नाकारलेली ती!!

Nakarleli



ती अनाथाश्रमात पोहचते.. तो ही सोबत असतो

ती सगळ्या मुली निरखून बघते... तो तिच्या सोबत असतो...

तिला एक काळी सावळी... मुलगी आवडते आणि म्हणते हीच आपण घेऊ...मला हीच आवडली आहे...

तो....अग पण ही अशी...इतर ही आहेत त्या बघून घे...घाई करू नकोस...

ती....नाही मला हीच हवी ,हीच आवडली आहे.. कारण विचारू नकोस

तो....तू का असे वागतेस...काय आवडले तुला त्या मुलीमध्ये... आपल्या घरी सूट होणार नाही ती..किती ऑड वाटेल ती आपल्या घरात..

ती.... अरे तिला मुलगी म्हणून घेऊन जाणार आहोत आपण ,कोणता शो पीस म्हणून नाही घेऊन जात आहोत रे...निदान मनाचा नाही पण माझ्या जुन्या वेदनेचा विचार करशील...ती वेदना कमी व्हावी म्हणून मी हिलाच दत्तक घेणार आहे..

तो... मी हिला आपली मुलगी कसे मानू यार... जी बघताच क्षणी नको वाटते...कृष वाटते...मला नको ही...तू अजून ही निर्णय बदलावा...निदान तिचे संगोपन करतो तिच्या बद्दल प्रेम तर वाटावे ना मनापासून....तिला बघूनच ती नकोशी वाटते..

ती आता आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर खूप संतापली होती..रागाच्या भरात ती काही ही ऐकून घेणार नाही असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते, ती ज्या कटाक्षाने त्याच्या कडे बघत होती त्या नजरेकडे बघून जणू असे वाटत होते की अजून एक जरी शब्द त्याने त्या अनाथ मुलीबद्दल उच्चारला तर हिच्यातील एक अनाथ ,सावळी, इतरांनी वेळोवेळी नाकारलेली, तुच्छ समजलेली ,कोणी ही तिच्या कडे फिरकत ही नसे... जिला कोणी साधे जवळ ही घेत नसे...ती मुलगी आता ह्या माणसावर बरसणार होती....त्याने त्या मुलीला नाकारणे म्हणजे नकळतपणे तिला नाकारणे असे तिच्या आतील त्या अनाथ मीनल ला वाटत होते...

मीनल, जी आज ह्या अशाच एका नाकारलेल्या,कृष मुलीला दत्तक घ्यायला आली होती, जिला कोणी ही दत्तक घ्यायला तयार नव्हते...मग तिच्या मनात जुन्या आठवणींचा एक काळ तिच्या मनात डोकावला...तिला जो काळ आयुष्यात नसता तर किती बरे झाले असते असे वाटत होता... आपण जन्मालाच नसतो आलो तर अजूनच बरे झाले असते... मग देवाने जन्मच का दिला...जर सगळ्या जगाने आम्हाला नाकारायचे होते तर....का त्याने त्या आईच्या पोटी जन्म घातला जिला मीच नको होते.... असे अनेक असह्य वेदनेचे दुःख घेऊन ती आज ही जगत होती...

आणि मग कोणी तरी देव माणूस तिच्या आयुष्यात येतो आणि जिला सगळे नाकारत होते नेमका तो तिलाच दत्तक काय घेतो...आणि तिला आपल्या अख्ख्या प्रॉपर्टी ची एकुलती एक मालकीण म्हणून घोषित करतो....एक बलशाली आणि खूप गर्भ श्रीमंत माणूस तिला मुलगी म्हणून घेऊन जातो...आपले नाव ही देतो...मग आशिष सारख्या श्रीमंतीला भुललेल्या ,आणि स्वार्थापोटी तिच्या सोबत लग्न करू पाहत असलेल्या मुलाला तिच्यासाठी निवडतो....

ह्या बापाला इतर बापाप्रमाणे ,आशिष ची परीक्षा पहावी असे वाटते आणि तो मीनल ला ह्या अनाथाश्रमात जाऊन एक अशी मुलगी दत्तक घ्यायला सांगतो की जिला कोणी स्वीकारत नाही ,जिला कोणी पालक मिळत नाही....आणि मग मीनल ही बाबांचे म्हणणे ऐकते.... तिच्या मनातील एका कप्प्यात हे असेच करावे ही मनोमन इच्छा असते आणि तीच ओळखून बाबा तिला त्या अनाथ मुलीला दत्तक घ्यायला सांगतात..


ती तर परीक्षा होती, ज्यात आशिषला पास होने गरजेचे होते नाहीतर मीनल त्याची होणार नव्हती...

पण आशिष ह्या परीक्षेत बाबांच्या काय मिनलच्या ही पसंतीस उतरला नव्हता, मीनलला तो आपला जीवनात नको होता... तिला कळले होते की जर हा एका अनाथ मुलीला माझ्या बाबांच्या खर्चावर ही स्वीकृत करू शकत नाही..आणि उलट तो तिला इतरांप्रमाणे तुच्छ लेखतो तर हा माझे सत्य समजल्यावर मला ही स्वीकारणार नाही ,किंवा होऊ शकते की तो माझ्या पैस्याला पाहून मला माझ्या गुण दोषा सहीत स्वीकारेन ही...पण मला अशी संकुचित वृत्तीने वावरणारी व्यक्ती नकोय...कारण तो जेव्हा जेव्हा ,ह्या मुलीला तुच्छ भावनेने वागणूक देईल तेव्हा तेव्हा माझ्यातील ,ती नाकारलेली मुलगी त्याचा तिरस्कारच करेन....


ती मागे फिरून, आशिष ला सांगते....मी आज आत्ता पासून सांगू इच्छित आहे की मी जगेन तर फक्त अनाथ मुलांसाठी आणि मरेन तर फक्त अनाथ मुलांचे संगोपन करतांना ...

तो... म्हणजे काय म्हणायचे तुला..

ती... म्हणजे मी लग्नच न करण्याचा निर्धार केला आहे... तर तू माझ्या आयुष्यात जसा आला आहेस तसा तू परत फिर....कारण तुला माहीत नाही की तू जिच्या शी लग्न करणार होतास ती ही एक अनाथ, नाकारलेली...मुलगी आहे...जी कोणाच्या ही घरात सूट होत नव्हती...आणि तुझ्या ही घरात सूट होणार नाही...so good bye....

तो हे सत्य ऐकताच चक्रावून गेला.... त्याला आज मीनल बद्दल हे सत्य कळल्यावर तिची साथ देऊ की माघारी फिरू ह्या नात्यातून हे कळत नव्हते... पण तरी इतके कटू बोलल्यावर आपल्याला मीनल कधीच स्वीकारणार नाही हे समजत होते..


ती..... आशिष तू खऱ्या अर्थाने मुक्त झाला आहेस...तुला मी मुक्त केले आहे... कारण मी ह्या मार्गावर चालणार आहे हे ठरवले आहे...

तो.... मी चूक केली अग... जमले तर मी ही येईल तुझ्या सोबत...

ती...मी ह्या मार्गावर बाबांच्या पैश्याची ताकद घेऊन येणार नाही हे लक्षात असू दे....मी त्यांनी दिलेली ओळख आणि त्यांनी दिलेले शिक्षण ह्याच भरोश्यावर मार्गक्रमण करणार आहे... इथेच कमाई करणार आणि तिच ह्या मुलांसाठी खर्च करणार...बाकी मार्ग कठीण आहे... तू ह्यावर नाही चालू शकणार...कारण इथे फक्त समाधान आहे.... सुख ऐशो आराम असेलच असे नाही...हो दुसरे म्हणजे जो जसा आहे तशी स्वीकारण्याची वृत्ती अंगीकारावी लागेल....जमत असेल तर बघ... मी वाट बघेल तुझी...अगदी कोणत्या ही वळणावर...

तो... मला जमेल असे ??

ती... नाही, तू मुळात ह्यासाठी बनलेलाच नाही..तू परत जा...तुला अजून ही बरेच मार्ग आहेत...त्यात मीच सोबत असावी असे ही नाही..