नक्षत्र मैत्री.. भाग२ ययाती

ययाती तारका समूहाची कथा..
Perseus - ययाती


ययाती संगितले की, आपल्या समोर वि. स. खांडेकर सरांनी वर्णन केलेला ययाती उभा राहणे साहजिकच आहे.... कारण ययाती ही कादंबरी न वाचलेले फार मोजकी लोकं मिळतील..


आज आपण त्याच ययाती बद्दल माहिती घेणार आहोत... मात्र अवकाशात....


उतरेच्या आकाशातील अतिशय मोठा आणि विलोभनीय तारकासमूह म्हणजे ययाती.... यात हौशी खगोल निरीक्षकांना निरीक्षण करण्यात सारखे अनेक तारे व तारकागुच्छ पहायला मिळतील.


एका ग्रीक कथेनुसार देवांचा राजा आक्रीसीऊस ची कन्या डेएन यांचा पर्सीऊस हा पुत्र .अत्यंत पराक्रमी योद्धा म्हणून प्रसिध्द होता. मेडुसा या भयानक राक्षसीनिचा वध करण्याच्या कामगिरी वर त्याची रवानगी करण्यात आली.
त्याने मेडुसाचे शिर धडावेगळे केले. आणि या शिराचा उपयोग करून त्याने सेटुस या सागरी सैतानाचा वध केला.
ययाती तारकासमूहातील अल्गोल हा रूपविकारी तारा प्रसिध्द आहे.आकाशात ययातीचीच्या आक्रुतीची कल्पना केलेल्या मेडुसाचे तो शिर दाखवतो.

भारतीय पुराणांत ययाती विषयी अनेक कथा आहेत.त्या इथे सांगत नाही... कारण.. आदरणीय वि. स. खांडेकर सरांनी या विषयी अदभुत लिखाण केलच आहे. हे आपल्याला आधी संगितलेच..

या तारकासमूहाच्या आजूबाजूला ययाती पत्नी देवयानी व शर्मिस्ठा हे तारकासमूह देखिल आहेत......देवयानी म्हणजे अँड्रोमेडा आपल्या आकाशगंगेला सर्वात जवळची दिर्घिका आहे.... ती आपल्या पासुन सुमारे बावीस लाख प्रकाशवर्षे दूर आहे.... देवयानी म्हणजे आपल्या आकाशगंगेची मोठी बहिणच .....

बाजुला ययाती पत्नी ...शर्मिष्ठा उत्तरेच्या आकाशात उलट्या M आकाराची दिसते.... उत्तर आकाशात ती सहजच ओळखता येते....तीच्या बाजूला... वृषपर्वा वैगरे... नक्षत्र आहेत....
त्यांची पुढील भागांत माहिती घेऊच..
ययाती तारकासमूहाच्या निरीक्षणासाठी नोव्हेंबर- डिसेंबर महिना योग्य...अनेक ताऱ्यांचा खच पडलेला या तारका समूहात दिसतो..... हाताशी एखादी दुर्बीण असली तर... यातील ताऱ्यांचे निरिक्षण करण्याची मजा वेगळीच......

क्रमशः

- चंद्रकांत घाटाळ
संचालक - अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा
7350131480

🎭 Series Post

View all