Jan 27, 2022
Kathamalika

नंदिनी...श्वास माझा 23

Read Later
नंदिनी...श्वास माझा 23


 

भाग 23

राज उठना....... नंदिनी राजच्या हाताला हलवत त्याला उठवत होती....

काय झालं नंदिनी ..... काही हवंय का...राज झोपेतच बोलत होता

काही नाही झालं पण तू उठना आधी......नंदिनी

राजने घड्याळात बघितलं तर पहाटेचे पाच वाजले होते....... नंदिनी अजून बाहेर अंधारच आहे झोप बघू अजून वेळ आहे सकाळ व्हायला.... तुला भीती वाटते का कशाची..... स्वप्न बघितलेस का काही......... तिच्या हाताला ओढत.... आपल्या कुशीमध्ये घेत तिच्या डोक्यावर दुसऱ्या हाताने थोपटत राज बोलत होता...

राज उठत नाही आहे बघू नंदिनी त्याच्या कानामध्ये बोट घालत होती ......गाल ओढत होती....... तिच्या अशा वागण्याने तो इरिटेत झाला.... त्याची झोपमोड झाली आणि तो उठून बसला.....

काय झालं नंदिनी सकाळी सकाळी.... इतक्या सकाळी का उठलीस. .....राज

अरे ते आबा उठले असतील ना ......पूजा करायची आहे ना मला त्यांच्यासोबत ...फुल तोडायला बगीच्यामध्ये पण जायचं आहे.....नंदिनी

राजने डोक्यावर हात मारून घेतला..... तुझ्यासाठी उठवलं मला..... अजून बराच वेळ आहे आबा सहा साडेसहा वाजता जातील आहे फुल तोडायला.......राज

हो तर मग तोपर्यंत ब्रश करायचा आहे ....आंघोळ करायची आहे..... कपडे घालायचे आहे..... दूध प्यायचं आहे ....किती सारे काम आहे उशीर होईल ना..... आणि मग उशीर झाला तर ते एकटेच तोडून घेतील सगळे फुलं.........नंदिनी

अरे बापरे........ हो खूपच  महत्त्वाची कामे आहेत करायची चला उठा मग....... तुझा ब्रश करून ये मग आपण दूध प्यायला खाली जाऊ...... नंदिनी ब्रश करून आले त्यामागोमाग राज सुद्धा फ्रेश होऊन आला..... बाहेर अंधारच होता ..... नंदिनी राजचा हात पकडून खाली आलेत..... एवढ्या सकाळी घरातला कोणीच उठायचं नाही त्यामुळे त्याने बाकीचे डिस्टर्ब होऊ नये म्हणून लाईट लावला नव्हता...... मंद डीम लाईट हॉलमध्ये सुरू होता...... राजनंदिनी ला डायनिंग टेबल वर बसवले   

तू बसते ना इथे..... भीती तर नाही वाटणार ना एकटीला..... मी तुझ्यासाठी दूध घेऊन येतो........राज

हो..... हो...... मी बसते इथे.... मी कशाला नाही घाबरत..... मी खूप स्ट्रोंग मुलगी आहे.... तुला माहितीये मला कोंबड्यांची पिल्ले सुद्धा पकडता येतात..... आणि मी बकरी च्या मागे धावून सुद्धा त्यांना पकडू शकते.... तिची बडबड सुरु झाली होती.....नंदिनी

...राज  हसला ...आणि तो किचन मध्ये तिच्यासाठी दूध आणि स्वतासाठी कॉफी बनवायला गेला... रात्री बराच वेळ तो ऑफिसचं काम करत होता...... रात्री उशिरा झोप आल्यामुळे तो आतासुद्धा थोडाफार झोपेतच होता......

फ्रीजमधून दुधाचं पातेलं काढून त्याने गॅसवर गरम करायला ठेवलं आणि कप घ्यायला गेला तेवढ्यात त्याचा धक्का लागून ग्लास खाली पडला..... सकाळची शांतता त्या ग्लास पडण्याचा आवाज खूप मोठा झाला होता...

आ ssssss............... घाबरून ओरडतच नंदिनी पळतच राज्याच्या मागे गेले आणि त्याला मागूनच घट्ट पकडून चिटकून उभी राहिली......

