नणंद भावजय- सख्ख्या मैत्रिणी...भाग 3
©®ऋतुजा वैरागडकर
©®ऋतुजा वैरागडकर
सायलीने स्वतःच्या पायावर उभ राहण्याचं ठरवलं. ती मृणालिनीसोबत सगळं बोलली, तिला सगळी परिस्थिती सांगितली.
सासू- सासऱ्यांनी आधी थोडी नाटकं केली पण मग तेही तयार झाले. सायलीने लग्ना आधी ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला होता. त्याचाच उपयोग म्हणून तिने ब्युटी पार्लर सुरू केलं. देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं आणि तिचं पार्लर चांगलं चालायला लागलं.
हळूहळू मुलगा मोठा होत गेला, आता मुलाचं शिक्षण सुरू झालं. सायलीचं सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण विवेक देखील मार्गी लागावा अशी तिची इच्छा होती. तो दिवसभर बाहेर भटकायचा, घरी असला तरी मोबाईल बघत राहायचा पण काहीच काम करत नसे. बिझनेस तर ठप्प झालाच होता. दुसरं काहीतरी करावं म्हणून सायली त्याच्या मागे लागलेली होती. घरचे त्याला काहीच बोलत नव्हते ती काही बोलायला गेली की तिला गप्प बसवत असतं.
मुलगा पाच वर्षाचा झाला, सायलीने त्याचा मोठा वाढदिवस करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे चांगला मोठा वाढदिवस झाला. सगळे खूप आनंदात होते आणि त्याच रात्री एक अघटीत घटना घडली. विवेकचा एक्सीडेंट झाला आणि तो जागीच मरण पावलेला होता.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये विवेक नशेत होता हे सिद्ध झालं. तो निघून गेला पण सायली एकटी पडली. ऐन तिशीत ती विधवा झाली. पदरात एक मूल आणि वय कमी..
तिला काहीच कळत नव्हतं काय करावं? ब्युटी पार्लर सुरूच होतं. सासर्यांची मोडकी तोडकी पेन्शन होती पण ते घराला हातभार लावत नव्हते. सायली कसं तरी घर चालवायची.
दिवस हळूहळू सरत गेले, सायलीच्या माहेरच्यांनी आणि काही नातेवाईकांनी तिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करायला सांगितला.
समोर अख्ख आयुष्य आहे, एकट्या बाईने कसं काढायचं? सासू सासरे आहेत तोपर्यंत ठीक आहे पण समोर तू एकटीच राहणार आहेस. त्यामुळे दुसरे लग्न करशील तर तू सुखी होशील. जोडीदार मिळेल तुला. असं तिच्या नातेवाईकांनी, घरच्यांनी तिला सांगितलं. तिने तिचा प्रस्ताव तिच्या सासू- सासऱ्यांसमोर ठेवला तर ते तिच्या अंगावर धावून उठले.
तू असा कसा विचार करू शकतेस? तू आमची सून आहेस आम्ही तुला परक्या घरी कसं जाऊ द्यायचं? पदरात मुलं आहे तुझ्या विसरलीस का? असं म्हणून त्यांनी तिला गप्प केलं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा