नणंद कुठे परकी असते

Nanand Kuthe Prki
शिल्पा घरात मोठी वहिनी म्हणून आली ,आणि घरात आल्या आल्या घरात कोण कसे हे हळूहळू समजून घेऊ लागली ,तिला घरातल्याच्या मनात घर आणि आपले आपुलकीचे स्थन निर्माण करायचे हे ठरवून ,आई कडून शिकवून आली होती.

मोठ्या घरातली मुलगी, परिवार मोठा पण सगळे बालपण हॉस्टेल मध्ये गेलेले, घरी तर फक्त सुट्टीपूर्तीच आलेली होती, आणि जेव्हा ही येणं होत तेव्हा तेव्हा आई तिला लाडात कोडात वाढवायची.

शिल्पाला दोन मोठे भाऊ होते पण ते आई वडीलाजवल राहून शिकलेले,फक्त शिल्पाच बाहेर राहून शिकलेली, हुशार हुशार म्हणून आणि काही तरी मोठी होईल शिकून असे सगळ्याना वाटायचे,सगळ्यांना म्हणजे फक्त तिच्या वडिलांना आणि आजीला, बाकी इतर मुलींप्रमाणे ती ही इथे गावात इतर मुली शिकतात तशी शिकली असती पण शेवटी ती शेंडे फळ ,आणि नवसाची,बाबांची लाडकी. मग त्याच्या पुढे कोणाचं काय चलतय. नाही हो नाही म्हणत दिली पाठवून हॉस्टेल वर.

तिथे बंदीस्थ सगळे ,मग घरी आल्यावर नको तितके लाड, मुला पेक्षा ही हिची ठेप जास्त राहिली,ना तिला आईने घर काम,स्वयंपाक ,ना नाती गोती काय कसे जपायचे ह्या सोपस्कारात पडले, शिकेल ती हळूहळू आत्ताच काय घाई आहे, आपण नवरा ही असाच बघू जो घर जावई असेल.
ज्याचा परिवार फार मोठा नसेल,हवं तर आपल्या मुलीला लग्नानंतर लगेच वेगळं रहाण्याची सोय करू, तिचा बाप पाठीशी असल्यावर सगळं शक्य करेन ,आणि दुनिया माझ्या लेकीच्या सोयी नुसार बदलायला लावेल असे तिचे बाबा म्हणत आणि त्याचे विपरीत परिणाम त्या अति लाडवलेल्या लेकी वर होई.

तरी तिची आई सांगायची तिच्या बाबाला की कोणती ही लेक किती ही लाडाची असो तिला माहेर आणि माहेरच्यांच्या प्रेमाला पती प्रेमा साठी आणि तिच्या संसारासाठी परके व्हावेच लागते हो. तुम्ही तिला बिघडवून ठेवू नका, तिला स्वकर्तृत्वाने मोठे होऊ द्या, तिथे तिला सांभाळून घ्यायला ना लाडाचा गोतावळा असणार नाही ना तुम्ही असणार तिला सोबत, लक्षात ठेवा भानावर या.
मी ही आलेच होते ना माझं घर माझे माहेर सोडून,तेव्हा तर तुम्हीच म्हणाला होतात ना ,तिकडे काय लाडाची होतीस हे इथे मिरवायचे नाही,तुझे कोड कौतुक तिकडे तुझ्या माहेरी, ते इथे चालणार नाही,तुला इथल्याच रीती प्रमाणे वागावे लागणार ते. मग तुमच्या लेकीसाठी काय वेगळे नियम असणार का. जिथे तुम्ही एक ही दिवस माझ्या माहेरी मुक्काम ही केला नाहीत आणि इथे तुम्ही घर जावई आणण्याच्या गोष्टी करत आहात, तुमच्या आई वडिलांसाठी अक्ख आयुष्य गावात घालवले पण वेगळे निघायचे नाव ही घेतले नाही. आता लेकीसाठी संसार उभा राहत नाही तोच तिला वेगळे काढायचा गप्पा करवतात तरी कश्या.

काही दिवसांनी शिल्पाचे बाबा सगळ्यांना सोडून गेले, शिल्पा बाबांच्या मायेला पोरकी झाली,आई आणि भाऊ हेच तिचे आपले होते, बाबा गेल्यानंतर आईने काकाला सांगून शिल्पा आणि मुलासाठी स्थळ बघण्यास सांगितले.
शिल्पाला चांगले स्थळ आले,आणि भावाला ही चांगली मुलगी शोधली. एक मुलगी जाणार एक येणार म्हणजे घर रिकामे होणार नाही ह्या विचाराने आई खुश होती.

शिल्पाचे सासरचे लोक चांगले होते, त्यांना शिल्पाच्या आईने कल्पना दिली होती,मुलगा ही गुणी होता त्याला शिल्पाची आवस्था कळत होती ,तो जबाबदार मुलगा होता ,आणि त्याला  ही ही जबाबदारी समजत होती.

मुलाच्या पसंतीत होणाऱ्या जावयाला ही विचारले होते,आणि शिल्पाला ही आईने विचारायचे म्हणून विचारले, तिला ही वहिनी ठीक वाटली म्हणून तिने ही भावाच्या पसंतीस उतरलेल्या वहिनीला हिरवा कंदील दाखवला.

दोघांचे ही लग्न एकाच मांडवात झाले, सून घरी येण्याचा आनंद आणि लाडाची लेक सासरी जाण्याचे दुःख सांभाळत येत नव्हते, वडील असते तर आज खूप खुश झाले असते शिल्पाला हवं नको ते सगळे त्यांनी जातीने पाहिले असते. शेवटी पोरकी झाली होती बाबा शिवाय.

सासर खूप चांगले होते म्हणून शिल्पाला कोणी दुखवत नसत, पण म्हणतात ना सुख टोचत असते तसेच काही शिल्पाला झाले. सासू सोबत पटायचे पण नणंद घरी आली की सगळे फिस्कटायचे ,सासू सगळा वेळ आपल्या ननंदेला देते ,सगळे तिचे लाड करतात,ती आली की घरभर तिचाच जप करतात,नवरा ही तिच्या पुढे पुढे करतो ,जशी ही अजून ही ह्याच घरात आहे ,लग्न झालेच नाही अशी लहान असल्या सारखी लागते. तिच्या आवडी निवडीच्या खाण्याच्या पदार्थांच्या रीघ लागतात, आता हिचे फक्त दोन दिवस माहेरपण असावे तर ही 8 ते 10 दिवस राहून जाते.

तिचे हे वागणे तिच्या आणि तिच्या नवऱ्या मध्ये वादाचे कारण ठरु लागले,ती नेहमी हेच म्हणत ताईंनी त्यांच्या घरी रहावे ,इथे त्यांनी पाहुण्यासारखे यावे ,मुली सारखे येऊन कुठे ही कश्यात ही लुडबुड करू नये, हे तिचे घर नाही ,तिचे घर तिचे सासर असते. शेवटी ती दुसऱ्या दिवशी माहेरी निघून गेली. तिथे ही आईला न कळवता, नवऱ्याला न कळवता निघून गेली.

नवीन वहिनीला आईची घट्ट मैत्री झालेली पाहून तिला तिची कोणी तरी जागा घेत आहे ह्याचा तिला खूप राग येत होता, तिची खोली आणि त्यातील समान कोणी तरी हक्काने वापर करत आहे ह्याची ही चिडचिड होऊ लागली.
तिच्या कपटाला ही आता तिची सत्ता राहिली नाही हे तर अतीच झाले होते. तिने तडक वहिनीची सर्व सामाण बाहेर काढले ,आणि संपले सगळे सामान आत टाकले. आई ,वहिनी आणि भाऊ हे बघत होते, वहिनी काही बोलली नाही पण भाऊ मात्र तडक बाहेर आला आणि म्हणाला "काय problem आहे ग, अशी का वागतेस तू?"

हे माझे घर आहे,इथे फक्त माझे समान राहील,माझी room मी कोणाला देणार नाही ,मी इथे जेव्हा ही येईल तेव्हा तेव्हा मी माझा हक्क तसाच गाजवेल,माझ्या बाबाच हे घर आहे, कोणी तरी नवीन येईल आणि मला बाहेर काढले असे होणार नाही. मी नांदायला गेले म्हणजे माझे हक्क संपले काय इथले .मी ह्याच घरची आहे, हे माझे घर आहे, आणि बाहेरून अली ती ही मुलगी जिला तुम्ही सून म्हणताय.

हे सगळे घडतांना शिल्पाचा नवरा रवी मागून ऐकत होता, त्याने येऊन टाळ्या वाजवल्या, तेव्हा सगळे त्याच्या ह्या वागण्याकडे बघतच होते, हा असा का टाळ्या वाजवत आला.

ओ तर तू तिकडे ही तुझंच वर्चस्व गाजवणार आणि इथे ह्या घरची लेक म्हणून इकडे ही तुझेच वर्चस्व गाजवणार,
माझी बहिण आली आणि तिचे येणे तुला आवडत नाही म्हणून तू मला न सांगता माहेरी येणार .

तिच्या असला आपल्या मुलीचा हेकेखोर पणा आणि तिचे वागणे कळले होते, त्यांनी तिला आली तशी नवऱ्यासोबत परत जाण्यास सांगितले आणि सांगितले तू जर मानाने येशील तर मान मिळेल ,तू जर तुझंच खर करण्यासाठी माहेरी उठसुठ येशील आणि ते ही भांडून तर हे मी खपवून घेणार नाही.


तेव्हा रवीने शिल्पाला उठवले, डोळे पुसले आणि म्हणाला काल पासून मी ही हेच तुला माझ्या ताई बद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होतो,जे तू रडून रडून ,काकुळतीला येऊन ,तुझा कसा हक्क जास्त आहे आणि वहिनीची कमी आहे, तू कशी घरची लेक आहे,तू कशी आधी पासून इथे आहे, वाढली  आहेस, परकी तर वहिनी आहे,घरची लेक ती लेक आहे, मग हेच तुला काल का वाईट वाटत होतं,
माझी बहिण ही सगळ्यात आधी priority असणार मग तू सून म्हणून असणार,तिला हवं तेव्हा ती येणार,तिला हवे तितके दिवस ती राहणार यात तुला इथून पुढे वाईट वाटायला नको, हक्क जन्माने येतात जसे तुझे तुझ्या ह्या घराशी तसेच ताईंचे माझ्या घराशी .

आईने शिल्पाला  काही समजदारीचा गोष्टी सांगितल्या, आता बाबा नाहीत म्हणजे तूला समजून घेणारे कोणी नाही असे नाही पण आता तुझी तू समजदरीने वागावे ,
हो आणि जसे हे तुझे घर आहे तसे तुझ्या ननदेचे ही घर ते ही हक्काचे आहे,तुझ्या आधी तिचा त्या घरावर अधिकार असणार ,तू मोठी म्हणून समजून घेणे गरजेचे आहे.