आतापर्यंतची फुशारकी मारत असलेली नंदिनी घाबरून त्याच्या जवळ आलेली बघून त्याला खूप हसायला आले होते....... त्याने तिच्या हाताला पकडून तिला आपल्या समोरून फिरवत मिठीत घेतले..... भीतीमुळे तिचे हृदय जोरजोराने  धडधड करत होते.... त्याला तिचे हृदयाचे heart बिट्स अगदी स्पष्ट जाणवत होते....... तिने त्याला खूप घट्ट पकडून घेतले......

शु sss..... शांत हो..... मी आहो ना..... काही नाही झालं.... ग्लास पडला आहे फक्त...... राज तिला पाठीवरुन हात फिरवत बोलला...... आता तिच्या हार्टबीट कमी झाल्या होत्या..... थोडी नॉर्मल झाली होती...

राज मांजर आली होती का ... ग्लास कोणी पाडला...... त्याच्या मिठीतच त्याला घट्ट पकडून ती बोलत होती....

त्याला आता खूप हसायला येत होतं तिची मस्करी करायचा त्याचा मूड झाला..... हो मोठा बोक्याला होता..... त्यानेच पाडला ग्लास.....ते काय आहे ना मांजरीने त्याला नीट रात्री झोपू दिले नाही त्यामुळे बोक्यात सकाळी झोपेतच होता तर त्याचा धक्का लागला आणि ग्लास खाली पडला.....आणि काय ग ....आताच एक मुलगी म्हणत होती की खूप स्ट्रोंग आहे ..घाबरत नाही कशालाच....राज

हो ना मांजर बदमाश दिसते...... कुठे आहे दाखव मला.....मी घाबरत नाही..थांब पकडते....नंदिनी

हे काय आहे इथे माझ्यासमोर..... तिचे गाल ओढत राज बोलला...

काय..... मी मांजर......मी मांजर नाहीये  ..शी मला मांजर आवडत नाही....... नंदिनी राजला पाठीवर मारायला लागली.....

तो तिला मांजर मांजर चिडवत हॉल मध्ये पळत होता आणि ती त्याच्या मागे त्याला मारण्यासाठी म्हणून पळत होती........ तिने तिथली सोफ्यावरची एक कुशन घेतली आणि त्याला मारून फेकली...... राजने सुद्धा दुसरी कुशन घेतली आणि तिला मारून फेकले..... आणि त्यांचा आता कुशन ने  मारामारीचा खेळ सुरू झाला होता......

राज.........हे काय सुरू आहे........ हा काय अवतार करून घेतला आहे खोलीचा आणि स्वतःचा सुद्धा...... राज तुम्ही काय लहान आहे का आता......... आणि हे सकाळी सकाळी तुमच इथे काय सुरू आहे....... आता सुखाने झोपू सुद्धा देणार नाही आहात का तुम्ही...... आजी साहेब गरजल्या

त्यांच्या गोंधळामुळे सगळेच बाहेर उठून आले होते.....

सॉरी ते मी दुध घ्यायला आलो होतो......राज

अरे वा छान...... मुलांच्या  किलबिलाटाने काय सुंदर सकाळ झाली आहे आज खूप वर्षांनी अशी सकाळ बघायला भेटली........ घराला घर पण आलो या माझ्या नंदिनी मुळे....... आबासाहेब त्यांच्या रूम मधून बाहेर येत बोलले... त्यांच्या आवाजाने सगळे परत आत मध्ये जाऊन झोपले.....

आईने त्या तिघांसाठी चहा बनवून घेतला...... राजनी  आधीच नंदिनी साठी चॉकलेट दूध बनवले होते त्याने तो ग्लास नंदिनीला हातात दिला..... आईने सर्वांना चहाचा कप हातात दिला आणि सगळे डायनींग टेबलवर बसून गप्पा मारत बसले.....

राज एवढ्या सकाळी कशाला उठला... आणि किती तो गोंधळ घालून ठेवला.. आई

मी नाही हि नंदिनी आहे......राज

आई मला तो मांजर म्हणून चिडवत होता......नंदिनी

काय.....आई

हो तो बोक्या आला होता किचनमध्ये त्याने ग्लास पडला तर हार राज सांगत होता की मांजर त्याला त्रास देते म्हणून तो बोक्या झोपला नाही आणि मग मला मांजर म्हणत होता.....नंदिनी

तिचा बोलना एकूण आबा आणि आई जोर जोराने हसायला लागले......

