नंदिनी श्वास माझा ८

मिठीत ये ना... जवळ घे ना
शरू सोबत बाहेर फिरायला जायचं म्हणून नंदू खूप उत्साहात होती. तिला तर रात्रभर झोप सुद्धा आली नव्हती.

पहाटे नंदुला लवकर जाग आली . तिने पटापट आपलं आवरून घेतले. तिने लाईट आकाशी रंगाचा कॉटोनचा कुर्ता पटियाला घातला. त्यावर आकाशी पांढऱ्या कॉम्बिनेशनची ओढणी घेतली. साजेसे मोत्यांचे छोटेसे टॉप त्याला एक मोती लटकन होते, ते तिच्या हालचाली सोबत हलायचे . ओठांवर लीपबाम, कपाळावर छोटीशी चंद्रकोर , गळ्यात शरूने दिलेले हार्ट शेप ❤️ लॉकेट चेन, हातात प्लेन आकाशी बांगड्या , आकाशी रंगात ती खूप फ्रेश दिसत होती. सगळं आवरून ती खाली आली.

" आजी , वेणी घालून दे ना ग."नंदूने आजीला आवाज दिला.

" काय मुलगी आहे, इतकी मोठी झाली तरी वेणी घालता येत नाही. सासरी वेणी काय सासूबाई घालून देईल काय? " वेणी घालता घालता आजी तिची मस्करी करत होती.

" सासूचे माहिती नाही, पण नवरा मात्र वेणी घालून देणाराच शोधेल!" नंदू सुद्धा मस्करी करत म्हणाली.

" हो ग टवळे , पण तू नको शिकू काय ?" आजी.

" आजी , तू आहे ना आता, शिकेल ना नंतर आरामात. आता सकाळी सकाळी डोज नको देऊ ग!" नंदू.

" आजी , मी शरूकडे एक चक्कर मारून येते. त्याची तयारी झाली की नाही बघून येते." नंदू.

" अगं , अजून बराच वेळ आहे. आता कुठे फक्त सहा वाजले आहेत. तुम्ही ८ नंतर निघणार आहात ना ?" आजी.

" अगं हो , बघून तर येते एकदा कुठपर्यंत आली त्यांची तयार."नंदू बोलतच पळत शरूच्या वाड्यात गेली.

बाहेर अंगणात तिला मामी भेटल्या.

" अरे तू , सकाळी सकाळी?" मामी.

" हो , आम्हाला जायचं आहे ना." नंदू.

" हो ते माहिती ग बाळा , पण इकडे तर अजून कोणीच उठलं नाही . वन्स तर एकदा आवाज देऊन आल्यात, तरी सुद्धा हे मुलं उठले नाहीत. जा , तू आवाज देऊन ये , नाहीतर तुम्हाला उशीर व्हायचा."मामी.

मामींच्या शब्दांवर होकारार्थी मान हलवत नंदू वरती शरूच्या रूममध्ये गेली. शरूच्या रूमचे दार उघडे होते. तिने वाकून आतमध्ये बघितले , तर शरू , राहुल , रोहन तिघे पण मस्त ढाराढुर झोपले होते . ती आतमध्ये जाऊ की नको विचार करत होती. रोहन आणि राहुलला काय वाटेल, ते काय विचार करतील , ती विचार करत होती. पण ते झोपले होते, म्हणून मग ती आवाज न करता हळूच आतमध्ये शरू झोपला होता तिथे गेली. रोहन आणि राहुल थोडे दूर खिडकी जवळ झोपले होते. इकडे शरू गाढ झोपला होता.

" किती गोड दिसतो हा झोपेत , अगदी लहान बाळ सारखा." नंदू मनातच बोलत त्याच्याकडे बघत तिथेच बसली.

झोपेत सुद्धा शरूच्या चेहऱ्यावर हसू होते. केस विस्कटलेले होते, हवेमुळे ते त्याचा चेहऱ्यावर- कपाळावर उडत होते (त्याचे केस मोठे होते ना थोडे)


" शरू!" नंदू त्याच्या जवळ थोडी झुकून हळू आवाजात म्हणाली . पण तिच्या आवाजाचा शरुवर काहीच परिणाम झाला नाही , तो तसाच गोड झोपेत होता.

" किती क्युट दिसतोय हा ! याचे गाल ओढावेसे वाटतंय." नंदू त्याचे ते लोभसवाणे रूप बघून मनातच बोलत होती .

" अरे, याला तर माझा आवाज ऐकू पण नाही जात आहे. " तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि परत हळूच आवाज दिला ," शरू! " तसे शरूने कड बदलला आणि झोपेतच हसला .


त्याचे ते गोड हसू बघून आणि तो झोपेत इतका गोड दिसत होता की नंदूला त्याला किस करायची इच्छा झाली.

" करू काय किस? नको, कोणी बघितले म्हणजे? " नंदूने आजूबाजूला बघितले. कोणी नव्हते. आणि राहुल रोहन दोघंही मस्त गाढ झोपले होते.

" जाऊ दे , किस करतेच ! नको पण शरूला कळले तर? तो आपल्याला सोडायचा नाही. पण जे आहे ते आताच करता येईल, तो जागा असला की आपली हिम्मतच होत नाही. तो जवळ आला की आपल्याला काहीच सुचत नाही. डोकं काम करण्याचं बंद होतं. त्या दिवशी पण मी मनाला कसाबसा आवर घातला होता. जाऊ दे आता करतेच, परत असा वेळ मिळायचा नाही . माझाच तर आहे हा , मी का घाबरु?" मनातच नंदुचे ' हो , नाही, हो, नाही' सुरू होतं .


नंदू त्याच्या चेहऱ्याजवळ खाली झुकली आणि हळूच तिने त्याच्या गालावर किस केले. त्याच्या त्या होणाऱ्या गोड स्पर्शाने ती थोडी शहारली, स्वतःशीच लाजली. किस करून ती वळणार तोच मागून शरूने तिचा हात पकडला आणि स्वतःकडे तिला ओढून घेतले. ती बेसावध असल्याने त्याचा अंगावर जाऊन पडली आणि त्याच्या गळ्याजवळ तिच्या कपाळाचा स्पर्श झाला. शरू आणि नंदू आता एकमेकांच्या खूप जवळ आले होते. नंदूने डोकं वर करत त्याच्याकडे बघितले तर तो एकटक तिच्या डोळ्यात बघत हसत होता.

"मी तुझाच आहो राणी , फक्त तुझा . इतका काय विचार करत होती ? जे हवं ते करू शकतेस तू माझ्यासोबत . माझ्यावर फक्त तुझा हक्क आहे !" शरू एक डोळा मारत मिश्कीलपणे हसत तिला म्हणाला.

" याला नेहमीच माझ्या मनातले सगळं कसं कळतं?" नंदू त्याचाकडे बघत मनातच बोलत होती.

" तर तू जागा होता?"नंदू.

नंदू बोलत होती तरी अजूनही तो मिश्किलपणे हसत तिच्याकडे बघत होता.

" तू माझ्या जवळ येणार , आणि मला कळणार नाही? असं कसं होणार स्वीटहार्ट!" शरू हळूच तिच्या ओठांकडे बघत म्हणाला.

" मग तुला आवाज दिला, तेव्हा उठला का नाही?" नंदू खोट्या रागात त्याच्याकडे बघत बोलली.

" मग , माझी अशी ही गोड सकाळ कशी झाली असती? माझ्या जागेपणी तर तू मला किस दिला नसता , तेव्हा तुला आजी आठवते. " शरू मिश्कीलपणे बोलला.

त्याचे ते शब्द ऐकून नंदूला लाजल्या सारखे झाले. ओठांत लाजेचे हसू , लाजून तिने आपली नजर खाली केली .

" कुणाचे तरी गाल खूप लाल झालेत. कसली सुंदर दिसत आहेस. रोज अशीच सकाळ झाली तर किती छान होईल ना? डोळे उघडले की तुझा चेहरा समोर दिसला तर दिवस कसा मस्त जायचा." शरू.

नंदुचा हात अजूनही शरूने पकडून ठेवला होता. ती हात सोडवायची खटपट करत होती..

" सोड ना , तुझे मित्र उठतील. मला असे इथे तुझ्या मिठीत बघून काय म्हणतील?" नंदू.

" बघितले नाही काय , कसे झोपले आहेत ते? लाथ मारल्याशिवाय उठणार नाहीत."शरू हसत म्हणाला.

" काकी येतील." नंदू.

" ना , आई कामात बिझी असेल." शरू दुसऱ्या हाताने तिला ओढत, तिला आपल्या कुशीत घट्ट पकडत बोलला.

त्याच्या त्या स्पर्शाने , तो इतका जवळ , आता नंदूची धडधड वाढली होती . तिच्या शरीरातुन करंट गेल्यासारखं तिला जाणवलं. तिला काहीच सुचेनासे झाले होते .
" सोड ना प्लीज ! खूप धडधड होते आहे हृदयात." नंदू काकुळतीने म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावरचे कावरेबावरे भाव बघून त्याला हसू आले. त्याने तिचा हात सोडला . ती त्याच्या डोळ्यात एवढी हरवली होती की त्याने तिचा हात सोडलाय ते तिला कळलेच नाही.

" तुला माझ्या कुशीतच राहायचं होत तर हात सोड म्हणायचं नाटक का केलंस?" नंदुला तसे त्याच्यात हरवलेले बघून शरू मिश्किलपणे म्हणाला..

ते ऐकून नंदू भानावर आली आणि लगेच बाजूला झाली आणि इकडेतिकडे बघत बसली.

" किती वजनी झाली आहेस ग तू?" नंदुला चिडवत शरू जागेवर उठून बसला..

" काय ? मी वजनी? " नंदूने तिथलीच एक उशी हातात उचलली आणि त्याला मारायला लागली .

तिच्या हातातील उशीला पक्क पकडत शरूने तिला स्वतःकडे खेचले आणि तिच्या कानाजवळ येत, " जितकं मारशील ना , तेवढे मी तुला किस करेन आहे." शरू.

" काय?" डोळे मोठे करत नंदू थोडी ओरडलीच.

नंदूने घाबरतच उशी फेकली आणि बाहेर पाळली..रूमचा बाहेर दारात येऊन बोलली, " आवर लवकर, उशीर होईल!" म्हणत पळाली.

" वेडाबाई !" शरू ती गेलेल्या दिशेनेच बघत डोक्यावरून हात फिरवत हसतच आवरायला निघून गेला.
स्वतःचे आवरून झाल्यावर त्याने रोहन आणि राहूलला उठवले..


शरूला उठवल्या नंतर नंदू ,सुजी- टिनाच्या रूममध्ये त्यांना उठवायला गेली. तिने दरवाजा नॉक केला, तसे त्या दोघी डोअरनॉकच्या आवाजाने उठल्या..

आळोखेपिळोखे देत सुजीने रूमचे दार उघडले , " अरे तू? ये , ये आतमध्ये ." म्हणत सुजीने नंदूला आत घेतले.

" तू? इथे? इतक्या सकाळी सकाळी तू इथे काय करतेय?" टिना नंदूला बघून त्रासिक सुरताच म्हणाली.

" मामींनी तुम्हाला उठवायला सांगितले होते . बाहेर जायचं आहे तर उशीर होईल म्हणाल्या , म्हणून आले "

" ओके , तू जा आता , आम्ही उठलो. तू तयार हो" टिना.

" मी, माझी तयारी झाली , ही काय मी रेडी आहे." नंदू.

" काय ? तू अशी येणार आहेस? आपण देवळात नाही चाललो , म्हणजे असं कोण घालतं आऊटिंगला जातांना ?" टिना थोडी आश्चर्यचकित झाल्याचे भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली.

नंदूला तिचं बोलणं आवडलं नाही. " आमच्याकडे असेच घालतात. ". नंदू म्हणाली .

" whatever.." टिना.

" बरं, तुम्ही तयार व्हा , मी जाते ." म्हणत नंदू मागे वळली तर तिला त्यांचे हाई हिल्स सँडल दिसल्या .

" काल मला शरू जवळ बसू नाही दिले ना , बघ आता !" त्या सँडल बघून नंदुला एक आयडिया आली.

नंदू ते हाय हिल्स घालून बघायचं नाटक करत होती . ते घालून उभे राहायचा प्रयत्न करत होती तेव्हा तिचा तोल जात होता .

" तुला नाही जमायचं ते !" नंदूला नीट हाई हिल्स घालता येत नाहीये बघून टिना म्हणाली.

" तुम्हाला जमते काय? म्हणजे इथे गावात , अशा खडबडीत रस्त्यांवर हे घालून कसं चालता येते? शरूला तर फार आवडतात असे उंच टाचांच्या चपला , पण इकडे रस्त्यांवर जमतच नाही चालायला." नंदू.

" त्यात काय एवढं ? ते तुमच्यासारख्या गावच्या मुलींना नाही जमत . आम्हाला सवय आहे ,ते घालून मला कुठे ही चालता येते." टिना 'शरूला आवडते' ऐकून म्हणाली.

" खरंच ?"नंदू.

" हो , बघ आता मी तेच घालून येणार आहे.बघ मग मला." नंदू पुढे शरू वर चांगलं इम्प्रेशन पाडता येईल म्हणून टिना बोलली.

" ठीक आहे , तुम्ही खाली लवकर या." म्हणत नंदू खाली गेली.

सगळे बाहेर जाण्यासाठी तयार झाले. नाश्ता आटोपून सगळे बाहेर गाडी जवळ आले .

नंदू पण आजीला निरोप देऊन बाहेर आली. तेवढयात मीना सुद्धा नंदू जवळ आली.

" ही, ही कोण?" रोहन मीनाला तिथे आलेले बघून म्हणाला .

" ही मीना, माझी मैत्रीण , आपल्यासोबत येतेय." नंदू.

" ओह , good!" रोहन.

" ही काकूबाई काय कमी होती , त्यात हीची भर अजून. हा राज पण ना , फारच लाडावतो हिला." टिना तोंड मुर्डतच सुजीला हळू आवाजात म्हणाली.

शरू जीप घेऊन पुढे आला. शरू सुद्धा एकदम हॉट हँडसम दिसत होता. त्याने लाईट ब्ल्यू टीशर्ट (मुद्दाम त्याने नंदूला मॅचींग केले होते) , शॉर्ट ट्रॅक पँट, स्पोर्ट शूज , केसांना मागे घेत त्यांची पोनी बांधली होती , डोळ्यावर काळा गॉगल . छान दिसत होता . बाकी सगळे पण छान दिसत होते. टिनाने नंदुला सांगितल्या प्रमाणे हाई हिल्स घातल्या होत्या. तिला बघून नंदूला थोड हसू आलं.

नंदूला शरूच्या शेजारी बसायचे होते पण त्या आधीच टिना जाऊन बसली. नंदू आणि मीना मधल्या सीट वर बसल्या, आणि मागे रोहन , राहुल , सुजी बसले. जीप ओपन स्टाईलची होती. मस्त गार हवा वाहत होती. सगळ्यांना खूप फ्रेश वाटत होते . सगळे तालासुरात गाणे गात, अंताक्षरी खेळत होते. नंदू मात्र एकटक शरूला बघत होती. सकाळी शरूने तिला जवळ घेतले आठवत होते. ते आठवून तिला गालातच हसू येत होते. मीना नंदुचे हावभाव बघण्यात बिझी होती. गाडी चालवताना शरूला जाणवत होते की नंदू त्याला बघतेय. त्याने पण समोरचा काच ती दिसेल असा एडजस्ट केला होता. ड्राईव्ह करत अधूनमधून तो नंदूला बघत होता. नंदूचे स्वतःशीच लाजणं, हसणं बघून त्याला गम्मत वाटत होती .तिला असे खुश बघून त्याला पण आनंद होत होता.

जवळपास दीड तासांनी ते सगळे शरूच्या शेतावर पोहचले. शेतातच एकबजुला छोटंसं घर सुद्धा होते. सगळे गाडीतून बाहेर उतरले..

" Wow ! इथे कसलं भारी वाटतेय !" सुजी.

शेत खूप मोठं होत जवळपास 400-500 एकर असेल . चहू साईडने मोठमोठी झाडे, त्यात काही आंब्याची झाडे होती. शेतीत काही सीजनल झाडं लावली होती. एका साईडला घर, मोठा गोठा, त्यात बैल, बकऱ्या, कोंबड्या असे प्राणी होते.


सगळे ते बघून खूप खुश झाले होते. तिकडे मुंबईला त्यांना असे काही दिसायचं नाही.

" आता इथेच उभे राहता काय ? चला आतमध्ये जाऊया." सगळे तिथेच खोळंबलेले बघून शरू म्हणाला. तसे सगळे आतमध्ये जायला निघाले.

रोहन, राहुल , सुजी पुढे होते त्यांच्या मागे टिना, आणि त्या सगळ्यांच्या मागे नंदू आणि मीना चालत होत्या . शरू थोडा थोडा वेळ सगळ्यांसोबत चालत शेतीची माहिती देत येत होता. सगळे इकडे तिकडे बघत जात पुढे होते. पुढे काही झाडांना पाणी दिले होते. पाण्याच्या पाइपमुळे तिथे थोडासा चिखल झालेला होता. सगळे वरती बघत पुढे जात होते. टिनाला चापलेच्या हीलमुळे पाण्यामुळे तिथे असलेल्या चिखलात नीट चालता येत नव्हते . कसेतरी स्वतःचा तोल सावरत ती चालत होती. पण शेवटी तिच्या तोल गडबडला आणि ती धपकन चिखलात पडली.

तिला तसे पडलेले बघून सगळे हसायला लागले. नंदू तर जास्तच हसत होती . तिला बघून टिनाचा राग अनावर झाला. ती खाऊ की गिळू नजरेने नंदुला बघत होती.


*******

क्रमशः

******

🎭 Series Post

View all