*उगाचच काहीतरी*
गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण हे बहुतांश बहिणींचे आवडते गाणे.. आणि दुसर्या बाजूला सैंय्या छेड देवे , नणंदजी चुटकी लेवे ससुराल गेंदा फूल, हे बर्याच वहिनीचे आवडते गाणे..तसे बघायला गेले तर अगदी सौख्याचे असलेले हे नाते.. पण बर्याच मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये सासूसोबत नणंदेलाही खलनायिका दाखवले जाते..एका लेखकानी लिहिलेली वाक्ये मनात रुतून बसलेली आहे.. त्यांचे नाव आठवत नाही आत्ता.. "मी बहिणींना सांगितले आहे , माहेरी आलात की पाहुणचार घ्यायचा आणि निघायचे.. घरात हा पडदा का लावला? हे का केले असे विचारायचे नाही. " हे खरेच असे असते का? खरेतर आपण जिथे एक, दोन वर्षे राहतो त्या बद्दल आपल्याला आपुलकी, जिव्हाळा वाटतो.. मग जिथे वयाची 20,25 वर्षे गेली असतील, त्या ठिकाणाबद्दलच्या भावना लग्न झाले म्हणून बटण दाबले की बंद होणार? आणि आई हि बर्याचदा मुलीच्या सल्ल्यानुसार घराची सजावट करत असते.. त्या मुळे मुलींना लग्नानंतरही माहेरचे घरच आपले वाटत असते.. राजाराणीचा संसार असला तर प्रश्नच नाही.. पण घरात सासुसासरे असतील तर सुरुवातीची काही वर्षं तरी तिला ते तेवढे जवळचे वाटत नसते.. अशा वेळेस भावाचे किंवा एकूणच समाजाचा दृष्टीकोन खटकतो..कोणतीही स्त्री आपल्या आईवडिलांच्या संसारात दखल देते कारण ते तिचे असते.. तशी दखल गरज नसेल तर ती आपल्या बहिणीच्या, भावाच्या, दिराच्या किंवा नणंदेच्या संसारात देत नाही.. कारण ती माणसे जरी आपली असली तरी संसार त्यांचा आहे हे समजण्या इतपत सूज्ञ ती नक्कीच असते.. आणि ही जुन्या किंवा आपले बालपण जिथे गेले आहे त्या ठिकाणाबद्दलची ओढ प्रत्येक माणसांमध्ये असतेच ना? वडिलोपार्जित घर सोडून वेगळे राहिलेला मुलगाही तिथे रहात नसला तरी हे का केले असे विचारतोच ना? So हि भावना असते.. शेवटी जग कितीही बदलले तरी भावना बदलत नाही..आणि कितीही काही झाले तरी कोणाशीही संबंध कसे ठेवायचे हे त्या घरच्या स्त्रीच्या हाती असते.. बदलत्या काळानुसार बर्याच घरांमध्ये नणंद भावजयींचे प्रेमाचे, मैत्रीचे नाते असतेच.. ते सगळीकडे दिसावे.. हिच ईच्छा..कारण *भावजयभी कभी नणंद थी*...
*सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा