"तू तुझं जेव बरं. तिच्याकडे नको लक्ष देवूस. येता जाता सारखा तिच्या खोड्या काढत असतोस."
"अगं आई.. तुला माहित नाही, जेव्हापासून त्या सरांना धडकली आहे ना तेव्हापासून हे असेच सुरू आहे तिचे."
"तुलाही जाणवले का ते?"
"म्हणजे...?
"म्हणजे तुझ्या बाबांना आणि मलाही दोन दिवसापासून तिच्यातील बदल जाणवत आहे."
"बस झालं आई, आता खरंच हिचे लग्न उरकून टाकायला पाहिजे." पुन्हा एकदा अमेयची गाडी ताईच्या लग्नावर येवून घसरली.
आजकाल अदिती वेगळ्याच दुनियेत जगत असल्याचे फील ती स्वतःदेखील करत होती. तितक्यात तिचा फोन वाजला आणि तिच्या विचारांची तंद्री तुटली.
"अदिती आधी जेवून घे बरं, कोणाचा फोन आहे? नंतर कॉल बॅक कर पुन्हा."
"अगं आई ईशाचा फोन आहे. आलेच पटकन्."
"ही मुलगी पण ना."
"ये हाय ईशा...बोल ना.. आता ह्यावेळी फोन? म्हणजे उद्या भेटणारच होतो ना आपण म्हणून म्हटलं. पण काही अर्जंट आहे का ग?"
"अगं हो हो थांब. श्वास तरी घे. किती प्रश्न विचारतेस?"
"अगं तसे नाही म्हणजे तू काही अर्जंट असेल तरच फोन करतेस ना म्हणून विचारले."
"अगं त्यांना फोन केला होता. हेच सांगायला तुला कॉल केला मी. राहावलेच नाही काय करू? जस्ट त्यांचा फोन ठेवला आणि लगेच तुला कॉल केला. त्यांच्यासोबत बोलल्यामुळे खूप हलकं वाटतंय आता. निदान त्यांचा गैरसमज तरी दूर झाला."
"अरे बापरे! तू तर खूपच फास्ट निघालीस ग. म्हणजे आजच तुला मी सांगितले आणि लगेच फोन केलासुद्धा."
"मग काय..नेकी और पूछ पूछ."
"ह्ममम...मग काय म्हणाले ते?"
"काही नाही अगं. सुरुवातीला थोडे रागातच बोलले पण नंतर त्यांनाही पटले माझे म्हणणे."
"अरे वा! छानच की मग. खूप समजूतदार आहेत म्हणजे."
"हो अगं आणि आणखी काय म्हणाले माहितीये? म्हणाले की तुमच्या मैत्रिणीला माझ्याकडून स्पेशल थँक्स् सांगा."
"आता माझे नाव कशाला सांगितलेस तू त्यांना? बावळटेस का तू जरा मंद."
"अगं पण त्यांनी पण विचारलेच ना की, तुमचे जर कोणावर प्रेम होते तर आम्हाला बोलवायच्या आधी तुमच्या आई बाबांना कल्पना द्यायची होती तुम्ही. मग मी सांगितले माझ्यात तितकी हिंमत नव्हती माझ्यात पण माझ्या मैत्रिणीमुळे मी धाडस केले. मग कुठे त्यांना पटले."
"अच्छा...मग ठीक आहे."
"पण अदिती खरंच खूप थँक्यू गं. तू आहे म्हणून सगळे प्रश्न कसे पटापट सुटतात. तू दिलेला प्रत्येक सल्ला खूप कामी येतो बघ."
"बरं चल आई बाबा जेवायचे थांबले आहेत माझ्यासाठी. तुला जे काही माझे आभार मानायचे आहेत, ते उद्या कॉलेजला आल्यावर मान. आधीच आई म्हणत होती की नंतर फोन कर आधी जेवून घे. पण आपण उद्या नक्की बोलुयात या विषयावर."
"बरं बरं कर जेवण. भेटुयात उद्या, बाय.. गुड नाईट."म्हणत दोघींनीही फोन ठेवला.
पण अदितीला अजून हे समजले नव्हते की तिने ईशाला ज्या स्थळाला नकार द्यायला भरीस पाडले होते ते स्थळ दुसरे तिसरे कोणाचे नसून प्रो.शंतनु सदावर्ते यांचेच होते.
तिकडे शंतनु सरांना मात्र ईशाची मैत्रीण अदिती नेमकी कोण? राहून राहून हाच प्रश्न सतावत होता.
अदितीचे ते निरागस बोलणे, तिचे ते गोड हसणे, अचानक असे गाडीच्या समोर येणे. सारे काही आठवून शंतनु सर मात्र गालातल्या गालात हसत होते. लहान भावासोबत अदितीची सुरू असलेली नोकझोक पाहून तर सर खूपच खूश झाले.
"काहीतरी आहे ह्या मुलीमध्ये? पण काय? ते मात्र समजेना. जर इशाची मैत्रीण ती हीच अदिती असेल तर मग मानले राव ह्या पोरीला. मैत्रिणीला असा सपोर्ट करून तीन आयुष्य खरच बरबाद होण्यापासून वाचवली आहेत तिने. त्या दिवशी आईसमोर देखील खरे बोलायला अजिबात डगमगली नाही. खरं तर आईलादेखील अशीच सून मिळायला हवी."
नुसत्या विचारानेच शंतनु सरांच्या मनात शादी के लड्डू फुटत होते तसेच चेहऱ्यावर वेगळीच चमकदेखील आली होती.
"माझे मन मला सांगतंय की ती हीच अदिती आहे म्हणून. जर काहीच कनेक्शन नसते तर सलग दोन दिवस ती अशी माझ्याच गाडीसमोर आली नसती. पण ती हीच आहे हे शोधायचे कसे?"
शंतनु मनाशीच बोलत होता. "पण देवा ती हीच अदिती असू दे म्हणजे झालं." मनातून तो देवाला प्रार्थना करत होता.
तसे पाहिले तर आग दोन्ही बाजूने सारखीच लागली होती. दोघांच्याही मनाला प्रेमाची भावना हलकेच साद घालू पाहत होती.
नको नको म्हणताना...
अखेर प्रेमाची पालवी फुटायला
सुरुवात ही झाली,
दोन मने एकमेकांसाठी
नव्याने जगायला देखील लागली..
अनोळखी हे बंध रेशमी
होतील का कधी एक?
प्रेमाच्या या गोड नात्याचा
पसरेल का सुगंध चहू दिशेत?
अखेर प्रेमाची पालवी फुटायला
सुरुवात ही झाली,
दोन मने एकमेकांसाठी
नव्याने जगायला देखील लागली..
अनोळखी हे बंध रेशमी
होतील का कधी एक?
प्रेमाच्या या गोड नात्याचा
पसरेल का सुगंध चहू दिशेत?
क्रमशः
कशी सुरु होणार शंतनु आणि अदितीच्या प्रेमाची कहाणी? जाणून घेऊयात पुढील भागात.
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा