Jan 27, 2022
प्रेम

नंदिनी श्वास माझा 3

Read Later
नंदिनी श्वास माझा 3

भाग ३

"हा माझा वाढदिवस कसा विसरला ..??..... इतकी वर्ष आला नाही ना... म्हणून विसरला असेल ..... ई sss ... शी बा असं कसं करू शकतो हा .... म्हणे मी बिझी आहो...."

चीड चीड करतच नंदू जेवण करत होती..
आजी च सगळं लक्ष तिच्याकडेच होत ....


"अग हेे  असं धुसापुसायला काय झालं.??..आजी


" काही नाही .... झालं माझं ... मी झोपते " ....म्हणत ती वर आपल्या खोलीत गेली..

नंदू नी शरू च्या मामा चा वाडा आजूबाजूला च होता, जवळ जवळ .. त्यामुळे वरतून गच्ची मधून उडी मारून बऱ्यापैकी इकडून तिकडे जाता यायचं...

नंदुची रूम होती त्या पुढेच जी रूम होती तिथे शरू आला की थांबायचा..... खिडकी मधून दिसायचं ...

नंदू इकडे आपल्या खोलीत आली ... नी शरू चा रूम कडे अधून मधून बघत होती... "हा कुठे दिसत नाहीये ... गेला कुठे ?"...विचार सुरू होते तिचे ...

उगाच काहीतरी काढत होती... परत ठेवत होती , आवरत होती.. मनातच तिची बडबड सुरु होती...


"तिकडे शहरात म्हणे रात्री १२ वाजताच विश करतात...केक आणतात ... असं तर काहीच दिसत नाहीये ...हा खरंच विसरला असेल काय माझा वाढदिवस.??..आता त्याला तिकडे सुंदर मैत्रिणी भेटल्या ना ..माझी आठवणच नाही याला." .. थोड्या थोड्या वेळाने खिडकीतून बघायची नी बडबड करत होती...

शरू १२ वाजून गेले तरी आला नव्हता रूम मध्ये ... तो मुद्दाम च गेला नव्हता..त्याला माहिती होत नंदू वाट बघत असणारे... त्याला पण इच्छा होत होती रात्री विश करायची पण हे गाव होत इथे असा चांगलं नाही वाटणार म्हणून तो गेला नव्हता...

वाट बघत बघत शेवटी तिचा डोळा लागला.. नी ती झोपी गेली ...

सकाळी ५-५.३० ला च शरू उठला बाहेर पडवीत आला .. थोडस उजाडलं होत पण बऱ्यापैकी डार्क च होत .. सगळी कडे मोगऱ्याचा सुगंध दरवळला होता...

 

शरी दोन्ही हाथ पराऊन श्वास घेत होता..."  wow काय फ्रेश वाटतेय... peaceful.." 

मन प्रसन्न करणारी सकाळ होती.. पक्ष्यांची किलबिल चिवचिवाट सुरू होता ...मुंबई ला अशी सकाळ कधीच नव्हती होत.. .गाड्यांचे कर्कश आवाजाने च सकाळ व्हायची....

त्याने नंदू चा खिडकी कडे बघितले ..." अजुन उठली नाही वाटतेय ही चिमणी .... रागावली असेल नक्कीच... चला श्रिराज कामाला लागा..." 
फ्रेश होऊन तो खाली आला ....


"आज इतक्या लवकर कसा झाला सूर्योदय साहेबांचाा??..."  आई मस्करीच्या सुरात म्हणाली ... तिला पण माहिती होत आजा नंदू चा वाढदिवस आहे ते..

" हा ते असच.. जाग आली लवकर"  ...म्हणत तो टोपली घेऊन बाहेर गेला ...त्याने पटापट मोगऱ्याची टपोरी फुलं तोडली ,, नी नंदू च्या वाड्यात आला ... तिथे पण मोगऱ्याची खूप फुले फुलली होती त्यातली पण त्याने थोडी तोडलीत.... पळतच आतमध्ये गेला ...आजी ची सकाळची कामे सुरू होती

"आजी नंदू...?" ....शरू

"झोपलिये ...उशिरा झोपली बहुतेक... चीड चीड सुरू होती काल रात्री तिची... काही बिनसलंय काय तुमच्या दोघांचं..?" .आजी

" नाही ग आजी अस काही नाही...बर ऐक ना आज मी नंदू ला बाहेर घेऊन जाऊ काय ..??. आज तिचा वाढदिवस आहे तर.??" . शरू

" हो जावा... पण लवकर या ...."  आजी

" हो लवकर येऊ .."शरू खुश होत आजीच्या गालावर किस करत... " बर मी जाऊ काय तिच्या खोलीत .?" .....शरू

"म्हणूनच ही फुलं गोळा करून आणलीस होय रे तिला आवडतात म्हणून .??.. जा जा .."  आजी हसत बोलल्या

तो पळतच वरती नंदिनी च्या रूम मध्ये गेला ...

बघतो नंदू गोड साखर झोपेत होती...खिडकीतून काही किरणे तिच्या चेहऱ्यावर आली होती त्यामुळे तिचा तो नितळ गोरा रंग सोनेरी दिसत होता... त्यात ती खूपच लोभस दिसत होती...काही केस तिच्या कपाळावर आले होते ... .. तो तिला बघण्यात हरवला होता...

"किती निरागस दिसते ही चिमणी झोपेत... जागी असली की सततची चिवचिव सुरू असते तिची....."

शरू  ला नंदिनी लहानपणापासूनच आवडत होती.......हळू हळू तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता...कॉलेज मध्ये कितीतरी मुली त्याचा मागे लागल्या होत्या , पण त्यानी कधीच त्यांना भाव दिला नव्हता...त्याचा मनात फक्त नी फक्त नंदिनी च होती..

त्याची नजर तिच्या नाजुक गुलाबी ओठांकडे कडे गेली..त्याला किस करायची खूप इच्छा झाली पण त्याला माहिती होत तिकडे शहरात हे सगळं कॉमन होत तरी इकडे गावात तस वातावरण नाहीये......आणि नंदू किती नाजूक किती निरागस , त्याचा जीव की प्राण होती....

त्याने त्याचे मन  आवराले.... त्याने तिच्या डोक्याशेजारी फुलांची टोपली ठेवली .... कपाळावरचे केस अलगद बाजूला केले ...
"सॉरी पिल्लू काल खूप वाट बघत होतीस ना ..... पण तुझ्यासाठी सरप्राइज प्लॅन करत होतो... हॅपी बर्थडे चिमणे.." .म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केले नि निघून गेला .....

" काय रे एकटाच आला खाली.?"...आजी
" अगं हो ती झोपलिये" .... शरू
" उठावयच ना मग.?" ..आजी
" नाही असू दे , छान झोपलिये ती ...नंतर येतो.." ..शरू घरी निघून गेला ...

तो तिला उठवायला आला होता ... पण तीच लोभस रूप बघून त्याचं मन नव्हते झाले उठवायचे...

सूर्याची किरणं नंदू च्या चेहऱ्यावर जास्ती पडायला लागली होती... तिला आता जाग येत होती.... छान सुगंध रूम मध्ये दरवळला आहे तिला जाणवले होते, तिने उठून आळस देत आजूबाजूला बघितले... तिला मोगऱ्याची टपोरी फुल दिसली...

" वा!  माझी आवडती फुल" ...थोडे फुलं हातात घेऊन त्यांचा सुवास घेत..... " अच्छा तर ..हा बोक्या येऊन गेला वाटतं...म्हणजे विसरला नाही हा" ....नंदू आनंदली...

नेहमी तिच्या वाढदिवसाला शरू तिला मोगऱ्याची फुल द्यायचा...तिला खूप आवडतात त्याला माहिती होत...

आनंदातच उड्या मारत ती आजीकडे आली.....आजीच्या गळ्यात पडली...

" अग हो .... चल जा आधी आवरून ये .... औक्षावांन करायचं ना...." आजी

" हो जाते ग... ये आजी तोपर्यंत या फुलांचा गजरा दे ना बनऊन ...तो गाठींचा... तुलाच येतो ना " .....नंदू

" हो देते करून , आता काय बाईसाहेब चा वाढदिवस... ऐकावेच लागेल ना." .. आजी हसत तिच्या डोक्यावर टपली मारत बोलली

नंदू आंघोळीसाठी जातांना..."  आणि हो लांब कर चांगला...आलेच मी " 

" उठला काय आमचा लाडोबा." ....आबासाहेब पूजा आटोपत बोलले...

" हा आबा" ... म्हणत ती आबासाहेब च्या गळ्यात पडली...." बर मी येतेच २ मि आवरून." .नी ती पळाली..

नंदू ने फिक्कट निळ्या रंगाचं अनारकली चुडीदार घातलं, त्यावर आर्श्यांची सुदंर नक्षी होती... प्रकाशामुळे ते आरसे चमकत होते... खड्यांचे कानातले..केस थोडे क्लिप लाऊन मोकळे सोडले होते...हातात मॅचींग बांगड्या...ओठांवर लीपबाम..नी कपाळावर छोटीशी चंद्रकोर...

हातातल्या बांगड्याचा हाथ स्वतःसामोर घेऊन वाजवत... " छान झालीय तयारी ... खाली जाऊया." ..म्हणत ती खाली आली..

" किती गोड दिसतेय माझं लेकरु.." .. आजी ने काजळ तिच्या कानामागे लावलं..

" आजी गजरा" ......नंदू
" हो हो केलाय." .. टोपली मधला गजरा सारखा करत आजी बोलली...

" माळून देना ग आजी केसांमध्ये..." .नंदू
आजी ने गजरा तिच्या केसांमध्ये माळला..

" ये आजी तू माझी बेस्ट आजी आहेस ," तिचे गाल ओढत नंदू बोलली...

" बरं बरं पुरे झाला माझं कौतुक ... जा श्रिराज ला बोलावून आण , सकाळी पण येऊन गेला तो...तुम्ही झोपल्या होत्या .... औक्षवन करूया ..." 

नंदू पळतच शरू ला बोलवायला आली

"शरू ssss "आवाज देत ती घरात गेली...

" अरे वाह, आज एक पिल्लू खूप गोड दिसतेय ... " श्रिराज ची मामी म्हणाली...
" हो आज वाढदिवस आहे ना माझा...शरू कुठेय..??. आजी ने बोलावलंय त्यालाा " .,.नंदू

"अगं बस , आवरतोय तो, येईलच... तू तोंड तर गोड कर"  म्हणत श्रिराज च्या आई ने तिला लाडू भरवला..

सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. नंदू ने सगळ्यांना कंबरेत वाकून नमस्कार केला.....

" हा शरू पण ना खूप वेळ लावतोय.." ..काकी मी पुढे जाते , शरू ला पाठवा ना....आजी वाट बघत असेल माझी..."  ती घरी परत आली

" ये आजी हे केस गजर्यात गुंततात आहे ग... " कुरकुर करत ती आतमध्ये आली..

" अगं वेणी घालायची  केसांची,  मग नाही गुंतत ते" ...आजी
" घालून दे ना मग ..तुला तर माहिती आहे मला नाही जमत ते ." ..
ती आजी च्या पुढ्यात बसली.. आजी तिची केसांची वेणी घालत होती..

" आता पण तुला वेणी नाही घालता येत ..मोठी झाली तरी." .. शरू मस्करी करत आतमध्ये आला..
" काय ग आजी  किती लाडावून ठेवलं आहे तिला"  ... हसत तो बोलला...

"आजी sssss बघ ना ग हा?" .. रडक्या सुरात नंदू बोलली

" कोण त्रास देताय आमच्या राजकन्येला... जी सगळ्यांना त्रास देत असते.... " आबासाहेब हसत म्हणाले
सगळे हसायला लागले

आजीने पाट मांडला होता, त्या भोवती रांगोळीने सुंदर वेल काढला होता...
"नंदू बस बाळा इथे." ..आजी
नंदू  शरू ला ठेंगा दाखवत पाटावर बसली
आबासाहेब नी शरू देखील शेजारी खुर्च्यांवर बसले...

आजीने नंदू ला कुंकू लावलं.. तिचं औक्षवन केले.... नंदूने आजी आबांना नमस्कार केला.....

"१८व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या पिल्लू ला ..". आबासाहेब तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले..

"हॅपी बर्थडे नंद्या."... नंदू ला जवळ घेत शरू म्हणाला

"चला आता गिफ्ट द्या मला.."हाथ पुढे करत नंदू...

"ये मोठं झाल्यावर आता गिफ्ट नसते भेटत..".शरू मस्करी करत बोलला

"आमच्याकडे अस काही नसते...तुमच्या शहरात असेल अस काही.". त्याला चिडत नंदू बोलली

"बरं आता कायद्याने सुद्धा तुम्ही मोठ्या झाल्या आहात.... आता तरी टवाळकी करणं बंद करा...जबाबदारीने वागा...." आबासाहेब

"हो."... नंदू

आजी ने नंदू ला मोत्यांचा सेट आणला तिला हातात दिला..

".बघ आजीच बेस्ट आहे फक्त..."नंदू

तिने लगेच तिचे कानातले काढले नी मोत्यांचे घातले, गळ्यात पण आजीने दिलेले मोत्याचा सेट घातला..

"बसा पोरांनो ,, शीरा केलाय... आणते" ....म्हणत आजी आतमध्ये गेल्या.. नंदू पण आजी ला मदत करायला गेली..

आजी ने गोडाचा शिरा केला होता नंदू ला आवडते म्हणून..

नंदू ला शीरा खाण्यात गुंतलेलं बघत.,.. "ई... तुला  आतपण गोड च आवडते काय... म्हणूनच इतकी जाडी झालिये तू....?" तिला चिडवत शरू म्हणाला...

"ये तू स्वतःकडे बघ , कसला काडी झालायेस..". नंदू

खाता खाता दोघांची चिवचिव सुरू होती...

"बरं आजी आम्ही येतो जाऊन... मी गाडी काढतो ग, तू ये बाहेर.". म्हणत शरू उठला....

"बाहेर.,?"... नंदू डोळे मोठे करत बोलली..." हे कधी ठरलं...?"

"ते सरप्राइज आहे तुझ्यासाठी...".शरू गालात हसत बोलला

"सरप्राइज..... wow..." नंदू आनंदाने उड्या मारत होती...
तिला उद्या मारताना बघून शरू पण आनंदला...

उड्या मारताना तिला आठवलं..."पण आबा... ते परमिशन देतील काय...?"

"काळजी नको करू, मी काढलीय परमिशन आधीच... चल आता पटकन... " शरू बाहेर गेला

तो ओपन जीप घेऊन आला... नी हॉर्न वाजवला...तशी आजीला बाय करून नंदू बाहेर आली......

"बापरे हा बोक्या पण किती छान दिसतो.." .. नंदू एकटक त्याच्या कडे बघत होती..
शरू ने केसांची छोटी मागे पोनी बांधली होती, हलकीशी दाढी.. डोळ्यांवर काळा गॉगल, ब्ल्यू चेक्स च शिर्ट, भाह्या फोल्ड केलेल्या.. लाइट ब्ल्यू जीन्स ... हातात वॉच..ड्रायव्हिंग सीट वर बसून नंदू कडे बघत होता...

"ओ मॅडम, मला माहिती मी खूप हँडसम दिसतोय....नंतर बघा मला.. चल आता लवकर ,संध्याकाळच्या आत परत पण यायचं आहे ...,"
तशी भानावर येत नंदू शरू च्या शेजारी गाडी मध्ये बसली...

ती दोघं एका टेकडी वर आले...तिच्या आवडीच्या बाप्पांच्या देवळात.....तिथला परिसर खूप सुंदर होता, सकाळची वेळ असल्यामुळे नी देवळा मुळे तिथले वातावरण खूप प्रसन्न वाटत होते..

ये माझं आवडती जागा.... गाडीतून उतरत शरू चा हाथ पकडत नंदू उड्या मारत होती...

अगं बस किती उड्या मारते लहान मुलांसारखी..... चल आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आधी... शरू

दोघं आता मध्ये बाप्पांचं दर्शन घेऊन आले ...नंतर थोड्या वेळ आजूबाजूचा परिसर फिरले.....

अग ये चिमणे अजून बराच फिरायच आपल्याला... चल गाडी मध्ये बस...शरू

हो रे बोक्या आलेच.....

शरू ने गाडी एक दुकानात घेतली होती, तिथे त्यांनी मुलांसाठी शाळेचं उपयुक्त सामान घेतले ....नंतर खूप चॉकलेट्स नी खायचं सामान घेतले... नंदू सामान घेण्यात बिझी होती तेव्हा शरू ने केक आणला होता... खरेदी आटोपून दोघंही एका अनाथाश्रम मध्ये आले .... नंदू नेहमी आपल्या आबा सोबत यायची इथे... आबा बरीच मदत करायचे आश्रमाला .... त्यामुळे तिला तिथे नेहमीच यायला आवडायचे ..... ही पण तिची आवडती जागा होती...

दोघंही आतमध्ये गेले.... सगळे मुलं नंडूच्या भोवती जमले .. शरू ने आणलेलं सामान मुलांमध्ये वाटले ..

काकी कशा आहात... नंदू तिथल्या केयर टेकर बोलत होती..त्या पण तिला ओळखत होत्या.

बरं चला मुलांनो आपण केक कपुयात...शरू
आज काय आहे दादा.... त्यातल्या एका लहानग्या मुली ने विचारले

आज ना खूप छान दिवस आहे ... चला ये पटकन...केक टेबल वर ठेवला .,.नी नंदू ला आवाज दिला ...

हे कधी घेतले शरू ने ....ती विचार करतच आली..

ये शरू हॅपी birthday गाणं नाही म्हणायचं हा ..मुलांना वाटीत वाटेल रे त्यांची वाढदिवस साजरे नाही होत ना ...

बापरे ही लहानशी माझी चिमणी इतकी समजदार झाली ...शरू कौतुकाने नंदू कडे बघत होता...
काय बघतोय असा.... नंदू

हे पिलू लवकरच मोठं झालं ग....
हो तू म्हणशील तस...... शरू..

नंदू ने तिथल्या एका छोट्या मुलीला उचललं नी केक जवळ आली .. मग लहान मुलीचा हाथ पकडून तिने केक कापला नी सगळ्या मुलांना भरवण्यात बिझी झाली... सगळी मुलं केक बघून खूप खुश झाली होती..

शरू ने खाण्यापिण्याचे सामान दिले...काकी जेवायची तयारी कराल....

सगळ्यांची खूप मस्ती चालली होती.. नंदू पण त्यांच्या मध्ये खूप रमली होती....

ताई नाच कर ना  ... किती दिवस झाले तुझा नाच नाही बघितला.....मुलं म्हणाली

शरु भिंती ला टेकून उभा होता ... पुढ्यात मुलं बसली होती.. नंदू ने ओढणी खोचली.....  छम छम  गाण्यावर तिने नाच सुरू केला...मुलं खूप एन्जॉय करत होती

शरू भिंतीला टेकून तिच्याकडे बघत होता... तिच्या सगळ्या हालचाली, expressions डोळ्यात साठाऊन घेत होता ...अमेरिका ला गेल्यावर त्याला परत काही वर्ष त्याला  नंदू ला भेटता नाही येणार होते... जास्तीत जास्त वेळ तो नंदू सोबत घालवत होता...
तिच्या प्रत्येक अदांवर त्याच मन घायाळ होत होत....तो तिला बघण्यात खूप गुंतला होता...

नंदू खूप छान नाच करत होती... गिरकी घेत ती शरूच्या आंगवर जाऊन आदळली..... पडणारच होती की शरू ने तिला जवळ ओढून घेतले...

नंदू ने पडायच्या भीतीने गच्च डोळे मिटले होते...
शरू तिला एकटक बघत होता ... दमल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर घाम आला होता...केस पण विस्कटले होते ...
ही सगळ्याच अवतारात किती सुंदर दिसते.... मनातच..
नंदू डोळे उघड .. बघ इकडे ....आवाजाने नंदू भानावर आली... तिला कळलं होत ती पडली नाहीये शरू ने तिला पकडले आहे..
नंडूने डोळे उघडले... तिला शरू तिच्याकडे बघतांना दिसला...त्याच्या डोळ्यात तिला प्रेम, काळजी दिसत होती...ती पण त्याच्याकडे बघत होती, आता नंदू पण त्याच्या डोळ्यात हरवली होती...त्याच्या स्पर्शाने तिला आज वेगळं वाटत होत...खूप प्रेम जाणवत होत...तिच्या शरीरातुन गोड शिरशिरी गेली...काहीतरी वेगळं आहे हे ... पण कळत नाहीये...पण खूप छान वाटत आज ... तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते ...

मुलांच्या टाळ्यांच्या आवाजाने ती दोघं भा अवर आली, नंदू त्याच्या पासून दूर होत वळली...
आ s s ह.....ती कळवली......तिने डोक्याला हाथ लावला... मागे वळून बघतेय त शरू तिच्याकडे काळजी ने बघत होता..
तिच्या आवाजाने त्याचा पण काळजातून एक कळ निघाली होती..त्याला पण कळले नाही काय झाले ते..

नंतर तिने खाली बघितले तर तिचे केस त्याच्या कॉलर जवळ च्या बटन मध्ये अडकले होते...
ती जवळ गेली , केसा सोडवण्याचा प्रयत्न करत होती..
ती खूप जवळ गेल्याने त्याचे श्वास तिला जाणवत होते...तिची धडधड खूप वाढली... केस सोडवता सोडवता..तिने जास्तीच गुंतवले होते... तिची चालली धडपड तो बघत होता...आता त्याचा पण लक्षात आलं होत ..तो समाजाचं ते समाजाला होता...

तीच हृदय दुप्पट स्पीड ने धडधडत होते...हे मला काय होते...तिला काही सुचत नव्हते...ये मदत कर ना ... बघत काय बसलाय...बघ  ना हे निघत नाहीये ...ती अटकत बोलली ...कावरीबावरी झाली होती..

त्याने तिचे हाथ पकडले...... sshhh शांत हो ... मी बघतो... तिचे हाथ बाजूला करत तो हळू आवाजात बोलला..
तो हळू हळू तिचे केस काढत होता...तिला दुखणार नाही याची काळजी घेत होता ...
तशी ती शांत झाली.....ती त्याचे भाव टिपण्यात मग्ना झाली होती..... किती काळजी घेतो हा आपली....लहानपणापासून तिला सगळ आठवत होत... ..तो जवळ असला की आपल्याला काहीच नको असते...किती रमते मी त्याचामध्ये...मला झालेला थोडंसं दुःख सुद्धा याला सहन होत नाही...कुणी काही बोललं की लगेच माझी बाजू घेतो......हे काय होतंय आपल्याला... का त्यालाच बघावस वाटतेय....मीना म्हणते तसाच असेल काय... मला प्रेम झाले असेल काय....असे खूप विचार नंदू च्या डोक्यात सुरू होते...

झालं ग चिमणे...तीच्ये केस बाजूला करत तो बोलला...
हा... ह.... नंदू

काय कसला विचार सुरू आहे या इवल्याश्या डोक्यात ....मस्करी करत शरू म्हणाला...
ती.... काही नाही...गोंधळलेल्या स्वरात बोलली. 

सगळ्यांसोबत जेवण आटोपून ते निघाले... आता नंदू खूप शांत बसली होती... हळूच डोळ्याच्या कोनातून शरू कडे अधूनमधून बघत होती..
  काय झालं अशी का शांत बसलीय.... मघापासून बघतोय ...जेवण करतांना पण शांत होती...ठीक आहेस ना ...तो काळजीने ड्राईव्ह करत तिला बघत बोलला...

हो ठीक आहे तिने फक्त मान हलवली...

या मुली पण ना... काय सुरू असते त्यांचंच त्यांना माहिती...त्याने ड्रायव्हिंग वर concentrate केले....

बाजूच्या गावात मेळा लागला होता... आता तिथेच ते चालले होते.. आता ऊन थोड वाढलं होतं, त्याने जीप च वरच कव्हर घातलं होतं...गाव थोड दूर होत ...जेवण झाल्यामुळे नी त्यात हवा लागल्यामुळे नंदू ला झोप येत होती, ती सिट ला मागे टेकून झोपी गेली होती....हवेमुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर उडत होते.... शरू ड्राईव्ह करत अधूनमधून तिच्या निरागस चेहऱ्यकडे बघत होता...

नंदू उठ...पोहचलो आपण...त्याने तिला आवाज दिला..
wow आपण मेळ्यात आलो.... ती आनंदाने ओरडली...

आता थोड ऊन उतरलं होत ... आजूबाजूचा परिसर छान वाटत होता......ती जिथे जिथे ती जायची तो तिच्या मागे मागे जात होता .... सगळ्या rides मधे ती बसली होती... तो पण  तिला सोबत करत होता...
गोला... आइस्क्रीम असं सगळं खाऊन झालं होत ..

तिथे छोटी छोटी दुकाने होती... ती प्रत्येक दुकानात जात होती...

अरे आपण पैसेच नाही आणले....मनातच म्हणत... ये बोक्या तू मला आधी का नाही सांगितले आपण इथे येणार आहोत .... मी आबांकडून पैसे आणले असते ना...तिच्या आवडीच सगळं दिसत असूनही आपल्याला काही घेता नाही येणार म्हणून ती रुसली होती...
ओ रुसुबाई.... घ्या तुम्हाला जे हवाय ते ...आहेत माझ्याकडे पैसे....शरू

खरंच....नंदू त्याच्या कडे आनंदाने बघत...म्हणली

हो, तुला जे जे आवडते ते घे.....शरू

तुझ्या कडे इतके पैसे कसे काय...नंदू

अगं मी पार्ट टाईम जॉब करत होतो तिथे...अनुभव म्हणून...म्हणून त इकडे यायला जमलं नाही ना इतकी वर्ष..

ती कौतुकाने त्याच्या कडे बघत होती.. इतक्या मोठ्या घरचा मुलगा...पण किती स्वाभिमानी आहे ....

अग किती ते प्रश्न.... चल आता...
तिने बांगड्या, कानातले.... ओढण्या घेतल्या...मन भरून खरेदी केली तिने ....

थकली बाबा आता....नंदू
खूप मज्जा केली आज, सगळ्यात छान वाढदिवस झाला माझा हा ...म्हणत ती शरू ला बिलगली...त्याने पण तिला जवळ घेतले, पाठीवर थोपटले , तिच्या डोक्यावर केसांवर किस केले...बर चल बस गाडी मध्ये... अजुन पण सरप्राइज बाकी आहे .....शरू

क...काय.... नंदू उडालीच...
आणखी काय आता.......ती दोन्ही हाथ गालांवर ठेवत डोळे मोठे करत बोलली..... मी तर आताच थकले रे .....

१८वा वाढदिवस आहे माझ्या परी चा ... स्पेशल असायलाच हवा ना ..... शरू गालात हसत बोलला.....
गाडीत बसून ते दोघं घरी जायला निघाले ..,..

********

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️