Aug 16, 2022
मनोरंजन

नंदिनी कथा लिहितांना.....

Read Later
नंदिनी कथा लिहितांना.....

नमस्कार मित्र/मैत्रिणींनो

सगळ्यात पहिले सॉरी , हा भाग बघून तुम्हाला वाटले असेल की पुढला भाग आला ..... पण हे माझं आभार पत्र बघून तुमचा हिरमोड झाला असेल....पण आता कथा संपत आली आहे तर सगळ्यांचे आभार मानने जरुरी आहे ... 

आज थोडं "नंदिनी...श्वास माझा" या कथेबद्दल .....

सगळ्यात आधी आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपणाला ही कथा आवडली आणि भरभरून कथेला प्रेम दिले. 

नंदिनी ... श्वास माझा ही कथा आता अल्मोस्ट संपली आहे .... कधी कॉमेंट्स मधून तर कधी मेसेजेस मधून नंदिनी बद्दल काही प्रश्न विचारल्या जात होते ... तर अश्या काही प्रश्नांची उत्तरे मी या लेखात देते..

नंदिनी कथा लिहितांना एक क्लिअर होते की एक पारिवारिक आणि प्रेमकथा लिहायची...
प्रेमकथा...पण त्यात वेगळेपण सुद्धा हवे होते ..... एक निस्वार्थ प्रेम दखवयाचे होते... आणि मग ते जोडपं आठवलं ...... त्या जोडप्याची रिअल कथा  मी शेवटी सांगणार आहे...

नंदिनी या कथेतील प्रेम निस्वार्थ दाखवायचे होते आणि नाती अपेक्षारहित.... खरं तर अपेक्षारहित कुठलच नातं नाहीये... अगदी मायलेक सुद्धा... असं म्हणतात एका आईला कशाचीच अपेक्षा नसते पण खरंतर तिच्या पण कमी म्हणू माफक म्हणू पण असतातच अपेक्षा आपल्या अपत्त्याकडून...काही नाही तर म्हातारपणी याने आपल्या सांभाळावे... काही हवे नको ते बघावे... तर अपेक्षा असतातच ... त्या असाव्या सुद्धा..पण त्या किती असाव्या  यावर मात्र नक्कीच कंट्रोल असावा.... अपेक्षांचं ओझं आणि कडू तिखट शब्दांचे तीर यांनी नातं करपते, चुर्गाळते , आणि नंतर कितीही प्रयत्न केला तरी मनात उठलेली सल मात्र शेवटपर्यंत  जात नाही...आणि नातं पण पुर्वावत होत नाही जसे एखादा प्लेन कागद एकदा चुरगाळला की त्याला कितीही सरळ करा, त्यावर प्रेस फिरवा ,  तो आधीसारखा प्लेन मऊशार होत नाही...

एक हसरं खेळत घर, सगळं मनाप्रमाणे सुरू असते.... आणि मग होतं मुलाचं लग्न , घरात सून येते आणि मग सगळंच बदलून जातं ... कारण मग प्रत्येक नात्याकडून खूप अपेक्षा वाढतात..

कुठलं पण नवीन नातं हे घरात नव्याने जन्मलेल्या बाळसारख असते जे खूप काळजीने जपावे लागते...आणि हाच कॉन्सेप्ट या कथेत वापरला..

घरात सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती घरातील मोठ्या व्यक्तीची.... घरात योग्य निर्णय घेतला जातील ही त्यांची जबाबदारी असते... जसे इथे राजचे आबा... ते राज नंदिनीच्या पाठशी होते...त्यामुळे बाकी लोकांनी कितीही oppose केले तरी एकदा घरातील मोठी व्यक्ती बोलली की सगळे ते मान्य करतात.... पण ही घरातील व्यक्ती समजदार असणे खूप महत्वाचे असते...

नंदिनीला काहीच कळत नाही , काही येत नाही , ती लहान आहे हे समजून वेळाने का होईना पण घरातील सगळ्यांनीच तिला तिच्या कडून काहीच ( एका सूने कडून असतात तश्या सगळ्या  ) अपेक्षा न ठेवता तिला स्वीकारले.....तिला वेळ दिला... आणि त्यांच्यातील हे नातं फुलत गेलं .

नंदिनी देशमुख परिवारात एक सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून आली होती....त्यामुळे तिला तिथे मिळवून घ्यायला सोपी पडले...सासू सून ...सासर हे काहीच तिला कळत नव्हते...जसे आजीकडे होती राहत होती  तशीच ती इथेही राहत होती... आणि हळूहळू मोठ्यांच्या शिकवण्याने ती तिथल्या गोष्टी शिकली....त्यामुळे सासर नावाची अढी तिच्या नात्यात नव्हती.

श्रीराज .... सर्वगुण संपन्न दाखवला आहे.... आणि खूप संयमी .... नायक असल्यामुळे जरा जास्तीच सगळं चांगलं दाखवले आहे .... कारण ही गरज आहे आता... खास करून संयम असण्याची.... त्यामुळे कदाचित तुम्हाला वाटेल काही गोष्टींचा अतिरेक झाला , जसे पात्रांचे गुण दोष , प्रेम , संयम , काळजी , सासर माहेर-  नात्यांमध्ये  अती गोडवा ...इत्यादी .....माझे एक लेखक मित्र म्हणाले होते की आपल्या कथांमधून ०.००००००१ टक्का जरी काही चांगलं फरक पडला तर आपली कथा यशस्वी झाली... आपलं लिखाण सार्थकी ठरले ..... आणि त्यांचं मला पटले सुद्धा.....

आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत आहेत खास करून मुली बायकांसोबत ... जर असे संयमी ( खास करून आपल्या मनावर , शरीरावर कंट्रोल ठेवणारे) पुरुष असतील तर बलात्कार , मुलींची छेडखानी असे प्रकार घडणार नाहीत.... बाहेरच काय घरात पण बायकांवर कधी मानसिक तर कधी शरिएक  अत्याचार होतच असतो ...

सासर आणि सून या दोघांमधला मुलगा हा दुवा असतो... ही नाती एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने balance कशी होतील याची जबाबदारी मुलाची सुद्धा असते किंवा सूनेपेक्षा मुलाचीच जबाबदारी जास्ती असते असे  म्हटले तरी गैर नको वाटायला...आई किंवा बायको किंवा इतर नाती ,  यात गरज पडली तर योग्य ती बाजू त्याने आधीपासून घ्यायला हवी...नाहीतर नाती चिघळायला वेळ लागत नाही...

नवरा बायकोचे नाते हे शारिरीक संबंधच्याही पुढे असते... सगळ्यात महत्वाचं असते एकमेकांसोबत  commitment , विश्वास आणि आदर...जे राज नंदिनीच्या नात्यांमधून  सांगण्याचा प्रयत्न केला आहे...

राजने नंदिनीची घेतलेली काळजी.... खाण्यापिण्यात म्हणा , किंवा तिची तिच्या त्या चार दिवसात घेतलेली काळजी.....या चार दिवसात बायका थोड्या थकलेल्या असतात...तर जर प्रत्येक नवऱ्याने थोडीफार काळजी घेतली , मदत केली तर बिघडते कुठे.....

आपल्या समाजातील लग्नसंस्थाबद्दल  खास करून  बोलणी , व्यवहार , हुंडा, देणेघेणे .....थोडं लिहायचं होते म्हणून राहुल आणि रश्मीच्या लग्नाचा घाट घातला....

आयुष्यात मैत्री किती महत्वाची असते, मित्रांमुळे बाहेरील जग आपलं करण्यात मदत होते.....

एखाद्या व्यक्ती बद्दल माहिती नसते, तो व्यक्ती कुठल्या परिस्थितीतून जातोय, त्याच्यावर  काय वाईट प्रसंग ओढावले आहेत  ..... तरी नातेवाईक , समाजातील लोक आपले  तर्कवितर्क लावत समोरच्या व्यक्तीचे मूल्यमापन करून मोकळे होतात....त्यांना शेरे मारत आनंद घेतात....त्यांच्या परिस्थीतीवर हसतात....जसे राज आणि नंदिनीबद्दल काही लोकं वागत होते..

नात्यांमध्ये जसे प्रेम काळजी महत्वाची असते तसेच गैरसमज हा किती घातक असतो , वेळीच गैरसमज दूर नाहीं केला तर नातं किती ताणल्या जाऊ शकते किंवा तुटू सुद्धा शकते हेच राजनंदिनीच्या गैरसमजमुळे ताणलेल्या नात्यांमधून  सांगायचे होते...

नात्यांची गंमत बघा......राजनंदिनीने आपले नाते , आपलं प्रेम एकमेकांना व्यक्त करावं , जवळ यावे...त्यांचा दुरावा मिटावा.......हे त्यांना तर वाटत होतेच पण आपल्याला सुद्धा वाटत होते.... इन्फॅक्ट आपण याचीच वाट बघत होतो....ते एकत्र असूनही आपल्याला ते दूर बघावल्या जात नव्हते ...... तर खऱ्या नात्यात का आपण व्यक्त व्हावं नाही...?कदाचित  कोणीतरी तुमच्या दोन गोड शब्दांसाठी झुरत असेल....

शेवटी नातं कितीही घट्ट असले तरी एकेमकांच्या मनातील भावना अधूनमधून सांगणं किती गरजेचं असते....एकमेकांना कितीही चांगलं ओळखत असलो तरी कधीना कधी भावनेच्या आहारी चुका होऊ शकतात...... राज नंदिनी मनानी , शरीराने सोबत होते... पण तरीही जोपर्यंत त्यांनी आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त नाही केले , कबूल नाही केले तोपर्यंत ते एक नाही होऊ शकले.... जवळ असून ते दूर होते.... का हट्टाहास करावा खूप समजदरीचा ... आम्हाला एकमेकांना I love you म्हणायची गरज नाही, प्रेम व्यक्त करायची, दाखवायची गरज नाही , आम्ही एकमेकांना खूप छान ओळखतो वैगरे.... जर एखादे surprise, खास दिवस , वाढदिवस इत्यादी  आपल्या जोडीदारासाठी स्पेशल केला.. आणि तर नक्कीच तुमचा जोडीदार सुखावून जाईल... आणि या धकाधकीच्या जीवनात एक क्षण आपला , आनंदाचा  सुखाचा असेल आहे....

आयुष्यात खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते , बघितलेली स्वप्नं मातीमोल होऊ शकतात.... आपल्यांचा साथ सुटतो...एकट्याने या आयुष्याच्या वाटेवर प्रवास करावा लागतो....कधी कधी प्रसंग इतकी कठीण असतात की पार केल्या जात नाही, त्यावेळी व्यक्ती खचतो ....आणि एकतर चुकीचा मार्ग निवडतो ( आत्महत्या सारखा ) नाहीतर चुकीची वाट निवडतो..... निराशा पदरी पडते  आणि आयुष्य उध्वस्त करून बसतो... राज हरला नाही , शेवट पर्यंत त्याने प्रयत्न सुरू ठेवले रिझल्ट काय असेल हे माहिती नसतांना सुद्धा......

आणि लास्ट...... मनोरंजन..... सगळेच आपापल्या आयुष्यात बऱ्याच प्रसंगांना सामोरे जात असतात.... त्यात दुसऱ्यांना त्यांचं त्रास थोड्या काळासाठी विसरवण्यासाठी , हसावण्यासाठी  , मनोरंजन करण्यासाठी , वास्तविकतेच्या झळी पासून दूर स्वप्न नगरीत नेण्यासाठी हा सगळा खटाटोप......... तुम्ही सगळे या नंदिनी...श्वास माझा कथेचे प्रवासी झालात....कथेला भरभरून प्रेम दिले त्यासाठी धन्यवाद !

हे सगळं या एका कथेत लिहितांना कदाचित कधीकधी कथा तुम्हाला ताणल्यासारखी वाटली किंवा बोअर झाली...तर सॉरी..पण हे सगळं लिहायचे होते...

तर थोडक्यात प्रेमाची आणि नात्यांची सांगड  आणि हे वरती सांगितलेले  सगळे पॉइंट्स डोक्यात ठेऊन या कथेची आखणी केली होती......कथेची कच्ची आखणी केली तेव्हा वाटले 15-20 भागात कथा लिहून होऊन जाईल......पण लिहीत गेले आणि ही कथा 86 भागा पर्यंत पोहचली....माझ्यासाठी हा पल्ला गाठणे म्हणजे खूप मोठं आहे ...

ईरावर बऱ्याच कथांनी 100 भाग पार केले आहेत.... आणि इतर ही बऱ्याच मोठ्या कथा झाल्या आहेत....काही लेखक सातत्याने इरावर लिहीत आहेत, अप्रतिम असे त्यांचे लेखन आहे...... खरंच हे सगळे लेखक कौतुकास्पद आहेत....
 

मी बरेचदा आधीही सांगितले आहे की मी काही लेखिका नाही.... मी आपल्या सगळ्यांसारखीच एक वाचक आहे ... मला तुम्ही लॉकडाऊनची लेखिका सुद्धा म्हणून शकता ... लॉकडाऊनमुळे बराच शिल्लक वेळ मिळत होता... रीडिंग करतांना मनात आले की एखादी कथा लिहून बघावी काय.....फार काही नाही तर नवीन काहीतरी शिकता येईल...नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न तरी करून बघुया.... आणि मग हा लिखाणाचा थोडासा अट्टाहास केला...

वाचक मित्रांचे खूप खूप धन्यवाद.... वेळोवेळी कॉमेंट्स मधून मार्गदर्शन केले... लिखाणा बाबतीत असो किंवा शुद्धलेखन बाबत.....किंवा लवकर भाग पोस्ट करत नाही त्या बाबत.....काही लेखक/वाचक मंडळींनी तर अक्षरशः कानात गरम तेलही ओतले  ,कधीही विसरणार नाही अश्या comments आल्या होत्या..... पण तुमचे हे तिखट गोड शब्द पुढे जाण्यास मार्गदर्शक ठरले.....thank you!!

माझी लिखाणाची भाषा साहित्यिक नाही, आणि मला येत सुद्धा नाही... अगदी बोली भाषा आहे ....पण साध्या भाषेत समोरच्या सोबत कनेक्ट लवकर होता येते असे मला वाटते.......... सुरुवातीला कथा edit कशी करायची माहिती नव्हते... त्यात बरेच शब्द ऑटो करेक्ट होऊन यायचे....त्यात मराठीतून टायपिंग....कधीकधी डोकं फास्ट पळत की टायपिंग करतांना बरेच शब्द खाऊन पण टाकलेले असतात..... सगळंच दिव्य आहे  माझ्यासाठी..... त्यामुळे माझ्या काही चुकलेल्या शुद्धलेखनमुळे बऱ्याच जणांना वैताग आला असेल...चीड सुद्धा आली असेल...... त्यासाठी सॉरी......आपले शब्द कोणाच्या जिव्हारी नाही लागतील नेहमीच हीच काळजी असते त्यामुळे शुद्धलेखन दुर्लक्षित झाले..... पण तरीही  सगळ्यांनी माझ्या शब्दातून मला कथेत  काय मांडायच आहे , या भावना समजून घेतल्या...कधीच कशाची/कोणतीच  कंप्लेंट नाही केली त्यासाठी Big Thank you !

ईरा व्यासपीठाचे आणि ईरा टीमचे धन्यवाद , त्यांनी मला इथे कथा लिहिण्यासाठी  संमती दिली......

नंदिनी आणि तूहिरे  कथा सुरू झाल्यावर मधल्या काळात ईराचे काही रुल्स बदलले... त्यामुळे दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरील कथा इथे पोस्ट करणे जमणार नव्हते......... संजना मॅडमकडून परवानगी मागितली..." तिथे पण वाचक जुळल्या गेले आहेत, इथे पण ... मन मोडवं नाही वाटत आहे ".... आणि संजना मॅडमनी समजून घेऊन परवानगी दिली..... त्यासाठी त्यांचे खूप आभार...त्यांच्यामुळेच ईरावर मी ही कथा पूर्ण करू शकले...

काही वाचक  मैत्रिणींनी कथा पुढे सुरू रहावी , काहींनी तर सांगितले १०० भाग पूर्ण करा कथेचे....मूळ कथा जी होती ती पूर्ण झाली आहे.... त्यामुळे कथा पुढे वाढवली तर तुम्हाला सुद्धा बोर होणार..." का उगाच संवाद आणि सीन टाकत बसलाय " , "कथा ताणत आहे " , " कथा बोर करताय " ....असे वाटेल...कथेचे १०० भाग तर पूर्ण नाही करू शकत त्यासाठी सॉरी... पण  थोडं राजनंदिनी बद्दल नक्की लिहितेय....पुढल्या भागात...

***********

दुसरा  प्रश्न .... श्रीराज सारखी व्यक्ती खरंच खऱ्या आयुष्यात  असतात काय ?

श्रीराजच्या ठिकाणी एखादी महिला असती तर कदाचित असे प्रश्न आपल्याला पडले नसते....बाईचे हे कर्तव्यच आहे , तिने हे सगळं करायलाच पाहिजे....किंवा तिने असे काही केले तरी खूप मोठं असे काही  केले नाही असेच मत असते...आपल्या समाजाची बहुतेक विचारसरणी हीच आहे....आपल्या समाजाचा पुरुषाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि बाईकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा,  त्यामुळे असे प्रश्न पडणं साहजिकच आहेत...

तर....श्रीराज सारखी व्यक्ती खरंच खऱ्या आयुष्यात  असतात काय ?
तर माझं उत्तर आहे ' हो '.....असे बरेच लोकं असतात.....त्यातीलच एक म्हणजे आमचे शेजारी ...म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणारे.... यांची आमची ओळख झाली ते यांच्या मुलीमुळे..ती परी माझ्या मुलांसोबत खेळायला यायची...आणि मग आमची हळूहळू त्यांच्या सोबत ओळख झाली आणि मग काही काही गोष्टी कळायला लागल्या.......    तर यांची कथा बरीचशी आपल्या नंदिनीच्या कथेसोबत मिळती जुळती आहे... ही रिअल लाईफ कथा मी थोडी शॉर्टमध्ये सांगते... या राजची नंदिनी abnormal तर नाहीये पण नॉर्मल सुधा नाही आहे... म्हणजे ती तिच्या वयापेक्षा लहान असल्यासारखी वागते... मेडीकली एक्झॅक्ट word मी सांगणार नाही कारण मग काही उत्सुक वाचक लगेच Google मामांना विचारतील,  माहिती काढतील , मग हे असे नसते किंवा असते यावर वाद होतील.... तर ही नंदिनी एका मुलीची आई आहे, पण नॉर्मल व्यक्तीसारखी वागत नाही... यातला राज दिल्लीला एका मोठ्या फर्ममध्ये जॉब करत होता...पण जसजशी मुलगी मोठी होऊ लागली , त्याला एकट्याने बायको आणि मुलगी सांभाळणे जमले नाही म्हणून तिथला जॉब सोडून ते आपल्या होम टाऊनला परतले... आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला... स्वतः चा बिझनेस म्हटलं कोणाच्या दबावात नाही आणि पाहिजे तेव्हा घरी वेळ देता येईल हा त्यांचा कॉन्सेप्ट होता...बाकी यात त्यांच्या परिवाराची तशी फारशी साथ नाही..... घरी दिवसभर मुलीला आणि बायकोला सांभाळायला बाई ठेवली.
तो राज आपल्या नंदिनीला रोज रात्री हाथ पकडून फिरायला नेतो... सोसायटीमध्ये काही उत्सव असला की घेऊन येतो....तिला नीट प्रसाद नाही खाता येणार..तेव्हा तो नीट तिचे तोंड पुसून देतो.... घरी मुलीच्या वाढदिवसाला त्या नंदिनीला आपल्या मुलीचे नीट औक्षण पण नाही करता येत तर तो थाळी हातात पकडुन तिला औक्षण कसे करायचे ते शिकवतो...वेळ प्रसंगी तिला  रागावतो......आणि ती सुद्धा लहान मुलांसारखी रडते .... सकाळी घाई असते म्हणून लवकर नाश्ता बनवतो, मुलीला शाळेसाठी तयार करतो , तिच्या वेण्या घालून देतो ...तिला  बसस्टॉपवर सोडायला येतो.... तो एक हाथी दोघींना पण सांभाळतो आहे.....ती फारफार तर छोटी कामं कपडे घडी करणे...थोडीफार आवराआवर करणे येवढच थोडफार काय तिला  येते.....  पण मी जेव्हाही त्यांना बघितले तो मात्र तिची काळजी घेताना दिसतो....आणि कधी त्यांची ती परी घरातील गमतीजमती सांगते.... त्यानं त्याचं नातं अजिबात लपवलेले नाही...की त्याला त्याची लाज पण वाटत नाही....घरात मुलीचा वाढदिवस असो की आणखी काही उत्सव  ... सगळ्यांना आमंत्रित करतो.... आधी त्यांच्या मुलीची थोडी चिडचिड व्हायची , का आपली आई बाकीच्या मुलांच्या आईसारखी नाही...बरेचदा मला म्हणाली " आंटी मेरी मम्मी स्कूल क्यू नही आती... सबकी मम्मी आती आहे "...पण आता तिला सुद्धा खरी परिस्थिती कळली आहे.... आता त्या राज प्रमाणेच ती सुद्धा आपल्या आईची तशीच काळजी घेते जशी तिचे बाबा.... आणि तुम्हाला गंमत वाटेल पण आता त्यांची ही परिराणी सुद्धा १४ वर्षाची झाली आहे.....

आपली कथा काल्पनिक होती.. म्हणून आपली नंदिनी स्वस्थ होऊन  श्रीराजला परत मिळाली.... पण या खऱ्या कथेतील नंदिनी मात्र  आहे तशीच आहे.... आणि हेच सत्य त्या दोघा बापलेकीने स्वीकारले आहे......

***********
Stay safe , stay healthy
Take care !!

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️