नंदिनी श्वास माझा २

नंदू शरू चे तारुण्यात पदार्पण
भाग २ : शरू नंदूचे मधाळ तारुण्यात पदार्पण

" हुश्श! चला बाबा एकदाची संपली एक्झाम." श्रीराज म्हणाला.

" हा यार , पूर्ण वाट लागली होती. वरतून हे लास्ट इअर , प्रोजेक्ट्स, सबमिशन, प्रॅक्टिकल , बापरे! " सुजी म्हणाली.

" हो ना , पण आता आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली आहे. नोकरी शोधा. भरघोस कमाई करा. करीअर सेट करा. तुमचं मुलींचं बरं असते , एखादा वेल सेटल्ड मुलगा बघितला की झालं , मग नो टेन्शन." रोहन एक डोळा मारत श्रीराजकडे बघत म्हणाला आणि दोघेही एका हातावर टाळ्या देत हसायला लागले.

" असं काही नसतं हं ! " टिना म्हणाली.

" बरं , ते गमतीचा विषय जाऊ द्या. इकडे बघा , तुमचे पुढचे फ्युचरचे काय प्लॅन्स आहेत?" राहुल म्हणाला.

" अरे हा, मी तर सांगायलाच विसरलो , पुढल्या शिक्षणसाठी माझा नंबर लागला आहे. मला स्कॉलरशिप मिळाली आहे . पुढल्या महिन्यात अमेरिकेला जायचं आहे." श्रीराजने सांगितले.

" तू एवढया मोठ्या बिझनेसमनचा मुलगा, तुला कशाला हवी आहे स्कॉलरशिप?" रोहन म्हणाला.

" तसं नाही हा , मला माझ्या हिमतीवर पुढे जायचं." श्रीराज.

" मी इथेच MBA करेन." राहुलने सांगितले.

" मी जॉब करेन. मला आता पुढे शिकायचं बोर झालंय." टिना म्हणाली.

" बरं बरं ते नंतरचे नंतर बघू , आधी सेलिब्रेट करूया यार. किती दिवस झाले फक्त अभ्यास करत होतो. " राहुल.

" हो हो खूप दिवसांनी फ्री झालोय, आऊटींगसाठी कुठेतरी बाहेर जाऊया काय? काय म्हणता? "सुजी.

" हो , आय एम इन . पण कुठे जायचं ?"रोहन.

" माझ्या मामाच्या गावी जाउया काय? उन्हाळा आहे , मजा येईल. ३-४ दिवस राहुयात, काय म्हणता?" श्रीराज.

" ठीक आहे , चालेल. रविवारी जाऊया , तयारी करावी लागेल ना ? " सुजी.

" बरं चालेल, मी आणि आई पुढे जातो. आईला तिथे थोडं काम आहे. तुम्ही संडेला या." श्रीराज.

" ठीक आहे , चालेल. " सगळे एकमेकांना हाय फाय देत बोलले.

हा आहे श्रीराजचा मित्र परिवार रोहन , राहुल, टिना, सुजी . आतापर्यंत सगळे एकत्र शिकले होते. एकदम क्लोज फ्रेंडस , त्यात टिना थोडी श्रीराजच्या मागे मागे करणारी , तिला तो आवडत होता , पण कधी तिने त्याला सांगितले नव्हते.

********

" नंदू ssssss नंदू ssss. ....
ये नंद्याsss , बाहेर ये." म्हणत श्रीराज नंदूच्या वाड्यात आला . त्याचा म्हणजे हा क्रम ठरालाच होता. कधीही आला तरी त्याची सुरुवात नंदू नावानेच व्हायची.

" आबासाहेब कुठेय तुमची नात?"श् श्रीराज आबासाहेबांना नमस्कार करत म्हणाला.

"खूप वर्षांनी आलास होय रे. एवढा कुठल्या व्यापात व्यस्त होता?" आबासाहेब त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देत म्हणाले.

" आबासाहेब कॉलेज होते ."

" हो हो. पण हे काय , हे असे मुली सारखे केसं का वाढवालेत?" आजी.

" अगं आजी फॅशन आहे तशी. बरं ते जाऊ द्या , नंदू कुठाय? नंदू sssss.." श्रीराज आवाज देत होता.

"चिडून , रुसून बसली असेल कुठेतरी. " आजी.

" ही मुलगी पूर्ण गावाला हैराण करून सोडते . " आबा.

" आता काय केले तिने?" श्रीराज.

श्रीराजचा आवाज ऐकुन नंदू पळत बाहेर आली. त्याला बघून जागीच थोडी थबकली.

" बापरे हा तर किती मोठा, उंच दिसतोय." मनातच म्हणत त्याचा गळ्यात पडायला त्याचा जवळ गेली.

" अगं कार्टे, किती वेळा सांगितले तुला की आता तू मोठी झाली आहे. आता मोठ्या मुलांपासून दूर राहायचं." आजी.

" अगं हा मुलगा थोडी आहे. हा तर माझा मित्र आहे ना , तो पण बालपणीचा.. " म्हणत श्रिराजच्या गळ्यात हात घालत नेहमीप्रमाणे त्याला बिलगली.

" अग येsss मी मुलगाच आहे." शरू तिच्याकडे डोळे मोठे करून बघत तिची मस्करी करत त्याने तिला मिठी मारत आपल्या कुशीत घेतले.

तसे सगळे हसायला लागतात.

सगळे तिला हसतात आहे बघून ती चिडून श्रीराजच्या दंडावर फटके मारू लागली.

"तुम्ही सगळे मलाच बोला. ते आबा पण माझ्याच चुका काढतात , मलाच बोलतात. " नंदू रडका आवाज काढायचं नाटक करत म्हणाली.

" अगं हळू ssss , लागतंय ना. किती जाडी झालीस. " श्रीराज मस्करीच्या सुरात म्हणाला.

" शी बाबा , तू पण तसाच." ती तोंड वाकडं करत मागे फिरली.

" काय हो आबासाहेब आता काय झालंय? ती मस्ती नाही करणार तर काय तुम्ही करणार ?" गम्मतिच्या सुरात श्रीराज म्हणाला .

" तूच लाडावून ठेवलंय तिला. तुझ्यामुळेच बिघडली आहे ती. जरा तिला थोडी समज दे. दुसऱ्यांच्या घरगुती बाबींमध्ये पडणं ठीक नाही. ते तर गावात सगळे माझा मान करतात म्हणून कोणी मला समोरून येऊन बोलत नाही. " आबा.

" ती मीना दुसरी कुणी थोडी आहे हो? माझी मैत्रीण आहे ना ती. मग मी नको काय तिला मदत करायला?" नंदू.

" बरं sss.. तुम्ही दोघं मला कळेल असे काही बोलाल काय ?" श्रीराज.

"तिलाच विचार काय ते? नंतर सगळं मला सोडवावे लागते. "आबा.

" शरू, ते मी फक्त मीनाला मदत केली रे . तिला पुढे शिकायचं होते आणि तिच्या घरचे तिचं लग्नं लावून द्यायचे म्हणत होते. तर मी त्यात तिला थोडीशी मदत केली. " नंदू.

" याला थोडीशी म्हणतात? नको तो घोळ घालून ठेवला. नसले उद्योग करत असते . मीनाला आज एक स्थळ बघायला आले होते . नंदूने ते आले तेव्हा मीनाला लपवून ठेवले. शोधाशोध करण्यात सगळा वेळ गेला. तिच्या वडिलांनी पाहुण्यांना काहीतरी समजावून वेळ मारून नेली." आबा.

" अहो आबा , तो मुलगा दिसतो तुम्हाला? चार मुलांचा बाप दिसत होतं ते काळ ढूस्स ढेमसं. अन् केवढा जाडा होता तो . ती मीना केवढी छोटी आहे , लग्नाचं वय आहे काय हो तिचे ?" नंदू.

" हो, तो थोडा मोठा होता तसा. " आबा आपले हसू दाबत म्हणाले.

" अगं , पण तो त्यांचा प्रश्न आहे ना ? आणि इकडे गावात मुलींची लग्न लवकर करतात." आजी.

" ते तर तो केश्या आपल्याकडे काम करतो म्हणून त्याने माझे ऐकले आणि शांत झाला. पण नंतर या सगळ्या प्रकरणाची भरपाई मला करावी लागली. "आबा.

" तशीही मला सोबत हवी होती. आता १२वी नंतर पुढे शिकायचं म्हणजे तालुक्याच्या गावी जायला लागणार आहे. मला सोबत नको का कुणी? काय होते थोडेसे पैसे खर्च केले तर? तिचं शिक्षण पूर्ण होईल ना, पुण्य मिळेल तुम्हाला ." नंदू.

" सगळं गाव मीनाला शोधत होते आणि माहिती हिने तिला कुठे लपवून ठेवले होते ?" आबा.

" कुठे?" श्रीराज.

" विचार तिलाच. " आबा.

श्रीराज नंदूकडे बघत भुवया उंच करत कुठे म्हणून खुणेने विचारत होता.

" आपल्यात वाड्यात." नंदू.

नंदू आबासाहेबांकडे तिरकस नजरेने बघत , नंतर शरूकडे एक डोळ्यांनी बघत होती .थोडा वेळ शांततेत गेल्यावर, शरू नंदू जोरजोराने हसू लागले.

" काय हो आबासाहेब ही केवढी छोटीशी गोष्ट आहे. आणि एका मुलीला शिकवून, तुम्ही तिला तिच्या पायावर उभे राहायला मदत करतात आहात. तुमच्या नातीने तुम्हाला स्वर्गात जायची सोय करून दिली. " श्रीराज हसत म्हणाला.

त्याचे बोलणे ऐकून आजी हसायला लागली.

" काय रे गधड्यांनो, मला स्वर्गात पोहचवता होय इतक्या लवकर ? " म्हणत बाजूची काठी उचलत आबा मुलांच्या मागे लागले .

शरू नंदुचा हात पकडत दोघेही गोल गोल धावत इकडून तिकडे उड्या मारत होते . आबा त्यांच्या मागे मागे काठी घेऊन चालत होते .

" थांबा ! बघतोच तुम्हाला कार्ट्यांनो." आबा थकून खुर्चीवर बसत म्हणाले.

शरू आणि नंदू हसत वरती पायऱ्या चढत माळ्यावर पळाले .

भिंतीला टेकत दोघंही आपापल्या गुडघ्यांवर हाथ ठेऊन , मोठमोठ्याने श्वास घेत धापा टाकत बऱ्याच वेळ एकमेकांकडे एकटक बघत होते आणि नंतर जोऱ्याने हसायला लागले.

" काय ग, किती त्रास देते त्यांना?"

" काय रे थोडासा तर हट्ट केला मी. आणि चांगल्या गोष्टी साठीच केला ना?"

" बरं बाबा, ठीक आहे "

" आणि काय रे , तुला मी जाडी दिसतीये काय? तू बघ किती उंट झालास ते ."


"ये उंट काय म्हणतेस, याला परसनालिटी म्हणतात." शरू आपल्या कॉलरला उडवत म्हणाला.

" ह्म्म ! personality म्हणे. " नंदिनी तोंड वाकडं करत म्हणाली.

शरू मात्र एकटक तिच्याकडे बघत होता.

आल्यापासून आता तो तिला नीट बघत होता. शेवटची भेट झाली होती तेव्हा ती १२-१३ वर्षांची असेल. आता चक्क १८ वर्षांची तरुणी झाली होती. फिक्कट हिरवा कुर्ता, तसाच पटियाला सलवार आणि त्यावर डार्क हिरवी ओढणी... कंबरेखाली जातील एवढे मोकळे कुरळे काळे केस, त्यातील थोडे केस मागे घेऊन क्लिपमध्ये अडकवले होते. काही चुकार बटा कपाळावर कानाजवळून पुढे आल्या होत्या. कपाळावर छोटीशी चंद्रकोर टिकली, घारे हिरवे डोळे , छोटासे नक्ट्ट नाक, धनुष्यबाणच्या आकाराचे नाजूक ओठ , थोडा लंबोळका गोल चेहरा खाली छोटीशी निमुळती हनुवटी, निगरागस चेहरा, चेहऱ्यावर थोडे मस्तीखोर भाव , रंग मोत्या सारखा चमकदार.. उंची ५.४ इंच असावी , उंचीला शोभेल असा कमनीय बांधा. ती खूप सुंदर दिसत होती.

" ये असा काय बघतोय?" त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत नंदू प्रश्नार्थक मान हलवत म्हणाली.

तिच्या आवाजाने तो भानावर आला.
" खूप मोठी झालीस ग चिमणे." तो तिचे नकटे नाक ओढत म्हणाला .

" तू पण मोठा झालास की रे बोक्या. छे उंट झालास आता." आपलं नाक चोळत नंदू म्हणाली.

" ह्म्म ते पण आहे. आता खूप सुंदर दिसतेय, अगदी लोभस . लहानपणी सुद्धा गोबरी क्युट दिसायची , पण आता अजूनच खूप छान दिसते आहे. असे वाटतेय एक किस घ्यावं या मऊ मऊ गालांचे." हसत आपल्या दोन्ही हातांनी तिचे गाल ओढत शरू म्हणाला.

" ये सोड ना ते, दुखतयं ना. आणि तसं पण आजीने सांगितले आहे कुणाला हात लावू द्यायचा नाही." आपले गाल चोळत नंदू बोलत होती.

" किती वर्षांनी आला रे? तुझी किती वाट बघायची? तुला तर माझी आठवण पण नसेल आली? तिकडे तुला खूप मित्रमैत्रिणी भेटल्या असतील ना?" नाराजीच्या नाटकी सुरात नंदू म्हणाली.

" सॉरी बाबा. पण काय करणार , अभ्यास खूप वाढला होता ग, त्यामुळे यायला जमले नाही. " आपले दोन्ही कान पकडत बिचारा केविलवाणा चेहरा करत शरू म्हणाला.

" बरं बरं ठीक आहे. " .नंदू थोडी भाऊक झाली.

