Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 50

Read Later
नंदिनी...श्वास माझा 50

भाग 50

सूनबाई , नंदिनी ने राहुल साठी सुचवली मुलगी बरी वाटते आहे आम्हाला.....तुम्हा दोघींना कश्या वाटल्या त्या रश्मी देसाई.....??....... आजीसाहेब

फोटो आणि माहिती वरुन तर चांगली वाटते आहे........काकी

ह्मम.......फक्त आम्हाला दिसायला त्या राहुल पेक्षा डाव्या वाटत आहे.......आणि आपल्या स्टेटस ला मॅच नाही होत ....येवढाच थोडा प्रश्न आहे..... आजीसाहेब

हो....पण मी राहुल सोबत बोलली आहे.... सावळी आहे थोडी पण नाकी डोळी सुंदर आहे म्हणाला......आणि शिक्षणाने पण चांगली आहे म्हणत होता...... कर्तबगार आहे ...सेल्फ डेपेंडेंत आहे... ......एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून तरी त्याला आवडली आहे ती....असे दिसतेय.......काकी

मग ठीक आहे.......नंदिनी ने त्यांचं काम केलय दिसतेय बरोबर........ आजिसहेब

हो.....अगदी सगळी खरीखुरी माहिती काढून आणली आहे..... काल मी आपल्या महाराजांसोबत बोलले राहुल च्या लग्नाबद्दल.....तर त्यांच्याकडे सुद्धा रश्मी देसाई ची सगळी माहिती आहे.....ते पण बोलले लोक चांगले आहेत......आणि मुख्य म्हणजे राहुल आणि रश्मी ची पत्रिका पण चांगली जुळते आहे.......काकी

मग तर हे छानच झाले.......मग तुम्ही महाराजांना कळवा आणि मुलीच्या घरी बोलायला सांगा.....म्हणजे त्यांना जर पसंत असेल आपलं स्थळ तर राहुल आणि रश्मी दोघांना भेटता येईल ....जर त्या दोघांना ते आवडले तर पुढे लग्नासाठी बोलणी करता येईल......... आजीसाहेब

हो , पण आधी मुलीला भेटायचं म्हणत होते मुलं.........काकी

नको.....राहुल ला आवडली आहे तर आपल्याकडून होकराच आहे.......मुलीच्या घरी आधी न कळवता परस्पर मुलीला भेटणे मला तर योग्य वाटत नाही.....ही आजकालची पिढी जरा वेगळा विचारांची आहे..... पण आपण आपल्या पद्धतीनेच पुढे जायला हवे......तुम्ही कळवा महाराजांना नी पुढचं काय ते बोलून घ्या....... आजीसहेब

ठीक आहे  , मी आजच बोलते.........काकी

*******

असं अचानक लग्नासाठी कोण मागणी घालते...... शी.....मला नाही करायचे येवाध्यात लग्न............रश्मी

अग , अचानक वैगरे काही नाही.....मी आपल्या महाराजांना तुझी पत्रिका आणि माहिती देऊन ठेवली होती....आता 24 वर्षाची झाली....आता सुरू केले तरी 1-2 वर्ष सहज निघून जातात.,,.....रशमीची आई

हो , पण मग हे असे आजच कसा काय आला त्यांचा फोन...??.....रश्मी

अग जोशी महाराज सांगत होते खूप चांगले लोक आहेत...खूप श्रीमंत घरचे स्थळ आहे, आणि पत्रका सुद्धा उत्तम मिळते आहे तुझी त्यांच्यासोबत.......आणि मुलगा पण खूप चांगला आहे.....रेवती ( रशमीची आई)

अगं पण अजून रुची च शिक्षण व्हायचं आहे, तिला बारावी नंतर शिकायचं म्हणजे पैसे नको काय जमवायला.....माझ्या लग्नाच्या मध्ये तिच्या शिक्षणाचं नुकसान नको व्हायला.....आणि त्या लोकांनी माझा पगार इकडे द्यायला नकार दिला तर.........??.....नकोच....इतकी काय घाई आहे...??.......रश्मी

हे पहिलंच स्थळ आले आहे बघ तुझ्यासाठी, पहिल्याच स्थळाला नाट नको लाऊ.....आणि त्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला आहे......मुलाच्या मोठ्या भावाच्या बायकोने तुला कुठेतरी बघितले म्हणे, आणि तिला तू आवडली म्हणून स्वतःहून आपल्याला फोन केला....नाहीतर असे मुलं कडील लोक स्वतःहून फोन करत नाही..........आई

अरे यार आता त्यांनी कुठे बघितले मला.......अहो बाबा तुम्ही तरी काही सांगा........माझं अजून पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण व्हायचं आहे........रश्मी

रशू....तुझी आई बरोबर बोलते आहे.... अगं खूप चांगली लोक आहे ,मी थोडीफार विचारपूस केली तर कळले.......नी मुलाचा मोठा भाऊ तर खूप फेमस बिझनेसमन आहे .....बऱ्याच मॅगझिन मध्ये त्याचे इंटरव्ह्यू,. लेख , फोटोज् आलेले आहे.....शिक्षणाला खूप महत्त्व देतो तो......तुला शिकू देतील ते पुढे......लगेच नकार नको देऊ, एकदा बघ ,भेट आणि नंतर ठरव ....घाई नाहीच कशाची.......बाबा

बरं मग काय कळवू त्यांना..??....त्यांनी दोन ऑप्शन्स सांगितले...तुला जर मुलाला आधी भेटायचं असेल तर आधी तुम्ही दोघं भेटू शकता...नाही तर आपली पारंपरिक पद्धत परिवारासोबत कांदे पोहे चा कार्यक्रम आपण करू शकतो.......आई

मला तर सध्यातरी लग्न नाही करायचे...उगाच भेटून तरी काय करू त्याला...??...त्याच्या श्रीमंतीच मला काय करायचे....मला जर माझं अस्तित्व नसेल त्यात तर काय कामाची ती श्रीमंती.....?? ..कांदेपोहे च ठीक आहे....सगळ्यांसमोर भेटू ,....श्रीमंत आहेत म्हणतात तर ते या चाळीत यायला तयार नाही होतील...... आणि काहीतरी कारण सांगून नकार देऊ....रश्मी स्वतःशीच विचार करत होती

अग बोल....तू म्हणशील तसे करू.......आई

आई बाबा आपण कांदेपोहे चाच कार्यक्रम करूया.....म्हणजे सगळ्यांनाच बघता येईल.........आणि हो त्यांना इथे या म्हणावं कार्यक्रमासाठी..........रश्मी

अग पण इथे....आपल्या घरी....??..किती मोठी लोक आहेत ती.........आई काळजी करत बोलली

मग तुला कळते आहे , आणि तुला आपल्या घरी त्यांना बोलवायला संकोच होत आहे ...तर मग हे नातं किती दडपणाखाली राहील......आयुष्यभर कसे निभावशिल......बघ मग अजूनही विचार कर.....आणि दुसरे म्हणजे त्यांचे मन पण समजून येईल.....ही अशी लोकं त्यांच्या स्टेटस चा खूप विचार करतात......बघुया त्यांना खरंच मी मनापासून आवडली आहे काय ते....??...रश्मी

आपली मुलगी चांगल्या घरी जावी, सुखी राहावी अशीच कुठल्याही आईवडिलांची इच्छा असते....म्हणून म्हणाते आहे ......आई

कांदेपोहे चा कार्यक्रम आपल्याच घरी होणार.....नाही तर मग माझा नकार आहे.......रश्मी बाहेर आपल्या कामाने निघून गेली...
 

ही मुलगी पण ना खूप हट्टी आहे......आई

रेवती तिचं पण बरोबर आहे..... तू त्यांना फोन कर आणि कळव, नी कधी वेळ आहे विचारून निमंत्रण दे घरी येण्याचे......तशी मग आपण आपली तयारी करू........बाबा

ठीक आहे, बोलून बघते काय म्हणतात ते.......आई

******

नंदिनी ला आता ऑफिस मध्ये दोन महिने होत आले होते.....तिच्या फ्रेंडली स्वभावामुळे ऑफिस मध्ये आता बरेच लोकं तिला ओळखायला लागली होती....तिचे इथे पण बरेच मित्र झाले होते.... टी ब्रेक ला गप्पा मस्ती करणं....कोण कोणाची खोड्या काढणे म्हणजे नंदिनी चे आवडते काम झाले होते......पण कामाच्या वेळी मात्र ती खूप मन लाऊन काम करायची....आणि ती उत्कृष्ट पद्धतीने आपले काम करत होती...त्यामुळे कामामध्ये चुका काढायला कोणाला वाव मिळायचा नाही.....पण नंदिमीचे मॅनेजर ठाकूर आणि नंदिनीच मात्र तू तू मैं मैं वाल रिलेशन झालं होते.....ठाकूर तिला बोलयासाठी काही ना काही संधी शोधून च काढायचे.....आणि आता हे पूर्ण ऑफिस ला च माहिती झाले होते......राज मात्र कधीच तिला बायको असल्याचे बेनिफिट देत नव्हता....तो कधीच तिच्या नी ऑफिस च्या स्टाफ मध्ये पडत नव्हता....खूप गरज असली तरच तो मध्ये बोलायचा.....आणि mr ठाकूर पण थोडे सनकी असले तरी काम मध्ये चोख आणि प्रामाणिक होते......त्यांचा थोडा स्वभाव सोडला तर ते चांगले होते.....फक्त नंदिनी जॉईन झाल्यापासून त्यांची नी नंदिनी ची काही ना काही गडबड चालू असायची.

मिस नंदिनी तुम्ही इथे काय करत आहात.....??..mr ठाकूर

सर, मी हे काम कसे करतात ते बघत आहे......नंदिनी

तुम्ही तुमच्या कामात लक्ष दिले तर बरं होईल......mr ठाकूर

माझं आजचे काम झाले.....मी सगळं सबमिट पण केले आहे.........आता माझ्या कडे एक तास आहे अजून उरला म्हणून मी यांचे हे बघते आहे......तेवढेच मला शिकायला भेटेल.........नंदिनी

तुम्ही इथे शिकायला येता की काम करायला...??.....mr ठाकूर

दोन्ही.........नंदिनी

आजूबाजूचे या दोघांकडे बघत होते.....ठाकूर ला उत्तर देण्याची कोनामध्येच हिम्मत नसायची....त्यात नंदिनी ऐवधी कूल आणि ठाकूर सोबत बोलत आहे.....सगळे आश्चर्य होत बघत होते...

शिकायचं आहे तर मग कॉलेज मध्ये जाऊन शिका.......इथे हे चालणार नाही......mr ठाकूर

सर माझ्याकडे वेळ नाही कॉलेज ला जाऊन हे सगळं शिकायला......मला एडमिशन सुद्धा भेटणार नाही.......मला खूप आवड आहे नवीन नवीन शिकायची.........नंदिनी

राज च सगळे लक्ष नंदिनी कडे होते.....आणि ठाकूर च्या चेहऱ्याच्या हावभाव वरून लक्षात येत होते की काहीतरी दोघांची गडबड सुरू आहे......आणि तो त्यांच्या जवळ आला.....

Any problem Mr Thakur, Ms Nandini...??.... तो दोघांकडे आळीपाळीने बघत होता...

सर....या इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यामुळे बाकीचे डिस्टर्ब होत आहे......ठाकूर

Ms Nandini...??........ राज

सर , माझं काम झाले आहे....मी फक्त इथे बसले होते या लोकांचे काम बघत......मला शिकायचं होत...आणि माझ्याजवळ थोडा वेळ शिल्लक होता म्हणून मी इथे आली... ........नंदिनी

आणि शिकून काय करणार आहात तुम्ही...??....तुम्ही अकाउंट ला आहात ना....हा मानाजमेंट चा डिपार्टमेंट आहे........ठाकूर

सर, अहो नॉलेज जमा करायला , किंवा काही नवीन शिकायला काही कारण लागते काय.....शिक्षण कधीही वाया नाही जात........नंदिनी

नंदिनी आणि ठाकूर ची शाब्दिक चकमक सुरू होती......दर दोन तीन दिवसां आड नंदिनी आणि ठाकूर च काहीतरी बिनसले च असायचे....येवाहणा आता ऑफिस मध्ये सगळ्यांनाच माहिती झाले होते.....बाजूला असलेला स्टाफ तोंड दाबून हसत होते..........राज पण नंदिनीचे ऐकून गालातल्या गालात हसत होता.....

आणि कशी मी आता अकाउंटिंग मध्ये आली, तशीच कधी पुढे जाऊन मानाजमेंट मध्ये पण जाऊ शकते की.....आणि जर मला तुम्ही मला असेच थोड शिकायला मदत केली तर या कंपनी मध्ये हायर पोस्ट पण मला भेटू शकते.......and I promise मी सगळं क्रेडिट तुम्हालाच देईल ...आणि मग तुमचं पण प्रमोशन होईल.....नंदिनी

खरं बोलत आहात तुम्ही???..... ठाकूर

हो.......मी कधीच खोटं बोलत नाही....हवं तर राज.... सॉरी  देशमुख सरांना विचारा.....??.......नंदिनी

सरांना...?.....ठाकूर प्रश्नार्थक नजरेने नंदिनी कडे बघत होते...

तिने आपल्याच दातांखली आपली जीभ चावली...... नंदिनी ला आपली चूक लक्षात आली.......की आपण राज चे नाव घेतले.....राज पण तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता.....

म्हणजे.....म्हणजे.... सर ...ओळखतात ना कोण कसे आहे ते.....त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बघितले होते मी.....त्या रिपोर्टर ला आधीच तिचे प्रश्न ओळखून उत्तर देत होते........नंदिनी ने कसं बस आपलं बोलणं सावरले.....

हा...ते तर आहे......सर लोकांच्या परसनालिटी, फेस परफेक्टली रीड करतात........ठाकूर

हा....मग मी तेच म्हणत होते.....तिने सुटकेचा श्वास घेतला..

बरं मग मी इथे बसू शकते ना........??.....नंदिनी

हो....पण बाकी कोणाला डिस्टर्ब व्हायला नको.....जर एकही कंप्लेंट आली तर मग मी काहीच ऐकून घेणार नाही........सर ठीक आहे ना.???....मिस नंदिनी तश्या कामात चोख आहेत....त्यांना हे शिकायची आवड आहे , त्यांचे पॅशन कळते त्यांच्या कामातून..........ठाकूर राज कडे बघत बोलत होता .

ठाकूर राज सोबत बोलत होता तेव्हा नंदिनिने राज कडे बघून एक डोळा मारला....नी डोळे भुवया उडवत इशर्यानेच त्याच्या समोर स्वतःचेच कौतुक करत होती...

नंदिनी ने राज ला डोळा मारला......राज तिला बघून शॉक च झाला......तो पूर्ण गोंधळलेल्या नजरे ने कधी नंदिनी , कधी ठाकूर कडे बघत होता......आणि ठाकूर त्याच्या सोबत बोलत होता.....

Sir, am I right.....??.... ठाकूर

Okay Mr. Thakur तुम्हाला योग्य वाटते आहे तर द्या परमिशन.....मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे .....शिकण्यासाठी माझं नेहमीच सगळ्यांसाठी पाठिंबा होता नि असेलच.......आणि हो जर Ms Nnadini ला शिकायची आवडत आहेच तर त्यांना आपल्या प्रोजेक्ट्स च्या प्रेझेंटेशन, ट्रेनिंग मध्ये पण घ्या ....त्यांना फायदा होईल त्याचा........राज

ओके सर......ठाकूर

राज नंदिनी कडे एकदा बघून आपल्या कॅबिन कडे जायला निघाला.......ठाकूर पण आपल्या केबिन कडे जायला वळला....

कोणाचे लक्ष नाही आहे बघून नंदिनी ने राज ला एक छोटीशी फ्लायिंक किस दिले........तिला तसे करतांना बघून राज च्या चेहऱ्यावर स्मायल आले.....त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता....त्याने एकदा नंदिनी कडे बघितले.....नंदिनी वेड लावशिल तू मला.....काय करू तुझ्या या लोभस रुपाच.....मनातच विचार करत... नी हसतच आपल्या केबिन मध्ये निघून गेला.....

आदल्या दिवशी रात्री......
नंदिनी अभ्यास करत बसली होती.....पण डोक्यात मात्र राज चा च विचार सुरू होता....त्याला आवडणारी मुलगी कोण असेल....हेच तिच्या डोक्यात सुरू होते....आणि तीच कशातच मन लागत नव्हते.....परत राहुल ने सांगितले होते की ती ऑफिस मध्ये सुद्धा काम करते.....तर ऑफिस वर फोकस करायचं ठरवल.......आणि त्यासाठी तिला जितके जास्ती होईल तितके राज च्या आजूबाजूला राहावे लागेल....पण ते कसे करायचे याचाच ती विचार करत होती......

राज sss........ आवाज देत नंदिनी राज च्या रूम मध्ये गेली

काय नंदिनी.......झोपली नाही तू..........राज बेड वर बुक वाचत पडला होता....

हे सांग ना मला....मला येत नाही आहे ......नंदिनी लॅपटॉप मध्ये त्याला काही दाखवत बोलली

अग हे तर मानाजमेंट डिपार्टमेंट चे आहे.......राज तिच्या लॅपटॉप मध्ये बघत चेक करत बोलला...

हो.....मग.........नंदिनी

तुला काय करायचं याचे.......??.....राज

मला शिकायचं आहे हे सगळं...........सांग मला....??....नंदिनी

आता...??.... अगं हे खूप लेंगदी आहे......सुरवातीपासून शिकावं लागेल...... आधी बेसिक क्लिअर करायला लागेल....मग हे जमेल.......बराच वेळ द्यावा लागेल.......राज

मग आता....??......नंदिनी

आता तर नाही होणार....बघू वेळ भेटला की तसे तुला शिकवतो........राज

राज,  मी जर  मानाजमेंट डिपार्टमेंट ला जाऊन बसले तर चालेल काय...?? मी त्यांचं बघता बघता शिकेल.......नंदिनी

तू अकाउंट डिपार्टमेंट ची आहेस.....तिकडे त्यांना डिस्टर्ब होईल.......राज

माझे फ्रेंड्स आहेत ते .....आम्ही मॅनेज करू....मी कोणाला डिस्टर्ब नाही करणार, अगदी चुपचाप बसेल मी नोट्स काढेल....आणि जे जे फंक्शन त्यांनी वापरले आहेत त्यांची घरी येऊन डिटेल अभ्यास करेल.......नंदिनी

पण तुझा मॅनेजर Mr Thakur , ते तुला परमिशन नाही देणार......आधीच तुझं नी त्याचं वाजत असते......त्यात असे नव्या गोष्टी.......?? राज

जर त्याने दिली परमिशन तर......??....नंदिनी

मला माहिती तो कसा आहे , तो नाही ऐकणार......राज

त्याने ऐकले तर.....तर तू काय करशील बोल....??......नंदिनी

तू जे म्हणशील......राज

ठीक आहे..... जर मला Mr ठाकूर ने परमिशन दिली तर तू मला तुझ्या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये , प्रेझेंटेशन वैगरे जे काही असते त्यात घेशील.......नंदिनी

पण का....?? तू आधीच जास्तीचे काम करते आहेस.....थकून जाशील तू......काही गरज नाही याची.....राज

घाबरतो आहेस ना तू ...,मी जिंकेल म्हणून......नंदिनी

घाबरत नाही आहो, काळजी वाटते म्हणून......तू तर नेहमीच जिंकावी असे वाटते मला.....आणि मला तुला खूप यशस्वी सुद्धा झालेली बघायची आहे.......राज

मग.....मी जे म्हणते आहे ते तू करशील आहे......नंदिनी

अगं....पण...... तू किती दमते रे सोन्या......का हट्ट करते आहेस...???.......राज

कारण तिला जास्तीत जास्त तुझ्या आजूबाजूला , जवळ राहायचे आहे.........राहुल त्यांच्या रूम मध्ये येत बोलला

मला कळले नाही......राज प्रश्नार्थक नजरे ने दोघांकडे बघत होता......

ये तू गप रे.....आणि तू ,राज,  त्याच काय ऐकतो आहे........तो अशीच फालतू बडबड करत असतो......तू माझं ऐक.....मी जिंकली तर मी जे म्हणते आहे ते उद्या तू करणार आहेस........नंदिनी

तुला नाही तरी म्हणतो काय ग तो........तू त्याला त्याच हार्ट पण मागशील तर तो हातात काढून तुला गिफ्ट करेल........राहुल

राज राहुल ला डोळ्यांनीच खडासावत चूप बसायला सांगत होता.....

म्हणजे..??.....नंदिनी

वाघाचे पंजे.......तुला काही डोकं च नाहीये....जाऊ दे.....तू ते अकाउंट , मानाजमेंट, फाईन आर्टस.....मारामारी तेच शिक......तुला तेच जमते बरोबर.......आणि हो अजून एक ...मॅच मेकिंग.......राहुल

ये तुला नसेल आवडली तर सांग.....नाही म्हणून येते....काकी आणि आजिसहेबांना पण सांगून येते.......नंदिनी राहुल ला बोलतच जायला उठली...

ये.....ये बाई......नेहमी अशी धमकी च का देते ग तू........राहुल तिचे पाय पडायची अक्टिंग करत होता.....

हो ना....मग शांत राहायचे......अजून पण तुम्हारी लव्ह लाईफ की डोर हमारे हाथ में है..........जे बोलेल ना ते ऐकायचे नी जे मागेल ना ते द्यायचे चुपचाप......नंदिनी ठसक्यात बोलत होती

यार भाई.....ही किती दादागिरी करते.....तुला वाटत नाही काय तू खूप लाडाऊन ठेवले आहे हिला......येताजाता धमक्या देते यार ही........राहुल

तुमचं तुम्ही दोघं बघा.....मला नका घालू त्यात.....भांडता भांडता एक होता.....आणि मग आमच्यावरच येत सगळं.........राज

तू पण तसाच......राहुल

तुझं काय मध्येच लावलाय रे.....आम्ही महत्वाचं बोलत होतो ना......डिस्टर्ब करतोय......नंदिनी राहुल ला बोलली

राज.....मग प्रॉमिस कर , जर ठाकूर नी परमिशन दिली  तर तू ज्या ज्या प्रोजेक्ट मध्ये आहे त्यात त्यात तू मला घेशील.......नंदिनी

तू ऐकणार नाहीस ना........राज

नाही......नंदिनी बॉक्स टाईप स्मायल करत बोलली

ठीक आहे......राज., राहुल ने डोक्यावर हात मारून घेतला...

ये ssss.........नंदिनी उड्या मारतच राज च्या गळ्यात जाऊन पडली..........

राज तू ऑसम आहेस.........चला तुम्ही करा गप्पा , मला झोप आली.......मी जाते.......नंदिनी

का......आज नाही प्यायची काय कॉफी.....???? बाहेर भुतांसोबत.........राहुल

नंदिनी ला त्या दिवशी ची रात्र आठवली.........आणि तिला कॉफी बनवताना राज तिच्या जवळ असल्याचे डोळ्या समोर दिसत होते.......तिला ते आठवून स्वतहालाच लाजयाला झाल्यासारखे झाले.......तिने एकदा राज कडे बघितले.......तो गालावर एक हाथ ठेवून तिच्याकडेच बघत होता.......त्याला तसे बघतांना बघून नंदिनी ला पोटात कसेतरी झाल्यासारखे वाटले......नी ती पळतच आपल्या रूम मध्ये गेली.

ही अशी अचानक काही न बोलता कशी काय पळाली???... भूत म्हटले तर आता पर्यंत चांगली भांडली असती...दोंचार धमक्या देऊन झाल्या असत्या आतापर्यंत.......राहुल तिला चुपचाप जातांना बघून बोलला

माहिती नाही......पण काहीतरी बदल होतोय तिच्या मध्ये.....काहीतरी डोक्यात सुरू असते......कधी खूप हायपर असते तर कधी एकदम शांत........राज

I think she is falling in love with you.....????????????...... राहुल

तुला जस्तीचेच कळायला लागले ना तिचं....???....राज

ना ना.....हे तुझं कार्टून तुलाच मुबारक........बाय झोपतो.....राहुल तिथून पळला

राहुल बोलतोय तसेच असेल काय काही...??.....असेच झालं तर.........राज विचार करतच कधीतरी झोपी गेला होता.....

आणि आज अगदी नंदिनीच्या मताप्रमाणे झाले होते.....ठाकूर नी तिला परमिशन दिली होती...........

 

******

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️