Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी ...श्वास माझा 16 ©️Radhika Megha Amol

Read Later
नंदिनी ...श्वास माझा 16 ©️Radhika Megha Amol

भाग-16 

श्रीराज तिथे चेअरवर बसला होता.......... त्याला कळत नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे.......... त्याने एक मोठा आवंढा गिळला आणि तो आबाजी जवळ जाऊन बसला.......

हे काय झाला आहे ......मला सविस्तर ऐकायचे आहे आबासाहेब........... श्रीराज

सगळ सांगतो पण आधी थोडं खाऊन पिऊन तरी हे आत्ताच आला आहेस.....आबासाहेब

नाही ते नंतर बघेल आधी मला सगळं नंदू बद्दल सांगा...... श्रीराज

ह्म्म्म.....

तिचा बारावीचा रिझल्ट छान लागला तिला 89 टक्के मिळाले.,.... सोबत मीना सुद्धा चांगल्या मार्काने पास झाली......... पुढे शिकायसाठी आता तालुक्याच्या गावी  जावे लागणार होते........ नंदिनी आणि मीनाने  बी एस सी साठी ऍडमिशन घेतली........

चांगल्या मार्कांनी पास झाली म्हणून तिने स्कूटर घेऊन मागण्यासाठी हट्ट केला...... मी पण तिला आनंदाने घेऊन दिली.......... मीना आणि नंदू दोघी मिळून स्कूटर वरूनच कॉलेजला जायच्या...... बीएससी मध्ये सुद्धा बंद चांगल्या मार्काने पास होत होती........तिला लेक्चरर व्हायचे होते ती भरपूर अभ्यास करत होती....... कॉलेजमध्ये होणार या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आवडीने भाग घ्यायची....... आता ती थिर्ड इयर च्या वर्षाला होती.. तिथेच कुठे बाजूच्या गावातला एक मुलगा तिच्या मागे लागला......... अति गुंडा प्रवृत्तीचा तो मुलगा होता........ सतत तिच्या मागेमागे येना..... नको ते कमेंट्स पास करणं....... असं सुरू होतं.... सुरवातीला नंदूने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.......... पण हळूहळू त्या मुलाची हिम्मत वाढतच होती......... एकदा तर तो तिच्या कॉलेजमध्ये जाऊन पोहोचला.... आणि तिचा रस्ता अडवू लागला........ सहन किती करायचं म्हणून तिने सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली लावून दिले.......तु जे केलं हे फार वाईट केलं सगळ्यांसमोर ती माझी इन्सलट केली.. मी तुला बघून घेईल असं बोलून तो चालला गेला......... अशातच लास्ट इयर च्या परीक्षा जवळ आल्या होत्या.... लायब्ररी मधून काहीतरी तिला बुक आणायचे होते म्हणून ती कॉलेजला गेली..... त्या दिवशी मिनाला काही काम होतं म्हणून ती गेली नव्हती........ बराच वेळ झाला ती घरी आली नव्हती म्हणून तिला बघायला म्हणून मी निघणारच होतो की बाजूच्या राम्या चा फोन आला......तिकडे गावाकडच्या रस्त्यावर तिचा एक्सीडेंट झालेला आहे असं कळलं......... तसाच मी आणि तुझा मामा घटनास्थळी गेलो आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो......बाकी शरीराला तिला कुठेच मार लागला नव्हता फक्त डोक्याला खूप मार लागला होता खूप रक्त वाहून........ डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन थेटर मध्ये घेतलं........... ऑपरेशन तसे नीट झाले होते....पण तिला शुद्ध आली नव्हती डॉक्टर बोलले की शुद्ध येईपर्यंत काहीच सांगू शकत नाही..... दहा दिवस झाले तरी तुला शुद्ध आली नव्हती....ती ट्रीटमेंटला काहीतरी रिस्पॉन्स देत नव्हती म्हणून तुझ्या मामांनी तुझ्या घरी कळलं तर तुझ्या बाबांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली त्यांनी तिथून न्यूरो स्पेशालिस्ट घेऊन आले........ त्यांनी आता त्यांनीसुद्धा तिची ट्रीटमेंट केली......... पण ती कोमामध्ये गेली होती................. तुला कळवावं असं मनात खूप झालं पण तू तिकडे उगाच काळजी करशील म्हणून कळवलं नाही........ आणि तुझ्या आजी आणि बाबांनी पण तशी अट घातली होती की तुला काही कळता कामा नाही ....त्यांना माहिती होतं की तू सगळ सोडून इथे परत येऊन जाशील आणि तुझ्या करिअरवर त्याचा खूप मोठा परिणाम होईल..... त्यामुळे तुला कळवलं नाही...... तुझे फोन यायचे पण काहीतरी बहाणा करून तुला काहीतरी सांगून द्यायचं........... तुझी आजी आणि मी फार हतबल झालो होतो काहीच कळत नव्हतं काहीच सुचत नव्हतं त्या वेळेला मात्र तुझ्या मामाने मामिने खूप धीर दिला......... बऱ्याच गोष्टी त्यांनीच पाहून घेतल्या होत्या....... ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती .... पण अजून सुद्धा नंदू कोमातून बाहेर आली नव्हती.................. जवळपास एक महिन्यांनी तिला शुद्ध आली होती.... आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला तिला बरं झालेलं बघून............पण नंतर ती कोणालाच ओळखत नव्हती फक्त मला आणि आजीला ओळखत होती......... शुद्धी वरून उठली तेव्हा आई बाबा...... आई बाबा करतच ओरडत होती............ डॉक्टरांनी परत सगळ्या टेस्ट केल्या आणि मग आम्हाला कळलं की ती सगळं विसरली आहे........लहानपणी तिचा आई-बाबांसोबत जो एक्सीडेंट झाला ती त्याच्या धक्क्यात  होती आणि तिला फक्त येवढेच आठवत होतं पुढचं आयुष्य तिला काहीच आठवत नव्हतं....... तिला तिच्या फक्त आयुष्यातले पहिले सात वर्षाचा ठरत होते नंतर ती सगळं विसरली होती........ती बरी होऊन तर घरी परतली होती पण ती आता पूर्ण सात वर्षाच्या मुली सारखीच वागत होती....... ती स्वतःला लहान समजत होती....... तिचा ब्रेन आता फक्त एवढंच जाणतो........ तिला पुढं काहीच माहित नाही.... ती मोठी झाली आहे सुद्धा तिला समजत नाही...... डॉक्टरांचं म्हणणं आहे की  तिची मेमरी परत येऊ शकते पण त्याचे खूप कमी चान्सेस आहेत........ नाही बरोबरचेच... दोन वर्ष होत आले आता या गोष्टीला तिला आम्ही असंच सांभाळत आहोत... खूप लोकांना ते पागल वाटते पण ती पागल नाही आहे रे बाळा ते सगळं विसरली आहे यात तिचा तरी काय दोष..... या गोष्टी तुला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता........ तुझ्या आयुष्याचा प्रश्न होता माफ कर बाळा मला....... म्हणून रडायला लागले

श्रीराज आता पूर्ण सुन्न झाला होता.......... त्याचं लाईफच थांबल्यासारखं झालं होतं............ एकटा पायरीवर जाऊन बसला होता .....नंदू आणि त्याची नेहमीची आवडती जागा होती ती....बराच विचार करून स्वतःला सावरून तो बाबासाहेबां जवळ येऊन बसला....

आबासाहेब शांत व्हा सगळ ठीक होईल........ ती आपल्या सोबत आहे हेच खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी............ तो त्यांना सावरण्यासाठी बोलत होता............ तिच्यासोबत त्याने आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवले होते.. तीच आता त्याला विसरली होती.......... आता आयुष्याच एक स्वप्न बनून राहिलं होतं त्याच्यासाठी............

बाबासाहेब येतो मी थोड्या वेळात........ त्याला काहीतरी आठवलं आणि तो बाहेर गेला... बराच वेळ तो कोणासोबत तरी फोनवर बोलला आणि परत आत मध्ये आला.....

आबासाहेब मला नंदिनी सोबत लग्न करायचे आहे आता लवकरच....... श्रीराज

अरे बाळा तुला एवढं सगळं सांगून ये तू असा कसा बोलतोय...... आजी

आजी मला तिच्यासोबत लग्न करायचे प्लीज..... श्रीराज

बाळा तुला कळते का ती बायको बनण्याच्या परिस्थितीत नाही आहे....... तिच्यासोबत लग्न करून तुझं आयुष्य तो उध्वस्त करतोय...... तिच्यासोबत तुझं काहीच भविष्य नाही......शरीराने तर ती परिपूर्ण आहे...... पण मनाने आणि डोक्याने ती अजूनही सात वर्षाची मुलगी आहे..... ते तुला काहीच सुख देऊ शकत नाही...... तुझ्या कुठल्याच अपेक्षा तिच्याकडून पूर्ण होणार नाही...... तू इतका मोठा झाला आहेस छान सुंदर अशी एखादी गोड मुलगी तुला मिळेल...... नंदूला विसर बाळा आता.... आजी

आजी आबासाहेब .....माझं प्रेम आहे तिच्यावर..... स्वतःपेक्षा जास्त जीव आहे माझा तिच्यावर... तिच्याशिवाय मी श्वास सुद्धा घेऊ शकत नाही....... जगू शकत नाही.... ....आणि प्रेमामध्ये कुठल्या अपेक्षा आल्या.......प्रेमात अपेक्षा केल्या तर ते प्रेम राहणार का ...तो तर व्यवहार होईल ना आणि माझं प्रेम व्यवहार नाही आहे...... ती माझ्यासोबत आहे मला एवढेच पुष्कळ आहे...... माझं आयुष्य मला देऊन द्या आबासाहेब ...मला दुसरं कुणाकडून काहीही नको ....मला फक्त माझी नंदिनी हवी आहे..... श्रीराज काकुळतीने बोलला

घाई कशाची आहे श्रीराज..... आराम कर तू आता आपण नंतर बोलु...... आबासाहेब

नाही आबासाहेब तुम्ही विषय बदलू नका ......माझं ठरलं मी नंदिनीशीच लग्न करणार आहे.... नंदिनी नाहीतर मी कुणाशीच लग्न करणार नाही... श्रीराज

असं भावनेच्या भरात येऊन असे निर्णय घेत नसतात बाळा...... तुझ्या घरी सुद्धा कुणाला हे आवडणार नाही....... मुळात हे आम्हाला सुद्धा आवडलेलं नाही...... जशी नंदिनी आहे आमच्यासाठी तसाच तू आहे आमच्यासाठी लहानपणापासून........ तुझा आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं आम्हाला सुद्धा बघवणार नाही......तुझा आता वयाच्या किती आहे तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे खूप नाव कमवायचं आहे..., आयुष्य खूप सुंदर आहे बाळा...... असे निर्णय घेऊ नको.... तुझी आजी बरोबर बोलते तुला खूप छान मुलगी मिळेल.... तिच्यासोबत लग्न कर नंदिनीला विसर आता........आबासाहेब

मी भावनेच्या भरात असा कुठलाच निर्णय घेत नाही आहे हे तर माझं जेव्हापासून मला प्रेम कळायला लागलं तेव्हापासून अस ठरलं होतं ....यात विचार काय करायचा ..... आणि जर नंदू सोबत जे घडलं ते माझ्यासोबत घडलं असतं तर काय नांदू मला सोडून गेली असती काय........ श्रीराज

असे अपशब्द नको बोलूस काही होणार नाही तुला...... आजी त्याच्या तोंडावर हात ठेवत बोलली..

माझा मित्र असतो अमेरिकेला तो न्यूरो स्पेशालिस्ट आहे...... मी आत्ताच त्याच्यासोबत बोललो..... नंदू ला परत सगळं आठवू शकते जर तिला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर..... इथे गावात तसे डॉक्टर नाहीत तिथे मुंबईला तिला चांगले मोठ्यातला मोठा डॉक्टरची ट्रिटमेंट मिळेल आणि वेळ पडली तर मी तिला अमेरिकेला सुद्धा घेऊन जाईल....... श्रीराज

त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे आपण तिला तसंच घेऊन जाऊ या..... हवा तर तू तिला घेऊन जा..... आबासाहेब

नाही आबासाहेब ....मला तिला मानाने आपल्यासोबत न्यायचे आहे ..... मला तिची आता जबाबदारी घ्यायची आहे...... श्रीराज

करेल तिच्या सोबत लग्न करणार इतकी सोपी नाही आहे रे....... तिला लग्नाचा अर्थ सुद्धा कळत नाही.....तिला फक्त तिच्या भावला भावली यांची लग्न माहिती आहे.....लग्न म्हणजे नवीन कपडे खाणं आणि खेळणा एवढेच काय तिला समजते..... तिची जबाबदारी घेणा इतका सोपी नाही राजा.... ती आता एक तरुण लहान मुलगी आहे..... एकदाची लहान मुलगी सांभाळणं सोप असतं पण तिला सांभाळणं आता खूप कठीण आहे...... ती तिचं आई बनून तुला तिचा सांभाळ कराव लागेल.... तिच्या शरीरात तारुण्याचे झालेले बदल तिला कळत नाही....... तिला कपडे घालून द्यावे लागतात तिला ....वेणी घालून द्यावे लागते कधी ती भलतेसलते हट्ट करत असते.... खूप कठीण नाही बाळा हे सगळं करणे.... वडील तर तू बनवून जाशील पण आई बनणे खूप कठीण आहे...... आजी

आजी मला हे सगळं कळतंय म्हणून तर मी तुमच्याकडे लग्नाची परमिशन मागतोय ना....... कोणीही तिच्यावर बोट उचलू नये म्हणून लग्नाची परमिशन मागतोय..... एकदा लग्न झालं की मी सगळं करेल........ मी तिची आईसुद्धा बनेल कठीण जाईन पण करेल सगळं नीट....... माझ्यावर विश्वास नाही का तुमचा..... श्रीराज

बाळा आई-बाबा तर तू बनवून जाशील...... पण तुझ्या नवरा असण्याच्या हक्काचं काय...... ती फक्त शरीराने मोठी आहे पण मनाने आणि डोक्याने छोटी आहे.....असं जर काही घडलं तर तिच्या मनावर खूप मोठा परिणाम होईल...... आणि मग परत त्यांना तिला बाहेर खाणं खूप कठीण जाईल..... आजी

तिच्या मनावर परिणाम होईल असं काहीही वागणार नाही........ जोपर्यंत ती समज येत नाही .....तोपर्यंत तिला मी काहीच करणार नाही...... तुझा विश्वास आहे ना माझ्यावर... तिच्या मनाला खूप हळुवार जपेल...... श्रीराज

आजी आबां जवळ आता बोलायच साठी काहीच उरलं नव्हतं....... त्याला काय सांगावं त्यांना कळत नव्हतं.....

तुझ्या आई बाबांचे तुझ्या घरच्यांची तुझ्या लग्नाकडून खूप अपेक्षा असतील खूप स्वप्न बघितली असतील त्यांनी ...अशी मोडणार आहेस का..., बाबासाहेब

आबासाहेब मी दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत जगू शकत नाही......... नंदिनी नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईल..... घरच्यांचा विचार तुम्ही करू नका मी त्यांना मनवेल... तुम्ही फक्त लग्नाला होकार द्या...... श्रीराज

होऊ दे तुझ्या मनासारखं......आबासाहेब

खरंच ......?... श्रीराज खूप आनंदी झाला...... आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून येत होते.... आबासाहेबांचे हात हातात घेऊन तो नमस्कार करत होता..

आबासाहेबांनी मान हलवून होकार दिला....

आबासाहेब येत्या दोन-तीन दिवसातच चांगलं दिवस बघून तयारी करायला सुरुवात करा.....

आजी एकदा नंदूला बघून येऊ...... श्रीराज

आजीने मानेनेच होकार दिला..... तसा श्रीराज आत मध्ये गेला.....

नंदू खेळून दमल्यामुळे बेडवर झोपी गेली होती.....
किती निरागस आहेना ही........ अजूनही तशीच आहे माझी नंदू जसं पहिल्यांदा भेटला होतो.....
तो तिच्याजवळ गेला.....

खूप भोगले ग राणी  तू.........जेव्हा तुला गरज होती तेव्हाच मी तुझ्या जवळ नव्हतो....... मला माफ कर रे राजा..... आता कधीच परत तुला स्वतःपासून दूर करणार नाही...... तिच्या डोक्यावरून हात फिरवत डोक्यावर केसांवर केस करतो बाहेर निघून गेला.....

*******
क्रमशः

 

.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️