Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी...श्वास माझा 59

Read Later
नंदिनी...श्वास माझा 59

भाग 58

" राज मला तुझ्यासोबत खूप महत्वाचं बोलायचे आहे , फ्री झाला की सांग ?" ..नंदिनी

" I am always free for you , बोल काय काम आहे ?" राज हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत बोलला.

" राज , मला प्रॉमिस कर , मी जे सांगेल ते तू नीट समजून घेशील, आणि मी जे मागेल ते तू मला देशील ?" ....नंदिनी

" नंदिनी, प्रॉमिस चे काय त्यात? देण्यासारखे असेल तर नक्कीच देईल, " ... राज

" राज, मी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी साठी प्रिपरेशन केले होते,  त्यात माझे सिलेक्शन झाले आहे आणि मला स्कॉलरशिप सुद्धा मिळाली आहे  " ....नंदिनी

" अरे वाह  छान,  तू मेहनती आहे  आणि सोबत हुशार आहे " .... राज

" राज मला तिथे जायचं आहे " ...नंदिनी

" काय......? का..?...." ...राज

" राज माझ तिथे जाऊन शिकायचं स्वप्न होतं,   मला तिथे जाऊन शिकायचं आहे....." नंदिनी

" No ..." ... राज

" राज यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे , मी माझी मेहनत वाया नाही जाऊ देणार , माझं स्वप्न आहे ते , मला पूर्ण करायची आहे " नंदिनी

" नंदिनी तुला जे शिकायचे आहे ते तू शिकू शकते,   पण इथेच ,  बाहेर  नाही..." राज

" नाही, मला तिथेच जायचे आहे , आणि मी जाणार आहे "  नंदिनी

" नंदिनी, I don't want to argue on this, you are not going anywhere " .. राज

" राज, माझं ठरले आहे , मी जाणार म्हणजे जाणारच" ...नंदिनी चा आता हत्तीपणाचा सुर सुरू झाला होता.

" नंदिनी, उगाच हट्टीपणा करू नको, इथे राहून जे करायचे ते कर " राज

" No , I am going , and that's final...... I don't want to discuss anything on this now "...... म्हणतच नंदिनी रागातच तिच्या रूम मध्ये चालली गेली.

" काय झाले आहे हिला, का अशी हट्टीपणा करायला लागली ?""....राज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विचार करत होता..

***

सकाळी डायनिंग टेबल वर एकदम शांतता होती. नंदिनी, राज चुपचाप शांत बसले नाश्ता करत होते.....नाश्ता झाल्यावर नंदिनी ने परत विषय काढला..

" असे चूप बसून  प्रॉब्लेम  सुटणार आहे काय??? आपण बोलूया त्यावर, काहीतरी सॉल्युशन निघेलच " ....आबा

" आबा, आता तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम वाटतो??? हा माझ्या भविष्यासाठी चांगली संधी आहे .....तुम्हाला ते का दिसत नाही आहे "...नंदिनी

" नंदिनी, तू कुठेही जाणार नाही आहे , हे फायनल आहे . तुला जे हवे ते सगळे तुला आणून देईल, जे हवे ते इथे कर " ...राज

" माझं ते स्वप्न आहे, त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे ...मला जायचं आहे " ...नंदिनी

" नंदिनी, राज बरोबर बोलतो आहे , तू जे बोलते आहे ते प्रॅक्टिकल नाही आहे " ...राहुल

" तुम्ही सगळे फक्त राज ची साईड घेत आहात , माझं म्हणणे कोणाला कळतच नाही आहे , माझी पण काही स्वप्न आहेत, तुम्हा कोणाला का कळत नाही आहे ???" .....नंदिनी

" नंदिनी , बाळा तू कधीच कुठे एकटी गेली नाही आहे , म्हणून म्हणतोय तो " .... आईं

" नंदिनी, तुला बोलायला सोपं वाटते आहे हे सगळे, पण तूच राज शिवाय राहू नाही शकत, त्याला सोडून तू एकटी कधीच राहिली नाही आहे .... काही वर्षांपूर्वी तो ऑफिस च्या कामाने दिल्ली गेला होता, तर तू एका दिवसात ताप काढला होता, रात्रीतून परत आला होता तो....भारतातच होते तर पॉसिबल झाले ते, भारता बाहेर होऊ शकणार आहे काय??" ...राहुल

" हेच, हेच नकोय मला, आता मला माझ्या मताने आयुष्य जगायचे आहे ....माझे निर्णय मला घ्य्याचे आहे ...., मला तुम्ही कोणी कधीच कुठे जाऊ नाही दिले आहे ....आणि कदाचित आधी तशी गरज पडली नाही, पण आता मला संधी मिळते आहे , त्या संधीच सोनं करायला हवे मी " ...नंदिनी

" नंदिनी, you can't live without him, why you are not understanding???" .... राहुल

" मी राहू शकते, आणि मी राहून सुद्धा दाखवणार..... मला सेल्फ डीपेंडेंट व्हायचे आहे , किती दिवस मी अशी राज वर अवलंबून राहू,??? I want to enjoy my life on my rules...., आणि म्हणूनच मी जाणार आहे " ....नंदिनी

" Nandini, I don't want more argue on this... Now close this topic...my decision is final....you are not going anywhere...." ..... राज नंदिनी कडे बघत बोलला नी आपल्या रूम कडे जायला निघाला......जातच होता की नंदिनीचे शब्द कानावर पडले, आणि तो तिथेच थिजला.....

" Who gave you rights to take decisions of  my life...??? It's my life , my rules.....why always you want to control my life ..?? का मी नेहमी तुझ्या मता प्रमाणे जगायचं......का मी प्रत्येक वेळ तुझी परमिशन घ्यायची.....who are you ??? तू कोण आहेस माझा???? Ohh yess , we are married ...right??? म्हणून तू आता नवरेगिरी करणार तर???? ते जे काही झाले होते, त्या लग्नाला मी लग्न मानात नाही, तो केवळ एक खेळ होता..एक पोरखेळ.........मला जायचं आहे .... दम घुटतो आहे माझा ....मी का नेहमी तुझे ऐकावे.......तू फक्त आपल्या मताचे करतो, you are selfish......
 

"नंदिनी................ थाड.." ........एकच आवाज घरभर घुमायला लागला........एकदम शांतता पसरली.....

नंदिनी बोलतच होती की आईने जोरदार तिच्या गालावर जोऱ्याने एक थापड मारली....

सगळे अचानक झालेल्या या आवाजाने फक्त नंदिनिकडे, राजकडे  बघत होते.......

आवाजाने राज चे हृदय हेलावले....नंदिनीच्या शब्दांचे वार तर त्याच्या हृदयावर झालेच होते , पण आई ने नंदिनीच्या गालावर मारलेले त्याच्या हृदयात घाव करून गेले होते......

" तू ठीक आहेस ?? तुला लागलं नाही ना ? " राज नंदिनी जवळ येत तिच्या गालाला हाथ लावायला जात बोलला..

" हे सगळं तुझ्यामुळे होत आहे ... it's  all because of you only....." नंदिनी गालावर हात ठेवत त्याच्याकडे बघत बोलत होती....तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते.....एकदा तिने सगळ्यांकडे बघितले, एक नजर राज वर टाकली, नी रडतच पळत आपल्या रूम मध्ये निघून गेली.........राज पाठमोऱ्या नंदिनी कडे बघत होता...

" Raj, are you okay???" ... राहुल
L

" आई तू नंदिनीला मारायला नको होते " .....राज आईजवळ येत बोलला

" मग काय करणार होते? तू बघितले ना ती मनाला येईल तसे बोलत सुटली होती , तुला काय काय बोलत होती? "  आई

" आई, तरीसुद्धा तू तिच्यावर हाथ नव्हता उगरयला हवा होता" ...राज

" खूप लाडावून ठेवले आहे तू तिला, आपण कोणासोबत बोलतोय, काय बोलतो आहे ....काहीतरी भान असायला हवे, ... " ....आई

" आई, तू बघितले नाही काय, तिच्या गालावर तुझ्या हाताची सगळी बोटं उलटली होती, तिचा गाल पूर्ण लाल झाला होता " राज

हॉल मध्ये बाकी सगळे या माय लेकांचे बोलणे ऐकत होते, कोणाला काय बोलावे काहीच कळत नव्हते.....आता गोष्ट हाताबाहेर गेली होती, राज सोबत बोलून पण काहीच फायदा दिसत नव्हता..

" राज, अरे मी काय बोलते आहे, तू काय बोलतो आहे??? हे असे कसे रे प्रेम तुझे .....?? ती तुला वाटेल ते बोलली आणि तुला तिला मारल्याची काळजी आहे ?? तू जरी दाखवत नसला तरी तुला आतून किती त्रास होतोय मला कळते आहे ....प्रेम असे नसते रे बाळा, हा वेडेपणा आहे ....वेळीच तिच्यासोबत बोलला असता तर आज ही वेळ आली नसती " ....आई

" आई मला नाही माहिती प्रेम काय आहे? मला नाही माहिती नाती कशी निभावतात.....नकोय मला हे काहीच, मला माझी नंदिनी आनंदी हवी आहे, सुखी हवी आहे ......  आज माझामुळे तिने मार खाल्ला आहे .....आज माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आहे, आज ती माझ्यामुळे रडली आहे , आज माझ्यामुळे तिला त्रास झाला आहे ......मी नाही बघू शकत तिला असे , वेडा म्हणशील तर वेडाच आहे मी, पण  मला नाही होत सहन तिच्या डोळ्यातले पाणी....." ....राज , 

" बाळा , कुठल्या मातीचा बनला आहे रे तू...? का कळत नाहीये तुला, का तुला तुझा त्रास दिसत नाही आहे ??  ..तुला सुद्धा सुखी, आनंदी राहण्याचा हक्क आहे रे बाळा .....का कळत नाही तुला काही...?? " ...आई

" आई, नंदिनी खुश आहे तर मी खुश आहे . मी नंदिनी ला बघतो, खूप लागलं आहे तिला.....रडत असेल ती "  म्हणतच राज वरती रूमकडे निघून गेला.

सगळे स्तब्ध राज कडे बघत होते.......कोणीच त्याच्या प्रेमाची खोली समजू शकत नव्हते.......

नंदिनी रडतच खिडकीजवळ बाहेर बघत उभी होती......तिला कळत होते आज ती थोडी जास्तच बोलली होती.....खर तर पहिल्यांदाच ती असे काही बोलली होती.....ज्याचे तिला वाईट सुद्धा वाटत होते....

राज ने नंदिनीच्या रूम चे दार नॉक केले......नी दारातच उभा होता.......अचानक हा असा दुरावा कसा आला दोघांमध्ये कळतच नव्हते, कधीही एकमेकांच्या रूम मध्ये हवे तेव्हा ते दोघे जात होते....पण आज हे असे वेगळेच घडत होते .

राज ने दार नॉक केले नि तिथेच उभा होता......आवाजाने नंदिनी ने मागे वळून बघितले.....एकदा राज कडे बघत परत ती मान वळावत बाहेर बघत होती...

राज तिच्या जवळ येऊन उभा राहिला.....तिने एकदा राज कडे बघितले नी परत पुढे बघत होती .

राज चे सगळे लक्ष तिच्या गलाकडे होते.....त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला, तिचा गाल खूप लाल झाला होता, थोडा सुजल्यासारखाही वाटत होतं..ते बघून त्याच्या काळजात धस्स झाले ......राज ने खिशातून ऑईनमेंट ची ट्युब काढली, त्यातले थोडे क्रीम घेत तिच्या गालावर फुंकर मारत हळूवारपणे लावत होता.....नंदिनी  नजर खाली झुकावत चुपचाप उभी होती.......राज मात्र तिच्याकडेच बघत होता.......नंदिनीच्या डोळ्यात आता परत पाणी जमायला लागले होते....तीच मन भरून आले होते ...

" सॉरी " .......म्हणतच ती राजच्या कंबरे मध्ये हाथ घालत त्याच्या कुशी मध्ये गेली.....तिचा  आवाज खूप कातर झाला होता...." मला माफ कर राज, आज नको ते ते बोलली मी, खूप दुखावले तुला....पण मी गेल्याशिवाय तू तुझ्याबद्दल , तुझ्या लाईफ बद्दल विचार करणार नाही , मी तुझ्या डोळ्यांपुढे असेल तर तुला सतत माझीच काळजी लागून राहिलं....." नंदिनी राज च्या भोवतीचा आपल्या हाथाचा विखळा घट्ट करत मनातच बोलत होती.

तिला असे जवळ आलेले बघून, त्याच्या सुद्धा मनावरचा ताण थोडा कमी झाला होता......त्याने तिला आपल्या मिठीत पकडून घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता....

" जा " ......राज तिच्या डोक्यातून कुरवाळत बोलला

तो शब्द ऐकून नंदिनी त्याच्याकडे बघायला लागली...

" तू खुश असशील ना??? जा मग " .......राज तिच्या डोळ्यात बघत बोलला..

" आई ??? , बाकी घरतले सगळे??? " ......नंदिनी

" मी समजवेल सगळ्यांना, नको काळजी करू " ......राज

" खरंच ?? " ......नंदिनी

" ह्मम"........राज

" Thank you " .....आनंदाने तिने परत त्याला मिठी मारली......आता त्याच्या डोळ्यात मात्र पाणी होते....

नैना जो साँझ ख्वाब देखते थे
नैना बिछड़ के आज रो दिए हे यूं
नैना जो मिलके रात जागते थे
नैना सेहर में पलकें मीचते हे यूं

जुदा हुए कदम
जिन्होंने ली थी ये कसम
मिलके चलेंगे हर दम
अब बाँटते हे ये गम
भीगे नैना जो खिड़कियों से झांकते थे
नैना घुटन में बंद हो गए हे यूं

सांस हैरान हे
मन परेशान हे
हो रही क्यूँ रुआँसा ये मेरी जान हे

क्यूँ रुआँसा से हे
आस हारी हुई
क्यूँ सवालो का उठा सा
दिल में तुफान है

नैना थे आसमान के सितारे
नैना ग्रेहण में आज टूटते हे यूं
नैना कभी जो धुप सेंकते थे
नैना ठहर के छाओं ढूंढते हे यूं

जुदा हुए कदम
जिन्होंने ली थी ये कसम
मिलके चलेंगे हर दम 
अब बांटते हे ये गम
भीगे नैना जो साँझ ख्वाब देखते थे
नैना बिछड़ के आज रो दिए हे यूं

******

क्रमशः

****

 

 

हॅलो फ्रेंड्स 

आज चा पार्ट खूप लोकांना कदाचित आवडला नसेल....आज सगळे माझ्यावर राग काढतील....पण तो कथेचा भाग आहे ....मनाला लावून घेऊ नका ???? 

Thank you 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️