Login

नंदिनी .... श्वास माझा 85

राज नंदिनी

भाग 85

( आधीच्या भागात : नंदिनी संगीत कार्यक्रमाच्या वेळी सगळ्यांसमोर राजसाठी असलेले आपले प्रेम व्यक्त करते ... दगदग आणि सकाळी पावसात भिजल्यामुळे नंदिनीला थोडा ताप चढला होता, औषधांमुळे ती लगेच झोपी गेली....त्यामुळे राज आणि नंदिनी मध्ये काही बोलणं होत नाही .... इकडे आजी (नंदिनी ची) आणि राहुल नंदिनीला सगळा भूतकाळ कसा माहिती झाला ते सविस्तर सांगतात ... सगळे खूप आनंदित असतात . आता पुढे ...)

पहाट होत आली होती....... नंदिनीला  जाग आली तर ती राजच्या मिठीमध्ये होती.....आणि समोर राजचा चेहरा..... राज तिला पकडून शांत गाढ झोपला होता ... झोपेतही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता ....ती बराच वेळ त्याला न्याहाळत होती.... त्याच्या ओठांवर हलकेसे हसू आहे असे तिला त्याला बघून वाटले...ते बघून तिच्या पण ओठांवर हसू उमटले.....नंदिनीचा ताप आता उतरला होता , तिला बरेच फ्रेश वाटत होते .... भूक पण थोडी लागली होती ... पण तिला त्याच्या प्रेमळ उबदार मिठीतुन उठावं, वाटत नव्हते......प्रेमाची अनुभूती झाल्यावर आज पहिल्यांदा ती त्याच्या मिठीत झोपली होती... रात्री संगीत कार्यक्रम नंतर रूममध्ये आल्यावर , बेड वर झोपल्या नंतरचे तिला फार काही आठवत नव्हते... राजच्या मिठीत कधी व कसे झोपले हे सुद्धा आठवत  नव्हते आणि आता तशी पण तिला काही काळजी नव्हती...आणि रात्री काय झालं हे आठवायचा भानगडीत ती पडली सुद्धा नाही..mm.... कारण  जे पण होते ते तिला खूप गोड आणि हवेहवेसे वाटत होते ..... तिने त्याच्या केसांमधून हात फिरवला...आणि परत त्याला बिलगून , त्याच्या डायरीमध्ये लिहिल्या गोष्टी आठवत ...परत तिला कधीतरी झोप लागली...

रोजच्या वेळेवर राजला जाग आली......बघतो तर नंदिनी त्याला अगदी घट्ट पकडून झोपलेली होती...त्याच्या हालचालीमुळे तिची झोप चळवळली...तिने झोपेतच आपलं डोकं त्याच्या छातीवर घासले........ तिला तसे करतांना बघून त्याला हसू आले....तिची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने तिच्या डोक्यावर हळूवारपणे थोपटले...ती परत झोपली...त्याला सुद्धा तिला सोडून उठायची अजिबात इच्छा होत नव्हती....बऱ्याच दिवसानंतर ती त्याच्या मिठी मध्ये झोपली होती....तशी ती आधी पण झोपायची पण तेव्हा एक लहान मूल म्हणून ती जवळ होती....आज सगळंच वेगळं होते.... त्याचं किती वर्षांपासून बघितलेले स्वप्न पूर्ण झाले होते ...त्याची नंदिनी  त्याच्या मिठीत होती....अजूनही शरीराने ते जवळ आले नव्हते , नवरा बायको म्हणून  शरीराने ते दूर होते ....पण मनाने मात्र जवळ आले होते , त्यांच्यात असलेले नाते त्यांनी स्वीकारले होते, हेच त्याच्यासाठी खूप मोठं होते......किती बोलायचं होते .... काल पासून त्याला बोलायचा चांसच मिळत नव्हता....पण काल तिला बरे नव्हते , तिला आरामाची गरज आहे म्हणून त्याने तिला उठवले नाही .....  आज लग्न...... सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली असली तरी सगळं एकदा नजरे खालून घालणं पण गरजेचं होते .... त्याला तिच्या जवळून उठायची इच्छा तर नव्हतीच पण मन मारत शेवटी तो उठलाच......तिच्या कपाळावर हात ठेवत तिचा ताप चेक केला....तिला ताप नव्हता ,त्याला हायसं वाटलं.... हळुवारपणे तिची झोपमोड होणार नाही याची दक्षता घेत त्याच्या हातावरील तिचं डोकं अलगदपणे खाली उशीवर ठेवले....तिच्या अंगावर पांघरुण नीट करत तो बेड खाली उतरला....  फ्रेश होऊन खाली निघून आला...

सगळं रिसॉर्टच बुक केल्यामुळे बाहेरचं कोणीच नव्हते.... सगळे घरचे जवळचे लोकं होती....त्यामुळे एकदम घरच्यासारखेच वातावरण होते. आज रिसॉर्ट एकदम पारंपरिक मराठमोळ्या स्टाईलने सजवले होते ... आंब्याची तोरणं , झंडूच्या फुलांच्या माळा.... पारंपरिक जरीच्या बॉर्डर असलेल्या खणांच्या कापडांचे पडदे लावले होते .... जुन्या पद्धतीची कोरीव लाकडी फर्निचर त्यात उठून दिसत होते......राज सगळीकडे नजर फिरवत होता...

खाली घरातील बाकी मंडळी सुद्धा होती... बहुतेक सगळ्यांनीच नंदिनीच्या तब्बेतीची विचारपूस केली ... काही जणांनी त्याची माफी सुद्धा मागितली होती... गमतीत म्हणा किंवा मुद्धाम ...काही लोकांकडून त्याचे मन दुखावल्या गेले होते , काल रात्रीच्या नंदिनी च्या कथेमुळे आणि फोटो पेंटिंगमुळे सगळ्यांनाच नंदिनी आणि राजच्या नात्याची सत्यता कळली होती , तो कुठल्या परिस्थितीतून गेला आहे याची ते लोकं कल्पना सुद्धा करू शकत नव्हते... नंदिनीमुळे त्या लोकांचे डोळे उघडले होते... त्यांचा राज नंदिनी आणि देशमुख परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता .... ' घरी पागल बायको, बाहेर मस्त मज्जा करता येते , त्यात तो इतका श्रीमंत , विचारणार कोण होते ....अशा पद्धतींचे ताशेरे राजवर ओढले होते .... आता त्यांना आपल्याच विचारांची लाज वाटत होती... खरं आहे ना ... आपण एखाद्या व्यक्ती बद्दल किती लवकर मत बनवतो...मनाला येईल तसे बोलून जातो , अगदी समोरच्याचे मन दुखावयाला सुद्धा मागेपुढे बघत नाही... तो व्यक्ती कुठल्या परिस्थितीतून जात आहे,  आपण कोणीच ते जाणून घेण्याची इच्छा सुद्धा नाही करत की आपल्याला त्याची गरजही वाटत नाही... आपल्या दोन क्षणाच्या एन्जोयमेंट पुढे दुसऱ्याचा त्रास सुद्धा दिसत नाही.... हा असा कसा आपला स्वार्थ?... आणि म्हणूनच ते सगळे राज जवळ माफी मागत होते ..... राजने पण काहीच झाले नसल्यासारखे भासवत सगळं माफ केले... आणि तो होता सुद्धा तसाच...त्याचे लक्ष्य ठरले होते...त्यामुळे कोण काय बोलतेय ... त्याने सगळंच दुर्लक्षित केले होते... नंदिनी , आपला परिवार आणि आपले काम येवढच काय तो बघत होता .....

आज राज सगळ्यांना वेगळाच भासत होता....सगळ्यांसोबत हसून काय बोलत होता.... गंमती जमती काय करत होता...राहुलच्या , भावांच्या खोड्या काय करत होता..... त्याला सुद्धा त्याच्या बहिणी चिडवत होत्या.....मध्येच लाजत काय होता..... एकंदरीत तो खूप खुश दिसत होता....

इकडे नंदिनीला जाग आली....बघते तर बरीच सकाळ झाली होती...बाजूला बघितले तर राज नव्हता... तिचं मन खट्टू झाले.....पण झोप छान झाली होती... पहाटे उठून परत झोपलेली , ती तिची हक्काची झोप झाली होती...एकदम शांत निवांत..... आळोखे पिळोखे देत उठली , बाजूला नजर गेली तरी एक फोल्ड केलेला पेपर आणि त्यावर एक फुल ठेवले होते..... नंदिनीला ते बघून खूप गम्मत वाटली... तिने लगेच तो पेपर हातात घेतला.....आणि उघडला...

डियर नंदिनी ,
बरं वाटतंय ना आता ? ( नंदिनीने त्या प्रश्न सोबत होकारार्थी मान हलवली) . मी लग्नाची तयारी बघायला खाली जातो आहो...वरती रूममध्येच ब्रेकफास्ट पाठवतो आहो , तिथेच खाऊन घे...बाजूला औषध ठेवलंय ते घे.....आराम कर......खाली अजिबात यायचं नाही.....

- श्रीराज
खाली एक मोठी स्मायली काढली होती...

" Oh my God ... My first love letter ....."....लिहिले अगदी साधेच होते, पण ते सुद्धा बघून तिला भयंकर आनंद झाला होता ....ती बसल्या बसल्या बेडवर उड्या मारत होती.

ठरल्या प्रमाणे रूम मध्ये ब्रेकफास्ट आला होता...त्यात तिच्या आवडीचा थोडासा पास्ता...बाकी सगळं हेल्दी फूड  आणि ज्यूस होते...

" Yuuummm ........ राज it's super tasty "..... नंदिनिने पास्ता  एक चम्मच खाल्ला.....आणि तिला लगेच कळलं होतं पास्ता राजने बनवलेला आहे ते.... तिने पटापट नाश्ता आटोपून औषध घेतले..

" Super .... Perfect morning ...."... तिला खूप स्पेशलवाले फिलिंग येत होते... इतके सारे हाताखाली काम करणारे लोकं असून सुद्धा , अगदीच कशाच , मोठेपणाचा बडेजाव  न दाखवता , राजने हौसेने नंदिनिसाठी स्वतः बनवून ब्रेकफास्ट पाठवला होता... नंदिनीला त्याचे खूप कौतुक वाटले....

लग्न लवकरच होते , थोड्या वेळात मेकप आर्टिस्ट आली होती...त्यामुळे नंदिनी तयार व्हायला तिच्या रूममध्ये निघून आली... रात्री ती राजच्याच रूममध्ये झोपली होती ... पण आता सगळं तिचं सामान तिच्या रूममध्ये होते..... राजची तिने वाट बघितली...पण तो सुद्धा काही कामात अडकला असेल, तयारीला उशीर नको व्हायला  विचार करत ती तिच्या रूममध्ये आली...

राज आपले कामं आटोपून वरती रूममध्ये आला तर नंदिनी तिथे नव्हती.... त्याला काळजी वाटली बाहेर जाण्यासाठी वळणार तोच त्याला बाजूला टेबल वर एक पेपर आणि दोन फुलं ठेवलेली दिसली ...

प्रिय शरू ,

(शरू नाव वाचलं नी त्याचे डोळे आनंदाने भरुन आले....हृदय आनंदाने उड्या मारू लागले.....त्याचा आनंद त्याला सांभाळल्या जाईना....)

Thanks for the love letter.... माझं पहिलं वहिलं प्रेम पत्र....

(" वेडाबाई."....त्याला ते वाचून खूपच गंमत वाटली)

मला एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटत आहे .... मी ब्रेकफास्ट केला आहे , औषध सुद्धा घेतले आहे ... मेकप आर्टिस्ट वाल्या ताई आल्या म्हणून तयारी करायला जाते आहे ...

खरं तर हे सगळं फोनवर पण सांगू शकली असती.... पण फोन मध्ये ती मज्जा नाही जी पत्रात..... म्हणजे या प्रेम पत्रात आहे....आणि पत्राचे उत्तर पत्रातच असायला हवे... नाही काय? जे दिलंय तेच मिळायला हवे ना....

आणि हो पास्ता सुपर यम्मी होता .... 

तुझीच , तुझीच , तुझीच
नंदू

नंदिनीने दोन्ही नावांजवळ सुबकदार नक्षी काढल्या होत्या....

" First love letter....".. राजच्या चेहऱ्यावर हसू फुलले...... " नंदिनी तू अशी कितीतरी पत्र लिहिली आहेस ..... आणि मी पण तुला खूप पत्र पाठवली आहेत.....आणि अशी छोटी नाही.. खूप मोठी ,अगदी तीन चार पानांची ...तुझं लिखाण अजिबात बदलेले नाहीये.... अशीच लिहायची ...जिथे मोकळी जागा असली पत्रात  अशीच चित्र , नक्षी , फुलं काढत असायची ..".....राजला जुन्या आठवणी आठवत होत्या....

नंदिनीला पत्र खूप आवडायची.... जेव्हा पण आठवण आली तेव्हा वाचता येते....परत परत तो क्षण जगता येतो म्हणायची.....राज वर्षातून एकदा नंदिनीच्या गावाला यायचा , त्यामुळे वर्षभर , त्यात दिवाळी आणि राजचा वाढदिवस असला की  नंदिनी राजला पत्रच लिहायची....आणि उत्तर सुद्धा पत्रानेच द्यायचं ,खडसावून ठेवले होते त्यातही छोटे नाही तर ती लीहेल तेवढेच मोठे पत्र तिला हवे असायचे....... त्यामुळे तो सुद्धा तिच्यासारखीच पत्र नंदिनीला लिहून पाठवत होता .... तिचा हा हट्टाहस त्याच्या आता कामी आला होता....या काही वर्षात या पत्रांच्या रूपाने त्याची नंदिनी त्याच्या जवळ होती... ते वाचून , तो परत ते क्षण जगून घ्यायचा.... म्हणून सकाळी उठला तेव्हा आधी त्याला तिला मेसेज करावा वाटला पण नंतर त्याला तिची आवड आठवली आणि त्याने ती नोट लिहिली होती .... पण त्याला त्याचं उत्तर जे मिळालं होते ते त्याच्या अपेक्षेच्या बाहेर होते ... त्याचा आनंद गगनात मावेना झाला होता.... त्याच्या नंदिनीने त्याचा  ' शरू '  म्हणून उल्लेख केला होता ... आता जावे आणि तिला आपल्या मिठीत घ्यावे त्याची इच्छा झाली आणि तो लगेच तिच्या रूमकडे जायला वळला... पण त्याचा लक्षात आले की ती तयार होते आहे .... आणि खट्टू मनाने परत आला.... लग्नासाठी थोडा वेळ उरला होता...तयार व्हायला हवे म्हणत तो आपल्या तयारीला लागला.

................

नंदिनी राजच्या रूममध्ये आली... पुढे राजला बघून तर एकाच जागी स्तब्ध झाली.....राज आरसा समोर उभा तयारी करत होता, अगदी राजकुमार दिसत होता.  नंदिनीला आवडतो अगदी तसाच......त्याने शेविंग पण ट्रिम केली होती ....त्याचा तो देवदासवाला लूक कुठल्या कुठे गायब झाला होता.......तिला समज आल्यापासून जसा मुलगा तिने विचार केला होता अगदी तसाच...किंवा त्याहूनही जास्त छान तिला तो भासत होता...नंदिनी तर त्याला पापणी न हलवता बघत होती.किती बघू नी किती नको असे तिला झाले होते.त्याचे राजबिंडे रूप तिच्या काळजाचे ठाव घेत होते.. भान हरपून दारातच उभी ती त्याला बघण्यात मग्न झाली होती...

राज स्वतःच्याच विश्वात होता...नंदिनी सोबत काय बोलू ?....कुठून सुरू करू?...परत लग्न करायचं काय ? ...असे बरेच विचार त्याच्या डोक्यात फिरत होते...... विचार करतच तो आपली तयारी करत होता .... तयारी झाल्यावर सगळ्यात आधी नंदिनीला भेटायचं म्हणून त्याने बाजूला ठेवलेली मोगऱ्याच्या फुलांची  गजऱ्याची टोपली उचलली आणि नंदिनीच्या रूममध्ये जाण्यासाठी वळला.....  तो वळला तर नंदिनी दारात उभी दिसली... तिला बघून त्याचा हृदयाचा ठोकाच चुकला.....आणि त्याच्या डोक्यात सुरू असलेले सगळे प्रश्न तिथेच थांबले... न बोलता , न विचारता त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती...

नंदिनीने तिच्या लग्नाची रेड कांजीवरम साडी नेसली होती....हातात हिरव्या  त्यात अधून मधून  सोन्याच्या बांगड्या .....साजेसा हलका मेकप ( राजला फार भडक मेकप आवडत नाही तिला माहिती होते , त्याकडे तिने पूर्ण लक्ष दिले होते).. तिने पूर्ण तिच्या लग्नाचा पेहराव केला होता .... अगदी नवंवधू ती त्याला आज भासत होती.

नातं बदललेले होते त्यामुळे एक वेगळच पण गोड असे  अवघडलेपण दोघांनाही जाणवत होते .....दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ लागली होती..  .... काल रात्री संगीतमध्ये जवळ आले  तेव्हा सगळे होते.....पण आता रूममध्ये फक्त दोघंच होते .... सकाळी दोघंही जवळ होते पण एकमेकांच्या नकळत होते.... आता मात्र वेगळं होतं... नंदिनी राजपुढे व्यक्त झाली त्या नंतर असे दोघं पहिल्यांदा समोरासमोर होते....

तिला त्या  नववधू रुपात   बघून राजला  त्यांच्या लग्नाचा दिवस आठवला... त्या दिवशीचे एक एक प्रसंग त्याच्या डोळ्यांपुढे सरकायला लागले.....आणि त्याचं मन थोडं गलबलून आलं.... त्याचे पाय जागीच खिळले आणि तो नंदिनिकडे बघत होता..... राजच्या मनाची अवस्था नंदिनीला काळात होती म्हणून तिने रूमचे दार बंद केले आणि   हळूहळू पुढे राजकडे यायला लागली होती.... दोघांचेही हृदय आता जोरजोराने धडधडायला लागले होते होते......नंदिनी राजच्या पुढे येऊन उभी राहिली....आतापर्यंत दोघांच्याही डोक्यात बऱ्याच गोष्टी होत्या, हे बोलू, ते विचारू ....असे बरेच काही पण आता समोरासमोर आले आणि दोघंही काय बोलायचं तेच विसरले....दोघंही निशब्द झाले होते......जणूकाही त्यांचे शब्दच हरवले..... 

" खूप छान दिसतोय......".... नंदिनीने काहीतरी बोलून बोलायला सुरुवात केली...

" तू पण गोड दिसते आहेस.........".....राज कसाबसा हसत बोलला...

" नंदिनी ..... परत लग्न ......"......

" आपलं लग्न खरं आहे , मला कळायला उशीर झाला...पण  आपलं नातं खरं आहे .... लग्नात दिलेली सगळी वचने तू पूर्ण केली आहेस ... तू प्रॉमिस केलेले सगळे शब्द पाळले.....तू आपल्या नात्याला जपले आहे ... निभावले आहेस .... ".....नंदिनी

" पण .... तुझं स्वप्न ?".....राज

" तू माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केले आहे .... हा मला ते आठवत नाहीये .... पण तू आहेस ना साक्षीदार सगळ्या स्वप्नांचा , वास्तविकतेचा.......तुझ्या सोबतीने प्रत्येक क्षण उत्सवाचा आहे ..... तू माझ्यासोबत लग्न करून मला सन्मानाने तुझ्या आयुष्यात घेऊन आला आहेस.....तेव्हा तू  बांधलेली आपली लग्नगाठ हेच सत्य आहे ...... माहिती नाही मी तुझ्या येवढं निस्वार्थ प्रेम करू शकेल की नाही......... "......नंदिनी बोलतांना थोडी भाऊक झाली होती.......

" नातं तुझं नि माझं ... विश्वासाचं, त्यागाचं , प्रेमाचं आणि ........"...... नंदिनी

तो फक्त तिच्याकडे बघत होता.........

" आणि समर्पणाचं ......."......त्याच्या डोळ्यात बघत तिने त्याच्या पुढे आपला हात धरला......आणि हाताची मुठ्ठी उघडली.......

तिच्या हातात तेच मंगळसूत्र होते जे राजने त्यांच्या लग्नामध्ये तिच्या गळ्यात घातले होते......राज तिच्या हाताकडे बघत होता....ते बघून त्याला खूप आनंद झाला होता पण तिचा एक एक शब्द त्याच्या हृदयाला भिडत होता...... नेहमी नंदिनीचे डोळे वाचून तिला काय हवय नकोय समजणारा ,पण याबाबतीत  तिच्या भावना समजातांना त्याचा गोंधळ उडाला होता.....त्याला  झालेल्या गैरसमजमुळे  त्याचे ते तिच्या सोबत तुटक वागणे, तिच्या दूर पळणे... नकळतपणे का होईना त्याचा नंदिनीला त्रास झाला होता....त्याचे मन दाटुन आले होते....त्याचे डोळे भरून आले होते........

" समर्पण " शब्द ऐकला आणि आता पर्यंत रोखून ठेवलेला त्याचा  श्वास सुटला ....आपोआप त्याचे डोळे मिटल्या गेले.....

"Sorr........."........त्याचे शब्द पूर्ण व्हायच्या आतच  त्याच्या माने भोवतीची पकड घट्ट झालेली होती ..... त्याचा ओठांवर मऊ रेशमी स्पर्श जाणवला.....आणि क्षणात  त्याचे ओठ लॉक झालेत......

नंदिनीला त्याच्या डोळ्यांमधूनच कळले होते की नक्कीच राजला  वाईट वाटत आहे ....त्याची काहीच चूक नसतांना त्याच्या तोंडून तो सॉरी शब्द पण तिला नकोसा झाला होता...... त्याच्या डोळ्यांतील अश्रू बाहेर यायच्या आधीच तिने त्याचा ओठांवर आपले ओठ टेकवत त्याच्या ओठांचा ताबा मिळावला होता.....

इतक्या वर्षांपासून त्याने त्याच्या कंट्रोल केलेल्या भावना आता मात्र त्याला अनावर झाल्या.....आपोआप त्याचे हात तिच्या कंबरेभोवती घट्ट झालेत, तिला किती जवळ घेऊ असे त्याला झाले होते  आणि त्याने तिला आपल्या मिठीमध्ये खूप टाईट केले.....

" Love you Sonya ..... Missed you a lot Raja...... Love you Nandu...........". 

******

क्रमशः


******

नमस्कार मित्रांनो

कोरोनामुळे आजूबाजूची परिस्थिती खूप गंभीर झाली आहे .... अगदी जवळच्या नात्यांमध्ये , मित्र परिवारांमध्ये कोरोनाचे पेशंट निघत आहेत..... मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहे....कशातच मन लागेना झालंय....... औषधं , हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं खूप कठीण होऊन बसले आहे...... प्लीज गरज नसतांना घराबाहेर पडू नका....आणि पडलात च तर सगळ्या नियमाचे पालन करा ही विनंती....

परिस्थिती हाताबाहेर जाण्या आधी आणि नंतर रडत बसण्याआधीच , आपली आणि आपल्या परिवाची काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे आणि आपले कर्तव्य आहे....

शासनाने सांगितलेले सगळे नियम पाळून या कठीण प्रसंगी एकमेकांसोबत उभे राहून देशाच्या सेवेत हातभार लावूया ....

Stay safe ,Take care !!

🎭 Series Post

View all