नंदिनी...श्वास माझा 69

राज नंदिनी

भाग 69

" राज , I am in Love ...... I am in love ......." .. नंदिनीचे ते शब्द ऐकून राज शॉक झाला आणि त्याच्या हातातला फोन खाली पडला..... त्याच्या डोळ्यांत पाणी साचायला लागले होते....

" राज.....राज....मी प्रेमात पडले, फायनली कळले मला.... तुला माहिती सगळं पिकं पिंक दिसायला लागले आहे .... सगळीकडे गोड मुझिक वाजते आहे .... दिवसभर स्वतःलाच आरसा मध्ये बघते आहे , स्वतःलाच बघून लाजयाला सुद्धा होत आहे ....  फक्त फक्त त्यालाच बघावेसे वाटते आहे , त्यालाच आठावावेसे वाटते आहे , स्वप्नात पण तोच येतो आहे .... I can't live without him Raj ..... I am in love.......... कधी कधी तुला सांगतेय असे झाले  होते..... सॉरी तुला जागवले , पण मी वाट नव्हती बघू शकत .... Raj , I love him a lot .....

बरं , ऐकना ,उद्या सकाळी  नेक्स्ट वन विकसाठी मी एका कॅम्पला जाते आहे , तिथे फोन अलाऊ नाही आहे , एक इमर्जन्सी नंबर तुला पाठवते , खूप महत्वाचं काही असेल तर तिथे फोन कर. इंटरनेट ॲक्सेस असला तर मेल करेल. आणि माझी काळजी करू नकोस ... मी एकदम झकास आहे ....काळजी घेईल कॅम्प मध्ये स्वतःची ..." ...नंदिनीची फोनवर बडबड सुरू होती. ती खूप एक्साईटेड  होत बोलत होती. पण राजचे कशातच लक्ष नव्हते ....तो चेअर वर शांत बसला होता.... आणि अश्रूवाटे त्याचे फक्त डोळे बोलत होते.

" राज......राज.......... आपलं ठरलं होत ना, मी प्रेमात पडेल तर सगळ्यात आधी तुला सांगेल .... See I kept my promise ...... राज ....तू बोलत का नाही आहेस ....राज ...राज...are you there ....." ... नंदिनी

राज राज हे शब्द त्याच्या कानावर पडले आणि तो भानावर आला ...स्वतहाला कंट्रोल करत .. त्याने खाली पडलेला फोन उचलला आणि कानाला लावला..

" ऐकतोय..... गुड..... I am  Very Happy ...." ... तो कसाबसा बोलला.

" राज हे सिक्रेट असेल हा आपल्या दोघांमध्ये...... ॲक्च्युअली तुला पण तिथे आल्यावरच सांगणार होते पण you know na ... माझ्या पोटात काही राहत नाही , तुला सांगितलं नाही तर मला कसेतरी होत असते.....सो प्लीज  घरी कोणाला काहीच सांगू नको, it's a surprise for everyone " ..... नंदिनी

" Okay ......." ... राज

" बरं , झोप आता , मला पण कामं आहेत ...बाय " ...नंदिनी

" Take care , बाय " ....राज

" राज, तू तो कोण आहे , विचारले नाही ???" ....नंदिनीला काहीतरी आठवले आणि ती परत बोलत होती .

" ह्मम , कोण आहे??? " ... राज

" He is the well known international personality " ..... नंदिनी

" Good..... तू निवडला आहे म्हणजे छानच असणार " ....राज

" Yeap ..... Bye....good night ...." ... नंदिनी ने बोलून फोन कट केला....

नंदिनी तर हवेतच होती . खूप खुश होती. फायनली ती ज्याची वाट बघत होती तो क्षण आला होता , ती प्रेमात पडली होती. तिला आताच कळले होते की ती प्रेमात पडलीय.तिचा आनंद गगनात मावेना झाला होता. चर्च मधून बाहेर पडल्या पडल्या तिने राज ला फोन करून कळवले होते.

******

" राहुल , राज आज सकाळपासून दिसला नाही .... मॉर्निंग वॉक ला पण नाही गेला तो " ...निती

" काकी रात्री बराच वेळ जागा होता , काही काम करत होता  .. उशिरा झोपला असेल, जाग नसेल आली ."....राहुल ,बाहेरून मॉर्निंग रूटीन्स आटोपून आला होता तेव्हा नीतीने त्याला थांबवले होते.

"राहुल नाष्ट्यासाठी आवाज देऊन ये त्याला,परत ऑफिसला उशीर झाला जायला तर नाश्ता सुद्धा करणार नाही."....निती

"हो.... आलोच त्याला आवाज देऊन "...राहुल वरती राजच्या रूम मध्ये गेला.

"Hey bro......"... आवाज देत राहुल राजच्या रूम मध्ये आला तर तो चेअर वर बसला टेबल वर डोकं ठेऊन झोपला होता. राजला तसे झोपलेले बघून राहुलला थोडे अजब वाटले.

"राज.......इथे का झोपला आहेस...?"...राहुल त्याच्याजवळ जात त्याच्या हाताला हलवत बोलला.

"याला तर खूप ताप आहे ....."..राहुल मनातच बोलत त्याला चेक करत होता

"Ohh sorry.... तू कधी आला, माझं लक्ष नव्हते..."...राज  राहुलच्या स्पर्शाने जागा झाला होता.

" राज, तुला खूप ताप आहे....आणि तू असा इथे का झोपला आहे ....???"....राहुल

राहुलच्या बोलण्याने राजला  नंदिनीचा रात्री आलेला फोन आणि तिचं सगळं बोलणे आठवले.परत त्याचा हृदयात त्या दुखायला लागले होते.

"अरे, काय विचार करतोय....आणि आधी उठ इथून , तिथे बेडवर चल...."....राहुल

"ते.....मी काम करत बसलो होतो, कधी डोळा लागला कळले नाही..."....राज खुर्चीवरून उठत बोलत होता की थोडा चालतांना अडखळला....राहुलने त्याला आधार देत बेडवर बसवले.

"काल तर ठीक होता, अचानक येवढा ताप????"....राहुल

"कामाच्या एक्झरशनमुळे असेल.... don't worry, I am fine......"... राज

"काय??? येवढा तापाने फणफणला आहे , आणि don't worry म्हणे, येवढा ताप तर तू नंदिनी अमेरिकेला गेली तेव्हा सुद्धा नव्हता काढला...... चल फ्रेश हो, औषध देतो..."...राहुल

नंदिनीचे नाव निघाले तसे राजचे डोळे पाणावले होते.....

"वाद झाला काय काही नंदिनिसोबत??? थांब आताच तिला झापतो..."....राहुल ,त्याच्या हातात ब्रश देत बोलला.

"अरे नाही नाही....नंदिनीचा इथे काय संबंध.......असू दे , दूर आहे, उगाच काळजी करत बसेल.......सांगितले ना ,काम खूप वाढले आहे आता.... होतं एखाद्या वेळेला कधी......"...राज

"Okay......... मी इथेच ब्रेकफास्ट घेऊन येतो...., इथेच बस, जाऊ नकोस कुठे .." ..राहुल......

"ह्मम......"...राज

राहुल खाली ब्रेकफास्ट आणायला निघून आला.

काल जेव्हा नंदिनीचा फोन आला होता,त्यानंतर त्याला झोप लागली नव्हती.... तिचं बोलणे त्याने मनाला इतके लावून घेतले होते की  बऱ्याच वेळ त्याच्या डोळ्यातले पाणी थांबले नव्हते....रात्रभर तो जागा होता.....खूप वेळ तो भरल्या डोळ्यांनी नंदिनीचा फोटो बघत बसला होता.....कधीतरी सकाळी त्याचा डोळा लागला होता.कदाचित आतापर्यंतच्या आयुष्यातली ही पहिली वेळ होती जेव्हा तो मनाने इतका खचला होता.....जेव्हा नंदिनीच्या मेंटल हेल्थ बद्दल कळले होते तेव्हा सुद्धा तो इतका खचला नव्हता,धैर्याने त्याने सगळं सांभाळले होते.नंदिनी त्याच्या जवळ होती, एक होप होती ती कधीतरी आपली होईल.....पण आता सगळंच संपलं होते...ज्या गोष्टीची तो वाट बघत होता ती गोष्ट आता पूर्ण होणार नव्हती......तिच्या आनंदात आपण आनंदी व्हावे हे जरी त्याच्या डोक्याने मान्य केले होते तरी त्याचं मन मात्र हे सगळं मानायला तयार नव्हत.हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्काच होता....जो त्याला सहन झाला नव्हता आणि त्याने ताप काढला होता.

******

आजकाल नंदिनी तर आपल्याच विश्वात होती....आपल्याच विश्वात रमायची......तिला नटण्यामुरडण्यात कधीच फारसा इंटरेस्ट नव्हता.....किंबहुना तिला स्वतःला नीट तयार सुद्धा होता यायचे नाही. पण आता सगळंच बदललं होते....आता घणटोंशी ती आरसा समोर बसली असायची....स्वतःलाच बघत असायची....स्वतःलाच बघून हसायची काय... एकट्यातच बोलायची काय ....चारदा कपडे बदलायची काय....कितीतरी सेल्फिज काढत असायची.....ती प्रेमात तर पडली होती....पण या प्रेमाने तिला स्वतःच्या सुद्धा प्रेमात पाडले होते...ती खूप आनंदी राहायला लागलो होती. गाणे गायला लागली होती.... सगळंच कसे गुलाबी गुलाबी दिसायला लागले होते.... सगळंच कसे हवेहवेसे.., आपल्याच दुनियेत....

कुछ तो हुआ है  , कुछ हो गया है
कुछ तो हुआ है ,कुछ हो गया है
दो चार दिन से ,लगता है जैसे
सब कुछ अलग है  ,सब कुछ नया है
कुछ तो हुआ है ,कुछ हो गया है..

चीज़ें मैं रख के ,भूल जाती हूँ
बे-ख्याली में,गुनगुनाती हूँ
अब अकेले में, मुस्कुराती हूँ
बदली हुई सी , मेरी अदा है
कुछ तो हुआ है ,कुछ हो गया है..

ये नशा जिसमें ,दोनों रहते हैं
ये लहर जिसमें, दोनों बहते हैं
हो न हो इसको प्यार कहते हैं
प्यार मिला तो दिल खो गया है
कुछ तो हुआ है कुछ हो गया है
हम्म.. कुछ हो गया है..
हम्म.. क्या हो गया है..

" Why she is behaving like this....???...any problem???".... एक अमेरिकन फ्रेंड नंदिनी ला एकट्यातच हसतांना, नाचातांना , तीच लक्ष नाहीये बघून नंदिनीची फ्रेंड शैला ला विचारात होती.

"Nothing......she is very fun going girl...."... शैला

"Oh I see....."... American

"She is very hot....."... एक अमेरिकन मुलगा

"Yay.......".....

"Hey Nandini.....what are you doing..... it's looks very funny from here ...???"... शैला नंदिनीला बघून ओरडली.

" I am in love Shaila..... I am in love......"...... नंदिनी , शैलाचा हात पकडत नाचत होती...

"Yess my darling.....yess......"... शैला

"Yeah...... I am very happy.......I always wanted to feel this feelings..... finally I am in love......".... नंदिनी शैला ला हग करत बोलली

"Yess baby......but everyone looking at you dear....."... शैला..

"Hey girls....what are you doing there.....go back to your work...".. तिथल्या इंस्ट्रक्टरने आवाज दिला तश्या त्या आपल्या कामाला गेल्या...

नंदिनी एका कॅम्प मध्ये आली होती... ती सुंदर होती त्यात तिचे असे वागणे....सगळे तिलाच बघत होते .

********

दोन दिवस झाले तरी राजचा ताप उतरला नव्हता...आईला , घरात सगळ्यांना त्याची फार काळजी वाटत होती..

" राज, डॉक्टरांना बोलवले आहे ...ते चेकप करतील..."...राहुल

" अरे, काही गरज नव्हती....मी ठीक आहो....."...राज

"अशी कशी गरज नव्हती....दोन दिवस झाले ताप उतरत नाहीये...... डॉक्टर तपासातील, निदान सांगतील...तेवढेच समाधान आम्हाला..."...आई

"Okay....".... राज

डॉक्टरांनी राजला तपासले......काही इंजेक्शन दिले....

" काहीतरी टेन्शन घेतले दिसतेय.....BP थोडा लो झाला आहे.... खानपान कडे लक्ष द्या......हे काही औषध आहेत....तीन दिवसात नाही उतरला तर मग काही टेस्ट करून घेऊ...."...डॉक्टर

"ठिक आहे ..."....आई

राहुल डॉक्टरणणा खाली सोडून आला...

"भाई....तू कशाचे टेन्शन घेतले आहे ???काही प्रोब्लेम आहे काय??"...राहुल

"मी काय म्हणते, आठ दिवस साठी याचा लॅपटॉप काढून घ्या....सतत दिवसरात्र घेऊन बसला असतो.....आराम होत नाही काही नाही.....सगळी दूनियाभरची कामं याने आपल्या मागे लावून घेतली आहे...."... काकी

"काकी, असे काही नाही ..."....राज

"हे बरोबर म्हणते आहे आई तू.....राज जे काही काम असेल मला सांग.... आठ दिवस तू पूर्ण आराम करणार आहे......."....राहुल

"अहो, आठ दिवस राज ऑफिस ला येणार नाही....काय आहे ते तुम्ही बघून घ्या "...काको राहुल च्या बाबांना म्हणाल्या.

"हो.........राज मी हॅण्डल करतो ऑफिस....काळजी नको करू....."....काका

"भाऊजी हेच बरे राहील....तेवढाच राजचा आराम होईल....". 

"Stop pampering.......तुम्ही लोकं मला लहान बाळा सारखं का वागवत आहात.???....मला कळते सगळं..... मी म्हणालो ना ...मी ठीक आहो....."....राज आता बराच वैतागला होता, तो थोडा ओरडतच बोलला.

राजला असे चिडलेले  बघून सगळे एकदम शांत झाले.....

"काकी , तुम्ही सगळे जा....राजला आराम करू द्या...मी आहो इथे......"...राहुल

तसे सगळे तुमच्या बाहेर निघून आले......

"नंदिनीला फोन करतो.....तिच्यासोबत बोलणं झालं की तुला बरे वाटेल....."...राहुलने हातात फोन घेतला.

"Don't disturb her ....... ती कॅम्पसाठी गेलीय...."....राज

"जे कधी झाले....??...मला नाही सांगितले तिने काही???"...राहुल

" दोन दिवस आधी फोन आला होता.....मी सांगायचे विसरलो......"....राज

"तुमची फाईटिंग झाली....???.. राईट???"....राहुल

"नाही म्हणून सांगितले ना........परत परत का तेच विचारतो आहेस???? You are irritating me now....."... राज

"Okay ... मी जातोय......पण तू आराम कर...आणि काही लागलं तर मला सांग........"..... राहुल बाहेर निघून आला....

राज बऱ्याच वेळ काहीतरी विचार करत होता....औषांधांच्या असर मुळे हळू हळू त्याला झोप लागली होती.

********

त्या दिवसानंतर राज खूप शांत शांत राहायला लागला होता. घरात पण तो कोणासोबत फार बोलत नव्हता.....लग्नाच्या कामात पण तो काही इंटरेस्ट दाखवत नव्हता...त्याने स्वतःला ऑफिसच्या कामात खूप व्यस्त करून घेतले होते.....जास्तीत जास्त वेळ तो ऑफिस मध्येच घालवत होता...अशातच त्याने काही नवीन प्रोजेक्ट्स सुद्धा सुरू केले होते....

घरतल्यांना राजची बरीच काळजी लागून राहिली होती....वारंवार विचारूनही तो काहीच सांगत नव्हता...जास्तीच खोलवर जाऊन विचारले की तो चिडचिड करायला लागायचा....

नंदिनाला राजच्या तब्बेतीबद्दल काही सांगायचे म्हणून राजने सांगून ठेवले होते......त्यामुळे नंदिनीला यातले काहीच माहिती नव्हते.....फोनवर तिचे नेहमी नॉर्मल बोलणे होत होते....त्यामुळे त्या दोघांमध्ये काही बिनसले आहे ....असे पण काही लक्षात येत नव्हते....

