Oct 16, 2021
प्रेम

नंदिनी..श्वास माझा 6

Read Later
नंदिनी..श्वास माझा 6
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

भाग ६


 

शरू ने मित्रांची घरात सगळ्यांसोबत ओळख करून दिली...
त्याने सगळ्यांना त्यांची राहायची सोय दाखवली.,
वरतीच मुलींना वेगळी रूम दिली , नी रोहन राहुलची शरूच्या च रूम मध्ये सोय केली होती. सगळे फ्रेश झाले, खाली येऊन सगळ्यांनी मस्त जेवणावर ताव मारला....

उन्हाळ्याचे दिवस, त्यावर झालेला प्रवास , सगळे थकले होते , त्यामुळे सगळ्यांनी आराम करायचं ठरवलं.... सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन आडवे झाले...

संध्याकाळी ६ ला सगळे फ्रेश होऊन खाली आलेत ... मामींनी त्यांना मस्त थंड थंड सरबत दिले ...

सरबत घेऊन सगळे बाहेर आलेत.... आज शरू ने त्यांना त्यांचा वाडा दाखवायचा प्लॅन केला होता... तसे ते वाडा फिरत होते... गोठा, गायी, बागीच असा सगळं बघत होते ....बगीचा मध्ये बाहेर झुला लावला होता ... नी काही खुर्च्या ठेवल्या होत्या तिथे जाऊन हे सगळे बसले ..... त्यांच्या गप्पा सुरू होत्या..,शरू त्यांना गावाकडील लाईफ स्टाईल ची माहिती देत होता ......संध्याकाळचा गारवा पसरला होता ....

शरू sssssss......,..... आवाज देत नंदू फाटकातून आत आली

हे इकडे....नंदू इकडे ये , आम्ही इकडे बसलोयत...शरू ने तिला ते बसले होते तिथे बोलावले ....

नंदू पळतच त्यांच्याकडे गेली .....शरू जवळ जाऊन उभी राहिली.....

hey hey wait, अरे राज  ही ती.....तीच मगाची च मुलगी आहे जिनी आम्हाला लांबचा पत्ता सांगितला
होता .........तुझी हिम्मत कशी झालीं ग आमच्या सोबत अस वागायची..... टिना

का....का नाही...मी गवार ना ....का विश्वास ठेवला तुम्ही माझ्यावर मग ..... नंदू ने पण तिला तिच्याच स्टाईल मध्ये उत्तर दिले ....

guys .... guys pls stop...... तुमचा काहीतरी गैसमज होतोय.... मस्करी केली असेल मी म्हणालो होतो ना .... शरू

नंदू सॉरी बोलून घे बाळा.... त्यांना किती फिरावं लागलं..... आपले पाहुणे आहेत ना ते ..... शरू

सॉरी , माझ्या मुळे तुम्हाला त्रास झाला नंदू शरू च्या दंडाला दोन्ही हातांनी पकडत बोलली....

hey , सॉरी ची गरज नाहीये ... इफॅक्ट मजाच आली आम्हाला.... सगळं गाव बघून आलो आम्ही....रोहन राहुलला  एका हाताने टाळी  देत बोलला....तसे सगळे हसायला लागले... टिना ला अजिबात हसू आले नव्हते तिला नंदू चा राग येत होता...नंदू पण कसनुस तोंड करत हसली..

okay guys... ही नंदू, माझी लहानपणापासूनची मैत्रीण..

ई....हे कसं नाव आहे मुलासारखा.....नंदू.... टिना

नंदिनी ....,.. नंदिनी नाव आहे माझं...जवळची लोक मला प्रेमाने नंदू म्हणतात.....तुम्ही नंदिनी च म्हणा..... टिना कडे बघत नंदू बोलली....

नंदू .....हे रोहन, राहुल, सुजी नी ही टिना....हे माझे फ्रेंड्स ...आम्ही एकाच कॉलेज मध्ये होतो.... शरू

सगळ्यांनी तिला हाय केले.....
हाय.....नंदू

hey हे शरू कोण आहे ......मघाशी ही आवाज देत होती.......सुजी

हाहाहा... तो मीच आहो... ती मलाच शरू म्हणते....शरू

इव....किती छान नाव आहे त्याच..... shriraaj....... हवं तर राज म्हण.... हे शरू कसा वाटते.... टिना

ती लहान होती ना तेव्हा तिला श्रिराज म्हणता नाही यायचं... मग ती शरू च म्हणायला लागली.....शरू

पण आता तर म्हणता येत असेल ना ...,... की नाही म्हणता येत या बाळा ला अजून पण..... टिना नंदुला  चिडवत बोलली

मी शरू च म्हणणार..... ज्यांना नाही आवडत त्यांनी आपले
कान बंद करावे...ती टिना कडे रागात बघत बोलली

अरे बाबा बंद करा हे ....काय आल्यापासून तुम्ही दोघींनी लाऊन ठेवलंय.... नी मला नंदू ने शरू च बोलले आवडत ..... झालं ...शरू

मी कुठे हिनीच सुरू केले ते .... टिना

मी नंतर सॉरी बोललेले ना.....नंदू

दोघींचं परत सुरू झालं..,.

त्यांची ही न बंद होणारी नोकझोक बघून ....एक  मिनिट हा guys.... म्हणत शरू नंदू ला दुसरी कडे घेऊन गेला....

काय ग चिमणे .... काय चिवचिव चाललेली तुझी....शरू.

मी काय केले....तू पण मलाच बोल..... एक तर ती सारखी आल्यापासून तुला चीपकते.... सकाळपासून बघतेय मी...... शरू

शरू ला हसायला येत........ येडपटच आहे हे माझं ध्यान....तिच्या डोक्यावर किस करत बोलला

चालली मी घरी, तू  बस त्या टिना फिना सोबत गप्पा मारत...तोंड वाकडं करत नंदू घरी जायला वळली..

बरं मामींनी तुला संध्याकाळी जेवायला बोलावलं आहे ... येशील आहे .... शरू तिला आवाज देत बोलला

ह्म्म.....नंदू....घरी गेली

*******

रूम मध्ये सगळे उद्याचा प्लॅन डिस्कस करत बसले होते ..तेवढयात नंदू तिथे आली....

नंदू उद्या आपण सगळे आपल्या शेतीवर जाऊया... नंतर बीच वर जाऊ या.... ..... शरू

ही कशाला .... टिना डोक्यावर आट्या पाडत बोलली... I mean तिला बोर होईल ना ...म्हणून म्हणाले....

मी आहो ना ..... नाही होणार ती बोर... don't worry...  हो ना g नंदू....,कोणाचं लक्ष नाही बघून शरू नंदू ला डोळा मारत बोलला...

मीना ला पण घे सोबत..,शरू

ह.... पण आबा....नंदू (तिला मागचा राग होताच...)

मी विचारतो...नको काळजी करू...शरू

ठीक आहे...नंदू

बरं काकी सगळ्यांना जेवायला बोलावत आहे  खाली....

सगळे खाली येऊन डायनिंग टेबल वर बसले....मोठ्या लोकांचे आधीच आटोपले होते जेवण.....

शरू जवळ नंदू बसणार तेवढयात टिना तिथे जाऊन बसली....नंदुला तिचा राग आला, ती आतमध्ये मामी, काकिंना मदत करायला गेली...

मी पण मदत करते, काय करू मी....नंदू

ह्म्म्म या... आम्ही वाढायला घेतो, तोपर्यंत तू ती खीर बाउल मध्ये भर नी सगळ्यांना आणून दे ....शरू ची आई

ठीक आहे काकी...नंदू

वाटी मध्ये खीर भरतांना नंदू ला एक आयडिया सुचली.... तिने टिना चा खीर मध्ये मीठ कलाऊन ठेवलं.....मला बसू देत नाही काय शरु जवळ...होऊन जाऊ दे मग पाहुणचार....मनाशीच बोलत तिने सगळ्यांना खीर चे बाउल नेऊन दिले नी सुजी जवळ , टिना चा पुढे जाऊन बसली...

सगळ्यांनी जेवण सुरू केले.....

काकी काय भाजी केली आहे वाह....रोहन

हो काकी खूप छान जेवण बनवले आहे, सकाळी खूप चान बेत केला होता तुम्ही...सुजी

हो खरंच, अन ही खीर तर माझी favourite आहे.... टिना..म्हणत तिने एक चम्मच तोंडत घातला.....तिला ठसकाच लागला......

काय झालं ग...... छान नाही का झाली...तिच्या हातात पाण्याचं ग्लास देत मामी बोलल्या...

सगळे खूप आवडीने खात होते, खीर, तस टिना चा लक्षात आले की आपल्याच खीर मध्ये आहे गडबड.....नक्कीच या नंडूने गडबड केली आहे तिच्या लक्षात आले कारण तिनेच वाट्या आणून दिल्या होत्या....

आ.., नाही नाही, ... छान झालीय खीर... टिना

मग घे ना,  वाढू परत..... मामी

मामी इतका सगळं आहे ताटात, आधी हे सगळं संपाऊ द्या मग मीच मागते तुम्हाला.... टिना ने कशी तरी वेळ मारून नेली होती....

सगळ्यांची जेवण आटोपले , सगळे टेरेस वर जाऊन बसले ..
नी उद्याच प्लॅनिंग करत बसले होते...फ्युचर मध्ये काय करायचे, जॉब असा सगळ्या गप्पा सुरू होत्या त्यांच्या.. ....नंदू शरू शेजारी झुल्यावर बसली होती...तिला त्यांच्यात खूप बोर होत होते, पण शारी सोबत वेळ घालवता यावा म्हणून ती बसली होती.....नी थोड्या वेळात तिचा डोळा लागला...तिची मान आपोआप शरू च्या खांद्यावर पडली...

नंदू ला शरू च्या जवळ बघून टिना ला फार जेलस फिल होत होते.... पण ती कशीतरी अवरून होती...

किती गोड आहे ना ही..,....डोळे कसले भारी आहेत तिचे .... खूप निरागस....रोहन

हम्म....हळवी पण आहे तेवढीच, खूप लवकर कोणती पण गोष्टा मनाला  लाऊन घेते.....स्वतःचा हाथ तिच्या डोक्याच्या मागून टाकत तिला  स्वतःच्या खांद्यावर नीट अडजस्ट करत शरू तिच्या खांद्यावर थोपटत होता...

हळवी, निरागस ..... ? खरंच टिना दिले मोठे करत त्यांच्या कडे बघत होती...तसे सगळे हसायला लागले...

बरं चला झोपुया आता, उद्या सकाळी पण लवकर निघायचं आहे ना ..सुजी

हो हो चला....राहुल

तुम्ही व्हा पुढे मी हिला पोहाचाऊन येतो...शरू

okay.... सगळे आपापल्या रूम मध्ये गेले....

नंदू.......... बाळा उठ... शरू तिला उठवत होता...

उम्म्म..,झोपू दे ना शरू......नंदू

अगं हो , चल घरी जाऊन झोप....रात्र झालीय...उद्या निघायचं ना आपल्याला लवकर...

ती त्याला अजून घट्ट आवळत.... ५ च मिनिट झोपू दे ना तुझ्या कुशीत....म्हणत परत तिने त्याचा शर्ट मध्ये आपला तोंड खुपसला..,त्याने पण त्याची मिठी घट्ट केली...

१५-२० मिनिट तो पण तसाच झुल्याला टेकून  शांत बसला राहिला.....नी तिचा गोड स्पर्श अनुभवत राहिला...ती पण स्वस्थ त्याच्या कुशीत झोपली होती..
.
.
.
.
.
.

पिल्लु , चल ना बाळा आता ...नाहीतर आबासाहेब रागवायचे आता ..नी मला उद्यासाठी विचारायचं पण आहे ना ... चल उठ आता...

ह्म्म्म ... चल...नंदू

त्याने तिच्या डोक्यावर किस केले नि तिला घरी पोहचवले..... आबासाहेब सोबत बोलून घरी वापस आला..,नी त्याच्या रूम मध्ये गेला....

राहुल झोपला होता, रोहन जागा होता...

झोपला नाही अजून...शरू

हा...झोप नाही आली.... .रोहन

शरू पण बेडवर पडला.

खूप प्रेम करतो ना तिच्यावर....रोहन

शरू ताडकन उठून बसला....तुला कसं कळलं.

दिसते तुझ्या डोळ्यात...रोहन

हो.....खूप.....तिच्याशिवाय आता लाईफ इमॅजिन पण नाही होत......... शरू

किती काळजी घेतोस.....रोहन

ह्म्म लहान आहे रे ती, अल्लड आहे खूप.....इतकी वर्ष America ला राहायचं..... कसा राहू शकेल तिच्याशिवाय माहिती नाही ........बघुया कसं होतंय मनेज.... चल झोप..good night..,

सगळे झोपी गेले......

*********

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "