

भाग 66
नंदिनी संध्याकाळी उशिरापर्यंत झोपली होती. औषधांमुळे थोडी गुंगी सुद्धा होती. झोपून उठल्यावर तिला आता बरेच फ्रेश वाटत होते. राज तिथेच सोफ्यावर लॅपटॉप मध्ये काहीतरी करत बसला होता. नंदिनी बेडवर उठून बसली.
" नंदिनी, काही हवे आहे काय ?? डोकं नाही ना दुखत आहे आता ??" .... राज
" हो, बरे वाटते आहे. चल मी खाली जाते, आई काकी वाट बघत असतील..." ...नंदिनी बेडवरून उठत बोलत होती.
"Wait... तू कुठेच जाणार नाही आहेस.... इथेच माझ्यापुढे आराम करायचा आहे. आई , काकी बघतील सगळं. " ..राज
" अरे , सगळं त्यांना कसे काय सांभाळल्या जाईल....माझा खूप आराम झाला आहे... मी जाते आता..." ..नंदिनी
" नंदिनी , उगाच वाद घालायचा नाही . इथे बसल्या बसल्या काय काम करायचे ते करत बस..पण या रूम च्या बाहेर पाय ठेवायचा नाही. " ... राज
" शी बाबा..... इथे किती बोर होत आहे ...." ...नंदिनी कुरकुर करत बोलत होती .
" मग सांगितले कोणी होते बाबागिरी करायला ??? किती प्रवचन दिले तू ....." ...राहुल रूम मध्ये येत बोलला...
" ये बाबागिरी काय ..... खरं काय तेच बोलत होती. तू बघितले ना रश्मीच्या.......अरे हो रश्मी कशी आहे??? म्हणाजे ठीक आहे ना??" ...नंदिनी
" हो , एकदम ठीक आहे ती. ये नंदिनी तुला माहिती आपल्या आजीसाहेब पूर्णच बदलल्या ग .." ...असे म्हणत राहुल तिला आजीसाहेबांनी सुशीला मावशीला बोललेले सगळे सांगत होता. त्याचं बोलणं ऐकतांना नंदिनी च्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला होता.
" अरे सहीच की रे ..... आपल्या आजीसाहेब आहेच ग्रेट ....." ...नंदिनी
" हो ना , आणि रश्मीला सुद्धा खूप बरं वाटलं . नाहीतर सुशीला आजीचे बोलणे ऐकून ती रडतच होती खूप... पण आजिसहेबांचे बोलणे ऐकले आणि सगळं आधीचे विसरली ती ...." ...राहुल
" हो ना रे ... किती टोचले असेल तिला त्यांचे बोलणे...." ...नंदिनी
" आणि तू ग , तू पण तशीच.... असे कोणाचे बोलणे इतके मनाला लाऊन घ्यायचे असते काय? लगेच तब्बेत खराब झाली ना तुझी ?? इथे आम्ही सगळे आहोत सांभाळायला तर ठीक आहे ....तिथे कशी करणार आहेस ??? आमच्या डोक्याला तू परत येई पर्यंत काळजी लागून राहील ना ...?? " ... राहूल
" आपल्या लोकांची बोलणं टोचत असतात रे....तिथे कोण आपले असणार आहे , ज्यांचं बोलणं मी मनावर घेणार आहे ?? नको काळजी करू माझी , मी काळजी घेईल आणि तसेही मला औषध माहिती आहेत..." ...नंदिनी
" हो, आली मोठी काळजी घेणारी ... इथे आमचा जीव टांगणीला लागतो , तुला काही कळायचे नाही ..... जाऊ दे सोड " .....राहुल
" तुम्ही करा गप्पा , मी जाते आईला मदत करायला " ...नंदिनी
" नंदिनी, मी काय बोललो होतो??? तुला कळले नाही काय?" ...राज
" अरे पण मी ठीक आहे आता ... See here, I am perfectly fine " .... नंदिनी आपले हात पाय हलवत चेक करत त्याला दाखवत होती. राहुल ला तिला बघून हसायला येत होते.
" ठीक आहेस, तरीही इथून हालायचे नाही .... " ...राज
" नंदिनी , तुला राज सोबत टाईम स्पेंड करायला नाही आवडत काय ?" .... राहूल
" आवडते, खूप आवडते " ....नंदिनी
" मग बस ना इथे .... तिकडे खाली काम करायला भरपूर लोकं आहेत.... इथे बस, गप्पा कर त्याच्यासोबत , माझ्यासोबत.... दोन दिवसांनी जाणार आहेस तू ..... " .... राहूल
" ते तर आहे , पण तिकडे पाहुण्यांना काय वाटणार.... " ..नंदिनी
" काही वाटणार नाही... आणि वाटते आहे तर वाटू दे .....तसे पण आतापर्यंत मी त्यांच्यासोबतच होतो.... खूप पिडले यार सगळ्यांनी मला..... कसातरी आलोय इकडे ...."..राहुल.
दोघेही बेडवर पालखट घालून गप्पा करण्यात बिझी झाले. राज बसल्या बसल्या नंदिनीला बघत होता. थोड्या वेळात राहुल काहीतरी बहाणा करत तिथून निसटला होता. आता नंदिनी आणि राज गप्पा करत बसले होते.
साखरपुड्याला काय घालायचे विचारत नंदिनिने खूप पसारा काढून ठेवला होता. तिचे आपले आरसा पुढे दागिने , ओढणी वैगरे घेत मटकने सुरू होते. राज तिचे एक एक एक्स्प्रेशन टिपत बसला होता.
नंदिनीला नॉर्मल झालेले बघून राजला आता बरे वाटत होते. त्याने त्यांच्यासाठी वरतीच जेवण मागाऊन घेतले होते. आई काकी सोबत थोडेफार बोलून घेत नंदिनी तिच्या रूम मध्ये जाऊन झोपली. राज एक दोनदा तिच्या रूम मध्ये तिला बघून आला होता. झोपेत ती बरीच चुळबुळ करत होती. म्हणून राज तिथेच तिच्या रूम मधल्या सोफ्यावर जाऊन झोपला होता.
आज साखरपुडा असल्यामुळे नंदिनीला सकाळी लवकरच जाग आली. डोळे उघडून बघते तर समोर सोफ्यावर राज झोपलेला होता... सकाळी सकाळी उठल्याबरोबर त्याचा चेहरा बघून नंदिनीला खूप आनंद झाला होता. ती तशीच झोपल्या झोपल्या बऱ्याच वेळ त्याला न्याहाळत होती. त्याने चुळबुळ केली तशी ती भानावर येत उठून बसली. त्याच्या जवळ जात खाली टोंगळ्यांवर बसली नी एकटक त्याच्याकडे बघत होती.
" कसला क्यूट दिसतोय .... रोज अशीच सकाळ झाली तर ......." .... तिच्या डोक्यात एक गोड विचार येऊन गेला... आणि ती स्वतःच हसली. हळूच त्याच्या अंगावरचे पांघरून नीट केले, आणि त्याच्या केसांमध्ये हात घालत त्याचे विसकटलेले केस आणखीच विस्कटवले.....तिच्या झालेल्या स्पर्शाने झोपेतच त्याच्या ओठांवर गोड हसू पसरले...त्याला झोपेत हसतांना बघून तिला त्याची खूप गम्मत वाटली.
नंदिनी ने आपले सगळे आवरून घेत खाली मदतीला गेली. काल आजीसाहेबांनी सगळ्यांना ठणकावून सांगितल्यामुळे कोणीच आदल्या दिवशीचे कुठलेच विषय काढले नव्हते. नंदिनी पण सगळे विसरून सगळ्यांच्या आवभगतीमध्ये लागली होती. आज संध्याकाळी साखरपुडा होता. जेवण वैगरे सगळं लवकर आटोपून सगळे साखरपुडा साठी तयारीला लागले.
******
" राज मी क ss ......... शी ..दी........".... नंदिनी तयार होऊन पळतच राज च्या रूम मध्ये कशी दिसतेय आहे विचारायला म्हणून आली होती, पण समोर राजला बघून तिची बोलतीच बंद झाली होती. ती जागीच स्तब्ध उभी होत राजला बघत होती. तो दिसत सुद्धा तसाच होता....की त्याच्यावरून कोणाची नजर हटणार नाही . राज आरसा समोर उभा तयारी करत होता.

राजने स्लिम फिट ब्लॅक शर्ट , ब्लॅक ब्लेझर , ग्रे कलर ट्राउजर , ब्लॅक शूज , हातात ब्लाकिष सिल्व्हर बेल्ट चे घड्याळ ....केस जेल ने परफेक्टली सेट केलेले , ओठांवर हसू, गालांवर गोड खळी.....बघताक्षणी कोणीही प्रेमात पडावे असा तो दिसत होता.
नंदिनीच्या आवाजाने राजने दाराकडे बघितले ..... तिला बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला ,इतकी सुंदर ती दिसत होती.

नंदिनी ने सिंपल क्रिमिश व्हाइट कलरचा मोती आणि स्टोन चा हेवी वर्क असलेला लेहांगा , सेम ब्लाऊज , सेम स्टोन वर्क केलेली ओढणी एका खांद्यावरून घेतली होती, एका हातात डायमंड ब्रेसलेट , एका हातात कडे, कानात मोती स्टोन कॉम्बिनेशन चे मोठे कानातले , गळ्यात तिची नेहमीची पाच काळे मनी आणि मोती ची नाजूक चेन , केसांची फ्रेंच कनॉट , डोळ्यात काजळ, ओठांवर लाईट शेड लिपस्टिक , आणि कपाळावर छोटीशी लाल चुटुक टिकली ..... खूप गोड अशी सुंदर ती दिसत होती.
दोघेही एकमेकांना बघण्यात हरवले होते.
" कधीचे आवाज देतोय , कुठे हरवलात ......" राहुल खोकतच राजच्या रूम मध्ये आला होता. बाहेरून दोन तीनदा आवाज देऊनही राज नंदिनी ला ऐकू गेले नव्हते, शेवटी त्याला आतमध्ये यावे लागले होते.
राहुलच्या आवाजाने दोघेही भानावर आले ..... आणि नजर चोरत इकडे तिकडे बघू लागले.
" चला आता, किती वेळ करत आहात.....सगळे पुढे गेले सुद्धा... आपण तिघेच आहोत ....." ...राहुल
" हो ना , तुला खूप घाई झाली असेल ना ....." ....नंदिनी
" अरे मग काय इथे बसून तुम्हा दोघांना बघू काय.....चला माझी रश्मी वाट बघत असेल ....माझी " ...राहुल
" किती घाई करतोस रे...... कार्यक्रमासाठी अजून दोन तास आहेत....माझं थोड महत्वाचं काम राहिले आहे ...." ...नंदिनी
" तुझं काय महत्वाचं काम असते ग ..?? तुझं महत्वाचा माणूस इथे आहे ... तुम्ही इथे हे जे महत्वाचे काम करत होता ना, तो तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा करू शकता ..... चला यार लवकर लवकर ....." ...राहुल
" जरा धीर धर........" ....नंदिनी
" राज, सांग यार हिला...... नंदिनी तुझी पण वेळ येणार आहे अशी....तेव्हा बघतो मग.... I will take Revenge .... " .... राहूल
" मी नाही अशी तुझ्यासारखी एवढी उतावीळ होणार आहे .... " नंदिनी
" बघू बघू , सबका टाईम आता है ......" .. राहूल
" अरे ....काय परत सुरू झालाय तुम्ही दोघं....राहुल उशीर होतोय ना ... चला आता ....." ..राज
" बघूच............सद्ध्या तर तू शांतच रहा....रश्मी अपने म्हणणेमे है......" नंदिनी
" राजsss........" ...राहुल
" राजsss ......" नंदिनी
दोघंही थांबायचं नाव नाही घेत आहेत बघून राजने नंदिनीचा एक हात पकडला आणि तिला सोबत पुढे घेऊन जाऊ लागला.
" Eye on you ....." .. नंदिनी चालता चालता मागे वळत राहुलकडे बघत आपल्या हाताची दोन बोटं त्याच्या डोळ्यांपुढे धरत बोलली. राहुलने सुद्धा तिला बघून सेम अँक्शन केली.
******
सगळे हॉटेलमध्ये पोहचले होते. रश्मीचे आईवडील आणि काही नातेवाईक राहुल आणि परिवाराचे स्वागत करण्यासाठी मेन गेट ला उभे होते . स्वागत समारोह आटोपून सगळे आतमध्ये गेले. आतमध्ये फुलं लायटिंग ची खूप छान तयारी केली होती. सगळे आपापल्या स्थानी आसनग्रह झाले. राहुलची नजर मात्र रश्मीला शोधत होती. नंदिनी सुद्धा लपुनछपून राजला बघत होती. राज सुद्धा गेस्ट सोबत बोलत अधूनमधून नंदिनिकडे बघत होता.... नजरानजर झाली की नंदिनी लगेच नजर चोरून घ्यायची. तिला तसे करतांना बघून त्याला हसू यायचे...आता त्यांचा हा असाच नजरानजर चा खेळ सुरू होता .
पारंपरिक पद्धतीने साखरपुड्याचे विधी पार पडल्या. रश्मीने आजिसहेबांनी दिलेली साडी घातली होती, राहुलने सुद्धा कुर्ता पायजमा घातला होता. नंतर रिंग सेरेमनी , एकेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी राहुल आणि रश्मी दोघेही कपडे बदलून आले. यावेळी मात्र दोघांनीही एकेकांना मॅचींग कलर घातले होते .
दोघांनीही जांभळ्या शेड मध्ये मॅचींग केलं होते. राहुल ने थ्री पीस सुट तर रश्मीने लेहांगा घातला होता. दोघेपण एकमेकांना कम्पलिमेंट करत होते.


" फायनली , तू सेम कलर घालायला तयार झाला तर ?" ...नंदिनी
" हो....प्रेम आहे ...मन कसे तोडणार ना तिचे .तिला या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळत असेल तर मी अश्या कितीही गोष्टी करू शकतो...."...राहुल
" ह्मम.....प्रेमात पडलात तर राव ....." ...नंदिनी
" इतक्या गोड मुलीच्या कोण प्रेमात नाही पडणार......" ...राहुल खूप ब्लश करत होता.
" सही यार...... प्रेमात माणूस आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीसाठी काहीपण करू शकतो ना....?" ...नंदिनी
" Yess.......anything....anywhere .... anytime ..." .... राहुल
" Cool......खूप छान आहे ना हे फिलिंग.....आपल्यासाठी कोणी काहीपण करू शकते ......" ... नंदिनी
" ह्मम , तू पडली ना प्रेमात की कळेल तुला.......लवकरच घडू दे तुझ्यासोबत हे सगळं......"....राहुल
" माझं होईल तेव्हा बघू...तुलाच विचारेल.....आता जा तिकडे, रश्मी आली आहे .... वाट बघतेय तुझी...." ....नंदिनी
" ह्मम, तू पण जा तिकडे.... राज वाट बघतोय तुझी......." ... राहूल
" हां .......?" ...नंदिनी
" राज तुला ..........." राहुल पुढे काही बोलणार तेवढयात त्याला स्टेज वर येण्यासाठी कोणीतरी आवाज दिला ......
" तो वाट बघतोय तुझी ......." ...राहुल राजकडे इशारा करत तिच्या डोक्यावर मायेने थोपटत स्टेज वर गेला... नंदिनी पण राज जवळ येत उभी राहिली.
राहुलने सगळ्यांसमोर त्याच्या खोडकर अंदाजमध्ये रश्मीला प्रपोज केले.... रश्मीने सुद्धा लाजतच त्याचे प्रपोजल मान्य केले. टाळ्यांच्या गडगडाटात आणि फुलांच्या वर्षावात दोघांनीही एकमेकांना अंगठी घातल्या..
त्या दोघांना बघून नंदिनी जोरजोराने टाळ्या वाजवत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता....राज तर त्या दोघांना सोडून बाजूला उभ्या असलेल्या नंदिनिकडेच बघत होता.
" कसली गोड दिसत आहेत ना दोघं......" ...नंदिनी
" हो , खूप गोड दिसत आहे " .....राज नंदिनीला बघत बोलला.
" खूपच सुंदर आहे हे सगळं.....किती खुश दिसत आहेत ना दोघंही......."नंदिनी
" हो ......" ... राज
" राज , माझी पण एंगेजमेंट अशीच होईल ना ........ ??" ... नंदिनी कुतूहलाने राजकडे बघत होती. ते सगळं बघून तिला पण खूप गम्मत वाटत होती. हवेहवेसे वाटणारे ते वातावरण होते...
" तुला आवडले हे ??" .... राज
" हो ....खूप........" .....नंदिनी
" करूया असच.........." ..राज
" खरंच ......??" ....नंदिनी
" हो ...... तुला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली की सांग मला ........ सगळं असेच अरेंज करूया.." ...राज
" तो मुलगा पण असा राहुल सारखाच माझ्या पुढे टोंगळ्यावर येऊन बसेल....???... आणि मला प्रपोज करेल ?? , इतकाच प्रेम करेल ??? " .... नंदिनी
" हो ....." ....राज
" खरंच ......??? इतकं प्रेम करेल कोणी मला ?" ....नंदिनी
" प्रेमच काय, तो तुझ्यावर त्याचा जीव सुद्धा ओवाळून टाकेल , इतकी गोड आहेस तू " ....राज तिच्या गालावर एका हाताने थोपटत बोलला.
"खरंच ??" ... नंदिनी तिच्या गालावरचा तिचा हात आपल्या हातात पकडत त्याच्या कडे बघत होती.
" हो ......" ...राज , नंदिनी ने साईड ने त्याच्या कांबरेमध्ये हात घालत त्याच्या कुशीत जात त्याला हग केले..... त्याने पण तिला एका हाताने जवळ घेतले, आणि तिच्या डोक्यावर किस करणार की त्याची नजर आजूबाजूला गेली तर त्याचे कझिंस , काही गेस्ट त्याला त्यांच्याकडे बघत असल्याचे जाणवले....त्यांना तसे बघतांना बघून त्याला अवघडल्यासारखे आणि लाजल्यासारखे झाले , नंदिनीच्या खांद्यावरून हात बाजूला करत त्याने त्याचा तिच्या केसांवर किस करण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला....राजला असे दूर झालेले बघून नंदिनीला थोड वेगळे वाटले आणि ती पण त्याच्यापासून दूर होत उभी राहिली.
" असं का दूर केले राजने मला??? कधीच तर असे करत नाही हा ....का दूर झाला माझ्या जवळऊन ?" .... राहुल रश्मीचे फोटोशूट बघत नंदिनी विचार करत होती.
" Raj , control yourself ..... सगळे आहेत इथे..... " ...राज आजूबाजूला बघत स्वतःच विचार करत होता.
राहूल रश्मी चे फोटोशूट आटोपले होते. नंतर परिवारासोबत पण छान छान फोटो क्लिक झाली होते. नंदिनी सगळ्यांसोबत सेल्फिज काढल्या होत्या. रश्मी आणि रूचीच्या मैत्रिणी राहुलची खूप खेचाई करत होत्या. राहुल पण त्यांना गमतीशीर उत्तर देत आपल्या साळ्यांना हसवत होता. जास्तीत जास्त मुलींची नजर मात्र राजवरच होती.
सगळेच खूप आनंदी होते. मोठी लोकं आपल्या गप्पांमध्ये रमली होती, पुढल्या गोष्टींचे प्लॅनिंग करत होते. तेवढयात कपल डान्स साठी अंनाउन्समेंट झाली .
सगळे कपल डान्स साठी जॉईन झालेत . आणि सेंटर ऑफ अट्ट्रॅक्शन होते रश्मी राहुल ... रश्मी आणि राहुल एकमेकांत हरवून डान्स करत होते. राज नंदिनी साईड ला उभे त्यांना बघत एन्जॉय करत होते. बाकी सगळे सुद्धा बाजूला उभे संगीत आणि डान्सचा आस्वाद घेत होते. डान्स करता करता रश्मीचे लक्ष राज नंदिनिकडे गेले...
" राहूल , एक मिनिट .....आलेच " ....म्हणत रश्मी पळतच राज नंदिनी जवळ आली , आणि दोघांचेही हात पकडत त्यांना स्टेज वर घेऊन येत होती. ते बघत राहुल ने dj वाल्याला काही इशारा केला आणि साँग बदलले. खूप सॉफ्ट आणि स्वीट असे गाणे सुरू झाले.
रश्मीने दोघांनाही हात पकडत मधोमध आणून उभे केले... आणि ती परत राहुलकडे गेली. राज नंदिनी दोघेही एकमेकांकडे बघत उभे होते. राजला बघता बघता तिची नजर बाजूला गेली तर त्या कालच्याच मुली नंदिनिकडे बघत होत्या , आणि तिला त्या तिच्या बद्दल बोलत होत्या ते आठवले , तिला तो शब्द आठवला ' पागल ' , ' नंदिनिमुळे राजला किती त्रास झाला.' ..... आणि क्षणार्धात तिचा चेहऱ्यावरचा उत्साह आनंद मावळला होता.
" नंदिनी का नाराज वाटते आहे??? आतापर्यंत तर खुश होती ..." ..राज तिच्या डोळ्यात बघत विचार करत होता. तिच्या डोळ्यात त्याला उदासी दिसत होती.
आता सगळ्यांच्या नजरा राज नंदिनिवर स्थिरावल्या होत्या... त्या दोघांना स्टेज वर बघून टाळ्यांचा गडगडाट झाला आणि सगळे लाइट्स ऑफ झाले ... एक लाईट चा फोकस राजनंदिनिवर पडला....
सगळ्यांच्या नजरा आपल्यावर आहे बघत , राज नंदिनिजवळ गेला..
" May I ....." ..म्हणत त्याने आपला एक हात तिच्यापुढे केला...नी ती तिचा हात देईल याची वाट बघत उभा होता...
नंदिनीला वारंवार तो शब्द ' पागल ' आठवत होता . तो ऐकून तिला खूप वाईट वाटले होते. सगळ्यांसमोर नाराजी नको दिसायला म्हणून तिने एकदा आजूबाजूला बघितले आणि राजच्या हातात हात दिला.....आणि दोघांचा डान्स मूव्हज सुरू झाल्या.
( रुस्तम सिनेमाचे साँग आहे, खूप छान आहे )
देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ आप में बात ऐसी है
लेकर इजाज़त अब आप से
सांसें ये आती जाती है
ढूंढें से मिलते नहीं हैं हम
बस आप ही आप बाकी हैं
डान्स करता करता स्टेप चेंज झाली आणि पार्टनर चेंज झाले....नंदिनी राहुलकडे गेली होती आणि रश्मी राजकडे....
" दादा , नंदिनीला तुमचं प्रेम कळणार की नाही , माहिती नाही किंवा खूप वेळ सुद्धा लागेल.....तुम्ही तुमच्या मनातले तिला सांगा ....." ..रश्मी , राज सोबत डान्स करत बोलत होती.
" I will wait Rashmi ....... " ... राज
" पण दादा , कधी पर्यंत ??? नाही आवडत आहे बघायला तुमचा त्रास ..... " ....रश्मी
" नक्कीच सांगेल मी तिला माझ्या मनातल्या भावना.... योग्य वेळ आली की ...' I will tell her that I love her a lot' . Don't worry ..... I am Happy ..... You two looks very awesome together......." ... राज , बोलता बोलता परत स्टेप चेंज झाली आणि परत रश्मी राहुल कडे गेली आणि नंदिनी राजच्या जवळ आली.
देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ आप में बात ऐसी है
पल भर ना दूरी सहें आप से
बेताबियां ये कुछ और हैं
हम दूर होक भी पास हैं
नजदीकियां ये कुछ और हैं
देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ आप में बात ऐसी है
नंदिनी आणि राज एकमेकांच्या डोळ्यात बघत डान्स करत होते. नंदिनीला मघाशी राजने अचानक तिला त्याच्या मिठीतुन दूर केलेले आणि त्या मुलींचा ' पागल ' शब्द आठवत होता.
" काय झाले??? अचानक का अशी उदास झाली ?" .... राज
" काही नाही " ....नंदिनी
" Don't lie , I can read your eyes..,." .... राज
" मग वाच ना , तुला वाचता येतात तर कारण सुद्धा वाच " ...नंदिनी त्याच्यावरून नजर बाजूला करत बोलली .
" Nandini , look at me ..... मी विचारतोय तुला काहीतरी ..... बोल ना प्लीज " .....राज
" राज , मी आधी पागल होते ना ....??? माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे ना .....?" ....नंदिनी
" काय??? कोण म्हणाले ?? नंदिनी असही कोणी काही बोलेल आणि तू विश्वास ठेवणार आहेस काय???" ...राज
" मला माहिती आहे, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो. म्हणूनच मघाशी तू मला स्वतःपासून दूर केले होते ना?? " ....नंदिनी
नंदिनीच्या बोलण्याने त्याला तिच्या नाराजीचे कारण समजले होते, ती त्याच्या कुशीत आली होती, तो तिला जवळ घेत तिच्या डोक्यावर किस करणार होताच की आजूबाजूचे त्यांच्याकडे बघत आहे लक्षात घेऊन तो तिच्या दूर झाला होता. नंदिनीच्या मनाला त्याचं हे वागणं इतके लागेल याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती .
" मला माहिती आहे, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो. म्हणूनच मघाशी तू मला स्वतःपासून दूर केले होते ना?? " ....नंदिनी
तिचे ' तू मला स्वतःपासून दूर केले ' हे वाक्य त्याच्या मनाला भिडले होते..... आपला आता तिच्या कंबरेवर ठेवत तिला जोरातच स्वतःकडे ओढले होते.तिच्या नाजुक कंबरेला झालेला त्याचा गरम हातांचा स्पर्श होताच तिच्या अंगावर तिला रोमांच उठल्या सारखे झाले होते, हृदयाची धडधड वाढली . तिला काहीतरी फील होईल असाच स्पर्श त्याने मुद्दाम तिला केला होता.... तो फक्त तिच्यासाठी आहे, तिच्याच जवळ आहे हे त्याला तिला सांगायचे होते....आणि त्याने आता डान्स मधले सगळे रोमँटिक मुव्हज करायला सुरुवात केली . ती तर फक्त तो तिला नाचवत होता तशी नाचत होती, बाकी सगळ्या स्टेप्स तोच करत होता . त्याच्या प्रत्येक स्पर्शाने ती रोमांचित होत होती . ती भांबावलेल्या नजरेने त्याला बघत होती , आज तिला तो वेगळाच भासत होता. तो खूप पॅशनेटली डान्स करत होता. आता सगळेच बाजूला झाले होते . फक्त राज आणि नंदिनी डान्स करत होते. सगळीकडे अंधार होता, फक्त या दोघांवर लाइट्स होते.
आगोश में है जो आपकी
ऐसा सुकून और पायें कहाँ
आँखें हमें ये रास आ गयी
अब हम यहाँ से जायें कहाँ
देखा हज़ारों दफ़ा आपको
फिर बेक़रारी कैसी है
संभाले संभलता नहीं ये दिल
कुछ प्यार में बात ऐसी है हम्म..
फिर बेक़रारी कैसी है हम्म..
कुछ प्यार में बात ऐसी है
बऱ्याच वेळ दोघांचा डान्स सुरू होता . त्याने एक मुव घेतला आणि नंदिनी त्याचा दूर गेली, तिचा हात पकडत तिला गोल फिरवत स्वतःकडे ओढले. नंदिनी आता बरीच थकली होती , गोल फिरताना तिचा तोल गेला आणि ती त्याच्या छातीवर जाऊन जोरदार आपटली . जशी नंदिनी त्याच्यावर आपटली , राहुलने एक इशारा केला आणि त्यांच्यावर असलेला लाईट ऑफ झाला. आणि आता तिथे हॉल मध्ये मंद मंद असे लाईट सुरू होते. सगळं वातावरण एकदम शांत झाले होते. येवढ्या डोळे दिपवून टाकणारा डान्स झाला होता.
नंदिनी गोल गोल फिरत राजवर आपटली होती , त्याच्या शर्टच्या वरच्या दोन बटण ओपन असल्यामुळे नकळतपणे तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या कॉलर बोनला झाला .... तो पण थकला तर होताच, पण तिच्या मऊशार ओठांचा स्पर्श त्याच्या मनावर हळूवार फुंकर मारून गेला. त्याचे मन आता शांत झाले होते. तिच्या मान आणि डोक्यामागुन त्याने आपल्या हातांचा वेढा घट्ट केला... त्यामुळे ती त्याच्या आणखीच खूप जवळ होती ..तिच्या झालेल्या स्पर्शाने त्याचे डोळे आपोआप मिटल्या गेले होते, तो तिला , तिचा स्पर्श, तिचा गंध अनुभवत होता .
थोड्या वेळाने सगळे लाइट्स लागले. ते बघून नंदिनी त्याच्यापासून दूर व्हायला गेली. ती मिठीतुन दूर होण्याचा प्रयत्न करते आहे बघून त्याने त्याची मिठी आणखीच घट्ट केली .
" परत कधी असे नको म्हणू की ' मी तुला दूर करतोय, तुझ्यामुळे मला त्रास होतोय ' ..... तू माझ्याजवळ कधीही येऊ शकते , अगदी कधीही केव्हाही ......तुझ्यामुळे मला कधीच कुठलाच त्रास झालेला नाही आहे ... I will never ever leave you ..... " ....त्याने सगळ्यांसमोर तिच्या डोक्यावर किस केले आणि तिच्या भोवतीची आपली मिठी सैल केली. तशी ती त्याच्याकडे बघत त्याच्यापासून दूर होत बाजूला झाली .....
त्या दोघांचा डान्स इतका सुन्दर झाला होता की सगळे मंत्रमुग्ध होत त्यांना बघत होते. जसा लाईट लागला तसे सगळे टाळ्या वाजवत होते. राजने हसून सगळ्यांचे धन्यवाद केले आणि तिथून बाजूला होत गायब झाला.
*****
क्रमशः