*****

"ये बोक्या .....how are you ???"..... नंदिनी

" बोल ग गधडे....आता वेळ मिळाला तुला माझ्यासोबत बोलायला?"....राहुल

"सॉरी यार.....पण खरंच थोडी बिझी होती...... बर ऐक ना ..... राज कुठे आहे रे ???...बरेच दिवस झाले तो माझा फोन पिकप करत नाहीये??? "....नंदिनी

" हो का.....???....काम वाढली आहेत सद्ध्या त्याची....घरी पण आजकाल उशिरा येतो...."....राहुल

" यार....याचे काय करावे कळत नाही..... येवढं कोण काम करते काय???? तुझ्या आसपास असेल तर दे ना त्याला फोन....खूप आठवण येतेय त्याची...."....नंदिनी

" घरी नाही आला आहे तो अजून...."....तेवढयात राज त्याला आतमध्ये येताना दिसला...

"राज ssss....... "..... राहुलने राजला आवाज देत राजच्या हातात फोन दिला...

"कोण???"...राजने डोळ्यांनीच राहुल ला विचारले..

"बोल....."....राहुल

"हॅलो.........."...राज

" राज........ I hate you......".... नंदिनी

आज बऱ्याच दिवसांनी राजने नंदिनीचा आवाज ऐकला होता...त्याचे मन खूप भरून आले होते...

" ह्ममम......."....राज

"राज , कुठे होता तू??? किती फोन केले तुला...एक पण फोन घेत नाही आहे माझा.....??? "....नंदिनी

" कामात होतो....."...राज

" माझ्यापेक्षा पण महत्वाचं काम आले तुला??".....नंदिनी

" ह्मम.... थोडं महत्वाचं होत...."...राज

" राज....तू असा का बोलतो आहेस???? Why are behaving so rude???? मला तुझी आठवण येते आहे ना....का बोलत नाही आहे माझ्यासोबत ?? माझं काही चुकलय काय???"....नंदिनी

"नाही......".......राज

"राज.... I really miss you ......".... नंदिनी

"नंदिनी मला एक महत्वाची मीटिंग आहे ... नंतर बोलू ... बाय..."...राजने राहुल जवळ फोन दिला आणि वरती आपल्या रूम मध्ये निघून आला..

" बोला , मॅडम कधी येतंय???"...राहुल

"राहुल, राज ठीक आहे ना??? तो नीट नाही बोलला???"...नंदिनी

"अगं कामाचं प्रेशर आहे थोड.....म्हणून असेल आहे...."...राहुल.

" खरंच ना???"..नंदिनी..

"अग ...हो ग बाई....बर सांग कधी येत आहे....??? लवकर ये आता....मला खूप बोर होत आहे "....राहुल

"का रे ....??? ...रश्मी पिडत नाही काय???? ".....नंदिनी

" ती शहाणी मुलगी आहे ....तुझ्यासारखी डाम्रट नाही....."...राहुल

" हो ना ..... जा मग मी येत नाही....."...नंदिनी

" ये भाव नको खाऊ आता....खूप कामं पडली आहेत....लग्नाची......"....राहुल

" मी तेच सांगायला फोन केला होता, माझं पुढल्या आठवड्यातले तिकीट बुक झाले आहे....."....नंदिनी

" ये वॉव, ऑस्सम न्यूज दिली यार.....".... राहुल

" Yupp.....आणि दोन सरप्राइज आहेत तुम्हा सर्वांसाठी....."....नंदिनी खूप उत्साहात बोलत होती

" काय...?? काय आहे ....??'.....राहुल.

"सांगितले ना सरप्राइज आहे....आल्यावर सांगेल...."...नंदिनी

"अरे यार....मग आल्यावरच सांगायचे असते ना .....आता डोक्याला काम लावले तू..........बर एक तर सांग ...."...राहुल

" तुला ना पेशन्स म्हणून नाही ....बर एक सांगते.... एक  पेंटिंग कंपिटीशन मध्ये माझं पेंटिंग सिलेक्ट झाले आहे ....तिथे पेंटिंग एक्जीभिषण आहे......बेस्ट पेंटिंग्ज ला अवॉर्ड देणार आहेत........"....…नंदिनी

" Wow...... मस्तच ग.........चला म्हणजे तुम्ही तिथे जाऊन काहीतरी शिकला म्हणजे.......मला वाटले नुसते हिंडण्या फिरण्यातच वेळ घालवला......"....राहुल तिची मस्करी करत होता...

"आगाऊ...........कुठला.......... ओके चल खूप कामं करायची आहेत....."......नंदिनी

"दुसरं सरप्राइज???"......राहुल

"ते आल्यावर ...... मला तुम्हा सगळ्यांचे भाव बघायचे.....तुम्ही कसे रिॲक्ट कराल ते....... हे माझ्यासाठी खूप स्पेशल ....सो ते आल्यावरच......."....नंदिनी

"तुझ्या पोटात राहील इतके दिवस..???"..... राहूल

"Yess........... चल बाय ....."...नंदिनी..बोलून फिन ठेवला.

"राज ला काय झालं???? तो मला का इग्नोर करतोय???? पण तो कधीच असा नाही करत, कितीही कामात असला तरी आधी माझा कॉल पिकप करतो.....काही प्रोब्लेम तर नसेल ना?? की खरंच तो कामात आहे????......तो माझ्याकडून काही लपवत नाही ...सांगतो काही असले तर......कामातच असेल....मला तर माहितीच आहे किती काय काय प्रोजेक्ट्स करत असतो तो.....".....नंदिनी स्वतःशीच विचार करत होती.

राजचे वागणे बघून राहुलला थोडा डाऊट आला....." राजला काय झालंय??? घरात पण आजकाल नीट वागत नाही आहे, कोणाशी बोलत नाहीये....नंदिनिसोबत पण नीट बोलला नाही......तिच्यासोबत तर तो कधीच असा वागत नाही........काहीतरी आहे त्याच्या मनात सुरू......बोलायला हवे त्याचसोबत...."...विचार करतच तो राजच्या रूम मध्ये गेला.....

"राज, काय चालले आहे तुझे???? नंदिनिसोबत का नीट बोलला नाही ???"... राहुल

"मी सांगितले ना , मला मीटिंग आहे आता........".......राज

"नंदिनिपेक्षा महत्वाची कुठली कामं आलीत रे तुला...???मला पण कळू दे???? "....राहुल

" आहेत बरीच.....तुला प्रत्येक गोष्टीचे एक्स्प्लानेशन द्यावे असे मला वाटत नाही......".... राज

" राज , तू बदलतोय.....तू असा नाही आहे.......सांग काय झाले आहे.....मी लहान भाऊ असलो तरी आपण आधी फ्रेंड्स आहोत......काही प्रोब्लेम असेल तर शेअर कर....प्लीज....."... राहुल

"माझ्या काही पर्सनल गोष्टी आहेत.....so please respect my privacy....." ..... राज

राजचे बोलणे राहुलच्या मनाला खूप लागले होते....तो चुपचाप तिथून निघून आला...

"सॉरी.... राहूल......पण मी नाही सांगू शकत काही .....सगळं कळल्यावर तुम्हा सर्वांना खूप वाईट वाटणार आहे....सगळ्यांचा मूड नाही खराब करू शकत मी..... लग्नाचं वातावरण आहे घरात.....नंदिनीलाच सगळं सांगू देत.......".... .राहुलला जातांना बघून राज मनातच त्याची माफी मागत होता...

विचार करता करता त्याचे लक्ष भिंतीवर लागलेल्या त्याचा आणि नंदिनीच्या फोटोकडे गेले....त्याच्या रूम मधली एक भिंत त्याच्या पारिवारिक फोटोंनी भरली होती....त्यात नंदिनी आणि त्याचे जास्ती फोटो होते....नंदिनीचे वेगवेगळे कार्टून सारखे एक्स्प्रेशन बघून त्याच्या ओठांवर हसू उमलले....

" नंदिनी.....तुझ्या आनंदात मी खुश आहो.....तू सुखी आणि आनंदी राहावी नेहमीच हे वाटत होते....पण या हृदयाचं काय करू????कसे समजावू स्वतःला???.....तुझ्याशिवाय कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात.....माझी सगळी स्वप्न....सगळं आयुष्य तुझ्या भोवती फिरते......पण नको काळजी करू.....माझा तुला त्रास होणार नाही..... माझं प्रेम मला नाही मिळालं...ठीक आहे.... तुझं प्रेम तुला नक्कीच मिळेल....देवापुढे पण माझी हीच प्रार्थना असेल आहे........पण तुझ्यासोबत बोलणं नाही जमत आहे मला......नाही करू शकत आहो तुझ्यापुढे खुश असण्याचे नाटक......वेळ दे मला थोडा....."......राज तिच्या फोटो पुढे उभा बोलत होता......

*****
क्रमशः


 

🎭 Series Post

View all