अच्छा  बोका होता तर....... मोठा बोका आहे हा...... नंदिनी..... आवडली बाबा आम्हाला मांजर आणि बोका ची जोडी..... आबा नंदिनीला हसत हसतच चिडवत बोलले

त्यांना कळले बघून राजने सुद्धां लाजेने मान वळवून हसायला लागला.......

बर एवढ्या सकाळी सकाळी काय करताय तुम्ही इकडे....आई

आबा तुम्ही तुमच्या पूजेचा टाईम थोडा चेंज करा ना.....तुम्ही काल हिला  बोललेत आपण फुलं तोडायला जाऊ ...हिनी मला सकाळी सकाळी पाच वाजताच उठून ठेवल आहे......राज

हा हा हा..... चला म्हणजे सकाळी कोणालातरी उठायला आवडते......बर तू सांग तुझ्या सोयीची वेळ.... त्यावेळेला मी करेल पूजा.... मला तरी काय काम असते आणि अशी गोड सोबत जर भेटणार असेल तर मी केव्हाही करेल.... तुझी झोप होण सुद्धा खूप महत्त्वाच आहे.......आबा

थँक्यू आबा.....राज

आई आज मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे तर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल.... नंदिनी चा लक्ष नसताना बघून तो आईला बोलला

ठीक आहे ....आई

नंदिनी आंघोळ केली.... तिने फ्रॉक सारखाच असलेला एक ड्रेस घातला राजने तिला युट्युब मध्ये बघून एक वेणी घालून दिली ...वेणी अगदी परफेक्ट नव्हती झाली पण पहिल्यांदाच प्रयत्न केला होता तर बरी झाली होती.... नंदिनी खाली आबांसोबत बगीचा मधून फुलं तोडून आणले आबा देव पूजेला बसले ...नंदिनी त्यांच्याजवळ बसूनच फुलांचा हार करत होती आणि आबांसोबत श्लोक म्हणत होती...

अरे वा नंदिनीला तर सगळेच श्लोक म्हणता येतात...आबा

हो मला आबांनी शिकवलं सगळं बाबा पूजा करत असतात तेव्हा मी त्यांच्या जवळ बसून अशीच श्लोक म्हणत असते...नंदिनी

छान....आबा

आबांना आज घर कसा भरल्यासारखा वाटत होतं र्‍याच दिवसांनी ते खूप आनंदाने पूजा करत होते...

सुनबाई नंदिनीच्या हातून किचन मध्ये पूजा करून घ्या आणि काही गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवून द्या आजी सोप्यावर बसत बोलल्या...

हो आई साहेब....आई

आईने नंदिनीच्या हातून किचन ची आणि गॅस ची पूजा करून घेतली.... पण नंदिनीला मात्र काही बनवता येत नव्हते.....

काय काही बनवता येत नाही..... मग काय करणार आहात आता...... काही रितभात ठेवली नाही.... काय नंदिनी फक्त खाता येतं का... करता काय येत तुम्हाला..... आजी जरा रागवत बोलल्या

मी करते ना आजीला स्वयंपाक घरात मदत मी तिला भाजी तोडून देत होती......नंदिनी

बस पुरे सुनबाई बघा काय करायचं नाही तर तुम्हीच बनवा काहीतरी आणि यांचा हात लावून घ्या त्याला.....आजिसहेब

मी दही साखर कालवून नैवेद्य दाखवू का...... आजी मला असंच नैवेद्य  दाखवायला सांगायची.....नंदिनी

हो चालेल....  सुनबाई द्या तिला दही साखर.... तिच्या हातचा नैवैद्य दाखवणे महत्त्वाचा आहे आणि दही साखर सुद्धा चांगलेच असते .....आबा बोलले

नंदिनी देवापुढे दही साखरेचा नैवेद्य दाखवला.... आबांसोबत मोठ्यामोठ्याने घंटी वाजवून आरती म्हणू लागली..नंदिनी चा आवाज खूप गोड होता...त्यामुळे घरभर तिच्या आरतीचा आवाज घुमत होता...... आजची सकाळ खरंच खूप प्रसन्न वाटत होती घरातले सगळे मेंबर आरतीसाठी आबा आणि नंदिनीच्या मागे येऊन उभे राहिले.... राज सुद्धा फ्रेश होऊन खाली आला होता..... आज बऱ्याच वर्षांनी सगळे लोक असे एकत्र आरती करत होते.......

बघा सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते..... घराचे गोकुळ बनवते..... आज खूप वर्षांनी या या घरात असं घडलं आहे नाहीतर सगळे सतत कामात बिझी असता..... नंदिनी बाळा खूप सुखी रहा..... आबा तिच्या डोक्यावर हात ठेवलt बोलले

नाश्ता आटोपून राज नंदिनीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला..... हॉस्पिटल येईपर्यंत तर नंदिनी नीट बसली होती पण हॉस्पिटल बघून आता तिची घाबरगुंडी उडाली...

राज आपण का बरं आलो आहे हॉस्पिटलमध्ये....नंदिनी

इथे माझा एक मित्र असतो आपण त्यांना भेटायला जात आहोत....राज

तू जा मी नाही येत.... तिथे डॉक्टर असतात इंजेक्शन देतात मी नाही येणार......नंदिनी

नंदिनी सांगितलं ना ते डॉक्टर माझे मित्र आहेत हे काहीच करत नाही आपल्याला फक्त त्यांच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे ते झालं की आपण घरी परत जाऊया...राज

नाही मी नाही येणार ....नंदिनी आता हट्टाला पेटली....

हे बघ जर आपण पण डॉक्टरांना भेटून गेलो की माझ्याकडे एक खूप मस्त गोष्ट आहे मी ती तुला देणार....राज

काय आहे....नंदिनी

मी नाही सांगत आता पहिले तू चल....राज

खरच ते इंजेक्शन नाही देत.....नंदिनी

नाही....राज

नंदिनी आणि राज दिलेल्या वेळेत हॉस्पिटल मध्ये पोहोचले होते आणि तो न्यूरो स्पेशालिस्ट डॉक्टर राजे ना भेटायला गेला.... डॉक्टरांना त्यांनी आधीच सगळी कल्पना देऊन ठेवली होती.... नंदिनीच्या केसच्या सगळ्या फाइल्स त्याने डॉक्टरांना मेल केल्या होत्या..... डॉक्टरांनी नंदिनीच्या काही बेसिक चेकअप  केला... आणि काही टेस्ट लिहून दिल्या......हो नाही हो नाही करता करता राज ने नंदिनी च्या सगळ्या टेस्ट करवल्या..... डॉक्टरांनी काही प्रश्न विचारून नंदिनीची बौद्धिक चाचणी सुद्धा केली....

टेस्ट करताना मात्र नंदिनी खूप घाबरली होती.... एक ब्लड टेस्ट सुद्धा लिहून दिली होती...... तेव्हा मात्र ती खूप घाबरली होती.... अर्जुन कसा तरी तिला गोष्टींमध्ये गुंतवलं.... आणि नर्सने तिचे ब्लड घेतलं.... तेव्हा मात्र ती खूप जोराने ओरडली आणि रडायला लागली.... तिच्या आवाजाने मात्र राज कळवळला.....तिने राजचा हात घट्ट धरुन ठेवला होता......नंतर ब्रेन स्कॅन करतानासुद्धा ती खूप घाबरली होती.... राजला तिला असं बघावल्या जात नव्हत... त्याला तिची खुप कीव येत होती.... त्याला खुप वाईट वाटत होतं.... तिला होणारा त्रास त्याला स्वतः जाणवत होता...पण हे सगळे चेकअप करण्याचा शिवाय काहीच ऑप्शन्स नव्हते म्हणून तो तिला कधी आईस्क्रीम कधी चॉकलेट कधी खेळणे असं काही काही गोष्टी सांगून मनावत होता..

डॉक्टर रिपोर्ट चेक करत होते....

डॉक्टर नंदिनी ठीक होईल ना... तिची मेमरी परत येईल ना...राज खूप होप ठेवून डॉक्टरांकडे बघत बोलला

श्रीराज तिचे मेमरी परत येईल की नाही सध्या तरी मी काही सांगू शकत नाही.... डॉक्टर राजे

डॉक्टर राजेंद्र बोलना एकूण राज्य थोडा हिरमुसला.....

राजला बघून.... हे बघा श्रीराज... अगदीच चान्सेस नाही असा मी म्हणत नाही आहे....फक्त कमी आहे असा मी म्हणालो..... काही गोष्टी देवावर सोडून देऊयात पण आपण आपला प्रयत्न नक्कीच करू शकतो..... आपण तिला काही मेडिकेशन सुरु करू , आणि सोबतच तुम्हाला योगा आणि एक्सरसाइज करून घ्यावी लागेल.....ज्याने तिची body रिलॅक्स होईल.... तिची मी बौद्धिक चाचणी सुद्धा केली तर एक चांगली गोष्ट आहे की ती नवीन काही शिकायची तयारी ठेवते... तिचा ब्रेन समजायचं... समजून घ्यायचं स्थिती मध्ये आहे... आपण काही सेशन्स घेऊयात... आणि तिला हळूहळू थोड्या मोठे मुलं कसे वागतात वगैरे त्याची इन्फोर्मेशन देऊयात..... बघूया ते कुठपर्यंत वर्क होते.... तिची मेमरी परत यायचे चान्सेस खूप कमी आहे..... पण तिची मेमरी ग्रोथ नक्कीच होऊ शकते..... डॉक्टर राजे

ठीक आहे डॉक्टर तुम्ही जसा म्हणाल.. अशीच ट्रीटमेंट सुरू करूया...राज

डॉक्टरांनी त्याला काही  औषध लिहून दिले दिले आणि सगळं समजावून सांगितलं आणि एका महिन्यानंतर परत चेकअपसाठी बोलावलं होतं.....

नंदिनी तिची डोल खेळत बसली होती आणि डान्स डॉक्टरांची बोलत होता...

या सगळ्यांमध्ये बराच वेळ गेला होता..... राज मला खूप भूक लागली आता....नंदिनी

हो असं झालंच आहे सगळं.... चल निघू....राज

कारमध्ये बसल्यावर नंदिनीची हॉस्पिटल च्या नावाची कुरकुर सुरू होती .....आता मला परत कधीच इथे आणायचं नाही सतत राहून ती तेच बोलत होती...

राज जवळच असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये नंदिनीला घेऊन आला आणि तिच्या आवडीचं जेवण त्याने ऑर्डर केले दोघांनी मिळून तिथे जेवण आटोपले..... आवडीचं जेवण बघून नंदिनी सुद्धा खूप खुश झाली होती....

राज तू बोलला होता ना की तू एक गंमत देणार आहे मला... देना आता ...मी शहाण्यासारखे वागली ना  तिथे डॉक्टरांकडे....नंदिनी

हो...आपण  तिथे च चाललो आहे.....राज गाडी ड्राईव्ह करत बोलला आणि नंदिनी त्याच्या शेजारी बसून तिच्या भावली सोबत गप्पा मारत होती.... बोलकी तर ती आधीपासूनच होती फक्त आता बोलण्याची प्रकार बदलले होते

चल उत्तर पोहोचलो आपण..... राज.

नंदिनी बाहेर बघितले......
तलाव....... नंदिनी जोरातच ओरडत बोलली.... नंदिनीला असं तलावाशेजारी पाण्यात खेळायला खूप आवडत होते त्यामुळे राज तिला बीच वर घेऊन आला होता...... तिथे नंदीनी खूप मस्ती केली काढण्यात खेळली वाळूमध्ये खोपे बनवले....राज सुद्धा तिला चांगली कंपनी देत होता तिच्यासोबत तिच्यासारखाच उड्या मारत खेळत होता...... तो पण आज खूप दिवसानंतर मनमोकळे प्रमाणाने एन्जॉय करत होता....... जरी तिची मेमरी येण्याचे चान्सेस कमी होते तरीसुद्धा ब्रेन ठेवलं होऊ शकते या एवढ्याच गोष्टीने त्याला चांगले वाटले होते...... दोघांनी बीचवर खूप मस्ती केली..... पकडापकडी मारामारी सगळे खेळ खेळून झाले...... तिथेच  फुगे विकणारे आले होते..... नंदीने राजला खूप फुगे घेऊन मागितले...... फुगे घेऊन तिला गाडीमध्ये बसता येईना तर तिची चिडचिड सुरू झाली...... राजनेते सगळे बलून्स मागे मागच्या सीटवर नीट बांधून ठेवले......

आता खुश..... घरी गेलो की सगळे काढून देतो... बस आता गाडीमध्ये घरी जाऊयात...राज

हो.... आनंदाने जोराने ओरडत नंदिनी उड्या मारत  तिने त्याच्या  गालाला कीस केले...... त्याला नंदिनीच्या बांधण्याचे खूप हसू आले......... लहान सहान गोष्टीत खुश होते चिमणी माझी त्याने तिचं नाक ओढले......आनंदी राहण्यासाठी खरच मोठ्या एक्सपन्स्सिव गोष्टींची गरज असते का......... आजूबाजूला बघितले तर बरेच लोक त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते......नी हसत होते..

नंदिनी आता हॉस्पिटल मध्ये झालेला त्रास विसरली होती आणि बीच वर खेळून फ्रेश झाली होती...

राजनी कार आत मध्ये घेतली नंदिनी लगेच त्याला सगळे बलून्स काढून मागितले..... आणि हातात घेऊन ती घरातच धावत धावत आबासाहेबांकडे त्यांच्या रूम मध्ये गेली...... आणि तिने दिवसभर झालेल्या सगळ्या गोष्टी आबांना सांगितल्या......

आबा तुम्हाला माहीती आहे राज खूप छान आहे त्याने मला बलून घेऊन दिले .....आज माझ्या आवडीच  जेवण केले.... तिच्या गप्पा सुरू झाल्या... तेवढ्यात आई आत मध्ये आली आणि तिने आबासाहेबांना त्यांचे रोजचे मेडिसिन दिले.... आबासाहेब मात्र नंतर खाईल.. नंतर घेईल म्हणून नाटक करत होते...

आबासाहेब तुम्ही आता लहान आहात का तुमची हि औषधांची रोजचीच नाटक आहेत.... आई  लाडीकपणे रागावत बोलली..

हा..... आबा तुम्ही औषध घ्यायला घाबरता..... मी तर किती कडू कडू औषध घेते मी तर नाही घाबरत अजिबात..... मी काढून देऊ का तुम्हाला औषध.... माझ्या आबांना नेहमीमी औषध काढून द्यायची... ते म्हणायचे तुझ्या हाताने औषध काढून दिलं की ते खूप गोड लागते ....तुम्हाला पण गोड लागेल देऊ का मी काढून....नंदिनी

हो का... बघू बरं... दे बर मला तू हे गोळ्या काढून....आबा

नवीन मे लगेच त्यांना गोळ्या काढून दिल्या आणि त्यांनी त्या घेऊन टाकल्या.... नंदिनी ला खूप आनंद झाला आणि ती आनंदाने टाळ्या वाजवत होती ....
बघा मी म्हटलं होतं ना...नंदिनी

हो गं खरंच तुझे आबा बरोबर बोलत होते..... बरं मग आता रोज तूच मला औषध द्यायचं.... तू देशील तरच मी औषध घेणार नाही तर मी घेणार नाही.....आबा

हो..... नक्की......नंदिनी

बरं जा आता हात पाय धुवून ये... मग मी तुला गोष्ट सांगतो..... आज मी दोन-तीन छान गोष्टी वाचून ठेवले आहेत... जेवण झालं की मी तुला गोष्टी सांगेल.....आबा

गोष्टीचं नाव ऐकून नंदिनी पळतच तिच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला गेली..

*******
असेच जवळपास आठवडाभर राजने घरूनच ऑफिसचे काम केले.... आबांची त्याला खूप मदत होत होती.... आबा तिच्यासोबत खेळायचे ...गप्पा मारायचे ...गोष्टी  सांगायचे त्यामुळे तिचा बराच वेळ त्यांच्यासोबत चांगला जायचा आणि राजला सुद्धा ऑफिसचं काम करायला बऱ्यापैकी वेळ मिळत होता.... आजीचा आणि घरातल्या बाकीच्या लोकांचा मात्र तिच्यासोबत जास्त जमत नव्हतं रोज काही ना काही कारणावरून आजी तिच्यावर रागवत असायची आणि राज तिला त्यांच्यापासून वाचवत असायचा... राहुल सोबत मात्र येता-जाता तिचं बोलणं चालणं सुरू असायचं.. कधीकधी तिचा खूप बालिशपणा सुद्धा सुरू असायचा....तिच्यासोबत सुद्धा त्याचा लहानपण एन्जॉय करत होता तिच्या सोबत ठेवून मस्ती करून त्याला सुद्धा खूप फ्रेश वाटायचं आणि मग फ्रेश मनानेच तो त्याच ऑफिसचं काम करायचा..... रात्री मात्र तो तिला जवळच लागायचा राज थोडाजरी उठून बाजूला झाला की तिची झोप मोड व्हायची आणि ती उठून बसायची कधीकधी तर ती रात्री भोंगा सुद्धा पसरवायची..... कधी कधी तिला रात्री झोपे मध्ये भीती वाटायची..... मग तो तिला जवळ घेऊन गोष्टी सांगत शांत करायचा... रात्री मात्र ती लवकर झोपायची नऊ.. साडे नऊ पर्यंत झोपून जायची त्यामुळे त्याला त्याचा ऑफिसचं काम करायला बराच वेळ मिळायचा..

रात्री लवकर झोपत असल्यामुळे सकाळी मात्र नंदिनी लवकर उठायची.... राज तिला सकाळी दूध घेऊन स्वतःसोबत बाहेर वॉक ला घेऊन जायचा... सोबतच थोडी जॉगिंग सुद्धा करायचे... हळुहळु तिला थोड्या सोपी एक्झरसाइज शिकवत होता....बाहेर गार्डन मध्ये फिरायला भेटते याच आनंदामध्ये ती तो सांगेल ते  ऐकायची..... ..त्यानंतर घरी योगा इंस्ट्रक्टर येऊन तिला योगा आणि meditation शिकवायची..... योगा करताना मात्र तिची खुप खूप कुरकुर असायची ...आधी तर ती योगा करायला तयारच झाली नव्हती....नंतर तिला त्यांनी तो एक खेळ आहे असं पटवून दिले होते....... तीची कुरकुर बघून त्याने आबांना सुद्धा योगासाठी रेडी केले होते.... आता राज आबा आणि नंदिनी रोज योगा करायचे...... नंतर आबांसोबत देव पूजा आरती सगळं करायची........ आता नंदिनी चांगल्यापैकी घरामध्ये रमली होती .... आता तिची बऱ्यापैकी दिनाचाऱ्या सेट झाली होती..

आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे राजला ऑफिसमध्ये जाणं खूप गरजेचं होतं... त्याने नंदिनीला बऱ्याच इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवल्या होत्या..... आपल्या रूम मध्येच खेळायचं.... फार फार तर आबा जवळ जाऊन त्यांच्यासोबत खेळायचं असं सांगितलं होतं.... ऑफिसमध्ये जाऊन तो लगेचच दोन तासांमध्ये परत येणार होता

आज लग्नानंतर पहिल्यांदा तो ऑफिसमध्ये गेला होता....
ऑफिसमध्ये सगळ्यांनाच राज्याच्या लग्नाची न्यूज कळली होती.... बऱ्याच मुलींचे त्यामुळे हृदय तुटले होते..... बऱ्याच मुलींचा हिरमोड झाला होता..... शैलानी बुके देऊन राज चे स्वागत केले..... तिच्या पाठोपाठ सगळ्यांनी त्याला काँग्रॅच्युलेशन केले.... त्याने पण हसतच सगळ्यांचे आभार मानले....

ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याने सध्या सुरू असलेल्या प्रोजेक्टचा फाईल चेक केल्या आणि काम प्लान केल्याप्रमाणे सुरू होते... रोहन सगळं नीट हाताळत होता...... मीटिंग आटोपून सगळ्या स्टाफला त्याने कामाच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या.... काय चेंजेस हवे-नको ते सगळं त्यांना समजावून सांगितलं..... काही नवीन फ्लाईंग आले होते त्यांच्यासोबत घ्यायला आला सांगून मीटिंग फिक्स करायला सांगितल्या होत्या..... सर्व काम आटोपून तो घरी परत आला.... दारात पाय ठेवला तर आजी साहेब त्याला खूप रागात दिसल्या....

******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️