Oct 24, 2021
प्रेम

नंदिनी..श्वास माझा 12

Read Later
नंदिनी..श्वास माझा 12

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग-12


 

काय यार नंदू तू स्वप्नात पण माझ्या खोड्या करत असतेस झोपु दे गं...... ...... कान हलवत शरू झोपेतच बोलत होता

मी स्वप्नात नाही खरोखरच आली इथे ....... उठना आता उद्यापासून झोपायचं आहे तुला........नंदू खुसुर पुसुर आवाज करत त्याच्या कानात बोलत होती.....

तिच्या आवाजाने त्याने ताड्कन डोळे उघडले....

ये बाई अशी रात्रीची तू इथे काय करते आहे.... ....... तो थोडा जोरात बोलणारच होता की नंदूने तिचा हात त्याच्या तोंडावर दाबून धरला ...

shhh .....ए हळु बोल ना... जागे होतिला ना सगळे.... नंदू

त्याला बोलता येत नव्हते, तो इशाऱ्याने तिला तोंडावरचा हात काढ म्हणत होता... नंदू ने त्याच्या तोंडावरून हात काढला तसा तो झोपल्या ठिकाणी उठून बसला.... नी आजूबाजूला बघत होता तर त्याला रोहन दिसला नाही....

तू इथे काय करतेस इतक्या रात्रीची.... हार्ट अटॅक येता येता राहिला मला ,असं कोणी येऊन बसतं काय  समोर ,ते ही इतक्या मध्यरात्री..... आणि तू आत मध्ये कशी आली, दार तर  बंद होते ना..... शरू

हा ते रोहन बाहेर बालकणी मध्ये काहीतरी करतोय , दार उघड होतं... नंदू

काय करायला आली इतक्या रात्रीची तू इथे, सांगायचं असतं ना इतकी आठवण येते माझी आलो असतो मी...... शरू तिची मस्करी करत बोलला

ए फाजीलपणा पुरे कर आता.... दोन-तीन दिवसापासून काहीच वेळ घालवायला भेटला नाही मला तुझ्या सोबत, ही चांडाळ चौकडी तुझ्या सोबत असते सतत ......आता काय तो शांत वेळ भेटला, चल आता लवकर.... म्हणत नंदू त्याला तिच्या गच्चीवर घेऊन येत होती.... शरूनी रोहन ला इशारा केला आणि तो नंदू सोबत तिच्या घरी गच्चीवर दोघंही उड्या मारून आले.

एकच रात्र मध्ये उरल्याने आणि इतके दिवस तिला त्याच्या सोबत पाहिजे तसा वेळ न घालवता आल्यामुळे तिने रात्री सोबत घालवण्याचा प्लॅन केला होता..... ती रात्री सगळे झोपायची वाट बघत होती.... शरूच्या रूमचा लाईट बंद दिसल्यावर तिच्या लक्षात आलं की आता सगळे झोपले तशी ती गच्चीवरून उडी मारून शरूच्या गच्चीत गेली... तिला रोहन बाहेर बालकनीत सीग्रेट पितांना दिसला त्यामुळे शरूच्या रुमचं दार अनायसे तिला उघडे सापडलं... आणि ती आत मध्ये शरूला उठवायला गेली होती.. ..दोन तीन दिवसाची दगदग आणि नंदूच्या तब्येतीमुळे रात्रीची झोप नीट न झाल्यामुळे थकलेला शरू आज लवकरच झोपी गेला होता...

बापरे तू तर पूर्ण रात्र जागायची प्लॅनिंग करून ठेवलेली दिसते ......शरू गच्चीवर नजर फिरवत बोलला..

आजीच्या डब्यातल्या खाऊचे चार-पाच प्लेट ,पाण्याची बॉटल ,खाली चटई टाकलेली होती.....

नंदू चटईवर जाऊन बसली

ए इथे माझ्या समोर येऊन बस ना ,  मला तुला नजर भरून बघून घ्यायचे आहे .......नंदू

बापरे मॅडम तर रोमँटिक मूडमध्ये दिसून राहिल्या .......नंदू मस्करी करत तिच्यासमोर जाऊन बसला.... जशी आपली आज्ञा राणीसरकार..... तो हसत बोलला ...

रोमँटिक वगैरे काही नाही हा, मला खूप खूप खूप गप्पा मारायचे आहे तुझ्यासोबत आणि इथे कोणी डिस्टर्ब करणार नसेल आहे,  फक्त तू आणि मी.... नंदू त्याचा हात आपल्या हातात घेत बोलली...

ओ हो मोठ्या झाल्या तर नंदिनीबाई.... तो डोळे मिचकावत बोलला.......

श्रीराज............... नंदूने हळू आवाज दीला.... तिच्या हातात एक छोटासा बॉक्स होता...

खाऊ खाताखाता तो आपलं नाव ऐकून तसाच डोळे फाडून तिच्याकडे बघत राहिला......

काय म्हणालीस..........? तुला श्रीराज म्हणता येते...??... शरू आश्चर्याने तिला विचारले...

आज तिने पहिल्यांदा त्याला श्रीराज म्हणून आवाज दिला होता...

हो पण मला शरू च  म्हणायला आवडते,  तुला शरु फक्त मी एकटीच बोलते ना, मी दिलेलं ते नाव आहे म्हणून मला ते फार आवडते........

मी एक छोटसं गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी....... म्हणत तिने तिच्या हातातला बॉक्स ओपन केला..... त्यात एक छोटसं श्री कोरलेलं गोल्ड पेंडंट होतं..... तिने त्याच्या हातात दिलं ...

खूप छान आहे .......शरू ते पेंडेंट हातात घेत बोलला.....

श्री फॉर श्रीराज....... अजून एक स्पेशालिटी आहे टर्न करून बघ........नंदू

शरूने ते टर्न के,ले त्यावर बारीक अक्षरात  SN असे लिहिले होते........

SN.. म्हणजे श्रीराज नंदिनी.... नंदू

खूप सुंदर आहे हे ,मी सदैव आहे माझ्याजवळ ठेवेल ....शरू

ठेवेल नाही घालायची, असं म्हणत नंदूने तिच्या गळ्यातली एक लांब चेन काढली त्यात ते पेंडंट घातलं ,नी  शरूच्या गळ्यात ते घातलं...... हे बघ  आता मी  नेहमी तुझ्या ह्रदयात जवळ राहील , ते पेंडंट हातात घेऊन त्याच्या हृदय वर धरत,. आता मी तुझ्या हृदयाच्या जवळ राहिल आहे नेहमी साठी,, आता तू तिकडे गेला तरी तुला माझी नेहमी आठवण राहील म्हणजे तुझी दुसऱ्या मुलीकडे चुकूनही नजर जाणार नाही नंदू मस्करी करत बोलली.

अरे सोन्या तुझ्या शिवाय कोणी नव्हतं आणि कोणी नसणार आहे ..... मी हे असच घालून ठेवेल कधीच काढणार नाही ....शरू तिला जवळ घेत बोलला.

तू खरच परत येशील ना, टीना त्यादिवशी बोलली तिकडे गेला की तिकडंन कोणी परत येत नाही.......... नंदू थोडी  चिंतित बोलली.

अरे बाबा असं काहीही नाही होणार आहे ....
तू कुणाचेही ऐकत बसते...... मन्या आता तू मोठी झाली आहे, खूप लोक तुझ्या लाईफ मध्ये येतील, कोणाचा ऐकायचं कोणाचं सोडून द्यायचं कोणाचं मनावर घ्यायचं आता तुला समजायला हवं....... असं प्रत्येकाचं बोलणं जर मनावर घेतलं तर आयुष्यातले आनंदाचे क्षण घालून बसशील......शरू

ह्म्म.....नंदू ...तरी तिचं त्याच्या उत्तराने समाधान झाले नव्हते पण तिने तो विषय बदलला...

नंतर बराच वेळ तो तिला बारावीनंतर काय शिकायचं कॉलेजमध्ये कसं राहायचं असं बरंच काही सांगत होता... मध्येमध्ये एकमेकांची मस्करी करणं, मारामारी करणं सुद्धा सुरू होतं.... 

शरू माझ्यासोबत डान्स करशील.... माझ्या वाढदिवसाला केला होता तसा.....नंदू

म्युझिक.....?....शरू

म्युझिक ची गरज आहे का ,आपल्या दोघांचे हार्ट बिटस च आपल्यासाठी खुप स्वीट म्युझिक आहे...नंदू त्याच्या डोळ्यात बघत बोलली...

तो हसला ...नी तो उठून उभा राहिला....... शरूने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि एक हात तिच्या कमरेत घातला.... नंदूने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती घातले.... आणि ती त्याच्या पावलांवर जाऊन उभी राहिली..... आणि नजर त्याच्या नजरेला भिडवली
.... बिना म्युझिकचे सुद्धा ते खूप छान डान्स करत होते..... दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले होते,.. आता शरूनी त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घेतले होते आणि तिच्या कपाळाला स्वतःचा कपाळ टेकवून डान्स करत होता....तोच पायाने स्टेप्स घेत होता ,नंदू तर त्याच्या पायावर त्याला पकडून उभी होती.... पुष्कळ वेळ ते दोघे एकमेकांमध्ये हरवून डान्स करत होते...

रात्र बरीच झाली होती त्यामुळे आता थोडी थंड हवा जाणवायला लागली होती...

नंदू चल आता खाली जाऊन झोप, येथे थंडी वाढत आहे....शरू

नाही मला पूर्ण रात्र तुझ्या सोबतच घालवायची आहे.... नंदू हट्ट करत बोलली.

तिचा मन मोडेल तो शरू कसा.......

बरं थांब एक मिनिट मी जाऊन येतो मनात शरू खाली नंदूच्या रूम मध्ये गेला आणि तिथून त्याने एक शोध घेऊन आला.....

बरं चला आता इथे मोकळ्या हवेत बसून नको ...आत्ताच दोन दिवस तुला ताप होता ....चल आपण तिकडे झुल्यावर बसू तिथे थोडं शेड आहे,  हवा लागणार नाही ....शरू

शालूने नंदूला झुल्यावर नेऊन बसवले आणि तिच्या खांद्यावर डोक्यावरून शाल ओढली मी तिच्या बाजूला जवळ जाऊन बसला...... नंदूने एक हात आपल्या माने  खालून  घेतला, डोके त्याच्या खांद्यावर ठेवले, नी दोन्ही पाय वर पोटाजवळ घेऊन..त्याच्या कुशीत  जाऊन बसली...

शरू आई-बाबा तारे बनवून खरंच आकाशात चमकत असतील काय रे आजी मला लहानपणी असंच सांगायची....नंदू

हो बघते तिकडे दोन तारे एक आई एक बाबा, ते बघ आपल्याकडेच बघत आहेत...... तू आता नीट राहायचं, असं रडायचं वगैरे नाही ,असं खचून जायचं नाही ... तुला असं रडताना दुःखी झालेलं बघून त्यांना किती वाईट वाटेल.....शरू

ह्म्म.,नंदू

शरू..  केस कापणारे तू आणि टिना सेमच दिसता, असे लांब केस कुणी मुलगा करत असतो काय,  ही असली कसली फॅशन तुझी.... त्याच्या डोक्यावर हात फिरवत नंदू बोलली..

ओके.... नेक्स्ट टाईम येईल तेव्हा छोटे करून येईल शरू हसत बोलला..

पण तू तुझे है कैस असेच ठेवायचे बिलकुल कापायचे नाही छोटे करायचे नाही, मलाही असेच आवडतात......... तिची केसांची एक बट आपल्या बोटांमध्ये फिरवत खेळत तो बोलला

ह्म्म...नंदू

आता जवळपास पहाटेचे तीन-साडेतीन वाजत आले होते.... तरी त्यांच्या गप्पा सुरूच होत्या.... हळूहळू नंदू पेंगत होती ती तशीच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली..... त्याने पांघरून तिच्या अंगावर नीट केले........ तो सुद्धा समोर टेबलवर पाय लांब करुन झुल्याला पाठ टेकवून .... तिच्या केसात हात फिरवत..... झोपी गेला....

पहाटेच्या पक्ष्यांच्या  किलबिलाटाने शरू ला जाग आली.... घड्याळात बघितले तर साडेपाच झाले होते....

बापरे इथेच झोपलो की काय मी पण.....

नंदू शरू च्या मांडीवर छान गाढ झोपली होती ,तिला तसं झोपलेलं बघून त्याला आतून आनंद झाला..... मन्या अशीच सकाळ हवी आहे ग रोज मला, बघ आता एकदा शिकून आलो आणि करियर चांगलं सेट के झालं की लगेच इकडे येऊन आबासाहेबांकडून तुला नेहमीसाठी घेऊन जाईल... प्रॉमिस आहे माझं तुला ........तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत शरू मनातच बोलत होता...

त्याने तिला आपल्या कुशीत दोन्ही हातांवर उचलून घेतलं नी.... खाली तिच्या रूममध्ये आला तिला बेडवर नीट झोपवून तिच्या अंगावर पांघरूण घालून तिच्या कपाळाचं किस घेऊन तो गच्ची वरूनच उडी मारून त्याच्या रूम मध्ये निघून गेला.....

*******

सकाळी सगळ्यांची निघायची तयारी झाली होती, चहा नाश्ता आटोपून सगळ्यांना भेटून शरू आणि त्याचे मित्र गाडीत सामान ठेवत होते.....

तुम्ही सामान ठेवा मी आजी आबासाहेबांना आणि नंदूला भेटून येतो ,....शरू त्याच्या मित्रांना बोलला नी नंदूच्या वाड्यात निघून आला....

सगळी तयारी झाली बाळा.....आजी

हो आजी, नंदू कुठे आहे... शरू

जा बघ, बहुतेक झोपलीये, उठव तिला ......आजी तिचे काम करत बोलली..

शरूनी काही मोगऱ्याचे फूल तोडलीत, फुले आणि  एक मोरपीस घेऊन तो नंदूच्या रूम मध्ये गेला....

रात्री उशिरा झोपल्यामुळे नंदू खूप काळ झोपली होती.....

शरू तिच्या शेजारी जाऊन बसला त्याने मोगऱ्याची फुलांची टोपली तिच्या डोक्याजवळ ठेवली..... नी मोरपीस तो तिच्या चेहऱ्यावर अलगद फिरवत होता.....

श....शू..... करत नंदू ने चेहऱ्यावर हाताने माशी  उडवण्या सारखे केले नी परत झोपली...

तिच्या अशा वागण्याने शरूला हसू आले....... बावळटच आहे माझी चिमणी....

त्याने ते मोरपिस तिच्या अंगावर ठेवले नी तिचं रूप डोळ्यात साठवून घेतलं .. काळजी घे राजा स्वतःची.... बोलत त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं..... तिच्या डोक्यावर कीस करून डोळे पुसत तो बाहेर आला.....

खाली येऊन आजीला जाऊन नमस्कार आणि हग केले...

नंदू नाही आली खाली ,वरती पायाऱ्यानकडे बघत आजी बोलली

अगं नाही ती झोपली आहे ,माझं उठायचं मन नाही झालं तिला ,रात्री उशिरा झोपली होती.....शरू

(शरू ने तिला मुद्दाम उठवले नव्हते....नाहीतर त्याला जायला खूप जड गेले असते नी त्याला जाताना बघून नंदूला त्रास झाला असता... जे त्याला नको होते..)

हो रे लबाडा ,तरीच म्हटलं डब्यातला खाऊ संपला कसा....... आजी त्याचा कान ओढत बोलली..

अरे पण उठायचं होतं ना तिला, उठल्यावर ती आमचं डोकं खाईल ना  मला उठवलं का नाही म्हणून..... आजी

ठीक आहे ग एवढं काही नाही... शरू

आबासाहेब खुर्चीवर बसले होते ,त्यांच्या पायाजवळ जाऊन बसला....

त्यांच्या मांडीवर आपले हात ठेवून...... काळजी घ्या आबासाहेब..... शरू त्यांना नमस्कार करत बोलला..

लवकर परत ये बाळा ...... आबासाहेब त्याच्या डोक्यावर हात ठेवत बोलले....

हो आबासाहेब, हा गेलो आणि हा आलो..... हसत सरू बोलला.. आणि घराबाहेर पडण्यासाठी तो दरवाजाजवळ आला आणि परत काहीतरी आठवल्यासारखं करुन आबासाहेबांचे जवळ परत आला.....

आबासाहेब परत आल्यावर मी नंदूला घेऊन जाणार आहे,... काय ते लाड करायचे ते आत्ताच करून घ्या, नंतर ऐकणार नाही हा कोणाचं......  तो डोळ्यात पाणी आणत  बोलला... त्याचा आवाज आता कापरा झाला होता......... डोळे पुसतच घराबाहेर पडला....

सगळं कळते रे बाळांनो खुश राहा ... आबासाहेब आपले दोन्ही हात वर करत आशीर्वाद दिल्यासारखे मनातच  बोलले...... त्याच्या डोळ्यातल्या आसवांनी सगळं खरं काय ते  आबासाहेबांना सांगितलं होतं....

**********
शरू ने  तिच्या चेहऱ्यावर मोरपिस फिरवल्यामुळे तिची झोप मोडली होती....., दहा मिनिटातच ती जागी झाली होती,.. आळस देत ती उठली बघते तर तिच्या अंगावर मोरपीस ठेवलं होतं आणि बाजूला मोगऱ्याची फुलं तिला दिसली... मोरपीस हातात घेऊन एकटक त्याच्याकडे बघत गोल गोल फिरवत होती...

अच्छा तर हा शरू येऊन गेला वाटतं..... आणि मग अचानक तिला आठवलं,... अरे आज तर् हा  जाणार होता, तिने घड्याळाकडे बघितलं 8.५ झाले होते...... ती होती त्या अवतारात तशीच पळत खाली आली.....

आजी आजी शरू आला होता का... नंदू ओरडतच बोलली

अग हो ,पाच मिनिट झाले आत्ताच गेला.... तुला भेटायला आला होता वर पण तू गाढ झोपली होती म्हणून उठवला नाही बोलला.... आजी

अगं पण उठायचं होतं ना मला.... नंदू ओरडतच बाहेर पळाली

अग कुठे चालली..... आजी

अगं थांब येते बघून, जास्ती दूर नसेल गेला म्हणती तिने बाहेर धूम ठोकली........

तिचा जीव आता घाबरा झाला होता..... ती तशीच पळत निघाली होती.... तिने आड वळण्याचा छोटा शॉर्टकट रस्ता रस्ता पकडला आणि त्या रस्त्यावरून पळत होती.....

मला न भेटता कसा काय जाऊ शकतो तू शरू, हा आपल्या या भेटीचा शेवटचा क्षण तू माझ्याकडून कसा हिरावून घेऊ शकतो... मला मला बघायचे होते तुला  , तुझ्या मिठीत एकदा यायचे होते... एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.......... रडत रडत पळत होती.... आणि ती मोठ्या रस्त्याच्या जवळ येऊन पोहोचलई.... आणि तिला शरू ची गाडी दिसली... गाडी अजून यायची होती....

शरू......शरू.... जोराने ती आवाज देत होती.... रस्त्यापासून थोड्या उंच भागावर ती उभी होती...गाडी निघून  ना जावी म्हणून घाईघाईने ती खाली उतरायला गेली.... तिचा पाय घसरला आणि ती घसरतच खाली आली....

शरूने तिला बघितलं आणि लगेच च रस्त्याच्या एका साईडला गाडी उभी केली... गाडी थोडी पुढे निघून गेली होती... तो गाडीतून उतरून लगेच पळत नंदू जवळ आला....

त्याला  पळताना बघून बाकीचे पण गाडी बाहेर येऊन उभे राहिले....

नंदू घसरल्यामुळे खाली पडली होती होती, कसाबसा स्वतःला सावरून ती बसली होती...

तिचा लाईट पिवळा पटियाला सलवार, ओढणी सुद्धा घ्यायला ते विसरली होती... घरातून तशीच पळत निघाली होती तिला एक मिनिटाचा ही उशीर करायचा नव्हता... मोकळे विस्कटलेले केस.., डोळ्यात पाणी, पडल्यामुळे कपाळावर थोडं खरचटलं होतं त्यातून थोडसं रक्त येत होतं आणि हाताला कोपरा जवळ खरचटलं होतं ती लागलेला हात एका हातात घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी शरू कडे बघत बसली होती ,तिचा श्वास फुलला होता....

तिचा तो अवतार बघून शरूच्या काळजात धस्स झालं...
त्याने तिला दोन्ही हातांवर त्याच्या कुशीत उचलून घेतले ,तिने पण तिचा एक हात त्याच्या मानेत टाकून एका हाताने त्याची कॉलर पकडली होती.... नी रडक्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती.... त्याने तिला जवळच असलेल्या झाडाच्या कठड्यावर आणून बसवले...

रोहन फर्स्ट किट बॉक्स..... तो रोहन कडे बघत ओरडला...

रोहन धावतच बॉक्स घेऊन आला.

शरू त्याच्या हातातून बॉक्स घेतला... कॉटन डेटॉल नि तिच्या कपाळावरची जखम क्लीन करत होता.....

स... स्.... तिला थोडी डेटॉल मुळे जळजळ झालं... ती त्याच्याकडे बघत बसली होती

तो फूनकार घालत औषध लावत होता.... ती एकटक त्याच्याकडे बघत होती...

आता सगळे त्यांच्याजवळ जमले होते...मीना पण नंदूच्या मागे आली होती, नंदू तिला रस्त्याने धावताना दिसली तेव्हा ती नंदूच्या मागे आली होती... ती पण खाली  नंदू जवळ येऊन उभी राहिली....  दोघे उभे होते त्यांच्या आजूबाजूला हे सगळे उभे होते... त्या दोघांना बघून बाकीच्यांना पण आता वाईट वाटत होतं..

