नणंद-भावजय गोड मैत्रिणी

Nitu lagn houn sasari aali ani sasarchi sagli jababdari tichyavar sopvnyat aali

नितु...

लग्न होऊन सासरी आली आणि सासरची सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली...

माहेरी चौकोनी कुटुंब, त्यामुळे कधी कोणती जबाबदारी नाही पडली अंगावर...

सासरी भरलं कुटुंब सासुसासरे, चुलत सासू सासरे, नंदा, जावा, दिर ,त्यांची मुले..वीस बावीस जणांचं कुटुंब...

नितु जी सकाळी उठायची ती रात्रीच रूम मध्ये जायची...

कधी कधी समीरलाही राग यायचा..

"नितु तू मला वेळच देत नाहीस...

समीर, आय एम सॉरी, मलाही वाटत तुझ्यासोबत वेळ घालवावा, कधीतरी तुझ्यासोबत बाहेर फिरायला जावं... पण घरातल्या कामामुळे मी खूप व्यस्त असते रे..

"मी बोलू का घरच्यांशी?..

"नाही नाही.., उगाच कोणाला बोलायला चान्स नको...

एक दिवस सगळ्या समोर  न राहवून समीर बोलला...

"नितु आज संध्याकाळी तयार रहा , आपल्याला बाहेर जायचय...

नितुची लहान नणंद शुभदा बोलली, अरे वा, वहिनीला बाहेर न्यायचय ,मग संध्याकाळचा स्वयंपाक कोण करणार...

"तू कर ना आजचा दिवस...

" वहिनी काही उशीर लागत नाही, पटकन तर होत.. तू तुझा स्वयंपाक करून जा... बाकीच्या मोठ्या मंडळींनी पण हो ला हो लावलं.. नितुनी काहीही न बोलता पूर्ण स्वयंपाक केला... आणि ओटा आवरत असताना तिच्या हातावर गरम तेल सांडलं.. ती जोरात किंचाळली... तसाच समीर किचन मध्ये आला, नितु च्या हाताला खूप भाजलेल बघून तो तिला हॉस्पिटल ला घेऊन गेला...

डॉक्टरांनी ट्रीटमेंट करून आराम करायला सांगितलं आणि पाण्यात हात घालायचा नाही अशी ताकीद देऊन ठेवली..

दोघेही घरी गेले.. समीर ने घरी सगळं सांगितलं... दुसऱ्या दिवशी नितुच्या सासूने शुभदाला बोलवल आणि

"शुभदा आज स्वयंपाक तू करून घे, नितुच्या हातानी काही जमायचं नाही...

"ये आई नाही ग, एवढ्या जणांचा स्वयंपाक मी करणार नाही... किती वेळ लागतो, एवढ्या गर्मीत मी करणार नाही..

बाजूला उभा राहून समीर हे सगळं ऐकत होता..

"वा.. वा.. त्यादिवशी नितुला बोललीस ना, किती वेळ लागतो तू तुझं करून जा.. मग आता काय झालं... उगाच " बढाईला पुढे, लढायला मागे" खूप बोललीस ना तू तिला, मग आता तुला करायला काय होतंय.. घे कर, ती रोजच करते एवढ्याच लोकांचं . एक दिवस तू पण करून बघ... कुणाला बोलायला सोपं जातं पण तेच स्वतः वर आलं ना की मग कळत...

"आय एम सॉरी दादा.." "हे तू मला म्हणू नकोस.. जीला म्हणायचं आहे तिला म्हण..

शुभदा नितुच्या रूम मध्ये गेली,

"वहिनी आय एम सॉरी ग, माझ्या मुळे तुझा हात भाजलाय, मी उगाच त्यादिवशी तुला बोलले ..

"अहो ताई तुम्ही प्लीज अशी माझी माफी मागू नका... तुमच्या मुळे नाही झाल...

"नाही वहिनी,आता मी तुला कधीच त्रास देणार नाही.. तुला सगळी मदत करील... प्रॉमिस..

"सो वहिनी फ्रेंड्स...

"फ्रेंड्स...

दोघीही एकमेकींचा हात पकडून  हसल्या.. 

आता दोघीही अगदी छान मैत्रिणी झाल्या.. एकमेकींची काळजी घ्यायच्या..

समाप्त