नंदिनी...श्वास माझा 55

राजनंदिनी

भाग 55

राज ला पहाटे जाग आली....तर नंदिनी त्याच्या कंबरेजवळ हाथाचा विळखा घालून त्याला पकडून शांत झोपली होती......रात्री एक दोनदा ती झोप मध्ये दचकली होती.....पण राज ने तिला डोक्यावरून मायेने हाथ फिरवत, थोपटून झोपवले होते.......

राज ने हळूवारपणे तिची झोपमोड होणार नाही याची काळजी घेत  तिचा हाथ बाजूला केला  ....तिच्या अंगावरचे पांघरुण नीट केले.....तिच्या केसंमधून हाथ फिरवत कपळवर किस केले......नी तिच्या रूम चे दार नीट बंद करून आपल्या रूम मध्ये निघून गेला.....

राजने झोपायचा प्रयत्न केला....पण त्याच्या डोळ्यांपुढे नंदिनी येत होती.....हवेवर उडणारे तिचे केस...साडीचा पदर नीट करतानाची तिची कसरत, डोळ्यात लाजेचे भाव.....त्याच तिच्याकडे बघताच तिचं अंग चोरून घेण्याची  धडपड.......एका पाठून एक चित्र त्याच्या डोळ्यांपुढे सरकत होती......

किती दिवसांनी आज नंदिनी ने साडी घातली......त्यात माझा आवडता हिरवा रंग, किती मोहक दिसत होती....तुझ्या त्या खनखणनाऱ्या बांगड्या माझ्या मनाचा ठाव घेतात,  तुझं ते कपाळावरच हळदीकुंकू तू फक्त माझी आहेस सांगून जाते.....तुझे ते लाजतांना होणारे गुलाबी गाल...मला घायाळ करून जाते.....तुझ्या डोळ्यातले ते लाजरे भाव, मला वेड करून जाते...........कधी कळणार तुला, तू बायको आहेस माझी........कधी संपेल हा विरह.....ये ना ग लवकर..... वाट बघतोय तुझी......राज ने आपला मोबाईल घेतला नी त्यात नंदिनीचे फोटो स्क्रोल करत होता.....

*

ह........कोणीतरी आवाज देत होत मला.....कुणीतरी माझी वाट बघत आहे म्हणत होते.........नंदिनी झोपेतून जागी होत बेड वर बसली होती....तिने आजुबाजुला बघितले, कोणी नव्हते.......

शी बाई.....नेहमी प्रमाणे काहीतरी स्वप्न होते....... परत डोळे चोळत इकडे तिकडे बघत होती...... ओह, मी साडी घालूनच झोपली.....पण कधी...???..... रात्री तर राज सोबत लाँग ड्राईव्ह ला गेली होती........ आणि साडी कडे बघत तिला तिचा तो अवघडलेपना आठवला......नी ते आठवून परत तिच्या पोटात काही व्हायला लागले......

अरे यार हे काय होते आहे मला......पोटात छातीत का असं घाबरून व्हायला होते आहे.... काल पासून जरा जास्तीच होते आहे.....नंदिनी उठली नी फ्रेश व्हायला निघून गेली....

*

Good morning Dhomya.......... नंदिनी जिम एरिया मध्ये जात बोलली

गुड मॉर्निंग........ये आता माझं लग्न होणार आहे , हे काय काहीही म्हणते तू ........ राहुल

लग्न होणार आहेत तर काय शिंग फुटली काय तुला.......मी काहीही म्हणेल.....माझी मर्जी........नंदिनी

नंदिनी आगाऊपणा नाही करायचा हा..........राहुल

हा आगाऊपणा नाही आहे......कोणी नवीन येत आहे म्हणून काय तुझं नी माझं नातं बदलायचे काय........मी अशीच राहील, नी अशीच बोलील ,नी अशीच त्रास देईल तुला.......तू आपले बघून घे काय करायचे ते.........नंदिनी

Good morning Raj....... राज ला जिम मध्ये येतांना बघून नंदिनी बोलली नी परत राहुल सोबतच भांडण काँटिन्यु केले...

Good morning Sweetheart........... नंदिनीचे नाक ओढतच तो पुढे त्याच्या फेवरेट सेक्शन ला गेला...

काय भांडण सुरू होते....??.....तुम्ही दोघं नाही सुधारणार ना...... राज

ही नंदिनी च उगाच चिडवत असते.........राहुल

ह्मम......रश्मी छान आहे.....you two looks good together....... राज

Thank you..... हेच एक काम तुझ्या स्वीटहार्ट ने चांगले केले आहे ....राहुल नंदिनीची मस्करी करत बोलला....पण नंदिनी चे या सगळ्याकडे लक्षच नव्हते.....ती तर राज च्या स्पर्शाने, नी स्वीटहार्ट शब्दानेच गोंधळली होती....

"स्वीटहार्ट".......नंदिनी डोळे मोठे करत अवाक होत राज कडे बघत होती........कारण तो नेहमीच तिला चिमणी, सोन्या, राज्या असे काही काही म्हणायचा, पण हे असं स्वीटहार्ट वैगरे त्याने कधीच म्हटले नव्हते....पहिल्यांदाच असे काहीतरी तो बोलला होता........त्यामुळे नंदिनी शॉक झाली होती........तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत राहुल हसत होता.....

आतापर्यंत भांडत असलेली नंदिनी राज च्या येण्याने एकदम शांत झाली होती......नी ती राज कडे बघत होती....राज आपला व्यायम करण्यात बिझी होता....
 

Shriraj Deshmukh is in love again with same girl.........not bad....... very good start brother...., Very much needed step.......... राहुल आळीपाळीने कधी नंदिनी तर कधी राज कडे बघत गालातच हसत होता....

परत पोटात कसं तरी होत आहे.......आतापर्यंत तर ठीक होत सगळं, अचानक परत काय झाले तब्बेतीला.......ती आपली एगझरसैज सोडून परत जायला निघाली...

नंदिनी....कुठे निघाली....??..तुझी एगझरसैज अजून पूर्ण कुठे झाली.....??....राहुल

असू दे...नंतर करेल........म्हणत ती परत जायला वळली

नंदिनी.... काल तुम्ही दोघं उशिरा आलात....म्हणून बोलायचं राहिले........thankx yar Nandini...you are great.....म्हणतच राहुल ने तिला हग केले......तू रश्मीला माझ्यासाठी सिलेक्ट केले.....आणि हो तुला जे म्हणायचं ते म्हणू शकते तू मला......our relation will never change...it will be like this only..... राहूल

Okay........ राहुल जवळ आला तर करंट नाही लागत आहे, काल राज जवळ आला तेव्हा करंट लागत होता.......नंदिनी चे डोक्यात विचार सुरू होते.....

One minute........ राहुल च्या मिठीतुन निघून तिनें जाऊन राज ला मिठी मारली...... तिचं हे असे अचानक जवळ आल्याने राज गोंधळाला......तो एगझरसैज करता करता थांबला नी तसाच उभा राहिला......

नंदिनी ...काय झालं??.....Are you okay..??..... राज

राज ला हग केले तर परत तिला तसेच करंट लागल्यासारखे वाटत होते.....परत आपली काही गडबड होते आहे काय बघून तिने राहुल ला हग केले......

राज राहुल कडे बघत होता...,

काय झालं हिला.........??..राहुल ने इशर्यानेच राज la विचारले.....

माहिती नाही..........राज ने त्याला इशारानेच उत्तर दिले...

राहुल जवळ तर नॉर्मल वाटते आहे........मनातच विचार करत ती परत राज ला मिठी मारली..... परत तिला सेम करंट लागल्यासारखे झाले.............ती झरकन त्याच्या दूर झाली........नी बाहेर पळाली

नंदिनी , ठीक आहेस ना....??...राहुल

हो, मी ठीक आहे.....ओरडतच ती बाहेर पळाली

Funny आहे तुझी स्वीटहार्ट........but good ha bro........ राहुल हसतच बोलला...

ह्मम........राज पळत जाणाऱ्या नंदिनी कडे बघत होता.......

*

नंदिनी......खा ते , थंड होईल......... आई

नंदिनी नाश्त्याच्या पोह्यांचा प्लेट मधून चमचा गोल गोल फिरवत आपल्याच विचारांमध्ये हरवली होती........

ब्रो त्या मेहातांच्या प्रोजेक्ट चे काय करायचे....??...एक विक पासून ती फाईल पडली आहे.......राहुल

ह्मम.....मला दे , बघतो मी.......राज

Okay...... पण फार काही प्रॉफिट नाही आहे त्या प्रोजेक्ट मध्ये.......राहुल

Let's see......... राज

राज नी राहुल ऑफिस च्या काही गोष्टी डिस्कस करत डायनिंग टेबल जवळ येत होते......

"राज."............राज चा आवाज ऐकून परत तिला धडधडायला लागले........आता त्याच्या आवाजाने पण सुचेनासे होत आहे ........काय हा त्रास....काय करू काहीच कळत नाही आहे ...

राज नंदिनीच्या बाजूच्या चेअर वर येऊन बसला.......नी तिच्या प्लेट मधून एक सफरचंदाची फोड उचलली......

अरे यार हा माझ्या जवळ का येऊन बसला.......आधीच कसतरी होते आहे .....खायला पण होत नाही आहे.......परत हा बाजूला........नंदिनी त्याच्याकडे बघत विचार करत होती....

आज भयंकर शांतता आहे घरात.?? कोणीतरी म्युट मोड मध्ये दिसत आहे.....?? ......राहुल

हो, काय माहिती सकाळपासून काय झाले आहे .....बोलतच नाही आहे, फक्त सगळ्यांना मिठी मारणे सुरु होते.......आई

ओह.....हा गेम अजूनही खेळत आहे काय ही.......आज काय हग डे वैगरे आहे की काय...?? ...राहुल

हग करायला काय हग डे च असावा लागतो काय.......माझी इच्छा झाली, मे करेल.....तुला काय प्रोब्लेम..........नंदिनी कुरकुर करत बोलली..

नक्कीच बिनसले दिसतेय काहीतरी..........राहुल

सगळे तिच्या कडे बघून हसत होते...

नंदिनी , पोहे पूर्ण थंड झाले......दे इकडे गरम करून देते........काकी

काकी, राहू द्या, नको मला........नंदिनी

नंदिनी...काय झालं.....??....चेहरा काय असा उतरला वाटतोय तुझा..?? बरं वैगरे वाटत नाही आहे काय.......??.... काकी

काकी काल पासून पोटात आणि इथे छातीत कसेतरी होत आहे.........नंदिनी छोटासा चेहरा करत बोलली

बरं नाही वाटत ...??...काय होते आहे??..डोकं वैगरे दुखत आहे काय..??...डॉक्टर कडे जायचं काय....??राज काळजीने तिचा हाथ आपल्या हातात घेत एका हाताने तीच कपाळ गळा ला हात लावत चेक करत बोलला.

परत करंट लागला.....तिने त्याच्या हातातून आपला हाथ काढून घेतला.....

नाही, डोकं नाही दुखत आहे....फक्त हे पोटात कसेतरी होत  आहे .........नंदिनी

असीडिटी झाली असेल....... काल तुम्ही उशिरा पण आलात ना घरी.....झोप नसेल झाली नीट.....म्हणून तसे होत आहे, थांब तुला आलेनिंबु देते..... बरं वाटेल........आई

बाहेर काही खाल्ले होते काय नंतर.....??.....आई

नाही...........राज नी नंदिनी एकसाथ बोलले..नी एकमेकांकडे बघत परत त्यांची नजरानजर झाली........

सूनबाई दृष्ट काढून घ्या त्यांची........ काल साडी मध्ये सुंदर दिसत होत्या.....सगळ्या नजरा वळून वळून त्यांनाच बघत होत्या....... आजीसाहेब

हो, माझीच लागली असेल....., हे असे काही नसते राज, तू कधीपासून या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागला.....??? पण मी पण तर तिला वळून वळून बघत होतो............राज मनातच विचार करत होता......

Ohh..... तर असिडीटी मुळे होत आहे असे........नंदिनी ला आता रिलॅक्स वाटत होत.....

हो आईसाहेब.......निती

नीती हातात काही लाल मिरच्या घेऊन आली नी नंदिनी ला नीट बसवत तिच्या डोक्यापासून पायापर्यंत हातांनी वरतून खाली काही बडबडत करत होती........नंदिनी त्यांच्या हाताकडे वरती खाली अशी बघत होती......राहुल ला खूप हसायला येत होते...

लक्ष्मी च्या नारायणाची पण काढून घ्या.......त्याच्याकडे पण लोक वळून वळून बघत होते..... स्पेशली मुली.......राहुल ला आता मस्करी करायचा मूड झाला होता.......

हो हो......बरोबर आहे तुझं..........निती राज जवळ सुद्धा त्याची दृष्ट काढायला गेली...

