नणंद - भावजय ( भाग ४)

नणंद भावजय च्या प्रेमाची गोष्ट.

देवकी - यशोदा 


मागच्या भागात आपण पाहिले अक्षरा कधीही आई होऊ शकणार नाही. ऋता ने मनाशी काहीतरी निश्चय केला. पुढे ऋता लग्न होऊन सासरी गेली आणि अक्षरा एकटी पडली. 


ऋता मात्र अक्षरा ला जमेल तेव्हा फोन करून चौकशी करत. ऋता आनंदी आहे हे बघून अक्षरा मनोमन सुखावत होती. ऋता ला लवकरच दिवस गेले आणि ऋता ने केलेल्या निश्र्चयाची ही नांदी होती. अक्षराला खरंच ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ऋता ७ व्या महिन्यात माहेरी आली. अक्षरा पुन्हा ऋता ची काळजी घेण्यात रमली. नणंद भावजय हे नात विसरून त्या अगदीच एकमेकींची सुखदुःख जाणून घेऊ लागल्या. ऋता चे आवरण्यात, तिच्याशी गप्पा मारण्यात, तिच्या गर्भारपणातील आनंदात अक्षराचे दिवस अगदी सुखात जाऊ लागले आणि असेच २ महिने कुठे गेले ते अगदी दोघींनाही कळले नाही. स्वतःचं दुःख बाजूला सारून मोठ्या मनाने अक्षरा ऋता च सगळं अगदी आनंदात करते हे कुटुंबातील कुणाच्याही नजरेतून सुटत नव्हते. ऋताच्या प्रसूतीचा दिवस आला. ऋता ला प्रसुतीकळा सुरू झाल्या. ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. २ तास प्रसुतीकळा सोसल्यानंतर तिने २ गोंडस मुलींना जन्म दिला. प्रसूती नॉर्मल झाल्यामुळे ऋता लवकरच बोलू लागली. तिने अक्षरा ल जवळ बोलावले आणि ऋता म्हणाली... "वहिनी, माझ्या या दोन्ही मुलींमधली एक मुलगी आजपासून तुझी. कसलाही विचार न करता आजपासूनच तू तिला आईच्या मायेने जवळ कर. तिला खूप प्रेम दे. मी कधीही पुन्हा तिला परत मागणार नाही." अक्षरा हे ऐकून हुंदके देऊन रडू लागली आणि म्हणाली, "दीदी हे तुमचं बाळ आहे. तुम्ही मला कसकाय देऊ शकतात. आणि एवढा मोठा निर्णय घेताना तुम्ही इतरांचा सल्ला सुद्धा घेत नाहीयेत. तुम्ही मनाने फार मोठ्या आहात पण खरंच तुमच्या सासरी तुम्हाला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो म्हणून मी आत्ता हे बाळ स्वीकारू शकत नाही." ऋता उत्तरादाखल म्हणाली,"वहिनी मला आज एक बाळ जरी झालं असतं तरी मी ते तुम्हालाच देणार होते आणि हा निर्णय मी सासरच्या मंडळींशी बोलूनच घेतला आहे. त्यामुळे तुम्ही या बाळाचा स्वीकार करा. तुम्ही तिला कसलीही कमी पडू देणार नाही याची मला खात्री आहे आणि कधीही देवकी पेक्षा यशोदाच श्रेष्ठ नाही का?" तेवढ्यात ऋता ची सासरची मंडळी आत आली. सगळ्यांनी ऋताच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्वीकार केला. दोन्ही कुटुंब या ननंद-भावजयचं प्रेम बघून मनोमन सुखावले. सगळ्यांनी या दोघींना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि अक्षरा ने तोपर्यंत बाळाला कवेत घेतलं सुद्धा. 



अश्विनी सोनवणे - अभोणकर 









🎭 Series Post

View all