का निघून आलास मला न भेटता...नंदू डोळ्यांनीच बोलत होती....

तू जागी असताना तुला बघून मला जायला त्रास झाला असता... शरू ने पण डोळ्यांनीच उत्तर दिले...

दोघांनाही आता शब्दांची गरज नव्हती त्यांचे डोळेच एकमेकांशी बोलत होते आणि वाहत होते......

तुला न भेटता किती त्रास झाला असता मला.....नंदू

बाळा काय अवतार करून घेतला आहेस  राणी असं धावत-पळत घ्यायची काही गरज होती का.........मला तुझा त्रास बघायला गेला नसता म्हणून तुला न उठवता निघून आलो..,..शरू

हो होती ,खूप गरज होती......नंदू

परत येशील ना....नंदू

शरूने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या हृदयावर लावला आता तिला त्याचे हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवत होते जसं काही त्याचं हृदय तिला सांगत होतं हो मी नक्कीच लवकर परत येणार... आणि त्याने होकारार्थी मान हलवली

तुला भेटायचा, तुला बघायचा, तुला स्पर्श करायचा  हक्क होता मला... का निघून आला असाच मला न भेटता.....
तुला एकदा करकचून मिठी मारायची होती....
....... तिच्या डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू लागले...

मिठीचा ..... तिच्या मनातलं ऐकून....समजून त्याने तिला मिठीत घ्यायला साठी दोन्ही हात पसरले.....  पण लगेचच त्याच्या लक्षात आले की आपण रस्त्यावर उभे आहोत .. त्याने इकडे तिकडे बघितले.......मग त्याने त्याचे हात मागे खिशात घातले....तो बांधल्या गेला होता .........तिला मिठीत घ्यायची इच्छा असूनही त्याला काही करता येत नव्हतं याचं त्याला खूप दुःख वाटत होतं..... त्याच्या सुद्धा डोळ्यातून आता पाणी खाली येऊ लागलं होतं...

दोघेही भरल्या डोळ्यांनी एकमेकांना बघत तसेच उभे होते,... मनाशी मनाचं बोलणं सुरू होतं....

शरू इकडे तिकडे बघताना रोहनने त्याला बघितले होते आणि त्याच्या लक्षात आलं त्याने सगळ्यांच्या कानात काहीतरी सांगितलं तसे ते सगळे एक लाईन मध्ये  उभे होऊन भिंतिसरखा  आडोसा बनवला .... आता रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना नंदू आणि शरू दोघ दिसत नव्हते...... आणि  सगळे रस्त्याच्या साईड ने  तोंड करून उभे होते.... सकाळची वेळ असल्यामुळे तसेही रस्त्यावर वाहने कमी होती..

जशी सगळ्यांनी एकमेकांजवळ उभे राहून भिंत बनवून रस्त्याच्या साईड ने आपले तोंड वळवले... लक्षात येताच नंदूने आपले पाय  उंच करत आपल्या दोन्ही हातांनी शरूची मान आणि डोकं पकडून त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले ... आणि ती त्याला  किस करु लागली.... शरूला काही कळायच्या आत हे सगळं घडलं होतं......

श्वास घ्यायला जड होऊ लागलं तसं तिने त्याला सोडलं..... तो एकटक तिच्या डोळ्यात आरपार बघत होता आणि त्याने तिच्या डोक्याला पकडून तिला आपल्या छातीजवळ मीठी मध्ये ओढल....आणि तिच्या डोक्यावर कपाळावर केसांवर गालांवर किस करत सुटला..,......

जड मनाने त्याने तिला मिठीतून सोडलं.....
मीना हीची काळजी घे...., एवढं बोलून तो जाण्यासाठी मागे वळला तसे सगळे गाडीत जाऊन बसले........

नंदू तिथेच पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांची गाडी दिसेपर्यंत उभी होती............ 

५ वर्ष नंतर..............
 

********

शरू नंदुचा आता पर्यंतचा प्रवास तुम्हाला आवडला...खूप छान वाटतेय...आता इथून पुढे कथा वेगळे वळण घेत आहे ...अपेक्षा आहे की ते पण तुम्हाला आवडेल..

********

प्रिय वाचक मित्रांनो,
 

खूप खूप धन्यवाद .....तुम्हाला शरू नंदू ची  स्टोरी आवडत आहे ....तुमच्या  कमेंट्स साठी खूप धन्यवाद..

काळजी घ्या...स्वस्थ राहा ????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "