Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 65

Read Later
नंदिनी...श्वास माझा 65

भाग 65

" सुंदर दिसते आहे ना नंदिनी ....." ...

" हो, खूप ...."

" येलो ग्रीन कॉम्बिनेशन खूप खुलतोय ना ??" ...

" हो, बेस्ट दिसतोय हा ड्रेस ..." ...

" दृष्ट लावशील काय ?? ...

" हो ना, तसेच वाटते आहे , माझीच दृष्ट लागेल की काय...."

" कॉलेज गर्ल दिसतेय ना ??"

" हो ना ,  कॉलेज मध्ये असल्यासारखेच वाटते आहे , जुने दिवस आठवत आहेत . अशीच सलवार कुर्ता, वेणी , गजरा लावून घरभर फिरत अस्याची ." ...

" किती मस्त वाटते आहे नाही, आपल्याच बायकोवर लाईन मारताना?? .....  "

" इतकी गोड सुंदर मुलगी डोळ्यांसमोर  असेल तर ...तिच्यावरून नजर कशी काय हटणार...."

"  लपून का बघतोय ?....

" मग काय करू.....तिला कळले तर ?" ...

" तू असाच पेपरच्या मागून बघत असलास तर तिला आता थोड्या वेळात कळेलच.., पेपर सरळ पकड  " ..... काकी

" काय....?." .....राज हातात असलेला पेपर बघत दचकला... बाजूला बघतो तर काकी उभी होती.

" काकी , तू  इथे ??? इथे काय करत आहेत ??" ...राज

" तेच मी विचारत आहे तू इथे काय करतोय ??' ..काकी त्याची मस्करी करत होत्या...

" मी .....मी ....ते .....ते आपलं ....." ..., तो लाजतच  अडखळत बोलत होता...राजची चोरी पकडल्या गेली होती....राज एका कॉर्नर मध्ये उभा पेपरच्या मागे आपला चेहरा लपवत समोर काम करत असलेल्या नंदिनीला बघत उभा होता.  तो तिला बघण्यात इतका गुंतला होता की तो काकिंसोबत बोलत आहे त्याला कळले सुद्धा नव्हते. त्याला तिथे नंदिनीला लपुनछपून बघतांना बघत काकी तिथे आल्या होत्या,  काकिंनी त्याची चोरी पकडली होती.

"  कधीचा असे बघतोय लपून छपून  तिला ...  तुझीच बायको आहे ना ... ..... बुद्धू ......" ...काकी त्याच्या डोक्यात हात घालत त्याचे केस विस्कटत बोलल्या.

" काकी , बघ ना फक्त चार दिवस राहिलेत , परवा एंगेजमेंट, त्यानंतर दोन दिवसांनी ती जाणार आहे ......." ...राज

" बघा बघा ... लायसेन्स आहे तुमच्या जवळ त्या मॅडमला बघायचे.....तसे बरेच काही करायचे सुद्धा आहे बरं का लायसेन्स ...... तुम्ही आपल्या अधिकाराचा वापर नाही करत आहात ..." ...काकी

" काकी , काय ग तू ....." ... काकीचे बोलणे ऐकून राजला लाजल्यासारखे झाले होते..

" लाजाळू  ग माझं लेकरु ........करा काँटिन्यू ....." ...काकी बोलून निघून गेली...राज तिथेच कॉर्नर ला उभा नंदिनीला बघत होता.

नंदिनी ने आज येलो ग्रीन कॉम्बिनेशनचा सलवार सूट घातला होता, कानात मोठे झुमके, हातात मॅचींग एक दिड डझन बांगड्या , पायात छुम छुम पैंजण ,  डोळ्यात काजळ, ओठांवर फक्त लीप बाम, कपाळावर चंद्रकोर , केसांची सागरचोटी आणि त्यात माळलेला जाई जुई चा गजरा.....अगदी तिची मेमरी जायच्या आधी जशी तयार व्हायची, तशीच तयार झाली होती , राज ला त्याची आधीची नंदू आठवत होती ....   तिच्या खणखणनाऱ्या बांगड्या,  ऋणझुनंनारे पैजणचे सुमधुर संगीत,  वातावरण खूपच मोहक झाले होते ...राज मंत्रमुग्ध होत तिला बघत होता.

******

" नंदिनी , रश्मीला बोलाऊन घ्या  थोड्या वेळासाठी , साठेकाका येणार आहेत काही पारंपरिक सोन्या चांदीच्या जरी असलेल्या साडी  घेऊन, त्यांच्या  आवडीने काही साड्या  घेऊया.." ... आजीसाहेब

" हो आजीसाहेब , आताच फोन करते तिला " ....नंदिनी

" बाकी कामं आटोपली काय??? पाहुण्यांची सोय नीट केली आहे ?? ती सुशी  भारी कुरकुरी आहे " ..... आजीसाहेब

" शालू कोण??" .....नंदिनी

" सांगितले ना त्यांनी, कुरकुरी आहे ........कोण असेल ओळख बरे ???" ....आबा

आबांचे बोलणे ऐकून निती आणि रागिणी ला हसायला येत होते. त्या तोंड दाबत हसत होत्या. आजीसाहेब आबांकडे डोळे मोठे करत बघत होत्या. त्यांना हसतांना बघून नंदिनीला थोडा डाऊट आला की नक्कीच कोणीतरी आजीसहेबांच्या नात्यातले आहे . तिने राजकडे ' कोण आहे ' डोळे उंचावत विचारले....त्याने तिला इशर्यानेच काही सांगितले पण तिला काही कळले नाही.

" आमच्या साळीसाहेबा आहेत.... तुमच्या आजीसहेबांचे च व्हर्जन ....." .....आबा
ते ऐकून नंदिनी खुदकन हसायला लागली.

" बस , पुरे पुरे.....कामाला लागा... आणि रश्मीला तेवढे बोलाऊन घ्या वेळेत..." .. आजीसाहेब

सगळ्यांनी माना हलवल्या , आणि आपापल्या कामाला निघून गेले.

******

घरात साखरपुड्याची तयारी सुरू होती. नंदिनी ने आपल्या आवडीप्रमाणे घर फुलांनी, छोट्या छोट्या आरस्यांनी  सजवून घेतले होते. घरात लोकांची ये जा वाढली होती. पाहुणे यायचे सुरू झाले होते. गेस्ट रूम, बाहेर गेस्ट हाऊस मध्ये पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. काही जवळच्या नातेवाईकांची घरीच राहण्याची सोय केली होती तर बाकी नातेवाईकांची हॉटेल मध्ये सोय करण्यात आली होती .  नंदिनी जातीने सगळ्यामध्ये लक्ष घालत होती.

राजने सुद्धा पाच दिवसापासून आपले सगळे काम बाजूला ठेवले होते ,  ऑफिसमधून सुट्ट्या घेतल्या होत्या , त्याला पूर्ण वेळ नंदिनिसोबत घालवायचा होता.

नंदिनीने  आजीसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे रश्मीला फोन करून बोलावले होते.
 

" अहो दादा , लवकर लवकर काम करा...." ...नंदिनी बोलत काही इंस्ट्रक्शन्स देत पळत पळत वरती येतच होती की ती राजला जाऊन धडकली...ती पडणारच होती की राजने तिला पकडुन घेतले होते ...

" नंदिनी, अग हळू ..... किती धावपळ करते आहे, थोडे कमीजास्त झाले तर काही होत नाही "  .....राज

" कमीजास्त तर काही झालेच नाही पाहिजे, बघितले ना त्या सुशीला आजी , थोडेसे काही दिसले ना राहिलेले तर दहा गोष्टी ऐकवतील ..... चल सोड मला, जाऊ दे , खूप कामं आहेत करायची ..." ...नंदिनी

" सुशीला आजींचे टेन्शन घेतले काय .... सोड ग ते ,त्यांचा तो स्वभावच आहे , त्यांचे बोलणे इतके मनावर नको घेऊ.  बरं मी तुलाच शोधत होतो , पायाला भिंगरी लागल्यासारखी इकडे तिकडे पळत आहे...दिसतच नव्हती " ....राज

" का शोधत होता ....?? काही काम होते काय ?? " ....नंदिनी

" ह्मम , इकडे ये ......" ..राज तिचा हात पकडतच तिला आपल्या रूममध्ये घेऊन आला ...

" राज , अरे ..... जाऊ दे ना ....खरंच खूप कामं आहेत रे ...." ...नंदिनी

" अग हो , कर ते ....आधी थोडे खाऊन घे , तू सकाळी नाश्ता सुद्धा केलेला नाही आहे ......" ...राज पुरी भाजीचा घास तिच्या पुढे धरत बोलला. त्याला तसे बघून तिच्या ओठांवर गोड हसू आले.

" खूप काळजी करतो तू माझी....तू पण नाही ना  खाल्लेले काही ....." ... म्हणतच तिने त्याचा हात पकडला आणि तिने तो घास त्याला भरवला...

" किती काळजी करशील माझी, स्वतःकडे पण लक्ष देत जा ना थोडे...." नंदिनी ने गुलाबजाम चा एक चमचा घास त्याच्यापुढे धरला..

" स्वतःची काय काळजी घ्यायची, कुणीतरी काळजी घेणारी हवी ना....." ...राज तिच्या हाथून घास खात बोलत होता..

"हो ना ... मग शोध आपली काळजी घेणारी ....." ..नंदिनी

" खरंच शोधू ??" ....राज

" हो ..... " ..... तिने परत एक पुरिभाजीचा घास खाऊ घातला.

" पण मग ती अशी खाऊ घालेल काय??  " ....राज

" का नाही खाऊ घालणार..... तुझ्यावर प्रेम करेल तर खाऊ घालणार च ना ...." ...नंदिनी

" मी आवडेल तिला ....??" ...राज

" का नाही आवडणार....?? You are the best person on this earth..... असे कोणी आहेच नाही जिला तू आवडणार नाही " .... नंदिनी त्याला एक एक घास खाऊ घालत होती.

" पण तरीही काही कारणाने तिने मला नाकारले तर ?? " ...राज

" तुला कोणी नाकारू शकत नाही.... तू सांगून तर बघ " ...नंदिनी

" आणि ती नाही म्हणाली तर ..... ??.." ...राज

" ती पागल असेल मग.....मला सांग, तिचा कान पकडून घेऊन येईल तुझ्यापुढे......." ...नंदिनी

" मी तुला खायला घेऊन आलो होतो, तू मलाच सगळं भरवले ...." ...राज

" चालतंय रे .... कधीतरी चांस मिळतो तुझा लोभ करायचा .....आणि मी ठीक आहे , मी ज्यूस पिले होते . " ....नंदिनी

" मोठी झालीस ग चिमणे "...... राज

" हा मग ....तू पण कधीतरी लहान होत जा ना ..... का सगळ्या जबाबदाऱ्या स्वतः वर घेतल्या आहेस???....का सतत सगळ्यांची काळजी करत असतो,?? दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगत असतो??? .... कधीतरी स्वतः साठी जगुन बघ ना .... आवडेल आम्हा सगळ्यांना ......"  नंदिनी

" हो रे सोन्या.... मला आवडते हे सगळं करायला .... तुमच्या सगळ्यांच्या आनंदात मी आनंदी असतो..... आणि तू अशी मोठी अजिबात छान नाही वाटत....अशी मोठी नको होत जाऊ बाबा ,  मला तू माझी छोटी परीराणीच आवडते .." .... राजने तिच्यापुढे तिच्या आवडीचे मोठे चॉकलेट धरले...

" Wow , it's my favorite ".... चॉकलेट बघून तिला खूप आनंद झाला,  तिने लगेच त्याच्या हातातून चॉकलेट घेतले नि त्याचे रॅपर काढले सुद्धा . त्यातले छोटे पिस तोडत राजला ला भरवले , आणि बाकी ती खात होती.

" नंदिनी....... अगं कुठे गायब झाली " ..... खालून काकींचा आवाज आला.

" आले......... " ...नंदिनी चॉकलेट खात खात बाहेर जात होती. राज हात फोल्ड करून  खिडकीला टेकून उभा तिला बघत होता. नंदिनी दारापर्यंत पोहचली आणि काहीतरी आठवत परत फिरली आणि पळतच राजजवळ आली..

" तू खूप गोड आहेस, अगदी या चॉकलेट सारखा, thank you  ...." नंदिनी ने एका हाताने राजचे गाल ओढले ... आणि त्याच्या गळ्यात हात घालत त्याच्या कुशिमध्ये शिरली.

" ह्मम.....तुझ्यापेक्षा नाही ....." त्याने तिला आपल्या कुशिमध्ये घेतले ...

" काकी वाट बघत आहेत....नंतर बोलूया ..." ...नंदिनी त्याच्या कुशीमधून दूर होत त्याला बाय करत तिथून पळाली..

******

" अरे ही राजचीच बायको ना ....ती जी पागल होती ...." 

" हो हो,, ती नंदिनीच आहे .....पण आता  नॉर्मल वाटत आहे ........."

" हो , तेव्हा किती त्रास झाला होता राजला .... किती करावं लागायचे त्याला तिचे ..."

" हो ना , काय बघितले त्याने तिच्या काय माहिती तेव्हा .... लगेच लग्न करून आला होता ...."

" सौंदर्य....आणखी काय असणार ... बाकी तर अगदी पागल सारखी होती ...पण आता बराच बदल झालेला दिसतोय ...."
 

" मला तर कळलेच नाही राजने तिच्यासोबत का लग्न केले ते ? किती चांगल्या चांगल्या मुली सांगून आल्या होत्या त्याला .... पण त्याने हिला निवडली..."

दोन तीन राजच्याच वयाच्या मुली( पाहुणे )  एका कॉर्नर मध्ये बसून गप्पा करत होत्या. नंदिनी तिथेच मागे काम करत होती....तिला त्यांचे सगळे बोलणे ऐकू आले होते , ते ऐकून तिला खूप वाईट वाटले होते, आणि बरेच प्रश्न सुद्धा पडले होते.  घरात आपले पाहुणे आहेत म्हणून तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तिथून निघून गेली.

" आधी मला सुद्धा वाटायचं , काय बघितले त्याने नंदिनी मध्ये??? पण बघ ना सुंदर तर आहेच, पण घरात पण किती छान सांभाळते आहे सगळं . किती चपळ आणि चुणूक आहे . हुशार सुद्धा वाटते आहे. "

" हो आणि मुख्य म्हणजे तो खूप प्रेम करतो तिच्यावर ... बघितले नाही किती काळजी घेतो तिची...आता तिने ब्रेकफास्ट केला नाही आहे बघून तो स्वतः तिच्यासाठी खायला घेऊन गेला होता..... "

" किती लकी आहे ना नंदिनी ...... मला पण आवडायचा ग तो .... पण त्याने भावच नाही दिला कधी.... " ....

मुलींच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

*****

" शालू घर खूप छान सजवले ..." ....सुशीला

" हो, नंदिनीला खूप आवड आहे , स्वतः लक्ष घालत त्यांनी  सगळी कामं केली आहेत " ... आजीसाहेब

" नंदिनी ...??? राजची बायको ??? " ....सुशीला

" हो , त्यांचीच बायको. त्यांना खूप आवड आहे घर सजवायची . सगळ्या सोयी , खाणेपिणे त्यांनीच तयारी केली आहे . " .... आजीसाहेब

" पण ती तर......?? " ...सुशीला बोलतच होत्या की समोरून राज येतांना दिसला आणि त्याला बघून त्या चूप झाल्या.

आजीसाहेब, त्यांची बहीण सुशीला गप्पा मारत बसल्या होत्या. आता बाकीचे आलेले पाहुणे मंडळी ,महिलावर्ग तिथे येऊन बसल्या. नंदिनीची आजी सुद्धा त्यांच्यासोबत बसली होती. सगळ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या.  नंदिनी घरभर काही ना काही कामानिमत्त फिरत होती.  नौकर मंडळी असून   सुद्धा सगळ्यांना नाश्ता पाणी, चहा वैगरे सगळं नंदिनी जातीने विचारत होती. चपळतेने ती घरात वावरत होती.  ते सगळं बघून इतर बायका तिचं कौतुक करत होते.

" या या साठे काका , आजीसाहेब तुमचीच वाट बघत आहेत.   "...नंदिनी मोठ्या दरवाजातून येणाऱ्या साठे काकांना बोलली. आजीसाहेबांनी त्यांच्या नेहमीच्या साडी विक्रेते साठे यांना बोलावून घेतले होते. घरात सगळेच जवळचे नातेवाईक होते, सगळ्या बायकांना त्यांच्या आवडीच्या साडी घ्यायला  आणि काही सोन्याच्या तारांच्या साड्या रशमिसाठी मागवल्या होत्या. साठेकाका त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांसोबत साड्यांच्या पेट्या घेऊन आले होते.

" या साठे साहेब, तुमचीच वाट बघत होतो . नंदिनी नाश्त्याचे बघा " ..... आजीसाहेब

" हो आजीसाहेब... रामू काका इथे खाली गालीचे अंथरा साड्यांसाठी ...." ....नंदिनी

रामू काकांनी खाली मोठे मोठे गालिचे अंथरले... साठे काका आणि त्यांचे कर्मचारी मधात बसले आणि बाकी बायका त्यांना गोल  बसल्या होत्या.  बायकांचा अगदी आवडता कार्यक्रम सुरू होता , घरात एकदम उत्साहाचे वातावरण झाले होते. तेवढयात रश्मी सुद्धा घरी आली होती . रश्मी आलेली कळताच राहुल सुद्धा तिथे बायकांमध्ये येऊन बसला होता.

" या रश्मी, बसा इथे माझ्याजवळ " ...आजिसाहेब रशमीचा हाथ धरत तिला स्वतःजवळ बसऊन घेतले.  आजिसाहेबांनी सगळ्यांसोबत रश्मी ची ओळख करून दिली. सगळ्या बायका साडी निवडण्यात व्यस्त झाल्या.

" रश्मी , तुमच्या आवडीच्या साड्या निवडा .." .. आजीसाहेब

रश्मी आणि राहुलची इशारेबाजी सुरू होती...रश्मी त्याला कुठली साडी घेऊ विचारत होती , आणि तो ती दाखवत होती त्या सगळ्या साड्या रीजेक्ट करत होता. असाच काय तो त्या दोघांचा खेळ सुरू होता.

" मी काय म्हणते आईसाहेब , आपण आपल्या आवडीच्या घेऊया... हे असे तर पूर्ण दिवस निघून जाईल पण यांच्या साड्या सिलेक्ट नाही होणार " .....रागिणी ( काकी ) त्या दोघांचे चालेले आँखो आँखो इशारे बघून त्यांची मस्करी करत होती.
तसे सगळे हसायला लागले . आता मात्र रश्मीला खूप लाजल्यासारखे झाले होते .

" होऊ देत वेळ, काही घाई नाही आपल्याला ... नंदिनी तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी साड्या निवडा " .. आजीसाहेब

" आजीसाहेब , तुम्हीच निवडा...मला फार काही कळत नाही त्यात ...." ..नंदिनी

" नंदिनी मी मदत करते , काका ती जांभळी साडी दाखवा " ....रश्मी

" काकी , ही साडी कशी दिसतेय " ..रश्मी  एक जांभळी साडी घेत नंदिनीच्या खांद्यावर ठेवत बोलत होती.

" काकी....ही साडी कशी दिसतेय " .... रश्मी थोडा आवाज मोठा करत बोलत होती. तिकडे एका खिडकी जवळ राज फोनवर बोलत होता, त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी रश्मी आवाज वाढवत होती. राजचे लक्ष गेले तर तो नंदीनिकडे बघतच राहिला...तो जांभळा रंग तीच्यवर खूप खुलून दिसत होता....  रश्मीने डोळ्यांनीच साडी कशी आहे विचारले.......राजने हसतच  हातानेच सुंदर असा  इशारा केला .....नंदिनीचे पण त्याच्याकडे लक्ष गेले , त्याला बघून ती गोड हसली....आणि तिचे ते गोड हसू त्याच्या काळजावर गोड वार करून गेले ....

सगळ्यांच्या आवडीप्रमाणे साड्यांची खरेदी करून झाली होती . सगळे चहा पाणी घेत गप्पा करत बसले होते.

" काय ग , साध्या घरचीच सून आणली तू शाले , वाटत नाही काही दिले असेल ??? दिसायला पण फार काही सुंदर नाही, मी सुचवलेली माझ्या नंदेची मुलगी तान्या केली असती तर घरात ठेवायला जागा कमी पडली असती, आणि दिसायला पण किती सुंदर आहे ती  . " ...सुशीला

ते ऐकून रश्मीच्या डोळ्यात पाणी तरळले.... तिने शिताफीने ते सगळ्यांपासून लपवले होते , राहुल ला सुद्धा ते ऐकून वाईट वाटले होते , सगळे मोठे, पाहुणे म्हणून तो चुपचाप बसला होता ... पण नंदिनीला मात्र ते बोलणे अजिबात आवडले नव्हते, तसेही आल्यापासूनच त्यांचं लग्नावरून काही ना काही बोलणे सुरू होतेच...आता त्या रश्मी समोरच बोलल्या होत्या. काकी आणि आई ला सुद्धा त्यांचे बोलणे आवडले नव्हते.

" रश्मी , ते वरती माझ्या रूम मध्ये काही ड्रेसेस काढून ठेवले आहेत, तेवढे बघून घेते काय ?" ... नंदिनी ,

"हो....आलेच बघून " ...रश्मी तिथून उठत वर निघून आली.

" कसे आहे ना आजी , कोणाला किती पण दिले ना , पण बिना मेहनतीचे ते टिकतही नसते आणि आयुष्यभर पुरत सुद्धा नसते. रश्मीच्या घरच्यांनी आयुष्यभर सोबत करेल अशी खूप गोड आणि संस्कारी साथ आम्हाला दिली आहे .  ( नंदिनी राहुलच्या खांद्यावर थोपटत बोलत होती ) दुसरी गोष्ट हे जे खांदे आहेत ना , हे खूप मजबूत आहेत . हे या अख्ख्या घराचा भार उचलू शकतात . हे हात समर्थ आहेत त्याची, त्याच्या बायकोची आणि त्याच्या या आमच्या पूर्ण परिवाराची जबाबदारी घेण्यासाठी .. आम्हाला घरात कोणालाच या हातांवर डाऊट नाही आहे . जी स्वप्न आम्ही बघतोय ती आम्ही स्व बळावर पूर्ण करण्याची हिम्मत ठेवतो , त्यासाठी हवी ती मेहनत सुद्धा करतो. आमची स्वप्न, आमचे सुख, आमचा आनंद  दुसऱ्याच्या देण्याघेण्यावर अवलंबून नाही आहे.   त्यामुळे कोणाकडून काही घेण्याचा प्रश्नच येत नाही.  दुसरे म्हणजे दिसणं, तसे तर मला कधीच कोणाचं कंपरिजन करायला आवडत नाही, प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो, त्याची कोणा इतरांसोबत तुलना करणे हे अयोग्य आहे , तरी तुम्ही म्हणत आहात  तर सांगावेसे वाटते आहे ,  रश्मी तुमच्या तान्यापेक्षा शंभर पटीने सुंदर आहे . तान्या आर्किटेक्ट आहे, चांगल्या पदावर काम करते... पण तिची आवड काय आहे , पार्टीज, आऊटिंग करणे, शॉपिंग .... लहानोठ्या ना तर ती भाव सुद्धा देत नाही, गरिबांना तर आजूबाजूला सुद्धा भटकू देत नाही . पण आमच्या रशमीची आवड माहिती काय आहे, गोरगरिबांना मदत करणे, गरजू लोकांना त्यांना हवी ती मदत करते, वृद्धाश्रम , अनाथ आश्रम मध्ये फ्री सेवा देते. आपल्या मेहनितीने घराला हातभार लावते. रश्मीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज आहे, डोळ्यांमध्ये दुसऱ्यांसाठी मदत करण्याचे तेज आहे , ओठांवर दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असे शब्द आहेत , मनात सगळ्यांबद्दल आदर आहे, मनगटात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे बळ आहे .....नाते जपण्याची शिकवण आहे... लहान मोठ्यांचा मानपान करणे तिच्या संस्कारात आहे . " .....नंदिनी निर्धास्तपणे बोलत होती. तिचं बोलणे ऐकून सुशिलाबाईना मात्र खूप राग आला होता.

" शाले ,  तुझी ही मोठी सून तर खूप आगाऊ आहे. आताच सांभाळ , नाहीतर डोक्यावर मिरे वाटेल ..." ....सुशिलाबई

" नंदिनी ........ " ..... आजी ( नंदिनी ची आजी )

" नाही आजी, मी खूप नम्रपणे बोलते आहे. आणि बोलणे खूप गरजेचे आहे . तुमच्या या चुकीच्या विचारांचे आम्ही समर्थन नाही करू शकत. तुमच्या सारख्या असेच विचार करणाऱ्या मुळे , हुंडा मागितल्यामुळे कितीतरी निष्पाप  मुलींचा जीव गेला आहे , कितीतरी वडिलांनी आपले जीवन संपविले आहे . या अश्याच विचारांमुळे कोणाला घरात मुलगी नको आहे.... मुलीचे लग्न करणे प्रत्येक बापासाठी ओझं होऊन बसले आहे. मानापाणाच्या , देण्याघेण्याच्या, रीतिभातींच्या नावाखाली लग्न सारख्या पवित्र बंधन चा तुम्ही लोकांनी बिजनेस मांडून ठेवला आहे ... उगाच काहीतरी बोलून घरातल्या आनंदी वातावरनावर पाणी फिरवायचे काम करता आहात. मला माझ्या घरात कुणाच्याही डोळ्यात पाणी आलेले बघवणार नाही, मग ते रश्मी असो वा अजून कोणी ....मी खपाऊन घेणार नाही " ....नंदिनी

" नंदिनी....बस....आता एक शब्द नाही ..आपल्या खोलीत जा ..." ... आजीसहेब थोड्या मोठ्याने बोलल्या. तशी नंदिनी चूप झाली , तिने एक नजर सगळ्यांवर फिरवली आणि आपल्या रूम मध्ये जायला निघाली. पुढे राज सगळं ऐकत नंदिनीला बघत उभा   होता.

" काही संस्कारच नाहीत .मोठ्या घरात मुलगी देण्याची स्वप्न बघतात ही लोकं, पण मोठ्या घरासारखे संस्कार मात्र शून्य . म्हणून आपल्या तोलामोलाचा लोकांसोबत संबंध जोडायचा असतो .  मोठ्यांसोबत कसे वागायचे तुम्ही शिकवले नाही तिला  नंदिनीच्या  आजी ??? घरांदाजपणा कसा असतो नाही शिकवला  ??    बरोबर आहे  आईविना  वाढलेली  पोर , कुठून येणार संस्कार ... " सुशीला बाई

पुढे जाताजाता नंदिनीचे पाय तिथेच खिळले...

' आईविना वाढलेली पोर ' शब्द नंदिनीच्या हृदयावर घाव करून गेले होते, ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते.  कोणीतरी परत तिला आई नसल्याची जाणीव करून देत होते . आता तिच्या डोळ्यातले पाणी गालांवर ओघळू लागले होते. तिला बघून आता राजला सुद्धा वाईट वाटत होते ...तो लगेच तिच्या जवळ येत त्याने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला... त्याच्या झालेल्या स्पर्शाने नंदिनी भरल्या डोळ्यांनी त्याला बघत होती . त्याने आपल्या एका हाताने तिचे डोळे पुसले आणि डोळ्यांनीच रडू नको म्हणून खुणावले. पण काही गोष्टी नंदिनीच्या मनाला इतक्या जास्ती लागल्या होत्या की तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. नंदिनीच्या डोळ्यातले अश्रू राजचा खूप मोठा विक पॉइंट होता, तिच्या डोळ्यात पाणी बघितले की मग तो समोर की लहान मोठं आहे ते विसरून जायचा .तो पुढे बोलायला येत होता.

" आजी ........" ....राज काही बोलणार तेवढ्यात नीती मधात बोलली.

" राज, नंदिनीला रूम मध्ये घेऊन जा ....." ...आई , त्यांना माहिती होते आता राज सुशीला आजीला काहीतरी नक्कीच बोलणार, घरातले चांगले वातावरण खराब होऊ नये याच्याकडे लक्ष देत त्यांनी राजला नंदिनीला घेऊन जाण्यासाठी सांगितले होते.

"पण ......." .....राज

" राज .....नंदिनी ला जास्ती गरज आहे तुझी .....जा ....सांभाळ तिला ....." ....निती हळूवारपणे त्याच्या जवळ जात बोलली.

राज शांत होत नंदिनीचा हात पकडत तिला वरती रूम मध्ये घेऊन गेला.

" राहुल , जा रश्मीला काय हवं नको ते बघ. ".....निती

राहुल सुद्धा एकदा सगळ्यांकडे बघत तिथून उठून वरती चालला गेला.

" हे बघ सुशी , तू जे बोलली आता ते आम्हाला अजिबात आवडलेले नाही आहे . मुलांसमोर काही बोलणे नको म्हणून आम्ही चूप होतो. नंदिनी जे बोलल्या ते सगळं अगदी खरं बोलल्या. त्यांना आमची आणि या घराची खूप काळजी आहे . त्यांना घरात कुणालाही वाईट बोललेले, वागलेले अजिबात आवडत नाही . त्यांचे संस्कार, त्यांचे विचार खूप उच्च सरणीचे आहे . कशाला कुठे महत्व द्यायचे त्यांना माहिती आहे. आणि नंदिनी बोलल्या प्रमाणे रश्मी खूप सुंदर आहेत, चांगल्या गुणांची खाण आहेत , संस्काराने श्रीमंत आहेत. अगदी योग्य मुलगी घरात येत आहे. तू लहान बहीण आहे म्हणून आम्ही आता जास्ती बोलणार नाही, पण आम्हाला तुमचं बोलणे अजिबात आवडले नाही आहे. दुसऱ्यांच्या घरी आपण त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला जातो , हे कदाचित तुम्ही विसरला आहात. " .... आजीसाहेब

" शाले, तू बदललीय  ....तू आपली परंपरा , जुन्या गोष्टी विसरायला लागली .." सुशीला

" चांगल्या गोष्टी अंगिकरायला काही हरकत नाही . जुन्या काही गोष्टी ज्यांनी आपल्याच लोकांना त्रास होतो त्या सोडायलाचच हव्यात . परंपरा , चालीरीती ज्या काही आधी बनवल्या गेल्या आहेत त्या,  त्या काळा च्या हिशोबाने बनवल्या गेल्या होत्या, आता काळ बदतोय , तेव्हाच्या गोष्टी आता कशा लागू होणार आहेत ?? परंपरा , चालीरीती सोडाव्या म्हणत नाही आहे, पण काळानुरूप त्या बदलल्या पाहिजे , आताची पिढी खूप हुशार आहे, त्यांची वैचारिक पातळी आपल्यापेक्षा कैक पटीने चांगली आहे. ते जुन्या गोष्टी करायच्या म्हणून नाही करत तर त्या मागचा अर्थ समजून करत असतात, ते अंधविश्वासू नाहीत . घरात सुख समृध्दी, आनंद असायला हवा, त्यासाठी जुन्या काही गोष्टी सोडाव्या लागल्या तरी काही हरकत नसावी. चांगला बदल आहे हा, चांगला बदल आपल्यासाठीच चांगला असतो सुशी .आम्ही आतापर्यंत खूप चुकीचे वागत आलो आहोत, या लहान मुलांकडून आम्ही जगण्याचा खरा अर्थ शिकलोय. " .... आजीसाहेब

तेवढयात आबा तिथे टाळ्या वाजवत आले....

" एकदम बरोबर बोलल्या राजच्या आजीसाहेब , उगाच नाही आम्ही तुमच्या मागे मागे असतो " ....आबा, वातावरण खूप गंभीर झालेले बघून आबांनी हलका फुलका जोक केला होता.

" तुमचं आपलं काहीच तरी ...." .... आजीसाहेबांना आता लाजल्यासारखे झाले होते.  त्यांना बघून आता सगळे हसायला लागले होते.

रश्मी राहुल वरतून हे सगळं बघत होते. रश्मीने हसतच आपले डोळे पुसले.

" हे बघ, असे आहे आपले घर....सुख दुःख सोबतीने वाटून घ्यायला शिकलोय आम्ही , and all credit goes to my bro my ideal Shriraj , खूप धैर्याने आणि संयमाने  त्याने घराचं गोकुळ केलंय.  " ....राहुलने रश्मीला आपल्या जवळ आपल्या मिठीमध्ये घेतले आणि तिच्या केसांवर किस केले.

" खूप गोड आहे आपलं घर आणि घरातली माणसं. Love you  " ...रश्मी राहुलच्या गालावर एक छोटासा किस करत बोलली.

" Oh my God , you are killing me now....... love you too sweety ......" ... राहूल खूप एक्साईटेड झाला होता.

" नंदिनी , अग त्या आजींचा स्वभाव आहे तसा, नको त्यांचे बोलणे आपल्या मनाला लावून घेऊ " ...राज नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

" राज , माझी आई मला एकटीला सोडून का गेली ??? राज का नाही आहे माझ्याजवळ आई ?? मला आई हवी आहे . आई असती तर मी शहाणे झाले असते ना..... मी अशी वाईट नसते ना ......" नंदिनी रडत रडत बोलत होती .

तिचं बोलणे त्याला ऐकवत नव्हते, आणि तिच्या प्रश्नांवर त्याच्याजवळ काही उत्तरं सुद्धा नव्हते. राजने अलगद तिला आपल्या मिठीत घेत तिला  घट्ट पकडून घेतले. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न करत होता.

" मी खूप वाईट आहे, मी सगळ्यांनाच त्रास देत असते. कोणीच खुश नसते माझ्यामुळे.... मी वाईट आहे , कोणालाच मी आवडत नाही ...,....." ..नंदिनी त्याच्या छातीवर आपलं डोकं घासत बडबड करत होती. राज तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण तिला काहीच कळत नव्हते....तिने ती गोष्ट मनाला खूप लाऊन घेतली होती , ती त्या गोष्टीचा खूप विचार करत होती , राजच्या लक्षात आले होते, ज्याची त्याला भीती होती तेच झाले होते ....तिचे डोकं दुखायला लागले होते ......तिला  पनिक अटॅक आला होता.   राजने तिला धरत बेड वर बसवले  ,  बाजूला असलेले ड्रॉवर एका हाताने उघडत त्यातून टॅबलेट काढत नंदिनीला खाऊ घालत पाणी पाजले....तो तिला जवळ घेऊन बसला होता , तिला शांत करत होता.... रडत रडत तिने मान खाली त्याच्या खांद्यावर टाकली . थोड्या वेळाने औषधाचा असर सुरू झाला आणि तिला गुंगी आली होती. राजने रूमचे दार बंद करून घेतले. सगळे पडदे लाऊन घेतले. लाइट्स ऑफ केले .  रूम मध्ये आता खूप शांत वाटत होते. राजने राहुलला काही मेसेज केले आणि फोन बंद करून ठेऊन दिला. नंदिनी झोपेत सुद्धा दचकत होती . तो  नंदिनीजवळ जात, तिला आपल्या कुशिमध्ये घेत शांत झोपला.

एखादी गोष्ट नंदिनिने खूप मनाला लाऊन घेतली, त्याचा खूप विचार केला की तिला असेच पॅनिक अटॅक येत होते. राजला आणि घरात सगळ्यांनाच आता हे माहिती होते. म्हणूनच राज तिला अश्या कार्यक्रमापासून, लोकांच्या गर्दी पासून जास्तीत जास्ती दूर ठेवायचा प्रयत्न करत असायचा.  खूपदा त्याला त्याच्या मनातल्या तीच्याबद्दलच्या त्याच्या भावना तिला सांगाव्या वाटत होत्या... त्याचा चांगला परिणाम झाला तर ठीक पण जर त्याचा काही दुष्परिणाम झाला तर ??? हाच विचार मनात आणत तो तिला काहीच सांगत नव्हता.

*******

कशी गंमत असते बघा..... खरं तर आपण पाहुणे , नातेवाईक आपला आनंद वाटण्यासाठी निमंत्रित करत असतो. पण बहुदा असेच काहीतरी , जे खरंच महत्वाचे नसते , उगाच गॉसिप करायचे म्हणून बोलल्या जात असते.  असे बोलून समोरच्याचा आनंदावर, उत्साहावर विरजण घालत असतो. कधी कधी ते बोलणे इतके वाईट असू शकते की आपल्याच लोकांमध्ये नात्यांमध्ये दरी निर्माण करणारी ठरते.
आपल्या कृतीतून , बोलण्यातून जास्तीत जास्त आनंद वाटावा........असे मला वाटते.

*****
संक्रांती च्या खूप खूप शुभेच्छा...गोड गोड बोला....गोड बोलण्यात वाईट काहीच नाही.

*****

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️