Oct 01, 2020
प्रेम

नंदिनी....श्वास माझा 14

Read Later
नंदिनी....श्वास माझा 14

भाग-14


 

आई तीन दिवसांनी माझं लग्न आहे...... तू येते आहेस ना.... श्रीराज

अरे बाळा इतकी कशाची घाई आहे...... थोडा तरी विचार करून निर्णय घ्यायचा ना.... तुझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे हा......... मला खूप काळजी वाटते तुझी...... आई काळजीने बोलली

आई पूर्ण विचार केला मी ,आधीच फार उशीर झालाय आता परत उशीर करायला परवडणार नाही मला...... तू येते आहेस ना....... मी तुझी वाट बघेल....... श्रीराज

आई काही बोलणार तेवढ्यात आईच्या हातातला फोन आजीने घेतला..........

हे लग्न आम्हाला मान्य नाही...... ती मुलगी आमच्या घरची सून बनण्याच्या योग्यतेची नाही...... हे लग्नाचा खोड डोक्यातून काढून टाकावा...... तुम्ही त्वरित इकडे परत यावा,...... आजी

मी परमिशन घेत नाही आहो ......मी मी सांगतोय तीन दिवसांनी माझं लग्न आहे तेव्हा इकडे सर्व यावे...... आणि कोणाची काय योग्यता आहे ते मला तुम्ही न सांगितलेली च बरे........ तुम्ही सगळे खोटे बोलत माझ्याशी............ श्रीराज थोडा रागात बोलला

तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात....... या लग्नाने तुमचं सगळं आयुष्य बरबाद होणार आहे....... तुम्ही आंधळे होऊन विचार करत आहात.......... तुम्ही इतके मोठे बिझनेस मॅन..... आपलं प्रॉफिट कुठे आहे हे बघून निर्णय घ्यायला हवा...... समाजामध्ये इतका मान आहे आपला........या निर्णयाने तुमची सुद्धा प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते..... कदाचित तुमच्या बिजनेस वर सुद्धा परिणाम होऊ शकतो............... तुम्हाला पाहिजे ती मुलगी भेटू शकते....... मुलींची लाईन लागली आहे तुमच्या मागे....... बोलाल त्या मुलीशी तुमचं लग्न करून देऊ........ पण हिला विसरा आता....... आजी

बिझनेस ,प्रतिष्ठा ,स्टेटस या कोणत्याही गोष्टी तिच्यापुढे मला महत्त्वाच्या नाही..... श्रीराज

तुम्ही जर हे लग्न केलं तर तुम्ही या घरात पाय ठेवायचा नाही......... इथून कोणीही तुमच्या लग्नाला येणार नाही..... तुमचा आमचा संबंध संपला........ आजी

तुम्ही जसं म्हणाल तसं ......पण मी हे लग्न करणारच आहे....... श्रीराज

शशिकांत ने आजीकडून फोन काढून घेतला आणि फोनवर बोलले आम्ही सगळे लग्नाला येऊ..... आणि फोन ठेवला

तुमचं पण डोकं तुमच्या मुलासारखं फिरलं वाटते........ मुलाच्या हट्टापुढे तुम्हाला काहीही दिसत नाहीये..... तो एक मूर्ख आपला आयुष्य बरबाद करायला निघालाय आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय........ आजी चीडतच बोलली

आई माझा ऐकून घ्या तुम्ही शांत व्हा... शशिकांत

माझ्या बिझनेस पार्टनर ची मुलगी मी त्याच्यासाठी बघून ठेवली आहे .....तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हा बिजनेस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे जर त्याने पार्टनरशिप तोडली तर आपल्याला खूप मोठा लॉस होईल वरून बिजनेस मध्ये जे काही नाव आहे ते सुद्धा कमी होईल...... तुम्हाला पण माहिती आहे हे लग्न टिकू शकत नाही..... सहा महिन्यातच ते मोडेल........ गॅरेंटी देतो मी तुम्हाला..... जर तो या घरात ना बाहेर गेला तर मग कधीच परत घरात येणार नाही.... तो किती स्वाभिमानी आहे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे....... हे लग्न होऊन जाऊ द्या...... तो स्वतः हे लग्न मॉडेल...... आणि आपण घरात आहोतच आपणही तशी व्यवस्था करूच..... शशिकांत

हे सगळं ऐकून श्रीराज आईच्या डोळ्यात पाणी आले....

अहो पण तो आपला मुलगा आहे..... तुम्ही असे कसे वागू शकता त्याच्यासोबत.... आई

हे बघ नीती जे मी करतोय ते योग्यच करतोय...... तुला तरी पटतय का ते लग्न .......तुला तरी काही सुख दिसतय का त्या लग्नामध्ये....... शशिकांत

आई गप्प उभी होती....... या सगळ्या विचारांमुळे तिचा डोक्याचा भुगा झाला होता...... तिला काहीच कळत नव्हतं..... काय चाललाय काय वाईट काय...... तीन पण गप्पपणे होकार दिला...

सुनबाई आणि यातलं काहीही त्याला कळता कामा नये..... आजी
 

श्रीराज लग्नाच्या तयारीसाठी लागला होता..... लग्न अगदी साध्या पणाने घरगुती लोकांमध्ये होणार होते.......

रोहन मला तु संध्याकाळपर्यंत इथे हवा आहेस...... लग्नाची सगळी तयारी तुला बघायची आहे...... लग्नासाठी काय हवं नको ते तू बघून घे....... .. फार फार वाटलं तर मदतीला राहुल  ला तू घेऊ शकतोस..... जास्ती कोणाला काही कळू देऊ नको.... श्रीराज फोनवर रोहनला इन्स्ट्रक्शन्स देत होता.......

समोर टेन्ट वाले टेंट  घालत होते..... रोहन जातीने सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत होता..... काय हवं नको ते बघत होता....... वाड्या समोरच मोठं अंगण होतं तिथेच लग्न होणार होतं.......

श्रीराज चेअरवर बसून लग्नाची सुरू असलेली तयारी बघत शांत बसला होता...... त्याचे डोळे पाणावले होते...... पाच वर्षापासून त्याने जे सुंदर, गोड गुलाबी स्वप्न रंगवले होते ते अशा पद्धतीने पूर्ण होईल हा विचार मनात येऊनच त्याच्या हृदयामध्ये कळ उठली होती........ सारखे विचार मनात येऊन त्याचा गळा दाटून आला होता..... त्याच्या डोळ्यात न पाणी खाली गालांवर ओघळल......... रोहन दुरून त्याच्याकडे बघत होता......... त्याला सुद्धा त्याच्या मनाची अवस्था कळत होती....

रोहन ने त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारली आणि शांत केले........ सगळ ठीक होईल, तुझं प्रेम सगळं ठीक करेल काळजी नको करूस....

तेवढ्यात मामी तिथे आल्या  ....त्यासुद्धा श्रीराजला खूप वेळापासून बघत होत्या..... बाळा खूप मोठा निर्णय घेतला आहेस तू...... तुझं प्रेम आम्हाला कळत होतं पण आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही...... तुझ्या आजी साहेबांनी तसं  सगळ्यांना बजावलाच होतं ....... माफ कर बाळा आम्हाला सगळ्यांना...... मामी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या...

तो मामीच्या कमरेला बिलगून लहान मुलासारखा रडायला लागला......

बाळा असं खचून कसं चालणार आहे...... तुला आता खूप खंबीर व्हायला लागेल आहे..... मामी

त्याने मान हलवली आणि डोळ्यातले अश्रू पुसले आणि तो कामाला लागला....

अखेर तो लग्नाचा दिवस उजाडला...... त्याने प्रेम गोल्डन कलरचा कुर्ता पायजमा आणि त्यावर रेड फ्लावर प्रिंट चा वेस्ट कोट घातला होता........ रेड कलर चा फेटा बांधला होता...... कपाळावर मुंडावळ्या खूप शोभून दिसत होत्या....... आईने त्याच्या कपाळावर कुंकू लावून त्याचा औक्षवण केलं...... तो राजबिंडा नवरदेव खूप शोभून दिसत होता.....त्याचं असं रूप बघून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले ....... जी आई मुलाच्या लग्नाचं सुंदर स्वप्न बघत असते ते आज अशा प्रकारे पूर्ण होईल तिला असह्य झालं...........तिने त्याच्या कपाळावर कीस केलं...... नी डोळे पुसत ती तिथून निघून गेली.....

मुहूर्ताची वेळ झाली...... श्रीराज मांडवात स्टेजवर येऊन तिची वाट बघत उभा राहिला....... आणि फायनली ती वेळ आली..... ती समोर गेटमध्ये तिच्या आजी सोबत आणि काही लहान मुलींसोबत येऊन उभी राहिली........ .. तिने लाल रंगाचे गोल्डन काठ असलेली साडी घातली होती...... त्यावर सोन्याचे दागिने घातले होते...... हातात हिरवा चुडा त्याच्या आजूबाजूला सोन्याचे कंगन....... केसांची लांब वेणी त्यावर तिच्या आवडत्या फुलांचे गजरे लावले होते...... चेहऱ्यावर नावापुरतीच मेकअप होता...... नाकात नथ.....कपाळावर मोत्यांची मुंडवळ आणि कपाळावर तिची नेहमीची चंद्रकोर ची टिकली.....
ती आधीपासूनच दिसायला खुप सुन्दर होती त्याला ती नेहमीच कुठल्याही अवतारात आवडत होती... पण आज ती        नवावधू रूपात ती खूपच सुंदर दिसत होती....... श्रीराज तिला मंत्रमुग्ध होऊन बघत उभा होता..... त्याच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू आलं......

फायनली आज तो दिवस आला...... आज तू माझीच होणार आणि आता मी तुला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही बाळा..... खूप चुकलो मी मी जे तुला सोडून तिकडे गेलो.... पण आता कधीच कधीच तुला सोडून कुठेच जाणार नाही..... तू फक्त माझी आहेस.... माझीच आहेस राणी..... आय लव यू मोर द्यान  लाईफ.......... मनातच श्रीराज बोलत होता........

तिला तसं नववधूच्या रुपात बघून त्याच्या डोळ्यातून एक अश्रू खाली आला........... आणि त्याला तो चार दिवस आधी तिला भेटायला आला होता ते आठवलं...........

*******

क्रमशः

 

Circle Image

Radhika

Teacher

Hello friends.. I am Megha Amol... I am computer engineer... I like to explore new things .... I am very much art lover ...my Megha rangolies very much loved by social media friends .... I like reading a lot .... I have started reading books.. novels... historic books from my very young age .....so now I am trying my writing skills here...hope you will likey stories ... Thank you ???? Take care ????