नणंदबाईचे माहेरपण...भाग 3 अंतिम

Nanad bavjayich God nat
नणंदबाईचे माहेरपण...भाग 3 अंतिम


"वहिनी तू किती छान सांगतेस ना."

"आई आणि तू दोघींनी मिळून मला भरभरून प्रेम दिले, तुम्ही दोघींनी मला माहेरची आठवण येऊ दिली नाही, दोघींनी मला किती सांभाळून घेतलं. आता माझी वेळ आहे तुला सांभाळून घेण्याची, तुझं माहेरपण करण्याची आणि तुझे लाड पुरवण्याची."

दोघींनीही एकमेकींना जवळ घेतलं.

पूर्ण आठ दिवस अनघा तिच्या माहेरी राहिली, अनघाने तिचे सगळे लाड पुरवले, तिला अगदी राणीसारखं ठेवलं.

सतीशराव तिला न्यायला आले, तिने त्या दोघांचा खूप छान पाहुणचार केला.

अनघा आनंदात तिच्या सासरी गेली, माहेरून ओंजळभर आनंद घेऊन गेली, वाहिनीच्या गोष्टी लक्षात ठेवून ती सासरी वागायला लागली, राहायला लागली आणि खरच तिचा संसार खूप सुखाने होऊ लागला. समोरच्याला प्रेम दिलं की आपल्यालाही प्रेम मिळतं हेच खरे.

आठ दिवसांनी अनघाचा फोन आला.

"हॅलो वहिनी.."
"बोल ग."


"थँक यू वाहिनी."

"अग थँक यू काय?"

"तू येताना जो ओंजळभर आनंद दिलास होता ना मला, तो आयुष्यभर जगण्याला नवी ऊर्जा देईल. थँक्यू वहिनी थँक्यू सो मच."

"अग असं काय ते तुझ्या हक्काचं होतं. आपल्या हक्काचं असतं ते मिळतच आणि तू कधीही ये तुझं माहेर पण असंच होणार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत."


नणंद भावजयचे नाते
बहिणीसारखे असावे
कितीही रुसवे फुगवे असले तरी
मुरलेल्या लोणच्याप्रमाणे असावे..
माहेरी आल्यावर सगळ्यांनी
त्यांचे लाड पुरवावे
हेही त्यांचं हक्काचं घर आहे
प्रेमाने त्यांना राहू द्यावे..
वाहिणींनी नणंद बाईच्या
आवडीचे सगळे करावे
वर्षभर स्वतःसाठी करते
एक दिवस नणंदबाईचे माहेरपण करावे...


समाप्त:

🎭 Series Post

View all