नणंदबाईचे माहेरपण...भाग 2

Nanad bhavjaych god nat
नणंदबाईचे माहेरपण...भाग 2

दोन महिन्यापूर्वी अनघाचं लग्न झालं आणि आज ती पहिल्यांदा तिच्या माहेरपणाला आलेली होती. अनघा येणार म्हणून मिहिकाने तिच्या आवडीचे सगळे पदार्थ करून ठेवलेले होते. तिचं छान औक्षण केलं.

दोघींनी गप्पा मारल्या त्यानंतर मिहीकाने तिच्या आवडीचं शरबत आणून दिलं.

दोघींना अस हसत हसत बघून अनघाच्या आईला खूप बरे वाटले.

ती लगेच अनघा जवळ आली,

"काय ग अनघा. वहिनी जवळ आहे म्हणून आईला विसरलीस की काय?"

"असं काही नाही ग वहिनीने इतकं छान स्वागत केले की मी त्या आनंदात वाहवून गेले."

"चल तू फ्रेश हो, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेत मी." मिहिका तिला किचनमध्ये घेऊन गेली, मिहीकाने तिला जेवण वाढलं.


एवढे पदार्थ बघून अनघाला आश्चर्य वाटलं.

"बापरे वहिनी अग किती पदार्थ बनवलेस तू."

"अग करू दे ग, सासरी गेल्यानंतर असे लाड होत नाहीत, करू दे मला."


अनघाचे डोळे पाणावले.

"काय ग काय झालं?"

"काही नाही ग वहिनी, इतक सुंदर माहेरपण होईल याची कधी कल्पनाही केली नव्हती."

"का माझ्यावर विश्वास नव्हता तुझा."

"विश्वासाचे नाही ग."

"चल आता जेवून घे मग जेवढे रडायचं ना तेवढं रड."

दोघींचं सगळ आवरून झालं आणि दोघीही गप्पा मारायला रूम मध्ये गेल्या.


"काय म्हणत तुझं सासर? सतीश राव काय म्हणतात?"

"चांगला आहे ग तो, मला समजून घेतो. इतक्या लवकर माणसं कळणार नाहीत, थोडा वेळ लागेल."

"हो पण एक सांगू का, सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. कधी कधी नातं टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे घ्यावा लागतो तर कधी एक पाऊल समोर घ्यावा लागतो, दोन्हीची तयारी ठेव. नात्यात कधीही अहंकार येऊ नये. मी पणा आणू नये, त्याच्याने नाती दुरावतात. सासूची एखादी गोष्ट नाही पटली तर त्यांना प्रेमाने समजावून सांग. त्यांच्यावर रागावू नकोस किंवा तू ही रुसू नकोस.

त्यांना प्रेमाने समजावून सांगितलंस ना तर त्या समजतील आणि नाही समजल्या तर मग सोडून द्यायचं. काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्यायच्या काही गोष्टी आपल्या मना प्रमाणे हाऊ द्यायच्या. पण वाद घालायचा नाही अगदी कुणाशीही नाही."

क्रमशः

🎭 Series Post

View all