*कथेचं नाव :- "नंदा"*
*फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा*
*विषय :- ...स्त्री ला समजणं खरंच कठीण असत का?*

अस्ताला गेलेल्या सुर्या सोबत रमा ची चिता, शांत शांत होत होती. जळून खाक झालेल्या तिच्या देहाची राख वाऱ्याबरोबर आसमंत गाठत होती. गणा वाऱ्यावर जोखलेली रमाच्या देहाची राख एक टक बघत बसला होता. तेवढ्यात सोमा न गणाच्या खांद्यावर हात टाकत म्हटलं
"जे झालं ते वाईटच झालं बगs... जाऊदे लका, अस खचून जाऊ नग...चल आता घरलाss आय घरला एकटी हाय नव्ह का! माणस बी परतायली हायती..चल"
खांद्यावरचा टॉवेलच्या तुकड्याने डोळे पुसत गणा म्हणाला
"व्हयss चल जाऊ"
घराच्या रस्त्याला लागला असताना गणा रमाच्या चितेकडे वारंवार वळून वळून बघत होता. लहान वयात आई पण अंगी आल्यानं रमाच शरीर तिला फारस मदत करू शकलं नाही, वयाच्या बावीशीला ती दोन वर्षाच्या म्हया ला गणा च्या हातात सोडून देवाघरी गेली.

म्हया, गणा आणि थकलेली गणाची आई चंदाबाई, इन मिन आता घरात तीन व्यक्ती उरल्या होत्या. दिवसांवर दिवस गेले आणि रमा मध्ये रमलेला गणा कामावर, घरावर लक्ष देऊ लागला. चंदाबाई स्वभावाने चांगलीच होती, म्हया आणि गणा च ती सगळं काही जमलं तस करायची तरी पण तिची इच्छा होती की गणान दुसरं लग्न करावं.
"मी काय म्हणते गणाss, न्हाय म्हंजी मी करतीच सगळं पण मला म्हातारीला किती दिस जमल रं, घरात आजून एक बाय माणूस पाहिजे बघs...तवा मी म्हणती तस कर पुन्हा लगीन, त्या लेकराला बी आय मिळल!!"
"हे बघ आयss तुला कितीदा सांगितलं नव्ह...म्हया ला सावत्र आई नग, आन माझ्यासारख्या बाप्या न आणि एकदा लगीन करूच नये, सगळं इस्खळीत करती नवी बाय... नाय नग आन तू बी ह्यो नाद सोड बर."
"आर पोरा...आयुष्य पडलंय, आ...अस एकट काढणार हाय का जगून?"
"आय रमा गेली असली ना तरी तिच्या आठवणी हायती माझ्याकडं, आन तू आन म्हया हायच की आजून कश्याला कोण बी पाइजे?"
"बाबा तुझं काय बी समजत न्हाय बगsss"
पदरान आपलं तोंड पुसत चंदाबाई म्हणाली
पदरान आपलं तोंड पुसत चंदाबाई म्हणाली
"व्हय नव्ह का, जाऊदे मंग तू फकस्त म्हयाची काळजी घे...!!बाकीच मी हाय बगाया...चल वाढ जेवाय परत गावात जायचं हाय चांगलं काम हाती लागायचं हाय तवा बिगी बिगी वढाय घे"
चंदाबाई गपगुमान ताट वाढत होती..गणा च्या दुसऱ्या लग्नाचा विषय आता तीन पण थांबवला होता.

दोन वर्षांच निष्पाप पोर म्हया, आईच्या मायेची,उबेची जाणीव वाटली की बेंबीच्या देठा पासून रडायचं...चंदाबाई आणि गणा ला काय तो शांत व्हायचा नाही. त्याला शांत करण्यात दोघांची फजिती उडायची. मग शेजार पाजारांनी दिलेल्या उपायावर कधी मावशीकडे तर कधी आत्याकडे अशीच फेरी म्हया ची चालू असायची, आपल्या वयाच्या पोरांसोबत राहिला तर शांत होईल, मन रमेल इतकाच हेतू त्या मागचा. गणा च्या कामाचा पत्ता नव्हता, कधी दिवस-दिवस भर घरी तर कधी रात्र-रात्र भर घराबाहेर.
चंदाबाई आणि म्हया रात्री उशिरा येणाऱ्या बापाची डोळ्यात तेल टाकून वाट बघत बसायचे. गणा चा हा विचित्र पणा सोमा च्या नजरेत पडला, सोमा गावातल्या मजदूरांच्या नियमावलीवर काम करायला स्थायिक होता, गाव आणि गावाबाहेर येणं जाणं नित्यनेमाने चालूच त्याची. पुढाकार घेऊन सोमानेच गणा साठी एक स्थळ सुचवलं ज्यात कुणाला त्रास होईल असं आत्ता तरी नव्हतं. सोमा न दाखवलेलं स्थळ गणा आणि चंदाबाई ला पसंत पडलं, चंदाबाई ला घरकाम करणारी आणि म्हया ला सांभाळणारी पोरगी हवी होती आणि गणाला शांत स्वभावाची आणि त्याच्या सोयीस्कर \"बायको\" होती. गणा परत मांडवात बसला, सगळं ठरल्या आणि बोलणी झाल्या प्रमाणे झालं. सोमा जाऊन सुपारी फोडून आला.

अगदी पंधरा दिवसांतच गणा आणि नंदा च लग्न झालं. गणा च ते निचपीत पडलेलं घर आता आनंदानं भरणार होत,
"ये बायss... उजवा पाय टाकुशीन आत ये"
चंदाबाई न सुनेच स्वागत चांगलंच केलं. भरलेल्या तांदळाचं माप ओलांडून नंदा घरात आली, तिला बघताच म्हया \"आईsss...आईsss\" म्हणत पुढं आला, एक वेळ..दोन वेळ...आवाज देऊन ही नंदा मात्र कसलीच प्रतिक्रिया देत नव्हती. सोमान पुढं होऊन नंदाच लक्ष म्हया कडे केंद्रित केलं. उत्सुकतेने तिला बघणाऱ्या म्हया ला तीन बघताच जवळ केलं मायेन त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला पण तोंडातून एक शब्द काढला नाही पण काय करणार तिचा ही नाईलाज होता जन्मालाच येता तिची \"वाचा\" गेली होती आणि \"बहिरेपणा\" ही अंगी आला होत. तिच्या ह्याच अपंगत्वाने सुंदर, सुशील असूनही तीच लग्न काही ठरत नव्हतं. म्हणून आलेलं स्थळ न नाकारता एका \"मयत झालेल्या बायकोच्या नवऱ्याशी\" त्यांनी तीच लग्न लावून दिल. "आता हेच काय ते तुझं नशीब हायss..." अस म्हणून तिचे आई बाप आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. नंदाने ही जे आहे ते स्वीकारलं होत.
नंदांच्या बहिरेपणाने चंदाबाई आणि तिच्यात वैतागाचे वातावरण असायचे, ना चंदाबाई चे बोलणे नंदा ला समजायचं ना नंदाचे हातवारे चंदाबाई ला...दोघींचे होणारे वाद म्हया साठी मनोरंजक भाग बनला होता, नंदाने गणा कडे कसलीच तक्रार कधी केली नाही, शांतपणे सासू आणि मुलाचं सगळं काही करत होती. गणा आणि नंदाचा ही संसार व्यवस्थित चालू होता. म्हया चार वर्षांचा झाल्या नंतर नंदाची पाळी चुकली नंदला त्या गोष्टीच सुख होत पण ती खबर कळताच गणा तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला.
नंदाची तब्येत बरी नसते आणि म्हया आजून लहान आहे तर मुलं नको असल्याचं गणान डॉक्टरांना सांगितलं. घरातल्या जबाबदाऱ्या आणि परिस्थिती पाहता नंदाचा \"गर्भ\" गणान रिकामा केला. बिचारी नंदा बहिरेपणा मूळ ना गणा च बोलणं तिला समजत होत ना डॉक्टर च...पण काहीतरी विपरीत घडणार हे तिला नक्की माहीत होतं, आणि शेवटी तस घडलंच तीच पोट रिकाम झालं, सगळा आनंद काही क्षणात माती मात्र झाला.
दवाखान्यातुन दोघे रात्री उशिराच घरी आले, घडलेल्या गोष्टी नंतर ना ती जेवली ना रडू थांबवू शकली...सकाळी तशी उशिराच तिचा डोळा उघडला. गणा चहाचा पेला घेऊन तिच्या जवळ आला आणि खुणावतच म्हणाला.

"ही गोळी...डाक्टर बाईंनी दिली हाय, रोज न चुकता खायाची...पाळी आली तरी बी गोळी चुकवायची न्हाय "
डॉक्टरांनी नंदाला काळजी घेयला सांगितली असताना गणा तिच्या पासून थोडा लांबच झोपत होता..गणा न सांगितलेल्या शब्दाबाहेर नंदा गेली नाही, नित्यनियमाने ती गणा ने दिलेली गोळी घेतच होती. वर्षानुवर्ष हा प्रवास चालूच राहिला.
बघता बघता सुरज ही चढत्यावयात आला होता. त्याच्या आवडीनिवडी त्याच वागणं सगळ्या गोष्टी बदलत होत्या, घरात बाप नसल्यानं त्याच वागणं अगदी वात्रट झालं होतं ना आज्जी ला, ना सावत्र आईला तो हवासा आदर देत होता. त्याच बोलणं नंदाला समजत नसल्यानं तो सतत तिला \"ये भैरेss..ये भैरेss.." म्हणून चिडवून जोर जोरात हसायचा. त्याच वागणं दिवसेंदिवस एक आई प्रति आणि आज्जी प्रति बिघडलेलं दिसत होतं. नंदा स्वभावाला काही करू शकत नव्हती तिचा शांत स्वभाव आणि त्यात पोटी देवाने भर नाही दिली असाच विचार किरत ती चुलीपुढे रडत बसायची.
रोज प्रमाणे आजही नंदा पाणी भरायला गावातल्या ओढ्याला गेली. सोबत तिची मैत्रीण शेला असायची, शेला आज तिच्या लहान बाळाला घेऊन आली होती. मुलाला बघून नंदा एकदम आनंदून गेली. बाळाला ती अंगा खांद्यावर खेळवू लागली. त्याला खेळवायच्या गडबडीत गणा न दिलेलं औषधाचे पाकीट खाली पडलं. शेला न लगबगीने ते पाकीट उचललं..

"काय गं हे नंदेsss...?
तीन आश्चर्यानं नंदा ला समजेल अस खाणाखुणा विचारलं

"काय नाय गं, डाक्टर नि औषध दिली हायती...सारखी आजारी असती नव्ह का म्या..!!"
अस तीन खाणाखुणा करूनच सांगितलं.
अस तीन खाणाखुणा करूनच सांगितलं.
"आंग, पर मी बी घेती ही औषध... माझ्या नवऱ्यानं चानस नको म्हणून आणल्यात्या गोळ्या...तू बी पोर थांबवती का??"
आता मात्र ह्या वाक्यांन नंदा थबकली तीच अंगच जणू गार पडलं. डोळे अवघे भरून आले. तीन शेलाच्या हातातलं ते औषधाच पाकीट घेतलं आणि लगबगीनं घराकडं धावली.

"आगं नंदेss.. आगं ऐ..!!"
शेला नि दिलेला प्रत्येक आवाज व्यर्थच होता.

नंदा घरी पोहोचली चंदाबाई वाढत होती आणि गणा जेवायला बसला होता. नंदा घरात आली आणि गणाच्या डोळ्यात डोळे घालून हातवारे करत त्याला जबाब विचारत होती. डोळ्यांतून वाहणार पाणी तिने मुलासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची साक्ष देत होत...वाचा नसून आज ती गणा ला कित्येक काही सूनावात होती. गणा न नंदाचा हात पकडला आणि म्हणाला.
"बासss बंद कर तुझं ही हातवार.. काय बी व्हणार न्हाय आता"
नंदाचा हात झटकून आता त्यानं तीच तोंड पकडलं होत.

"तुला ठाव झालं हाय नव्ह, व्हय म्या तुला बाळ नग व्हायला म्हणून ह्या गोळ्या दिल्या...तू अशी मुकी-भैरी आन पॉर बी तसच जन्माला घातलं तर आन ते कोण जोपासायच, म्हणून म्या अस केलं आलं ध्यानात चल निघ..!!"
निशबळ झालेल्या नंदला त्यानं जमिनीवर कागदाच्या तुकड्याप्रमाणे फेकून दिलं. नंदा पूर्ण पणे विसखळून गेली होती, स्वतःला आयुष्यभर वांज समजणारी नंदा कधी वांज नव्हतीच...स्वतःच्या स्वार्थापोटी तिच्या नवऱ्यानं तिला वांज ठेवलं. पडक्याबाजूचा सतत केला जाणारा उद्धार तिला परिस्थितीत जमवून घेयला भाग पाडत होत. गणाच्या मनात थोडक्यात नंदाविषयी भावना ह्या मातीसम होत्या. आता फक्त नंदाचा शोषण होणार होत आणि तिला आई होणं ही भाग्यात नव्हतं. इतकं सगळं विपरीत घडलेलं पाहून ती चुलीजवळ मूठ आवळून रडत होती, गणा नका दिलेली औषध आज तीन त्या चुलीत टाकून राख केली पण त्यासाठी फार आज उशीर झाला होता.

समाप्त.
*-सोमनाथ बावणे (सुरज)*
*टीम- सातारा व सांगली*
*टीम- सातारा व सांगली*