Aug 16, 2022
कथामालिका

नक्षत्र मैत्री..

Read Later
नक्षत्र मैत्री..
आपणांस कळवण्यात आनंद होत आहे की,... मी आपल्यासाठी \"नक्षत्र मैत्री\" ही एक नवीन मालिका घेऊन येत आहे.... या मालिकेत...अवकाशातील नक्षत्रांच्या रंजक माहिती बरोबर.....त्या नक्षत्रा संबंधित अदभुत अश्या पुराण कथा देखिल सांगेन......म्हणजे माहिती बरोबर मनोरंजन देखिल होईल.......

चला तर मग सुरुवात करुया ...आणि जाणुन घेऊयात.... नक्षत्रांची रंजक माहिती.......


व्रुषभ
( Taurus )
हिवाळ्यात रात्रीच्या आकाशात उतर गोलार्धात दिसणारा एक मनमोहक तारकासमूह म्हणजे व्रुषभ होय .
हा तारकापुंज म्हणजे आपली दुसऱ्या क्रमांकाची राशी होय. या राशी मध्ये सुर्य १४ मे ते १९ जून पर्यंत असतो .
या राशीतील\" व्ही \" आकाराचा तारकापुंज \" हैडस \" म्हणून ओळखला जातो .यातील रोहिणी (Aldebaran )हा तारा रोहिणी नक्षत्र म्हणून प्रसिध्द आहे .
यातील प्रसिद्ध तारकापुंज म्हणजेच क्रुतिका .(Pleiades ) होय .
क्रुतीका ला सप्तमाता असेही म्हणतात .अंबा , दुला , नितत्नि अभ्रयंती , मेघयंती , वर्षयंती आणि चुपुणीका अशी त्यांची नांवे आहेत . हा आकाशातील प्रसिध्द असा खुला तारकागुच्छ आहे .
ग्रीक पुराणात टॉरस ची मनोरंजक कथा आहे .देवांचा राजा झ्यूस अत्यंत वीलासी होता .फिनिशियन रूपसुंदर राजकुमारी युरोपा वर तो मोहित झाला .तिला आपल्या वशात करण्यासाठी त्याने पांढऱ्या रंगाचे बैलाचे रूप घेतले .त्या सुंदर बैलावर युरोपा मोहित होऊन त्याच्या पाठीवर बसली .त्याचबरोबर तत्काळ त्या बैलाने अवकाशात झेप घेतली .
हिंदू पुराणात रोहिणी चंद्राची आवडती राणी होती अशी आख्यायिका आहे .
या व्रुषभ तारकापुंजात ..रोहिणी (Aldebaran) हा लाल रंगाचा राक्षसी तारा सर्वात तेजस्वी आहे .आपल्या पासुन याचे अंतर सुमारे ६८ प्रकाशवर्ष आहे .हा अनियमित स्वरूपाचा रुपविकारी तारा आहे .
या ताऱ्यांच्या भोवती एक प्रचंड आकाराचा मोठा ग्रह फिरत असल्याचं लक्षात आले आहे .हा ग्रह गुरू ग्रहापेक्षाही ११ पटीने मोठा आहे .रोहिणी भोवती सुमारे ६४ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो .
या तारकापुंजात वर्षातून दोन वेळा उल्कावर्षाव होतो .एन्कि हा धूमकेतू याला कारणीभूत आहे .
दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 25
नोव्हेंबर या दरम्यान उल्कावर्षाव होतो .नोव्हेंबर 5 आणि 12 या दिवशी प्रमाण जास्त असते .पण हा उल्कावर्षाव इतरांनाच्या तुलनेत फारच कमी म्हणजे फार..तर ताशी चार ते पाच उल्का पाडतात .त्यामुळे या उल्कावर्षावाची फारशी चर्चा होत नाही .

- चंद्रकांत घाटाळ
संचालक - अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा
7350131480
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक