नणंदबाईचे माहेरपण...भाग 1
लग्न झाल्यानंतर अनघा पहिल्यांदाच तिच्या माहेरी आली, दारात पाऊल ठेवताच वहिनीन नणंद बाईंना बघून
"अहो नणंद बाई थांबा जरा घाई काय?"असं म्हणून त्यांना दारातच थांबवलं.
आतून आरतीचं ताट आणलं. ननंद बाईचं औक्षण केलं आणि त्यांना मानाने आत घेतलं.
हे सगळं बघून अनघाला खूप आश्चर्य वाटलं. तिने हसत हसत मिहीकाला विचारलं.
"वहिनी हे सगळं काय आहे ग?"
"काय म्हणजे ननंद बाईचे स्वागत आहे."
"काय ग वहिनी नणंद बाई वगैरे काय? ननंद बाई म्हणून मला ओल्ड करू नकोस हं."
"नाही म्हणणार चल तू बस मी तुझ्यासाठी थंड गार शरबत करते."
"अगं वहिनी बस ना थोडा वेळ मग करशील."
"काय ग एकटीच आलीस? सतीश राव का नाही आले?
त्याला अर्जंट बाहेर जावे लागले त्यामुळे तो नाही येऊ शकला पण रिटर्न मध्ये मला घ्यायला येणार आहे सो तेव्हा त्याचे लाड पुरवता येतील तुला." असं म्हणून अनघा हसायला लागली.
अनघा आणि मिहिका ननंद भावजय...
दोघींचं बहिणीचं, मैत्रिणींचं आणि नणंद- भावजयीच प्रेमळ नातं.
दोघींचं बहिणीचं, मैत्रिणींचं आणि नणंद- भावजयीच प्रेमळ नातं.
मिहिकाच्या लग्नाला चार वर्षे झालेली होती, मिहीका आणि सागर एक प्रेमळ जोडपं. घरात सासू-सासरे आणि अनघा एकुलती एक लाडाची नणंद असं प्रेमळ कुटुंब होतं.
क्रमशः