अग आई तो गंमत करतो आहे .....आणि हे काय ......या कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवून बसले आहात तुम्ही.....?? असं काही नसते.......,..राज

तुझं असू दे रे , आमचा आपला आहे विश्वास तर........करू दे , तुला काही त्रास होतो आहे काय.....?? नीती

राज, तुमच्या भाषेत सांगायचं झाले तर, त्या मिरच्या किंवा अजून आपण जे वापरतो त्याने तुमच्या भोवती निर्माण झालेली negative energy , हवेलतले किटाणू वैगरे शोषून घेतात........ आजीसाहेब

आजिसहेब बोलल्यावर कोण काय बोलणार.....राज चुपचाप बसला....

अरे हे तुमचं बरे आहे, बेगानी शादी में अब्दुला दिवना......मुलगी बघायला मी गेलो, नी दृष्टब्या दोघांची काढत आहात........कठीण आहे, माझी तर कोणालाच पर्वा नाही.......राहुल

हो ग माझं सोन पिल्लू ते......काकी त्याची मस्करी करत त्याची पण दृष्ट काढत होती....

आई, रश्मी ची पण काढून घे तिचं नाव घेऊन.....तिला पण लागू शकते दृष्ट....ती पण छान दिसत होती ना काल......... राहुल

हे घ्या.....हे ही गेले हातातून........काय करावं या नातवांचे....??....काय खाऊन जन्माला घातले तर.........??...मोठा तर वेडाच झाला आहे , दुसरं काही दिसतच नाही त्यांना........ आवरा सूनबाई आताच छोट्या साहेबांना.........अजून लग्न ही नाही झाले तरी येवढी प्रगती आहे.......पुढे जाऊन आणखी काय काय बघावं लागते काय माहिती........... आजीसहेब

राज तर डोळे मोठे करत आजिसहेबँकडे बघत होता......आजिसहेबांनी त्याला वेडा जे म्हटले होते...... राहुल तर तोंड दाबून हसत होता.......

आजीसाहेब , देशमुख खानदानाची परंपरा म्हणातात याला......आबांनी सुरू केली, नी आता ती पुढे राहुल चालवणार.........नंदिनी हसतच बोलत होती......तिला आजी ने राज साठी मोठा शब्द वापरला , ते तिला कळले नव्हते....आणि आजी राहुल बद्दल बोलतय ते समजलं होते...

नंदिनीचे बोलणे ऐकून आता मात्र सगळ्यांनाच हसू येत होते.......सगळे आजिसहेबांचे लक्ष चोरत  हसत होते..

हे ....हे ...सगळं तुमच्यामुळे आहे........आजिसहेब आबावर गराजल्या

आता मी काय केले.....??....तुमचं बरं असते कोणीही काही केले तरी फिरून आमच्यावरच येता........आबा

आणि तसेही तो सुखी संसाराचा मंत्रच आहे.......बायकोचं ऐका........ राहूल वेल डन........शिकला तू, सुखी राहशील.......आबा मस्करी करत होते...

तुमच्यासोबत तर बोलायलाच नको.........आजिसहेब आतमध्ये निघून गेल्या....

काय हो आबा .....किती त्रास देता आजिसहेबांना......बिचाऱ्या आमच्या आजीसहेब.........नंदिनी

हा हा हा.....तुमच्या आजिसहेब त्रास करून घेतात तरी काय स्वतहाला........ बरं चालू द्या तुमचे मी बाहेर उन्हात बसतो..... चल रविकांत........आबा रविकांत बाहेर गेले...

हो का ग गधडे....तू पण काही कमी नाही आहेस.......काकी ने एक धपाटा नंदिनीच्या पाठीत मारला...,..धक्का लागून तिच्या हातातला चमचा राजच्या साईड ने खाली पडला......नंदिनी चमचा उचलण्यासाठी खाली वाकली तेवढयात राज पण चमचा उचलण्यासाठी खाली वाकला.......चमचा उचलणार तेवढयात दोघांची नजरानजर झाली.........राज च्या नजरेत काही होत ज्याने तिच्या नजरेला बांधून घेतले.....नंदिनीची नजर राजाच्या नजरेत कैद झाली होती........राज पण तिच्या हिरव्या घाऱ्या डोळ्यांमध्ये हरवला होता......

पाच मिनिट पूर्ण झाले.........राहुल दोघांकडे बघत घडी मध्ये वेळ बघत होता.....आणि गालात हसत होता.....

आंखो ही आंखो मे इशारा होगाया.....बैठे बैठे जिने का सहारा मिल गया......... गुडुम ........खाली ग्लास पडल्याचा आवाज झाला.....

का रे, का त्रास देतोस त्यांना......?? काकी

अगं आई तुला त्यांची कॅपॅसिटी माहिती नाही , दोन चार तास सहज पोहू शकतात ते.........राहुल

पोहू...??..... काकी

एकमेकांच्या डोळ्यात ग...........राहुल ने जीभ बाहेर काढली.....

बदमाश..........काकी त्याच्या पाठीत धबुक्का देत किचन मध्ये चालल्या गेल्या...

ग्लास पडण्याच्या आवाजाने राज नंदिनी भानावर आले.......नी एकमेकांपासून नजर चोरत परत चमचा घ्यायला खाली वाकले...

धुडुम..........दोघांचेही डोके एकमेकांवर आपटले होते...

याचं काही होऊ शकत नाही.....रश्मी मै यहा , तू कहा........ म्हणत राहुल तिथून ऑफिस तयारी करायला निघून गेला....

आ ssss..........नंदिनी डोकं चोळत ओरडली...

नंदिनी.....दाखव लागलं तर नाही.......राज तीच डोकं चोळत त्यावर फुंकर घालत होता

नाही....ठीक आहे........नंदिनी

सॉरी मन्या.....ते चुकून झाल..... सॉरी......दुखत नाही आहे ना .......राज काळजी करत तीच डोकं आपल्या एका हातात पकडत चोळत होता.........

राज..............

ह्ममम.......

मी ठीक आहे आता........नंदिनी

Ohh sorry...... म्हणत त्याने तिच्या कपाळावरचा हाथ बाजूला केला...

काकी, आई मी येते, कॉलेज ला निघते आहे.......नंदिनी ओरडतच बॅग उचलत बाहेर जायला निघाली....

नंदिनी.........

ह्मम...........

अँसिडीटी होते आहे ना...... बरं नाही वाटत आहे ना....??

ह्मम....

मग घरीच आराम कर...., ऑफिस मध्ये पण यायची गरज नाही........

ठीक आहे आता......जाते कॉलेज ला, बरं नाही वाटले तर लवकर येईल.....

ह्मम..... चल मी सोडतो तुला कॉलेज मध्ये........नाहीतर ड्रायव्हर काका सोडतील....

Raj, I am okay.......

ठीक आहे, काही वाटलं तर फोन कर......

Okay....... नंदिनी परत जायला निघाली ..

नंदिनी........

ह्मम......

बाहेरचं काही खाऊ नको........

Okay........ नंदिनी परत जायला निघाली

नंदिनी.......

काय राज...........

एक मिनिट......म्हणत तो तिच्या जवळ गेला.....नी तिच्या डोक्याला आपल्या दोन्ही हातात धरत हळूवारपणे तिच्या डोक्याची नी आपल्या डोक्याची ठो केली.......नंदिनी तर तो काय करतोय हे बघत होती......

राज......हे काय होत.......

मला कुणीतरी म्हणाले होते......एकदा ठोस झाली तर परत करायची असते, नाहीतर शिंग येतात.......

Seriously Raj......... तू पण वेडा आहेस, मला पण वेड लावशील...........नंदिनी हसत होती त्याच्या अश्या बालिश वागण्यावर.....

ह्मम.....good day and take care....

You too ...... नंदिनी बाईक काढून कॉलेज ला गेली

वेडा तर आहोच मी, तू वेडी कधी होशील त्याची वाट बघतोय..........राज ने हसतच आपल्या केसंमधून हाथ फिरवला...

*

नंदिनी, तुझ्यासाठी काय ऑर्डर करू.......सुहास

मला काही नकोय......नंदिनी

का....??....सुहास

माहिती नाही, काल पासून थोडे असिडीटी सारखं होते आहे.........नंदिनी

ओके.........सुहास

नंदिनी आणि तिचे फ्रेंड्स कॉलेज कॅन्टीन मध्ये बसले होते....

नंदिनी आपल्याच विचारात होती........

ये आर्याविर....तुझा हाथ दे रे......नंदिन

काय..,??.....आयाविर

अरे दे रे..,..मला ना काही दिवसांपासून करंट लागल्यासारखं होत आहे.....काहीतरी static energy चा प्रभाव दिसतो आहे........कुणी हाथ लावला, जवळ आला तर करंट लागल्यासारखे होते.....चेक करायचं होत....म्हणत तिने अर्यविर, सुहास नी बाकी एक दोन मुलांना हात लाऊन बघितला पण तिला काहीच जाणवलं नाही.,....

हा हा हा हा.......नंदिनी हे काय लहान मुलांसारखी बोलते आहेस...,रेवा

अग नाही, खरंच, तो जवळ आला की करंट लागतो आहे........नंदिनी आपल्याच विचारात बोलून गेली

तो....???.....सगळे एकसाथ डोळे मोठे करत तिच्याकडे बघत होते......

ह........नंदिनी

Who is he....??.... रीता

कोण......कोणी नाही........नंदिनी

तोच.....ज्याच्या जवळ येण्याने करंट लागतोय..??..... रिवा

नाही नाही असे काही नाही ......नंदिनी

ओके.....नंदिनी तुला कुठला मुलगा आवडत नाही काय ग..........??....रीता

म्हणजे....??.....नंदिनी

म्हणजे असं कोणी,ज्याला सतत बघावसे वाटते.....तो सतत आपल्या अवतीभोवती असावा..... ज्याचं बोलणं सतत ऐकावसे वाटते.......reva

रेवा बोलत होती नि नंदिनीच्या समोर राज येत होता.....

तो जवळ आला की पोटात फुलपाखरं उडायला लागतात....

हा......हे काय...??...हे काय फुलपाखरं...??..मला तर असिडिटी होते आहे......ये हे काय फालतू बडबड करताय तुम्ही......आधीच बर नाही वाटत त्यात तुमची ही फालतू बडबड.......मी चालली घरी......नंदिनी, नंदिनी तिथून निघून गेली....

Something is wrong with her...... आर्याविर

I think she likes someone....but she is not sure.......... रेवा

ये जाऊ दे ना, कशाला उगाच आपल्या दिमाखाचे घोडे दवडत आहे.....तशीही तिची तब्बेत बरी नव्हती वाटत......सुहास

तू पण उल्लुचा पठ्ठा आहेस...... चल सोड..... रेवा

***

नंदिनी चे ने आजकाल असेच झाले होते.....तीच कॉलेज मध्ये, घरी कुठेच मन लागत नव्हते.....ऑफिस मध्ये पण तिची चिडचिड वाढली होती.....घरातही तिची चिडचिड होत होती.....राज असला की शांत असायची....नसला की तिचं कशातच मन लागायचे नाही.... पण तो जवळ आला की मात्र तिच्या हृदयाची धडधड वाढत होती, तिला परत असिडीती झाली की काय वाटायचं....आणि परत ती तिथून पळ काढायची......तीच काय चाललं आहे, कोणाला काही कळायला मार्ग नव्हता.....

ऑफिस मध्ये पण राज ला कोण आवडते याचा तिचा तपास सुरू होता....पण तिच्या हाती काहीच लागत नव्हते.....राज कुठल्याही मुलीच्या फार जवळ तिला दिसला नव्हता....त्यामुळे राहुल ने आपली मस्करी केली असेल असा तिचा समज झाला होता....उगाच आपल्याला त्रास द्यायचा म्हणून राहुल ने आपल्याला काहीतरी कहाणी बनाऊन सांगितली असेल.....असे तिला वाटले होते......पण राज ने पण तिला सांगितले होते त्याला कुणीतरी आवडते....पण ते सद्ध्या one sided च वाटत होते त्याच्या बोलण्यावरून.....त्यामुळे तिने ती मुलगी कोण आहे याचा तपास करणे सध्यातरी बंद केले होते...... नी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले होते....कारण या सगळ्या प्रकारामुळे तिचं अभ्यासाकडे बरेच दुर्लक्ष झाले होते.....जे तिला स्वतहालाच आवडले नव्हते.

*
ये wow नंदिनी...... तुझं सिलेक्शन झाले आहे ..... California च्या University मध्ये.... सहा महिन्यांच्या स्पेशल कोर्स साठी........ सुपर्ब यार........सुहास

ह्मम......नंदिनी

अग असे तोंड पाडून बसायला काय झालं..??....इतकी छान न्यूज आहे, आणि तुझं त स्वप्न होते तिथे जाऊन तो कोर्स करूचा........रेवा

हो, पण घरचे पाठवतील काय.....?? तो विचार करत होती....

का नाही पाठवतील....तुला तर स्कॉलरशिप पण मिळाली आहे.......रीता

मी कधीच एकटी कुठे गेली नाही आहे ....म्हणून......नंदिनी

तू समजवं, ऐकतील ते.........सुहास

ह्मम......बघू , काहीतरी करावं लागेल.......नंदिनी

******

क्रमशः

🎭 Series Post

View all