नाही आहे .... यात काहीतरी स्पेशल आहे.......या एकाच पेंटिंग मध्ये सगळे इमोशन्स तुम्हाला बघायला मिळतील......लव्ह, केअर, dreaming, sad, happy, curious, crying, excited , smiling, paitience, confidence,  त्याग , दया,   divine.... असे सगळे भाव तुम्हाला या चेहऱ्यावर दिसतील........" अँकर बोलली तसे वेगवेगळया अँगलने फोटोवर लाईट फोकस करण्यात आले.....जवळपास दहा पंधरा  मिनिट हा कार्यक्रम सुरू होता.....पूर्ण हॉलभर एकदम शांतता पसरली होती...सगळे पेंटिंग बघण्यात मग्न झाले होते.....इतका तो अद्भुत शो सुरू होता......नंदिनी सुद्धा एकटक राजच्या पेंटिनगकडे  बघत होती........ फोकस लाईट बंद झाला आणि सगळे लाइट्स ऑन झाले......आणि सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट सुरू होता......राहुल तर आपल्या जागेवरून उठून उभा होत जोरजोराने टाळ्या वाजवत होता.....

" Ms Nandini , या अद्भुत पेंटिंगसाठी आपले खूप खूप धन्यवाद!!!.....".... अँकर

" My pleasure .....thank  you!!".... नंदिनीने हसून उत्तर दिले.

" He is really very special....any relation with you???"..... अँकर

" माझ्या जीवनाचा शिल्पकार...... My lifeline........ Without whom I can't even breath.........".... नंदिनी

" He is none other than Mr Shriraj Deshmukh.......My husband.....My life......all the reasons for my wide smiles......."...

********

क्रमशः...

*********

हॅलो फ्रेंड्स...

"मी श्रीराज देशमुख......"

"मी नंदिनी श्रीराज देशमुख.......".


"आपण सगळे आम्हाला ओळखता  अशी आशा करते......"...नंदिनी

"आपण सगळे आम्हाला आणि आमच्या परिवाराला भेटत आले आहात.....नंदिनी...श्वास माझा या कथामालिकेतून....."... श्रीराज

" उद्या व्हॅलेंटाईन डे......प्रेम व्यक्त करण्याचा दिवस...."...नंदिनी

" प्रत्येकाची प्रेम याविषयी वेगळी परिभाषा असू शकते...., पण माझ्यासाठी प्रेम म्हणजे आदर,  काळजी, आणि आनंद...... जसे राज माझी घेत आला आहे अगदी माझ्या लहानपापासून च......त्याने माझ्यावर त्याचे प्रेम कधीच लादले नाही....त्याच्या प्रेमात मी उडायला शिकले, किंवा असे म्हणता येईल त्यानेच मला उडायला शिकवले.....माझी स्वप्न पूर्ण करायला, माझ्या सुख दुःखात, माझ्या वाईट प्रसंगी तो  माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि आहे सुद्धा...जेवढे प्रेम त्याने माझ्यावर केले तेवढेच प्रेम त्याने त्याचा प्रत्येक नात्यावर केले आहे....प्रत्येक नात त्याने फक्त निभावले नाही तर जपले सुद्धा आहे......त्याने प्रत्येक नात एका फुलं प्रमाणे जपले आहे......"...नंदिनी

" माझ्यासाठी प्रेम म्हणजे माझी नंदिनी आहे........" ... राज

" राज sssss........"....नंदिनी

" काय???..."....राज

" काही काय बोलतो??"....नंदिनी

" खरं तेच बोलतोय चिमणे......... तुला बघितले  नी प्रेम काय आहे मला कळत गेले......"....राज

" प्रेम म्हणजे अपेक्षारहित  एकमेकांचा आनंद जपणं,  त्याग.... संयम..... आणि समर्पण......मग ते कुठलेही नाते असू देत......" ....राज

" एक्झॅक्टली.....मी पण तर  हेच म्हणत होते....."...नंदिनी त्याच्या कुशीत जात बोलली...

" म्हणून तर म्हणालो ना .... प्रेम म्हणजे नंदिनी.....श्वास माझा"...तिच्या कपाळावर किस करत राजाने  तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून घेतले......

Happy Valentine's Day!!!!

Stay happy......

******

तुम्हाला काय वाटते प्रेम म्हणजे काय???

कसा वाटला आजचा भाग...नक्की कळवा....

🎭 Series Post

View all