" हा तिकडे माझे खूप फ्रेंड्स आहेत. मुली फ्रेंड्स आहेत , त्या सुंदर पण आहेत (सुंदर या शब्दावर जोर देत). पण तुझ्यासारखे स्पेशल वेंधळे कोणी नाही भेटलं." तिला भावुक झालेले बघून, तिची मस्करी करत गालात हसत शरू म्हणाला.

नंदू दोन्ही हात कंबरेवर ठेऊन बारीक डोळे करत त्याच्याकडे बघत होती.

" मी वेंधळी काय ?" म्हणत बाजूला असलेली काठी उचलत त्याच्या मागे धावली.
तो पुढे पळायला लागला.

"अग हो , ती काठी आधी बाजूला ठेव, फार जोराने लागत असते ती.." म्हणत शरू खाली पायऱ्या उतरून पळू लागला. नंदू काठी घेऊन त्याचा पाठी आली .

तो खाली आबांच्या भोवती फिरू लागला. ती त्याच्या मागे पळत होती , मग तो आजी जवळ आला .

" अगं अग, का मारते त्याला ? ठेव ती बाजूला. त्याला लागायची त्याला." आजी.

" हो ना बघ ना, मी पण तेच सांगतोय कधीचा , ऐकत नाहीये" शरू आजीच्या मागे लपत म्हणाला.

"आजी तो मला वेंधळा म्हणतोय. मी काय वेंधळी आहे काय?"नंदू काठी बाजूला ठेवत रडका सुर काढत, छोटंसं तोंड करत नंदू म्हणाली.

" बरोबर आहे त्याचं , वेंधळ्याला वेंधळच म्हणणार ना?" आजी आणि शरू हसायला लागले.

" आबा sssss बघा ना हो, सगळेच मला त्रास देतात." म्हणत आबासाहेब जवळ बसत नंदू म्हणाली.

" या या , आता आली होय आबाची आठवण?" आबा.

" शी बाबा, तुम्ही सगळेच मला त्रास देतात." म्हणत नंदू एकटी पायऱ्यांवर जाऊन बसली.

" ए आजी भूक लागलीय, खायला दे ना काही. इथे गावात आल्या बरोबर सरळ इकडे आलो बघ." शरू.

" हो हो , हातपाय धू , आणतेच." म्हणत आजी आतमध्ये गेली.

शरू हातपाय धुवून नंदू जवळ जाऊन बसला.

" मला कुणासोबत बोलायचं नाही. जा तिकडे." पलीकडल्या दिशेने मान वळवत नंदू म्हणाली.

" बोलतंय कोण? मी बोलायला थोडी आलो. माझ्या पण आबसाहेबांच्या घरच्या पायऱ्या आहेत या , मी पण इथ बसू शकतो. " शरू.

" ए , आबा फक्त माझे आहेत.."

" ए माझे पण आहेत."
शरू नंदू परत भांडायला लागले.

"अरे ओ पोरांनो , काय चिवचिव करताय? शांत बसा . हे घर तुम्हा दोघांचंही आहे , जिथे बसायचे तिथे बसा. " बोलतच आबा आतमध्ये गेले.

आजी नाश्ताची प्लेट घेऊन आली.

" wow ! करंजी sss, चिवडाsss " आनंदी होत करंजी तोंडत घालत शरू म्हणाला.

"आजी , मी खूप मिस केले ग तुझ्या हातचे पदार्थ. कुणालाच तुझ्या हातची चव नाही बघ.." शरू.

" मग , आजी कुणाची आहे?"नसलेली कॉलर वर करत नंदू म्हणाली.

" येssss , फुशारकी मारायची बंद कर. तुला येत की नाही काही बनवता? हिला पण काही शिकव ग आजी." शरू खात खात बोलत होता.

" ये sssss मी तिला मदत करत असते जरा. होकिने ग आजी ?" नंदू.

" फक्त अंगापायाने मोठे झालीत ही दोघं. डोक्याने अजूनही लहानच आहेत. " आजी मनातच बोलत हसत हसत हो म्हणत आत गेली.

नंदू भुवया उंचावत, मान हलवत शरूकडे बघत हसायला लागली .

दोघंही एकाच पायरीवर बसून, एकमेकांना ढकलत चिवडा, करंजी खात बसले होते.

" उद्या बिझी आहे मी ." म्हणत शरू उठला आणि तिच्याकडे न बघता घरी गेला.

"ऑ , उद्याचा दिवस हा असं कसं विसरला ?"नंदू डोळे मोठे करत… मनातच खट्टू होत म्हणाली..

**********
असं काय विसरला होता श्रीराज की नंदूचे मन उदास झाले. श्रीराजला कुठले महत्वाचे काम होते? या दोघांच्या नात्यात पुढे काय होणार आहे? श्रीराजचे मित्र इथे गावात आल्यावर काय घडणार आहे , बघुया पुढल्या भागात.

क्रमशः


*****************


🎭 Series Post

View all